प्रतिभाबाईंचा प्रचंड प्रवासखर्च !

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
27 Mar 2012 - 10:15 am
गाभा: 

आपल्या लाडक्या , पहिल्या महिला राष्ट्रपतीबाईंचा परदेश प्रवास हा तब्बल २०५ कोटी रुपये इतका भारी ठरला आहे.
बाईंनी नि:संकोचपणे सढळ हस्ताने आपल्या कुटुंबियासहित मुबलक दौरे केले.
ह्यातल्या कुठल्याही दौर्याचा भारताला काडीचाही फायदा नाही हे वेगळे सांगायला नकोच.

बाकी बाबतीत सुमार असणारी ह्या बाईंची कारकीर्द ह्या बाबतीत अस्मानही ठेंगणे वाटावी अशी उत्तुंग आहे.

एका राजकारणी घराण्यातली एक स्त्री. पण त्यांच्या कारकीर्दीत त्यांच्या कुटुं बियां बद्दल मुख्यतः वादग्रस्त, वाईट असेच ऐकले आहे.

अमरावतीत कुठल्याशा कार मधे कोट्यावधी रुपये सापडले आणि ते म्हणे निवडणूकीत वाटायला आणले होते. आणि त्यात राष्ट्रपतीपुत्र सामील होते. मागे कुठेतरी एका शेतकर्‍याची जमीन हडप करायच्या प्रकरणात शेखावत मंडळी दोषी ठरली.

राष्ट्रपतीपद हा एक पांढरा हत्ती आहे. जवळपास शून्य जबाबदारी आणि अवाच्या सवा मान, फिरायला विमान. निवृत्त झाल्यावर भक्कम पेन्शन आहेच.
भविष्यात कधीतरी हे पद कमी करण्याविषयी विचार व्हावा ही इच्छा.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12412436.cms

प्रतिक्रिया

रणजित चितळे's picture

27 Mar 2012 - 10:21 am | रणजित चितळे

मराठी माणसाकडून ही अपेक्षा नव्हती.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Mar 2012 - 11:23 am | परिकथेतील राजकुमार

इथे प्रचंड टूकार धाग्यांनी सर्व्हरची बँडविडथ झोपते त्याची कोणाला पर्वा नाहीये.

त्यापुढे हे असले प्रश्न किरकोळ आहेत.

जौ दे हो ! परा साहेब , तुम्हि लक्ष नका देउ. तुमचे म्हणण कितिही बरोबर असल तरी हे लोक ऐकणार नाहित टुकार धागे टाकायला. तुम्हि खरच लक्ष देउ नका
नाहितर हे लोक उगाच पराचा कावळा करतिल. सवयच आहे त्याना

स्वातीविशु's picture

27 Mar 2012 - 11:38 am | स्वातीविशु

प्रतिभाबैंनी आपल्या पदाचा चांगलाच फायदा घेतलाय. त्यांची कारकीर्द संपण्यास अजुन ६ महिने बाकी असून अजून १ द. आफ्रीकेचा दौरा बाकी आहे. तो धरुन २२० कोटी पर्यंत जाइल हा खर्च (अंदाजे). बाई फारच हौशी पर्यटक आहेत म्हणायच्या. ;)

एवढा लष्कराचा / जनतेचा पैसा खर्च करुन देशासाठी किती महत्वाचे करार केले भेटी दिलेल्या देशांबरोबर हेही विचारा त्यांना.

चिरोटा's picture

27 Mar 2012 - 12:20 pm | चिरोटा

अवो त्या राष्ट्रपती हायेत. प्रतिभाताईंनी 'शिवनेरी' वा डेक्कन एकस्प्रेसमधून प्रवास केला पाहिजे असे सुचवायचे आहे का? तुमच्या ८० किलोच्या ओबामासाठी अख्खे बोइंग ७४७ वापरतात तर एका विकसनशिल देशाच्या प्रमुखाने थोडे जग फिरुन घेतले तर एवढे चिडायचे कारण काय?

इरसाल's picture

27 Mar 2012 - 12:26 pm | इरसाल

अस नका म्हणु हो. शेवटचे ६ महिने सुख भोगु द्या हो.
बरं काय अपेक्शा बाळगून आहात ?

तरीच कसाब अजुन जिता हाय नव्हं ! त्याचा दयेचा अर्ज अजुन राष्ट्रपतींकडे पडुनशान हाय बरं का ! असे अजुन २० अर्ज पडीक हायेत म्हणे !
यांना दौर्‍यातुन वेळ मिळायास तर हवा की नाय ! ;)

संदर्भ :- http://articles.timesofindia.indiatimes.com/2011-02-22/india/28624885_1_...

