गडांवरील शिल्पे

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
3 May 2012 - 12:03 pm

गडांवर भटकंती करत असता बरीच शिल्पे नजरेस पडत असतात.
गडांच्या प्रवेशमार्गावर हनुमान, गणपतीच्या कोरीव मूर्ती आढळतात, तर प्रवेशद्वारांवर शरभ, गंडभेरूंड, व्याल, गज, कमळ आदी कोरलेले आढळतात. खुद्द गडमाथ्यावर काहीवेळा आगळ्यावेगळ्या मूर्ती आढळतात. मंदिरांचे काही अवषेश, काही स्थानिक गडदेवतांच्या मूर्ती, शिवलिंग इत्यादी तर पोर्तुगीज, ब्रिटिशांची सत्ता राहिलेल्या किल्ल्यांवर त्यांचे नाविक सामर्थ्याचे चिन्ह, जगावरील त्यांच्या स्वामित्वाची चिन्हे आढळतात.
ह्या शिल्पाकृतींवर गडाचा काळ, त्याचे राज्यकर्ते, गडबांधणीची शैली इ. तपशील कळू शकतो. वास्तविक गडांवरील शिल्पे हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय. पण त्याचे फारसे संकलन केल्याचे फारसे आढळून येत नाही.
ह्या धाग्याद्वारे गडशिल्पांचे संकलन करण्याचा अल्पसा प्रयत्न मी केला आहे.

१. रतनगडावरील गणेश दरवाजात कोरलेली गणेशाची चतुर्भुज मूर्ती

२. रतनगडावरच्या हनुमान दरवाज्यात असलेली अर्धे शरीर सर्पाकार असलेली चतुर्भुज मूर्ती

३.मल्हारगडावरील अष्टभुजा

४. सुधागडाच्या निम्म्या चढावात असणारी हनुमान मूर्ती

५. सुधागडाच्या दरवाजानजीक असलेली एका वीराची मूर्ती (जुझांत धारातीर्थी पडलेल्या वीराचे स्मारक म्हणूनही ही स्थापिली असावी, हा वीरगळ मात्र नाही)

६. सुधागडाच्या दरवाजावरील शरभ शिल्प

७. कोर्लई किल्ल्यावरील पोर्तुगीजांचे जागतिक स्वामित्व दाखवणारे चिन्ह

८. कोर्लईवरीलच पोर्तुगीजांचे 'आर्म्स ऑफ कोट' चिन्ह(शिलालेखाचा संक्षिप्त अर्थ: हा किल्ला बांधण्याची आज्ञा भारताचा व्हाईसरॉय डॉंम फिलिपे मस्कारेन्हास याने १६४६ मध्ये दिली आणि चौलचा कॅप्टन फर्नाओ मिरांडा हेन्रीक्स याने १६८० मध्ये हे काम संपवले. ह्या किल्ल्याचा कॅप्टन(किल्लेदार) क्रिस्ताव डी अबेइरू डी अझेवेदो हा आहे)

९. वासोटा किल्ल्याच्या पायवाटेवरील वीर हनुमान

१०. मकरंदगडावरील देवळातल्या शिल्पप्रतिमा

११. घनगडावरील गारजाई माता

१२. माहुली किल्ल्यावरील दरवाजातील पंख असलेल्या शरभाचे आगळेवेगळे शिल्प

१३. माहुली किल्ल्यावरील रानांत पडलेले त्रिशुळासारखे कोरलेले शिल्प (शैली थोडीशी इस्लामिक आहे)

१४. सरसगडावरील शिलाहारकालीन शिल्प

१५. वसईवरील पोर्तुगीजांचे नाविक सत्तेचे चिन्ह

१६. वसईवरीलच इंग्रजांच्या नाविक सत्तेचे चिन्ह (हे किल्ला पेशव्यानंतर इंग्रजांकडे गेल्यानंतरचे आहे)

१७. वसईवरीलच काठ्या (की मेणबत्त्या?) तोंडात पकडलेल्या कुत्र्यांचे इंग्रजकालीन शिल्प

१८. जीवधनाच्या प्रवेशद्वारावरील चंद्र, सूर्य व मध्ये कलश (बहुधा शिवलिंग) शिल्पाची शैली जरी इस्लामिक वाटत असली तरी हे काम शिलाहारकालीन (९/१० व्या शतकातील) आहे. गधेगाळांवरील बरेच वेळा अशी शिल्प कोरलेली दिसतात.

