✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

<<ज्योतिष>> आजं म टा (पुणे) मध्ये प्रसिद्ध झाले ला माझा लेख

य
युयुत्सु यांनी
Tue, 03/13/2012 - 16:42  ·  लेख
लेख
From 2012_03_13" alt="" /> टीप - ही जाहिरात नव्हे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
31475 वाचन

💬 प्रतिसाद (125)

प्रतिक्रिया

अरे ?

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/13/2012 - 16:59 नवीन
सपूर्ण लेख कसा काय दिला ? मला वाटले अर्ध्या भागाचा फटु असेल आणि उरलेले वाचण्यासाठी मटाची लिंक असेल. असो...
  • Log in or register to post comments

जालावर लेख नाही

प्रकाश घाटपांडे
Tue, 03/13/2012 - 18:07 नवीन
हा लेख जालावरील आवृत्तीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पेपरवाले काय द्याल ते छापतात

टवाळ कार्टा
Tue, 03/13/2012 - 17:16 नवीन
पेपरवाले काय द्याल ते छापतात :) आणि मटा तर.... ;) असो....
  • Log in or register to post comments

मग म. टा ने तपासली का ?

तर्री
Tue, 03/13/2012 - 17:52 नवीन
मग म. टा ने ज्योतिषाची ऊपयुक्त्तता पासली का ? ही ऊपयुक्तता कशी तपासतात ? नाडी परीक्षा की पट्टी परीक्षा ?
  • Log in or register to post comments

ज्यांना अनुभव आहे व ज्याना गरज आहे

चौकटराजा
Tue, 03/13/2012 - 18:16 नवीन
सर्वसामान्यपणे मानवी मन आपल्याला आवडणारा अनुभव दीर्घ़काळ जपून ठेवते. भविष्य खरे ठरून विपरित घडले तरी भविष्यावरचा विश्वास वाढीस च लागतो. मग सुखपर्यावसायी भविष्याची बातच सोडा. असा अनुभव आला की आहारी जाणे आलेच. मग ती गरज होते मग परत आहारी जाणे आलेच. पिणारे, जुगारी व भविष्याची नादी लागलेले याना कोणताही अनुभव येवो "उधर जानेका" बहाणा ते सहज उत्पन्न्न करतात.
  • Log in or register to post comments

१०० टक्के सहमत. पेपरातले

सस्नेह
गुरुवार, 03/15/2012 - 10:55 नवीन
१०० टक्के सहमत. पेपरातले भविष्य वाचताना माझे धोरण असे असते.वाईट असेल तर भविष्य हा खोटेपणा. चांगलं असेल तर ५ मि. एक सुखांत सिनेमा पहावा आणि विसरुन जावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

अभिनंदन -

अमोल केळकर
Tue, 03/13/2012 - 18:32 नवीन
तिकडे अभिनंदन केलेच आहे, इथेही करतो. :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments

युयुत्सु'जी.... आपण आहात तर

मृगनयनी
Tue, 03/13/2012 - 19:45 नवीन
युयुत्सु'जी.... आपण आहात तर "हे" राजीव उपाध्ये!!!..... :) आपल्या या लेखामुळे आज सकाळी सकाळी आपण आमचे आणि आमच्या कुटुम्बीयांचे कौतुक शिरोमणि बनलेले आहात!... :) "वैफल्यग्रस्त लोक धैर्य कुठून मिळवणार? अंधश्रद्धा निर्मूलनसमितीच्या ठेल्यावरून की नारळीकरांच्या 'आयुका'मधून ? " ह्या वाक्यासाठी एकदा जोरदार टाळ्या... अत्यंत सणसणीत लेख!!!! :) प्रचंड आवडला....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर

वैफल्य-ग्रस्त लो़क .

तर्री
Tue, 03/13/2012 - 19:55 नवीन
आयुका ही वैफल्य ग्रस्तांना धैर्य देण्यासाठी आहे असे काही नाही. तसेच अनिस बाबतही म्हणता येते. वैफल्य-ग्रस्तांनी आपल्या वैफल्याची कारणे शोधावी . कारणा नुसार ऊपाय योजना होते. मनोविज्ञान शास्त्र आता खूप प्रगत झाले आहे. ज्योतिषामुळे वैफल्य जाणार की अधिक वैफल्य पदरी पडणार ? हा ही एक प्रश्न आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

आयुका काय किन्वा अनिंस काय...

