पुराणातल्या वांग्याचे भरीत

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in पाककृती
30 Mar 2012 - 2:43 am

कच्चा माल
------------------------------------
ही पाककृती मला आपल्या मिपावरचे मित्र मृत्युंजय यांनी सुचवली आहे.
झणझणीत आणि एकदम खमंग अशी ही पाकृ आहे.
पुराणांना पाहून नेहमी नाक मुरडणारे विजुभाऊ आणि निळ्याभाऊ हेदेखील आवडीने खातील.
मृत्युंजयाचे मनापासून आभार...

साहित्यः
एक भलंमोठं महाभारताचं वांगं
२-३ निवडक कौरव-पांडव (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
२-३ व्यास- वैशंपायन- जनमेजय वगैरे (कोरड्या उपेक्षेने खरपूस भाजून घ्यावेत)
एक मध्यम कर्ण (सोलून)
एक आख्खा कृष्ण (लीलांसकट)
१ नवा येडपट आयडी (खास इन्ग्रेडियंन्ट!!)
काड्या - आपापल्या वृत्तीनुसार (आणि संपादकांच्या टॉलरन्सनुसार!!)

कृती:
प्रथम महाभारताच्या वांग्याला फाटे फोडून आणि त्यावर असत्याचे आणि अवास्तवतेचे वार करून कुशंकेच्या चुलीत चांगले भाजून घ्यावे.
कर्णाची साल व्यवस्थित सोलून घ्यावी (त्याला सवय आहे पूर्वीपासून, काळजी नसावी!!)
कौरव पांडवांना व्यवस्थित मॅश करून घ्यावे
खलबत्यात व्यास, वैशंपायन, जनमेजय एकत्र टाकून ठेचून घ्यावेत
हा मॅश आणि ठेचा त्या सालं काढलेल्या कर्णावर दाबून बसवावा.
एका कढईत असहिष्णु श्रद्धेचे तेल चांगले कडकडीत तापवून त्यात महाभागवताची मस्त फोडणी करावी.
त्यात वरील सर्व मिक्श्चर घालून ढवळावे
वरून मनाला येईल त्याप्रमाणे दूषणे, दुसर्‍याची अक्कल काढणे, वगैरे भुरभुरावे
टिपिकल मिपावरचं महाभारतीय भरीत तयार आहे
आस्वाद घेऊन पिडांकाकांना धन्यवाद द्यावेत!!
:)

नोटः मूळ मिपावरच्या कृतीत शल्य, अश्वत्थ्यामा वगैरे घालत नाहीत. पण जर आवडत (आणि पचत) असेल तर अवश्य घालावेत.
नाणं: सदर पाककृती ही महाभारतकालीन वांग्याची असल्याने फोटो देता येत नाहीत. तरी मागू नयेत.

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

30 Mar 2012 - 3:23 am | सुहास..

=)) =)) =))

केवळ गतप्राण !!

कर्णाची साल व्यवस्थित सोलून घ्यावी (त्याला सवय आहे पूर्वीपासून, काळजी नसावी!!)
=)) =))
अरे काही दया-माया !!

कौरव पांडवांना व्यवस्थित मॅश करून घ्यावे >>>>

अगगगग्ग्ग्ग्ग !! पिडाकाका मस्त पैंकी , दुर्योधन, दुशासन, भीम, अर्जुन व ईतर मंडळी ला एकेक करून, मोठ्या भांड्यात , हाताने शिजलेल्या बटाट्याला करतात, तसे मॅश करीत आहेत असे चित्र दिसले ;)

वरून मनाला येईल त्याप्रमाणे दूषणे, दुसर्‍याची अक्कल काढणे, वगैरे भुरभुरावे
टिपिकल मिपावरचं महाभारतीय भरीत तयार आहे >>>
=)) =))

खल्लास, खायच कशाबरोबर ? रामायणाची चपाती, की ऋग्वेदाचा भात आणि चवीला मनुस्मृती घ्यायची की उपनिषद ;)

आस्वाद घेऊन पिडांकाकांना धन्यवाद द्यावेत!! >>.

धन्याचे वाद्स ओ काका

अगदी अगदी!!
सुहास एकदम सहमत १००%.

