गाभा:
देव खरच नवसाला पावतो का? ह्या शंकेच उत्तर मला अजुन मिळाल नाही आहे.
ह्याला कारणही तसच घडल. काल रवीवारी , मी व माझे दोन मित्र एका प्रसिध्द देवळात देवाच्या पाया पडायला गेलो होतो.
बाहेर बरीच लांब रांग लागली होती. त्या रांगेत उभे रहीलो असतो तर सहजच आम्हाला दोन ते तीन तास लागले असते देवाच्या पाया पडायला. माझ्या मित्राने तिथे असलेल्या स्वयंसेवकाला विचारले आज ही रांग एव्हढी लांब का आहे? तर तो म्हणाला नवसाचि आहे. ती रांग एव्हढी लांब होती की मला खरच नवल वाटल की जर देवाला नवस करुन जर ते नवस खरे होत असतील तर मग हे जग मग फक्त नवसांवर चालायला हवे. कर नवस घे नवसाच फळ. काहीही काम न करता नवस करुन ते काम व्हायला पाहीजे.पण तसे होत नाही. मग हे देव नवसाला पावतात अस का म्हटल जात? म्हणुन खरच देव नवसाला पावतो काय ?
प्रतिक्रिया
26 Mar 2012 - 3:33 pm | प्रचेतस
नवसे कन्या पुत्र होती । मग का करणे लागे पती ।
--
संत तुकाराम
26 Mar 2012 - 3:39 pm | परिकथेतील राजकुमार
एकदम नवा कोरा आणि युनिक प्रश्न.
ह्या विषयावरती चर्चा व्हावी अशी आमची गेली अनेक वर्षाची मागणी होती.
स्वेटरमधल्या गोग्गोड गणपती बाप्पाचा फ्यान
परा
26 Mar 2012 - 3:42 pm | आबा
sarcastic स्मायली तयार करायला हवी राव ! :)
26 Mar 2012 - 3:56 pm | मोहनराव
मनात नाही भाव, अन देवा मला पाव!! ;)
26 Mar 2012 - 4:01 pm | गणपा
तुमच्या विश्वास नाही ना? (एकंदर जो सुर आहे धाग्याचा त्यावरुन काढलेल अनुमान) तर मग नका हो बोलू नवस. ज्यांच्या विश्वास आहे ते बोलतील.
मुळात तुमचा प्रॉब्लेम काय तोच कळला नाही? देवार विश्वास नाही ना मग देवळात गेलातच का?
सच्याने महाशतक काय मारल... साला हल्ली शतकांची हाव वाढत चालली आहे लोकांची.
(नवसाचा) गणा ;)
26 Mar 2012 - 4:17 pm | निश
गणपा साहेब, देवावर विश्वास नाही ह्यावर हा धागा नसुन तर हा धागा नवसावर आहे.तो तुम्ही नीट वाचलेला दिसत नाही आहे.
दुसर जर हे सदर तुम्ही सभासदानी शंका विचाराव्यात म्हणुन जर चालवत असाल तर मग मला शंका विचारायचा हक्क नाही आहे का?
मुळात शंका काय आहे ते आधि नीट समजावुन घ्या. घाईगडबडित प्रतिसाद देउ नका. माझ्या शंकेच उत्तर तुमच्या कडे नसेल तर मग ते शोधा किंवा इतर लोक जे उत्तर देतील ते वाचा.
शिकलेल्या माणसाचे हे लक्षण म्हणजे विचार करुन बोलण किंवा लिहीण. वरचा तुमचा प्रतिसाद बघता तुम्हाला उत्तर देता येत नाही. मग जरुर इथे प्रतिसाद येतिल ते वाचा.
नवस न करणारा
निश
26 Mar 2012 - 4:35 pm | गणपा
सॉरी शक्तिमान, धागा पुर्ण वाचला (होत्याच कितिशा ओळी म्हणे?) आणि पुर्ण विचार करुनच तो प्रतिसाद दिला आहे.
फक्त एक सांगा.. जर उद्या तुमच्या या कुटलेल्ल्या काथ्याचा कौल "हो देव नवसाला पावतो" असा लागला तर तुम्ही पण त्या रांगेत उभे रहाणार का?
बाकी चालुद्या तुमचं गुर्हाळ.
