मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in काथ्याकूट
9 Mar 2012 - 1:59 am
गाभा: 

जागतिक महिला दिनाच्या सर्व वाचक स्त्री-पुरुषांना शुभेच्छा.

महिला दिनाला साधारण १०० वर्षांचा इतिहास आहे. स्त्रीमुक्तीची चळवळ आणि महिला दिन साजरा करण्याचा संबंध घनिष्ठ आहे. महिलांना मतदानाचा हक्क मिळावा, निवडणूका लढवण्याचा हक्क मिळावा, समान वेतन, समान वागणूक मिळावी इत्यादी मागण्यांमुळे स्त्री चळवळ सुरू झाली आणि वाढली. बहुसंख्य देशांमधे या मागण्यांबाबत गेल्या शतकात मोठी प्रगती झालेली दिसते. तरीही स्त्री-समानता संपूर्णतः आलेली आहे असे आम्हांस वाटत नाही. मोठ्या प्रमाणावार मुलींनी शिकायला सुरूवात केलेली असली तरीही अजूनही सुशिक्षितांमध्ये स्त्री-पुरुषांचे प्रमाण समसमान नाही. नोकऱ्यांमध्येही अजून उच्चपदावर पुरुष अधिक संख्येने दिसतात.

कदाचित असे म्हणता येईल की वीस-तीस वर्षांपूर्वी जे सुशिक्षित झाले त्यांचेच प्रमाण उच्चपदस्थांत अधिक दिसेल. हाच युक्तिवाद थोडाफार एकंदरीत सुशिक्षितांच्या संख्येला लागू होतो. थोडक्यात पंचवीस तीस वर्षांपूर्वी जे खूपच अधिक संख्येने पुरुष शिकले ते व त्यांच्याबरोबर न शिकलेल्या स्त्रिया अजूनही लोकसंख्येमध्ये दिसतात. कदाचित आजची पिढी घेतली तर हे प्रमाण अधिक समसमान दिसेल. महाराष्ट्र हे भारतातले पुरोगामी राज्य. तेव्हा सध्याच्या मराठी पिढीत चित्र वेगळे दिसते का? ते शोधण्यासाठी मराठी इंटरनेट साइटवर असलेल्या स्त्री-पुरुष प्रमाणाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.

आम्हाला असे दिसले की मराठी इंटरनेटवर स्त्रिया आणि स्त्री-आयडींचे प्रमाण खूप कमी दिसते. पुराव्यादाखल अलेक्सा.कॉम वरून घेतलेले हे स्टॅटिस्टिक्स पहा.

मनोगतावर दिसणारे स्त्री-पुरूषांचे प्रमाण एकूणच इंटरनेटवर दिसणार्‍या प्रमाणासारखेच आहे. मायबोलीवर पुरूषांचे प्रमाण माफक प्रमाणात जास्त (over-represented) आहे. मिसळपाव, उपक्रम आणि मीमराठीवर स्त्रियांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी (greatly under-represented) आहे. ऐसी अक्षरेचे (हा न्यू किड ऑन द ब्लॉक असल्यामुळे) स्टॅट्स उपलब्ध नाही. पण ऐसीवरचे प्रमाण मायबोली किंवा मनोगताप्रमाणे असावे असे वाटते. या स्टॅट्सपैकी मायबोलीच्या स्टॅट्समधे Confidence: medium असं आहे तर इतर स्टॅट्सबद्दल Confidence: low आहे. पण या साईट्सवर पाहिल्यास लॉगिन केलेल्या पुरूषांची संख्या जास्त आणि स्त्रियांची संख्या कमी हे दिसतेच.

मराठी इंटरनेट वापरणारे लोक महाराष्ट्र किंवा भारताच्या शहरी भागातले, आणि परदेशात असणारे बहुसंख्येने असणार. या लोकांमधे शिक्षण, समृद्धी, इंटरनेटची उपलब्धता या अडचणी नसाव्यात. तरीही इंटरनेटवर व्यक्त होण्यात स्त्रियांचे प्रमाण कमी का असावे? गेल्या काही दिवसांतच पुरुषप्रधान लेखनाबद्दल तक्रारी वेगवेगळ्या साइट्सवर दिसून आल्या. मराठी इंटरनेट साइट्स पुरुषप्रधान मनोवृत्तीच्या आहेत का?

८ मार्चला थोडी का होईना चर्चा घडावी म्हणून घाईघाईत लिहील्यामुळे काही मुद्दे सुटले आहेत. त्यातले काही इथे लिहीते.

इंटरनेट-वापरकर्ती घरं सुशिक्षित असतील असं समजून, सांख्यिकदृष्ट्या नेट वापर करणार्‍यांमधे स्त्रिया आणि पुरूषांचं प्रमाण ढोबळमानाने समान असेल अशी माझी अपेक्षा होती. आपलं लिखाण ब्लॉगांपुरतेच मर्यादित ठेवणार्‍यात किंवा मराठीतून, इंटरनेटवर व्यक्त होणार्‍या व्यक्तींमधे स्त्रिया आणि पुरूषांचं प्रमाण थोड्याबहुत फरकाने समान असेल हे एक गृहीतक. (चुकीचं असल्यास का ते वाचायलाही आवडेल.)

विचार करण्यासाठी आणि/किंवा इंटरनेटवर किंवा कुठेही व्यक्त होण्यासाठी, विशेषतः राजकीय, सामाजिक, आर्थिक, चर्चा आणि कला या संदर्भात विचार करता स्त्रिया आणि पुरूष मुळात वेगळे नसतात हे ही मागच्याच शतकात पुढे आलेलं आहे. तर स्त्रिया एकूणच कमी प्रमाणात का व्यक्त होतात याबद्दल थोडी चर्चा करणं मला जिव्हाळ्याचे वाटते.

विशेषतः हा आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या एलिट म्हणावा असा गट आहे, जो मराठी इंटरनेटवर वावरतो. सामान्यतः समाजाची मूल्य, दिशा या वर्गातून ठरवली जाते. (पूर्वीही ब्राह्मणांना एलिट समजले जायचे आणि त्यांच्या घरच्या रूढींचे पालन करणे फॅशनेबल समजले जायचे.) त्यामुळे या वर्गाची मतं काय आहे हा विचार करणं मला महत्त्वाचं वाटतं. 'सुपरमॉम' संस्कृतीने आधीच काही स्त्रियांच्या व्यक्तीमत्त्वाचे नुकसान केलेले आहे; ते अधिक प्रमाणात झिरपू नये असं मला मनापासून वाटतं आणि त्यादृष्टीने मला अशा व्यक्ती ज्या समाजगटांत अधिक प्रमाणात आढळतात त्या लोकांची मतं महत्त्वाची वाटतात.

"एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं" हे थोडं जुनंच झालं. त्याच धर्तीवर एक स्त्री घराबाहेरही जे जग आहे त्याबाबतीत जागरूक झाल्यास संपूर्ण कुटुंबात ही जागरूकता येऊ शकते.

निदान अशा प्रकारच्या चर्चांमधून काही चुकतं आहे का असा विचार झाला तरी खूप.

प्रतिक्रिया

आला गं बाई आला गं बाई आलाऽऽ गं
आला आला आला आला.
पाशवी धागा आला.;)
वाचते गं. आत्ता फक्त धागा आल्याचा आनंद व्यक्त केलाय.

सुहास..'s picture

9 Mar 2012 - 9:48 pm | सुहास..

प्यारे१'s picture

12 Mar 2012 - 9:41 am | प्यारे१

तू पण घेतलीस एजन्सी? का डिस्ट्रिब्युशन फक्त रे? ;)

परिकथेतील राजकुमार's picture

10 Mar 2012 - 12:03 pm | परिकथेतील राजकुमार

श्री. चतुरंग, श्री. विकास (बिन काड्यावाले), श्री. निखिल देशपांडे, श्री. घासुगुर्जी, श्री. लिखाळ इ. मान्यवरांच्या प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक.

बाकी स्त्रियांचे हे प्रमाण वाढवण्यासाठी, काही पुरुष हे स्त्री आयडी घेऊन आपापल्या परीने हातभार लावत असतात म्हणे.

राजेश घासकडवी's picture

10 Mar 2012 - 5:22 pm | राजेश घासकडवी

चर्चा कशी आणि कुठे चालली आहे ते वाचत होतो.

अलेक्साकडचा विदा माझ्या सर्वसाधारण निरीक्षणांशी जुळतो. मराठी आंतरजालावर स्त्रियांचं प्रमाण कमी आहे यात वादच नाही. यावर थोडक्यात अनेकांनी म्हटलेलं आहे, 'त्यात विशेष काय, सगळीकडेच ते कमी आहे, म्हणून मराठी आंतरजालावर कमी आहे.' धनंजयनेदेखील विदा देऊन दाखवलं आहे की की भारतातल्या स्त्रियांच्या बाबतीत, एकंदरीतच आंतरजालावर वावर कमी आहे, त्यात मराठी आंतरजाल काही वेगळं नाही.

