खानदेशी वांग्याचे भरीत

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
24 Mar 2012 - 4:16 pm

ही पाकृ मला आपल्या मिपावरची मैत्रीण स्मिता हिने सांगितलेली आहे :)
झटपट आणी एकदम चविष्ट अशी ही पाकृ आहे :)
भरीताला पाहून नेहमी नाक मुरडणारे मी आणी माझा नवरा आवडीने हे खाऊ लागलो :)
स्मिताचे मनापासून आभार :)

साहित्यः

मोठे भरीताचं वांगं
२-३ हिरव्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
२-३ लसूण (लसूण आणी हिरव्या मिरच्या कोरड्याच तव्यावर भाजून घ्यायच्या)
मुठभर कोथंबीर
मुठभर कांद्याची पात चिरून
१ टीस्पून ओवा
मीठ चवीनुसार

.

पाकृ:

प्रथम वांग्याला सुरीने चिरा पाडून , जरासा तेलाचा हात लावून गॅसवर खरपूस भाजून घ्यावे.

.

वांग्याची सालं काढून घ्यावी.

.

त्याचा गर व्यवस्थित मॅश करुन घ्यावा.

.

खल-बत्त्यात कोथींबीर, कांद्याची पात, लसूण व हिरव्या मिरच्या एकत्र ठेचून घ्यावे.

.

हा ठेचा वांग्याच्या गरात घालून एकजीव करावा.

.

कढईत जरा जास्त तेल तापवून ओव्याची फोडणी करावी.

.

भरीत त्यात घालून व्यवस्थित एकत्र करावे. चवीनुसार मीठ घालावे व २ मिनीटे शिजवून गॅस बंद करावा.

.

टिपिकल जळगावकडचं भरीत -पुरी तयार आहे :)

.

नोटः

मुळ खानदेशी पाकृत दाण्याचा कुट किंवा अख्खे शेंगदाणे घालत नाही , आवडत असल्यास घालावे . तसे ही भरीत छान लागतं :)

प्रतिक्रिया

तुम्ही जळगावमध्‍ये नाहीयेत वाट्टे..
खानदेशी भरतात हिरव्याऐवजी नीळं वांगं का वापरलंय असा एका जाज्ज्वल्य खानदेशीचा प्रश्न आहे ब्वॉ.. इथे शेजारी बसलेत ते ..

सानिकास्वप्निल's picture

24 Mar 2012 - 4:32 pm | सानिकास्वप्निल

नाही ना जळगावचे आम्ही नाही
इथे राणीच्या देशात नीळं (जांभळं) वांगंच मिळतं तर काय करणार :(

पैसा's picture

24 Mar 2012 - 4:28 pm | पैसा

हिरवी वांगी जाम टेस्टी असतात.

यकु, जाळगावमधे एक तर मोठी निळी/जांभळी वांगी मिळत नाहीत आणि हिरवी वांगी मिळाली नाही तर कोणी बाकीच्या वाग्यांचं भरीतसुद्धा करत नाही ;)
सानिका राणीच्या देशात असल्याने तिला खान्देशातलं वांगं मिळालं नसेल.

सानिकातै थँक्यू.. सांगितलंय त्या जाज्ज्वल्य खानदेशींना.. :)
स्म‍ितातै, हिरव्या वांग्यांचं भरीत खाल्लंय, लै ब्येष्‍ट !

(भरीत झालेला) यक्कू

बाकी मला गंगथडीची काटाळ वांगी खूप आवडतात :p

वांगे आणि वांग्यांच्या पाककृत्या करणार्‍या सुगरणी अमर रहेऽ !

स्मिता.'s picture

24 Mar 2012 - 4:25 pm | स्मिता.

मी सांगितलेली पाककृती तू उत्साहाने बनवलीस आणि इथेही दिलीस हे बघून खूप आनंद झाला. एकदम झक्कास दिसत आहे वांग्याचं भरीत. सोबतीला कढी किंवा ताक असलं की बास्स!!