26 Mar 2012 - 4:54 pm | निश
गणपा (शकुनि) साहेब, तुम्हि धागा वाचलात पण नीट वाचलात का?
पुर्ण नाही म्हटल मी. नीट वाचलात का अस म्हटल.
असो . नवस जर खरे होत असतिल (?) हे खर मानल तर मग काम करायलाच नको ना. मग गणपा साहेब, कर नवस होईल काम पटकन असच ना.
मस्त मग आपण संत गाडगे बाबांची शिकवण चुकीची आहे अस मानायच का? कि नवसाच्या नावाखाली वेगवेगळ्या देवळात होणारी गरीब प्राणी व पक्षांचि हत्या ग्राह्य मानायची.
तुम्हिच ठरवा.
26 Mar 2012 - 4:59 pm | बिपिन कार्यकर्ते
आता बोला गणपा साहेब, बोला आता! टेल टेल गणपा सर, टेल नाउ! ;)
26 Mar 2012 - 5:03 pm | गणपा
=)) हात मेल्या अच्त्रत.
27 Mar 2012 - 1:13 am | पिवळा डांबिस
बिकाचा मुद्दा बरोबर आहे...
टेल हिम नाऊ
ऑर नील बिफोर अ काऊ!!!!
:)
26 Mar 2012 - 5:16 pm | गणपा
बाळा निश धागा संपुर्ण मन लावून वाचला. (तुझ्या सारख्या बालकांसाठी या पुढे योग्य ते शब्द वापरुन वाक्य रचना केल्या जाईल. ;) )
ते तुमचं तुम्ही काय ते पहा. (माताय ते कंसातल शकुनी राहिल की जी या वेळी. अस नाय कराच हा. एकद उपाधी दिलीत ना मोठ्या मनाने मग अशी कंजुशी नाय कराची. )
तुम्ही नवस करा वा नका करु आमाला काय बी देनं घेनं न्हाई.
नाही ना? मग असला वांझोटा धागा काढायच प्रयोजन काय ते कळलं नाही.
'प्रसाद' म्हणुन नळ्या फोडायला मिळणार असेल तर आपली ना न्हाई.
बाकी तुम्ही माझ्या वरच्या प्रतिसादातल्या प्रश्नाला सोईस्कर बगल दिली का आहे कळुन चुकले.
हॅ हॅ हॅ.
(साधुवाणी) गणा
26 Mar 2012 - 5:27 pm | निश
'प्रसाद' म्हणुन नळ्या फोडायला मिळणार असेल तर आपली ना न्हाई.
वा गणपा साहेब, मानल तुम्हाला, देवाच्या नावाखाली नवसाच्या माध्यमातुन मुक्या बिचार्या प्राण्यांचे बळि गेलेले चालणार वाटत तुम्हाला. लय भारी , मस्त. माणस शिकुन शहाणी होतात म्हणतात मग ते 'प्रसाद' म्हणुन नळ्या फोडायला मिळणार असेल तर आपली ना न्हाई अस ही म्हणतात.
मस्त मग तर आम्ही अडाणीच कि (किंवा बाळ तुमच्या प्रतिसादाप्रमाणे).
26 Mar 2012 - 5:34 pm | गणपा
तुम्ही अभक्ष भक्षणारे दिसत नाही.
जौदे तो वाद ईथे उकरुन काढला तर त्रिशतक झळकलच म्हणुन समजा. ;)
26 Mar 2012 - 5:43 pm | निश
अभक्ष भक्षणारे असु किंवा नसु पण नवसाच्या व देवाच्या नावावर नक्किच नाही.
27 Mar 2012 - 12:09 am | शिल्पा ब
प्रसादाचा शिरा चालत असेल तर नळ्या का नकोत?
26 Mar 2012 - 5:03 pm | परिकथेतील राजकुमार
ज्या संस्थळावरती नवलेखखकांना प्रोत्साहन दिले जावे असा आग्रह आहे, त्याच संस्थळाचे संपादक नवलेखकांना असे हताश करताना पाहून एक मिपाकर म्हणून शरम वाटली. (मिक्सर मध्ये वाटली का खलबत्त्यात ते विचारु नये. वेगळ्या मार्गाने अपमान केल्या जाईल.)
श्री. गणपा ह्यांच्यावरती काही कायदेशीर कारवाई करता येईल काय ?