इथे बहुतेकांना उत्तर सापडल्यासारखं वाटतं. पण खरा तर प्रश्न इथे सुरू होतो. धनंजयच्या तिथल्याच पुढच्या प्रतिसादात तो म्हणतो की

"मराठी संकेतस्थळ" यापासून बदलून मी विचारलेला प्रश्न एकूण भारतातच "जागतिक सरासरीपेक्षा" इंटरनेटचे स्त्री-वापरकर्ते कमी का? हा स्त्रियांच्या रोजीरोटी आणि सबलीकरणाशी संबंधित होतो. मला तरी हा व्यापक प्रश्न मुळीच भंपक वाटत नाही.

मला हाच कळीचा मुद्दा वाटतो. आंतरजालावर कमी दिसणारा स्त्रियांचा वावर हा प्रश्न नसून तो एका व्यापक प्रश्नाचा दृश्य परिणाम आहे. स्त्रियांचं सबलीकरण अजूनही झालेलं नाही हा मुद्दा रहातोच.

अनेकांनी मांडलेली कारणं हेच अधोरेखित करतात.
- घरी एकच कॉंप्युटर असतो - तो नवऱ्यालाच मिळतो. (असमानता, पुरुषांना प्रथमस्थान)
- बायकांना संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करायचा असतो, त्यामुळे त्यांना वेळ मिळतो. (चूल आणि मूल हेच जीवन)
- बऱ्याच घरी कॉंप्युटर नसतो, पण पुरुषांना मात्र नोकरीच्या ठिकाणी कॉंप्युटर वापरता येतो. (असमानता, नोकऱ्या पुरुषांनाच अधिक असतात)
- स्त्रिया वाद घालायला कचरतात (दबलेपणाची भावना)
- स्त्रियांना जालीय वावराची भीती वाटते (असुरक्षितता)
- स्त्रियांना तंत्रज्ञानाची भीती वाटते (लहानपणापासून धोका पत्करण्याचं, नवीन वस्तु हाताळण्याचं स्वातंत्र्य वा शिक्षण न दिल्यामुळे ही भीती येत असावी)

म्हणजे समाजात एकंदरीतच स्त्रियांमध्ये - अगदी वरच्या वर्गातल्या स्त्रियांतही (अदिती ज्यांना एलिट म्हणते) - हे वेगवेगळ्या पातळीवर दडपलेपण आहे. या चर्चेतून हा मुद्दा पुढे येतो हे या चर्चेचं यश आहे. यात विशेष काय, हे इतर ठिकाणी दिसतंच वगैरे म्हणणं म्हणजे आहे ती परिस्थिती वाईट आहे हे नाकारणं.

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Mar 2012 - 10:39 pm | llपुण्याचे पेशवेll

बाकी स्त्रियांचे हे प्रमाण वाढवण्यासाठी, काही पुरुष हे स्त्री आयडी घेऊन आपापल्या परीने हातभार लावत असतात म्हणे.
पण त्याने काय साध्य होणार? फारतर स्टॅटिस्टीक्स साठी डेटा जास्त होईल पण प्रॉडक्टीव्ह आउट्पुट काही नाही.

जेनी...'s picture

9 Mar 2012 - 2:24 am | जेनी...

'जागतिक महिला दिन व शिमगा.'

अतिशय पर्फेक्ट उदाहरण आणि त्यावर पर्ल ने मान्डलेल मत .

अश्या लेखांमुळे कदाचित स्त्रियांच येण कमी होत असाव.

माझ मत .

निवेदिता-ताई's picture

9 Mar 2012 - 2:29 pm | निवेदिता-ताई

असेच म्हणते.........:)

मला तरी त्या धाग्यात काही वावगे दिसले नाही. आता प्रत्येकाची जाण , समज, विनोदबुद्धी वगैरे वगैरे .... :)

>>मला तरी त्या धाग्यात काही वावगे दिसले नाही. आता प्रत्येकाची जाण , समज, विनोदबुद्धी वगैरे वगैरे .... Smile
>>

आता प्रत्येकाला वेगवेगळ्या तर्‍हेचे विनोद अपील होत असतात.
उदाहरणार्थ काही जणांना दादा कोंडके (मराठी नटाबद्दल बोलत आहे. मिपावरील आय डी बद्दल नाहे ;-)) यांचे विनोद आवडतात, काही जणांना नाही.
पण आता हे समजून घ्यायची प्रत्येकाची जाण , समज, बुद्धी वगैरे वगैरे :-)

रेवती's picture

9 Mar 2012 - 2:38 am | रेवती

चांगला चर्चा विषय.
स्टॅटिस्टीक्स दिसत नाहिये (मलाच की सगळ्यांना?).
मिसळपावशिवाय इतर ठिकाणी वावर फारसा नसल्याने त्यांची माहिती नवीन आहे.
मिपावर स्त्रीसदस्य कमी आहेत हे जाणवते. त्यातही फक्त सदस्यत्व घेऊन फारसे न फिरकलेल्या जणी जास्त असतील हे म्हणण्याचे धाडस करावेसे वाटते. स्त्री नावाने सदस्यत्व घेतलेले पुरुष यात धरले तर स्त्रीयांची संख्या आणखी कमी असण्याची शक्यता आहे.;) इंटरनेट वापर हा लेखात म्हटल्याप्रमाणे भारताचा शहरी भाग आणि परदेशस्थित (येथे मराठी)लोकांकडून जास्त होतो पण शहरात किंवा परदेशात मूव्ह होताना मुख्यत्वे नवर्‍याची नोकरी हे कारण असते. (बायकोची नोकरी असल्याने मूव्ह झालेलेही आहेत पण प्रमाण त्यामानाने कमी.). नवीन ठिकाणी रुजताना घरी लगेच सगळ्या सोयी नसणे (नवर्‍याला मात्र ऑफीसमधून इंटरनेट अ‍ॅक्सेस असणे). मुले लहान असणे व त्यामुळे वेळ देऊ न शकणे. नवीन देशात स्थिरस्थावर झाल्यावर बायका (म्हणजे मुली) नोकरी/व्यवसाय/उच्च शिक्षण करण्यामुळे वेळ देऊ न शकणे. ही मह्त्वाची कारणे म्हणावी लागतील असा अंदाज आहे. आता बायकांनाच स्वयंपाक करावा लागतो, घराची साफसफाई करणे, ग्रोसरी वगैरे यादी वाढवता येईल पण माझ्या घरी याबाबत काय होते तेच मला माहीत असेल. दुसर्‍या घरी पुरुषाची कितपत मदत होते आणि तो वेळ इंटरनेटसाठी वापरता येतो का ते वेगवेगळे असेल. वर नमूद केलेल्या वेबसाईट्स या मनोरंजन (त्यातून संवाद वगैरे पुढच्या गोष्टी आहेत. त्यातून सदस्यांना अर्थार्जन होत नाही या अर्थी घ्यावे.) या कारणापुरत्या वापरल्या जातात. जाहिराती, ऑनलाईन खरेदी विक्री भयानक मोठी उलाढाल करणारी असल्यास माहीत नाही.
ही झाली थोडी व्यावहारीक आणि दरदिवशी जगतानाची बाजू. (नक्की काय ते सांगता आले नाहिये.;) ) पण मानसिकरित्या कोणत्याही स्त्रीला समोरच्या पुरुष सदस्याविषयी असलेली भीड (भिती या अर्थी नाही). स्त्री शहरातली खेड्यातली असा भेदभाव नाही (तो आणखी वेगळा विषय, फक्त स्त्री असणे या अर्थी). माझा अपमान होणार नाही ना? झालाच तर त्यात कोणत्याप्रकारचे शब्द वापरले जातील? त्यापेक्षा नकोच! मी वाचकच राहीन. शिवाय शैक्षणिक पातळीवर आलेल्या अडचणी. मी कमी (किंवा जास्त) शिकलेली आहे म्हणून काही प्रश्न उद्भवतील काय इ. वैद्यकीय दृष्टीकोनातून सुरु केलेले विषय नंतर कुठल्याकुठे गेले तर लाज वाटणे अशी नैसर्गीक कारणेही असू शकतात. अश्लील व्य. नि. किंवा बाकीही गोष्टी आसतातच. यावर उपाय कोणते तोही वेगळा विषय होऊ शकेल. (आत्ता खरा महिला दिन साजरा झाला बुवा!;))

आपला एवढा दीर्ध प्रतिसाद पहिल्यांदा पहात आहे. (( ते माझे राखीव कुरण आहे)

आणी त्याच्याशी सहमत आहे.

हा हा हा. हो, वरचा प्रतिसाद फारच लांबला. तरी बाकी प्रश्नांची उत्तरं लिहिली नाहियेत;) अजून बरच अ‍ॅड करावसं वाटत होतं पण ते जास्तच होईल म्हणून थांबले. :)

रेवतीताई, प्रतिसाद लांबला तरी चालेल :-)
<<
अजून बरच अ‍ॅड करावसं वाटत होतं पण ते जास्तच होईल म्हणून थांबले<<
कृपया अ‍ॅड करा. वाचायला आवडेल.

नितिन थत्ते's picture

9 Mar 2012 - 10:31 am | नितिन थत्ते

असेच म्हणतो.

प्रतिसादात अ‍ॅडिशन कराच.