मृगनयनी
Tue, 03/13/2012 - 21:04 नवीन
आयुका काय किन्वा अनिंस काय... कुणालाही धैर्य वगैरे देऊ शकत नाही... ज्योतिष मात्र कमीत कमी "आता सध्या जरी तुम्हाला त्रास असला तरी...पुढचा येणारा काळ मात्र फार चान्गला आहे.." अश्या किन्वा तत्सम गोष्टी / फ्यूचर सांगून एखाद्या वैफल्यग्रस्त माणसाला धीर देऊ शकतात... "बुडत्याला काडीचा आधार" या म्हणीनुसार ज्योतिषशास्त्र किमान एखाद्याची काडीइतकी तरी मदत करू शकते... पण उठसूठ ज्योतिषाला नावे ठेवणार्‍या आयुका किन्वा अंनिस यांच्यामुळे लोकांचं असं काय मोठे कल्याण झाले? कुठल्याही शास्त्रज्ञाच्या दिव्य शोधामुळे किन्वा प्रकाशझोतात लोकांसमोर अन्धश्रद्धानिर्मूलनाचे गोडवे गाणार्‍या आणि प्रत्यक्ष आयुष्यात मात्र धार्मिक कारणे देऊन नवग्रहांच्या अंगठ्या घालणार्‍या अनिस'च्या कार्यकर्त्यांमुळे कोणत्याही वैफल्यग्रस्त माणसाचे आयुष्य सुधारलेले नाही... किन्वा ज्यांना आपले आयुष्य सुधरवायचे आहे अश्या कोणत्याही लोकांनी अनिस किन्वा नारळीकरांचे सल्ले घेतल्या गेल्याचे ऐकीवात नाही. :) ज्योतिष हे शास्त्र असो.. किन्वा नसो.. पण त्याच्या अर्धवट ज्ञानामुळे कुणी आत्माहत्या करत असेल.. तर तो त्याचा मूर्खपणा आहे... पण हे मात्र सत्य की ज्योतिषामुळे अनेक जणांचे आयुष्य आणि संसार वाचलेले आहेत.. कदाचित यापुढेही वाचू शकतील... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

<"बुडत्याला काडीचा आधार" या

तर्री
Tue, 03/13/2012 - 22:29 नवीन
<"बुडत्याला काडीचा आधार" या म्हणीनुसार ज्योतिषशास्त्र किमान एखाद्याची काडीइतकी तरी मदत करू शकत> हे करण्याचे काम कोणीही सहृद करू शकेल. ज्योतिशीच कशाला पाहिजे. विफलता टाळण्याचे ऊपाय " मानसशास्रात" आहेत. तसे ते "ज्योतिषामध्ये नाहित. अर्थात, मनाच्या आजारांसाठी , मानसोपचाराचा आधार घ्यायचा की ज्योतिषाचा ? हे ज्याचे त्यांनी ठरवायचे. जट आली की शांपू वापरायचा की जोगतीण व्हायचे हा जसा वैयक्तिक प्रश्ण आहे तसाच तो आहे. एवढेच.शेवटचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

