रेल्वे प्रवास!

amit_m's picture
amit_m in काथ्याकूट
25 Mar 2012 - 9:57 am
गाभा: 

मध्यंतरी मी रेल्वेच्या AC 2 TIER या वर्गातून सुमारे १०००किलोमीटर प्रवास केला. आरक्षण तत्काळ कोट्यातून आंतरजालावरून केले होते.
सांगायचा मुद्दा असा की तिकिटावर माझे नाव आणि ओळखपत्र नंबर चुकीचा टंकित झाला, त्यामुळे तिकीट परीक्षकाने
माझ्याकडे तिकीटाची पूर्ण रक्कम + २५० रुपये असा दंड मागितला.
मी दंड द्यायला नकार देऊन त्याच्याशी बरीच हुज्जत घातली आणि शेवटी विजयी झालो. याबाबत रेल्वे चा नियम काय आहे?
तिकिटाचे पूर्ण पैसे दिले असताना फक्त नाव आणि ओळखपत्र नंबर चुकीचा असल्याने दंड भरावा काय? (मी ओळखपत्र म्हणून PAN card दाखवले होते)

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

25 Mar 2012 - 10:29 am | नितिन थत्ते

>>तिकिटावर माझे नाव आणि ओळखपत्र नंबर चुकीचा टंकित झाला

आंतरजालावरून आरक्षण केले होते त्या अर्थी तुम्हीच चुकीची माहिती भरली होती (असेच गृहीत धरायला हवे. रेलवेचा कॉम्युटर चुकीचे नाव टंकित करेल हे संभवत नाही).

तरीसुद्धा तिकीट परीक्षकाने तुम्हाला प्रवास करू दिला याबद्दल तिकीट परीक्षकास शिक्षा व्हायला हवी. ;)

प्रत्येक वेळी टंकन चूक असेलच असे नाही. आरक्षण प्रणालीच्या सॉफ्टवेअर च्या चुकीमुळेही बरोबर माहिती भरली असतानाही चु़कीची माहिती भरली गेली असा मला नुकताच विमानाचे आरक्षण करताना अनुभव आला आहे.
माझा फ्लाईट क्रमांक चु़कला होता. जो क्रमांक मी भरला होता त्या जागी मला माझ्या तिकीटावर दुसराच क्रमांक आलेला दिसला. विमानकंपनीने चूक मान्य करून मला दुसरे त्याच डिल चे आरक्षण दिले. फक्त विमान फुल असल्याने मला जायचे त्या दिवशी चे न मिळता अन्य दिवसाचे जे मला चालणार होते असे आरक्षण मिळाले.

अन्या दातार's picture

25 Mar 2012 - 10:33 am | अन्या दातार

कोणत्या तारेत आरक्षण केले होते की नावही चुकावे व ओळखपत्र क्रमांकही चुकावा?
रेल्वेच्या नियमांनुसार सर्व माहिती योग्य व अचूक असणे गरजेचे आहे. इथे तुम्ही एकही गोष्ट बरोबर टंकलेली दिसत नाही. तपासनीसाने काय म्हणून तुम्हाला सोडून द्यावे?

बरं, तिकीट स्लीपर क्लासचे असते तर कदाचित वाचला असता, AC 2 Tier म्हणजे "चांगली शिकल्या-सवरलेली कि हो तुमी" ;)

शैलेन्द्र's picture

25 Mar 2012 - 10:41 am | शैलेन्द्र

"मध्यंतरी मी रेल्वेच्या AC 2 TIER या वर्गातून सुमारे १०००किलोमीटर प्रवास केला. आरक्षण तत्काळ कोट्यातून आंतरजालावरून केले होते.
सांगायचा मुद्दा असा की तिकिटावर माझे नाव आणि ओळखपत्र नंबर चुकीचा टंकित झाला, त्यामुळे तिकीट परीक्षकाने
माझ्याकडे तिकीटाची पूर्ण रक्कम + २५० रुपये असा दंड मागितला"

नाव चुकीचे आले हा पुर्णपणे तुमचा दोष आहे.. तुम्ही प्रवासास बसण्यापुर्वी तिकीटाची प्रत होती न तुमच्याकडे? ती बघीतली नाही का?

दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली(मागच्या एक वर्षापासुन) आय डी नंबर टाकायचा नसतो.. सरकारमान्य ओळखपत्र, तपासनिसास दाखवायचे असा नियम आहे.. तुम्ही नक्की कधी प्रवास केला?

अन्या दातार's picture

25 Mar 2012 - 10:47 am | अन्या दातार

दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली(मागच्या एक वर्षापासुन) आय डी नंबर टाकायचा नसतो..

चूक! तत्काळ तिकीट मिळवण्यासाठी ओळखपत्राचा प्रकार (पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, पारपत्र इ. इ.) व त्याचा आयडी क्रमांक टाकणे बंधनकारक आहे. त्याशिवाय तत्काळ कोट्यातून आरक्षण मिळतच्च नाही.

शैलेन्द्र's picture

25 Mar 2012 - 1:05 pm | शैलेन्द्र

ह्म्म्म.. चुकलं... पुर्वी नव्हत लागत, आणी त्याही पुर्वी सगळ्या तिकीटांना लागायच .. येवड्यात तात्काळने जाणे कमी झालय त्यामुळे माहीत नव्हतं..

jaypal's picture

25 Mar 2012 - 11:00 am | jaypal

धागा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. आपण चुकायच आणि कर्तव्यनिष्ठ तपासनिसास उगा बोल लावायचा.(आणि परत धागा काढुन चर्चा घडवायच्या ;-))

ang

मी तिकीट Agent कडून बुक केले होते त्यामुळे चूक झाली असली तरी ती मी केली न्हवती.
तिकीटाची प्रत मी तपासून पहिली होती, आणि मला ती चूक लक्षात आली होती.
पण प्रवास करणे आत्यंतिक गरजेचे असल्याने दुसरा उपाय न्हवता.
रेल्वेचे नियम पाळले पाहिजेत हे मान्य आहे, पण तरीही दंड मागणे हा "बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल" असला प्रकार झाला.
Mutual understanding असावे की नाही?