१९. शिवनेरीच्या प्रवेशद्वारावरील शरभाचे शिल्प

२०. राजमाचीवरील छ्त्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या मूर्ती

२१. राजमाचीवरील एका खोदीव गुहेच्या प्रवेशद्वारावरील गणेशपट्टी (वास्तविक ही गुहा सातवाहनकालीन असून गणेशमूर्ती मात्र यादवकालानंतर कोरली गेली असावी)

२२.रोहिड्याच्या प्रवेशद्वारावरील गजशिल्प व त्याच्या शेजारचा देवनागरीतील शिलालेख.

२३. पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली काही उद्धस्त शिल्पे

२४. हडसर किल्ल्याच्या महादेवाच्या रावळातील गरूडमूर्ती

२५. माहुलीवरीलच शिवलिंग

२६. रायगडाच्या महादरवाजावरील शरभ शिल्प

२७. रायगडाच्या बाजारपेठेत असलेल्या नागाचे एक शिल्प

२८. रायगडाच्या नगारखान्यावरील शरभाचे शिल्प

२९. नगारखान्यावरच कोरलेली सहस्त्रदल कमल

३०. राजमाचीवरचा एक वीरगळ

प्रतिक्रिया

निनाद's picture

3 May 2012 - 12:09 pm | निनाद

अतिशय चांगले संकलन आहे. माहिती बद्दल धन्यवाद!

पियुशा's picture

3 May 2012 - 12:56 pm | पियुशा

+१
हेच म्हणते :)

प्यारे१'s picture

3 May 2012 - 12:30 pm | प्यारे१

सही है वल्ली.... मस्तच धागा!

बाकी शरभ म्हणजे कुठला प्राणी?
आणि शिल्पांबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल हे वे सां न लगे.

शरभ म्हणजे सिंहासारखा दिसणारा काल्पनिक पशू.
हिरण्यकश्यपूच्या वधानंतरही विष्णूचे नरसिंहरूप शांत होईना. तेव्हा शंकराने त्याहूनही उग्ररूप धारण करून शरभेश्वर असा अवतार धारण करून नृसिंहाला शांत केले अशी काहीशी पुराणांत कथा आहे.

कवितानागेश's picture

3 May 2012 - 12:50 pm | कवितानागेश

पन्हाळ्यावर (कदाचित तीन दरवज्यावर) एका ठिकाणी मुसल्मनी पद्धतीची टोपी घातलेला गनपतीबाप्पा आहे. गाईडनी सांगितले की आदिलशहाच्या काळातच हा कोरलेला आहे.

मस्त रे, सोलापुरच्या भुईकोट किल्यावर सुद्धा आहेत अशी शिल्पं, परवा लक्षात नाही राहिलं नाहीतर फोटो आणुन दिले असते,
अवांतर - रतनगडाच्या वाटेवर असलेल्या देवळात एक शिल्प पडलेलं पाहिलं होतं, त्याचा फोटो आहे, तो इथं दिलातर चालेल का ? ज्ञानी लोक अर्थ सांगतीलाच त्याचा.

प्रचेतस's picture

3 May 2012 - 1:10 pm | प्रचेतस

बिंधास्त टाका हो ५०.
ते गधेगाळाचं शिल्प आहे. :)

बॅटमॅन's picture

3 May 2012 - 1:00 pm | बॅटमॅन

अतिशय उत्तम माहिती :)

स्पा's picture

3 May 2012 - 1:01 pm | स्पा

अप्रतिम रे वल्ली...
खरच सुंदर कलेक्शन केल आहेस ..
वेळो वेळी यात भर घालत जा

बाय द वेय त्या वसईच्या कुत्र्याच्या तोंडात ते हाडूक असाव अस वाटतंय ;)

मी-सौरभ's picture

3 May 2012 - 2:21 pm | मी-सौरभ

मन्याच्या पूर्ण प्रतिसादाशी सहमत.

मुक्त विहारि's picture

3 May 2012 - 1:47 pm | मुक्त विहारि

अजून काही प्रकाश-चित्रे असतील तर टाका...