तर्री'जी... आजही समाजात

मृगनयनी
Wed, 03/14/2012 - 13:00 नवीन
तर्री'जी... आजही समाजात बहुतांश लोक असे आहेत, की जे कितीही वैफल्यग्रस्त असले तरीही त्यांना स्वतःला मनोरुग्ण म्हणवून घ्यायला आवडत नाही. किम्बहुना ते तसे मानतच नाही. किन्वा बर्‍याचदा असे होते.... की सायकॉलोजिस्टपेक्षा ज्योतिषाला द्यायची दक्षिणा जनसामान्यांना परवडणारी असते. ज्योतिषातही बरेच प्रकार असतात.. जसे कुडमुडे ज्योतिषी, ६५-७० % भविष्य खरे ठरणारे ज्योतिषी (पक्षी: शिकाऊ ज्योतिषी ), नाडीज्योतिषी, सिद्धीप्राप्त ज्योतिषी....... काही ज्योतिषांना म्हणे वाचासिद्धी असते.. उदाह्रणार्थ :- "आदिनाथ साळवी"... साळवी'जींकडे गेलेल्या एखाद्या मनुष्याला त्यांनी त्याच्या दोषपरिहारार्थ एखादा उपाय सांगितला.. तर त्या मनुष्याने तो "केलाच्च्च्च" पाहिजे... नाहीतर त्या मनुष्याच्या आयुष्यात घडणार्‍या वाईट घटनेची शक्यत जवळजवळ ६० % नी वाढते. अर्थात असे खरोखरच अनुभव साळवी'जींकडे जाऊन आलेल्या लोकांना आलेले आहेत. काही लोकांच्या आयुष्यात आदिनाथ साळवींनी पत्रिकेनुसार कथन केलेल्या --घडू शकणार्‍या चांगल्या घटनादेखील तंतोतंत घडत आहेत. आणि हे सगळं ओपनली घडत आहे.. किन्वा यापूर्वीही घडून गेलेलं आहे. त्यामुळे लोकांना आदिनाथ'जींच्या सल्ल्यानुसार आलेल्या अनुभवांमुळे साहजिकच त्यांचा ज्योतिषावर असलेला विश्वास वाढलेला आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकान्त देसाई यांना बालगंधर्व'च्या वेळेस "आदिनाथ साळवीं"चा आणि त्यांनी सांगितलेल्या उपायांचा प्रचंड फायदा झालेला आहे. आदिनाथ साळवींनी स्वतःच्या पत्नीच्या बाबतीत सांगितलेले भविष्य देखील खरे ठरले... इतकेच कशाला त्यांच्या मुलीच्या जन्माच्या आधीच आदिनाथ'जींनी स्वतःची मुलगी कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला किती वाजून किती मिनिटांनी जन्माला येणार... हे देखील लिहून ठेवले होते.. व सर्व नातेवाईकांना सान्गितलेले होते... दरवर्षी आदिनाथ साळवी विश्वकल्याणाच्या उदात्त हेतूने पवित्र वैदिक ब्राह्मणांच्या कडून "नवचंडी होम" करवून घेतात. अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने आदिनाथ'जी स्वतः सपत्नीक पूजा करतात. यज्ञ, होमहवन, मन्त्रोच्चाराच्या योगेकरून देवीची, आदिशक्तीची भक्तिभावाने पूजा केली जाते. व यज्ञ आणि पूजा पूर्ण झाल्यानन्तर दोन तासाच्या आत हलकाचा पाऊस पडतो. आदिनाथ'जींच्याच म्हणण्यानुसार अर्थात हा "पाऊस" म्हणजे नवचंडीहोम त्या त्या देवतांपर्यन्त पोचल्याची व सफल झाल्याची खूण असते. आणि दरवर्षी या पवित्र नवचन्डीहोमानन्तर असा पाऊस पडतो. आणि तरीही ज्योतिषावर तथाकथित अन्धश्रद्धानिर्मूलन वाल्यांचा विश्वास नसेल.. तर मग हे अनिस वाले व्यक्तिशः "आदिनाथ साळवीं"ना का बरे चॅलेन्ज करत नाहीत? ;) .... की त्यांना कशाची भीती वाटते? की त्यांच्या तथाकथित तत्वांचा पायाच कच्चा आहे? ज्यांचा देव, ज्योतिष वगैरे गोष्टींवर विश्वास नाही.. त्यांनी भले ठेवू नये. पण ज्योतिषामुळे लोक वैफल्यग्रस्त होतात.. अशी विधाने तरी करू नये. किन्वा मग अशी विधाने करताना आधी आजपर्यन्त आपण लोकांचे काय कल्याण केले आहे.. किन्वा समाजाच्या उत्कर्षासाठी मिडीयापासून लाम्ब राहून आणि प्रसिद्धीचा हव्यास न धरता ...स्वतःच्या पोटाला चिमटा आणि खिशाला कात्री लावून काय काय कार्य केले आहे... याचा विचार करावा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

तडफदार प्रतिक्रिया वाचून

शशिकांत ओक
Sun, 03/18/2012 - 12:38 नवीन
मृगनयनीजी, आपण दिलेल्या तडफदार प्रतिक्रिया वाचून खालील एक मुलाखत जोडावी असे वाटून देत आहे. ...... विविध नाडीग्रंथ केंद्रवाचकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या बद्दलची सामान्य माहिती गोळा करण्याचे काम कार्यशाळा 2011 मधे केले गेले. त्यातील एक मुलाखत भाग ३... उजव्या कोपऱ्यात पहावी. पी बाबुस्वामीचे नाशिकला द्वारका भागात नाडी केंद्र गेले 7-8 वर्षे सुरू आहे. आपल्या कुटुंबासह ते नाशिकात राहतात. अनेक लोकांनी त्यांच्या नाडीकथनातून लाभ घेतला आहे. नाडी वाचक महर्षींच्या कथनातून लोकांच्या समस्या सोडवायला मानसिक आधार देण्याचे काम आनंदाने करतात. श्री श्री रविशंकरांनी आपले स्वतःचे कथन त्यांच्याकडून ऐकले आहे. त्यांच्यासारख्या जगप्रसिद्ध व्यक्तीपासून ते सामान्य लोकांना त्यांच्या कथनाने समस्यापुर्तीचे समाधान लाभले आहे. मी नुसता नाडीग्रंथ वाचक आहे असे न मानता, ज्याअपेक्षेने लोक नाडी महर्षींकडे पहातात त्यामुळे आम्हाला या व्यवसायाचा बाजार करणे मान्य नाही. इतर काय करतात यापेक्षा मी या व्यवसायातील साधन शुचितेचे भान राखतो का याचा सतत विचार करून, ग्राहकाला परतताना आपल्याला समस्येवर काही नविन विचारदिशा मिळाल्याचे समाधान नक्की करून देतो असे त्यांचे म्हणणे आहे. पैकी काही विचार त्यांच्या पुढील भागाच्या टेप मधे आहेत. या टेप मधे त्यांचे बालपण व ते नाडी वाचक कसे झालेचे ही कथन आहे. सत्यनिष्ठ हरिष्चंद्राला ही जीवनात इतक्या यातना का सहन कराव्या लागल्या आदि कथांतून सध्याचे जीवन कितीही निर्मळ असले तरी पुर्वजन्म कृत्ये आपल्याला त्रास देतात. नाडी ग्रंथ तयार करायला या मुळे प्रेरणा मिळाली असावी असे, याचे कथन आहे. पत्नी व बहिण अधुन मधून बोलताना आढळतात. नाडीपट्टीतील मजकूर एका वहीत श्लोकात कसा नोंदला जातो त्याला उद्धेशून ते एके ठिकाणी त्या श्लोकाच्या चार ओळींवर भाष्य करताना अंतादी असे त्या काव्यप्रकाराचे वर्णन करतात. तुटक हिंदीतून जरा लांबलेले असले तरी त्यांचे कथन रसाळ व भावनिक आहे, असे त्यांच्या कथनातून जाणवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

