http://www.esakal.com/esakal/20120417/5683849096694387473.htm
पुण्यात भर लक्ष्मी रस्त्यावर एक तरुण फुटपाथ आपले वाहन फुटपाथवार चढवून, फुटपाथ अडवून बसला होता. एका ६९ वर्षीय महिलेने त्याला जाब विचारल्यावर बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान त्या ज्येष्ठ महिलेला मारहाणीत झाले. नंतर पोलिसांकडे तक्रार करायचा प्रयत्न केल्यावर टोलवाटोलवी, त्या पोलिसस्टेशनला जा, उलटा त्या महिलेलाच उपदेश वगैरे नेहमीप्रमाणेच "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" धोरणाचे अनुभव आले. रस्त्यावरील बघ्या लोकांनीही त्या महिलेला मदत वगैरे केली नाही.
भारतातील शाळात विद्यार्थ्यांकडून एक प्रतिज्ञा घोकून घेतात. त्यात मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडिलधार्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन असे एक वाक्य आहे. त्याची आठवण झाली इतकेच.
बाकी पोलिसांबद्दल काय बोलावे? पण बर्याचदा पीडित माणसाच्या मदतीला जाणारे सामान्य लोकही इतके निर्विकार राहिले हे आश्चर्य.
प्रतिक्रिया
17 Apr 2012 - 7:42 am | टुकुल
असे ऐकुन वाईट वाटले असे म्हणायची पण आता लाज वाटु लागली आहे :-(
--टुकुल
17 Apr 2012 - 7:57 am | अन्या दातार
एका प्रकारातून इतका तीव्र निष्कर्ष?? छान. चालूद्यात
17 Apr 2012 - 8:19 am | मोदक
+१
इतका तीव्र निष्कर्ष..?
17 Apr 2012 - 10:40 am | पियुशा
नाण्याला दोन बाजु असतात :)
केवळ एका अनुभवाने / बातमीने असे कसे म्हणु शकता हो तुम्ही ?
17 Apr 2012 - 10:52 am | शिल्पा ब
यात त्या दुसर्या मार खाणार्या नाण्याची कोणती बाजु असु शकते जरा सविस्तर सांगुन पहा बरे!!
झाला प्रकार अतिशय निंदनीय आहे. त्या मुलाचे नक्कीच राजकीय संबंध असणार त्याशिवाय एवढा मुजोरपणा शक्य नाही असं वाटतं.
17 Apr 2012 - 11:06 am | पियुशा
@ शिल्पा तै
अस्तंगत होणारा वडिलधार्या माणसांचा मान आणि सौजन्य
धागाकर्त्याच्या ह्या शिर्षकावरुन त्याने जो निष्कर्श काढला आहे त्याबद्दल बोलतेय मी शिल्पा तै
एकांगी विचार अन एकाच अनुभवावरुन असा निष्कर्ष ? म्हणुन म्हणाले
इतर चांगल्या घटनांचा विचार करुनच हे वाक्य वापरले मी " नाण्याला एकच बाजु नसते "
वडिलधार्या माणसांचा मान आणि सौजन्य नक्किच वाढेल अशा सुखद गोष्टीही घड्त असतात की नेहमी :)
वरिल घटना वाइट आहे :(
पण मग काय चांगल्या घटना घडतच नाहियेत का ? वडिलधार्याचा मान वाढेल अस कुणी वागतच नाही का ?
तो मनुष्य असेल विक्रुत ,म्हणुन काय सगळेच बोकाळ्लेले आहेत का ?
सगळ्याची मानसिक अवस्था / परिस्थिती सारखी नसते म्हणुन येणारे अनुभव हे सुखद किंवा दुखद असतात
17 Apr 2012 - 10:44 am | चिरोटा
अजून अशा किती घटना घडल्या पाहिजेत की ज्यावरून निष्कर्ष काढता येईल? १०,२५,२५०?
अशा लहान घटनांमधूनच् समाज कुठल्या दिशेने चालला आहे हे दिसते.
17 Apr 2012 - 11:30 am | पांथस्थ
सहमत आहे. एकदाच झालं अस म्हणुन आत्ता सोडुन द्यायचे. मग हळुहळू अश्या प्रकारच्या घटना सतत होऊ लागतील, त्यावेळी रोजचंच आहे म्हणुन सोडुन द्यायचे (माणसाच्या/समाजाच्या अंगी सोईस्कर निगरगट्टता फार लवकर रुजते).
