गाभा:
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12871799.cms
सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी राष्ट्रपतींना असे पत्र पाठवले आहे की निवृत्त झाल्यावर खडकीला छानसा बंगला बांधायची योजना रद्द करावी.
राष्ट्रपतीपदावर असताना असे काय मोठे दिवे लावले की त्यातून निवृत्त झाल्यावर तशाच अवाच्या सवलती आमरण उपभोगत रहाव्यात?
राष्ट्रपतीपद हे एक अनावश्यक पांढरा हत्ती आहे ह्याचा एक उत्तम दाखला म्हणून प्रतिभाताई पाटलांच्या राष्ट्रपती कारकीर्दीकडे बोट दाखवता येईल.
अब्दुल कलामांसारखे लोक निदान आपल्या उर्वरित आयुष्यात काहीतरी करुन ह्या पदावर बसले आहेत. पण ह्यांचे काय? एखादे विमान उडवले, रणगाडा चालवला, पाणबुडी चालवली इतकेच? आणि हो, अफाट खर्चाच्या परदेशवार्याही.
प्रतिक्रिया
27 Apr 2012 - 2:27 am | रमताराम
आता एकदाचा बांधलाच आहे ना तो बंगला, कोणीतरी राहणारच तिथे तर या बैंना राहू दे कसं. रिकाम्या घराच्या मेंटेनन्सपेक्षा कुणीतरी राहतंय म्हटल्यावर खर्चलेला पैसा वापरात आला असं म्हणता येईल.
27 Apr 2012 - 2:53 am | पाषाणभेद
रिकामं घर कसं असेल?
समजा उद्या त्यांनी तेथे न राहयचे असे ठरवले तर तो बंगला खाली थोडीच राहणार आहे? त्याचा वापर कुणीतरी दुसरा मोठा साहेब (ती जागा सैन्याच्या ताब्यात असल्याने) करणारच की.
27 Apr 2012 - 3:40 am | यकु
मराठी प्रतिभाताई राष्ट्रपती असल्या तरी कदाचित चुकीच्या मराठी माणूस असाव्यात - कारण त्या मराठी आहेत तरी जळगावकडचा भाग वगळता मराठी माणसांनी त्यांना फारसा भाव दिलेला नाही, आणि या मराठी राष्ट्रपतींनीही त्या पदावरुन मराठी माणसाला फारशी किंमत दिलेली नाही असे वाटते.
एरव्ही एखादा पंजाबी राष्ट्रपती असता आणि तो निवृत्तीनंतर पुण्यात रहाणार आहे म्हटला असता तर 'अहो, आणखी कशाला सरकारचं फुकट खाताय, एवढे दिवस मजा मारलीत आता तरी अक्कल येऊ द्या आणि स्वत: खर्च करायला शिका' अशा खासगी पुणेरीबोली भाषेत अर्थनिष्पत्ती होणारी पत्रं त्याला पंजाब्यांनी लिहिली असती काय असा प्रश्न या निमित्ताने मुद्दाम पाडून घेतो.
प्रतिभाताईंनी राष्ट्रपती होऊन काय केलं त्यांचं त्यांना किंवा काँग्रेस प्रेमींना माहित. बाकी बाईची या पदावर निवड चुकलीच असा ठणठणाट त्या निवृत्त होताना सुरु झालेला दिसत आहे.
मागच्या रविवारी तर प्रतिभाताई प्रिन्स ऑफ वेल्स सोबत साडीवर लांब डगला घालून चालताना कशा विनोदी दिसतात, मिगमधून उतरताना ही थेरडी किती विनोदी दिसते अशा अर्थाचे लेख फोटोसहित अगदी संपादकीय पानावर पेपरमध्ये वाचले. हाइट म्हणजे बाईच राष्ट्रपती करायची होती तर वहिदा रहमान मस्त पर्याय होता अशीही पुस्ती त्या स्तंभलेखकाने जोडली होती. मला ते एकूण लिखाण नसती गरळ वाटले, कदाचित मी मराठी माणसाच्या अँगलने पाहिले असावे म्हणून.