विठठल कामत काय म्हणतात

चौकटराजा
Wed, 03/14/2012 - 16:59 नवीन
"बुडत्याला काडीचा आधार" या म्हणीनुसार ज्योतिषशास्त्र किमान एखाद्याची काडीइतकी तरी मदत करू शकत> हे करण्याचे काम कोणीही सहृद करू शकेल. ज्योतिशीच कशाला पाहिजे. विफलता टाळण्याचे ऊपाय " मानसशास्रात" आहेत. तसे ते "ज्योतिषामध्ये नाहित. आत्महत्या करायला गेलेल्या कामताना विसाव्या मजल्याच्या सेंटरिंग वर उभे राहून काम करणार्‍या रंगार्‍याने परावृत्त केले. तो काय आदिनाथ साळवी होता की अजंता जैन ? खरे तर त्याने काहीच केले नाही. बरा होतो माणूस. वैद्य फक्त औषध देण्याचा धनी. याचे श्रेय कामतानाच. त्यांच्या तील विवेकाच्या एका कोपर्‍याला ! म्हणून म्हणतो मंडळी आत्मारामा सारखा गुरू नाही ... बोला पुंडलिक वरदा .........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

आपलाच आधार आपल्याला

चौकटराजा
Wed, 03/14/2012 - 09:35 नवीन
अनिस काय , नारळीकर काय नि अजंता जैन काय हे काय जगन्नियंते लागून गेलेत काय? मी पक्का अनिस वाला आहे. माझ्या आयुष्यात अनेक वाईट माणसानी उच्छाद मांडला , मनस्ताप दिला. पण मी फक्त स्वता: च्या सद्विवेकाला शरण गेलो. ना गुरू ना अनुग्रह ना संप्रदाय , ना शनिवारी माळ , ना उपास तापास , ना प्रार्थना .म्हणून आपणच आपल्याला गुरू म्हणून लाभणे हे अलौकिक भाग्य मला प्राप्त झाले. ब्राह्मणाला जानवे जानवे असले तरी ईसाईच्या नजरेत तो एक फक्त दोरा असतो. म्हणून आत्मारामासारखा गुरू नाही रे जगात , वरून देइ कानशिलात आतून आधाराचा हात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

आपलाच आधार आपल्याला

चौकटराजा
Wed, 03/14/2012 - 09:38 नवीन
अनिस काय , नारळीकर काय नि अजंता जैन काय हे काय जगन्नियंते लागून गेलेत काय? मी पक्का अनिस वाला आहे. माझ्या आयुष्यात अनेक वाईट माणसानी उच्छाद मांडला , मनस्ताप दिला. पण मी फक्त स्वता: च्या सद्विवेकाला शरण गेलो. ना गुरू ना अनुग्रह ना संप्रदाय , ना शनिवारी माळ , ना उपास तापास , ना प्रार्थना .म्हणून आपणच आपल्याला गुरू म्हणून लाभणे हे अलौकिक भाग्य मला प्राप्त झाले. ब्राह्मणाला जानवे जानवे असले तरी ईसाईच्या नजरेत तो एक फक्त दोरा असतो. म्हणून आत्मारामासारखा गुरू नाही रे जगात , वरून देइ कानशिलात आतून आधाराचा हात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

सहमत

रणजित चितळे
Wed, 03/14/2012 - 13:21 नवीन
+१ पण हे मात्र सत्य की ज्योतिषामुळे अनेक जणांचे आयुष्य आणि संसार वाचलेले आहेत.. कदाचित यापुढेही वाचू शकतील... सहमत आहे. कोणी जर डिप्रेशन मध्ये लोकांना आशेचा किरण देऊन जरा मनाला आधार देतात. मला वाटते ज्योतिषशास्त्र हे मनोस्वास्थ्य सांभाळणारे एक मॅनेजमेन्ट टेकनिक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

+२

मूकवाचक
Wed, 03/14/2012 - 13:55 नवीन
पण हे मात्र सत्य की ज्योतिषामुळे अनेक जणांचे आयुष्य आणि संसार वाचलेले आहेत.. कदाचित यापुढेही वाचू शकतील... सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

