सध्या अनेक वार्तापत्रातुन प्रसीध्द होणा-या बातम्या वाचल्यावर "महाराष्ट्राचा बिहार होतो आहे का?" असा प्रश्ण पडतो आहे. आजची ताजी बातमी वाचा.
(सध्या महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल अनेक अहवालांवर चर्चा चालू आहे. महाराष्ट्राचा बिहार झाला आहे याबद्दल अनेकांचे एकमत झाले आहे. या पार्श्वभूमीवर आत्ताच एक धक्कादायक बातमी वाचण्यात आली.)
धक्कादायक
आंतरजालावरील वर्तमानपत्रातील ताजी बातमी पुढील प्रमाणे.
दिवेआगरःसोन्याच्या गणपतीची चोरी
राज्यातील मंदिरांमध्ये चो-यांचे प्रमाण प्रचंढ वाढले आहे. हिंदू नववर्षाच्या दुस-याच दिवशी श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरच्या सोन्याच्या गणपतीची चोरी झाली आहे. चोरट्यांनी आज (शनिवार) मध्यरात्री दोन ते तीनच्या दरम्यान मंदिराच्या दोन वॉचमनना मारहाण केली आणि सोन्याचा गणपती तसेच देवाचे दागिने चोरुन पळ काढल्याचे उघड झाले आहे.
सवीस्तर बातमी येथे वाचा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12388907.cms
या गणपती विषयी थोडी माहिती देतो. (खरेतर अनेकांना माहीत असेलच.)
सोन्याचा गणपती
श्रीमंत पेशव्यांच्या श्रीवर्धन तालुक्याच्या मध्यभागी दिवेआगर गाव वसलंय. श्रीवर्धनला दोन हजार वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. इ.स. पूर्वीपासूनच उत्तरेच्या दंडा-राजापुरी खाडीत असलेल्या मंदारपट्टण या बंदरातून परदेशांशी व्यापार चालत असे.
ऐतिहासिक तालुक्यातलं दिवेआगर गावही अतिप्राचीन , निसर्गरमणीय... गेल्या दहा वर्षांपासून या गावाला तीर्थक्षेत्राचं स्वरूप प्राप्त झालंय , ते तिथे सापडलेल्या सोन्याच्या गणपतीमुळे. द्रौपदी धर्मा पाटील या १७ नोव्हेंबर १९९७ ला , नारळी-सुपारीच्या बागेत काम करत असताना जमिनीखाली सुमारे दीड फुटावर त्यांना एक पेटी सापडली. त्यात बावन्नकशी सोन्याची गणपतीची रत्नजडीत मूर्ती पाहून काही क्षण त्या निश्चल , स्तब्ध झाल्या. योगायोगानं , नव्हे दैवयोगानंच त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. हा काय चमत्कार आहे ?, हे त्यांना कळेना. आजही ही मूर्ती पाहिली की अनेकांना हाच प्रश्न पडतो. कुठल्या काळातली असेल ही मूर्ती , कुणी आणि का ती जमिनीखाली ठेवली असेल , याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जातात. त्या अनुषंगाने श्रीवर्धनच्या इतिहासावर संशोधकांनी एक दृष्टिक्षेप टाकला.
(ही माहितीसुद्धाअ म.टा.मधे दि.८ सप्टेंबर २००९ रोजी प्रसीध्द झाली होती. सविस्तर माहिती येथे वाचा.)
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3046384.cms
आता ही दूसरी बातमी वाचा.
विधानसभेत मंत्री-आमदारांत शिवीगाळ
लोकशाहीचा प्रमुख स्तंभ असलेल्या विधानसभेत मंगळवारी मंत्री आणि आमदारांमध्ये शिवीगाळ तसेच हमरीतुमरीवर येण्याचा प्रकार घडला. पेशंटांनी दृष्टी गमावल्याच्या मुद्द्यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावीत यांना सदस्यांनी धारेवर धरले. शिवसेनेच्या दोघा आमदारांनी शेलक्या शब्दांत त्यांना हिणवल्याने गावीत यांनी दोघा आमदारांना शिवी हासडली. त्यावर हे आमदार मंत्र्यांच्या अंगावर धावून गेले. इतर सदस्यांनी या आमदारांना आवरल्यानंतर मंत्र्यांनीही दिलगिरी व्यक्त केली. मात्र पेक्षक गॅलरीमध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना हा सर्व प्रकार पाहून धक्का बसला.
