अस्तंगत होणार्या अंधश्रद्धा
"प्लॅंचेटवर मृताच्या आत्म्याशी संवाद" हा भ्रम पूर्वी सर्वत्र बोकाळला होता.कालान्तराने त्याची निरर्थकता लोकांच्या ध्यानीं आली.ती अंधश्रद्धा नामशेष झाली.एकेकाळी रामबाण म्हणून गाजलेले अनेक औषधोपचार नंतर निरुपयोगी ठरून विस्मृतीत गेले."रेकी " या प्रकाराला अनेक श्रद्धाळू काही काळ फसले. आता ती अंधश्रद्धा अस्तंगत झाली आहे. प्राणिक हीलिंग आणि भाग्यरत्ने हे फसवणूकप्रकार सध्या त्या मार्गावर आहेत.काही वर्षांपूर्वी वास्तुदिशाभूलशास्त्र या भ्रमाची देशात सर्वत्र साथीच्या रोगासारखी लागण झाली. अनेकजण बळी पडले.वास्तुशकुनींनी पैसे कमावले. आता या दिशाभुलीचा हास्यास्पदपणा लोकांच्या ध्यानीं येत आहे.साथ आटोक्यात आली आहे.लौकरच हा रोगाणू नामशेष होईल.याप्रमाणे अनेक अंधश्रद्धा अस्तंगत होतात.पण फसवणूक करणे हाच ज्यांच्या उपजीविकेचा आधार असतो असे लबाड लोक नवनव्या अंधश्रद्धा पसरवतात. श्रद्धाळूंच्या भोळसटपणाला सीमा नसते. या संदर्भात एक सुवचन आहे:" दोन गोष्टी अमर्याद आहेत. हे अनंत विश्व आणि श्रद्धाळूंचा भोळसटपणा (खरेतर अडाणीपणा). पैकी विश्व अमर्याद आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकत नाही."
अस्तंगत होणार्या अंधश्रद्धा
गाभा:
प्रतिक्रिया
15 Apr 2012 - 2:49 pm | अन्या दातार
सर्वप्रथम, बर्याच दिवसांनी पुनरागमन केल्याबद्दल अभिनंदन करतो. :)
खरंतर प्रत्येक गोष्टीचे एक जीवनचक्र (लाईफसायकल) असते. आज ज्या गोष्टी अस्तंगत पावल्या आहेत, त्या उद्या पुन्हा डोके वर काढतील. कारण लोकांना एकाच तंत्राने भुलवून चालत नाही, किंबहुना ते शक्यच होत नाही.
या काही दिवसांतच पेपरमध्ये वाचले की मल्टीलेव्हल मार्केटींग, अल्प कालावधीत दामदुप्पट वगैरे अश्या आर्थिक गुन्ह्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. या सर्वाचे कारण एकच ते म्हणजे पब्लिक मेमरी इज टू शॉर्ट!
15 Apr 2012 - 9:12 pm | प्रकाश घाटपांडे
अन्या शी सहमत. भामटेपणा तोच असला तरी 'बकरे' बदलत असतात.
15 Apr 2012 - 9:23 pm | मन१
भामटेपणा तोच असला तरी 'बकरे' बदलत असतात.
ह्याच्या उलटही म्हणता येइलच की
बकरे तेच असले तरी नवा भामटे ते शोधत असतात .
दरवेळी नवीन प्राण्याकडे "हा तरी आपली संकटातून सहिसलामत सुटका करेल" अशा आशेनं पाहणारी अगतिक मंडळी आहेतच की.
15 Apr 2012 - 9:36 pm | अन्या दातार
कैच्या कै!
तसं असतं तर बसेस, रेल्वे इ. ठिकाणी जाहिराती लागल्या नसत्या. अन अमका-तमका एखाद्या संकटातून सुटका करेल हे कळावे कसे?
खरंतर भामटेही बदलत असतात तसेच बकरेही. घाटपांडे काकांचे वाक्य नीट वाच.
भामटेपणा वेगळा व भामटा वेगळा. गुडगावला गेल्याबरोब्बर इतका फरक पडेल असं वाटत नव्हतं रे ;)
15 Apr 2012 - 3:00 pm | कवितानागेश
"अविश्वास हेच जीवन, श्रद्धा हा मृत्यु" :)
15 Apr 2012 - 3:09 pm | तिमा
लेटेस्ट फॅड 'व्हिगेन' (की व्हिजेन?) या कोरियन कंपनीच्या हिटिंग व मसाजिंग यंत्राचे आहे. या लोकांनी अनेक ठिकाणी विनामूल्य सेवा केंद्रे उभारली आहेत. या मशीनवर झोपल्यावर म्हणे, रक्तप्रवाह वाढतो आणि कॅन्सरपासून या जगातील यच्चयावत रोग बरे होतात. या केंद्रांवर पद्धतशीर ब्रेनवॉशिंग केले जाते आणि रु. ६६०००/ वा रु. १०००००/ चे मशीन थोडे लोक तरी विकत घेतात.
दुनिया झुकती है .....
15 Apr 2012 - 3:32 pm | amit_m
आजकाल टिव्हीवर असल्या जाहिरातींचा सुकाळ आहे. लोक देखील कसे काय ह्या भूलथापांना बळी पडतात कोण जाणे?