सानिकास्वप्निल's picture

30 Mar 2012 - 7:20 am | सानिकास्वप्निल

>>वरून मनाला येईल त्याप्रमाणे दूषणे, दुसर्‍याची अक्कल काढणे, वगैरे भुरभुरावे>>

१००% सहमत :)

छानचं जमलयं :)

सस्नेह's picture

31 Mar 2012 - 11:55 am | सस्नेह

+१.
एक सुचना : शक्यतो वांग्यातील शकुनीचा काटा न काढता भाजावे अन्यथा भरीताच्या ऐवजी श्रीखंड होण्याची शक्यता आहे.

सहज's picture

30 Mar 2012 - 3:40 am | सहज

स्वाती डांबिश यांची दुसरी हुच्च पाकृ आवडली!!

उत्खनन प्रेमींसाठी पहिली येथे

हँ - तुमां मॉडर्नऽ लोकांचे फटिंगाचे फ्यूजन हे...

दूषण आणिक खर ते रामायणातल्या कांडण्यातून म्हाभार्ताच्या भर्तात कित्याक घातले रे डांबिसां!

आमगेल्या पारंपरिक म्हाभार्ती भर्तात शल्ये घालतात, दूषणे न्हत.

तू आमगेलोच हळदोळो डांबीस म्हणून इल्लेशे खाऊन पळयले. बरे झणझणले. तरी फुडल्या फावटे परंपरा सांबाळून राव.

बबलु's picture

30 Mar 2012 - 5:23 am | बबलु

मेलो !!!! :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Mar 2012 - 5:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कर्णाची साल व्यवस्थित सोलून घ्यावी (त्याला सवय आहे पूर्वीपासून, काळजी नसावी!!)

इथे कृतीत थोडी शंका आहे. बाहेरचं कवच म्हणजे साल का कवचाच्या आत जो पापुद्रा असतो ती साल?

बाकी पाकृ अगदी आवडली. पण इतरही काही शंका आहेत. यात किती कुपोषण होते? डोक्याला पुरेसा व्यायाम होतो का मंडई होते?

आम्हाला तुमच्या श्रद्धेच्या तेलाची अ‍ॅलर्जी आहे.. तेल न घालता ही पाककृती करता येईल का? तेला ऐवजी आम्ही निष्ठुरतेचं बटर वापरलं तर चालेलं का? का विवेकबुद्धीच्या ओव्हनमध्ये बेक केलं तर चांगलं लागेल? ;-)

आणि हो, त्या कुशंकेच्या चुलीपेक्षा हलकटपणाच्या गॅसवर भाजून घेतलं तर चवीत फरक पडेल का?

पुराणतल्या वांग्याच्या भरताचा प्रेमी. ;-)

(अवांतरः हहपुवा!)

निनाद's picture

30 Mar 2012 - 6:40 am | निनाद

झणझणीत आणि एकदम खमंग!!
अजून असे यावे.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Mar 2012 - 7:20 am | अत्रुप्त आत्मा

उत्तम, आधी प्रात्यक्षिक आणि नंतर थेअरी असे पहिल्यांदाच पाहिले,

योगप्रभू's picture

30 Mar 2012 - 8:01 am | योगप्रभू

पीडांकाकांनी दिलेल्या या लज्जतदार पाककृतीमुळे तोंपासु.

फक्त काही सूचना
*झणझणीतपणा हवा असेल तर दुर्योधन, दु:शासन असे कौरव वापरावेत.
*पदार्थ पुरवठ्याला येण्यासाठी मोठ्या आकाराचा भीम वापरावा.
*शल्य जास्त वेळ वापरल्यास किंचित कडसर लागतो.
*काहीजण जातीयतेचा रंग वापरतात. त्यामुळे पदार्थ भडक दिसतो.

सावंतवाडीकडे निव्वळ कर्ण वापरुन तडका देण्याची पद्धत आहे. देसाईवाडीची पद्धत साधारणतः अशीच आहे. ओक गल्लीने एकटा भीम वापरला आहे. कर्वेनगर स्टाईलमध्ये प्रत्येक पदार्थ वेगवेगळा भाजून घेतातच, शिवाय आणखीही काही घटक पदार्थांचे मिश्रण करतात. हरदासपूर पद्धत थोडी गुळमट मसालेदार असते.
अर्थात ज्यांना सरळसोट पाककृती हवी असते ते पारंपरिक व्यास महानगर पद्धतीचाच अवलंब करतात.