26 Mar 2012 - 5:19 pm | गणपा
हे आले लगेच हवनात (तुपाची) धार सोडायला.
26 Mar 2012 - 6:51 pm | अत्रुप्त आत्मा
@हे आले लगेच हवनात ( ) धार सोडायला.>>> काय चित्र आलय डोळ्यांसमोर म्हणुन सांगू.... !
26 Mar 2012 - 10:46 pm | शैलेन्द्र
वाइट्ट फुटलो.. :))))))
27 Mar 2012 - 11:18 am | परिकथेतील राजकुमार
हवनाच्या दर्शनाला येता येता मध्येच समुद्र लागला, त्याला मी तरी काय करणार ?
अगस्ती
परा
27 Mar 2012 - 10:56 am | चिगो
>>(मिक्सर मध्ये वाटली का खलबत्त्यात ते विचारु नये. वेगळ्या मार्गाने अपमान केल्या जाईल.)
>>हे आले लगेच हवनात () धार सोडायला.
मेलो... :) :) :D खतरा पराशेठ आणि गणपाशेठ..
बास राव, अश्या खंग्री प्रतिसादांसाठी तरी मिपावर असे फुटकळ धागे येत राहोत, हिच प्रार्थना.. (नवस नको.. फेडायचे वांधे. ;-))
26 Mar 2012 - 4:31 pm | पिंगू
देव जर नवसाला पावत असता, तर मी रोज सकाळसंध्याकाळ दगडूशेठ गणपतीसमोर डोके टेकायला गेलो असतो.
हाकेच्या अंतरावर असूनसुद्धा कधी तिथे जायची माझी इच्छा होत नाही.
- पिंगू
26 Mar 2012 - 5:30 pm | परिकथेतील राजकुमार
तिथूनच हाकेच्या अंतरावरती अजूनही बरेच काही आहे. तिकडे चक्कर मारत जा. ;)
27 Mar 2012 - 2:02 pm | मी-सौरभ
ते तिकडे चक्कर मारत असताना बाप्पाचं देऊळ हाकेच्या अंतरावर असू शकते ही शक्यता पण विचारात घ्या. ;)
(शंकेखोर)
27 Mar 2012 - 2:06 pm | परिकथेतील राजकुमार
हाकेच्या अंतरावर असूनसुद्धा कधी तिथे जायची त्यांची इच्छा होत नाही असे त्यांनीच कबूल केले आहे.
मग 'देवळात नको, तर गोकुळात जा' असा सल्ला आम्ही त्यांना दिला.
26 Mar 2012 - 5:52 pm | किचेन
जरी गेला असता तरी डोक टेकायला मिळाल नसत.गर्दीच किती असते त्या श्रीमंत गणपती समोर! जर दगडूसेथ गणपती हाकेच्या अंतरावर तर कसबा गणपतीही हि हाकेच्या अंतरावरच असणार...येत जा कधी मधी गरीबाकड...
26 Mar 2012 - 8:45 pm | विश्वनाथ मेहेंदळे
सांभाळून जा रे. आणि हेल्मेट घालून जा. त्यांना एखादे विधान आवडले नाही तर नाकाड फोडतात म्हणे त्या ;-)
त्यातून त्या कराटे वाल्या असल्याने त्यांचा नाकावर बरोब्बर नेम पण लागत असणार. नाक मुठीत धरून शरण येशील मग. :-)
26 Mar 2012 - 4:33 pm | स्पा
म्हणुन खरच देव नवसाला पावतो काय ?
आमच्या हो किंवा नाही म्हणण्याने काय फरक पडणारे का निश साहेब..?
कशाला उगाच वांझोटे धागे काढता.. वेळ जात नाहीये का?
26 Mar 2012 - 4:38 pm | अन्या दातार
पावतो हो पावतो! देव नवसाला पावतो. काम तडीस नेण्याचा शेवटचा उपाय म्हणून लोक नवस बोलतात अन कामाला लागतात. कुणीही या भ्रमात राहू नये की नवस बोललो की आपण काहीही न करता काम होईल.
(श्रीगुरुकृपा पॉपकॉर्न सेंटरचालक) अन्या ;)
26 Mar 2012 - 4:42 pm | योगप्रभू
विवाहेच्छुकांनी बायको शांत-समजूतदार मिळावी म्हणून अवश्य नवस बोलावा.