(सवीस्तर बातमी येथे वाचा.)
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12349754.cms
महाराष्ट्र हे भारतातील एक पुढारलेले आणि सुशिक्षीत राज्य आहे असे म्हणले जाते. विधानसभेत जर मंत्री आणि लोकप्रतिनीधी असे वर्तन करीत असतील तर आम जनतेत काय संदेश जाणार या प्रकाराचा??
आता ही तिसरी बातमी.
विधान परिषदेत राडा
सत्ताधारी आघाडीचे दोन आमदार निलंबित
गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावरील चर्चेला मंगळवारी विधान परिषदेत विपरीत
वळण लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राम पंडागळे व काँग्रेसचे जैनुद्दीन
झवेरी यांच्यात चकमक उडाली. यावेळी पंडागळे व झवेरी यांनी केलेले वक्तव्य
सभापतींनी कामकाजातून काढून टाकले. मात्र झवेरी यांना २२ मार्चपर्यंत तर
पंडागळे यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी संपेपर्यंत निलंबित
करण्याची घोषणा सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केली.
गिरणी
कामगारांच्या घराबाबत चर्चा सुरू होताच राम पंडागळे उभे राहिले व त्यांनी
या विषयावर आपण आक्रमक भूमिका घेतलेली असल्याने आपल्याला मत मांडण्याची
संधी द्यावी, अशी मागणी केली. ही मागणी उपसभापती वसंत डावखरे यांनी
फेटाळली. त्यानंतर चर्चा संपली तेव्हा पुन्हा पंडागळे उभे राहिले व त्यांनी
बोलण्याची संधी देण्याचा आग्रह धरला. पक्षप्रतोद हेमंत टकले यांनी
केलेल्या विनंतीवरून त्यांना संधी दिली गेली. त्यावर पंडागळे यांनी
काँग्रेसच्या एका दिवंगत महिला नेत्याचा उल्लेख करून केलेल्या टिप्पणीवरून
काँग्रेसचे जैनुद्दीन झवेरी भडकले व त्यांनी पंडागळे यांच्याबाबत असभ्य
शब्दांचा वापर केला. ही बाब विरोधकांनी लक्षात आणून देताच पंडागळे यांनी
'आता आपण अॅट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल केल्याखेरीज गप्प बसणार नाही' असा
इशारा दिला. यामुळे सभागृहाचे कामकाज तीनवेळा ठप्प झाले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12345520.cms
प्रतिक्रिया
24 Mar 2012 - 11:15 am | कौन्तेय
आजचा बिहार ज्या पद्धतीने कात टाकतोय ते पाहता बिहारसंबद्ध 'तशा' उपमा देणे आता थांबवलेले बरे. लवकरच ती पोकळी बिहारचे शेजारी नेताजीसुपुत्र अखिलेश भरून काढतील असे आसार आहेत.
आपल्यासारख्या ज्यांना राजकीय नीतिमत्तेच्या घसरणीबद्दल चीड आहे नि बदल घडण्याची आस आहे अशांनी बदल घडवण्यासाठी काहीतरी करणे अपरिहार्य आहे. सक्रीय राजकारणात उतरून लागलंच तर एक पिढी बरबाद करून काही चांगली कामं करू शकलो तरच काही चांगल्या बदलाची सुरुवात दिसण्याची शक्यता आहे. हा तुम्ही उचललेल्या प्रश्नाचा एक पैलू आहे.
24 Mar 2012 - 11:55 am | गवि
+ १
बिहारची उपमा दिवसेंदिवस चुकीची ठरतेय. पण उपमा हा
भाग सो डला तर धाग्यात घेतलेला मुद्दा सत्य आहे.
24 Mar 2012 - 8:49 pm | प्रदीप
आजचा बिहार ज्या पद्धतीने कात टाकतोय ते पाहता बिहारविषयी 'तशा' उपमा देणे आता थांबवलेले बरे. लवकरच ती पोकळी बिहारचे शेजारी नेताजीसुपुत्र अखिलेश भरून काढतील अशी चिन्हे दिसत आहेत.