27 Apr 2012 - 6:07 am | चौकटराजा
प्रतिभाताईंनी राष्ट्रपती होऊन काय केलं त्यांचं त्यांना किंवा काँग्रेस प्रेमींना माहित
भारतातील वेगवेगळे राष्ट्रपती व राज्यपाल यांचे लाल दिव्यापलिकड्चे भोगदान व शपथविधीपलिकडचे योगदान या विषयी " यकू " अभ्यासपूर्ण धागा निर्माण करतील व धाग्याचा लेख हा " मराठीत" च लिहितील अशी आशा आहे.
शुभेच्छू
चौ रा
30 Apr 2012 - 6:51 am | कौतिक राव
क्रुपया त्या पेपर ची लिन्क पाठवाल का??
मला ते कधी वाचेन असे झाले अहे...
30 Apr 2012 - 3:28 pm | यकु
http://paper.hindustantimes.com/epaper/viewer.aspx
या लिंकवर 01.04.2012 चा जुना अंक पहाणे. :)
1 May 2012 - 11:05 am | कौतिक राव
अनि मन्ड्ल पन आभारी
27 Apr 2012 - 5:29 am | हुप्प्या
moneylife.in/article/president-pratibha-patils-palatial-ahome-in-pune-many-unanswered-questions/25181.html
बाईसाहेबांची २ लाख ४२ हजार चौरस फुटाचा भूभाग घेऊन त्यावर मोठ्ठ्ठ्ठ्ठा प्रासाद (सरकारी खर्चाने) बांधायची मनीषा आहे. ही जागा सैन्याकरता होती पण आता ती ह्यांच्याकरता दिली आहे म्हणतात.
असंख्य सैनिकांऐवजी ह्यांना ही मोक्याची जागा दिल्याने देशाचे नक्की कसे भले होणार आहे?
मुळात ह्या बाईसाहेबांची त्यांच्या गावी गब्बर इस्टेट आहे. निवृत्त झाल्यावर ह्या देशोधडीला लागणार असे काही नाही.
27 Apr 2012 - 10:34 am | इरसाल
मा.द्वितीय नागरिकांचे काही मत वगैरे आलेले आहे काय कुठे.
की प्रथम नागरिक त्यांना फाट्यावर मारतात ?
अजुन एक राहीलं : विद्या बाळ यांच काही खरं नाही आता.
27 Apr 2012 - 10:55 am | चिरोटा
खडकीला रेंज हील्सच्या जवळ का? तिकडे बर्यापैकी भाव आहे जमिनीला. २ BHK फ्लॅट ४० लाखच्या खाली नाही बे.
27 Apr 2012 - 2:51 pm | सुनिल पाटकर
देशातील आजवरच्या सर्वांत दयाळू राष्ट्रपती असलेल्या प्रतिभा पाटील यांनी परदेश दौ-यावरील खर्चाच्या बाबतीमध्येही आतापर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींना मागे टाकले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये राष्ट्रपतींनी केलेल्या 12 परदेश दौ-यावर तब्बल 205 कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती माहिती अधिकाराखाली समोर आली आहे.
2007च्या जुलै महिन्यामध्ये देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांची निवड करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत चार खंडांमध्ये केलेल्या 12 परदेश दौ-यामध्ये त्यांनी 22 देशांना भेट दिली. पाटील यांच्या राष्ट्रपतिपदाची पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण होण्यासाठी अद्याप चार महिने असून, त्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा एक दौराही होणार असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रपतींनी आतापर्यंत ब्राझील, मेक्सिको, चिली, भूतान, व्हिएतनाम, इंडोनेशिया, स्पेन, पोलंड, रशिया, ताजिकिस्तान, ब्रिटन, सायप्रस, चीन, लाओस, कंबोडिया, संयुक्त अरब अमिराती, सीरिया, मॉरिशस, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया या देशांना भेट दिली आहे.
