स्ट्रॉबेरी फेस्टीवल २०१२

मोदक's picture
मोदक in भटकंती
9 Apr 2012 - 11:53 am

"मॅप्रो" दरवर्षी इस्टरच्या वीकांताला स्ट्रॉबेरी फेस्टीवल आयोजीत करते. गेली दोन वर्षे याकडे लक्ष ठेवून होतो पण कांही ना कांही कारणाने जाणे जमत नव्हते, मागच्या वर्षी तर विश्वचषक अंतीम सामना आणि स्ट्रॉबेरी फेस्टीवल एकाच वेळी आल्याने जाणे शक्यच नव्हते.

यावेळी मात्र जानेवारीपासून प्लॅन करून आणि कोणत्याही परिस्थीतीत हे चुकवायचे नाहीच अशा तयारीने सगळे ठरवले. दरम्यान इव्हेंट मॅनेजरचा नंबर मिळवून त्याला प्रश्न विचारून जेरीस आणले होते. मित्रांची मोठी टोळी घेवून जायचे ठरले पण आयत्या बाकी सगळे मित्र कांही ना कांही कामात अडकल्याने मी आणि नितीन (हा मिपा सदस्य नाहीये) दोघेच गेलो.

सकाळी ७ ला पुणे सोडले. जास्ती थंडी नाही, जास्ती उकाडा नाही अशा वातावरणात गाडी हाणायला मजा येत होती.

कात्रज तलाव

शिरवळ ला नाष्टा करून पांचगणी ओलांडायला ०९:३० झाले. मॅप्रो गार्डन ला १० वाजता पोहोचलो.

गाड्या लावता लावता असे लक्षात आले की एक स्ट्रॉबेरी विक्रेता ५०० चे सुट्टे शोधत होता... मग एक मजेशीर संवाद झाला.

मी - (त्याला आपणहून बोलावून) सुट्टे पैसे देतो पण स्ट्रॉबेरी चा रेट किती कमी करतोस सांग. (खुल्ली ऑफर :-))
तो - किती घेणार आहे..?
मी - अमुक अमुक. पण रेट व्यवस्थीत मिळाला तरच.
तो -(आमची खरेदीची क्वांटीटी ऐकून) मग चला माज्या शेतावर.. तिथेच तोडून देतो.

अनपेक्षीतपणे शेतावर जाण्याचा बोनस मिळाल्याने लगेचच शेताकडे गाड्या वळवल्या.

नाशीकचा द्राक्षाचा शेतकरी (नितीन) एका दुसर्‍या शेतकर्‍याला मागे बसवून शेतात जाताना.

विक्रेता + शेतकरी पण झकास माणूस होता.. शेतावर चार वेगवेगळ्या जातींची स्ट्रॉबेरी आम्हाला टेस्ट करायला दिली आणि कोणती हवी ती सांगा अशी त्याने खुल्ली ऑफर दिली. नंतर त्याच्याइथला एक वाफा हेरून आम्ही हल्ला बोल केला.. रसाळ, गोड आणि ताजी फळे आपल्या हाताने तोडून खाण्याचा आनंद वेगळाच.

स्ट्रॉबेरी

रासबेरी

मलबेरी (तुतु चे फळ)

आमच्या वेळेचे गणित तपासून त्याला ४ वाजता पुन्हा भेटू असे सांगीतले आणि आमचा मोर्चा पुन्हा मॅप्रो गार्डन कडे वळवला. तिथे लहान मुलांसाठी भरपूर खेळ, लेझीम, साहसी प्रात्यक्षीके वगैरे प्रकार सुरू होते. आम्ही तिकडे न जाता चॉकलेट फॅक्टरी बाहेरून बघितली आणि किरकोळ खरेदी केली.
तिथले डार्क चॉकलेट मात्र आजीबात कडू नव्हते. ते मिल्क चॉकलेट सारख्याच चवीचे लागत होते. डार्क चॉकलेट खाल्यानंतर जी कडवटपणाची किक बसते ती आजीबात बसली नाही. :-(

चॉकलेट फाऊंटन

नंतर थोड्या लांब अंतरावरच्या मॅप्रोच्या शेतांमध्ये एक चक्कर मारली त्या शेतांमध्ये मंडप + (सुसह्य) डीजे वगैरे थाट होता. गेल्यागेल्या स्ट्रॉबेरी ज्यूस ने स्वागत केले गेले आणि "हे आमचे शेत.. हवी तितकी स्ट्रॉबेरी खा" असा प्रेमळ आग्रहही झाला.