नंतरही बायकोचे डोके ताळ्यावर राहावे म्हणून नियमित प्रार्थना करत राहावी.
स्त्रीमुक्तीवाल्या दुष्ट शक्तींपासून लांब राहाण्यासाठी गृह (स्वामिनी)शांती करावी.
26 Mar 2012 - 6:10 pm | अत्रुप्त आत्मा
@स्त्रीमुक्तीवाल्या दुष्ट शक्तींपासून लांब राहाण्यासाठी गृह (स्वामिनी)शांती करावी. >>> हे प्रभू वाचिव आंम्हाला वाचिव या हसवुन हसवुन मारणार्या योगप्रभू पासुन... ब्बास आता लिहिवत नाही... आम्चा शि.सा.न. स्विकारा हो प्रभू ;-)
26 Mar 2012 - 6:50 pm | प्रचेतस
फोटू बदला की हो आता.
26 Mar 2012 - 6:53 pm | अत्रुप्त आत्मा
व्हय जी...द्या ना दुसरा येखादा धुंडाळुन ;-)
26 Mar 2012 - 6:56 pm | प्रचेतस
तुम्हीच धुंडाळा.
आत्मा ना तुम्ही? ते ही अत्रुप्त. सर्वसंचारी असून एक साधा फोटू तुम्हाला धुंडाळता येऊ नये?
26 Mar 2012 - 7:34 pm | मोहनराव
26 Mar 2012 - 9:38 pm | अत्रुप्त आत्मा
@सर्वसंचारी असून एक साधा फोटू तुम्हाला धुंडाळता येऊ नये? >>> मित्र असून अडचणीच्या वेळी हूर्रर्र करुन दूर लोटल्याबद्दल णिषेध...!णिषेध...!णिषेध...! ;-)
26 Mar 2012 - 9:48 pm | प्रचेतस
26 Mar 2012 - 4:50 pm | चौकटराजा
निशा , झिलग्या तू रवळनाथाच्या दरर्शनाला गेला काय ?
( हे मस्त मालवणीत कसं लिहायच.मला सांग ना . तू तरी माझ्या नवसाला पाव रे निशूनाथा ! )
हाडाचा देवभक्त तोच "करविता "आहे असे म्ह्णणतो आणि आक्रित झालं तरी आम्ही नास्तिक म्हणतो " योगायोग ! "
26 Mar 2012 - 5:01 pm | निश
रवळनाथाच्या दरर्शनाक जाउन ईलस काय ?
26 Mar 2012 - 5:23 pm | चौकटराजा
आरतिच्यामारी, म्हण्जे क म्हन्जे स ते , स ला ना ते बरोबर ?
26 Mar 2012 - 4:54 pm | चौकटराजा
निश च्या धाग्याला प्रतिसाद दिल्याबद्द्ल धन्यवाद !
निश च्या धाग्याला प्रतिसाद दिल्याबद्द्ल धन्यवाद !निश च्या धाग्याला प्रतिसाद दिल्याबद्द्ल धन्यवाद !निश च्या धाग्याला प्रतिसाद दिल्याबद्द्ल धन्यवाद !
26 Mar 2012 - 5:14 pm | जगदिश देशमुख
"बाहेर बरीच लांब रांग लागली होती. त्या रांगेत उभे रहीलो असतो तर सहजच आम्हाला दोन ते तीन तास लागले असते देवाच्या पाया पडायला."
आत्ता एव्हडी रांग लागली मंजे देव पावत असणार की .... "हात च्या काकणाला आरसा कशाला"
26 Mar 2012 - 5:35 pm | यकु
मी नवस-सायास वगैरे काही मानत नाही, करीतही नाही..
कारण या शब्दांना विचित्र पार्श्वभूमी आहे..
त्याऐवजी मी माणसाला नेहमीच अज्ञात असणार्या, पण कधीही साद घालता येऊ शकणार्या अज्ञात प्रकाराला शरण जाणे असे म्हणायला मला आवडेल.
असली शक्ती प्रतिसाद देते काय त्याची सत्यता पडताळून पाहणे म्हणा किंवा त्या प्रतिसादातून स्वत:ची अडचण सोडविण्याची संधी नुकतीच ओघाने आली..
मी आत्मशून्यसोबत बारा कि.मी.च्या परिक्रमेला वगैरे गेलो होतो..