पैसा's picture

30 Mar 2012 - 8:09 am | पैसा

हे पाकृ चं विडंबन किंवा विडंबनाची पाकृ जे काय आहे ते फर्मास जमलंय! शिवाय सजावटीसाठी कोकणी खवचटपणा सढळहस्ते वापरल्यामुळे पाकृ चविष्ट होणार याची ग्यारंटी!

आता इथे महाभारत शोधणे आले!

सुहास झेले's picture

30 Mar 2012 - 10:33 am | सुहास झेले

ह्येच म्हणतो....... ;)

विकास's picture

30 Mar 2012 - 8:10 am | विकास

=)) =)) =))

मस्तच आहे! यावरून एक आवडीचे गाणे आठवले... बाकी कर्ण हा महाभारतकालीन सूर्यपुत्र होता म्हणून अंमळ डांबीस असावा असे आमचे व्यक्तीगत मत आहे. ;)

खलबत्यात व्यास, वैशंपायन, जनमेजय एकत्र टाकून ठेचून घ्यावेत

एक (मिपाच्या वतीने) डिसक्लेमर : ह्या नावाचे जर आयडी असले, तयार झाले तर त्यांना केवळ प्रतिक्रीयेद्वारे प्रतिकात्मकच ठेचून घ्या, खरे नको, ;)

प्यारे१'s picture

30 Mar 2012 - 9:17 am | प्यारे१

>>>>एक भलंमोठं महाभारताचं वांगं
२-३ निवडक कौरव-पांडव (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
२-३ व्यास- वैशंपायन- जनमेजय वगैरे (कोरड्या उपेक्षेने खरपूस भाजून घ्यावेत)
एक मध्यम कर्ण (सोलून)
एक आख्खा कृष्ण (लीलांसकट)
१ नवा येडपट आयडी (खास इन्ग्रेडियंन्ट!!)
काड्या - आपापल्या वृत्तीनुसार (आणि संपादकांच्या टॉलरन्सनुसार!!)<<<<

एवढं साहित्य म्हणजे चवीला 'ब्येक्कार' असणार ह्याची फुल्ल ग्यारंटी. कसेही करा. ;)

बाकी पिवळ्या डांबिस तै....

कालच केले होते हे महाभारतकालीन भरीत. अर्थात, थोडा बदल केला तो म्हणजे येडपट आयडी ऐवजी ठाकूरची फोडणी दिली. आणि मरायला टेकलेला अमिताभ घातला होता. असो.

चव वेगळी आणि चांगली झाली होती. गब्बरच्या डायलॉगचे प्रमाण जरा वाढविले तर चालेल (माझ्या वैयक्तिक आवडीनुसार) असे जाणवले. (बसंतीला 'नुसताच' नाचायला सांगणारा 'अबला- अबलात्कारी' गब्बर खलनायक कसा असं? )

काही ठिकाणी भरीतात सोनवणींचा अश्वत्थामा वापरतात, ते भरीतही करून पाहिले पाहिजे.
जे मी नेहमी करतो ते म्हणजे, खरपुस भाजलेल्या वांग्याच्या गरात बारीक चिरुन विज्ञान, सोकॉल्ड वैज्ञानिक, दुर्बिणी, गुर्जी, एक अर्धवट नीलपक्षी घालून श्रद्धा अंधश्रद्देची फोडणी द्यायची. ते जास्त आवडते. पण अर्थात, इतर चवीही चाखायला आवडतात.

सर्वात पहिल्यांदा हे सांगतो की "माझा या विषयात अभ्यास नाही"
त्यामुळे प्यारेशी सहमत ! ;)

प्रीत-मोहर's picture

30 Mar 2012 - 11:04 am | प्रीत-मोहर

अरे रे तै नाही काका आहेत!!!

स्वाती दिनेश's picture

30 Mar 2012 - 9:57 am | स्वाती दिनेश

बाकी पिवळ्या डांबिस तै....
प्यारे १, काका आहेत ते...
बाकी सुलेशबाबू, फर्मास हो पाकृ...
स्वाती

मी-सौरभ's picture

30 Mar 2012 - 10:07 am | मी-सौरभ

सर्वप्रथम काकांना शि.सा.न.