मध्यंतरी मल्टी लेवल मार्केटींगचा जमाना होता. सुटबुट आणि टाय घातलेली पोरं जगाला शहाणपणा शिकवत फिरायची.
ह्यात कोणत्यातरी फडतूस ई - लर्निंग कोर्सची सीडी वगैरे मिळायची म्हणे.
तात्पर्य म्हणजे आपणच प्रत्येक वेळी आपली विवेकबुद्धी वापरून निर्णय घ्यावेत.
15 Apr 2012 - 4:21 pm | प्रभाकर पेठकर
अंधश्रद्धा अस्तंगत होत असतील तर ती चांगली बातमी आहे नं? त्यावर धागा काढून पुन्हा त्याला उजाळा का द्यायचा??
15 Apr 2012 - 5:39 pm | मराठी_माणूस
सहमत
15 Apr 2012 - 5:15 pm | दादा कोंडके
आज सुद्धा बिल्डर वास्तुशास्त्रानुसार बांधकाम वगैरे जाहिरात देतात. या (सो कॉल्ड) शास्त्राइतकं भंपक शास्त्र कुठलं नसेल. स्वयंपाक घर अमुक दिशेला, संडास इथं, पाण्याचा साठा त्या दिशेला. मग भलेही ती बिल्डींग डिझास्टर मॅनेजमेंट नुसार कुचकामी असेल.
मला वाटतं आपल्या लोंकांच्या मनात पिढ्या न पिढ्या थोतांड बिंबवलेलं गेलंय. पुलंच्या गुरुदेवासारखं 'ब्लिस', 'सुप्राकॉन्शस', 'एटर्नल', 'कॉस्मीक एनर्जी' असले शब्द वापरले की लोकं फसतात.
15 Apr 2012 - 6:14 pm | आबा
+१
15 Apr 2012 - 5:16 pm | अमृत
चेहेरापुस्तकावर असण्यानेच मित्रांच्या संपर्कात राहाता येते, तुम्ही जर चेपू वर नसाल तर तुमचं काही खरं नाही किंवा आपल्या लाईक वा डिसलाईक केल्याने त्या गोष्टीचे मूल्य वाढते. काही काळापूर्वी असेच ऑर्कूट विषयी झाले होते. आता ऑर्कूट नामशेष झालेलं आहे.
अमृत
15 Apr 2012 - 8:38 pm | स्वानन्द
सुप्परलाईक :)
16 Apr 2012 - 11:53 am | मूकवाचक
=))
16 Apr 2012 - 12:52 pm | रमताराम
+१
(आपल्या 'LOL' आणि 'हम्म' एवढ्याच प्रतिसादांना 'लाईक' मारणारे पाहून हैराण झालेला) रमताराम
16 Apr 2012 - 12:58 pm | गणपा
पोस्ट वाचल्याची दखल म्हणुन 'LOL' आणि 'हम्म' एवढ्याच प्रतिसादांना 'लाईक' मारल्या जाते हे तुम्हा म्हातार्यांना काय कळावे. ;)
पळा तेज्यायला येतत ररा काठी घेउन.
16 Apr 2012 - 10:47 pm | रमताराम
पयले छूट लोल आन् हम्मं वाचल्यालं न्हाई समाजलं लिवनार्याला तर काय आबाळ कोसळतंया व्हय. जो आसली पर्तिक्रिया द्येतोय त्यो कशापायी बगाय येतू परतून, का आपन लिवल्यालं वाचलं का न्हाई या बेन्यानं, आं?
(ए घ्या रे याला कोपच्यात. लै टिव टिव.... आपलं लाईक लाईक करू र्हायलंय. ऐशा लंबे करा की सम्दे 'डिसलाईक' चं बटन का न्हाई चेपुवर म्हनून धरनं धरत्याल त्या मार्कबाबाकडं)
15 Apr 2012 - 6:08 pm | अविनाशकुलकर्णी
सहि वरुन भविष्य सांगणारे पण आहेत..
16 Apr 2012 - 7:16 am | रेवती
बरं झालं, दूध पिणारा बाप्पा यातून सुटला.;)
16 Apr 2012 - 4:28 pm | कवितानागेश
ज्योतिष पण राहिले की.
आणि नाडी पण! ;)
अरेरे. कसे काय व्हायचे या देशाचे??
16 Apr 2012 - 7:17 am | अत्रुप्त आत्मा
हा सगळा बाजार माणसाच्या दुर्बल मनोवृत्तीचं द्योतक आहे. आपण हे बंद झालं ते बंद झालं (मागे पडलं)असं निरिक्षण नोंदवत असलो,तरी जोपर्यंत ही दुर्बल मनोवृत्ती जिवंत आहे,तो पर्यंत या बाजाराची हि भरती ओहोटी चालुच रहाणार. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दुर्बल मन असलेली व्यक्ति हे कधिही मान्य करुन स्विकारायला तयार होत नाही की,'' मी दुबळ्या मनाचा आहे.'' अट्टल व्यसनी माणुस जसा शेवटपर्यंत स्वतःला मनापासुन अॅडिक्ट म्हणायला कचरतो,तसेच हे आहे. हा बदल घडविणारी एखादी संस्था जो पर्यंत (याच दुर्बल घटकांमधुन) निघत नाही.तो पर्यंत या बाजारावर इलाज सापडणे मुष्किल आहे... :-)
16 Apr 2012 - 7:28 am | ५० फक्त
काही दिवसानी तुम्ही मराठी संस्थळावर काढलेल्या धाग्याला मिळालेल्या वाचनांची संख्या आणि प्रतिसाद यांची सांगड घालुन तुमचं भविष्य सांगण्याची एक 'धागा' पद्धत रुढ होईल असे दिसते.
