गाभा:
देशातील अब्जावधी गरीबांच्या सेवेचे कंकण हाती बांधून देशाकरता सर्वस्व त्याग केलेल्या आपल्या परमलाडक्या महाराज्ञी सोनियांची संपत्ती फक्त पंचेचाळीस हजार कोटी रुपये इतकी असल्याचे वृत्त एका अमेरिकन संकेतस्थळावर आले आहे. जगातील अतीश्रीमंत लोकांत महाराज्ञी चौथ्या क्रमांकावर आहेत हे नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.
ह्या क्रमवारीत लवकरच त्यांचा क्रमांक आणखी वरती सरको अशी आकाशातल्या बापाकडे प्रार्थना.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12258052.cms
प्रतिक्रिया
15 Mar 2012 - 2:34 am | अर्धवटराव
किती सत्यता असेल त्यात किंवा त्या अमेरिकन संस्थळात ??
अर्धवटराव
15 Mar 2012 - 3:04 am | रामपुरी
जगातील अतीश्रीमंत लोकांत नव्हे जगातील अतीश्रीमंत राजकारण्यांत...
( काळा पैसा बाहेर आला तर कदाचित तेच वाक्य बरोबर सुद्धा ठरू शकेल.. :) )
15 Mar 2012 - 3:08 am | यकु
अहो हुप्प्या सम्राट
चालायचंच. त्यांच्या सासूबाई पंतप्रधान होत्या, पतिराज पंतप्रधान होते, आजचा पंतप्रधान त्यांनीच ठरवला आहे. उलट सोनिया आजींनी त्या संस्थळावर दावा दाखल केला पाहिजे एवढी कमी संपत्ती दाखवून घराण्याच्या अब्रुचे नुकसान केल्याचा.
एका देशाच्या पंतप्रधानांच्या घराण्यात एवढी कमी संपत्ती पाहून एक लुंगासुंगा, मराठी संकेतस्थळावर टैम्पास प्रतिसाद देणारा भारतीय म्हणून शरम वाटली.
आकाशातील बाप करो, आणि ही बातमी खोटी ठरो आणि खरा आकडा समोर येवो.
15 Mar 2012 - 3:24 am | रेवती
आजेसासर्यांना विसरलात ना?;)
15 Mar 2012 - 3:44 am | यकु
अरे होऽऽ!
ते राहिले नाही का.
पहा बरं, ज्या घराण्यात पंतप्रधान किती झाले तेही जनतेच्या लक्षात राहू शकत नाही एवढं ते घराणं जुनं आहे, त्यांच्या संपत्तीचं माप काय कपाळ करता येणार आहे.
संपलं मग इथंच. तिघांनी मिळून किमान दहा दहा हजार कोटींची बचत केलेली असेलच, बाकीचं व्याज धरा झाले ना पंचेचाळीस हजार कोटी. मनमोहन प्राजीनं घराण्यातले नाहीत म्हणून सोनिया आजीच्या घरात काही दिलं नसेल.
15 Mar 2012 - 7:48 am | हुप्प्या
१. मोतीलालजी
२. नेहरुजी
३. इंदिराजी
४. राजीवजी
५. महाराणी
६. राहुलजी
७. प्रियांकाजी
८. रॉबर्टजी
९. रिहानजी
१०. मिरायाजी
शेवटचे दोघे केवळ वयाने लहान (कर्तृत्वाने नाही) म्हणून अर्धे धरु
एकूण ९ * त्याग = ४५ हजार कोटी
म्हणजे भारताला प्रत्येक त्याग पाच हजार कोटी रुपयात मिळाला म्हणायचा!
खूप महाग नाही, नाही का?
15 Mar 2012 - 7:54 am | यकु
त्यागाची किंमत ठरवताय?
असं करु नका, महान भारतीय संस्कृती रसातळाला गेली नाही अजून.
उलट आपापली हाडं काढून द्यायची तयारी ठेवा ;-)
आमचे गांधी पणजोबा, इंदिराआज्जी आणि राजीवकाकांनी दिलीत, ते विसरलात - कृतघ्न कुठचे ;-)
15 Mar 2012 - 8:19 am | स्पा
तरी मी विचार करत होतो यावर अजून काकू त धागा कसा नै अला
धन्यवाद हुप्प्या जी... तुमच्या या तीनोळी धाग्याबद्दल.. आणि महाराष्ट्र टाईम्स च्या दुर्मिळ लिंक बद्दल
15 Mar 2012 - 11:55 pm | हुप्प्या
आपल्या दोनोळी प्रतिसादाबद्दल आणि वैचारिक पिंक टाकल्याबद्दलही!
15 Mar 2012 - 8:48 am | तर्री
गांधी कुटुंब "चेयर्मन / चेअर-परसन" असलेल्या त्यांच्या इंडिया आय.एन.सी. चा ताळेबंद आज त्यांचे सी.एफ.ओ. सादर करतील व सी.ई. ओ. संसदेच्या आढ्याकडे पहात बसतील.
आपण किडया-मुंगी परमाणे २/३ दिवस वळवळून परत निपचीत पडून राहू या. कसे?
15 Mar 2012 - 1:38 pm | संपत
आमचा मराठी गडी होऊ दे पंतप्रधान.. डायरेक पैला लंबर काढेल..
15 Mar 2012 - 8:52 pm | नावातकायआहे
आयला पयल्याच्या पुड मोजायला काय हाय का? तिकड हाय तो!
15 Mar 2012 - 2:27 pm | चिरोटा
म.टा.चे पत्रकार नेहमीच कळत नकळ्त ईनोद करून जातात.
काँग्रेस त्या साईटीवर कारवाई कशी करणार?आणि ती पण कायदेशीर? असो .मूळ बातमी येथे सापडली-
http://www.businessinsider.com/richest-politicians-in-the-world-2012-2?op=1
त्यांना बातमी कुठून मिळाली- जर्मनीच्या Die Welt ह्या वॄत्तपत्राच्या वर्ल्ड लक्सरी गाईड ह्या विभागातून.
16 Mar 2012 - 11:52 am | गोंधळी
लोकशाही च्या आयचा घो
आण्णां ना १०० कोटी हत्तींचे बळ मिळो.
17 Mar 2012 - 10:59 am | मुग्धा शिन्दे
पुढची पिढी तयार होत आहे.. नवे गुण उधळण्यासाठी.. राहुलबाबा आणि प्रियांका बेबी..