पाटील यांच्याआधीचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 47 दिवसांचे परदेश दौरे केले. कलाम यांच्याआधीचे राष्ट्रपती के. आर. नारायणन 46 दिवस परदेशात होते.
राष्ट्रपतींच्या परदेश दौऱ्यांची माहिती मिळविण्यासाठी गेली तीन वर्षे माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत अर्ज करण्यात आले होते. ही माहिती देण्यासाठी संबंधितांनी तयारी दर्शविली नाही. राष्ट्रपतींसाठी भाड्याने घेतलेल्या "एअर इंडिया'च्या विमानांचे भाडे भरणा-या संरक्षण मंत्रालयानेही मर्यादित माहिती दिली.
असा झाला खर्च :
- राष्ट्रपतींसाठी "चार्टर्ड फ्लाइट' म्हणून घेतलेल्या "बोईंग 747-400' विमानाचे भाडे 169 कोटी रुपये
- परदेशातील वास्तव्य, स्थानिक प्रवास, दैनंदिन भत्ता आणि इतर खर्चांसाठी 36 कोटी रुपये
- "चार्टर्ड फ्लाइट'चा खर्च संरक्षण मंत्रालय, तर परदेशातील खर्च परराष्ट्र मंत्रालय करणार
- "बोईंग 747-400' विमानाच्या 169 कोटी रुपयांच्या बिलापैकी अद्याप 16 कोटी रुपये बाकी
27 Apr 2012 - 10:13 pm | विकास
- राष्ट्रपतींसाठी "चार्टर्ड फ्लाइट' म्हणून घेतलेल्या "बोईंग 747-400' विमानाचे भाडे 169 कोटी रुपये
- परदेशातील वास्तव्य, स्थानिक प्रवास, दैनंदिन भत्ता आणि इतर खर्चांसाठी 36 कोटी रुपये
- "चार्टर्ड फ्लाइट'चा खर्च संरक्षण मंत्रालय, तर परदेशातील खर्च परराष्ट्र मंत्रालय करणार
- "बोईंग 747-400' विमानाच्या 169 कोटी रुपयांच्या बिलापैकी अद्याप 16 कोटी रुपये बाकी
हा खर्च करदात्याच्या खिशातून असते हे खरे आहे. पण त्या बाबत मला काही वावगे वाटत नाही, विशेष करून जर हे "अधिकृत दौरे" (state visits) असले तर काहीच गैर नाही. त्या राष्ट्रप्रमुख आहेत. त्यांनी काय इंटरनेटवर चीप डील्स कुठे मिळतील हे पाहून त्यात स्वतःचे फ्र्क्वेंट फ्लायर्सचे माईल्स घालून प्रवास करायचा का? त्यांचे किती (पतीव्यतिरीक्त) नातेवाईक होते वगैरेवरून टिका झाली तर ती समजण्यासारखी आहे आणि केली देखील पाहीजे. म्हणजे पुढचे राष्ट्रपती सावध होतील.
अर्थात पुण्यातल्या घराचा मुद्दा वेगळा आहे. पण ते घर/जमिन त्यांनी आता घेण्याचे टाळले आहे. :-)
29 Apr 2012 - 3:46 am | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे. सदर दौरे राष्ट्रांदरम्यानचे काही करार अधिकृत करण्यासाठी वगैरे केले असतील तर त्यात गैर नाही असे वाटते.
29 Apr 2012 - 4:20 am | हुप्प्या
देशाची आर्थिक स्थिती खराब आहे असे रडगाणे नेते कायम गात असतात. नियमितपणे भाववाढ चालू असते. असे असताना ह्या निरर्थक खर्चांना कात्री लावणे आवश्यक आहे. डझनावारी आचारी, तीन चार बटलर, लेडी असिस्टंट असला अनावश्यक गोतावळा घेऊन जायची काय गरज आहे? १६९ कोटी रुपया ऐवजी केवळ ५० कोटी खर्च झाले असते समजा तर काय आकाश कोसळणार होते का भारताची इज्जत मिट्टी मे वगैरे जायचा खतरा होता?