16 Apr 2012 - 11:34 am | बाळ सप्रे
अहो अंधश्रद्धा पसरवणारे देखिल काळाप्रमाणे बदलतात. स्वामींचा, बाबांचा (ओरि़जिनल ?) फोटो १०० जणांना फॉरवर्ड करा, १००० लाइक करा, १०० एस एम एस करा, केल तर लॉटरी लागेल, नाही केल तर काही तरी वाईट घडेल :-)
ऑनलाईन दर्शन, टि. व्हि वर अॅक्टिव्ह दर्शन, अॅक्टिव्ह हॉरोस्कोप असे कितितरी नवीन मार्ग येतच रहाणार
अंधश्रद्धांचे समूळ उच्चाटन हे हिन्दू मुस्लिम एकोप्याएतकेच अशक्य आहे..
16 Apr 2012 - 1:37 pm | यनावाला
श्री.अत्रुप्त आत्मा यांनी श्रद्धाळूंच्या मनोवृत्तीचे अगदी नेमके विश्लेषण केले आहे.
हे पटण्यासारखे आहे."आपण फसलो. वेळ,ऊर्जा आणि पैसे यांचा निष्कारण अपव्यय झाला.पदरी काहीच पडले नाही"हे सत्य स्वीकारायला श्रद्धाळू माणूस कधीच तयार नसतो.
२/मिपाचे बहुसंख्य सदस्य असल्या अंधश्रद्धांच्या विरुद्ध आहेत हे समजून आले.मनापासून आनंद झाला.
16 Apr 2012 - 2:02 pm | यकु
>>>> या संदर्भात एक सुवचन आहे:" दोन गोष्टी अमर्याद आहेत. हे अनंत विश्व आणि श्रद्धाळूंचा भोळसटपणा (खरेतर अडाणीपणा). पैकी विश्व अमर्याद आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकत नाही."
----- अहो विश्व अमर्याद आहे की कसे हेच नव्हे तर इतर काहीही तुम्ही किंवा इतर कुणीच निश्चित सांगू शकत नाही!
म्हणजे आपण कितीही जीव तोडून फडफड केली तरी हा पसारा आपल्या आवाक्यात येणारा नाही हे एक बाजूला मान्य करायचं आणि आपला अनुभव तोकडा पडतोय तिथे मात्र बुद्धीवादी मुखवटे घालून अगदी यादी करकरुन, एकेका गोष्टीचा निषेध करत सुटायचं हे मनोरंजक आहे. तुम्ही अद्याप जीवंत आहात तर एक्सप्लोर करा ना तुमचा जीवंतपणा जरा पूर्णपणे (फक्त तर्काने एक्सप्लोर करुन फायदा नाही - जीवंत आहात, त्या जीवंततेमध्ये जरा पूर्णपणे आत घुसा, तरच तुमचा असा जनरलाज्ड सूर सार्थकी ठरेल ) - आणि मग एका बिंदूवर पोचून सगळ्या बुद्धीवादाने दम तोडला की तुम्ही काय करु शकता ते असंच आम्हाला सांगा.
कदाचित मला व्यवस्थित मांडता येत नाहीय, पण असोच.
16 Apr 2012 - 2:38 pm | बाळ सप्रे
आणि बर्याच गोष्टी आवाक्यात येणार्या नाहीत म्हणून कोणीही केलेले बकवास दावे मान्य करायचे की काय तुमच्या मते??
सगळ्याच गोष्टींचा अनुभव घ्यावा लागत नाही. सारासारविवेक बुद्धीने काही दाव्यांचा फोलपणा सिद्ध करता येतो.
आपला तो अनुभव आणि दुसर्याचा तो बुद्धीवादी मुखवटा हा डोळ्यावरचा पडदा बाजूला करा मग या अमर्याद विश्वात बुद्धी कुठे वापरयची आणि कुठे आपले तोकडेपण मान्य करायच ते समजेल.
16 Apr 2012 - 3:06 pm | यकु
>>>>आणि बर्याच गोष्टी आवाक्यात येणार्या नाहीत म्हणून कोणीही केलेले बकवास दावे मान्य करायचे की काय तुमच्या मते??
--- बकवास दाव्यांचं काय करायचं हे मी सांगत बसत नाही. आणि माझी प्रतिक्रिया तथाकथित अंधश्रद्धांना वर लिहिलेल्या चार ओळीत झोडपून काढल्यामुळेही चिडून दिलेली आहे असं नाही.
|| या संदर्भात एक सुवचन आहे:" दोन गोष्टी अमर्याद आहेत. हे अनंत विश्व आणि श्रद्धाळूंचा भोळसटपणा (खरेतर अडाणीपणा). पैकी विश्व अमर्याद आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकत नाही."||
जगाच्या अंतापर्यंत जाणार्या अशा वचनाचा आधार घेतलाय म्हणजे जे कुणी हे सांगत असेल त्याला श्रद्धाळूंचा अमर्याद भोळसटपणा आणि विश्व अमर्याद आहे की कसे हे दोन प्रश्न पडले आहेत. पैकी श्रद्धाळूंच्या भोळसटपणाबद्दल नेहमीच विचार होताना दिसतो. विश्व नेमके कसे त्याबद्दल काय सांगणार? आणि ते जसे कसे असेल त्या विश्वात तुम्ही कसे आहात? कोण-कोणती साधने वापरुन तुम्ही विश्वाचा (त्यातल्या अंधश्रद्धांसकट) विचार करता? तुम्ही स्वत: पुरतं तरी स्वत:चा जीवंतपणा म्हणजे काय हे नेमके कुठे शोधले आहे? तर्क, बुद्धी वगैरे मामुली गोष्टींचा वापर केला आहे, ते वगळता?