तरीसुद्धा तिकीट परीक्षकाने तुम्हाला प्रवास करू दिला याबद्दल तिकीट परीक्षकास शिक्षा व्हायला हवी.
याबद्दल त्याचे आभार मानावेत तितके थोडेच आहेत..

आणखी एक......... हा धागा माहितीमध्ये भर पडावी यासाठी काढला आहे.
माझ्यासारखा प्रसंग आणखी कुणावर येवू नये म्हणून हा लेखनप्रपंच.

अन्या दातार's picture

25 Mar 2012 - 12:31 pm | अन्या दातार

>>रेल्वेचे नियम पाळले पाहिजेत हे मान्य आहे, पण तरीही दंड मागणे हा "बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल" असला प्रकार झाला.
रेल्वेचे नियम तर पाळायचे आहेत, वर दंडही भरायची इच्छा नाही याला काय अर्थ आहे? चूक एजंटची आहे तर त्याच्याशी कराल का Mutual Understanding? पकडा की त्याची गचांडी.

अन्या दातार साहेब! एजंटची गचांडी पकडायला परत १००० किलोमीटर जावे लागेल. (परवडण्यासारखे नाही..आर्थिक आणि वेळेच्या दृष्टीकोनातून)
आणि दूरध्वनीवरून एजंटची बरीच बिन पाण्याची केली..तेवढेच समाधान.

दुसर्‍या कुणाचंतरी तिकीट विकत घेउन मग "रेल्वेनेच माझं नाव अन गाव चुकीचं टाकलं" म्हणुन धागे काढतायं असं आमचं मत आहे.

नाव अन आय डी नंबर चुकीचा असेल तर ते तिकीट तुम्ही चोरलंसुद्धा असु शकतं!! तिकीटचेकरची काय चुक? उगा कैच्या कै!!

amit_m's picture

25 Mar 2012 - 12:34 pm | amit_m

"दुसर्‍या कुणाचंतरी तिकीट विकत घेउन मग "रेल्वेनेच माझं नाव अन गाव चुकीचं टाकलं" म्हणुन धागे काढतायं असं आमचं मत आहे.

नावामध्ये आणि PAN no. मध्ये फक्त १ अक्षर चुकीचे होते.
आणि माझ्याकडे वाहन चालवण्याचा परवाना, पारपत्र इत्यादी ओळखपत्रे सुद्धा होती.

शैलेन्द्र's picture

25 Mar 2012 - 1:11 pm | शैलेन्द्र

एकच अक्षर? इंग्लीश स्पेलींगचे?

तेवढ चालतं..

बाकी भांडलात ना? प्रोब्लेम सॉल्व झाला ना?

तसं टी टी च बरोबर आहे, पण तुमचही बरोबर आहे, जायचय म्हटल्यावर कसही जायचचं भांडुन्/गोड बोलुन्/लाच देवुन्/त्रास घेवुन.. .. जावच लागतं

नक्की काय चुक होती ते सांगाल का..?

"नावामध्ये आणि PAN no. मध्ये फक्त १ अक्षर चुकीचे होत"
आणि
"तिकिटावर माझे नाव आणि ओळखपत्र नंबर चुकीचा टंकित झाला"

या दोन वाक्यांमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे.

केवळ एक अक्षर चुकले तरी काही फरक पडत नाही असा माझा अनुभव आहे. मी University च्या परीक्षा, बँकेत चेक वटवणे आणि हो.. रेल्वेचा प्रवासही नावातल्या चुकीसकट केला आहे...

माझे पहिले नांव ९ (इंग्रजी) अक्षरी आणि आडनांव १० (इंग्रजी) अक्षरी आहे.. आणि माझे नांव पाठ करण्यापेक्षा अथर्वशीर्ष / रामरक्षा पाठ करणे सोपे वाटते कांही जणांना. :-)

नावातकायआहे's picture

25 Mar 2012 - 1:21 pm | नावातकायआहे

>> Mutual understanding?
म्हणजे लाच का?

कपिलमुनी's picture

26 Mar 2012 - 11:05 am | कपिलमुनी

१. तिकीट एजंटकडून काढल्यानंतर तुम्ही तपासले नाहीत.
>> ते तपासून बरोबर आहे याची खात्री करणे तुमचे काम आहे .
२. चूक ती चूक !!
>> Mutual understanding म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे ?
बाकी मोदक यांनी म्हणल्याप्रमाणे एक स्पेलींग चुकले असेल तर कोणी अडवत नाही ..

इथे mutual understanding म्हणजे लाच देणे अपेक्षित नाही. फक्त एकच अक्षर चुकीचे असताना विनाकारण अडवणूक करू नये एवढीच अपेक्षा होती.

मी दंड द्यायला नकार देऊन त्याच्याशी बरीच हुज्जत घातली आणि शेवटी विजयी झालो.

झालात ना विजयी?
मग धागस्य किं प्रयोजनम् ?

मी-सौरभ's picture

26 Mar 2012 - 3:03 pm | मी-सौरभ

तुम्हाला असं वाटत तर कारवाई करुन टाका नायतर मग पब्लिकला मजा करुन घेऊ द्या.

नायतरी धाग्याचा उद्देश स्वतःचा अपमान अन् हेटाळणि करुन घेणे नसावा अन् धागा उडवला तर त्याच्या कर्त्यालाही वाईट वाटायची शक्यता खूप कमी आहे :)