शेत

शेता मधले बाकीचे टूरीस्ट...

स्ट्रॉबेरी सारख्या रंगाच्या टीशर्ट मध्ये मी.. कॅमेरा गळ्यात लटकावून नितीन..

सकाळपासूनचा दिवस स्ट्रॉबेरीमय झाल्याने थोडासा बदल हवा होता.. तितक्यात एका झाडाला लगडलेल्या कैर्‍या दिसल्या.

भूक जाणवायला लागल्यानंतर आम्ही पुन्हा मॅप्रो गार्डन मध्ये आलो आणी खादाडी सुरू केली.

मॉकटेल - मॅनोरा (आंब्याचा गोडवा आणि संत्र्याची मिरमिरीत चव + बर्फाचा चुरा + थोडा चाट मसाल्यासारखा मसाला = अप्रतीम चव)

मॉकटेल - नॉटी काऊबॉय. (लिची + खस + लेमन सिरप + लिंबूटिंबू -हा एक ज्यूसचा प्रकार आहे असे सांगीतले - हे ही चांगले होते)

कोल्ड स्टोन आईसक्रीम
यामध्ये आपल्याला हवे ते ३ आईसक्रीम फ्लेवर एका ग्रॅनाईटवर घेतात, ड्रायफ्रूटचा कीस सढळहस्ते वापरून सगळे एकत्र करतात आणि केशर सिरप, मँगो क्रश, बदाम पिस्ते आणि काजू चा फायनल लेयर देवून वॅफल कोन च्या बाऊलमध्ये सजवून देतात.

केशर पिस्ता + मँगो + बटर स्कॉच आईसक्रीम आणि ड्रायफ्रूट कोल्ड स्टोन वर...

फायनल डीश. प्रत्येक घासाला दाद देता देता ही डीश कधी संपली तेही कळाले नाही.

सिझलींग हॉट चॉकलेट ब्राऊनी

एका कडकडीत तापलेल्या प्लेटवर एक वॉलनट केक स्लॅब ठेवतात, त्या केकवर आपल्या आवडीचे दोन स्कूप आईसक्रीम + ड्रायफ्रूट, फायनल स्टेज ला आजूबाजूला भरपूर प्रमाणात चॉकलेट सॉस घालून (सिझलर्स सारखे गरम गरम) Serve करतात.

पहिल्या राऊंडला बटरस्कॉच + मँगो आणि दुसर्‍या राऊंडला व्हॅनिला + केशरपिस्ता असे काँबीनेशन घेतले. (दिवसभर स्ट्रॉबेरी खात असल्यामुळे शेवटी शेवटी ऑर्डर स्ट्रॉबेरी सोडून आणखी कोणता फ्लेवर आहे याची चाचपणी करून जात होती. )

मॅप्रो गार्डन मध्ये आणखी एक मस्त प्रकार होता. प्रत्येक टेबलावर छोटी बुट्टी भरून स्ट्रॉबेरीज ठेवल्या होत्या. स्ट्रॉबेरी संपल्या की ते आणून भरत होते. देठ आणि पानांनीच आमची एक बुट्टी भरली.. तीही त्यांनी तत्परतेने (स्ट्रॉबेरीने) भरून दिली. :-)

स्ट्रॉबेरी खावून मन तृप्त झाले होते तरीही शेवटी, फ्रेश स्ट्रॉबेरी विथ क्रीम अँड आईसक्रीम. (याच्या वर्णनाची गरज आहे का..? ;-))

मजबूत खादाडीने पोट आणि खरेदीने बॅग तुडूंब भरली होती.

फुल्ली लोडेड...

आता एका दृष्टीक्षेपात दिसणारा पसरणी घाट उतरायचा होता..

दिवस भर भरपूर खादाडी केली... मनसोक्त स्ट्रॉबेरी खाल्ली... गाडीवरून २५० किमी प्रवास झाला... पुढच्या ट्रेक / ट्रीपचा विचार करत १०:३० ला घरी पोहोचलो..

हा एक नितांतसुंदर दिवस होता. :-)

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

9 Apr 2012 - 12:04 pm | प्रीत-मोहर

जळजळ झाल्या गेली आहे.....