सानिकास्वप्निल's picture

3 May 2012 - 2:16 pm | सानिकास्वप्निल

अप्रतिम!!

जयंत कुलकर्णी's picture

3 May 2012 - 2:47 pm | जयंत कुलकर्णी

छान... मी ही टाकेन काही.....

बिपिन कार्यकर्ते's picture

3 May 2012 - 2:55 pm | बिपिन कार्यकर्ते

फोटो आणि माहिती उत्तमच!

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2012 - 2:59 pm | अत्रुप्त आत्मा

ग्रेट संकलन व माहिती...या बाबतीत आंम्ही गडकरींच्या हेरणार्‍या नजरेचा/दृष्टीकोनाचा अनुभव कसब्यातल्या त्या देवळात त्या दिवशी घेतला होता.एखादे शिल्प त्या मागची ऐतिहासिक पौराणिक कथा अशा मार्गानी त्याचा वल्लींचा असलेला अभ्यास ग्रेटच आहे... :-)

वल्ली साहेब, अतिशय मस्त लेख व फोटो.

फोटो व त्यांची माहीती अतिशय उत्तम

वल्ली साहेब , अतिशय सुंदर लेख व फोटो

ग्रेट आहेस.. आम्हाला (मला) तर ही शिल्पे / मूर्ती आजुबाजूला असूनही बर्‍याचदा दिसतही नाहीत. लक्षातच येत नाही.

नुसते सरळ किल्ल्यामधे किंवा मंदिरात जाऊन परत यायचे हीच पद्धत...

आसपासची ही देखणी कलाकुसर नजरेस पडणे, म्हणजे त्याला खास नजर हवी, आणि ती तुझ्याकडे आहे... मान गये..

यकु's picture

3 May 2012 - 3:34 pm | यकु

वा: !
बर्‍याच ‍प्रतिमा/चिन्हांची नवी ओळख झाली.
परिचित देवांच्या मूर्तींचे फोटो नसतील तरी चालेल.

इंडियाना जोन्सचे हे आर्काइव्ह्ज पहाताना डॅनपंत ब्राऊन ह्यांची आठवण झाली ;-)

sneharani's picture

3 May 2012 - 3:34 pm | sneharani

मस्त संकलन, फोटो ही छान आहेत.
:)

चांगले संकलन.
क्र. १८ मधे कलश / शिवलिंग नसावे. केवळ डिज्जाईन असावे असे वाटले.

सुहास झेले's picture

3 May 2012 - 5:32 pm | सुहास झेले

मस्त... :) :)

स्वच्छंदी_मनोज's picture

3 May 2012 - 7:42 pm | स्वच्छंदी_मनोज

वल्लीजी छान कल्पना आणी मस्तच संकलन...

गेली अनेक वर्ष भटकताना अशी अनेक शिल्प बघण्यात आली आहेत...

हे माझ्याकडून काही फोटो...

१. किल्ले त्रिंबक (ब्रम्हगिरी) चढताना लागणारे - बहुधा नाथपंथीय - शिल्प

२. किल्ले हरीहर वरील शिवपिंडी आणी पाऊले

३. कुर्डूगडावरील मल्लीकार्जून शिल्प

३. त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याच्या असलेल्या लेण्याच्या छतावरील शिल्प

४. त्रिंगलवाडी किल्ल्याच्या दरवाज्यात असलेले १०-१२ फुटी हनुमान शिल्प

५. अशेरीगडावर असलेले पोर्तुगिज कालीन शिल्प

६. अशेरीगडावरील वाघदेव, चंद्र आणी सुर्य प्रतीमा असलेले शिल्प

अजूनही बर्‍याच शिल्पांचे फोटो आहेत... शोधतो आता.

---- मगाशीच प्रतिसाद टंकला होता पण प्रकाशित करताना मिपा गंडले ------

प्राध्यापक's picture

3 May 2012 - 7:45 pm | प्राध्यापक

वल्ली,एकदम भन्नाट लेख गड्या,आणी फोटो तर मस्तच.....शब्द कमी पडतायेत....

पैसा's picture

3 May 2012 - 8:12 pm | पैसा

लेख, फोटोंचं संकलन भन्नाटच.