17 Apr 2012 - 10:52 am | रणजित चितळे
हल्ली वडीलधा-यांचा मान राखणे गेलेले आहे. उद्धटपणा वाढलेला आहे.
17 Apr 2012 - 11:04 am | नितिन थत्ते
आपल्याहून स्टेटसने कमी असलेल्या* वृद्धांना मान न देणे हे पूर्वीपासूनच** चालत आले आहे.
*असे जे समजतात त्यांच्याकडून. या प्रसंगातला तरुण बाईकवर होता आणि बाई पायी होती. म्हणजे त्या बाईकवाल्याच्या मते त्याचा स्टेटस त्या बाईंपेक्षा वरचा होता.
**वृद्ध वडिलांना घराबाहेर काढणारा मुलगा-आजोबांची घोंगडी-नातू अर्धी घोंगडी मागतो- ही कथा ५०-६० वर्षे*** तरी अस्तित्वात आहे. :(
***५०-६० वर्षांपासून भारतात राज्यकर्त्यांना धर्माचे अधिष्ठान नाही म्हणून असे होत असावे. ;)
17 Apr 2012 - 12:12 pm | परिकथेतील राजकुमार
मा. श्री. हुप्प्या यांनी अशा दीन दुबळ्यांच्या सहाय्यासाठी तातडीने एक संघटना उभारावी. ह्या संघटनेच्या हापिस साठी आम्ही फुकटात जागा देवू.
नुसते बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्या आणि ह्या साठी श्री. हुप्प्यांसारख्या नवतरुणांनी पुढे यायला हवे.
आपला
जांबुवंत
18 Apr 2012 - 6:54 am | हुप्प्या
साठी आणि नवतरूण एकाच वाक्यात आल्यामुळे गंमत वाटली. असो. थिल्लर विनोद नकोत.
मला नवतरूण घोषित केल्याबद्दल शेपटापासून आभार.
जर कुठे असे काही प्रत्यक्ष घडताना दिसले तर कृती होईलच याची खात्री बाळगा. कसम मारुतीकी!
18 Apr 2012 - 1:24 pm | परिकथेतील राजकुमार
पण हे धागा काढायच्या आधीच तुमच्या लक्षात आले असते तर कित्ती कित्ती बरे झाले असते.
असो...
18 Apr 2012 - 11:00 pm | हुप्प्या
हा धागा आपल्याला थिल्लर विनोद वाटतो आहे? धन्य आहे. कुण्या म्हातारीला पुण्यात, दिवसा, भर रस्त्यात कुणी मारहाण करतो आणि ती बातमी चर्चेकरता मी दिली हा थिल्लरपणा?
असे म्हणू या की आपल्यासारख्या लोकांना आपल्या मताची पिंक टाकायचा किंवा अन्य प्रकारे "मोकळे" व्हायला एक व्यासपीठ मिळाले. असो.
19 Apr 2012 - 11:51 am | परिकथेतील राजकुमार
होय ! ही बातमी चर्चेकरता देणे हा थिल्लरपणाच. जे काही घडले ते नक्की चुकच आहे, मात्र त्याचे भांडवल करून स्वतःची एक जिलबी पाडून घेणे हा थिल्लरपणारच आहे.
असे धागे काढणे आणि त्यावरच्या चर्चेतून काही भरीव होण्याचा बळंच खोटा आशावाद दाखवणे ह्याला वांझोटे मैथुन म्हणतात. :)
खरंच तुम्हाला कळवळा वाटतो ना? मग घ्या ना पुढाकार. मी वरती म्हणालो ती खरेच गंमत नाही. तुम्ही ह्या लोकांसाठी कार्य सुरु करा, तुमच्या संघटनेला जागा, फर्निचर, एक संगणक मी तुम्ही संघटना नोंदवल्याच्या क्षणापासून एका तासात उपलब्ध करून देतो. संघटना नोंदी आधी जागेचा करार करायचा असेल तर तो देखील करायला मी तयार आहे. आहे तुमची तयारी पुढाकार घ्यायची ?