शेवटचा फोटो मस्तच... बघून ताव मारावसा वाटतोय ;)

अत्रुप्त आत्मा's picture

24 Mar 2012 - 4:42 pm | अत्रुप्त आत्मा

अरारारा...!काय हे..?
ही पाककृती सकाळी आली असती,तर किती बरं झालं असतं. अता मेसला रात्रीची दांडी(च) मारावी लागणार... ;-)

अवांतरः-चला अता आज संध्याकाळी भरीत करणे आले..आणी उद्या मेसवाल्या मावशी आमचं करतील ते येगळच...! (अरे...भटा,काल सक्काळी म्हणलावतास ना...रातच्याला काय तरी चमचमीत करा म्हणुन...अता खा हे ----- शिळं आधी...नाय तर डोक्यावर थापिन..वगैरे वगैरे )

असे समजावे.

बाकी नेहमीपेक्षा वेग्ळे लिहायचे म्हणून विचारतो.

खानदेशी वांग्याचे भरीत म्हणजे खानदेशातील वांग्याचे भरीत की खानदेशी पध्दतीने भरीत.

बाकी यक्कुने म्हणले आहेच त्या प्रमाणे खानदेशी वांगी हिरव्या सालिची असतात.

आणि कृष्णाकाठची सुद्धा.

सुनील's picture

24 Mar 2012 - 8:12 pm | सुनील

खानदेशी वांग्याचे भरीत म्हणजे खानदेशातील वांग्याचे भरीत की खानदेशी पध्दतीने भरीत.
चिंतामणी यांच्याशी सहमत (काय दिवस आलेत!)

सानिकास्वप्निल's picture

24 Mar 2012 - 11:17 pm | सानिकास्वप्निल

खानदेशी पध्दतीने भरीत बनवले आहे :)
धन्यवाद

परिकथेतील राजकुमार's picture

24 Mar 2012 - 5:07 pm | परिकथेतील राजकुमार

खत्तरनाक दिसते आहे पाकृ !

बाकी ही पाकृ स्मिताने सांगितली ह्यावरती विश्वास नाही. मुळात तिला स्वयंपाकघरातले काही कळते ह्यावरच आमचा विश्वास नाही. ;)

स्मिताने बनवुन खायला घातले असे थोडेच म्हणले आहे. :D

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Mar 2012 - 5:23 pm | बिपिन कार्यकर्ते

:(

कवितानागेश's picture

24 Mar 2012 - 6:50 pm | कवितानागेश

हे भरित वांगे न घालता कसे करायचे हे बिकाकाकांना कुणीतरी सांगा हो........... :(

नाहीतर भोपळ्याचे भरीत शिकवा...

दही घातलेले, मेथीच्या फोडणीचे भोपळ्याचे भरीत,कधी कधी झकास चव जमवून आणते..

मात्र वांग्याचे भरीत आणि भोपळ्याचे भरीत यामधला फरक म्हणजे सोलकढी आणि पियुष मधला फरक..
एकाची चव स्फोटक आणि दुसर्‍याची जराशी सोज्वळ. :-)

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Mar 2012 - 9:55 pm | बिपिन कार्यकर्ते

माऊ यडपट आहे! ;) आणि मोदक्या, लेका, च्यायला! हे असले फोटो बघितल्यावर भोपळ्याचं भरीत खायचं होय रे? गेम करेन तुझा! ;)

(माऊ) काकू S S S.. मला वाचवा.. :-D

जाई.'s picture

24 Mar 2012 - 5:23 pm | जाई.

मस्तच दिसतय हे भरीत

भरीत खमंग होण्यासाठी एक टीप..

वांगे खरपूस भाजल्यानंतर त्यातून तेल निघते.. (फोटो क्र ३ मध्ये प्लेटवर थोडे थोडे दिसत आहे.)

ते तेल गाळून घेवून (गरज असेल तर, कारण त्यात बर्‍याचदा भाजलेल्या वांग्याच्या टरफलाचे अगदी बारीक काळे तुकडे असतात.) फोटो क्र ८* च्या दरम्यान घालावे...

खमंग चव येते..!

* तोच तो ५० रावांचा आवडता चमचा असलेला फोटो. :-)

न गाळता घेतले तरी विशेष बिघडत नाही. भरीताला खास 'स्मोक टच' येईल्...मोठ्या हॉटेल्समधून मुद्दाम जळके करवंटीचे तुकडे टाकतात 'स्मोक टच' येण्यासाठी !