@प्यारे१: काका आणि तै असं कॉम्बिनेशन नैय्ये काई; ते मास्तर अन् ताई असं आहे. तुमच्यासारख्या जाणत्या माणसान आसं लिवायचं काय प्रयोजन? ;)

स्वाती दिनेश's picture

30 Mar 2012 - 10:13 am | स्वाती दिनेश

काका आणि तै असं कॉम्बिनेशन नैय्ये काई; ते मास्तर अन् ताई असं आहे.
हेच मनात आलं अगदी,
स्वाती

प्यारे१'s picture

30 Mar 2012 - 10:18 am | प्यारे१

हे पहा, आज मुद्दा तो नाही, मुद्दा हा आहे की मुद्दा आहे नी मुद्द्याभोवतीचेच मुद्दे आपण मांडण्याचा मुद्दा प्रामुख्यानं पुढं आणण्याचाच मुद्दा अपेक्षित आहे.... थोडक्यात भरकटवू नका चर्चा. ;)

-प्यारेश वागळे (आय बी यन्न रास्कला-आपलं -आपलंच मत. ;) )

मी-सौरभ's picture

30 Mar 2012 - 3:38 pm | मी-सौरभ

उभा महाराष्ट्र तुमच लिखाण बसून वाचतोय :D

(पण तुम्ही परत बसायला लागलात अशी शंका येत आहे)

-बसायला नेहमीच तयार असणारा-

इरसाल's picture

30 Mar 2012 - 10:24 am | इरसाल

काका मला भरीत नुसतेपण खायला जाम आवडते.

नगरीनिरंजन's picture

30 Mar 2012 - 10:25 am | नगरीनिरंजन

भन्नाट भरताची पाकृ एकदम परफेक्ट!
ताटात वाढताना मात्र स्वतःच्या अफाट (आणि अचाट) वाचनाच्या जाहिरातीचे गार्निशिंग करायला विसरू नये. ;-)

विजुभाऊ's picture

30 Mar 2012 - 10:57 am | विजुभाऊ

ठ्यॉ.................. =))

जाई.'s picture

30 Mar 2012 - 11:09 am | जाई.

=)) =))
चविष्ट पाककृती

पु.ल.. नी वंग चित्रे मध्ये एक खुमासदार पाकृ दिली आहे त्याची आठवण झाली.
हे भरित वाचून संपलो.

सस्नेह's picture

19 Oct 2016 - 11:56 am | सस्नेह

फर्मास भरीत डाम्बिस दा ! बाकी कुठल्या पाकृ मुळे नाही तरी हे भरीत खाऊन नक्कीच ( हसून हसून )अजीर्ण होणार ब्वा !

परिकथेतील राजकुमार's picture

30 Mar 2012 - 11:53 am | परिकथेतील राजकुमार

__/\__

पिडांकाका दंडवत हो.

बाकी,

खलबत्यात व्यास, वैशंपायन, जनमेजय एकत्र टाकून ठेचून घ्यावेत

च्या ऐवजी
'खलबत्यात व्यास, वैशंपायन, जनमेजय एकत्र टाकून ठेचून घ्यावेत. ह्यात बरेचसे लोक शल्य देखील घालतात, पण मला इथे मिळाला नाही म्हणून मी वैशंपायन वापरला' असे वाक्य करा बघू.

अन्या दातार's picture

30 Mar 2012 - 12:06 pm | अन्या दातार

क ह र!

'खलबत्यात व्यास, वैशंपायन, जनमेजय एकत्र टाकून ठेचून घ्यावेत. ह्यात बरेचसे लोक शल्य देखील घालतात, पण मला इथे मिळाला नाही म्हणून मी वैशंपायन वापरला' असे वाक्य करा बघू.

या सूचनेस पर्याय नाही!

आत्मशून्य's picture

30 Mar 2012 - 12:00 pm | आत्मशून्य

.

मन१'s picture

30 Mar 2012 - 12:02 pm | मन१

क ... ह.. र

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Mar 2012 - 12:38 pm | बिपिन कार्यकर्ते

__________//////////\\\\\\\\\\__________

पिंडाकाका फटु दिले असते तर एकुण पदार्थाचा अंदाज आला असता.
कृतीवरुन तरी किमान १००-१५० वेळा लाळ गळेल असा अंदाज आहे. ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Mar 2012 - 12:58 pm | llपुण्याचे पेशवेll

डांबिसराव फॉर्मात.

थोडं झणझणीत व्हायला वर हिडिंबेचा कीस टाकला तर चालेल का ?