Pearl's picture

9 Mar 2012 - 3:43 am | Pearl

चांगला विषय.. धन्स आदिती.
वेळ मिळाला की माझं मत सविस्तर लिहिन.
सध्या चर्चा वाचत आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2012 - 5:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ही चर्चा मायबोली, मनोगत, उपक्रम, मीमराठी आणि ऐसीअक्षरेवरही टाकलेली आहे. सर्व संस्थळांवर वेगवेगळे लोकं येतात त्यांची काय मतं आहेत, हे मला का जाणून घ्यायचं आहे यासंदर्भातही मला लिहायचं आहे. सवडीने मोठा प्रतिसाद लिहीते आहे. तोपर्यंत लोकांची मतं वाचण्यास उत्सुक आहे.

चित्रा's picture

9 Mar 2012 - 5:32 am | चित्रा

स्त्रियांचा वावर कमी हे कसे कळते?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2012 - 5:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अलेक्सावर डेमॉग्राफीचा विदा कसं गोळा करतात याबद्दल इथे किंचित माहिती मिळाली. नाईलच्या मताप्रमाणे:

अनेक वेबसाईट्स स्टॅटीस्टीकल मॉडेल्स वापरुन तुम्ही स्त्री आहात का पुरुष हे शोधतात. (गुगल प्रोफाईलवर मी माझे 'लिंग' दिले नव्हते. पण आता गुगल स्वतःचाच मला पुरुष असे दाखवतो) अलेक्साने अर्थातच मराठी संस्थळावरून तुम्ही पुरुष आहात का स्त्री हे ओळखलेले नाही. तुमच्या इतर इंटरनेट वापरावरून (इतर सर्च क्लायंट्सकडून?) ही माहीती मिळलेली आहे.

मला हे पटतं.

हा मुद्दा फार गौण नसला तरी चर्चा त्याबद्दल रेंगाळू नये अशी अपेक्षा आहे. त्यातून मायबोलीबद्दल जो डेटा आहे तो मला थोडा मजेशीर वाटला. पण मिपा, मीम, उपक्रमावर मी जे पहाते त्यात प्रचंड male-bias जाणवतो. ऐसीअक्षरेवरही (विदा गोळा केलेला नाही) मी पहाते तेव्हा स्त्री-आयडींचे प्रमाण बर्‍यापैकी दिसते.

मराठमोळा's picture

9 Mar 2012 - 6:06 am | मराठमोळा

लेखातील सुरुवातीच्या दोन परीच्छेदात म्हंटल्याप्रमाणे स्त्रीमुक्ती चळवळ किंवा स्त्रियांना समान हक्क याचा मराठी ईंटरनेट वर महिलांची संख्या कमी याचा काही संबंध वाटत नाही. कारण भारतात/महाराष्ट्रात तरी ईंटरनेटवर स्त्री सदस्यांना कुणीही बंदी/अत्याचार केल्याचे दिसुन आलेले नाही, किंबहुना महिलांची संख्या कमी असल्याने काही तोटे आहेत किंवा वाढल्याने फायदे होतील हा मुद्दा वादातीत आहे.

आता मूळ मुद्द्याकडे वळूया.
ईंटरनेट वापरणे हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. कदाचित बहुतांश स्त्रियांना यात रस नसेल किंवा बर्‍याचशा फक्त वाचनमात्र राहण्याला पसंती देत असाव्यात. करत असलेल्या नोकरीचे स्वरुपही कारणीभूत असु शकते. हे पुरुषांना देखील लागू होते. मिपाचेच उदाहरण घेतले तर बर्‍याच पुरुष मंडळींच्या पत्नींचे इथे आयडी नाहीत आणि स्त्री आयडींच्या पतीचे इथे किंवा कुठल्याही मराठी संस्थळावर आयडी नाहीत.

असो,
संख्या कमी का हा संशोधनाचा विषय म्हणूनच या चर्चेकडे पहातोय आणि ही चर्चा तिथेच सीमीत रहावी, स्त्रीमुक्ती, समान हक्क हे विषय या विषयाशी जोडले जाऊ नये अशी अपेक्षा.

महिला दिनाच्या आणि शिमग्याच्या सर्वांना शिळ्या शुभेच्छा!!!

>> भारतात/महाराष्ट्रात तरी ईंटरनेटवर स्त्री सदस्यांना कुणीही बंदी/अत्याचार केल्याचे दिसुन आलेले नाही >>
अशी कोणतीही बंदी नाहीये हे मान्य. पण इंटरनेटचं राहू द्या. मी आता केस स्टडी म्हणून आपल्या मिपाचं उदाहरण घेत आहे (कारण मराठी संस्थळात मी फक्त मिपावरचं वावरली आहे.)

स्त्री सदस्यांना बंदी नाहीये मान्य. पण वावर करताना मोकळेपणा जाणवला पाहिजे ना स्त्रियांना. कम्फर्ट वाटला पाहिजे. तो जाणवत नाही बरेच वेळा असं वाटतं.
याची कारणं कदाचित अशी असावीतं,
(१) बर्‍याचदा ज्या गोष्टींवर बोलणे/बोललेलं ऐकणे स्त्रियांना अनकंफर्टेबल वाटतं त्या गोष्टींवर उघडपणे चाललेली निरर्थक चर्चा. आणि त्यावर येणार्‍या काही वाचकांच्या प्रतिक्रिया, वाचक त्याचा घेत असलेला आनंद. आपल्याला ज्यांचा एरवी आदर वाटतो अशा आयडींच्याही अशा धाग्यावरच्या काही प्रतिक्रिया यामुळे तर अजूनच अनकंफर्टेबल वाटतं असावं. एरवी ज्या विषयांबद्दल गुप्तता पाळली जाते त्यावर कधी चर्चाच होऊ नये असं काही नाही, त्यावरही चर्चा व्हावीच ना. त्या विषयांवरील चर्चा निशिद्ध अस मुळीचं माझं म्हणणं नाही. पण ती चर्चा बर्‍याच अंशी ऑन सेरियस नोटच व्हावी. अशा विषयांवरील थोड्या हलक्या-फुलक्या विनोदांना कोणाचीही ना नसते. पण लेखविषय राहिला बाजूला आणि त्यावर अवांतर वायफळ आणि ऐकवत नाही अशी बडबड सुरू झाली की नको वाटते.
(२) कोणाही पुरूष आयडीने आपापल्या विचारक्षमतेनुसार कोणत्याही विषयावर काहीही मते मांडली तरी चालते. कोणाची त्याला काही हरकत नसते. बरेचदा ते लाइटली घेतले जाते. पण तेच एका स्त्रीने काही लेखन/प्रतिक्रिया लिहिली की ती मात्र लगेच वेगवेगळ्या मापदंडांवर तोलून-मापून पाहिली जाते, हे करताना (एरवी कितीही मतभेद असतील तरी) सर्व पुरूषवर्ग एक होतो.
सगळेचं पुरूष आयडी असं करतात असं नाही. पण ती एक मॉब-मेंटॅलिटी झाली आहे.
(३) बोलताना / चर्चा करताना / इथे वावरताना काही पारंपारीकपणे (रोजच्या जीवनात/समाजात) ज्या चुकीच्या संकल्पना चालतं आल्या आहेत त्यांचा त्रास होतो, त्या क्लेशदायक वाटतात. आणि बहुसंख्य सदस्य तेचं बरोबर असं मानून चालत असतात, याचाही त्रास होतो.
अजून थोडं विस्कटून सांगायचं झालं तर काही संकल्पना चुकीच्या आहेत आणि बहुसंख्य लोकं त्याबाबत रिजिड आहेत आणि तेच बरोबर मानून चालतात.
१) मुली / स्त्रिया या सुंदरचं असल्या पाहिजेत, दिसल्या पाहिजेत.
उदा. एका सदस्याचं वॅक्सिंगबद्दलची कमेंट. अतिशय हीन कमेंट. अरे आम्ही कसं रहायचं तुम्ही कोण सांगणार. यू आर नॉट सपोज्ड टू कमेंट ऑन दॅट. अ‍ॅट लिस्ट नॉट ऑन ओपन फोरम जिथे स्त्री/पुरूष दोघही वाचक आहेत. तुम्ही केस/दाढी/मिशा वाढवणार किंवा नाही वाढवणारं, केसांचा भांग पाडणार किंवा नाही पाडणार, वाटेल तसे पूर्ण/अर्धे/पाव कपडे घालणारं तसंच वावरणार, तोंडावरून हात फिरवून बाहेर पडणार किंवा न फिरवून बाहेर पडणारं हवं तसं, स्वत:च कसंही काळं/गोरं, ढेरपोटं, उंच/बुटकं असंणं हे सगळं नॉर्मल. पुरूष जे काही वागालं ते नॅचरल/नॉर्मल. आणि स्त्रीचं वागणं/बोलणं/दिसणं या कशावरही आले लगेच मापदंड घेऊन. [आता हे असं बोलणही आम्हाला (मला आणि कदाचित बर्‍याच जणींना) प्रशस्त वाटतं नाही. पण आता कशाचा त्रास होतो हे तर सांगायलाचं हवं ना.]