मला नेहमी चार वर्षांपासून टकूरं आऊट होण्याचा त्रास होता.. डोकं जड पडण्याचा त्रास होता.
हा त्रास ध्यान, कुंडलीनी जागृतीमुळे सुरु झाला होता..
डॉक्टर, गोळ्या, स्कॅन सगळं करुन पाहिलं होतं.
ते नर्मदामाई, नर्मदामाई, ती इच्छा पूर्ण करते वगैरे हॅमरींगमुळे मी एकदा त्रास होत असताना चिडून म्हणालो की माझा हा त्रास बंद होऊ दे, मी पण नर्मदा परिक्रमेला जाईन!
पुढच्याच काही दिवसांत तो त्रास दूर करणारी कृपावंत माता मला इथेच मिसळपाववर मिळून गेली.. आणि तो त्रासही कमी कमी होत जातो आहे..
मला परिक्रमेला जावं लागणार आहे, किंवा नेहमीच्या भाषेत नवस फेडायला जावं लागणार आहे..
27 Mar 2012 - 12:20 am | शिल्पा ब
कुंडलिनी (म्हणजे नक्की काय ते देव जाणे) जागृत झालेली चांगलं असतं ना? का नै? अन उगाच आपली चुकुन जागी झाली असेल तर कसं झोपवायचं? आमच्या आपल्या अडाणी शंका!!
27 Mar 2012 - 12:27 am | यकु
हो चांगलं असतं की.. पण ती हौस म्हणून, चुकून जागी करता येत नाही आणि झोपवताही येत नाही..:p
याला शंका नै कै, नसत्या चौकशा म्हणतात :p
बाकी ती जागृत झाल्याची खूण म्हणजे जे जे काही जागृत झालेल्या कुंडलिनीभोवती घडतं, ते सगळ्या जगाला अफेक्ट करतं.. ;-)
27 Mar 2012 - 1:22 am | पिवळा डांबिस
>>हा त्रास ध्यान, कुंडलीनी जागृतीमुळे सुरु झाला होता..
क्यों की आपको ठीकसे ढक्कन खोलना आता नही है ना, इसके वास्ते!!!!!
:)
27 Mar 2012 - 1:32 am | यकु
हौ ना पिडांकाका.. :(
लैच अवघड आहे.
27 Mar 2012 - 2:43 am | Nile
योग्य वयात योग्य ढक्कन उघडून योग्य ती क्रिया केली असती तर असी अयोग्य वेळ आली नसती....
असंच म्हणायचं आहे ना हो तुम्हाला पिडांकाका? ;-)
28 Mar 2012 - 4:36 pm | श्रावण मोडक
कोण? जाहीर नको. व्यनि कर.
26 Mar 2012 - 5:42 pm | सुहास..
देवीला नवस करा, बोळा निघण्याची शक्यता नाकारता येत नाही .
26 Mar 2012 - 7:43 pm | कपिलमुनी
टुकार धागे बंद व्हावेत म्हणून कुठल्या आय डी ला नवस बोलावा ??
26 Mar 2012 - 9:12 pm | कवितानागेश
टुकार धागे बंद व्हावेत म्हणून कुठल्या आय डी ला नवस बोलावा ??>>
गणपाला बोला! ;)
बायदवे, नवस नाही केला तरी देव पावतो म्हणे कधीकधी.... :)
26 Mar 2012 - 9:16 pm | पैसा
आपला धागा ठेवावा म्हणून एखाद्या आयडीने एण्टिक्विटी ब्लू चा नवस बोलला तर? ;)
26 Mar 2012 - 9:27 pm | यकु
>>>>>>आपला धागा ठेवावा म्हणून एखाद्या आयडीने एण्टिक्विटी ब्लू चा नवस बोलला तर?
ह्यात्त्याच्या!
गणपा आणि निश ह्या दोघांचाही निषेध !!!!
26 Mar 2012 - 9:54 pm | गणपा
आम्हाला आचमन करण्याची हुक्की आलीच तर स्वतःची सोय स्वतःच करतो.
पण कुणाला नवस बोलायचा/फेडायचा असल्यास आमची ना नाही.