म्हणूनच मी जीवंतपणा एक्सप्लोर करा आणि नंतर सांगा म्हणालो.
>>>>सगळ्याच गोष्टींचा अनुभव घ्यावा लागत नाही. सारासारविवेक बुद्धीने काही दाव्यांचा फोलपणा सिद्ध करता येतो.
------- नक्कीच! तो माझा मुद्दाच नाही.
>>>>आपला तो अनुभव आणि दुसर्याचा तो बुद्धीवादी मुखवटा हा डोळ्यावरचा पडदा बाजूला करा मग या अमर्याद विश्वात बुद्धी कुठे वापरयची आणि कुठे आपले तोकडेपण मान्य करायच ते समजेल.
------- डोळ्यावर पडदा वगैरे नाही. चर्चा ज्यांनी सुरु केलीय त्यांनी (आणि तुम्ही ही मत मांडलीत म्हणून तुम्हीही) आधी स्वत:चा जीवंतपणाचे आणि त्याच्या मर्यादीत/अमर्यादीत असण्यात असे नेमके काय करुन पाहिले आहे हे सांगावे. जेणेकरुन रेकी, प्राणीक हिलींग वगैरे अगदी निखालस फसवणुकीचेच प्रकार आहेत हे वर मांडलंय ते समजून घेता येईल.
16 Apr 2012 - 3:17 pm | बाळ सप्रे
तुम्हाला रेकी, प्राणिक हीलिंग वरील टीका मान्य नाही असे सरळ सांगा ना.. त्यासाठी लेखकाने जीवन्तपणा सिद्ध करावा यात काहीच लॉजिक नाही..
तुम्ही रेकी ई सिद्ध करणारे मुद्दे मांडा मग समजून घेता येइल काय ते. लेखकाने समजा श्वास घेतोय, हालचाल करतोय वगैरे जीवन्तपणाचे मुद्दे मांडले आणि सांगितले कि यापुढे सगळं बुद्धीपलिकडले आहे तर तुमचि रेकी कशी सिद्ध होणार आहे???
16 Apr 2012 - 3:28 pm | यकु
>>>>तुम्हाला रेकी, प्राणिक हीलिंग वरील टीका मान्य नाही असे सरळ सांगा ना.. त्यासाठी लेखकाने जीवन्तपणा सिद्ध करावा यात काहीच लॉजिक नाही..
---- मला काय पडली आहे टीका मान्य न करायला? माझी काही रेकी, प्राणिक हिलींगची दुकाने नाहीत. तुमचा जीवंतपणा सिद्ध करा मी म्हणालो नाही. तुम्ही एका बाजूला एक प्रकारचा अमर्यादपणाही मंजूर करताय आणि दुसर्या बाजूला दुसर्या प्रकारच्या अमर्यादपणावर टीकाही करताय हे बात कुछ हजम नहीं हुयी.
हे चुकीचेच आहे! असा जो सूर आहे, त्यामागे स्वत:चा काही अनुभव आहे का एवढं विचारतोय - माझा म्हणाल तर प्राणिक हिलींगबाबतीत जबरदस्त अनुभव आहे. विश्वाचा म/अमर्यादितपणा आणि प्राणिक हिलींग वरुन जीवंतपणाविषयीच्या अनुभवाबद्दल (लेखकाच्या, याला काही हरकत नसावी) मी विचारतोय.
>>>>तुम्ही रेकी ई सिद्ध करणारे मुद्दे मांडा मग समजून घेता येइल काय ते. लेखकाने समजा श्वास घेतोय, हालचाल करतोय वगैरे जीवन्तपणाचे मुद्दे मांडले आणि सांगितले कि यापुढे सगळं बुद्धीपलिकडले आहे तर तुमचि रेकी कशी सिद्ध होणार आहे???
---- हा माझा मुद्दा नाहीय. रेकी खरी की खोटी ते ज्यांना त्याबद्दल कुतुहल आहे त्यांनी पहावं असंही मी म्हणणार नाही.
16 Apr 2012 - 3:40 pm | बाळ सप्रे
अमर्यादपणाच्या नावाखाली काही वाट्टेल ते खपवलं जातं, पण त्यातले बरेच प्रकार विवेकबुद्धीने काही प्रश्न विचरताच उघडे पडतात.
ठीक आहे रेकी, प्राणिक हीलिंग नाही तर तुम्हाला "दुसर्या प्रकारच्या" अमर्यादपणामध्ये नक्की काय सिद्ध करायचय ते सांगा उगाच ताकाला जाउन भांड का लपवताय??