२) नोकरी करणार्‍या स्त्रियांनी सुपरवुमन होऊन नोकरी/घरकाम/मुलं सांभाळणं आवश्यक.
हे खरतरं चुकीच आहे. घर दोघांचं असतं, मुलं दोघांनी जन्माला घातली असतात, त्यामुळं बायको नोकरी करत असेल तर घरकाम (उदा. स्वयंपाक, किचन आवरणं, क्लिनिंग, बिलं भरणं, इतर कामं) /मुलांच करणं हे नवरा-बायको दोघांनीही मिळून सामंजस्यानं करणं अत्यावश्यक (इर्रिस्पे़क्टिव ऑफ कोणाला किती पगार मिळतो), तेही बायकोला मदत म्हणून नव्हे तर ती स्वत:ची जबाबदारी आहे हे जाणून. आणि हे करताना जर दोघांना लोड येत असेल तर कामाला, स्वयंपाकाला बाई लावणे असे पर्याय अवलंबून इतर कामं दोघं मिळून करणे. सो दॅट दोघांपैकी कोणीही जास्त एक्झॉस्ट होणार नाही.

जेव्हा बायको नोकरी करत नसते तेव्हाही (ऑफिसमधून आल्यावर थोडी विश्रांती झाल्यावर) घरकामात/मुलांचं करण्यात सहभाग आवश्यक. अर्थात हे करताना कोणं किती दमतं आहे हे पहाणं आवश्यकं(आता सकाळी निघून ऑफिसमधून यायलाच जर ९/१० वाजत असतील तर तेव्हा कोणीही तेव्हा घरात काम करण्याची अपेक्षा ठेवणार नाही हे उघडचं आहे). कोणावरही जास्तीचा लोड पडला नाही पाहिजे ना बायकोवर ना नवर्‍यावर.

३)असे अजून बरेच मुद्दे आहेत त्यावर नंतर कधीतरी किंवा वेळ मिळेल तेव्हा सविस्तर चर्चा करू.
मुद्दा क्र. २ या प्रकारचे मुद्दे याबाबत कुणी विरोध/विरोधी मत दर्शवलं की इतर सर्व एक होऊन मॉब बनून त्यावर हल्ला करतात.

वरकरणी पहाता हा संपूर्ण मुद्दा क्रमांक(३) वाचकांना अवांतर वाटेल. पण या गोष्टी चूकीच्या रूढी/संकल्पना ज्यांच्या मनात पूर्ण रूजल्या आहेत अशांशी केलेल्या काही विषयांवरच्या चर्चा निरर्थक ठरतात. असो.

(४) अजून एक. मिपाचे कट्टे. मी आजपर्यंत मिपाच्या कट्ट्यांचे अनेक व्रुत्तांत वाचले आहेत.
त्यासंबंधीही मला असे प्रश्न पडतात,
१) मिपाच्या बर्‍याचशा कट्ट्यांवर दारू मस्ट असते का?
२) ९९% मिपा कट्ट्यांवर मुली/स्त्रिया का नसतात?

तर अशा (१), (२), (३), (४) प्रकारच्या कारणांमुळे संस्थळांवर स्त्रियांना मोकळेपणा वाटतं नसावा हे माझं मत.

मस्त कलंदर's picture

12 Mar 2012 - 11:43 pm | मस्त कलंदर

ज्जे ब्बात!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Mar 2012 - 1:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पर्ल, तुमची सगळी मतं पटली नाहीत तरीही तुम्ही अनेक मुद्दे लिहीणं मी टाळत होते ते लिहीलेत याचा आनंद झाला. उदा ती वॅक्सिंगवरची प्रतिक्रिया वाचून तळपायाची आग मस्तकाला गेली होती. पण कोणीतरी त्या गोष्टीचा जाहीर निषेध केला याचा मनापासून आनंद झला.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

13 Mar 2012 - 1:11 am | विश्वनाथ मेहेंदळे

ते तुमचे गुरुजी तिथे कानी कपाळी ओरडून ट्रोल बद्दल जगाला सांगतात आणि तुम्हाला माहित नाही अजून ?? दिव्या खाली अंधार म्हणतात ते उगीच नाही. आता एक काम करा, एव्हाना गुरुदक्षिणा दिली असेल तर परत मागून घ्या, बरेच शिक्षण व्हायचे बाकी आहे तुमचे :-)

(ह घेशील याची खात्री आहे ;-))

Pearl's picture

13 Mar 2012 - 1:25 am | Pearl

आदिती,

जी मतं पटली नाहीत त्यावर चर्चा करायला आवडेल, त्यामुळे कदाचित मला एखादा नवीन व्ह्यू कळेल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Mar 2012 - 3:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तर्री यांच्या धाग्यासंदर्भात आपला मतभेद आहे. त्या संदर्भात तुम्ही आणि शुचित आधीच सुसंवादी विरोधप्रकटन झाल्यामुळे अधिक बोलण्याची गरज नाही. We can agree to disagree. :-)

वॅक्सिंगवरची प्रतिक्रिया वाचून तळपायाची आग मस्तकाला गेली होती.

तुमच्या या बोलण्यातून मला एक किस्सा आठवला. फेसबुकवर माझी अहमदाबादची एक फ्रेंड आहे. ती अशीच स्वतंत्र विचाराची आहे. तिने फेसबुकवर डकवलेले बहुतांशी फोटो हे अगदीच शॉर्ट क्लोथस् मधले आहेत किंबहुना ती आजही असेच फोटो डकवत असते. यावर एका महारथीने ऑब्जेक्शन घेत आणि आपली हिरोगिरी दाखवत तिला असे फोटो येथे डकवू नकोस म्हणून स्पष्ट सांगितले. यावर तिने जो त्याला झापायला सुरवात केली. तो म्हणे तु असे फोटो काढू नको आणि ती म्हणे नालायका तू माझ्यावर बंधन आणणारा आहेस तरी कोण?
जवळजवळ अर्धा तास या कमेंट वर कमेंट चालू होत्या. आणि आंम्ही मात्र यावर हसून-हसून बेहाल झालो होतो! ( अर्थात हे हसणे त्या मुलावर आणि त्याच्यावरच्या गाढवपणाच्या शिव्यांवर होते तिच्यावर नव्हे!) शेवटी शेवटी तर तिने त्याला इतक्या शिव्या हाणायला सुरवात केल्या की तो नंतर "मी तुला बहीण मानतोय आणि प्लिज तू असे कपडे घालू नकोस." असा काकूळतीला येऊन बोलू लागला. आणि त्यानंतरसुद्धा शिव्यांची तिव्रता वाढतच गेल्याने त्याची मग बोलतीच बंद झाली!
आजसुद्धा ती किंचीतही बदललेली नाही. कोणाच्याही बंधनाला किंवा प्रतिक्रियेला न जुमानता ती आजसुद्धा तिला जे पटतेय जे योग्य वाटतेय तेच करते.

तिच्या निडरपणाच्या परखड बोलण्याला खरंच माझा सलाम! :)

जग काहीही म्हणेल हो, पण त्याला काहीच किंमत नाही, कारण जगाला तर बोलायची सवयच असते. पण तुम्ही काय विचार करता हे मात्र खरे महत्वाचे आहे.

दादा कोंडके's picture

12 Mar 2012 - 11:54 pm | दादा कोंडके

याला म्हणतात सौ सोनार की एक सोनारन की! :D

विश्वनाथ मेहेंदळे's picture

13 Mar 2012 - 1:02 am | विश्वनाथ मेहेंदळे

(४) अजून एक. मिपाचे कट्टे. मी आजपर्यंत मिपाच्या कट्ट्यांचे अनेक व्रुत्तांत वाचले आहेत.
त्यासंबंधीही मला असे प्रश्न पडतात,
१) मिपाच्या बर्‍याचशा कट्ट्यांवर दारू मस्ट असते का?
२) ९९% मिपा कट्ट्यांवर मुली/स्त्रिया का नसतात?

गेल्या एका वर्षातील मुंबई कट्ट्यान्चा अभ्यास वाढवा. मदत पाहिजे असेल तर सांगा, मटेरियल पुरवण्याची व्यवस्था स्पा/सूड/किसन करतील.... टेस्टीमोनियल हवे असतील तर मस्त कलंदर किंवा माऊ ताईंना विचारा. बाय द वे, तुम्ही कुठल्या शहरात राहता? मुंबई किंवा पुण्यात असाल तर आता पावेतो रग्गड विनादारू कट्टे झाले आहेत. तुम्हाला इच्छा असेल तर पुढील वेळेस जरूर उपस्थिती लावावी.

आता मुख्य मुद्दा... इथल्या बऱ्याच प्रतिक्रियांचा अंडरकरंट मला खटकतो आहे. म्हणे स्त्रिया जालावर व्यक्त होण्यास कचरतात, घाबरतात. व्यक्त होण्यास जाल हे माझ्या मते सर्वात सेफ माध्यम आहे. कोण येऊन गळा धरणार आहे का ?? त्यातून अगदीच भीती वाटत असेल तर टोपण नावाने काढावा आयडी आणि घालावा धुडगूस. कुणी अडवले आहे ??

मुळात सर्व जण मिळून आपली सर्व बाजूने कुचंबणा करत आहे, ही भावना स्त्रियांनी सोडली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला हक्क मागून घ्या. हे इतर कुणी करणार नाही, तुमचे तुम्हीच केले पाहिजे. शाळेत एक धडा होता आम्हाला. आंबेडकरांनी लिहिलेला अग्रलेख होता. त्यात त्यांनी दलितांना उद्देशून लिहिले होते की "कुणी महात्मा येईल आणि आपला उद्धार करेल या अपेक्षेत राहू नका" इथेही तोच सल्ला लागू आहे. तुम्ही पुरेशा शिकलेल्या आहात. Exposure का काय म्हणतात ते उत्तम आहे तुम्हाला. सात समुद्रापार जाणार्या पण अनेक आहेत इथे. कित्येक पुरुषांपेक्षा कर्तृत्त्ववान पण आहेतच की बऱ्याच जणी. आणि काय पाहिजे ?? इतर कुणाची मदत कशाला पाहिजे ??