कवितानागेश's picture

30 Mar 2012 - 4:11 pm | कवितानागेश

या सुडक्याला कुणितरी दंडकारण्यात सोडून या रे हिडिंबेचा कीस आणायला.... :)

बाकी आता इथे 'खराखुरा यडपट आय डी' शोधणे आले.
हल्ली शिळेच आय डी नव्याचे येड पांघरुन येतात!

बॅटमॅन's picture

30 Mar 2012 - 11:58 pm | बॅटमॅन

हेहेहेहे "की" नक्की दीर्घच आहे कि र्‍हस्व ;) :P

र्‍हस्व की दीर्घ ते ज्याने त्याने ठरवावं.

प्रीत-मोहर's picture

30 Mar 2012 - 1:06 pm | प्रीत-मोहर

=)) =)) =))

कपिलमुनी's picture

30 Mar 2012 - 1:11 pm | कपिलमुनी

आम्ही महाभारत खात नसल्याने हीच पाकृ रामायण घालून कशी करता येइल ??

स्वातीविशु's picture

30 Mar 2012 - 1:18 pm | स्वातीविशु

बापरे......ही पाकक्रुती आजच कळली. ;)

पण पिडांकाका, साहित्य कोणत्या वाण्याकडे मिळेल तेही प्लीज सांगा ना.... ते आणले की भरीत करून लगेच फडशा पाडण्यात येईल. ;)

स्मिता.'s picture

30 Mar 2012 - 2:14 pm | स्मिता.

___/\___

एकदम झणझणीत पाककृती सांगितलीये पिडांकाकांनी... काही पदार्थ 'इण्डियन स्टोअरमधे' शोधायला लागतील पण या विकांताला नक्की करून बघणार.

*रटाळ, टुकार विडंबनांच्या गर्दीत अगदी जोरदार विडंबन*

अग्यावेताळ's picture

30 Mar 2012 - 6:49 pm | अग्यावेताळ

*रटाळ, टुकार विडंबनांच्या गर्दीत अगदी जोरदार विडंबन*

जुनी खोडं कंपूतली आहेत म्हणून त्यांनी केलेल्या कुठल्याही विडंबनाला चान चान म्हणायच आणि नविन लोकांनी केलेल्य विडंबनांना मात्र नाकं मुरडायची.

नविन लोकांनी भारंभार विडंबनं टाकली असतील पण याचा अर्थ असा नाही की रटाळ, टुकार आहेत. तीदेखील लोकप्रिय आहेत.
उगा नुसती टुकार कंपूबाजी करण्यात काहीच अर्थ नाही.

स्मिता.'s picture

30 Mar 2012 - 8:53 pm | स्मिता.

मी कुठल्याही चांगल्या लेखनाला (ते विडंबन असो की स्वतंत्र रचना) चांगले आणि रटाळ लेखनाला रटाळच म्हणेन. त्यात कोण्या कंपूचा किंवा त्या लेखक आयडीचासुद्धा काही संबंध नाही.

तुम्हीच कंपूचा विषय काढलात म्हणून सांगते की इतरांच्या तुलनेत मी इथे बरीच नवीन आहे आणि कदाचित पिडांकाका मला ओळखतही नसतील. मी मात्र त्यांच्या लेखनामुळे त्यांच्या 'पिवळा डांबिस' या आयडीला ओळखते. माझ्या सारख्या नवीन व्यक्तीला तुम्ही त्यांच्या कंपूत(?) सामिल केलं त्याबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
त्यातही जर हे वर लिहिलेलं विडंबन मला रटाळ वाटलं असतं तर मी इथे येवून प्रतिसाद देण्याचे कष्टही घेतले नसते.

माझ्याकरता हा विषय इथेच संपला आहे.

जय हिंद, जय महाराष्ट्र.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Mar 2012 - 9:20 pm | अत्रुप्त आत्मा

@ती देखील लोकप्रिय आहेत.
उगा नुसती टुकार कंपूबाजी करण्यात काहीच अर्थ नाही. >>> ज्जे बात....!
कंपूबाजी मुर्दाबाद... ;-)

पिशाच्चसेना झिंदाबाद

विनायक प्रभू's picture

30 Mar 2012 - 4:55 pm | विनायक प्रभू

कुंतीची फोडणी काय विसरले म्हणे?