-१ दुबळ्या मनाच्या लोकांना

शैलेन्द्र
Wed, 03/14/2012 - 15:11 नवीन
-१ दुबळ्या मनाच्या लोकांना जोतीष जसा आधार देत, तसच घाबरवतही.. अनेक उदाहरण पाहीलीत अशी.. खरा मुद्दा हा आहे की मनाचा दुबळेपणा दुर करायचा की त्याला गोंजारत बसायच? आणी आशेचा किरण म्हणाल तर तो दाखवणारे जोतीषापेक्षा खुप चांगले मार्ग उपल्ब्ध आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

वेगवेगळे उपाय

रणजित चितळे
Wed, 03/14/2012 - 16:36 नवीन
एकाच प्रकारचे उपाय करुन चालत नाहित. माणसाच्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणी आहेत. त्या त्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणीत, माणूस त्याच्या पुढे येणाऱ्या सगळ्या गोष्टींचे आकलन करून विचार करतो, निष्कर्ष काढतो. समोर येणाऱ्या प्रश्नांना उत्तरं शोधतो. संकटाला तोंड देतो. प्रत्येक मानसिक प्रगतीच्या श्रेणीत त्याचे स्वतःचे मानसिक स्वास्थ्य वाढवायचे ध्येय असते. प्रत्येक श्रेणीत त्याची विचार करण्याची कक्षा ठरलेली असते. तितकीच तो करू शकतो. कधी कधी माणूस कोणत्या लेव्हलला आहे त्यावर उपाय अवलंबून असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

अगदी बरोबर !

चौकटराजा
Wed, 03/14/2012 - 16:52 नवीन
माणसाच्या "आजाराची" लेव्हलच त्यावरील उपाय ठरवीत असते. एरवी सेल्फ मेडीसिन घातक असले तरी अध्यात्मिक जीवनात ते अमृत आहे. सबब स्वतः चा गुरू विवेकात शोधावा. राम राम अवघे जन म्हणती कोणी न जाणीती आत्माराम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

हम्म

मूकवाचक
Wed, 03/14/2012 - 17:55 नवीन
आत्मारामासारखा गुरू नाही ही ज्याने त्याने स्वानुभवाने जाणण्याची गोष्ट आहे. आतल्या गुरूशी परिचय होण्यासाठी एखादा बाह्य गुरूची मदत घेत असेल, तर त्याला खजिल करणे, आणि त्यासाठी आत्माराम आत्माराम असा धोशा लावणे पूर्णपणे व्यर्थ आहे. आत्मारामालाच गुरू मान अशी उठसूठ सक्ती करता येत नाही. तसे केल्यास काही उपयोग होणार नाही, कारण आत्मारामालाच गुरू मानण्यासाठीदेखील एक 'लेव्हल' यावी लागते. गुरूतत्व फक्त आतच आहे, आणि ते बाहेर असूच शकत नाही असा आग्रह धरणे देखील पूर्णपणे निराधार आहे. 'अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुज ज्ञान कळो आले, तुझा तुची देव तुझा तूचि भाव, मिटला संदेह अन्यतत्वी' हे अनुभवलेल्या ज्ञानदेवांचेही 'बाह्य गुरू' (निवृत्तीनाथ) होतेच. तेव्हा वैद्य, औषध या सगळ्यांना कवडीमोल ठरवत माझा मीच बरा झालो असे म्हणणार्यानेच सारासार विचार करायला हवा. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

तसे सगळेच गुरू

चौकटराजा
गुरुवार, 03/15/2012 - 08:45 नवीन
तसे अवघे विश्वच ज्ञानदेवानी गुरू मानले होते. हे त्यांचा दृष्टांताचा आवाका पाहिला की लक्षात येते. आपणही ज्ञानाच्या पातळीवर असे गुरू करीतच असतो. बालादपि सुभाषितं ग्राह्यम.पण परिशीलनाची वेळ आली ही आत्माराम हाच बेस्ट असा माझा तरी अनुभव आहे. बाह्य अध्यात्मिक गुरू वाचून माझे काही अडलेले नाही. माझ्याकडे सुखी माणसाचा सदरा आहे. विपत्ति वाट्याला येउनही ! महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध अध्यात्म गुरू स्वामी स्वरूपानंद नात्याने माझेआते मामा होते. ज्याला दैवदत्त प्रतिकार शक्ती आहे त्याला बाह्य औषधी कमी लागतात .तसेच अध्यात्माचे असेल कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

ज्याला दैवदत्त प्रतिकार शक्ती

कवितानागेश
गुरुवार, 03/15/2012 - 10:22 नवीन
ज्याला दैवदत्त प्रतिकार शक्ती आहे>> दैवदत्त म्हंजे काय हो आजोबा????? नाई, इथे दैववादावरच ( पक्षी= ज्योतिषावर) चर्चा सुरु आहे ना, म्हणून म्हटल, नक्की विचारुन घ्यावे.. :) - ( ठार गोंधळलेली) माउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

त्यांना, "निसर्ग्दत्त"

शैलेन्द्र
गुरुवार, 03/15/2012 - 11:15 नवीन
त्यांना, "निसर्ग्दत्त" म्हणायचय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

अस्सं क्काय!

