गाभा:
.
विद्यमान राष्ट्रपतीमहोदयांचा कालावधी तीन महिनेच राहिला आहे. नंतरचे तीन महिने नव्या राष्ट्रपतींच्या " निरनिराळ्या सत्कार समारंभात आणि परदेश दौरा करण्यात " जाणार !
आमचा जीव इथे टांगणीला लागून राहिला आहे, याचे कुणाला काहीच कसे वाटत नाही ? खरोखरच "भारतीय जनते"चा कळवळा येत असेल, तर एखाद्या राजकीय पक्षातल्या एखाद्या आमदार- नामदार- खासदाराने त्या क्रूरकर्मा कसाबची फाईल, सर्व जनतेच्या भावना लक्षात घेऊन, लगेच राष्ट्रपतीमहोदयांपुढे "अत्यंत तातडीचे" असे संबंधितांचा शेरा मारून योग्य मार्गाला लावावी, ही "हात जोडून" विनंती !
"आमच्या" जिवंतपणी "याची देही याची डोळा" त्या कसाबला फाशी दिलेली आनंदाने पहायला मिळावी, ही सर्व भारतीय जनतेची "शेवटची इच्छा "!!!
.
प्रतिक्रिया
26 Apr 2012 - 5:23 pm | इरसाल
प्लॉटबद्दल काय ? ते इसरुन कसं चालीन ?
26 Apr 2012 - 5:59 pm | अँग्री बर्ड
हिला संरक्षण तरी का देतात,एवढं बापुडवाणा चेहरा करून असते हिला कोण मारणार ?मारणाऱ्याला देखील कंटाळा येईल,आळस येईल.
26 Apr 2012 - 6:58 pm | चिरोटा
तमाम भारतियांच्या खदखदणार्या असंतोषाला वाट मोकळी करून देणारा धागा. ह्या धाग्याची लिंक राष्ट्रपती भवनाकडे पाठवली आहे.