16 Apr 2012 - 3:49 pm | बाळ सप्रे
अच्छा म्हणजे इथे मिरची झोंबली तर.. :-)
मग काढा ना एक धागा प्राणिक हीलिंगवर. असेल तथ्य तर करु मान्य. सध्यातरी नाडीच्याच कॅटॅगरीतला विषय वाटतोय :-)
16 Apr 2012 - 3:59 pm | यकु
>>>अच्छा म्हणजे इथे मिरची झोंबली तर..
--- छे हो! हे विश्व माझ्या बापजाद्यांनी मिळून निर्माण केलेलं नाही. त्यामुळे त्यात काहीही चुकीचं बोललं जात असलं तर मला मिर्च्या झोंबण्याचा प्रश्न नाही. मी माझ्या वैयक्तिक अनुभवाशी किंचीत प्रामाणिक रहाण्याचा प्रयत्न करतो, एवढंच. आणि मी स्वत:ला हिरीरीने इतरांना काही पटवून देणारा प्रचारकही नाही. :)
>>>मग काढा ना एक धागा प्राणिक हीलिंगवर. असेल तथ्य तर करु मान्य. सध्यातरी नाडीच्याच कॅटॅगरीतला विषय वाटतोय
--- धागे काढून लोक काही गोष्टी मान्य करतात यावर माझा तरी विश्वास नाही. हा धागा काढून ज्याने मते मांडली आहेत त्याने ती पूर्ण अनुभवांती मांडली आहेत का एवढं फक्त पहातोय.
श्रीयुत यनावाला यांचे काय म्हणणे आहे ते आधी कळू द्या.
16 Apr 2012 - 4:06 pm | बाळ सप्रे
मुद्द्यात काही तथ्य असेल तर मान्य करायला काहीच हरकत नाही..
आता तुम्हाला मांडायचाच नाही तर काय करणार??
मग उगाच लेखकाने जीवंतपणा सिद्ध करावा वगैरे बडबड कशासाठी :-)
16 Apr 2012 - 4:12 pm | यकु
>>>मग उगाच लेखकाने जीवंतपणा सिद्ध करावा वगैरे बडबड कशासाठी
---- आता मात्र बासच! जे म्हणण्यातच आलेले नाही ते म्हटले गेले आहे असे मानून तुमचे हे साद प्रतिसाद सुरु दिसत आहेत.
[अहो विश्व अमर्याद आहे की कसे हेच नव्हे तर इतर काहीही तुम्ही किंवा इतर कुणीच निश्चित सांगू शकत नाही!
म्हणजे आपण कितीही जीव तोडून फडफड केली तरी हा पसारा आपल्या आवाक्यात येणारा नाही हे एक बाजूला मान्य करायचं आणि आपला अनुभव तोकडा पडतोय तिथे मात्र बुद्धीवादी मुखवटे घालून अगदी यादी करकरुन, एकेका गोष्टीचा निषेध करत सुटायचं हे मनोरंजक आहे. तुम्ही अद्याप जीवंत आहात तर एक्सप्लोर करा ना तुमचा जीवंतपणा जरा पूर्णपणे (फक्त तर्काने एक्सप्लोर करुन फायदा नाही - जीवंत आहात, त्या जीवंततेमध्ये जरा पूर्णपणे आत घुसा, तरच तुमचा असा जनरलाज्ड सूर सार्थकी ठरेल ) - आणि मग एका बिंदूवर पोचून सगळ्या बुद्धीवादाने दम तोडला की तुम्ही काय करु शकता ते असंच आम्हाला सांगा.]
यातल्या कुठल्या वाक्याचा अर्थ जीवंतपणा सिद्ध करा असा होतो?
16 Apr 2012 - 4:20 pm | बाळ सप्रे
जीवंतपणा सिद्ध नव्हे.. तर एक्स्प्लोअर करा, आत घुसा एकन्दरीत काय तर माझा अनुभव ग्रेट आहे त्यावर तुम्ही बोलायच नाही कारण तुम्हाला तो अनुभव नाही..
आणि मुद्दे पण द्यायचे नाहीत .. का तर मला काहीच सिद्ध करायचं नाहिये..
:-)
16 Apr 2012 - 4:24 pm | यकु
>>>जीवंतपणा सिद्ध नव्हे.. तर एक्स्प्लोअर करा, आत घुसा एकन्दरीत काय तर माझा अनुभव ग्रेट आहे त्यावर तुम्ही बोलायच नाही कारण तुम्हाला तो अनुभव नाही..आणि मुद्दे पण द्यायचे नाहीत .. का तर मला काहीच सिद्ध करायचं नाहिये..
---- म्हणजे तुम्ही उगाच बडबड करता आणि ती तुम्हाला सप्रमाण दाखवून द्यावी लागते मग तुम्ही तुमच्या समजून घेण्यात किंचीतशी सुधारणा करता हे आपोआपच सिद्ध झाले!
आणि माझा अनुभव(च) ग्रेट आहे असं माझं म्हणणं असतं तर इथे चर्चेत पडलो नसतो.
असो.
16 Apr 2012 - 4:35 pm | बाळ सप्रे
रेकी तुमचा मुद्दा नव्हे.. तो मुद्दा सोडला..
मगाशी प्राणिक हीलिंग पकडलत.. एकदम ग्रेट अनुभव ..
तो पण सोडून नुसत्याच "अनुभवावर" आलात आता तो पण नको म्हणताय..
आता मात्र ऑल आउट.. काहीच बाकी ठेवल नाहीत..