19 Apr 2012 - 11:56 am | शिल्पा ब
असं ओ काय पराकुमार!! कैतरीच बै तुमचं!! ऑम्मी नै ज्जा!!
17 Apr 2012 - 12:29 pm | कुंदन
झालय काय की पुण्यात झाल्यात दुचाक्या जास्त.
आणि फुटपाथ तर काय दुचाक्या साठीचेच डेडिकेतेड कॉरिडोर आहेत ना.
17 Apr 2012 - 2:36 pm | प्रभाकर पेठकर
फुटपाथच काय आख्खे पुणे शहर दुचाकी स्वारांसाठी राखिव मार्गिके प्रमाणे आहे.
फुटपाथवर दुचाकी चालविणे, सिग्नल तोडून दुसर्याच्या मार्गात येणे, रहदारीत कारण नसताना डाव्या बाजूच्या मार्गिकेतून मधल्या आणि तिथून उजव्या मार्गिकेस स्पर्श करून पुन्हा डाव्या मार्गिकेकडे येणे, चारचाकी वाहनांसमोर आपली दुचाकी घालून त्याची वाट अडविणे, टपर्यांसमोर आपल्या दुचाक्या (कधी कधी चारचाकी वाहनेही असतात) उभ्या करून रस्ता अरुंद करणे, रस्त्यात मित्रांसमवेत कोंडाळे करून गप्पा मारीत बसणे असे अनेक उद्योग चालतात. त्यांना काही सांगायला गेले तर 'कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान' केला जातो.
वडिलधार्यांचा मान आणि सौजन्य कमी होत चालले आहे हे नि:संशय. खुप ठिकाणी मानही राखला जातो आणि सौजन्यही दिसून येते पण त्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत चालले आहे.
17 Apr 2012 - 11:08 pm | सचिन
निश्चितपणे चिन्तनीय बाब !
असे वागणारे आपण वा आपली मुले नसावीत एवढेच !!
18 Apr 2012 - 1:34 am | छो.राजन
मी मागील मन्हीन्यात, दादर ला न ची केळकर रोड च्या फुटपाथ वरून चाललो होतो. एक जण
बाईक फुटपाथ वरून चालवत होता. विचारल्या वर उत्तर मिळाले, पादचारी बाईक / कार च्या रस्त्या वर येत नाहित काय?
19 Apr 2012 - 1:04 pm | इरसाल
त्याची एवढी हिम्मत की तो छो. राजनला असे बोलला ?
18 Apr 2012 - 1:30 am | चिंतामणी
चिड, राग, संताप, उद्विग्नता व्यक्त करायला शब्द सापडत नाहीत. जे वाटते ते इथे लिहीणे शक्य नाही.
18 Apr 2012 - 11:07 am | मनीषा
घडलेला प्रसंग अतिशय दुर्दैवी आहे.
त्या बाईंचं कौतुक वाटते की त्यांनी जे घडले त्या बद्दल तक्रार केली, जाऊ दे म्हणून सोडून दिले नाही.
उगीचच आवांतर : - या वरून एक प्रसंग आठवला - पु. ल. देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला (बहुदा कुसुमाग्रजांच्या हस्ते .. ) त्या वेळी पु. ल. नी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर भाषण करताना ते म्हणाले होते, ज्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे, ज्याच्या पायावर डोके ठेवून आशिर्वाद घ्यावेत असे लोक देखील आजकाल दुर्मिळ झाले आहेत.
18 Apr 2012 - 11:09 am | इरसाल
असपण आंजावर न पाहिलेल्या(पण माहीत असलेल्या) वयस्कर माणसांचाही सध्या कुठे मान राखला जातोय ?
हुप्प्याजी तुमचं चिंतित होणं सहाजिकच आहे पण कुत्र्याच्या शेपटीचे काय ?
18 Apr 2012 - 11:19 am | नगरीनिरंजन
त्या युवकाचे चुकलेच.
पण मी लहान असताना म्हातारी माणसं "बाळा, बाजूला हो रे जरा" असं म्हणायची. "राजे, बाजूला व्हा" ही नवी प्रेमळ भाषा दिसतेय. ;-)
- (पुणेरी म्हातार्यांशीही सौजन्याने वागणारा) नगरी.