जाता जाता :--- कोण्याच्या खांद्यावर कोणाचे ओझे ही ओळ आठवली मला !

सर्वसाक्षी's picture

27 Mar 2012 - 2:12 pm | सर्वसाक्षी

म्हटला तर त्याच्या खाण्या विषयी तक्रार करायची नसते.
जाउ द्या. निदान हे पैसे अधिकृत रित्या खर्च होत आहेत आणि त्या खर्चाचा हिशेब आहे हेही नसे थोडके. माणुस आपल्या पोराबाळांचे लाड करणारच हो, चालायचच.

कवितानागेश's picture

27 Mar 2012 - 2:49 pm | कवितानागेश

अशी म्हातार्‍या माणसाच्या खर्चाची तक्रार करणे आपल्या संस्कृतीत बसत नाही बरं का!
करु देत की मजा थोडी. ;)

मुक्त विहारि's picture

27 Mar 2012 - 4:02 pm | मुक्त विहारि

एक जाते ह्या देशा दुसरी त्या देशा ...

आपण सोडले भारत देशा...

मेरा भारत महान है !

अमेरिका में ऑपरेशन है!!!!

असले धागे लिहू लागलात तर कोणता राष्‍ट्रपती तुम्हाला दौर्‍यात सोबत घेऊन जाणार आहे! :p
उगीच आपलं काहीतरी.. ते केतकर बघा, रायकर बघा, राऊत बघा, सगळे दर्डा, अगरवाल बघा.. शिका काहीतरी त्यांच्याकडून.. किती मस्त मस्त वृत्तांत लिहितात राष्‍ट्रपतींच्या दौर्‍यांचा.. आणि तुम्ही हे असले धागे लिहित सुटता.. :p
काही खरं नाहीय :(

वेताळ's picture

27 Mar 2012 - 6:22 pm | वेताळ

राष्ट्रपती ना निवृतीनंतर कुठे ही सरकारी रिकामी जागा बघुन त्यात बंगला बांधुन मिळतो. ताईंनी पुण्यातील कॅम्प मधिल जागा सिलेक्ट केली आहे ,किती ही त्याची दुरदृष्टी बघा. पण हे मिलेक्ट्रीवाल्याना पसंत नाही पडले. त्यानी त्यावर आक्षेप घेतला आहे.

शिल्पा ब's picture

27 Mar 2012 - 9:19 pm | शिल्पा ब

एखादाच का होइना पण मराठी माणुस जरा कुठे सुख उपभोगु लागला तर तुम्हाला कै ते बघवत नै!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Mar 2012 - 9:56 pm | निनाद मुक्काम प...

ह्या बातमीमधील एक वाक्य आवडले.

अमेरिका आणि जर्मनी येथे त्यांना अजून आमंत्रण मिळाले नाही. कारण तेथील राज्यकर्त्यांना मनमोहन सिंह जास्त जवळचे वाटतात.

काही लोक त्यांना उगाच गुळाचा गणपती किंवा आदर्श सनदी नोकर म्हणून हिणवतात.

ह्या आधीच्या पंतप्रधानांनी काय मोठे असे दिवे लावले होते. आणि जगभरातील असे स्वयंभू जागतिक नेते आहेत तरी किती?

आता प्रतिभा पाटील ह्यांच्या पेक्षा जास्त खर्चात हिलरी बाई इस्लामाबाद च्या फेर्या मारतात. तेथे काय उजेड पडला?

आमच्या खानदेशी व्यक्ती बद्दल उगाच भलते सलते........
खानदेशी अस्मिता ......

बाकी मी एका जेष्ठ पत्रकाराकडून असे जाणून घेतले होते कि हे दौरे दिसायला अत्यंत साधे सरळ उद्देशाने काढलेले दिसतात पण त्यामागे दोन राष्ट्रासंबंधी व्यापार व इतर अनेक शेत्रात कुटनैतिक सल्लामसलत व वायदे होतात.
आता पाटील ह्यांच्या दौर्याचे फलित काय ह्याचा जमाखर्च नेमका कोण व कसा काढणार.?

आपल्या वृत्तपत्रात नित्यनेमाने हजारो करोडोचे पैशांचे व्यवहार ,गैरव्यवहार ह्या संबंधी वाचतो.
आता फक्त दोनशे करोड सारख्या शुल्लक रकमेला किती महत्व द्यायचे.