कवितानागेश
गुरुवार, 03/15/2012 - 12:22 नवीन
अस्सं क्काय! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

(No subject)

शैलेन्द्र
गुरुवार, 03/15/2012 - 18:45 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

दैव या विषयावर

चौकटराजा
गुरुवार, 03/15/2012 - 15:15 नवीन
माझा रूढार्थाने देवावर विश्वास नाही पण दैवावर आहे. दैव ही संकल्पना व भविष्य या दोन वेगळ्या आहेत. दैवाचा संबंध भूत, वर्तमान व भविष्य काळ या तिंघांशी ही आहे. दैव या बाबतीत दासबोधातील अधिदैविक हे प्रकरण वाचल्यास बरे. पण ते जाउन द्या. दैव म्हणजे आपण हेतुपूर्वक व अहेतुकपणे जी कर्मे करतो ती सोडून इतरांनी केलेल्या अशाच हेतुपूर्वक वा अहेतुक कर्मांच्या परिणामाचा रिझल्टंट. जन्मतः च सुंदर रूप , आवाज लाभणे यात आपले कर्म काहीच नाही. म्हणून त्याला दैवदत्त म्हणायचे. व्यावहारिक भाषेत सांगायचे तर मी जो दहावीचा अभ्यास करतो ते माझे कर्म व इतर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा आवाका हे माझे दैव . तो त्यांचा आवाका कमी पडला तर माझा क्रमांक पहिला नाहीतर दुसरा तिसरा ...... पार शेवटून पाहिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

दैव म्हणजे आपण हेतुपूर्वक व

धन्या
गुरुवार, 03/15/2012 - 17:33 नवीन
दैव म्हणजे आपण हेतुपूर्वक व अहेतुकपणे जी कर्मे करतो ती सोडून इतरांनी केलेल्या अशाच हेतुपूर्वक वा अहेतुक कर्मांच्या परिणामाचा रिझल्टंट.
भन्नाट व्याख्या. थोडक्यात मी ओवाळले दिवे म्हणजे कर्म, मी ओवाळलेल्या दिव्यांचा पडलेला उजेड म्हणजे कर्माची फलश्रुती आणि दुसर्‍यांनी ओवाळलेल्या दिव्यांचा माझ्यावर पडलेला उजेड म्हणजे दैव. तुमची आधुनिक थेअरी ऑफ कर्मा आवडली बरं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

और ये लगा धनाजीराव का कडकसित

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/15/2012 - 18:21 नवीन
और ये लगा धनाजीराव का कडकसित सिक्सर.... ह्हे..ह्हे..ह्हे..ह्हे..! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

टेक्नीकल भाषेत

चौकटराजा
गुरुवार, 03/15/2012 - 19:32 नवीन
टेकनिकल भाषेत तुम्ही ओमनी लाईट व " तो " अन्य अ‍ॅम्बीयंट लाईट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

माउ , ( कित्ती चान नाव ) हे जाता जाता

चौकटराजा
गुरुवार, 03/15/2012 - 15:22 नवीन
डॉ.जॉन ड्वायर यांचे इम्युनॉलॉजी वर एक पुस्तक आहे. त्याची अर्पण पत्रिका खालील प्रमाणे त्याचे रुपांतर मराठीत पटकन उढून तो म्हणाला देवा , मी एक चांगले आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी काय करू ? देव हसला व म्हणाला "आपल्या आईवडिलांची निवड काळ्जी पूर्वक कर म्हन्जे झालं " "दैवदत्त "चा अर्थ असा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

एकाच प्रकारचे उपाय करा असे मी

शैलेन्द्र
Wed, 03/14/2012 - 19:23 नवीन
एकाच प्रकारचे उपाय करा असे मी म्हणत नाही, जोतीष जर कुणाला धीर द्यायच काम करत असेल तर त्यालाही माझा विरोध नाही, पण माझा रोख जोतिषाच्या दुसर्‍या बाजुवर आहे, आज त्रास आहे पण अमुक तारखेनंतर दिवस चांगले येतील हे म्हणण ठीक, पण पुढच्या वर्षी साडेसाती सुरु होतीय, त्रास होइल, अस होइल हे सांगुन दुबळ्या लोकांना घाबरवणे कोणत्या उपायात बसते? थोडक्यात, जोतीष हा लोकांना *त्या बनवायचा धंदा आहे हे माझ वैयक्तीक मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