18 Apr 2012 - 5:24 pm | विश्वनाथ मेहेंदळे
नगर(किंवा तुम्ही जिथे वाढलात ते शहर/गाव ) आणि पुणे यात फरक आहे ना हो.
तुमचे लहानपण पुण्यात गेले असेल तर "पाहिल्यासारखे पुणे राहिले नाही आता" असे म्हणतो ;-)
19 Apr 2012 - 3:38 am | चित्रा
बाळराजे, थोडे बाजूला व्हा असे म्हटले असते तर? कृपया हलके घ्या.
उर्मटपणा हा शाब्दिक थोडाफार समजू शकतो, (मला तोही समजत नाही, कारण बर्याचदा त्याची गरज नसते) . पण शिवीगाळ (केली असल्यास) समजून घेणे अवघड आहे. शिवाय लोखंडी बॅरिकेडवर पडण्याइतपत (किंवा न पडण्याइतपतही) शारिरीक धक्काबुक्की करण्याची गरज असते का याबद्दल साशंक आहे.
19 Apr 2012 - 1:22 pm | नगरीनिरंजन
शारीरिक धक्काबुक्कीच काय ज्येष्ठांना शाब्दिक ऊर्मटपणा दाखवणेसुद्धा कधीही समर्थनीय नाही. त्या मुलाची चूक आहे हे तर सर्वमान्यच असावे.
परंतु, अतिरिक्त गर्दी आणि रॅटरेसच्या ताणामुळे आजकाल कोण काय करील असा भरवसा नसताना ज्येष्ठांनीही आपली शक्ती आणि कायदा-नियम-सुव्यवस्था यांच्या अंमलबजावणीची अवस्था ओळखून अनवस्था प्रसंग टाळण्यासाठी (पडती बाजू घेऊन) सौजन्य पाळणे जास्त व्यवहार्य होईल असे वाटते.
19 Apr 2012 - 1:27 pm | गवि
नको नको.. असं म्हणू नका..
(समाज सौजन्य पाळत नाही, धक्काबुक्की करतो म्हणून वृद्धांच्या स्वातंत्र्यावर घाला का? गुंडगिरीबद्दल तुम्ही वृद्धांनाच जबाबदार धरता? धक्काबुक्कीचे समर्थन? इ. इ. इ.)
19 Apr 2012 - 1:36 pm | शिल्पा ब
पांढर्या शाईत का लिहिलंय?
19 Apr 2012 - 1:38 pm | गवि
घाबरुन..
19 Apr 2012 - 1:39 pm | नगरीनिरंजन
:)
(अरे हो की... बरं झालं सावध केलंत. _/\_ धन्यवाद.
आणि बरं झालं मी फक्त व्यवहार्य म्हटलं. व्यवहारी वागणूक असावी की नाही हे स्वातंत्र्य आहेच प्रत्येकाला. तरीही सावधगिरी म्हणून या धाग्यावरून गायबत आहे.)
18 Apr 2012 - 6:14 pm | अविनाशकुलकर्णी
शक्य तो अश्या भानगडीत पडु नये..
अंगी नाहि बळ त्याने फुलझाड लाऊ नये
19 Apr 2012 - 3:45 am | विकास
चर्चतील मजकूराशी सहमत. असे प्रकार अनेकदा ऐकलेले आहेत, त्यामुळे दुर्दैवाने नवीन वाटले नाही.
बाकी चर्चेचे शिर्षक, "अस्तंगत होणारा वडिलधार्या माणसांचा अस्तंगत होणारा मान आणि सौजन्य! " असे योग्य वाटले असते, असे वाटते.
19 Apr 2012 - 5:41 am | रेवती
ही बातमी तशी न आवडण्यासारखी असल्याने कालपासून धागा नुसता पहात होते.
आज अचानक आठवले की हे नवीन नाही. दहा बारा वर्षांपूर्वी बिल्डींगमध्ये धुणी भांडी करण्यास येणारी नणंद भावजयीची जोडी आठवली. नणंद माहेरी कायमची आलेली तर भावजयीचा नवरा कायम पिणारा. या दोघी कामावर आल्यानंतर त्यांच्या झोपडीत घुसून कोणा महाभागाने ७० वर्षाच्या सासूवर बलात्कार केल्यावर काय मत व्यक्त करावे हे समजले नव्हते, अजूनही सुन्न व्हायला होते.