गणपा's picture

24 Mar 2012 - 6:48 pm | गणपा

वांगं आपल लै लै फेव्हरीट.
शेवटचा फोटो तर निव्वळ भूक चाळवणारा...

सुहास झेले's picture

24 Mar 2012 - 7:15 pm | सुहास झेले

जबरदस्त.... मला प्रचंड आवडतं वांग्याचे भरीत :) :)

सुनील's picture

24 Mar 2012 - 8:17 pm | सुनील

सुरेख!

वांग्याचे भरीत हा अत्यंत आवडता प्रकार.

जर घरात गॅसची शेगडी नसेल (विजेच्या कॉइल असतील) तर वांगे भाजणे कठीण जाते. तेव्हा ओवन ४५० डिग्री फॅ. ला तापवून वांगे ४५ मिनिटे ठेवले, तर अगदी छान खरपूस भाजून निघते. मी अशा वांग्याची सालदेखिल बारीक चिरून भरीतात घालतो.

jaypal's picture

24 Mar 2012 - 9:04 pm | jaypal

ऊत्तम जमल आहे केवळ भरता बरोबर पुरी पहिल्यांदा बघतो आहे.(तेवढा भाकर तुकडा अन वाईस बचाक भर खरडा टाका व ताई ताटात)

चिंतामणी's picture

24 Mar 2012 - 11:33 pm | चिंतामणी

भाकर बनवायला राणिच्या देशात ज्वारी/बाजरीचे पिठ मिळायला हवे ना.

सानिकास्वप्निल's picture

24 Mar 2012 - 11:41 pm | सानिकास्वप्निल

राणीच्या देशात ज्वारी/बाजरीचे पीठ मिळतं पण स्मिता म्हणाली भरीत आणी पुर्‍या असे ही खाल्लं जातं म्हणून पुर्‍या केल्या इतकचं :)
खरं तर खानदेशात कळण्याच्या भाकरीबरोबर ही भरीत खाल्लं जातं :)

सानिकास्वप्निल's picture

24 Mar 2012 - 11:41 pm | सानिकास्वप्निल

राणीच्या देशात ज्वारी/बाजरीचे पीठ मिळतं पण स्मिता म्हणाली भरीत आणी पुर्‍या असे ही खाल्लं जातं म्हणून पुर्‍या केल्या इतकचं :)
खरं तर खानदेशात कळण्याच्या भाकरीबरोबर ही भरीत खाल्लं जातं :)

निवेदिता-ताई's picture

24 Mar 2012 - 10:14 pm | निवेदिता-ताई

सुरेख....................

यात थोडे शेंगदाणे कुट घालून पहा..चव अजुन छान येते...:

सानिकास्वप्निल's picture

24 Mar 2012 - 11:18 pm | सानिकास्वप्निल

मी हे पाकृत नमुद केले आहे ताई :)

नोटः
मुळ खानदेशी पाकृत दाण्याचा कुट किंवा अख्खे शेंगदाणे घालत नाही , आवडत असल्यास घालावे . तसे ही भरीत छान लागतं

धन्यवाद :)

निवेदिता-ताई's picture

24 Mar 2012 - 10:22 pm | निवेदिता-ताई

ओवा घालून भरीत प्रथमच पहाते आहे....

रेवती's picture

25 Mar 2012 - 1:33 am | रेवती

लई भारी!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

25 Mar 2012 - 1:40 am | निनाद मुक्काम प...

खानदेशातून पांढरी ठिपके असलेले वांगी आणि बोर जेव्हा वडिलांचे मामा मुंबईत आणायचे तेव्हा आजी खास खानदेशी बेत आखायची:
मग जेवणानंतर ही भावंड आपल्या बालपणीच्या बळीराम पेठेतील आठवणींना उजाळा द्यायची:

मराठमोळा's picture

25 Mar 2012 - 8:41 am | मराठमोळा

एक नंबर.. :)
पण जांभळ्या वांग्याला खानदेशी वांग्याची चव येईलसे वाटत नाही.. तरी तुमच्या मेहनतीला आणि प्रेझेंटेशनला दाद. :)

भरीतासोबत बाजरीची कडक भाकरी आणि खर्डा.. म्हणजे स्वर्गसुख आणि ते घ्यायला मी कुठेही जायला तयारच बसलेला असतो.