आम्ही फेडलेला नवस तिर्थ/प्रसाद म्हणुन आमच्या भक्तांमध्येच वाटू. :)
26 Mar 2012 - 10:19 pm | सोत्रि
एक्सक्युज मी,
एण्टिक्विटी ब्लू ला नवस करण्याचे हक्क माझ्याकडे राखिव आहेत.
मला एण्टिक्विटी ब्लू जो कोणी पाजेल त्याचे सर्व मनोरथ सफळ संपूर्ण होतील.
तथास्तु!
- (एण्टिक्विटी ब्लू लावणारा) सोकाजी
26 Mar 2012 - 10:40 pm | यकु
आम्ही अर्काचार्य सोकाजींमार्फत संपादकाचार्य गणाधिप यांना एण्टिक्विटी ब्लू चा नवस बोलू इच्छितो. :p
तीर्थप्रसाद प्रसाद अर्थातच भक्तमंडळात वाटला जाईल. ;-)
गणपतीला दारुचा नैवैद्य दाखवला, पाप वाढले, कलियुग आले, भूकंप होणार म्हणणार्यांकडे दुर्लक्ष केले जाईल. :p
26 Mar 2012 - 10:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बूच मारतो आहे. दोनदा पाहावा लागला विनाकारण प्रतिसाद मला. ;)
-दिलीप बिरुटे
26 Mar 2012 - 7:44 pm | मितभाषी
निशासाहेब बेसीकमध्ये राडा आहे. तेवढा क्लिअर करुन या. तद्नंतर आपण काथ्या कुटूयात.
बाकी गणपा (शकुणी)साहेबांनी टाकलेल्या कुटील फास्यांचा तीव्र णिषेढ हे जाताजाता नमूद करतो. ;)
26 Mar 2012 - 7:57 pm | भिकापाटील
त्यांचे नाव निशा नाही निश आहे.
शनि
26 Mar 2012 - 8:55 pm | प्रभाकर पेठकर
नवस हा मानसोपचार आहे.
नवस बोलणारा, समस्येचे निराकरण करण्याचे , सर्व प्रयत्न करून हरलेला, हतबल झालेला असतो. नव्याने काही प्रयत्न करण्याचे, त्या समस्येशी लढण्याचे बळ हरवून बसलेला असतो.
विश्वास (किंवा अंधविश्वास म्हणा हवं तर) असल्याने देवाला नवस बोलल्यावर ती सर्वसमर्थ शक्ती आपल्या मदतीसाठी उभी आहे ह्या विचारातून त्याला समस्येशी लढण्याचे नव्याने बळ मिळते तो लढत राहतो आणि त्याच्या स्वतःच्या प्रयत्नांनी किंवा कर्मधर्मसंयोगाने जेंव्हा समस्येचे निराकरण होते तेंव्हा तो जास्त देवभक्त होतो पण समस्येचे निराकरण नाही झाले तर तो पुन्हा देवालाच शरण जाऊन तिथेच उपाय शोधत राहतो.
त्यामुळेच 'देव नवसाला पावतो' आणि 'नवस वगैरे थोतांड आहे' अशी दोन्ही टोकाची मते असलेली माणसे भेटतात.
26 Mar 2012 - 9:29 pm | सर्वसाक्षी
एका बाईने देवाला नवस केला. देवा मुलगा दे, दिलास तर तुला सोन्याची कुंची वाहीन. तिला मुलगा झाला ( ). तिने मुलाचे नाव सोन्या ठेवले आणि एके दिवशी पोरांच्या अंगावरची कुंची घेऊन देवळात गेली. देवाला म्हणाली, ही घे सोन्याची कुंची. बोलल्याप्रमाणे नवस फेडला आहे.
तेव्हा पासून देव नवसाला पावत नसावा असा अंदाज आहे.
( ) : भलत्या शंका मनात येऊ देऊ नयेत यासाठी रिकामा कंस दिला आहे.
26 Mar 2012 - 9:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>> देव खरच नवसाला पावतो का ?
हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. आम्ही कोणाच्याही श्रद्धेत लुडबूड करत नाही.