साहेब त्यापेक्षा खाण घोटाळा आता सध्या चलतीमध्ये आहे त्या संबंधी खरडा जरा

अवांतर

अजून रामदेव बाबा आणि हजारे प्रभूती ह्यांनी ह्याविरुद्ध जनांदोलन उभारण्याचे ठरवले नाही आहे तस्मात एक तर ह्या बातमीत दम नसावा किंवा त्याला एवढे महत्व नसावे.

म्हणूनच झाले गेले विसरून जावे ,पुढे पुढे चालावे जीवनगाणे

गातच रहावे.

चेतनकुलकर्णी_85's picture

27 Mar 2012 - 10:02 pm | चेतनकुलकर्णी_85

बाकी मी एका जेष्ठ पत्रकाराकडून असे जाणून घेतले होते कि हे दौरे दिसायला अत्यंत साधे सरळ उद्देशाने काढलेले दिसतात पण त्यामागे दोन राष्ट्रासंबंधी व्यापार व इतर अनेक शेत्रात कुटनैतिक सल्लामसलत व वायदे होतात.

कसली कुटनीती घेऊन बसलाय राव...ह्या बाईंकडे पाहून ह्यांना शेंग दाण्याचे कुट पण पडता येत नसेल असे वाटतेय.. :P

बाकी बाबतीत सुमार असणारी ह्या बाईंची कारकीर्द

आपण सार्वभौम भारताच्या राष्ट्रपतींबद्दल लिहिताय याचे भान सुटलेले दिसते. सदर हेटाळणीजनक व निंदाजनक वाक्याबद्दल आम्ही आपला तीव्र निषेध करतो.

भविष्यात कधीतरी हे पद कमी करण्याविषयी विचार व्हावा ही इच्छा.

सदर विधान हे घटनेच्या कलम ५२ व ५३ ला धक्का देणारे आहे.

कलम ५२ - There shall be a President of India.

कलम ५३ - (1) The executive power of the Union shall be vested in the President and shall be exercised by him either directly or through officers subordinate to him in accordance with this Constitution.

(2) Without prejudice to the generality of the foregoing provision, the supreme command of the Defence Forces of the Union shall be vested in the President and the exercise thereof shall be regulated by law.
(3) Nothing in this article shall

(a) be deemed to transfer to the President any functions conferred by any existing law on the Government of any State or other authority; or
(b) prevent Parliament from conferring by law functions on authorities other than the President.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Mar 2012 - 4:06 pm | परिकथेतील राजकुमार

मिपाच्या घटनेच्या कलम ६१/६२ व ४२० ला अनुसरुन श्री. कॉमॅ. ह्यांच्याशी मी सहमत आहे.

बराक ओबामा, अण्णा हजारे, केजरीवाल, पुतीन, मुशर्रफ, सोनिया गांधी, ओमर अब्दुल्ला ह्यांच्या जोडीने प्रतिभाताई सुद्धा सकाळी सकाळी मिपा वाचल्या शिवाय आपल्या दिवसाची सुरुवात करत नाहीत ह्याचे भान श्री. कुलकर्णी ह्यांनी ठेवायला हवे होते.

श्री. कुलकर्णी ह्यांना तीन दिवस भिंतीकडे तोंड करून उभे करावे अशी याचीका मी मिपा कोर्टापुढे सादर करत आहे.

हुप्प्या's picture

30 Mar 2012 - 7:38 am | हुप्प्या

बाईंची कारकीर्द केवळ त्यांना राष्ट्रपतीपदाची झूल चढवल्यामुळे दैदिप्यमान होते असे आपणास वाटत असल्यास आपण जरूर माना. मला तसे वाटत नाही.
सोनिया बोले आणि दळ हाले अशी स्थिती असल्यामुळे ह्या बाईंची वर्णी लागली. ह्या बाईंची असे काय थोर कर्तृत्व होते की ज्यामुळे त्यांना हे पद मिळाले?

कुठल्या निरर्थक कलमांना साक्षात खुदाची वचने असल्यासारखे डोक्यावर बसवणे चूक आहे. कायदा हा बदलता येतो. नव्हे, प्रगत राष्ट्रात तो वेळोवेळी बदलला जातो.