तरी पण अजून जोष खूप आहे.. चालू द्या..
बुद्धीवादी "मुखवटे" वाल्याना मात्र मुद्दे लागतात :-)
16 Apr 2012 - 7:52 pm | कवितानागेश
तुला तुझ्याच शब्दात पकडता येइल आणि तुझ्याच तंगड्या तुझ्याच गळ्यात घालता येतील अशी सरळ साधी (भोळसट्पणाची) विधाने कर बरे यक्कु.
आणि जिवंतपणा एक्स्प्लोर करायला वगरै सांगू नकोस उगीच.
ही चिटींग झाली.
मराठीच्या पेप्राला कबड्डीची म्याच नाय खेळायची! :D
17 Apr 2012 - 4:36 am | रामपुरी
पहिलाच मुद्दा ( जिवंतपणा एक्सप्लोर करण्याचा) न कळल्यामुळे पुढचं सगळं मस्त वाटलं. :) :) :)
जिवंतपणा नक्की कसा "एक्सप्लोर" करायचा हे कळालं तर आणखी मज्जा येईल. रेकी, प्राणिक हिलींग इत्यादींनी जिवंतपणा एक्सप्लोर होतो की ओशो, सत्यसाईबाबा सारखा एखादा गुरु केल्याने?
16 Apr 2012 - 9:37 pm | यनावाला
मूळ वचन बहुधा विनोदी लेखक मार्क ट्वेन यांचे आहे. निश्चित ठाऊक नसल्याने नाव देण्याचे टाळले. ते तसे महत्त्वाचे नाही असे मला वाटते.पण त्या वचनाचा गर्भित अर्थ लक्षात घ्यायला हवा."पैकी विश्व अमर्याद आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकत नाही" यावरून समजायचे की श्रद्धाळूंचा भोळसटपणा अमर्याद आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकतो असे सुचवायचे आहे. थोडक्यात म्हणजे श्रद्धाळूंच्या भोळसटपणाला सीमा नाही हे ठसवायचे आहे.विश्व अमर्याद आहे की नाही याविषयींच्या ज्ञानाचा/अज्ञानाचा इथे काही संबंध नाही.
17 Apr 2012 - 5:45 am | अर्धवटराव
त्यांना नाहि कळणार तुम्ही काय म्हणताय ते... कळलं तरी ते मान्य करणार नाहि.
*इथे "ते" म्हणजे कोणि विवीक्षीत व्यक्ती नाहि.
अर्धवटराव
16 Apr 2012 - 6:25 pm | बॅटमॅन
ऐन्स्टैन बाबा की जय!!
"Two things are infinite: the universe and human stupidity; and I'm not sure about the the universe."
http://rescomp.stanford.edu/~cheshire/EinsteinQuotes.html
16 Apr 2012 - 3:55 pm | सुहास..
म्यांव !!
चुपक्रमावर आलो की काय ;)
16 Apr 2012 - 4:43 pm | प्यारे१
ज्युस पिवानु मज्जा करानु! ;)
16 Apr 2012 - 7:39 pm | पैसा
चूप!
16 Apr 2012 - 4:10 pm | परिकथेतील राजकुमार
नोंद घेतल्या गेली आहे.
बाकी अंधश्रद्धा कोणती आणि डोळस श्रद्धा कोणती हे कोण ठरवणार आणि काय ज्ञानावरती ठरवणार ? (अर्थात प्राण्यांचा बळी, भूत बाधा इ. इ. प्रकार ह्यात पकडलेले नाहीत.)
स्वेटर घालणार्या बाप्पाच भक्त
परा
16 Apr 2012 - 4:13 pm | बाळ सप्रे
सोप्पय .. आपली ती डोळस दुसर्याची तो अंधश्रद्धा ..
16 Apr 2012 - 10:53 pm | रमताराम
स्वेटर कोणत्या कंपनीचा घ्यावा हे कुंडली मांडून ठरवलं होतं कारे तुझ्या बाप्पानं.
(दूध पिणार्या बाप्पाचा भक्त*) रमताराम
* त्या निमित्ताने डेअरीवाल्यांचा चांगला खप झाला, च्यानेल्सना टीआरपी मिळाला, एसेमेसेस मुळे मोबाईल कुंपण्यांना फायदा झाला. आजच्या पैसा मिळवून देईल ते सारे पावन च्या जमान्यात यवडा फायदा कुटं व्हतोय हो. बगा बाप्पाच पावला की न्हाई?
17 Apr 2012 - 4:44 am | Nile
जेव्हा असले प्रश्न पडणार नाहीत तेव्हा आपोआप उत्तर मिळेल. तोपर्यंत गाढवांपासून* दुर रहा.
*गाढवं कोण असे गाढवपणे विचारू नये.
16 Apr 2012 - 7:04 pm | चौकटराजा
जग आहे .त्यात मानव ही आहे तो पर्यंत कधीही न संपणार्या गोष्टी
पैशाची सत्तेची हाव, भष्टाचार ,सर्व प्रकारचे लैंगिक आकर्षण, मतभेद जीवदया, समाधानी वृती, देवभक्ती, साम्यवाद, राषट्रीय स्वयंसेवक संघ.
आणि ..........................अंधश्रद्धा .
16 Apr 2012 - 7:56 pm | विकास
लेखाच्या मतितार्थाशी सहमत.