सोत्रि's picture

9 Apr 2012 - 8:03 pm | सोत्रि

अतिशय म्हणजे अती भयंकर जळजळ झाली आहे.
तो 'फ्रेश स्ट्रॉबेरी विथ आइस क्रीमचा' फोटो बघितल्यावर चेन्नैतली प्रचंड उष्णता अंग अंग जाळून गेली :(

स्वगतः सोक्या, 'इनो हवाय' हे तमिळमध्ये कसे म्हणतात हे लवकर शिकून घे नाहीतर तुझे काही खरे नाही

- (चेन्नै उष्णता फेस्टीव्हल २०१२ अनुभवणारा) सोकाजी

निशदे's picture

10 Apr 2012 - 1:23 am | निशदे

+१००००
म्हणजे 'जळजळ' या शब्दाला लाज वाटेल इतकी जळजळ........
एकसे एक फोटो.....

सोकाजीराव,
इथे बर्फ आहे, पाठवू का थोडा????

स्पा's picture

10 Apr 2012 - 11:06 am | स्पा

भेंडी... काय आहे हे????

साफ खपल्या गेलो आहे

__/\__

प्यारे१'s picture

9 Apr 2012 - 12:13 pm | प्यारे१

भा* , मला सांगायचंस ना!
वाईला जाऊन आलो असतो ना आपण...
श्श्य्या!

आर्रर्रर्र... ह्ये मिसलं की राव... ज्याम मोजा क्रुन आलेलं दिसतांव पाव्हणं...
फुडच्या येळी जाइन म्हंजी जाइन...
मोदका, अरे खर्च कितपत आला ते ही सांग म्हणजे प्लॅनिंग साठी बरे पडेल??

मोदक's picture

9 Apr 2012 - 12:44 pm | मोदक

कोल्ड स्टोन आईसक्रीम, सिझलींग हॉट चॉकलेट ब्राऊनी आणि फ्रेश स्ट्रॉबेरी विथ क्रीम अँड आईसक्रीम, एक डीश रू. १५०/-.

मॉकटेल ची रेंज रू. ४५ ते ९० अशी होती.

पिझ्झा सँडवीच आणि फ्राईज पण होते तिथे.. सँडवीच साधारणपणे ६० ते १५० च्या रेंजमध्ये आणि पिझ्झा १८० +.

मृत्युन्जय's picture

9 Apr 2012 - 12:22 pm | मृत्युन्जय

कालच महाबळेश्वरासी जाणे केले होते. परंतु तेथे ही फुकट स्ट्रॉबेरी नाही खयला मिळाली. कार्यक्रम मात्र चालु होते. मजा आली. कॉल्ड स्टोन घ्यायची प्रचंड इच्छा झाली होती पण नेहमीप्रमाणे स्ट्रॉबेरी विथ क्रीम घेतले गेले. पुढच्या वेळेस मात्र तु म्हणतोस तसे कोल्ड स्टोन घेइन.

सिझलिंग हॉट ब्राउनीचा फोटो अगाध आहे, केवळ आणि केवळ घरगुती संसारी कामात अडकल्याने येणे शक्य झाले नाही. फोटो आणि रिपोर्ट मस्त,

एक सल्ला. - हा रिपोर्ट आणि फोटो तुझ्या ब्लॉगवर टाकुन ती लिंक मॅप्रोला दे, ते आवडलं तर प्रिंट आउट काढुन गार्डन मध्ये लावुन ठेवतात तुझ्या नावासहित.

अवांतर - तुम्ही स्ट्रॉबेरी खात होता तेंव्हा आम्ही संदेश खात होतो त्यामु़ळं जळजळ वैग्रे झालेली नाही.

आदल्या दिवशी (दिवसभर) भेटूनही दुसर्‍या दिवशीच्या प्लॅनचा पत्ता लागून न दिल्याबद्दल वल्ली आणि तुमचा तीव्र निषेध. ;-)

२१ - २२ चा वीकांत रिकामा आहे... जायचे का संदेश खायला..?

प्रचेतस's picture

9 Apr 2012 - 3:15 pm | प्रचेतस

नुसते साँदेश नाय बे, खीर पुली, चोमचोम, मलाई टोस्ट पण ;)

अरे अरे, त्याआधीचं बेज मुगलाई विसरलात काय ? या बेज वरुन ते ठिकाण ऑथेंटिक बंगाली असल्याची खात्री पटली आहे आम्हाला.

