मराठीभाषेचे सरलीकरण का दुर्बलीकरण

अमोल सहस्रबुद्धे's picture
अमोल सहस्रबुद्धे in काथ्याकूट
3 Apr 2012 - 6:41 pm
गाभा: 

काही दिवसांपूर्वी वाचनात आले की आपल्या मायबाप सरकारनी शैक्षणिक धोरणांतर्गत असा नियम केला आहे की मराठी लिहितांना -हस्व दीर्घ म्हणजे फक्त पहिले अक्षर -हस्व त्यापुढील अक्षर दीर्घ करावे म्हणजे शुध्द आहे असे मानावे. उदा.. सूचना असे न लिहिता सुचना असे लिहिले तरी शुध्द आहे असे गृहीत धरावे . साधारणपणे मराठी लेखन हे उच्चारानुसार लिहिले तरी बरोबर होते त्यात आंग्ल लिपिसारखे शब्द पाठ करावे लागत नाही तरी हा नियम का? यानि काय घडेल त्याची एक झलक .
फुले ओवायला सूत वापरतात तिथे असा सुत असेल तर त्याचा काय उपयोग ?

आपल्या प्रतिक्रिया अपेक्षित
आपला छळवाद

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

3 Apr 2012 - 6:45 pm | मृत्युन्जय

अभिनंदन खुपच लक्षणीय प्रगती. शून्य शब्दापासुन नव्वदीच्या पुढे दमदार वाटचाल आहे तुमची. अशी लक्षणीय प्रगती होत राहो (तुमची आणि मिपाची) हीच इश्वरचरणी प्रार्थना.

जेनी...'s picture

3 Apr 2012 - 6:53 pm | जेनी...

चला दिसल एकदाच धाग्यात काहितरि लिहिलेलं :P

अभिनंदन.

चांगला विषय आहे .

तज्ञांच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतिल.:)
आम्हि शुद्धलेखनात अतिव कच्चे आहोत .:(

ते स्पष्‍टीकरण देणारे तुम्हीच का?
उडालं वाटतं ;-)
आता कळलं त्यात तुम्ही काहीच का लिहिलं नाहीत ते ;-)

जशी वाट लागायची आहे तशी लागू द्या हो मराठीची - किमान इथे तरी :p
आधी भरभरुन लिहा, बोला म्हणजे ते सरलीकरण की दुर्बलीकरण ते कळेल ;-)

परिकथेतील राजकुमार's picture

3 Apr 2012 - 6:57 pm | परिकथेतील राजकुमार

मिपावरती शुद्धलेखनावरती (र्‍हस्व / दिर्घ) चर्चा ? तात्या कुठे आहेस दिनदयाळा ?

भांचुत प्रलय प्रलय म्हणतात तो हाच काय ?

बाकी आम्हाला आजच पिडांकाकांनी दिलेली प्रतिक्रिया अतिशय आवडलेली आहे. :-

चांगलां लिहिणार्‍याक भाषेचो अपराध माफ आसतां. बेक्कार लिहिणार्‍यांचा कोकणी काय आणि मराठी काय, निसतो कळफलकावर अत्याचार!!!!

आम्ही र्‍हस्व / दिर्घ चुकांना भाषीक अपराधच मानतो.

गणामास्तर's picture

3 Apr 2012 - 9:22 pm | गणामास्तर

>>>>>आम्ही र्‍हस्व / दिर्घ चुकांना भाषीक अपराधच मानतो.

पराशेठ भाषीक की भाषिक ? ;)

नितिन थत्ते's picture

4 Apr 2012 - 8:25 pm | नितिन थत्ते

>>पराशेठ भाषीक की भाषिक ?

छे छे .... भाशीक

नितिन रावले

रामपुरी's picture

4 Apr 2012 - 3:43 am | रामपुरी

"आम्ही र्‍हस्व / दिर्घ चुकांना भाषीक अपराधच मानतो."
"तात्या कुठे आहेस दिनदयाळा ?"