स्टेट व्हिजिट वगैरे निरर्थक बडेजाव कशाला करायचा? ह्या बाईंनी आपल्या दौर्यातून नक्की काय साधले आहे? भारताकरता मिळकत काय? आणि खर्चाच्या तुलनेत ही मिळकत किती असणार आहे?
एखाद्या भोंदू बाबाच्या भाषणाला माना डोळावणारे आंधळे भक्त आणि स्टेट व्हिजिट वगैरे थाटामाटाला डोळे मिटून संमती देणारे ह्यात फार फरक नाही. जर लोकशाही म्हणजे लोकांकरता चालवलेले लोकांचे सरकार वगैरे असेल तर हा थाटमाट कमी झाला पाहिजे. एखाद्या घरात दारिद्र्य आले तर त्या घरातली छानछोकी कमी होतेच. घराण्याची प्रतिष्ठा वगैरे विसरावेच लागते तसे इथे ही व्हावे.
30 Apr 2012 - 8:33 am | नितिन थत्ते
ज्या सरकारचा एकूण वार्षिक खर्च १० लाख कोटी च्या जवळपास आहे. त्या सरकारच्या प्रमुखाच्या प्रवासावर वर्षाला ५० कोटी खर्च झाले तर काय बिघडते.
वर्षाला १० लाख रु खर्च करणार्या एखाद्या कुटुंबाने, कुटुंबातल्या कोणी वर्षभरात ५० रु प्रवासखर्च केला म्हणून आगपाखड करण्यासारखे आहे. विचार करून पहा.
1 May 2012 - 11:00 am | हुप्प्या
एकीकडे गांधींची साधी रहाणी , काटकसर वगैरेवर भाषणे झोडायची आणि अशी छानछोकी?
लोकसंख्येच्या तुलनेत हा खर्च दरडोई किती होतो?
राष्ट्रपती असला/ली तरी एका लोकशाहीवर आधारित देशाचा नेताच. तेव्हा त्याला/तिला सामान्य जनतेच्या फार वरती मानता कामा नये.
दुसरे असे की मी खर्च केला तर काय बिघडले असे राष्ट्रपती म्हणाला तर त्याची री पंतप्रधान, अर्थमंत्री अशी सगळे जण ओढू लागतील. आणि अशीच खर्चाची उतरंड वाढत जाईल. अमेरिकेत अनेक कंपन्या अशा आहेत (उदा. मायक्रोसॉफ्ट) जिथे वरपासून सगळे कंपनीच्या कामाकरता सामान्य वर्गातच विमान प्रवास करतात.
काटकसरीला अशी वरपासून सुरवात झाली तरच ती तळागाळापर्यंत पोचून त्याचा परिणाम होईल.
ह्या बाईंनी भारताला ह्या दौर्यातून काय मिळवून दिले आहे त्याच्या तुलनेत हा खर्च कितपत आहे ते सांगता आले तर बघा.
रस्ते, पाणी, अन्न, तेल, वाहतूक, आरोग्य, संरक्षण ह्या अत्यावश्यक सेवा पुर्या करण्याकरता केले ला मोठ्ठा खर्च आणि ह्या निरर्थक दौ र्यांचा खर्च एकाच मापाने तोलणे शहाणपणाचे आहे का?
गरीब घरात एखादा डायबेटिस रुग्ण असेल आणि त्याच्या औषधावर हजारो रुपये खर्च होतच आहेत मग त्याच घरातील दुसर्याने मी आठवड्याला पाचशे रुपये हॉटेलचे बिल केले तर काय बिघडले असे म्हणण्यासारखे आहे.