प्रचेतस's picture

9 Apr 2012 - 5:13 pm | प्रचेतस

छे छे. ते कसं विसरेन.
चोलेर करी असं कायसं नाव असलेली पनीर करी आणि बेज मुगलाई भन्नाटच होती. पण वर फक्त मिठायांबद्दलच सांगितले.

२१ / २२ ला नक्की जायचे आहे... Final.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Apr 2012 - 5:47 pm | अत्रुप्त आत्मा

पण दोघेही जणं संदेशात गुळ होता हे विसरलात... ;-)

एक गुळचट (गुर साँदेश)होता आणि एक साखरेचा (नुसताच साँदेश) ;)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Apr 2012 - 12:37 am | अत्रुप्त आत्मा

@एक साखरेचा (नुसताच साँदेश) >>> :-D देवाधिदेवा...या दु..दु..अ****ला मधुमेह कर,आणी मग याच्यात नुसतेच साखरेचे संदेस भर :-p

मोदक's picture

9 Apr 2012 - 12:36 pm | मोदक

प्रकाटाआ

नंदन's picture

9 Apr 2012 - 12:55 pm | नंदन

फोटू आणि वर्णन झकास. कोल्ड स्टोन आईस्क्रीमच्या ह्या फ्लेवरची 'खाणे मस्ट'च्या यादीत भर घातली आहे :)

भरपुर आणि चांगली माहिती...

झक्कास वर्णन रे... आणि फोटोही क्लास आहेत. लईच मजा करुन र्‍हायला बे तू.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Apr 2012 - 1:12 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त फेरफटका रे.

फटू पण झक्क्कास !

आम्ही मधे अत्रे सभागृहातल्या स्ट्रॉबेरी फेस्टिवलवरती तहान भागवून घेतली होती.

कवितानागेश's picture

9 Apr 2012 - 1:21 pm | कवितानागेश

फ्रेश स्ट्रॉबेरी विथ क्रीम अँड आईसक्रीम मस्त असते.
आयुष्यभर इथेच बसून हेच खात रहावे असे वाटते. :)

यकु's picture

9 Apr 2012 - 1:24 pm | यकु

:)

मोदक दि ग्रेट!

प्रचेतस's picture

9 Apr 2012 - 3:10 pm | प्रचेतस

झकास रे मोदका.
जाम ऐश केलीस.

स्वाती दिनेश's picture

9 Apr 2012 - 3:20 pm | स्वाती दिनेश

फोटो आणि वर्णन दोन्ही मस्तच...
स्वाती

इरसाल's picture

9 Apr 2012 - 3:25 pm | इरसाल

सुशपण

मोदक, निशेधाचा बाण मारतोय. पुन्हा एकदा मला कळवले नाही आणि कलटी मारल्याने निशेध..

- पिंगू

अत्रुप्त आत्मा's picture

9 Apr 2012 - 3:48 pm | अत्रुप्त आत्मा

मोदकाचे आमंत्रण होते...पण... सक्काळी त्याच वेळेत काम असल्याने,या भन्नाट अनुभवाला मुकलो.. (आता लैच बेचैनी वाटते आहे) :-(
पण मोदका,पुढच्या वर्षी मात्र कित्तीही काम असलं तरी मोठ्या तुकडी सह जोरदार हल्ला करायचा हे निश्चित , मॉकटेल्स आणी आईस्क्रीममुळे जळजळ तीव्र झाली आहे.. ;-) तिकडुन येताना आणखि काय/काय आणलय..? ;-)
हिरव्या-गार शेतीचे फोटू विशेष आवडल्या गेले आहेत. ;-)

भ र पू र स्ट्रॉबेरी आणि सरबते..

पाठीवरच्या ब्यागेच्या आकारावरून अंदाज येईलच. ;-)

प्रास's picture

9 Apr 2012 - 4:01 pm | प्रास

भन्नाट भटकंती मोदकराव!

खादाडीचे फोटो पाहून अंमळ, नव्हे नव्हे भरपूरच जळजळ झालेली आहे. इथे मुंबईत उन्हं चढलेली अनुभवताना असे फोटो बघणे हा त्रास आहे हे जाता जाता नमूद करून ठेवतो.

बाकी काही नाही तरी आता गेलाबाजार एखादं नॅचरल्सचं स्ट्रॉबेरी आईसक्रीम मस्ट आहे ;-)

पियुशा's picture

9 Apr 2012 - 4:05 pm | पियुशा

वॉव !!!!
मस्त फ्रेश स्ट्रॉबेरी विथ क्रीम अँड आईसक्रीम
सहीच्च :)

सुरेख वर्णन आणि चित्ताकर्षक फोटो. आवडले.