केवळ उदाहरण म्हणून कट्ट्याचा मुद्दा घेतो. दारूचे कारण ढाल म्हणून वापरणे आता बंद करावे. दारू असणार नाही असे जाहीर करून त्यावर शतकी भांडणे होऊनही झालेल्या कट्ट्यात केवळ तीन स्त्रिया आल्या होत्या. त्यात पण नवीन फक्त एकच. किती जणींनी इथे ठासून सांगितले आहे की कट्ट्याला दारू नसेल तर आणि तरच येऊ (आणि वाचनाला जागून आल्या आहेत?). इतकेच कशाला, तुम्हाला एकदम अनोळखी ग्रुप मध्ये जायचे नसेल तर महिला कट्टा करा ना. पुरुष दारू चे कट्टे करतात म्हणून आम्हाला जाता येत नाही असे गळे न काढता या पुढे आणि महिला स्पेशल कट्टा अरेंज करा. करताय??? पुढील एका महिन्यात करून दाखवा असा कट्टा, चालेंज आहे आपले. तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोन च्या बाहेर यायचे नाही तर इतर कुणी खेचून बाहेर काढेल अशी अपेक्षा करू नका.

मला आजवर असे दिसून आले आहे की अनेकदा दिलेली कारणे ही निव्वळ धूळफेक असते. निव्वळ पलायनवाद आहे. कारणे देणे बंद करा आणि केवळ सावित्रीबाई फुल्यांचा वारसा न सांगता त्यांच्या एक दशांश हिम्मत दाखवा. कुठे शिव्या, दगड, शेण झेलून पण मुलींना शिकवणाऱ्या त्या आणि कुठे जालावर व्यक्त व्हायला घाबरणारी आजची स्त्री ? शंभर वर्षात बरीच प्रगती आहे.

असो, एखादा शब्द अधिक उणा गेला असेल तर माफ करा !!! नाजूक, कोमल भावनांना दुखावण्याचे पातक नको माझ्या माथी.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Mar 2012 - 1:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

दारू वगळता अगदी १००% सहमत आहे.

(मला रक्तवारूणी आवडते. रोजच्या रोज मी बाटली उघडून बसत नाही, आणि त्याची सक्तीही नाही पण मुद्दाम ठरवून ती का वगळा? स्त्रिया ( किंवा भारतीय स्त्रिया ) दारू पीत नाहीत हा आणखी एक स्टीरीओटाईप बनू नये.)

म्हणे स्त्रिया जालावर व्यक्त होण्यास कचरतात, घाबरतात.

निश्चितच त्या कचरतात. विमे, तुमचा मुद्दा मान्य असला तरीही थोडं त्यांच्या कलाने घेऊनही बराच पल्ला गाठता येईल असं वाटतं.

>>स्त्रिया ( किंवा भारतीय स्त्रिया ) दारू पीत नाहीत हा आणखी एक स्टीरीओटाईप बनू नये
>>
मान्य.
असं काही मला म्हणायचं नव्हतं की भारतीय स्त्रिया दारू पीत नाहीत, किंवा त्यांनी दारू पिऊ नये.
किंवा असंही म्हणायचं नाहिये पुरूषांनी दारू पिऊ नये. हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण मी वाचलेल्या बर्‍याचशा कट्टा वृत्तांत्तात दारू हा अविभाज्य घटक वाटला. दारू जर शीतपेयासारखी घेतली आणि त्यानंतर शीतपेय प्यायल्यासारखेच वागले ;-) तर दारूला विरोध नाही. आणि दारूला विरोध नाही हे झालं माझं मत.
पण या बाबतीत बाकी स्त्रियांचे काय मत आहे ते मला माहिती नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Mar 2012 - 1:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मग तर काय प्रश्नच नाही. आपली सहमतीच झाली की!

साधारण अशाच संदर्भात ऐसी अक्षरेवर धनंजयने मार्मिक प्रतिसाद लिहीला आहे:
जे लोक नियमित दारू पितात, त्यांच्यापैकी पुष्कळ लोकांना (१) किती प्याल्यावर थांबायचे ते कळते, अथवा (२) चिकार पिऊनसुद्धा दारू तितकी चढत नाही.

मला कधीमधी चढण्यासाठी पाणीही पुरतं! ;-)

>>गेल्या एका वर्षातील मुंबई कट्ट्यान्चा अभ्यास वाढवा. मदत पाहिजे असेल तर सांगा, मटेरियल पुरवण्याची व्यवस्था स्पा/सूड/किसन करतील.... टेस्टीमोनियल हवे असतील तर मस्त कलंदर किंवा माऊ ताईंना विचारा.>>

असं होत असेल तर मस्तचं. मग मी माझे शब्द मागे घेते.
असे कट्टे होतात हे वाचून आनंद झाला.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Mar 2012 - 2:36 am | निनाद मुक्काम प...

महिला स्पेशल कट्टा व टोपण नावाने आयडी ह्या विमेंच्या दोन्ही सूचना अफलातून आहेत.

माझ्या मते आभसी जगतात मुशाफिरी सुरु केल्यावर कोणत्याही सदस्याला आभसी जगत व वास्तविक जगतात गल्लत होण्याची शक्यता असते.

माझ्या मते महिलांना आधीच सुपर वुमन ही आभासी संकल्पना ज्यात तिने ह्या
चंगळवादी संस्कृतीत कर्तबगार महिला व आदर्श गृहिणी असे मिश्रण असलेली आधुनिक मदर इंडिया होणे
अपेक्षित असते.
वास्तविक जीवनात तारेवरची कसरत करत असतांना एखादी महिला जर वाचनमात्र सदस्य असेल तर कुठल्याही संस्थळावर होणारे रणकंदन किंवा क्वचित आढळणारी कंपूबाजी ह्यामुळे आहे तो त्रास कमी आहे का, तर आभासी जगतात अजून तो निर्माण करायचा ह्या विचाराने त्या बहुदा सक्रीय सहभाग घेत नाही.

उलट माझ्या मते येथे अभिव्यक्त झाल्यास तुमच्या डोक्यातील ताणाचा निचरा होतो. व आभसी जगतातील फुकट शिकवणीत डिप्लोमसी व लॉबिंग आणी स्वताच्या लेखनाचे ( प्रोडक्ट) चे मार्केटिंग व त्याचे फंडे

सतत प्रकाश झोतात राहण्याची कला ह्याच बरोबर सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक आत्मविश्वास मिळतो.

तेव्हा महिलांनी महिलांना उत्तेजन देऊन लिखाणास प्रवृत्त केले पाहिजे.माझ्या पाहणीत अनेक दिवाळी अंकात, किंवा वृत्त पत्रात
वयाने जेष्ठ महिला लेखिकांचा सहभाग जास्त असतो.व त्यांचा महिला वाचकवर्ग देखील असतो. पण संगणकावर लिहितांना त्यांची गोची होते. म्हणून त्या नव्या युगातील आभासी जगतापासून लांब राहतात. येथे लेखन विनामुल्य जरी प्रकाशित होत असले तरी ते प्रकशित होण्यासाठी खात्री असते. व हवे तेवढे लिखाण हव्या त्या विषयावर त्या येथे करू शकतात हा मुद्दा त्यांना समजावून सांगितल्यास आभसी जगतात महिला टक्का वाढेल.

त्यांना संगणकावर मराठीत कसे लिहीवे ह्याबाबत मार्गदर्शन करणारी पुस्तिका किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शन केले तर त्यांना नवीन वाचकवर्ग तर वाचकांना दर्जेदार लेखन वाचायला मिळेल.
जाता जाता
मराठी संस्थळावर वावरल्याने वास्तविक जीवनात घडलेले परिवर्तन किंवा फायदे ,तोटे त्यांचे आपल्या आयुष्यातील महत्व किंवा स्थान ह्यावर साधक बाधक चर्चा ,महाचर्चा करण्यातही एखादा लेख किंवा काथ्याकुट करण्यासाठी शतकी प्रतिक्रिया मिळवणारा जालीम विषय आहे. ह्यावर जाणकार व तज्ञ व्यक्तींनी लक्ष द्यावे.

प्राजु's picture

13 Mar 2012 - 1:20 am | प्राजु

सोल्लिड प्रतिसाद!! मस्त!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2012 - 6:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

८ मार्चला थोडी का होईना चर्चा घडावी म्हणून घाईघाईत लिहील्यामुळे काही मुद्दे सुटले आहेत. त्यातले काही इथे लिहीते.