हेही बघा. विमानात बटलर, स्वैपाकी, स्वैपाक्याचा मदतनीस, त्याचा मदतनीस, फोटोग्राफिक ऑफिसर, अमके, तमके, ढमके. हास्यास्पद बडेजाव. लोकांच्या पैशावर अनाठायी चैन.
http://www.youtube.com/watch?v=zlaAf6KeWac

बाकी प्रगत, श्रीमंत राष्ट्राचे नेते पैसे वाचवायला साध्या प्रवासी विमानाने प्रवास करतात. आणि आपली पात्रे बघा. नुसती अंगावर खादी चढवून साधेपणा मिळतो का?

छो.राजन's picture

28 Mar 2012 - 8:56 pm | छो.राजन

मागच्या महिन्यात जुहु मधिल एका पन्च तारन्कित हॉटेल मधे लग्न समरम्भाला जाण्याचा
योग आला. तिथे इन्होउस नाइत्कब आहे. दोन मुम्बै पोलिस दोन मुलाना घेवुन आले. ३ तास २ मुम्बै पोलिस महअत्व्च्या व्यक्ति च्या फ्यामिलि बरोबर एस्कॉर्ट करन्याच्या ऐवजि आजुन चान्ग्लया कामाला वापरा. जनतेचा पैसा अत्ति महअत्व्च्या व्यक्ति च्या फ्यामिलि वर खर्च करुन काय उप्योग अहे?
हे एक उदहरण झाले.
जनते ने "पैसा फेको और तमाशा देखो" असे म्हनुन मुग गिळत बसावे काय?

गणामास्तर's picture

28 Mar 2012 - 9:48 pm | गणामास्तर

जौ द्या हो तुम्हि णका उगीच तरस करुण घिऊ. आपन आपले पन्च तारन्कित होत्लात
जावे मजा करावी अन यावे परत. घरी आल्यावर जम्ल्य्स तोडी सुद्द्लेख्नाची प्रक्टिस
करावी. त्या मुम्बै पोलिसांना आजुन चान्ग्लया कामाला लावले तर ते तुमच्या मागे लागतील. ;) कृ.ह.घ्या.

असो. मिपावर स्वागत.

धन्यवाद मास्तर, ते दिवस गेले आता, मु., पो.आणि अन्य सरकारी यंत्रणा फक्त कृपा शंकर, कलमाडी, आणि अन्य भ्रष्ट नेत्या च्या दिमतीला लागली आहे. आबांचे आणि देल्ही च्या अण्णांचे सहकारी २०५ कोटी पेक्षा जास्त रूपे खर्च करत आहेत. आम्हाला काळजीचे कारण नाही. पण त्यंचा पगार आणि खर्च पाणी आमच्या TAX आणि स्पीड MONEY मधून येत आहे.

सहज's picture

30 Mar 2012 - 8:07 am | सहज

राष्ट्रपतींचा विमान प्रवास खर्च नक्की किती असावा याचा आकडा कुठे मिळेल?

ह्या निमित्ताने एकदा भारतातल्या प्रमुख १० धार्मीक स्थानांचे एका दिवसाचे सध्याचे उत्पन्न पाहायची इच्छा झाली आहे. जवळजवळ दहा वर्षापूर्वी असे ऐकले होते(नॅशनल डेयरी डेव्हलपमेंट बोर्ड) भारतात एका वर्षात ५००० करोड किमतीचा मिठाई बाजार आहे . गेल्या दहा वर्षात परिस्थिती नक्कीच सुधारली असेल.

असो. वर्षाचे ३६५ दिवस रक्ताचे पाणी करुन चर्चा करणार्‍या आपण मंडळींनी जमा केलेल्या गंगाजळीची ही अशी राज्यकर्त्यांनी उधळपट्टी थांबवायला हवे.

विकास's picture

30 Mar 2012 - 8:45 am | विकास

जवळजवळ दहा वर्षापूर्वी असे ऐकले होते(नॅशनल डेयरी डेव्हलपमेंट बोर्ड) भारतात एका वर्षात ५००० करोड किमतीचा मिठाई बाजार आहे .

कदाचीत म्हणूनच "साखरेचे खाणार त्याला देव देणार", अशी म्हण अस्तित्वात आली असेल. ;) फक्त ते करदात्याच्या पैशाने होत नाही, खुल्या अर्थव्यवस्थेत होते. :-)

सुनील's picture

30 Mar 2012 - 8:57 am | सुनील

असो.

ह्या उठवळ धाग्याच्या निमित्ताने की होईना पण सहजराव आणि विकासराव लिहिते झाले, हेच ह्या धाग्याचे फळ!!!

बाकी चर्चा(?) नेहेमीप्रमाणेच चालू द्या!!!!!!!!