आपल्यासारख्या ज्यांना राजकीय नीतिमत्तेच्या घसरणीबद्दल चीड आहे व [ज्यांना] बदल घडण्याची आंच आहे अशांनी बदल घडवण्यासाठी काहीतरी करणे अपरिहार्य आहे. सक्रीय राजकारणात उतरून लागलंच तर एक पिढी बरबाद करून काही चांगली कामं करू शकलो तरच काही चांगल्या बदलाची सुरुवात दिसण्याची शक्यता आहे. हा तुम्ही मांडलेल्या प्रश्नाचा एक पैलू आहे.
24 Mar 2012 - 11:28 am | परिकथेतील राजकुमार
मी आधी 'मिपाचा बिहार होतो आहे का ?' असे वाचले.
बाकी ग्रीन कार्ड साठी प्रयत्न करत असणार्या चिंतामणीकाकांनी हा धागा टाकावा ही एक गंमतच.
24 Mar 2012 - 1:37 pm | चेतनकुलकर्णी_85
ह्याला उंटावरून शेळ्या हाकणे असे म्हणतात .....
बाकी न्यूयॉर्क,कॅलिफोर्निया ,दुबई ,परीस यांचेही पुणे ,मुंबई होत आहे का असे तिकडचे लोक म्हणत आहेत असे कानावर आले आहे...
22 Apr 2012 - 8:28 pm | कुंदन
परवा दुबैला मेट्रो मधलई गर्दी बघता , दुबैचे मुंबई होतेय का असा प्रश्न पडला होता.
24 Mar 2012 - 3:51 pm | चिंतामणी
प-या तब्येत बरी आहे ना तुझी???? तुला स्वाईन फ्लू झालेला दिसत आहे.
24 Mar 2012 - 1:12 pm | गणपा
कौन्तेयच्या पहिल्या वाक्याशी सहमत.
बाकी देव देवळात मुर्तीतच असतो या वर आपला विश्वास नाही.
बाकी कुण्या संत महात्म्याने म्हटलेलंच आहे.
सोन्याचा देव केलाऽऽऽऽऽऽ सोनारानं घडवीला,
देव चोरानं चोरुन नेला रंऽऽऽऽऽऽ
देव बाजारचा भाजीपाला नाही रं.
24 Mar 2012 - 1:36 pm | अविनाशकुलकर्णी
पाडव्याच्या श्रीखंडात जायफळाची मात्रा जास्त झालेली दिसत आहे..
श्रीखंडाच्या अति सेवनाने आलेला ह्यांग ओव्हर ...
असो..चिंका लिहिले ते खरे आहे..कायदा व सुव्यवस्था ढासलली आहे हे नक्की..
आबा ऐकता आहात ना??
24 Mar 2012 - 4:00 pm | पैसा
दिवेआगरला तीन एक वर्षांपूर्वी हा गणपती पाहिला होता. तेव्हा त्याची "अदृश्य" सुरक्षा यंत्रणा पाहून जे होणार असं वाटलं होतं, ते इतक्या वर्षांनी झालं हेच एक मोठं आश्चर्य आहे.
विधानपरिषदेत शिवीगाळच झाली ना? पेपरवेट, पुतळे वगैरे फेकले तर ती बातमी झाली....
24 Mar 2012 - 7:51 pm | किचेन
हेच म्हणायचं होत.
24 Mar 2012 - 10:39 pm | नितिन थत्ते
>>विधानपरिषदेत शिवीगाळच झाली ना? पेपरवेट, पुतळे वगैरे फेकले तर ती बातमी झाली....
पेपरवेट फेकण्याची घटना महाराष्ट्रात फार पूर्वीच घडून गेली आहे.
जांबुवन्तराव धोटे यांनी सभापतींच्या दिशेने पेपरवेट फेकले होते. १९७० च्या दशकात.
24 Mar 2012 - 10:47 pm | पैसा
गोवा विधानसभेत पण १९७९ आमदारांनी साली पेपरवेट आणि गांधीजींचा पुतळा एकमेकांवर फेकून मारले होते. या खर्या बातम्या! शिवीगाळ काय कधी सांसदीय कधी असांसदीय भाषेत सगळीकडेच चालू असते.
24 Mar 2012 - 4:52 pm | खटपट्या
आपण एक पुरातत्व महत्व असलेली वस्तु गमावुन बसलो आहोत.
आमदारान्चे वर्तन शिक्षणाच्या कमतरतेमुळे असु शकते.
आपण नेहमी बिहार चे उदाहरण देतो पण आता बिहार ही सुधारतो आहे.