परिकथेतील राजकुमार's picture

30 Mar 2012 - 5:40 pm | परिकथेतील राजकुमार

परदेशात फोडण्या वैग्रे करायला बंदी असते म्हणे. शेजार-पाजारचे खटले भरतात आणि मुख्य म्हणजे घर विकायला काढले तर मसाल्यांच्या वासाने भरलेले घर विकले जात नाही असे मिपावरती वाचल्याचे स्मरते.

यकु's picture

30 Mar 2012 - 9:35 pm | यकु

_____/\_______ !!!!!!

आद्य आचार्य पिडांकाकाची ही पाककृती सिद्ध होताना राजापुरी पंचा नेसून हातभार लावला जाईलऽ! विशेषत: पाकसिद्धी होताना जाळ लावण्याचे काम हिरीरीने केले जाईल ;-)

वापर केलेला दिसत नाही. (का सकाळी सकाळी माझी कॉफी कमी पडते आहे ?..)

हे म्हणजे मसाला किंवा मिठ विसरल्या सारखं वाटतं आहे. असल्या पाकृ मधे खरा ष्टार येडपट आयडीच असतो असं आपलं मत बनलं आहे.

पाकृ मस्त आहे पण एकदा "तांबडा-पांढरा समानतेचा" रस्सा पण येऊ दे. सोबतीला कॉकटेल आहेच!

-(फक्त हादडणारा) एक

छो.राजन's picture

30 Mar 2012 - 11:02 pm | छो.राजन

मी पुण्यातला वांग्याचे भरीत असे वाचले. आणि खालील मजकूर वेगळाच.इदेयाची कल्पना भारी.

नंदन's picture

31 Mar 2012 - 12:23 am | नंदन

एका कढईत असहिष्णु श्रद्धेचे तेल चांगले कडकडीत तापवून त्यात महाभागवताची मस्त फोडणी करावी.
त्यात वरील सर्व मिक्श्चर घालून ढवळावे
वरून मनाला येईल त्याप्रमाणे दूषणे, दुसर्‍याची अक्कल काढणे, वगैरे भुरभुरावे
टिपिकल मिपावरचं महाभारतीय भरीत तयार आहे

खी: खी: खी:

तशी पाकृ सोपी वाटते आहे. ह्या वीकांताला नक्की करून पाहीन ;)

एक's picture

31 Mar 2012 - 1:37 am | एक

थोडक्यात चुकलं.
या पाकृ चं पण वरती चांगलं भरीत (विथ कंपू मसाले) होऊ घातलं होतं. आम्ही एका आयडी (तोच तो पाकृ मधे उल्लेख केलेला) वरती विसंबून पण राहिलो. ताज्या भरतासाठी लंचची ऑर्डर कॅन्सल केली.

पण तेल तापायच्या आधीच गॅस बंद केला. जाउ दे. जाऊन ग्रोनोला बार खावा.

-भुकेलेला एक

चित्रा's picture

31 Mar 2012 - 8:48 am | चित्रा

भारीच मसालेदार आहे पाकृ.

नितिन थत्ते's picture

31 Mar 2012 - 9:01 am | नितिन थत्ते

भारी !!!!!

मृत्युन्जय's picture

31 Mar 2012 - 10:20 am | मृत्युन्जय

देवा सादर दंडवत. ___/\___

पाकृतीत द्रौपदीचा मसाला टाकल्यास पाकृ अजुन खमंग होइल. :) ही पाकृ द्रौपदीच्या थाळीतचे पेश करावी नाहितर पचत नाही म्हणतात. ;)

शैलेन्द्र's picture

31 Mar 2012 - 11:21 am | शैलेन्द्र

लाय्य्य भारी..

मज्जा आली..

मूकवाचक's picture

1 Apr 2012 - 4:01 pm | मूकवाचक

___/\___

तिमा's picture

1 Apr 2012 - 5:07 pm | तिमा

ही सर्व पाककृती त्या बल्लवाचार्य भीमाकडूनच करुन घ्या आणि शेवटी द्या त्याला ढकलून कढईमधे!!!

अविनाशकुलकर्णी's picture

3 Apr 2012 - 12:38 am | अविनाशकुलकर्णी

या वरुन एक पीजे आठवला.
रामाचे रामफळ..सीतेचे सीताफळ तर
भरताचे काय?
भरताचे.....वांगे

लेख आवडला...