या दोन्ही वाक्यात र्‍हस्व दीर्घाची चूक सापडती का बघा जरा.. :) :) :) :)

"तात्या कुठे आहेस दिनदयाळा ?" >>>

तात्यांच राहु देत , मालक , आपण कुठे आहात हल्ली :)

अमोल सहस्रबुद्धे's picture

3 Apr 2012 - 7:02 pm | अमोल सहस्रबुद्धे

लिहिता लिहिता शुध्द लिहायचा सराव झाला तर वाईट आहे का कोणालाही शुद्धलेखनाची अडचण असल्यास ती सोडवायला आपण सगळे आहोत की म्हणजे संवर्धन व संरक्षण एकदम होईल यापूर्वीही भरभरून लिहिले आहे पूर्वसूरींनी पण शुद्धलेखनाची कास न सोडता त्यांना हा प्रश्न पडला नाही असो

पुण्याचे वटवाघूळ's picture

3 Apr 2012 - 9:12 pm | पुण्याचे वटवाघूळ

आपल्याला हवे तसे लिहावे. आपण कसे लिहावे हे सांगणारे शिक्षणखाते कोण?

पैसा's picture

3 Apr 2012 - 9:19 pm | पैसा

शैक्षणिक धोरण म्हणजे फक्त मुलांचे पेपर तपासताना शुद्धलेखनाचे फार गुण कापू नयेत एवढाच मर्यादित अर्थ असावा. असं एक धोरण जाहीर करून सगळं व्याकरण कुठे बदलतंय काय!

यापेक्षा मोकलाया दाहि दिशा बरे,

काही वर्षानी मराठी संस्थळांवर इ- फ्लेक्स लावायची वेळ येते का काय अशी भिती वाट्ते आहे हल्ली. त्यापेक्षा आपला ब्लॉगच बरा.

आगाऊ कार्टा's picture

4 Apr 2012 - 10:52 am | आगाऊ कार्टा

पु. लं च्या एका पुस्तकात वाचलेले आठवते....
मरठी शुद्धलेखनाचे नियम उच्चारानुसार व्हावेत असा एक प्रस्ताव सरकारच्या समोर होता.
त्यावर पु. लं नी प्रतिक्रिया दिली होती...
मी एकादा एका गावातल्या शाळेत गेलो होतो. तिथे मास्तर मुलांना शुद्धलेखन घालत होते..
"पोराहो... लिवा...क्याळ..."
पुस्तकाचे नाव आठवत नाही. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2012 - 6:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी भाषेचं सरलीकरण असलं पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. र्‍हस्व-दीर्घ आणि शुद्धलेखनाच्या नियमात मराठी भाषेला कोंबून बसविण्याचा प्रयत्न करु नये असे मला वाटते. बाकी, ''मायबाप सरकारने सूचना च्या ऐवजी सुचना'' असे लिहिण्याचे ठरवले असेल तर आपण बॉ अशा नियमांचे स्वागत करतो.

बाकी, अचूक मराठी लिहिण्याचा आपण सराव करु या. ;) गृहपाठासाठी तीन प्रश्न.

१) शेवटच्या अक्षराला काना असेल तर त्यापूर्वीची वेलांटी नेहमी ....... लिहावी.
अ) र्‍हस्व ब) दीर्घ

२) मराठी शब्दांच्या शेवटी येणारा इकार व उकार उच्चारानुसार........ लिहावा.
अ) र्‍हस्व ब) दीर्घ

३)मुळाक्षरापूर्वीचा इकार व उकार ........... लिहावा.
अ) र्‍हस्व ब) दीर्घ

उत्तरे व्य.नि. करुन पाठवावी. उत्तर बरोबर आल्यास 'शाब्बास' असा प्रतिनिरोप पाठविण्यात येईल. :)

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2012 - 1:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रश्न क्र. २. मधे : मराठी शब्दांच्या शेवटी येणारा इकार व उकार .......... लिहावा.

प्रश्नपत्रिकेत एक चूक असल्याचे जाणकार मिपाकरांनी दाखवून दिले आहे. धन्स.

-दिलीप बिरुटे