एकाच प्रकारचे उपाय करा असे मी

शैलेन्द्र
Wed, 03/14/2012 - 19:23 नवीन
एकाच प्रकारचे उपाय करा असे मी म्हणत नाही, जोतीष जर कुणाला धीर द्यायच काम करत असेल तर त्यालाही माझा विरोध नाही, पण माझा रोख जोतिषाच्या दुसर्‍या बाजुवर आहे, आज त्रास आहे पण अमुक तारखेनंतर दिवस चांगले येतील हे म्हणण ठीक, पण पुढच्या वर्षी साडेसाती सुरु होतीय, त्रास होइल, अस होइल हे सांगुन दुबळ्या लोकांना घाबरवणे कोणत्या उपायात बसते? थोडक्यात, जोतीष हा लोकांना *त्या बनवायचा धंदा आहे हे माझ वैयक्तीक मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

ज्योतिष शास्त्र(prediction of life)

गोंधळी
Tue, 03/13/2012 - 18:59 नवीन
ज्योतिष शास्रा वर माझा विश्वास आहे. कारण एका ज्योतिष्याने सांगितलेल्या घटना माझ्या आयुष्यात घडल्या आहेत.
  • Log in or register to post comments

आता तुम्हाला जनरल रूल बनवायला सोपे !

चौकटराजा
Tue, 03/13/2012 - 19:44 नवीन
आपल्याला अनुभव आला. की अनेक आले ? मी वरच सांगितले आहे . अनुभव विपरित परिणामी येवो वा सुखद . एकदा घडले की पुढच्या वेळी कावळा बसला की फांदी मोडणारच हा जनरल रूल बनविणे फार सोपे असते. जादूगार रघुवीर म्हणत . मी हे नाणे आता माझ्या उजव्या हातात घेतो की हजारातील किंवा लाखातील एखादाच म्हणतो " ते अजूनही डाव्या हातातच असण्याची ही शक्यता आहे ना !" मानवी मन समांतर विचारधारेचा विचार करण्यात आळशी असते हाच जादुगाराचा फायदा ! "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी

@ज्योतिष शास्रा वर माझा

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/14/2012 - 01:01 नवीन
@ज्योतिष शास्रा वर माझा विश्वास आहे. कारण एका ज्योतिष्याने सांगितलेल्या घटना माझ्या आयुष्यात घडल्या आहेत.>>> अहो...आपल्या आयुष्यात घडणार्‍याच घटना ज्योतिष शास्त्री सांगत असतात... मी टवाळी करित नाही,पण तुंम्ही एक अनुभव घेऊन पहा..तुंम्ही हात/पत्रिका पाहु शकता-असा थोडासा तुमच्या मित्रमंडळींमध्ये बोलबाला करुन पहा... आणी येणार्‍यांचे भविष्य त्यांचं ''इनपुट'' ऐकुन घेऊन सांगायचा प्रयत्न करा ( तत्पुर्वी ज्योतिष सांगायची भाषा/शैली पाहुन शिकुन घ्या..) तुमची दुसर्‍याला सल्ला देण्याची मदत करण्याची तळमळ जितकी अधिक असेल...तेव्हढं तुम्ही सांगितलेलं भविष्यकथन प्रभावी होइल... अहो...अशी मदत आपणच आपल्या कामधामाच्या क्षेत्रातल्या लोकांना करत असतो... तीच ज्योतिषशास्त्रीय भाषेत केली की भविष्यकथन... एखाद्या व्यक्तिच्या आयुष्याचा अंदाज घेऊन त्याला सल्ला देणे,सावध करणे,,,हे हुषारीचे काम आहे...त्यात ज्योतिष-शास्त्राची म्हणुन विशेष अशी कर्तब काहिही नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोंधळी

अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 03/13/2012 - 19:26 नवीन
अभिनंदन.....! लेख कै वाचता नै आला पण मिपावरील लेखक मंडळी आपलं मत हिरिरीने मांडत असतात. आणि लेखन दैनिकात छापूनही येतं. सालं आपल्याला मिपाकरांचं लै कौतुक वाटतं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

सहज
Wed, 03/14/2012 - 07:10 नवीन
अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ज्योतिष शास्त्राला खरे कि

चेतनकुलकर्णी_85
Tue, 03/13/2012 - 20:31 नवीन
ज्योतिष शास्त्राला खरे कि खोटे ठरविणार्यांनी आधी स्वताचे लग्न ठरविताना कुंडली पहिली आहे कि नाही हे जरूर आठवावे... ;) ;-) :wink: बाकी युयुत्सु मंजे काय?
  • Log in or register to post comments

युयुत्सु हे महाभारतातील एक

प्रचेतस
Tue, 03/13/2012 - 22:03 नवीन
युयुत्सु हे महाभारतातील एक पात्र, धृतराष्ट्राचा दासीपुत्र. जो महाभारत युद्धाच्या सुरुवातीला पांडवांच्या गोटात सामील झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतनकुलकर्णी_85

ते नाव झाले हो अर्थ

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 03/14/2012 - 01:30 नवीन
ते नाव झाले हो अर्थ नाही. युयुत्सु म्हणजे लढण्यास तयार/उत्सुक असलेला :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