इंटरनेट-वापरकर्ती घरं सुशिक्षित असतील असं समजून, सांख्यिकदृष्ट्या नेट वापर करणार्‍यांमधे स्त्रिया आणि पुरूषांचं प्रमाण ढोबळमानाने समान असेल अशी माझी अपेक्षा होती. आपलं लिखाण ब्लॉगांपुरतेच मर्यादित ठेवणार्‍यात किंवा मराठीतून, इंटरनेटवर व्यक्त होणार्‍या व्यक्तींमधे स्त्रिया आणि पुरूषांचं प्रमाण थोड्याबहुत फरकाने समान असेल हे एक गृहीतक. (चुकीचं असल्यास का ते वाचायलाही आवडेल.)
विचार करण्यासाठी आणि/किंवा इंटरनेटवर किंवा कुठेही व्यक्त होण्यासाठी, विशेषतः राजकीय, सामाजिक, आर्थिक, चर्चा आणि कला या संदर्भात विचार करता स्त्रिया आणि पुरूष मुळात वेगळे नसतात हे ही मागच्याच शतकात पुढे आलेलं आहे. तर स्त्रिया एकूणच कमी प्रमाणात का व्यक्त होतात याबद्दल थोडी चर्चा करणं मला जिव्हाळ्याचे वाटते.

विशेषतः हा आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या एलिट म्हणावा असा गट आहे, जो मराठी इंटरनेटवर वावरतो. सामान्यतः समाजाची मूल्य, दिशा या वर्गातून ठरवली जाते. (पूर्वीही ब्राह्मणांना एलिट समजले जायचे आणि त्यांच्या घरच्या रूढींचे पालन करणे फॅशनेबल समजले जायचे.) त्यामुळे या वर्गाची मतं काय आहे हा विचार करणं मला महत्त्वाचं वाटतं. 'सुपरमॉम' संस्कृतीने आधीच काही स्त्रियांच्या व्यक्तीमत्त्वाचे नुकसान केलेले आहे; ते अधिक प्रमाणात झिरपू नये असं मला मनापासून वाटतं आणि त्यादृष्टीने मला अशा व्यक्ती ज्या समाजगटांत अधिक प्रमाणात आढळतात त्या लोकांची मतं महत्त्वाची वाटतात.

"एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं" हे थोडं जुनंच झालं. त्याच धर्तीवर एक स्त्री घराबाहेरही जे जग आहे त्याबाबतीत जागरूक झाल्यास संपूर्ण कुटुंबात ही जागरूकता येऊ शकते.

निदान अशा प्रकारच्या चर्चांमधून काही चुकतं आहे का असा विचार झाला तरी खूप.

मराठमोळा: स्त्रीमुक्ती, समान हक्क हे विषय या विषयापासून वेगळे निघूच शकत नाहीत.
मायबोलीवर आलेला आणि मला अतिशय आवडलेला एक प्रतिसाद आणि त्यावर माझी प्रतिक्रिया इथे डकवते आहे:
मृदुला म्हणतातः

मराठी इंटरनेट साइटची मनोवृत्ती अमूक असे म्हणता येणार नाही. त्यावर लिहिणार्‍या लोकांविषयी काही संख्याशास्त्रीय निष्कर्ष काढता येऊ शकेल.

माझ्या अनुभवात असे आले आहे की तात्रिक, राजकीय, क्रीडाविषयक अश्या (पूर्वी पुरुषप्रधान) चर्चांत हल्ली स्त्रियांचा जवळपास सारखाच सहभाग दिसून येतो. पण स्वयंपाक, सुशोभन, संगोपन, प्रसाधन अश्या (स्त्रीप्रधान) चर्चांत पुरुषांचे प्रमाण कमी दिसते.

माझं उत्तरः

मृदुलाच्या प्रतिसादामधे मला जी शंका होती तीच पुन्हा खरी आहे का काय असं वाटतंय. पूर्वीच्या पुरूषी चर्चांमधे आता स्त्रियांनाही रस निर्माण झालेला आहे. आपल्या घराबाहेरही जग आहे त्याची जाणीव स्त्रियांना झाली आहे, होते आहे; ही गोष्ट मला पॉझिटीव्ह वाटते. पण घर, मुलं यात आपलीही समान जबाबदारी आहे याबद्दल पुरूषांमधे कितपत जागृती आहे याबाबत शंका आहे.

या चर्चेत विचार करत असलेल्या सर्वच संस्थळांवर ही चर्चा सुरू केलेली आहे. त्यामुळे प्रतिसाद चोप्य-पस्ते करण्याचा मोह आवरत नाही; त्यातून तेच तेच पुन्हा टाईप करण्याचे कष्टही वाचवते आहे.

नगरीनिरंजन's picture

9 Mar 2012 - 8:20 am | नगरीनिरंजन

पूर्वीच्या पुरूषी चर्चांमधे आता स्त्रियांनाही रस निर्माण झालेला आहे.

सरसकट विधान वाटते आहे.

पण घर, मुलं यात आपलीही समान जबाबदारी आहे याबद्दल पुरूषांमधे कितपत जागृती आहे याबाबत शंका आहे.

समान जबाबदारी म्हणजे प्रत्येक काम दोघांनी अर्धे अर्धे करायचे की वेगवेगळ्या कामांची वाटणी करायची हे स्पष्ट केल्यास त्याप्रमाणे विचारांना दिशा मिळेल.

बाकी उद्बोधक चर्चा वाचत आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2012 - 8:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

दुर्दैवाने एकेकाळी सरसकट विधानं करता येण्याजोगी परिस्थिती होती (किंवा सुदैवाने आता सरसकटीकरण कठीण आहे). आजही महिलांसाठी म्हणून चालवली जाणारी असंख्य प्रकाशनं तद्दन भंपकच असतात ना?

समान जबाबदारी म्हणजे प्रत्येक काम दोघांनी अर्धे अर्धे करायचे की वेगवेगळ्या कामांची वाटणी करायची हे स्पष्ट केल्यास त्याप्रमाणे विचारांना दिशा मिळेल.

हा खासगी आयुष्यात अदितीचा हस्तक्षेप ठरेल. ;-)
माझं व्यक्तिगत मत चाक पुन्हा पुन्हा शोधू नये, असं आहे.

वरच्या प्रतिसादात 'माझं उत्तर' च्या आधीचा परिच्छेदही मृदुला यांच्या प्रतिसादामधलाच आहे.

लेख संपादित करून दिल्याबद्दल आभार.

नगरीनिरंजन's picture

9 Mar 2012 - 8:42 am | नगरीनिरंजन

हा खासगी आयुष्यात अदितीचा हस्तक्षेप ठरेल.

खासगी बाबतीत सल्ला विचारला नव्हता हे नम्रपणे ध्यानात आणून देऊ इच्छितो. :)
नोकरी करणे म्हणजे स्वातंत्र्य अशा विचारांनी पछाडलेल्या काही 'केसेस' पाहण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे असा प्रश्न पडतो.

माझं व्यक्तिगत मत दुसर्‍याच्या अनुकरणाला स्वातंत्र्य म्हणू नये असे आहे. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2012 - 9:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सदर संदर्भात स्वातंत्र्य व्यक्तीच्या मनोधारणेवर ठरतं असं माझं मत आहे. एरवी बिकीनी घालून बिनधास्त मिरवणारी स्त्री बुरसटलेल्या विचारांची असू शकते आणि नऊवारी साडी नेसणारी पुरोगामी, स्वतंत्र मनोवृत्तीची असू शकते. (मेट्रोसेक्शुअल पुरूषही बुरसटलेल्या विचारांचा असू शकेल आणि मुलांची मुंज करणारा पुरोगामी)

मला निदान आत्ता पडलेला प्रश्न स्वातंत्र्याबद्दल फारसा नसून व्यक्त होण्याच्या उदासीनतेमधे असणार्‍या जेंडर बायसबद्दल आहे.

नगरीनिरंजन's picture

9 Mar 2012 - 9:16 am | नगरीनिरंजन

पडलेला प्रश्न स्वातंत्र्याबद्दल फारसा नसून व्यक्त होण्याच्या उदासीनतेमधे असणार्‍या जेंडर बायसबद्दल आहे

मलाही असंच वाटत होतं, पण (सरसकट) पुरुषांच्या जबाबदारीच्या समजेबद्दलच्या शंका व्यक्त केलेले प्रतिसाद अंतर्भूत झाल्यामुळे काही प्रश्न पडले ते विचारले एवढेच. असो.
अवांतर थांबवतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2012 - 10:37 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुरुषांच्या जबाबदारीच्या समजेबद्दलच्या शंका व्यक्त केलेले प्रतिसाद अंतर्भूत झाल्यामुळे काही प्रश्न पडले ते विचारले एवढेच.

मायबोलीवर बालसंगोपन, सुशोभन अशा प्रकारचे अनेक धागे असतात, इतर कोणत्याही संस्थळापेक्षा जास्त असं मला दिसतं. त्यावर मृदुला यांच्या निरीक्षणाच्या विरुद्ध काही डेटा, निरीक्षण आहे का?

अतिशय निगुतीने वेगवेगळे पदार्थ बनवणारे गणपा आणि पांथस्थ हा संस्थळांवर अपवादच दिसतो. पाकृ विभागात वैविध्यपूर्ण लिखाण करणार्‍या स्त्री आयडींची संख्या जास्त दिसते.

नगरीनिरंजन's picture

9 Mar 2012 - 11:23 am | नगरीनिरंजन

मायबोलीवर बालसंगोपन, सुशोभन अशा प्रकारचे अनेक धागे असतात, इतर कोणत्याही संस्थळापेक्षा जास्त असं मला दिसतं. त्यावर मृदुला यांच्या निरीक्षणाच्या विरुद्ध काही डेटा, निरीक्षण आहे का?