- पिंगू

सस्नेह's picture

26 Mar 2012 - 11:39 am | सस्नेह

ही पाक्रु करताना हिरवीगार कुडची वांगी वापरल्यास जास्त खमंग होईल असे वाटते.

छो.राजन's picture

29 Mar 2012 - 10:27 pm | छो.राजन

काह्देशी सारखी हिरवी वांगी, परदेशात थाई वांगी म्हणून मिळतात. बंकोक,अमेरिका, कॅनडा येथे सुधा,
थान्क्स फोर RECIPE

प्यारे१'s picture

26 Mar 2012 - 12:15 pm | प्यारे१

खपतोय... आज माझा उपास असल्यानं वाचलो. ;)

५० फक्त's picture

26 Mar 2012 - 12:33 pm | ५० फक्त

उत्तम, आमच्याकडचे खानदानी भाजी आहे वांगी, त्यामुळॅ करुन खायला घालणे अशी विनंती ज्यादा आर्डर करणे आले आज.

क्या बात है.......नक्की करुन बघणार :)

प्रभाकर पेठकर's picture

27 Mar 2012 - 1:56 am | प्रभाकर पेठकर

कालच केले होते हे खानदेशी भरीत. अर्थात, थोडा बदल केला तो म्हणजे ओव्या ऐवजी मोहरीची फोडणी दिली. आणि कच्चा कांदा घातला होता. असो.

चव वेगळी आणि चांगली झाली होती. लसूणाचे प्रमाण जरा वाढविले तर चालेल (माझ्या वैयक्तिक आवडीनुसार) असे जाणवले.

काही ठिकाणी भरीतात चिंचेचा कोळ वापरतात, ते भरीतही करून पाहिले पाहिजे.

जे मी नेहमी करतो ते म्हणजे, खरपुस भाजलेल्या वांग्याच्या गरात बारीक चिरुन कांदा, मिरची, मीठ, कोथिंबीर, हळद,दही घालून हिंग मोहरीची फोडणी द्यायची. ते जास्त आवडते. पण अर्थात, इतर चवीही चाखायला आवडतात.

सर्वसाक्षी's picture

27 Mar 2012 - 9:49 am | सर्वसाक्षी

त्याची महती काय वर्णावी?

पेठकर शेठ म्हणजे जादुचे हात आणि मोठे काळिज लाभलेला माणुस.

भरभरुन खायला घालतात. प्राणी आणि पक्ष्यांना मित्रांखातर मुक्ति देताना माझ्यासारख्या तृणभक्षीसाठी ते वांग्याचे भरित बनवितात. कसे बनवितात हे मी चुकुनही विचारित नाही. सोन्याची बिस्किट कुणी देत आहे तर परिस कशाला मागायचा? परिस घ्या, लोखंड शोधा मग त्याला परिस लावा हे कुणी सांगितलय? त्यांनी करायच आणि आपण हाणायचं.

मग मी त्यांच्या पुढच्या भेटीचा वाट पाहत राहतो.

(पेठकरशेठ, कधी येताय ?)

प्रभाकर पेठकर's picture

27 Mar 2012 - 9:53 am | प्रभाकर पेठकर

हा: हा: हा: सर्वसाक्षीजी,

अशाने, आपली भेट म्हणजे 'भरीतभेट' म्हणून इतिहासात प्रसिद्धी पावायची.

मि एन आर आइ's picture

29 Mar 2012 - 3:47 am | मि एन आर आइ

खूप छान !!!

राजहंस's picture

4 Jun 2012 - 1:00 am | राजहंस

खूप छान....पण "नोटः मुळ खानदेशी पाकृत दाण्याचा कुट किंवा अख्खे शेंगदाणे घालत नाही ," - माझी आई खानदेशी (जळगाव), त्यामुळे मी जळगाव मधे भरपूर वेळा खानदेशी भरीताचा आस्वाद घेतलेला आहे आणि आई घरी पण बनवते......माझ्या माहितीप्रमाणे तरी खानदेशी लोकं वांग्याचा भारीतामध्ये शेंगदाणे ते पण कच्चे शेंगदाणे नक्कीच घालतात.