24 Mar 2012 - 8:02 pm | यकु
चिंतुकाका,
खाली दिलेल्या सर्व घटना गेल्या सहा महिन्याच्या आतबाहेर मध्य प्रदेशात घडलेल्या आहेत.
या तुलनेत महाराष्ट्र फार सुरक्षित वाटतो.
आयएएस अधिकार्याला जीवे मारणे, [http://ibnlive.in.com/news/cbi-to-probe-ips-officer-narendra-kumars-murd...
आरटीआय कार्यकर्तीची हत्या, [http://ibnlive.in.com/news/shehla-masood-case-one-more-arrested/240670-3...
पत्रकाराचे कुटुंब त्याच्यासहित जीवंत जाळून टाकणे [http://ibnlive.in.com/news/journalists-murder-in-mp-5-persons-arrested/2...,
मुलीचे अपहरण आणि सामुहिक बलात्कार [http://hindi.oneindia.in/news/2011/12/10/madhya-pradesh-teenager-kidnapp...
24 Mar 2012 - 8:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महाराष्ट्राचं जाऊ द्या. आपलं औरंगाबाद मला सुरक्षित वाटत नाही. पंधरा दिवसातल्या या घडामोडी [दुवा गुगलपानाचा] वाचल्या का ?
-दिलीप बिरुटे
24 Mar 2012 - 8:26 pm | यकु
सर, त्या इम्रान मेहंदीला धरुन हाना की म्हणाव...
तो एकच माणूस परेशान करतोय वाटतं फोलिसांना औरंगाबादमध्ये ;-)
24 Mar 2012 - 10:36 pm | अविनाशकुलकर्णी
१.१/५ किलो वजन होते
25 Mar 2012 - 12:26 am | निनाद मुक्काम प...
युती व आघाडी मधील पक्ष आपल्या सहकारी पक्षाच्या सोबत भांडत आहेत.
त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा बोऱ्या उडाल्याचे कुणालाच सोयरसुतक नाही आहे.
25 Mar 2012 - 12:43 am | चिरोटा
कुठे म्हंटले जाते? महाराष्ट्राबाहेर अमराठी माणसांकडून मी हे कधीही ऐकलेले नाही वा कुठे असे वाचलेले नाही.
उत्तर प्रदेश्,महाराष्ट्र,बिहार ह्या राज्यांच्या लोकसंख्या प्रचंड आहेत. त्यामुळे चोर्या मार्या वगैरे ईतर राज्यांत घडतात त्याप्रमाणात अधिक असतील तर आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे?बाकी कायदा सुव्यवस्था सुधारली पाहिजे ह्यावर दुमत नाही.
25 Mar 2012 - 10:11 am | बॅटमॅन
>>कुठे म्हंटले जाते? महाराष्ट्राबाहेर अमराठी माणसांकडून मी हे कधीही ऐकलेले नाही वा कुठे असे वाचलेले नाही.
असहमत.
वाचनात तर नेहमी महाराष्ट्र पुढारलेला असेच येते. अर्थात सध्याच्या परिस्थितीत राज्याचा बोर्या वाजला आहे हे नक्की, परंतु तरीही इतर वासरांपेक्षा, महाराष्ट्र म्हणजे लंगडीच नव्हे तर चांगली धडकी गाय आहे.
25 Mar 2012 - 1:40 am | रेवती
विचित्र लोक आहेत.
26 Mar 2012 - 2:39 pm | मानस्
हो नक्कीच होतोय!
काही वर्ष महाराष्ट्राच्या बाहेर (बेंगलोर सारख्या ठिकाणी) राहिल्यानंतर तर हे अगदी प्रकर्षाने जाणवते.
३-४ महिन्यापुर्वी तर पिंपरी मधे एका ठिकाणी भर रस्त्यात एका नगर्सेवक उमेदवाराच्या वाढदिवसाचा कार्यक्रम चालू होता,स्टेजवर नगर्सेवक उमेदवार आणि काही लोक बसले होते आणि समोर अर्ध्या कपडयात "एक मुन्नी " बदनाम होऊन महाराष्ट्राला बदनाम करत नाचत होती.कार्यकर्ते तत्परतेने रस्त्यातल्या वाहनांना दुसर्या रस्त्याने पाठवत होते आणि बाकीचे स्टेजसमोर बेहोश होऊन नाचत होते आणि या साठी पोलीस बंदोबस्त पण होता बरंका! मी तिथून एका परराज्यातील मित्रासोबत जात होतो,ते पाहून मित्र म्हणाला " यार ये सब यहां महाराष्ट्रा मे भी होता है क्या? मैनें तो सोचा था ये सिर्फ यूपी-बिहार मे होता है.महाराष्ट्र तो संतोकी भूमी है ना?"
