चित्रपटसृष्टीचे जनक कोण्??तोरणे कि फाळके?????????

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
3 May 2012 - 10:31 am
गाभा: 

राजा
हरिश्चंद्र’ या मूकपटाच्या आधी वर्षभर प्रदशिर्त झालेल्या ‘पुंडलिक’ या
मूकपटाला पहिल्या भारतीय चित्रपटाचा बहुमान मिळावा. त्याचप्रमाणे ‘पुंडलिक’
निर्माण करणार्‍या दादासाहेब तोरणे यांना चित्रपटसृष्टीचे जनक अशी उपाधी
देण्यात यावी, अशी मागणी प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि इंडियन मोशन
पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनचे संचालक विकास पाटील यांनी बुधवारी
पत्रकार परिषदेत केली.

दादासाहेब तोरणे यांचा 22 मिनिटे लांबीचा
‘पुंडलिक’ हा मूकपट 18 मे 1912 रोजी प्रदर्शित झाला होता, तर दादासाहेब
फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा 40 मिनिटांचा मूकपट 3 मे 1913 रोजी
प्रदर्शित झाला होता, असे सांगून पाटील यांनी ‘पुंडलिक’ चित्रपटाच्या
इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या जाहिराती पत्रकारांना दाखवल्या.
भविष्यात जनहित याचिका
दाखल करण्याचा मार्ग खुला असेल, असेही ते म्हणाले. याप्रसंगी तोरणे यांचे
पुत्र विजय आणि अनिल तोरणे उपस्थित होते.

प्रतिक्रिया

रणजित चितळे's picture

3 May 2012 - 11:06 am | रणजित चितळे

तोरणेच पहिले जनक हे मानायला काहीच प्रॉब्लेम नाही

वामन देशमुख's picture

3 May 2012 - 11:16 am | वामन देशमुख

हे काय नवीनच?

परिकथेतील राजकुमार's picture

3 May 2012 - 11:29 am | परिकथेतील राजकुमार

रामसे बंधु.

विवेक मोडक's picture

3 May 2012 - 11:57 am | विवेक मोडक

रामसे बंधु मॅन्युफॅक्चरिंग कं. च्या उत्पादनापैकी कोणते रामसे बंधु??

रामसे बंधु मॅन्युफॅक्चरिंग कं. च्या उत्पादनापैकी कोणते रामसे बंधु??

अर्थात ,थोरले रामसे बंधु...... (दरवाजा वाले ) :crazy: :crazy: :crazy:

चौकटराजा's picture

5 May 2012 - 7:00 pm | चौकटराजा

आपला अज्ञात वास संपलेला दिसतोय .
रामसे बंधुचे पिच्चर रिच्युअली पाहिलेला आ चौ रा .

विकास's picture

4 May 2012 - 7:42 pm | विकास

सहमत... :)

नाहीतर असे करूयात भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक "दादासाहेब" इतकेच म्हणूयात. म्हणजे त्यामगचे जे काही गलिच्छ राजकारण असेल त्याला "दरवाजा" दाखवता येईल. :-)

चिरोटा's picture

3 May 2012 - 11:29 am | चिरोटा

खरे आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Dadasaheb_Torne
The distinction may lie with the fact that, unlike Phalke, Torne sent his film overseas for processing.

इतका काळ फाळके यांचे नाव भूषवले गेल्यावर अचानक ही आठवण तोरणे वंशजांना का व्हावी इतकेच आश्चर्य. बाकी ज्याने पहिला चित्रपट काढला त्याला जनक म्हणायला कोणाचीच हरकत नसावी.

यातही एक दुसरा मुद्दा आहे. केवळ प्रथम निर्मितीला त्या त्या तंत्राचा "जनक" किंवा पायोनियर म्हणतातच असे नाही.

प्रथम विमान तात्विक अर्थाने राईट बंधूंच्या पूर्वीही उडवले गेले होते. त्या तंत्राचा विकास करुन पूर्ण नियंत्रणाखाली असणारे, हवेपेक्षा जड, इंजिनावर चालणारे, सस्टेनेबल (मराठी शब्द टिकाऊ?) विमानन तंत्र अस्तित्वात आणून प्रत्यक्ष वापराला चालना दिली म्हणून त्यांना विमानाचे जनक म्हणतात.

हवेत उडण्याची कला त्या आधीही होतीच.

तसा काही ब्रेकथ्रू सिनेमातंत्रामधे फाळके यांच्या गाठीस जमा आहे का ते पहावे लागेल.

अविनाशकुलकर्णी's picture

3 May 2012 - 12:35 pm | अविनाशकुलकर्णी

पुंडलिक हा स्वतंत्र सिनेमा नसून ते केवळ पुंडलिकाच्या कथेवरील नाटकाचे शूटींग घेतले व त्याचे प्रोसेसिंगही परदेशातून करुन घेतले याउलट "राजा हरिश्चंद्र" हि एक स्वतंत्र चित्रपट निर्मिती होती त्याचे बहुतांशी काम स्वदेशी श्रमनिर्मितीतून झाले होते असा काहिसा मुद्दा होता. आणि या उत्तरानंतर तो वाद बंद झाला होता. आता परत हा वाद का काढला गेला कळत नाही पण त्याचा फायदा घेऊन काही जात्यांध शक्ती जातीद्वेषाचे वातावरण निर्माण करायचा प्रयत्नात आहेत असे गुगल शोध घेतल्यावर आढळून आले.
हाच मुद्दा ग्राह्य धरून दादासाहेब फाळके यांना 'भारतीय'
चित्रपट सृष्टीचे जनक ही पदवी मिळाली. जर दादासाहेब तोरणे यांनी परदेशातून
प्रक्रिया करून आणली असेल तर ती भारतीय चित्रपट सृष्टीची सुरवात मानू नये
मात्र जर भारतात कोणी हे सगळे केले असेल तर नक्की त्या व्यक्तीसच जनक
मानावे.
असे हि एक मत वाचण्यात आले.