कुठलीही अंधश्रद्धा आणि त्यात अडकणे हे घातकच असते. फक्त असल्या अंधश्रद्धा केवळ व्यक्तींपुरत्याच मर्यादीत असतात.
पण सगळेजण समान आहेत याचा अर्थ मार्क्सवाद आणि समाजवादाप्रमाणे घेतल्याने केवळ काही व्यक्तींचेच नाहीतर संपूर्ण देशाचे नुकसान झाले. ती देखील एक अंधश्रद्धाच होती आणि गंमत म्हणजे आजही असे अनेकांच्यात ती दिसून येते. फारतर त्याला सेक्यूलर अथवा निधर्मी अंधश्रद्धा म्हणू शकतो. पण आपले म्हणणे करणारे हे अंधश्रद्ध, मुहं मे "all are equal", असे म्हणत देशाचे आणि समाजाचे अधिक नुकसान करत आहेत. त्या अंधश्रद्धेचे निर्मुलन कसे करायचे?
16 Apr 2012 - 8:12 pm | अप्रतिम
जुन्या जाऊन नव्या वैज्ञानिक मुलामा लावलेल्या अंधश्रद्धा येताहेत....
16 Apr 2012 - 11:03 pm | माझीही शॅम्पेन
तथाकथित नाडी विद्ये बद्दल हेच म्हणता येईल का ?
16 Apr 2012 - 11:52 pm | एक
कुठे जायची सोय ठेवली नाही.
लेखात एक मत असं व्यक्त होत आहे की एक अंधश्र्द्धा जाते आणि दुसरी येते. हे निरीक्षण सांगणं एवढाच लेखाचा उद्देश आहे का? मग हे तर आम्हाला ही दिसतं. (तसे ट्रेण्ड आम्हाला विज्ञानातही दिसतात. पण त्या बद्दल नाही हा बोलायचं. ते विज्ञान आहे..) मग त्यात नवीन असं काय सांगितलं?
बरं, या अंधश्रद्धा किती वेगाने येतात, किती वेगाने जातात, किंवा जाण्याचं प्रमाण आणि येण्याचं प्रमाण या बद्दल काही एनेलिसीस लेखात आहे का? त्यावरून काही निष्कर्ष काढला आहे का? तर अजिबात नाही.
म्हणजे, अंतु बर्वा ष्टाईलमधे "या लेखाला 'लाईक' तरी कुठ्ल्या खात्यावर करायचं?"
एक उद्देश वाटतो तो असा.. नवीन नवीन एक पंचलाईन कळली आहे (ती सुद्धा नक्की कोणाची आहे हे माहित नाही) ती सांगण्यासाठी एवढा लेख. ती लाईन तशीही अनेक वेळा अनेकांनी ऐकली/वाचली आहे हा मुद्दा वेगळा.
- एक अंधश्रद्ध (रिकामटेकड्या लोकांसाठी नवीन हॅण्डल. घ्या खेळा.)
17 Apr 2012 - 4:49 am | Nile
हं? तोंड दाबून कोणी लेख वाचायला लावत आहे का तुम्हाला?
17 Apr 2012 - 11:58 am | परिकथेतील राजकुमार
नायल्या इथे काय करतोय ?
शंकराचार्य
परा
17 Apr 2012 - 9:43 pm | एक
वाटच बघत होतो...
वकिल सरसावले पुढे! पण मी लेखा बद्द्ल जे मुद्दे उपस्थित केले (उ.दा. एनेलिसीस किंवा ट्रेण्ड ची कमतरता असणे, किंवा नुसतच निरिक्षण , जे सर्वांनाच दिसतं ते नोंदवणे. त्यामुळे लेखाची किंमत माझ्या दृष्टीने शुन्य ठरते) त्या बद्दल एक चकार शब्द नाही. जाऊ दे..
बादवे, आमच्या मिसळीत झुरळ पडलं तर आम्ही ती मिसळ टाकून देतो आणि मिसळवाल्याला थोड्या शिव्यापण घालतो. हा आवडी-निवडीचा प्रश्न आहे. आता आम्हाला नाही आवडत झुरळं! पण एरवी मिसळ चांगली मिळते ना म्हणून तक्रार करायची कि "बाबा थोडी काळजी घ्या. तुमची चांगली रेप्युटेशन आहे, तुमची मिसळ चांगली असते. पण असा हलगर्जीपणा करू नका."
18 Apr 2012 - 1:11 am | Nile
हो, तुम्ही आठवण काढल्याने उचक्या लागल्या म्हणूनच आलो.
17 Apr 2012 - 6:22 am | अर्धवटराव
>>"प्लॅंचेटवर मृताच्या आत्म्याशी संवाद" हा भ्रम पूर्वी सर्वत्र बोकाळला होता. कालान्तराने त्याची निरर्थकता लोकांच्या ध्यानीं आली.ती अंधश्रद्धा नामशेष झाली.
-- आपला काहि पर्सनल अनुभव नाहि बुवा... तेंव्हा पास. हां, आता ती अंधश्रद्धा नामशेष झालि कि काय याबद्दल दुमत आहे. आमच्या कॉलेजचे रिकामटेकडे उद्योगी अजुनही नवनवीन अवतार घेऊन हे असले प्रयोग करत असावे अशी खात्री आहे.
>>एकेकाळी रामबाण म्हणून गाजलेले अनेक औषधोपचार नंतर निरुपयोगी ठरून विस्मृतीत गेले.
