गाभा:
http://timesofindia.indiatimes.com/city/kolkata/TMC-MPs-guard-urinates-o...
नुकतेच वाचण्यात आले की तॄणमूल काँन्ग्रेसच्या एका खासदारीण बाईंच्या अंगरक्षकाने राजधानी एक्सप्रेसच्या प्रवासात एका प्रवाशाच्या अंगावर लघुशंका केली आणि ह्याची वाच्यता करु नये म्हणून त्या प्रवाशाला धमकावलेही.
ह्या बाईंचे नाव काकोली घोष दस्तिदार . नंतर पत्रकारांशी बोलताना ही एक मामुली गोष्ट आहे. तक्रार करणारा विरोधी पक्षाचा आहे त्यामुळे तो तसे सांगतो आहे वगैरे नेहमीचीच मखलाशी केली.
अगदी विरोधकही अशी खोटी तक्रार करेल असे वाटत नाही. कुठेतरी "पाणी" मुरत आहे हे नक्की.
आता आपल्या राजे, राण्यांबरोबर त्यांचे शिपाईही मुजोर होऊ लागले आहेत असे दिसते.
भारतीय लोकशाही चिरायु होवो ! असेच पाणीदार अंगरक्षक उत्तरोत्तर आपले कर्तृत्व दाखवत राहोत !
प्रतिक्रिया
20 Mar 2012 - 11:21 pm | रामपुरी
बातमी आणि धागा दोन्ही मनोरंजक. :)
बाकी तो अंगरक्षक हा सगळा कार्यभाग उरकेपर्यंत सदर प्रवासी काय बघत बसला होता? पळून का गेला नाही? की त्याला बाकिच्या प्रवाश्यांनी धरून ठेवला होता? नक्की प्रसंग कसा घडला असेल? :) :) :)
त्या प्रवाश्याने मारहाण झाल्याची तक्रार दिलेली दिसत नाही त्यामुळे त्याला .ग्या मार देऊन बेशुद्ध पाडला होता असंही म्हणता येत नाही.
21 Mar 2012 - 2:25 am | यकु
आवरा!!!!
फार पाणी पाणी झालंय सगळीकडं!! ;-)