जागोजागी गुटखा/पान मसाला थुंकून केलेल्या घाणीने पाय ठेवायलाही जागा शिल्लक नसते.जुने लाकडी मोडकळीस आलेले बस थांबे.घाणीने तुंबलेल्या मुतार्या,कचरा.फूटपाथवरची अतिक्रमणे.वाहतूकीच्या समस्या आणि लोकांचा ड्राईव्हींग सेन्स या बद्द्ल तर नं बोललेलचं बरं.शहरात जागोजागी रात्री बेरात्री ११-१२ वाजेपर्यंत वाजणारे डाल्बी आणि त्यासमोर नाचणारी गर्दी...लिस्ट खूप मोठी आहे...आणि दुर्दैवाने ती वाढतच चालली आहे.
19 Apr 2012 - 1:06 am | चिंतामणी
ती जागा महाराष्ट्र घेत आहे का?
आजची ताजी बातमी.
योगेश्वरी देवीच्या दागिन्यांची चोरी
आज अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीच्या मंदिरात चोरांनी डल्ला मारला. देवीच्या मूर्तीवरचे ३० तोळे सोन्याचे दागिने त्यांनी लांबवले असून त्याची किंमत सुमारे नऊ लाख रुपये इतकी आहे.
योगेश्वरी देवीच्या मंदिरात गाभा-याचा दरवाजा तोडून चोरट्यांनी देवीच्या मूर्तीवरील सर्व दागिने लंपास केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रोजच्याप्रमाणे देवीची पूजा करायला पुजारी मंदिरात आले, तेव्हा गाभा-यात सर्व अस्ताव्यस्त पसरल्याचं पाहून ते अवाक् झाले. देवीचे दागिने आणि पादुका जागेवर नसल्याचं पाहून त्यांनी तातडीनं पोलिसांना संपर्क साधला.
(सवीस्तर बातमी येथे वाचा.)
दिवेआगरच्या गणपतीच अजूनही शोध लागलेला नाही आणि आज ही बातमी.
अश्याच अनेक बातम्या आज येउन थडकल्या आहेत.
'मणप्पुरम'मधून १८ किलो सोनं लंपास
पुण्याच्या भवानी पेठेतील ‘ मणप्पुरम गोल्ड लोन ’ च्या शाखेत काल रात्री चोरी झाली असून, चोरट्यांनी १८ किलो सोनं आणि सहा लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. ऑफिस आणि तिजोरीची डुप्लिकेट चावी वापरून ही चोरी झाल्यानं, या ‘ सफाई ’ त ऑफिसमधल्या व्यक्तीचाच हात असल्याचा संशय व्यक्त होतोय.
(ही बातमी येथे आणि येथे सवीस्तर वाचा.)
नगरमध्ये घरावर दरोडा; युवकाचा खून, औरंगाबादमध्ये महिलेचा खून; मृतदेह जाळला या आणि इतर अनेक बातम्या आहेत.
22 Apr 2012 - 7:53 pm | चित्रगुप्त
मराठ्यांचा खरा इतिहास जर डोळसपणे, निष्पक्षपणे वाचला तर पूर्वीपेक्षा हल्लीचा काळ बराच सुरक्षित आहे, असेच म्हणावे लागेल.
... पेशवे, होळकर, शिंदे इत्यादिकांनी पूर्वी जे उत्तर हिंदुस्तानात वा अन्यत्र केले, त्यापुढे हे काहीच नाही...
हल्ली मिडीया मुळे अश्या बातम्यांचा रतीब अहोरात्र मिळत असल्याने जिकडे तिकडे सदोदित गुन्हेच घडत आहेत, अशी धारणा होउ लागते...
...याउलट स्वामी, राऊ वगैरे सारख्या कादंबर्या वा तथाकथित ऐतिहासिक मालिका वगैरें मुळे इतिहासाविषयी एक भ्रामक, विपर्यस्त व गोड कल्पना निर्माण होत असते, त्या तुलनेत वर्तमान काळ फार भयंकर वाटू लागतो...