-- फारच मोघम वाक्य. हे विधान अनेक टेक्नोलॉजी, थेरपीज, रसायनं, अॅलोपॅथी औषधी, मानसशास्त्रीय प्रयोग, डाएट प्रोग्राम्स.. असल्या असंख्य बाबतीत खरे आहे.
>>"रेकी " या प्रकाराला अनेक श्रद्धाळू काही काळ फसले. आता ती अंधश्रद्धा अस्तंगत झाली आहे.
-- ज्यांना "रेकी" चा चांगला अनुभव आला अशे अनेक लोक पाहाण्यात आहेत. शिवाय ति (जरी अंधश्रद्धा असली) नामशेष वगैरे नाहि झालेली. अजुन "मुर्खांचा" तोटा नाहि हो जगात.
>>प्राणिक हीलिंग आणि भाग्यरत्ने हे फसवणूकप्रकार सध्या त्या मार्गावर आहेत.
-- अस्तंगत होणार्या अंधश्रद्धांवर खरच एखादा डाटाबेस आहे काय लेखकाजवळ ? अस्ताचा इतका छातीठोक दावा करताय म्हणुन विचारतोय... कि ती सुद्धा एक "डोळस श्रद्धाच" आहे ? ;)
>>काही वर्षांपूर्वी वास्तुदिशाभूलशास्त्र या भ्रमाची देशात सर्वत्र साथीच्या रोगासारखी लागण झाली.
-- या शास्त्राचं नाव पहिल्यांदाच ऐकतोय...
>>पण फसवणूक करणे हाच ज्यांच्या उपजीविकेचा आधार असतो असे लबाड लोक नवनव्या अंधश्रद्धा पसरवतात.
-- हे सुद्धा फारच मोघम विधान आहे. लबाडी करण्याच्या ट्रीक्स कुठल्या प्रांतात चालत नाहित? इनफॅक्ट, हा तर एंटरप्रेनशीपचा वास्तुपाठ म्हणावा ;)
>>श्रद्धाळूंच्या भोळसटपणाला सीमा नसते.
-- एकदम चुकीचे विधान. करेक्ट स्टेटमेंट असे: "भोळसटपणाला सीमा नसते".
बरं, प्रत्येक मनुष्य अगदी हुषार, स्मार्ट, चौकस वगैरेच असला पाहिजे हा अट्टहास का? जगु द्या कि शांतपणे सर्वांना.
>>या संदर्भात एक सुवचन आहे:" दोन गोष्टी अमर्याद आहेत. हे अनंत विश्व आणि श्रद्धाळूंचा भोळसटपणा (खरेतर अडाणीपणा). पैकी विश्व अमर्याद आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकत नाही."
-- या सुवचनावर लिहावं तेव्हढं कमीच. सध्या एव्हढच सांगता येईल कि इथे हे सुवचन सॉलीड गंडलय :)
बाकि लेखकाच्या भावना समजल्या. त्याच्या प्रामाणीकपणाविषयी काहि शंका नाहि (आयला, शंका नाहि म्हणजे श्रद्धा->म्हणजे अंधश्रद्धा->म्हणजे आम्हि भोळसट-> म्हणजे आम्हि अमर्याद... ययाआआआहूऊऊऊ)
अर्धवटराव
17 Apr 2012 - 11:27 am | यकु
हा प्रतिसाद वाचल्यानंतर मर्यादित खिडकीतून अमर्यादीत आकाशात उडी मारण्यात आली आहे! ;-)
17 Apr 2012 - 11:32 am | कवितानागेश
एय्य,
व्हॉट आय टोल्ड यु चिल्ड्रन... नो कबड्डी हियर बरं का...... :)
17 Apr 2012 - 11:36 am | यकु
ब्वॉर्र!!
जातोय .. जातोय.. मैदानावर जातोय :p
17 Apr 2012 - 8:07 am | नितिन थत्ते
काही अंधश्रद्धा मात्र कधीच अस्तंगत होणार नाहीत. कारण त्यांच्यामुळे एक प्रकारची नशा येते.
17 Apr 2012 - 11:17 am | शिल्पा ब
बरं मग? तुमचं काय म्हणणं आहे हे एक गुपितच राहीलं की!!
17 Apr 2012 - 6:41 pm | विकास
भारतात जेंव्हा सुर्यास्त होतो तेंव्हा अमेरीकेत सुर्योदय होत असतो. अंधश्रद्धांच्या बाबतीत पण असेच आहे का कळत नाही...
आजच आमच्याकडील कर्मचार्यांसाठीच्या जत्रेमध्ये ब्लडप्रेशर वगैरे तपासणीचे बुथ्स आहेत पण त्याच बरोबर "रिलॅक्सेशन विथ रेकी" पण आहे! म्हणून सहज गुगल केले तर http://www.reiki.org/ हे अधिकृत संस्थळ दिसले.
(रेकी हा काय प्रकार आहे, हे केवळ ऐकून माहीत आहे. जे काही ऐकले आहे त्यावरून त्यात काही वैज्ञानिक वाटले नाही... अजून एक आठवले: पुलंच्या आजारपणात त्यांचे काही चाहते सारखे रेकी करू लागल्याचे त्यांना कळले तेंव्हा पुल म्हणाले, हे अतिरेकी झाले. ;) )