नाही.

अतिशय निगुतीने वेगवेगळे पदार्थ बनवणारे गणपा आणि पांथस्थ हा संस्थळांवर अपवादच दिसतो. पाकृ विभागात वैविध्यपूर्ण लिखाण करणार्‍या स्त्री आयडींची संख्या जास्त दिसते.

बरोबर.
पण म्हणून घर आणि मुले यात आपली समान जबाबदारी आहे याची इतरांमध्ये जागृती नाही असा निष्कर्ष निघत नाही.
शिवाय पदार्थ बनवण्याची आवड असणारे पण त्यावर लिहीण्याची आवड नसलेलेही पुरुष असतीलच की. मुळात अशा विषयांमध्ये रुची असणाराच पुरुष जबाबदार असतो याला काही आधार आहे का?
हा सगळा व्यक्तिगत आवडी-निवडींचा मामला आहे त्यावरून लिंगभेदाच्या अभिव्यक्तीवरील परिणामांबद्दलच फक्त निष्कर्ष काढणे योग्य होईल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Mar 2012 - 8:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आवड असणार्‍या विषयांवर प्रतिसाद दिला जातो आणि नावडीचे विषय टाळले जातात. यातही लिंगभेद असेल का?

आवडीच्या विषयावर प्रतिसाद न देण्यासाठी काही कारणं असतील, लिखाण न आवडणं किंवा लेखकाशी वाकडं असणं. पण सातत्य सांख्यिकीत महत्त्वाचं ठरतं.
फार रस नसलेल्या विषयात इतर कारणांमुळे प्रतिसाद दिला जातो. गणपाच्या अनेक पाकृंना (ज्या मी बनवण्याची अजिबात शक्यताही नाही) फोटो, सांगायची पद्धत आवडली म्हणून मी अनेकदा प्रतिसाद दिलेले आहेत.
अवांतरः झक्कास रेसिप्या टाकणार्‍या गणपाला इतरही काही मतं आहेत हे माहित आहे. पाकृ विभागातल्या इतर किती लोकांना काही मतं आहेत हे माहित आहे?

नगरीनिरंजन's picture

12 Mar 2012 - 9:23 am | नगरीनिरंजन

आवड असणार्‍या विषयांवर प्रतिसाद दिला जातो आणि नावडीचे विषय टाळले जातात. यातही लिंगभेद असेल का?

कदाचित असेल. पण फक्त लिंगभेदच असेल असे नाही. माझ्या बहुतेक आवडीच्या विषयांवर मी "वा वा छान छान" व्यतिरिक्त प्रतिसाद देत नाही कारण त्यावर लिहीण्यापेक्षा ती गोष्ट करणे मला महत्त्वाचे वाटते. पण त्याचवेळी न आवडलेल्या विषयांवर (किंवा विषयांविरुद्ध) मी बर्‍याचवेळा व्यर्थपणे माझी मते लिहीत बसण्यास उद्युक्त होतो.
सगळ्या पुरुषांचे असे होत असेल असे नाही. शेवटी व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.

पण सातत्य सांख्यिकीत महत्त्वाचं ठरतं.

हे खरं असलं तरी सगळ्या गोष्टी सांख्यिकीने पूर्णत: सिद्ध होणार नाहीत. नुसत्या स्त्रियांचा मराठी आंजावरील कमी सहभाग आणि स्त्रियांची एकूण प्रगती यांच्यातला परस्परसंबंध (Correlation) ठरवणे तर खूपच विदाखनन (Data Mining) केल्यासारखे होईल.
एकूणच आंतरजाल सुविधा असणे याचा एकवेळ स्त्रियांच्या प्रगतीशी परस्परसंबंध असू शकतो. पण आंतरजालावर वावर असणार्‍या स्त्रिया मराठी आंजावर वावरत नसल्या तर त्याची भाषिक, वैयक्तिक कारणे असतील. त्यावरून लिंगभेदाधारित निष्कर्ष काढला तरी त्याची विश्वासार्हता किती असेल ही शंकाच आहे.
अर्थात हे माझे व्यक्तिगत मत झाले.

पाकृ विभागातल्या इतर किती लोकांना काही मतं आहेत हे माहित आहे?

त्यांना पाकृ टाकण्यातच रस असेल आणि इतर चर्चांमध्ये रस नसेल तर त्यावरून काही लिंगभेदाधारित निष्कर्ष निघाला तरी आवडी-निवडींव्यतिरिक्त स्त्रियांच्या स्थितीसंबंधी निष्कर्ष निघत नाही. काही स्त्रियांना पुरुषी चर्चांमध्ये रस उत्पन्न झाला म्हणून सगळ्यांनाच तो रस उत्पन्न झाला आहे असे नाही.
त्याचवेळी घरी उत्तम स्वयंपाक करू शकणारे किती पुरुष इथे पाकृ टाकत नाहीत हे माहित आहे?

पैसा's picture

9 Mar 2012 - 8:00 am | पैसा

ही फक्त लेख पाहिल्याची पोच. सविस्तर प्रतिसाद हापिसातून आल्यावर देईन.

चौकटराजा's picture

9 Mar 2012 - 9:31 am | चौकटराजा

आंतरजालावर स्त्रियांचा वावर कमी आहे ? पुरूषांपेक्षा नक्क्क्क्क्क्क्क्कीच कमी.
गेल्या ५० वर्षात स्त्री जात मोडीत जात असून स्त्रैण शरीर रचना असलेली मानव असे तिचे रूपांतर होत आहे. अजूनही ती सणवार, व्रत वैकल्य
स्वयंपाक झाडलोट, दागिने, साड्या, सौंदर्यप्रसाधने, भजनी मंडळ, स्त्री अकाचे वाचन, रविवारचा नवा पदार्थ, नवरा सोडून प्रत्येकात " पर" म्हणजे मनानेही लांव ठेवण्याच्या लायकीचा पुरूष पहात राहाणे .ई मधून तिची सुटका करून घेउ शकत नाही. मुले नको मातृत्व नको असे
म्हणणे म्हणजे स्त्री चे माणसात रूपांतर होणे नव्हे . तर वरील गोष्टी आपल्यासाठीचे आहेत म्हणून परंपरेने त्याना जवळ करीत रहाणे म्हणजे स्वीकृत दास्य ! सार्वजनिक वर्तमानपत्रे ठेवली असतील तिथे किती स्त्रिया पेपर वाचायला बिन्दिक्कतपणे येतात?. पेपर वाचायची आवड स्त्री
मधे कमी म्हणून की तिथे अधिक संख्येने पुरुष हजर असतात म्हणून ? दोन्ही ला स्त्री वर्गाचे उत्तर हो असेल तर दास्याचा दोष कुणाचा ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2012 - 10:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

गेल्या ५० वर्षात स्त्री जात मोडीत जात असून स्त्रैण शरीर रचना असलेली मानव असे तिचे रूपांतर होत आहे.

Sorry! What?
कदाचित तुमचे शब्द जे सुचवत आहेत ते तुम्हाला म्हणायचं नाही. "शरीररचना वगळता स्त्री-पुरूषांत काही फरक नाही" असं काही म्हणण्यासाठी ही वाक्यरचना आवडली नाही.

मुले नको मातृत्व नको असे म्हणणे म्हणजे स्त्री चे माणसात रूपांतर होणे नव्हे

मुले असणे म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता असते, वात्सल्य ही स्त्रीची अत्यावश्यक गरज आहे असं काही लिखाण आजही आजूबाजूला दिसतं. मुलं वाढवणं हा एक आनंदाचा भाग असतो, आवडता पदार्थ खाण्यासारखंच आणि काही व्यक्तींना मुलं वाढवण्यात फारसा आनंद असतो असं वाटत नाही हा विचार खूप अलिकडचा वाटतो, पुरूषांच्याही बाबतीत. समज येण्याच्या आतच लग्न झालं आणि लग्न झालं तर मुलं झालीच अशीच बहुसंख्या दिसण्याचं काळ फार जुना नाही, नाही का?

दास्याचा दोष कुणाचा ?

पुरूषप्रधान व्यवस्थेचा आणि व्यवस्थेला बिनडोकपणे शरण जाणार्‍या सर्व स्त्री-पुरूषांचा.
हा बिनडोकपणा आजही इंटरनेट सुशिक्षित, एलिट गटातही दिसतो असा भीतीदायक विचार आल्यामुळे लोकांचे विचार काय आहेत असा प्रश्न पडला.

मराठमोळा's picture

9 Mar 2012 - 11:12 am | मराठमोळा

>>हा बिनडोकपणा आजही इंटरनेट सुशिक्षित, एलिट गटातही दिसतो असा भीतीदायक विचार आल्यामुळे लोकांचे विचार काय आहेत असा प्रश्न पडला.

कृपया "बिनडोक" सारखे शब्द जपून वापरा. आपण आपल्या स्वकीयांचा किंवा कुणाचा अपमान तर करत नाही आहोत याची काळजी घ्यावी.

माझ्या स्वतःच्या माहितीत उच्चशिक्षित, उच्च्पदस्थ स्त्रिया आहेत ज्यांच्या व्यक्तीमत्वाचे नुकसान परंपरा जपल्याने किंवा पुरुषांनी स्वयंपाक न केल्याने झाले असे त्यांना वाटत नाहीत. जर कुणी सुखी समाधानी असेल तर कोणत्या संस्कृतीला शरण जायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न.