1 May 2012 - 11:02 am | कौतिक राव
तुम्हाला निरुपद्रवी म्हनायचे आहे का??
27 Apr 2012 - 4:40 pm | इरसाल
इथे तोंडचे पाणी पळून बेशुद्ध पडलेली दुखली (स्मायलीच्या उलट म्हणुन) कल्पावी.
27 Apr 2012 - 10:47 pm | पिवळा डांबिस
दुखली (स्मायलीच्या उलट म्हणुन)
स्मायलीच्या :) उलट असते ती "दुखली" :(
:)
शब्दप्रयोग सॉल्लिड आवडला!!
उर्वरीत विषयावर नो कॉमेंट.
;)
1 May 2012 - 3:53 pm | इरसाल
:)
27 Apr 2012 - 7:56 pm | प्रभाकर पेठकर
राष्ट्रपती बाईंनी पुण्यातील प्रस्तावित बंगल्याची जागा परत केली.
निवृत्ती नंतर पुण्यात राहणार नाही.
-इति स्टार माझा.
28 Apr 2012 - 10:25 am | नितिन थत्ते
हुप्प्यांचा धागा वाचून* प्रतिभातैंचे डोळे खाडकन उघडले. त्याबद्दल हुप्प्या यांचे अभिनंदन. :)
*
त्यांनी लॉगइन न करता धागा वाचला असला तरी राष्ट्रपतीभवनाच्या आयपीची नोंद मिपा सर्वरवर झाली असल्याचे खात्रीलायकरीत्या कळते. :)
काळेकाकांचे धागे मात्र त्या वाचत नसाव्यात. :(
27 Apr 2012 - 10:35 pm | हुप्प्या
प्रजेच्या प्रतिकूल प्रतिक्रियांमुळे प्रतिभाताईंचा प्रशस्त प्रासाद प्रकल्प प्रखंडित *!
(शेवटच्या शब्दाविषयी खात्री नाही. जरा सांभाळून घ्या!)
29 Apr 2012 - 10:38 am | चित्रगुप्त
आगामी राष्ट्रपत्नी म्हणून कु. विद्याताई बालन यांचे नाव कसे वाटते ?
29 Apr 2012 - 11:34 am | प्रभाकर पेठकर
तुम्ही 'गुप्त'पणे त्यांचेच 'चित्र' मनांत धरून ठेवलेले (श्लेष नाही) दिसते आहे.
29 Apr 2012 - 2:30 pm | पैसा
भयंकर मोठा टायपो की हो झाला!
30 Apr 2012 - 10:00 am | चिरोटा
राष्ट्रपतीचे वय कमीत कमी ३५ पाहिजे असे २० मार्कांच्या नागरिकशास्त्रात वाचले होते.कु.विद्याचा जन्म १९७८ सालातला आहे.
1 May 2012 - 9:54 am | चिंतामणी
"विच्छा विद्याताईंची !" हे शिर्षक वाचून विद्या बालनबद्दलच हा धागा असणार अशी प्रथमदर्शनी समजुत झाली होती.
29 Apr 2012 - 11:10 pm | चित्रगुप्त
'राष्ट्रपिता' 'राष्ट्रपति' इत्यादि पुरुषप्रधान पदे बदलून आतातरी 'राष्ट्रमाता', 'राष्ट्रपत्नि' इत्यादि रूढ करावीत. याच संदर्भात कु. बालन यांचा विचार केला जावा. राष्ट्रमाता म्हणून सीताई, जिजाबाई, जोधाबाई, चांदबीबी, राणी लक्षुंबाई, कस्तुरबा, इंदिराश्री, सोन्याश्री, वगैरे वगैरे....
स्त्रीमुक्ती, स्त्रीशक्ती, स्त्रीयुक्ती, स्त्रीभक्ती ... हीच भविष्याची हाक आहे.
2 May 2012 - 3:27 pm | इरसाल
म्हणा म्हणा.................
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12959908.cms
शेवटचे दोन उतारे विसरु नका.