पर्यटन आणि मी.

VINODBANKHELE's picture
VINODBANKHELE in काथ्याकूट
20 Apr 2012 - 5:05 pm
गाभा: 

रामराम मंडळी, मी विनोद बाणखेले ,
राहणार मंचर ,तालुका -आंबेगाव, जिल्हा- पुणे,
सध्या सायबर कॅफे चालवतोय, कामाच्या व्यापामुळे गेले दोन महिने मी माझ्या कुटुंबियांना कुठे बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकलो नाही , मंचरच्या जवळ भरपूर ठिकाणे आहेत जसे भीमाशंकर , आहुपे , भोरगिरी, ओझर ,लेण्याद्री, शिवनेरी ,चावंड, जीवधन ,नाणेघाट,दार्याघाट, माणिकडोह, निमगिरी, हडसर,नारायणगड,माळशेज घाट , हरिश्चंद्रगड ,खोडद ,गिरवली, पिंपळगाव ,मोराची चिंचोली, पारुंढे , आणे,चास कमान एक न दोन अनेक.
माझ्या परिवाराला मी सोबत नसताना अगदी काळजी काट्याने आपल्या घरातील लोक असल्या सारखे सांभाळून व्यवस्थित मार्गदर्शना सह कोणी फिरवून आणील याचा आमच्या मंचर परिसरात शोध घेतला असता फार भयंकर परिस्थिती समोर आली, वरील सर्व ठिकाणी एस टी महामंडळाच्या सेवेने जायचे म्हणजे अवघड कार्यक्रम आहे, आणि खाजगी वाहन व्यवस्थे चे चालक बरेच डोलकर पंथीय आहेत. वरून या सर्व ठिकाणी जेवण किंवा वेळप्रसंगी मुक्कामाची सोय करणे म्हणजे काय असते याचा अनुभव मी स्वतः घेतला असल्याने त्याची हि वेगळी काळजी आहेच.
आता तुम्ही म्हणाल या सगळ्या ला आम्ही काय करू शकतो, म्हणजे का बाबा आम्हाला पिडतोय तुला काय करायचं ते कर. नाही तर एवढा त्रास होतोय तर कशाला उगाच घरच्यांना फिरायला जायचं? वगैरे वगैरे.... पण .........मला शेअर करायचं आहे ते वेगळेच , हि जी परिस्थिती आहे त्या सर्वावर मात करण्या साठी मी काही प्रयत्न करावा म्हणतोय. काही तरी असे कि माझ्या कुटुंबा बरोबरच त्याचा उपयोग माझ्या सारख्याच आपल्या परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्वांना झाला पाहिजे.
मित्र परिवारा बरोबर चर्चा सत्र सुरु आहेतच. त्याचे अपडेट्स निष्कर्ष पुढील वाटचाल हि आपल्या समोर ठेविलच . तुमचे हि काही अभिप्राय असतील, सूचना असतील त्या जरूर द्या. फोन , इमेल ,खव , जमेल तिथे जमेल तसा संवाद व्हावा हि विनंती.

माझा मोबाईल नं. ९८५०२२९८२२
इमेल vinodbankhele@gmail .com

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

20 Apr 2012 - 5:21 pm | जयंत कुलकर्णी

अत्यंत चांगली कल्पना.

मी व वल्ली आणि इतरही आपल्याला या बाबतीत बरीच मदत करू शकतो. माझी तयारी आहे. वल्ली नाही म्हणेल असे वाटत नाही. मदत म्हणजे प्रत्येक ठिकाणचा इतिहास, काय बघण्यासारखे आहे इ.... मूर्तीशास्त्र, शिल्पशास्त्र इ..वर माहिती या स्वरूपात. तसेच अनेक सुचना आहेत... या साठी पहिली सुचना ही आहे की याचा एक प्रॉजेक्ट रिपोर्ट तयार करावा. सध्या आर्थिक बाजू साठी नाही पण इतर बर्‍याच गोष्टी आपल्या लक्षात येतील.

ह्या कार्यात योगदान देण्यास मी हजर आहेच.

मोदक's picture

20 Apr 2012 - 11:24 pm | मोदक

मी पण आहे..

उत्तम कल्पना आहे विनोद.
तू वर उल्लेखलेल्या ठिकाणांबद्दल माहित आहेच पण गिरवली, पिंपळगाव, पारूंढे याबद्दल ऐकले नाही कधी. तिथे काय आहे बघण्यासारखे?

अवांतरः मंचरला आल्यावर ती मिसळ पुन्हा एकदा खायची आहे. :)

चांगली कल्पना आहे. शुभेच्छा.

VINODBANKHELE's picture

21 Apr 2012 - 10:20 am | VINODBANKHELE

धन्यवाद
थोडासा आराखडा तयार केला आहे तो संध्याकाळ पर्यंत पूर्ण झाल्यावर येथे आपल्या समोर ठेवतोच.

प्राध्यापक's picture

21 Apr 2012 - 3:38 pm | प्राध्यापक

एकदम सहमत, विनोद ,या तुमच्या योजनेला माझी एक सुचना आहे,आपले मिपा कर देशाच्या विविध भागात पसरलेले आहेत ,जर प्रत्येक सदस्याने आपाअपल्या भागातली पर्यटना संबधी आवश्यक माहीति संकलीत केली,उदा: महत्वाची ठिकाणे,तेथील रस्त्यांची माहीति,राहण्याची व्यवस्था तर बर्‍याच लोकांना पुर्ण माहीती मिळु शकेल.

मी-सौरभ's picture

22 Apr 2012 - 3:40 pm | मी-सौरभ

आमच्या पण शुभेच्छा!!
माझ्याकडुन जमेल तशी मदत करणारच :)

आशु जोग's picture

22 Apr 2012 - 9:56 pm | आशु जोग

बाणखेले,

चांगले पाऊल आहे.

तुमच्या प्रश्नाला नेमकं उत्तर नाही देता येणार. काही गोष्टी कॉमन असतील, काही त्या स्थानाप्रमाणे बदलतील.

विशेषत: नव्या ठिकाणी वाटाड्या मिळाल्यास उत्तम...

कुलकर्णी साहेब,वल्ली सरकार, मोदक भाई ,रेवती ताई, प्राध्यापकसाहेब,
सौरभ भाई,आशु जोग आणि किरण जोशी साहेब तुम्ही सर्वांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
@ कुलकर्णी साहेब :- प्रोजेक्ट रिपोर्ट तर करावाच लागणार आहे. त्या साठी पेपर वर्क चालू केले आहे ,
@वल्ली सरकार :- गिरवली येथे आयुका ची दुर्बीण आहे, पिंपळगाव घोडे येथे सध्या नवीनच सरस्वती मंदिर बांधले आहे.आणि पारूंढे येथे प्राचीन ब्रह्मनाथ मंदिर आहे
आणि विसावा आपलेच आहे या कधी पण..