विकास's picture

4 May 2012 - 7:44 pm | विकास

आता परत हा वाद का काढला गेला कळत नाही
ऑ? तुम्हीच तर चर्चा प्रस्ताव टाकलात...

शित्रेउमेश's picture

3 May 2012 - 12:58 pm | शित्रेउमेश

दादासाहेब फाळके, हेच भारतीय चित्रपट स्रुष्टीचे जनक आहेत, कारण त्यांनी केलेला "राजा हरिश्चंद्र" हा पहिला संपूर्ण भारतात तयार केला होता.

रणजित चितळे's picture

3 May 2012 - 1:02 pm | रणजित चितळे

मग फाळकेच भारतीय सिनेमाचे जनक म्हटले पाहिजेत.

कपिलमुनी's picture

3 May 2012 - 1:08 pm | कपिलमुनी

आणि चित्रपट तयार करणे ह्या भिन्न गोष्टी आहेत..
तोरणेंच्या कार्याचा संपूर्ण आदर ठेउन असे म्हणावे वाटते कि " पुंडलिक " हा चित्रपट नव्हे ..
सध्या अनेक नाटकांचे शूटींग करून चित्रफीत बनवली जाते .. पण त्यांस "चित्रपट" अशी संज्ञा नाही ..

मी-सौरभ's picture

3 May 2012 - 1:10 pm | मी-सौरभ

कुणि का असेना...
त्याच्या वंशजांनी (मंजे आत्ताची फिल्म इंडस्ट्री) चालवलेली थेरं बघुन तो वर व्यथित होत असल्याचीच शक्यता जास्त आहे.

१९१२-१९१३ चा काळ पाहता, आणि त्या काळात ज्या मेहनतीने या दोघांनी चित्रपट बनविले
त्यासाठी दोघांचा सन्मान व्हावयास हवा.
काय हरकत आहे जर हा मान दोघांनाही दिला तर.

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक "दादासाहेब फाळके - तोरणे"

बिपिन कार्यकर्ते's picture

5 May 2012 - 5:26 pm | बिपिन कार्यकर्ते

परवा आयबीएनलोकमतवर यावर चर्चा झाली. चर्चा छानच झाली. त्यात तोरणेंचे पुत्र आणि अजून एक जण त्यांच्या बाजूचे तर परेश मोकाशी, नंदू माधव, अशोक राणे वगैरे दुसर्‍या बाजूस. त्यात मुख्य मुद्दा हा होता की चित्रपट म्हणला की नुसतं कॅमेरा आणि शूटिंग असं नसतं. त्याला एक निश्चित कथा, पटकथा, चित्रिकरण असं सगळंच असतं. एका नाटकाचं चित्रिकरण करणं याला चित्रपट म्हणत नाहीत. आणि तसं जर म्हणायचंच झालं तर मग दादासाहेब तोरण्यांच्याही आधी कलकत्त्यामधे काही अशी चित्रिकरणं झाली होती आणि ती पण आम जनतेला तिकिट लावून दाखवण्यात आली होती. त्यामुळे त्या निकषावरही दादासाहेब तोरणे पहिले ठरत नाहीत.

या सगळ्यावर तोरणे पार्टीला काही मुद्देच मांडता येत नव्हते. अगदी भावनेला हात घालणं चालू होतं. आणि तेच ते दळण. अगदीच हास्यास्पद. आज चित्रपटाला जे निकष आहेत ते पहिल्या चित्रपटाला लागू होत नाहीत, फाळके ४६ वर्षांचे तर तोरणे केवळ २२ वर्षांचे होते म्हणुन त्यांचं जास्त कौतुक वगैरे... डोक्यावर हात मारून घेतला.

अजून एक मुद्दा मांडला गेला, फळके पार्टी कडून, तो हा की फाळक्यांनी नुसता चित्रपटच नाही बनवला तर भारतात चित्रपट सृष्टी असावी, कशी असावी, ती कशी उभी करता येईल, नट (आणि मुख्य म्हणजे नट्या) कसे प्रशिक्षित करता येतील अशा अनेक बाबींवर महत्वाचे आणि अगदी मूलभूत विचार मांडले आहेत. आजही काही बाबतीत तेच विचार बेस म्हणुन घेऊन मग पुढचे विस्तारित विवेचन केले जाते. अशी समग्र विचार करण्याची दृष्टी तोरण्यांनी दाखवली नाही. अर्थात, तोरण्यांचे एक महत्वाचे स्थान आहे, त्यांचेही योगदान आहेच आणि ते मोठेच आहे. पुढे जाऊन त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. हे सगळ्याबद्दल राणे प्रभृतींनी त्यांच्याबद्दल निर्विवाद आदर व्यक्त केला आहे.

हे सगळं ऐकल्यावर मनात शंकेची पाल चुकचुकली. याला काही जातीय रंग तर नाही! माहित नाही. असेलही नसेलही. पण शक्यताही नाकारता येत नाही.

आयचा घो ह्या असल्या वांझोट्या चर्चेचा!

आजच्या तमाम अंग उघडे टाकणार्‍या नायिका पाहिल्यास फाळके किंवा तोरणे ह्यांना नेमके काय वाटले असते असला काहीतरी विषय घ्या आणि करा की राव चर्चा!

- (ह्या असल्या चर्चेचा जनक) सोकाजी

आशु जोग's picture

6 May 2012 - 1:31 am | आशु जोग

पहीला कोण हा पडलेला प्रश्न आहे

आज लखनौकरांची गरज आहे जे म्हणतील

'पहले आप, पहले आप'