लाख

मन१
Tue, 03/13/2012 - 23:17 नवीन
एखाद्याला नसेल बघायची हो, पण पसंत पडलेल्या जोडिदाराकडचे कुनीतरी हटकून "नै नै बघाच", "आमचा विश्वास, आमचा अनुभव" वगैरे इत्कए काही त्रस्त करुन सोडतात , आणि पुन्हा "त्या" पक्षाकडील वजनदारही असतात की झक मारुन इच्छा नसतानाही कित्येकांना, अनेकानेक लोकांना बघावी लागते. आणि त्यांनी असा थेट गंभीर गुन्हा केला की टोचून टोचून बोलत पुन्हा आपल्या प्रतिक्रियांनी ज्योतिषांकडेच ढकलायला लोक तयारच असतात. धाग्यावर प्रतिसाद द्यायचा नव्हता, पण प्रतिसादास उत्तर देणे आवश्यक वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतनकुलकर्णी_85

म्हणजे जर तुम्हाला एखादी पसंद

चेतनकुलकर्णी_85
Tue, 03/13/2012 - 23:30 नवीन
म्हणजे जर तुम्हाला एखादी पसंद पडली आणि पत्रिका जुळली नाही तर टाटा बाय बाय ?? :O :-O :shock: काय राव असे असते का कुठे? धाग्यावर प्रतिसाद द्यायचा नव्हता, पण प्रतिसादास उत्तर देणे आवश्यक वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

काय

मन१
Tue, 03/13/2012 - 23:41 नवीन
काय ते ठाउक नाही. पण "मला पहायची नव्हती पण त्यांच्याकदे कुनीतरी उपताले म्हणून म्हणून पोअहावी लागली", "तशीही जमत होतीच" असे डायलॉग सातत्याने कानावर पडतात. ही के क्याटेगरी. टाटा बाय बाय वाली पण आहे.(तुमच्या प्रतिसादातून फक्त टाटा बाय बाय वालीच आहे असे वाटत होते, म्हणून लिहिण्यास डोकावलो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतनकुलकर्णी_85

म्हणजे जर तुम्हाला एखादी पसंद

धन्या
Wed, 03/14/2012 - 07:15 नवीन
म्हणजे जर तुम्हाला एखादी पसंद पडली आणि पत्रिका जुळली नाही तर टाटा बाय बाय ??
अद्याप तुमचे कांदे -पोहे सुरु झालेले दिसत नाहीत. एकदा कांदे पोहे संपले की या आणि अशा इतरही अनेक शंकांचे निरसन होईल. आता ज्योतिषावर विश्वास नसला तरीही हरकत नाही. लग्न जमेपर्यंत तुम्ही पत्रिका कशी पाहावी, गुणमेलन कोष्टक कसे पाहावे, कुंडली ही संगणक प्रणाली कशी वापरावी या विषयांत पारंगत व्हाल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतनकुलकर्णी_85

दुसरी बाजू

हुप्प्या
Tue, 03/13/2012 - 23:28 नवीन
समजा एखाद्याला हृदयविकारासारखा जीवघेणा रोग आहे. त्याला लांबच्या प्रवासाला जायचे आहे. अशा वेळी तो डॉक्टरकडे तपासणीला न जाता ज्योतिषाकडे हात वा कुंडली दाखवायला गेला. ज्योतिषाने त्याची आकडेमोड करुन सांगितले की खुशाल जा. तुमच्या आयुष्याची रेषा भक्कम आहे. आणि मग प्रवासातील शीणाने तो माणूस मेला तर ज्योतिष ह्या मृत्युची जबाबदारी घेते का? तो ज्योतिषी निष्काळजीपणाची भरपाई देईल का?
  • Log in or register to post comments

ज्योतीषी भरपाई देणार नाही पण डॉक्टर देईल?

नेत्रेश
Wed, 03/14/2012 - 11:46 नवीन
जर डॉक्टरने त्याला माहीत असलेल्या सर्व तपासण्याकरुन प्रवासाला जायला सांगीतले आणी तो माणुस मेला तर डॉक्टर जबाबदारी घेईल? भरपाई देईल? मी ज्योतीषाची बाजु घेल नाही पण तुलना कसताना अपेक्षा सुद्धा दोघांकडुन सारखीच ठेवावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

होय

Nile
Wed, 03/14/2012 - 12:33 नवीन
डॉक्टर जबाबदारी घेईल? भरपाई देईल?
डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद असते. (कलमं आपली आपण तपासावीत) पुढे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

चुकीची माहीती

नेत्रेश
Wed, 03/14/2012 - 12:39 नवीन
डॉक्टरचे निदान चुकले या कारणासाठी डॉक्टरवर कोणत्याही कमानुसार कोणतीही कारवाई करता येत नाही. (अक्षम्य निष्काळजीपणा, जाणुन बुजुन चुकीचे औषध देणे, ईत्यादीसाठी खटला दाखल करता येतो. ) तसेच ज्योतीष चुकले म्हणुन ज्योतीषावरही काही कारवाई करता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा