आमच्या त्सेंटा आजीची लहान बहिण फॅनीआजी हिची आवडती रेसिपी -
साहित्य- २५० ग्राम मैदा, १७५ ग्राम बटर, अर्धा कप साखर, १ चमचा बेकिंग पावडर,१ चिमूट मीठ
५०० ग्राम अॅप्रिकॉट्स, एक चहाचा चमचाभर दालचिनी पावडर
कृती- मैदा,बटर ,साखर, बेकिंगपावडर व मीठ सर्व एकत्र करणे व चांगले मळणे.हा गोळा प्लास्टीकमध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये १५-२० मिनिटे ठेवणे.
टिन्ड अॅप्रिकॉट्स असतील तर चाळणीवर घालून पाक निथळू देणे. अर्धे तुकडे करुन त्यात दालचिनी पावडर मिक्स करणे.
जर फ्रेश अॅप्रिकॉट्स असतील तर बिया काढून अर्धे करणे, ३-४ चमचे साखर व चमचाभर दालचिनी पावडर घालून मिक्स करणे.
मिश्रणाचा गोळा फ्रिजमधून बाहेर काढणे व केक मोल्डवर पसरणे, फक्त मोल्डच्या तळाशी न पसरता कडांपर्यंत वर नेणे.
आता मोल्डच्या आत मैद्याच्या मिश्रणाचा एक मोल्ड तयार होईल.
यावर अॅप्रिकॉट्स पसरणे.
प्रिहिटेड अवन मध्ये १८० अंश से वर साधारण २५ ते ३० मिनिटे बेक करणे.
पिठीसाखरेने सुशोभित करणे , व्हिप्ड क्रिमबरोबर सर्व्ह करणे.
प्रतिक्रिया
14 Mar 2012 - 2:37 pm | इरसाल
आता पुन्हा मोहात नको त्या केकच्या....आधीच कंबरेवर टायर वाढतोय.
का छळताय स्वातीतै ???????
14 Mar 2012 - 2:54 pm | मुक्त विहारि
अॅप्रिकॉट्स म्हण्जे मराठीत "जर्दाळु" का?
14 Mar 2012 - 2:59 pm | परिकथेतील राजकुमार
चटावरचे श्राद्ध* उरकल्यात लेखन उरकुन टाकले आहे.
*श्रेयाव्हेर :- कणेकर गुर्जी.
14 Mar 2012 - 3:38 pm | गणपा
अरेरे काय दिवस आलाय. चक्क सन्माननिय परिकथेतील राजमुमारजींशी सहमत व्हाव लागतय.
14 Mar 2012 - 6:21 pm | पक पक पक
चटावरचे श्राद्ध* उरकल्यात :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
तो केक आहे पिंड नव्हे... ;)
14 Mar 2012 - 6:24 pm | बिपिन कार्यकर्ते
सहकुटुंब लाळ गाळण्यात आली आहे. :(
15 Mar 2012 - 1:54 am | हरकाम्या
लाळ गाळण्याचा एखादा " फोटु " टाकला असता तर त्याची गणना "रेसिपी " म्हणुन झाली असती.
14 Mar 2012 - 7:22 pm | पैसा
केकची पाकृ एवढीच असते नाही!
14 Mar 2012 - 8:35 pm | प्राजु
अॅप्रिकॉट पाय!!!
मला जाम आवडतो.
14 Mar 2012 - 8:57 pm | तर्री
पा.कृ.छानच.पूर्ण फोटो चालला असता हो.
त्यामुळेच बरा आहे असे म्हणावेसे वाटते.
14 Mar 2012 - 10:22 pm | रेवती
फोटू नेहमीप्रमाणेच छान.
प्रश्न आहेत. पीठ मळताना दूध, पाणी कशाचीही गरज लागत नाही का?
यात अंडीही दिसत नाहीत. मग पीठ ओले कशाने होते?
14 Mar 2012 - 10:29 pm | कवितानागेश
मळलेले ( =तिंबलेले! :) ) पीठ किती घट्ट असले पाहिजे?
स्वगतः जणू काही लगेच मी करायला घेतेय! :)
14 Mar 2012 - 11:22 pm | पिंगू
अगं कर ना मग. आणि मला विकांताला खायला बोलवायला विसरु नकोस.. :)
- पिंगू
14 Mar 2012 - 11:20 pm | जाई.
मस्त पाकृ
14 Mar 2012 - 11:23 pm | पिंगू
केक मस्त झाला आहे. पण पाककृती घाईघाईत उरकून टाकली गेली आहे.
- पिंगू
15 Mar 2012 - 9:47 am | सूड
केक आवडला. आता रेशिपी येवढीच असेल तर उगा पाणी घालून वाढवण्यात काय अर्थ आहे.
15 Mar 2012 - 12:07 pm | स्वाती दिनेश
केकची पाकृ एवढीच असते नाही!
आता रेशिपी येवढीच असेल तर उगा पाणी घालून वाढवण्यात काय अर्थ आहे.
करेक्ट! रेसिपी एवढीच आहे, हा केक करायला एकदम सोपा आणि खायला एकदम टेस्टी!
परा,गणपा वाचताय ना?
मुक्तविहारी, अॅप्रिकॉट्स- ओले जर्दाळू
माउ, मळलेले पीठ कणकेसारखे व्हायला हवे, नंतर ते फ्रिजमध्ये ठेवले की जरा कडक होईल , जेव्हा आपण केकपॅन मध्ये ते पसरतो तेव्हा थोडा जोर लावावा लागतो.
तर्री, एक पंचमांश केक उरल्यावर (का होईना)फोटोची आठवण झाली हेही नसे थोडके,;)
रेवती, पाणी/दूध काहीही लागत नाही, कारण बटर आहे ना एवढे! अंडे न घालता हा केक करता येतो ही अजून एक खासियत.
(अंडे नसल्याने ह्या वर्षी बाप्पाच्या प्रसादाला मी अॅप्रिकॉट केक केला होता, दर्शनाला आलेली मंडळी खूष होती त्यामुळे.. :) )
सर्वांना धन्यवाद,
स्वाती
15 Mar 2012 - 1:17 pm | गणपा
हॅ हॅ हॅ.
केकृबद्दल काही म्हणण नै ग.
पण तो नेहमी दिसणारे पक्षि जळवणारे फोटु कमी पडलेत या वेळी. :)
(केसुगुर्जी ही दिसले नाहीत. सध्या डाएटींगवर आहेत काय? ;) )
15 Mar 2012 - 1:26 pm | स्वाती दिनेश
अरे, आधीच इनोचा तुटवडा आहे, त्यात लोकं इनोची सलाइनं लावायला लागलीत, म्हणून १/५ केकचाच फटू टाकला,;)
आणि केसु येथे नव्हते ह्या केकच्या वेळी ,
स्वाती
15 Mar 2012 - 4:41 pm | सानिकास्वप्निल
जबरा पाकृ :)
सहज, सोप्पी अशी पा़कृ आवडली एकदम :)
28 Mar 2012 - 8:19 am | मदनबाण
वाह्ह !
ताईचा हातच्या केकची चव चाखण्यासाठी जर्मनीलाच जावे लागेल काय ? असा इचार करतोय !
ठाण्याला आल्यावर केकचा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रण मिळेल काय ? ;)