मनोजने टाकलेले फोटो पण मस्त आहेत. मनोज, तुम्ही लिहिलेली किल्ल्यांची नावं पण नेहमीच्या ऐकण्यातली नाहीत. त्यांच्याबद्दल आणखी लिहा. फोटो आहेत म्हणजे तुमच्याकडे आणखी माहिती असणारच!

अप्रतिम संकलन ! :)
शरभाचे शिल्प बरेच वेळा दिसत आहे, त्या बद्धल माहिती असल्यास जाणुन घ्यायला आवडेल. :)

स्वच्छंदी_मनोज's picture

3 May 2012 - 8:48 pm | स्वच्छंदी_मनोज

माझ्या मते ही सर्व विजय चिन्हे आहेत आणी हिंदू मायथॉलोजिकल (मराठी शब्द माहीत नाही :( ) आहेत...
गंड-भेरुंड ही मराठ्यांची शिवकालीन निर्मिती. जे जे किल्ले शिवकालात बांधले किंवा दुरुस्त केले त्या किल्ल्यांवर हे आढळते.
शरभ चिन्ह हे त्याहून जुने आणी व्याल ह्या कल्पीत प्राण्याचे चिन्ह तर अती-प्राचिन... माझ्या मते व्याल असा कोणी प्राणी नाही तर हे संपूर्ण इमॅजिनरी चिन्ह आहे. व्यालचे शिल्प असेल तर तो किल्ला निश्चित १५०० किंवा त्याहून प्राचिन समजावा...सह्याद्रीतील फारच थोड्या किल्ल्यावर हे चिन्ह बघायला मिळते.. तोरणा किल्ल्याच्या भट्टी गावात उतरण्यार्‍या आणी आता बुजलेल्या चित्ता दरवाज्यावर व्यालाचे शिल्प बघायला मिळते त्यामुळे तोरणा किल्ला तेवढा प्राचिन आहेच...

वल्ली आदि जाणकार अधीक माहिती देऊ शकतील

मदनबाण's picture

3 May 2012 - 8:54 pm | मदनबाण

धन्यवाद b manoj :)

धन्यवाद मनोज.
संग्रहातील फोटो मस्तच आहेत.
महाराष्ट्रातील किल्ल्यांवर त्याहीपेक्षा शिवकालीन किल्ल्यांवर शरभाचे शिल्प आढळते. गंडभेरूंड आणि व्याल ही दाक्षिणात्य शैलीतील शिल्पे. गंडभेरूंड म्हणजे एकाच धडातून दोन चोची फुटलेल्या गरूडाचे शिल्प.
व्याल, शरभ आणि गंडभेरूंड ही तीनही पशू पुराणकथांतून आलेले आहेत.
महाराष्ट्रातील गडांवर व्यालाचे शिल्प फारसे आढळत नाही पण इथल्या मंदिरांमध्ये मात्र ते बर्‍याच ठिकाणी पाहावयास मिळते. व्याल हाही सिंहासारखा पशूच. काहीसा नृसिंहासारखा हा कोरलेला आढळतो. बर्‍याच मंदिरांत व्यालाचे फक्त मुखच कोरलेले दिसते. तर काही ठिकाणी मुखासह संपूर्ण शरीर कोरलेले दिसते.

पुण्याजवळील भुलेश्वर मंदिरातील व्यालमुख

भुलेश्वरातीलच संपूर्ण व्याल

गंडभेरूंड दक्षिणेकडच्या किल्ल्यांत आढळते. शिलाहार भोजांनी बांधलेल्या किल्ल्यात गंडभेरूंडांची शिल्पे दिसतात.

शरभ आणि गंडभेरूंड ही विजयचिन्हे तर व्याल हा संरक्षक म्हणून समजला जातो.

शरभ आणि गंडभेरूंडाच्या पायात आणि शेपटीत धरलेल्या हत्ती म्हणजे राजांनी नमवलेल्या राजसत्तांचे प्रतिक मानले जाते.

मदनबाण's picture

3 May 2012 - 10:36 pm | मदनबाण

वल्ली सेठ धन्यवाद. :)

स्वच्छंदी_मनोज's picture

3 May 2012 - 11:10 pm | स्वच्छंदी_मनोज

हो नक्कीच व्यालाचे शिल्प मुख्यतः मंदिरामधूनच कोरलेले दिसते.

