गाभा:
वर कोर्या आभाळाची
भट्टी तापली तापली
खाली लेकरांची माय
वारा पदराने घाली
वार्या खाली कसेबसे
उभे रोप जवारीचे
एक मलूल पोपटी
दोन सुकल्या पात्यांचे
...
...
...
...
...
...
...
...
उभी कोणाच्या दारात
रांग भुकेल्या बाळांची
तहाला वाडगा घेवून
अशी तिष्ठत केंव्हाची
ही कविता आपल्या बालभारती च्या पुस्तकात ६ वी -७ वी ला होती. हिचे कवी कोण हे कोणी सांगू शकेल का? कोणाकडे पूर्ण कविता असेल तर कृपया देवू शकाल का?
धन्यवाद
स्वानंद वागळे
प्रतिक्रिया
30 Mar 2012 - 4:14 pm | चिमी
http://balbharati.abweb.in/index1.htm
ही घ्या बालभारतीची लिंक. इथे शोधा म्हणजे सापडेल.
१ली पासुनच्या सर्व कविता मिळ्तील.
30 Mar 2012 - 4:30 pm | स्वानंद वागळे
इथे अनुक्रमणिका किंवा तत्सम कोणतीही लिंक नाही :(
30 Mar 2012 - 4:32 pm | स्वानंद वागळे
लिंक मिळाली. धन्यवाद ........
30 Mar 2012 - 4:33 pm | परिकथेतील राजकुमार
ही कविता म्हणजे गालिबच्या एका गझलेचे मराठी भाषांतर आहे असे विजुभौ बिपिन कार्यकर्त्यांना सांगत असताना डाण्रावांनी ऐकले असे श्रावण मोडक मागे एकदा म्हणाल्याचे आठवते.
जाणकार अधिक प्रकाश टाकतीलच.