बाय द वे, सच्या (सचिन तेंडुलकर) काल सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेल्यापासून साली आपली दोलायमान अवस्था झाली आहे. विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्याच्या दरम्यान मिपावरील रनींग प्रतिसादादरम्यान मिपाकरांच्या नादी लागून भारताला विश्वचषक जिंकू दे.......मी सिद्धीविनायकाला दर्शनाला येईन असं बोलून गेलो. . आणि कर्मधर्म संयोगाने भारताने क्रिकेटचा विश्वचषक जिंकला. आता नवस पूर्ण करायची जवाबदारी माझी आहे. आणि ती मी पूर्ण करीन. कोणाला काय म्हणायचे असेल ते म्हणू दे..........!
-दिलीप बिरुटे
(श्रद्धाळू )
27 Mar 2012 - 12:35 pm | इरसाल
अजुन गेले नाय काय तुम्ही नवस फेडायला..........
तेव्हाच सच्याचे १०० चे १०० इतके दिवस लटकले होते.
रनिंग कोमेंत्री मधे सामील असलेला
26 Mar 2012 - 11:48 pm | नेत्रेश
नवस म्हणजे 'मी हे काम करत आहे, त्याचे फळ मला माझ्या मनासारखे मिळु दे' अशी प्रार्थना.
म्हणजे नवस बोलणारा शक्यतो 'दे रे हरी खाटल्यावरी' म्हणणारा नसतो. तर 'मी परीक्षेसाठी अभ्यास केला आहे, पेपर, सोपा येउदे, फर्स्टक्लास मीळुदे', 'मी लॉटरीचे तीकीट काढत आहे, लाखाचे बक्षीस लागले तर ५ हजार पेटीत टाकेन', किवा 'आम्ही प्रयत्न करत आहोत, मुलगा/मुलगी होउ दे' अशा प्रार्थना.
प्रयत्न न करता काहीच फ़ळ मिळणार नाही हे नवस करणाराही जाणतो. लोक प्रयत्न करत असतातच, पण जे आपल्या प्रयत्नांच्या पलीकडले आहे, त्यासाठी देवाची प्रार्थना केली तर काय चुकले?
27 Mar 2012 - 12:43 am | किचेन
टाका देवापुढे चारणे आठने,आणि मग तुम्हाला काय मागायचं ते.मिळाल तर समजा देव नवसाला पावतो,नाही मिळाल तर समजा आपली इच्छा एवढी स्वस्त नव्हती थोडी महाग होती.पुढच्या वेळेस चारण आठन्या ऐवजी रुपया टाका बघा काय होतंय ते, अन सांगा आम्हाला.आम्ही पण ठरवू नवस करायचा कि न्हायी.
27 Mar 2012 - 1:19 am | नेत्रेश
देऊळ म्हण्जे इच्छापुरतीच दुकानच आहे. अन्यथा लोक देवळात कशासाठी जातात.
देवाची उपासना करण्यामागेसुद्धा प्रत्येकाचा काही ना काही हेतु असतोच.
अगदी ग्यान प्राप्ती, स्व्-उद्धार, लोक्-उद्धार, मोक्ष या सुद्धा ईच्छाच आहेत.
कुणी नामस्मरन, पुजन करुन देवाला प्रसन्न करायचा प्रयत्न करतो, तर कुणी आपल्या मतीनुसात सरळ पैसे देउन.
कुणाचा मार्ग चुकीचा व कुणाचा बरोबर हे ठरवणार फक्त तो देवच.
27 Mar 2012 - 10:35 am | चौकटराजा
१९७४ च्या दरम्यान माझा भाउ व त्यांचा फर्गसन चा कंपू बी एस सी पास झाले . नंतर सगळे गप्पा मारताना आता काय करायचे याबद्द्द्ल
बोलत होते. मिळेल ती नोकरी ते एम एस्सी ते डोक्टरेट इथवर प्रत्येकाने आपले बेत सांगितले. एक म्हणाला
" आमची थोडी मोकळी जागा आहे मी एक झकास देऊळ टाकणार आहे !
म्हन्जे भक्तीचे दुकान ?
यस यारो यू सेड ईट ! लेकाच्यानो, हा सनातन धंदा आहे. जागतिक मंदीतही मस्त चालणारा !
27 Mar 2012 - 4:42 pm | निश
चौकटराजा साहेब, हो देऊळ हा सनातन धंदा आहे.
खरच घरात पैसे नसणारी मंडळी हि मग हा धंदा करतात अगदी जोमाने व काही दिवसात धनदांडगे होऊन राजकारण राजकारण करत अजुन लुटालुट करतात.