किल्ल्यांवर मुख्यतः शरभाचे शिल्प कोरण्याचे पण कारण काय असेल? शरभ शिल्प शक्ती आणी विजयाशी बाकी दोन चिन्हांपेक्षा अधिक जोडले होते काय?

आणी एक... ह्या फोटोतील चिन्हात वराह दिसतो आहे.. ह्या विशयी अधिक माहीती आहे का? हा फोटो मी कुकडेश्वर मंदिराच्या उद्ध्वस्त शिलाखंडाचा काढला आहे (त्या वेळेला हे मंदिर जसेच्या तसे बांधण्याचे पुरातत्व खात्याचे चालले होते. आशा आहे की ते काम आता पुर्ण होऊन परत मंदिर उभे राहीले असेल).

मस्तच संकलन होते आहे....आता फोटोंच्या खजिन्यातून अजून शिल्पांचे फोटो शोधणे आले.

किल्ल्यांवर मुख्यतः शरभाचे शिल्प कोरण्याचे पण कारण काय असेल? शरभ शिल्प शक्ती आणी विजयाशी बाकी दोन चिन्हांपेक्षा अधिक जोडले होते काय?

शरभ हे ताकदवान शक्तीचे प्रतिक होते. हिरण्यकश्यपूच्या वधानंतरही रौद्र असलेल्या नृसिंहाला शांत करण्यासाठी शंकराने त्यापेक्षाही रौद्र असे शरभरूप धारण केले अशी पुराणात कथा आहे. गंडभेरूंड हे कर्नाटकात जास्त आढळते महाराष्ट्रात शरभ शिल्पच जास्त प्रचलित होते.

या फोटोतील चिन्हात वराह दिसतो आहे.. ह्या विशयी अधिक माहीती आहे का?

हे वराह शिल्प म्हणजे विष्णूचा वराहावतार आहे. शिलाहार भोज झंझ राजाने ९व्या शतकात पूरचे कुकडेश्वर, खिरेश्वरचे नागेश्वर, हरिश्चंद्रगडावरचे हरिश्चंद्रेश्वर, रतनवाडीतील अमृतेश्वर अशी शिल्पसमृद्ध मंदिरे बांधली.
कुकडेश्वर मंदिर आता बर्‍यापैकी उभे राहिलेले आहे.

प्रास's picture

3 May 2012 - 8:51 pm | प्रास

वॉव वल्लीशेठ!

मस्त विषय आणि भन्नाट संकलन.

बी मनोज रावांचा प्रतिसादही झकास!

मान गये, आपकी पारखी नजर और आपका कॅमेरा, दोनोंको..... :-)

चिगो's picture

3 May 2012 - 10:51 pm | चिगो

वल्लीशेठ, फोटोज आणि माहिती दोन्ही सुरेख..
मनोजजींनी दिलेली माहितीपण मस्तच.. धन्यवाद !

स्पंदना's picture

4 May 2012 - 7:25 am | स्पंदना

वाह वल्ली!

मला वाटतेय असा गडावरिल शिल्पांच्या अभ्यासाचा हा पहिलाच प्रयत्न असावा. असाच व्यासंग वाढवा. शुभेच्छा!

एक सांगु का? तुमचा कॅमेरा इतिहास पकडतो. अन तो तसाच ठेवा, उगा इतिहासात सौंदर्य कशाला? इतिहास खुद्द सुंदर आहे!

वल्लीदा तुमची गड, लेण्या ह्यांवर आधारीत अशी लेखमाला नक्कीच ईतिहासाच्या विद्यार्थ्यांना फारच उपयुक्त आणि मोलाची ठरेल यात तिळमात्र शंका नाही.

उत्क्रुष्ट संकलन आणि तेवढेच स्पष्ट फोटो यामुळे फार जवळून पहाताना खूप मजा येतेय. प्रत्यक्ष गडावर जाता नाही आले तरी तुमच्याकडे असलेल्या संकलनातून बरेच काही घेण्यासारखे आहे :)

वा छान संकलन आणि फोटोही छान.

निशब्द मित्रा !

अतिशय छान आणि वेगळा वाटणारा धागा !