रेवती's picture

9 Apr 2012 - 5:15 pm | रेवती

भारीच आहे सगळे.

सुहास झेले's picture

9 Apr 2012 - 6:55 pm | सुहास झेले

भन्नाट एकदम..... :) :)

पैसा's picture

9 Apr 2012 - 7:19 pm | पैसा

फोटो आणि वर्णन भयंकर आवडलंय!

sneharani's picture

10 Apr 2012 - 11:05 am | sneharani

असेच म्हणते
फोटो अगदी मस्त आलेत, आवडले!!

एकदम कडक वृत्तांत :-) सगळे फोटो अतिसुंदर...

पण ४-५ दिवस आधी का नाही हो सांगितले मिपावर की येत्या विकांताला हा फेस्टिवल आहे म्हणून.
खूप जणांनी हा आनंद लुटला असता ना...

एकदम स्वादिष्ट सहल केलीस रे !!

बाकी जळजळ निषेध आहेच ;)

जेनी...'s picture

10 Apr 2012 - 12:20 am | जेनी...

जिवंत वाटलं सगळच :)

अभिष्टा's picture

10 Apr 2012 - 10:47 am | अभिष्टा

बरं झालं मला फोटोच दिसत नाहियेत ते.

वपाडाव's picture

10 Apr 2012 - 12:08 pm | वपाडाव

म्याडम, आपलं गणेशाज्वरात अंमळ प्रेमाने स्वागत आहे.
संदर्भासाठी खालील लिंका चाळाव्यात.
http://www.misalpav.com/node/14832#comment-247237
http://www.misalpav.com/node/17091#comment-293996
http://www.misalpav.com/node/20871#comment-377140
http://www.misalpav.com/node/20871#comment-377236
http://www.misalpav.com/node/21181#comment-385466

मोदक's picture

10 Apr 2012 - 10:58 am | मोदक

धन्यवाद मंडळी...

वेगवेगळ्या फूड फेस्टीवल ला नेहमी जाणारे कोणी असेल तर जरूर सांगा.. मी बर्‍याचदा जातो.. बरोबर कोण असावे वगैरे अटी नाहीयेत.. कोणी नसेल तर मी एकटा पण जातो. ;-)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

11 Apr 2012 - 8:37 pm | विश्वनाथ मेहेंदळे

नाव लिहून घे रे.
मुंबईत कुठेही असेल तर जरूरच आणि अगदी खास असेल असे काही तर पुणे परिसर किंवा अजून लांब ही चालेल. :-)

फोटो आणि वृत्तांत आवडला

फोटो आणि वृत्तांत आवडला

मी कस्तुरी's picture

10 Apr 2012 - 11:43 am | मी कस्तुरी

मस्त खादाडी झालीय आणि वर्णन, फोटू, भटकंती भन्नाटच :)

अक्षया's picture

10 Apr 2012 - 12:45 pm | अक्षया

सहीच.....

सुरेख वर्णन आणि फोटो. आवडले.
:)

प्राजक्ता पवार's picture

10 Apr 2012 - 4:11 pm | प्राजक्ता पवार

फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले :)

फोटो पाहून जळजळ झाल्या गेली असली तरी ज्या कारणासाठी येणं कॅन्सल केलं ते सांगितलंच आहे. तेही तितकंच महत्त्वाचं होतं. त्यामुळे जळजळीची तीव्रता कमी झाल्या गेली आहे. ;)

प्रभाकर पेठकर's picture

10 Apr 2012 - 7:10 pm | प्रभाकर पेठकर

अप्रतिम छायाचित्रे. वर्णनही तितकेच 'रसाळ' आहे. मधुमेहामुळे गोडाची छायाचित्रे फक्त पाहण्यावरच समाधान मानून आहे. पण, पुढच्या स्ट्रॉबेरी उत्सवास हजेरी लावायलाच पाहिजे.

पुढच्या वर्षीच्या इस्टरचा गजर आजच माझ्या भ्रमणध्वनीत लावून ठेवतो.

स्मिता.'s picture

10 Apr 2012 - 7:59 pm | स्मिता.

कसले ते फोटो आणि काय ते वर्णन! अगदी जीव कासवीस झाला. आता घरी जाता जाता स्टॉबेरी घेऊन जावी म्हणते. तेवढीच दुधाची तहान ताकावर भागेल.