27 Mar 2012 - 9:25 am | रणजित चितळे
एखादा नवस (येथे चांगला व सात्विक नवस अभिप्रेत आहे) केला की तो करे पर्यन्त आपला अॅटीट्यूड तेवढ्या पुरता पोझीटिव्ह आपोआप होतो. नवस पुरे करण्यात आपल्याला काहीतरी चांगली सवय सुद्धा चुकून लागू शकते - लवकर उठणे ....
आपले मानसिक बळ वाढते.
ही सगळी आपले जिवन मॅनेज करायची आपआपली सॉफ्टस्किल्स आहेत.
27 Mar 2012 - 5:59 pm | आनन्दा
+१
27 Mar 2012 - 12:54 pm | मनीषा
तुम्ही नवस बोला/करा आणि काय घडते ते आम्हाला सांगा .
27 Mar 2012 - 7:51 pm | स्वछन्दि
विश्वास महत्वाचा आहे.
पावेल कि नाहि ते महत्वाचे नाहि.
देवाचे अस्तित्व नाकारु शकत नाहि कोनि....
आपन तर ब्वा मान्तो देवाला.
27 Mar 2012 - 8:15 pm | मराठे
देवळाचा धंदा म्हटल्यावर आठवण झाली...
ठाण्यात इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर शरणम हॉटेलच्या समोर असलेलं देऊळ बर्याच जणांना ठाऊक असेल. काही वर्षापर्यंत (म्हणजे तरी १० - १२ वर्षं झाली असतील) तिथला देव कुठल्याही दुर्लक्षीत गटासारखा आपल्या छोट्या देवळात एकटा आरामात राहात होता. तिथे कोणी कचरा टाकू नये म्हणून त्याची तिथे नेमणूक झाली असावी (कारण फार पूर्वी सर्विस रोड व्हायच्या आधी तिथे गटाराचं आणि घाणीचं साम्राज्य होतं). पण आता पहा ! तिथे सगळ्या देवांचं गेट-टुगेदर असल्यासारखं वाटतं. कोणता देव पाहिजे तो बोला. त्यातून हायवेने जाणारा प्रत्येक ट्रकवाले आणि गाडीवाले तिथे थांबून देवांना दर्शन देऊन जातात. त्यामुळे सध्या एखादा जुना वाडा पाडून बिल्डिंग बांधणार्या जुन्या घरमालकांसारखा त्या देवळाचा भाव वधारलाय! मागच्या वर्षी तिथून जाताना हीss भली मोठी रांग बघून आधी तर मला तिथे बस स्टॉप आहे की काय अशीच शंका आली. (पण लोकं नीट पद्धतशीरपणे लायनीत उभी होती म्हणजे बसस्टॉप नसावा हे लगेच लक्षात आलं.) नंतर तिथल्याच एका जुन्या रहिवाशाने त्या देवळचा इतिहास भूगोल सांगितला. अर्थात देवळाच्या परिसरातले बॅनर बघितले तर त्या देवाचा गॉडफादर कोण हे लगेच समजून येईलच. असो, पूर्वी एकेकाळी संध्याकाळच्या निरांजनाला महाग असणार्या त्या देवळाचं अस्तित्व सद्ध्या दर सणावारी तर येथेच्छ जाणवतं. त्या देवाने कोणाला नवस बोलला होता कोणास ठाऊक!
28 Mar 2012 - 11:54 am | निश
मराठे साहेब, हो आता त्या देवळात रांग असते लांबच लांब.
मी बघतो रोज येता जाता त्या रोडवरुन.
28 Mar 2012 - 8:46 pm | मदनबाण
मागच्या वेळी लाल बागच्या राजाला एकदा गेलो होतो,तिथे भली मोठी रांग होती,कोण कुठुन येतो हे सांगणे देखील महाकठीण.
मी जेव्हा बाप्पाच्या समोर आलो तेव्हा मला तिथे एक भला मोठा हार दिसला...सोन्याचा होता.तैवान बेस्ड स्वीस कंपनी अशी नावे त्याच्या लेबलावर दिसत होती.
मला जितके माहित आहे त्यानुसार लालबागचा गणपती नवसाला पावणारा म्हणुन प्रसिद्ध आहे.
असो...
बाकी नेहमी प्रमाणेच म्हटतो... चालुद्या ! ;)