फोटो तर अगदीच बघवत नाहीत

मोदक's picture

10 Apr 2012 - 9:10 pm | मोदक

:-)

सुनील's picture

10 Apr 2012 - 9:30 pm | सुनील

रंग आणि स्वाद यात स्टॉबेरीला तोड नाही. फोटो कातील!

प्रेरणा पित्रे's picture

11 Apr 2012 - 2:26 pm | प्रेरणा पित्रे

परवा हा लेख वाचल्यापासुन सतत कोल्ड्स्टोन आइस क्रीम डोळ्या समोर येत आहे.... परवा घरि जातान्ना सुजाता चे आईस क्रीम नेले... आणि काल नेचुरल्स चे... तरिपण जऴजळ काहि केल्या कामि होत नाही. कधी एकदा माप्रो ल जाते असे झाले आहे.... फोटो साठि तिव्र निशेध.

दणकट. फोटो नि वृत्तांत दोन्ही झकास!

सविता००१'s picture

11 Apr 2012 - 4:56 pm | सविता००१

मस्त-मस्त-मस्त

प्राध्यापक's picture

11 Apr 2012 - 6:36 pm | प्राध्यापक

मस्तच माहीती आहे जाम आवडली ....आणी फोटो तर एकदम झ्यक आले आहेत...{आमच्या जठरावर,स्वादुपींडावर,अन्ननलीकेवर आणी लाळ्ग्रंथी वर प्रचंड अन्याय झाला आहे}.मागच्या महीन्यात गेलो होतो महाबळेश्वराला त्यावेळेस पोलाद्पुर चा घाट उतरत असताना निसर्ग धाब्यावर चिकन कोल्हापुरी लई भारि लागल होतं.

त्या रस्त्याने पुण्याला येण्याची चूक एकदा केली होती...

दापोलीला बाईकवरून जाणे हा एक आवडीचा प्रकार आहे... दरवर्षी जातो.

एकदा वरंधा घाटातून कोकणात उतरलो.. दापोली, हरणे, उन्हावरे ठिकाणे करून परत येताना महाबळेश्वरमार्गे येण्याची हुक्की आली म्हणून तसे आलो.. समुद्रसपाटीपासून आपण हिल स्टेशन ला चाललो आहे इतके साधे लॉजीक लक्षात आले नाही आणि तो घाट चढण्याचा संपूर्ण प्रवास खूप कंटाळवाणा झाला...

मागे बसलेला मित्र जास्ती टिवटीव करायला लागल्यावर दूर कुठेतरी दिसणारा लाईट दाखवून तिथे जायचे आहे असे सांगून त्याला गप्प बसवले.. आणि दीड दोन तासांनी खरोखरीच तिथे पोहोचलो. :-)

तो रस्ता कोकणात उतरायला चांगला आहे. (पण पुण्यातून खूप लांब पडतो..)

चौकटराजा's picture

11 Apr 2012 - 7:47 pm | चौकटराजा

मोदका मांडिले तू रसाळ हे ताट
जळविला चौराच्या डोक्याचा हा माठ !

अरे काय रे भावा ! कोठून तुला हे फोटू टाकण्याची अवदसा आठवली रे ?
फार वर्षापूर्वी महाबळेश्वर च्या गहू गेरवा संशोधन केंद्राच्या शेतात आयुष्यातील सर्वात गोड मटार खाल्ला. ( अर्थात फुकट ! ) त्याची आठवण
तुला शेतात चरताना बघून झाली.

फारच उशीराने हा धागा उघडला त्या बद्धल खंत वाटत आहे !
फोटो आणि वर्णन परत परत वाचीन याची खात्री वाटते.

(स्ट्रॉबेरी प्रेमी) ;)

सुंदर वर्णन आणि रसाळ फोटोज.

केदार बर्वे's picture

13 Apr 2012 - 6:59 am | केदार बर्वे

खुपच भारी मनोज , एकदम रसभरित लिखाण.

अन्नू's picture

13 Apr 2012 - 3:37 pm | अन्नू

स्स्स्स्स्स्स..... काय हे आईसक्रीम!!!!
स्ट्रॉबेरी मला आवडत नाहीत पण आईसक्रीम म्हणजे माझा जीव की प्राण!
त्यामुळे त्याचे फोट्टु बघुनच खपल्या गेलो आहे.

सायली ब्रह्मे's picture

4 Jul 2012 - 4:54 pm | सायली ब्रह्मे

फोटो आणि लिखाण खुपच आवडले..:)

मोदक's picture

5 Mar 2013 - 10:19 am | मोदक

मंडळी..

यावेळचे स्ट्रॉबेरी फेस्टीवल २७ ते ३१ मार्च च्या दरम्यान आहे.

एन्जॉय!!

पण मला फोटो का दिसत नाही आहेत..?????

वा... एकदम छान!!! बर्‍याच आठवणी ताक्या झाल्या. धन्यवाद :)

मोदक's picture

5 Mar 2013 - 8:55 pm | मोदक

धन्यवाद,

आज फोटो अपडेट करताना रिसाईझ करणार होतो, परत विचार केला जावद्या.. ;-)

सुर's picture

6 Mar 2013 - 1:16 pm | सुर

आहेत तेच दिसत नाही आहेत. आणी हा गणेशज्वर नाही. कारण फोटो असल्या जागी नुसती नावंच दिसतायत. आणी बाकीच्या दुसर्या लेखातील फोटो दिसतायत.

कवितानागेश's picture

6 Mar 2013 - 1:22 pm | कवितानागेश

दिसतायत की गं. वेगळा ब्राउजर वापरुन बघ.

सुर's picture

6 Mar 2013 - 2:18 pm | सुर

मोझीला मधे तर नुसती नावंच दिसतायत. आणी विंडोज इंटरनेट मधे फुल्ली असलेला बॉक्स आहे फक्त.

इतक काही अडलेल नाही. पण घरातले सगले वाह वाह,, छान छान करतायत.. मग मला नको का पाहायला...????:(

शेवटी मोबाइल मध्धे मिपा चालु केलं तेव्हा कुठे दिसले फोटो..(चला इंटरनेट वाला मोबाइल घेतल्याचा फायदा झाला.) :)

तुमचा अभिषेक's picture

6 Mar 2013 - 2:47 pm | तुमचा अभिषेक

नशीब माझे, फ्रीजमध्ये स्ट्रॉबेरी पडलीय.
हे वाचून, खरे तर बघून, लागलेली दुधाची तहान तेवढीच ताकावर भागवता येईल.

मृदुला सूर्यवंशी's picture

25 Mar 2013 - 11:56 am | मृदुला सूर्यवंशी

@ मोदक, फोटो एकदम झकास आले आहेत...स्टॉबेरी पिकिंगसाठी कुठे नाव नोंदणी करावी लागते का? अजुन तपशील कुठे मिळेल?

मोदक's picture

25 Mar 2013 - 12:03 pm | मोदक

मॅप्रो गार्डनला भेट दिल्यानंतर तिथे एक आटोपशीर कस्टमर हेल्पडेस्क असेल, सर्व माहिती तिथेच मिळेल.

अगदी मागच्या वर्षापर्यंत नावनोंदणी वगैरे भानगडी नव्हत्या, यावर्षी काही बदल केला असेल तर कल्पना नाही.

मी २७ तारखेला जावून आल्यानंतर अधिक माहिती देईनच ;-)

मृदुला सूर्यवंशी's picture

25 Mar 2013 - 6:13 pm | मृदुला सूर्यवंशी

धन्यवाद मोदक! आम्ही पण २७ ला जाणार आहोत :) पण फेस्टीवल या तारखांनाच आहे ना नक्की? नाहीतर सगळ्यांचे फटके खावे लागतील :ड

मोदक's picture

25 Mar 2013 - 8:01 pm | मोदक

येथे कॉलवा...

Mapro Garden & Chocolate Plant

15/1B, Gureghar
Panchgani-Mahabaleswar Road,
Mahabaleswar 412 806.
Dist. Satara, Maharashtra
India
Phone +91.2168.240112 / 240199

http://mapro.com/mapro_contactus.html

मंडळी.. मॅप्रोवाले आज सांगत आहेत की फेस्टीवल २८ ला सुरू होईल..

वरील नंबरवरती अधिक माहिती मिळेल..

निवेदिता-ताई's picture

25 Mar 2013 - 8:39 pm | निवेदिता-ताई

फोटू आणि वर्णन झकास.

मृदुला सूर्यवंशी's picture

26 Mar 2013 - 12:55 am | मृदुला सूर्यवंशी

माहितीसाठी परत एकदा धन्यवाद मोदक!