वर ननि यांनी म्हंटल्याप्रमाणे कामे जर वाटून घेतली तर समानता येतेच. पुरुषांनी त्यासाठी स्वयंपाक केला पाहिजे असे काही नाही. उद्या जर पुरुषांनी लिपस्टीक, पावडर वापरावी, फ्रॉक घालावे, बाळाला जन्म द्यावा, त्याला पाजावे अशी अपेक्षा केली गेली तर ती रास्त ठरणार नाही. काही गोष्टी नैसर्गिक असतात. जसे सुशोभीकरण, रंगसंगतीची समज यात मुळातच नैसर्गिकरित्या स्त्रियांना मिळणार्‍या वरदानात्मक गोष्टी आहेत. (आता पर्यंत तरी)
बदल होत आहेत, पण ते एकदम होणार नाहीत, पिढ्या अन पिढ्या जातात समाजात बदल होताना.

सोत्रि's picture

9 Mar 2012 - 11:30 am | सोत्रि

कामे जर वाटून घेतली तर समानता येतेच. पुरुषांनी त्यासाठी स्वयंपाकच केला पाहिजे असे काही नाही. उद्या जर पुरुषांनी लिपस्टीक, पावडर वापरावी, फ्रॉक घालावे, बाळाला जन्म द्यावा, त्याला पाजावे अशी अपेक्षा केली गेली तर ती रास्त ठरणार नाही. काही गोष्टी नैसर्गिक असतात.

परफेक्ट !

- (कामे वाटून घेणारा*) सोकाजी

* ह्यावर माझ्या बायकोचे मत सर्वस्वी भिन्न असू शकेल :D

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2012 - 11:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बिनडोक हा शब्द आवडला नसेल तर विचारशून्य हा शब्दही मला आवडतो. बिनडोक हा शब्द मी मागे घेण्यासाठी तयार आहे.

उद्या जर पुरुषांनी लिपस्टीक, पावडर वापरावी, फ्रॉक घालावे, बाळाला जन्म द्यावा, त्याला पाजावे अशी अपेक्षा केली गेली तर ती रास्त ठरणार नाही.

कोणत्याही गोष्टीचा ताप येणंही मला विचाररहित वाटतं. तुम्ही कर्करोगाबद्दल बोलत आहात.
पण स्त्रियांसारखे लांबलचक कुडते घालणं, भारतीय किंवा हवाई प्रिंटचे शर्ट वापरणं, स्त्रियांप्रमाणेच डोक्यावरचे केस वाढवणं आणि चेहेर्‍यावरचे भुवया वगळून बाकीचे केस काढणे (हे स्त्रियांच्या चेहेर्‍याशी साम्य) इ. इ. अनेक गोष्टी माझ्या ओळखीतले अनेक पुरूष करतात. आणि आकर्षकही दिसतात. डोक्यावरचे* केस अगदी पेराएवढे ठेवणार्‍या काही मुली पाहिल्या आहेत, त्याही प्रचंड आकर्षक दिसतात.

सुशोभीकरण, रंगसंगतीची समज यात मुळातच नैसर्गिकरित्या स्त्रियांना मिळणार्‍या वरदानात्मक गोष्टी आहेत.

कधीपासून? जगप्रसिद्ध चित्रकार, मूर्तीकार, कलाकार यांच्यात जेंडर बायस कुठे दिसतो?

*काय करणार, इथे एक्सप्लिसिटली सगळे शब्द नाही वापरले तर अनर्थ आणि त्यातून विनोदशून्य अवांतर होण्याचीच भीती वाटते.

मराठमोळा's picture

9 Mar 2012 - 4:52 pm | मराठमोळा

>>*काय करणार, इथे एक्सप्लिसिटली सगळे शब्द नाही वापरले तर अनर्थ आणि त्यातून विनोदशून्य अवांतर होण्याचीच भीती वाटते.

मलाही फार उफाळुन येत आहे पण पुन्हा नर्थ आणि त्यातून विनोदशून्य अवांतर होण्याचीच भीती वाटते.

मराठमोळा's picture

9 Mar 2012 - 7:44 pm | मराठमोळा

अदिती,

>>माझ्या स्वतःच्या माहितीत उच्चशिक्षित, उच्च्पदस्थ स्त्रिया आहेत ज्यांच्या व्यक्तीमत्वाचे नुकसान परंपरा जपल्याने किंवा पुरुषांनी स्वयंपाक न केल्याने झाले असे त्यांना वाटत नाहीत. जर कुणी सुखी समाधानी असेल तर कोणत्या संस्कृतीला शरण जायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न.

याला उत्तर नाही दिलेत? डायरेक्ट माझ्या सहीवर हल्ला केलात?

>>कधीपासून? जगप्रसिद्ध चित्रकार, मूर्तीकार, कलाकार यांच्यात जेंडर बायस कुठे दिसतो?
मग स्वयंपाक, सुशोभीकरण, ई. यात तुम्हाला जेंडर बायस कुठे दिसला?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Mar 2012 - 4:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

याला उत्तर नाही दिलेत?

०. मुद्दा सोडून बोलण्यात मला फार रस नाही.
१. तरीही, मी सांख्यिकी विदाबद्दल बोलते आहे, एकेका माणसाबद्दल नाही. ही सांख्यिकीचा अभ्यास करण्याची पद्धत नाही.
२. तुमच्या ओळखीतल्या एकाही मनुष्याला मी अजिबात ओळखत नाही तेव्हा त्यांच्याबद्दल बोलणे इष्ट नाही.
३. लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यात नाक खुपसायला मला आवडत नाही. ओळखीतले असोत वा अनोळखी.
४. तुम्ही दिलेली माहिती संपूर्ण माहिती आहे असे समजल्यास माझा जो तर्क आहे तो तुम्हाला आवडणार नाही.
आणखी स्पष्ट उत्तर हवंय का?

डायरेक्ट माझ्या सहीवर हल्ला केलात?

तुमच्याच भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तो तुम्हाला हल्ला वाटत असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. मला कोणी गणित, पदार्थविज्ञान, खगोलशास्त्राच्या भाषेत सांगितलं तर तो हल्ला वाटत नाही.
ताप येणं, कर्करोग वगैरे शब्द इतर कोणी वापरू नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर ते कठीण आहे; इतर कोणी वापरले तर हल्ला होतो असं वाटत असेल तर सही बदला.

मग स्वयंपाक, सुशोभीकरण, ई. यात तुम्हाला जेंडर बायस कुठे दिसला?

ते विधान मृदुला यांचं होतं. मी दुजोरा दिला तो तत्संबंधी धाग्यांमधे अ‍ॅक्टीव्ह सदस्य बहुतांश स्त्रिया असतात; पुरूष सदस्यांचं प्रमाण कमी असतं या निरीक्षणाला. त्यालाच आंजावरचा जेंडर बायस असे नाव दिले. प्रत्यक्षात हे पुरूष घरात काय करतात हे मी पहायला गेले नाही, जाणार नाही. कारण पुन्हा वरचा मुद्दा क्रमांक ३.

कवितानागेश's picture

9 Mar 2012 - 12:00 pm | कवितानागेश

उद्या जर पुरुषांनी लिपस्टीक, पावडर वापरावी, फ्रॉक घालावे, बाळाला जन्म द्यावा, त्याला पाजावे अशी अपेक्षा केली गेली तर ती रास्त ठरणार नाही. काही गोष्टी नैसर्गिक असतात.>
JUNIOR आठवला! ;)

Nile's picture

9 Mar 2012 - 12:39 pm | Nile

कृपया "बिनडोक" सारखे शब्द जपून वापरा. आपण आपल्या स्वकीयांचा किंवा कुणाचा अपमान तर करत नाही आहोत याची काळजी घ्यावी.

हे काय नविन? अहो आम्ही तर जाणूनबूजून आणि काळजीपूर्वक अपमान करतो. आमचे अनेक स्वकीय बिनडोकच काय अगदी गाढव आहेत. इतरांचा अपमान तर आम्ही अगदी दिलखुलासपणे करतो. अजून काय प्रॉब्लेम असेल तर सांगा!!!

मराठमोळा's picture

9 Mar 2012 - 4:32 pm | मराठमोळा

>>अहो आम्ही तर जाणूनबूजून आणि काळजीपूर्वक अपमान करतो. आमचे अनेक स्वकीय बिनडोकच काय अगदी गाढव आहेत. इतरांचा अपमान तर आम्ही अगदी दिलखुलासपणे करतो. अजून काय प्रॉब्लेम असेल तर सांगा!!!

अवांतर नको,
उगाच आयडी/लेख/प्रतिसाद ब्लॉक होतात.

Nile's picture

9 Mar 2012 - 8:17 pm | Nile

तुम्ही तुमच्या स्वकीयांच्या अपमानाची काळजी करा.. आमच्या आयडीच्या बॅन होण्याची चिंता करू नका.

चौकटराजा's picture

9 Mar 2012 - 12:24 pm | चौकटराजा

"शरीररचना वगळता स्त्री-पुरूषांत काही फरक नाही" असं काही म्हणण्यासाठी ही वाक्यरचना आवडली नाही.
फरक नाही कसा? आहे ना ! पण बराचसा नाही व थोडासा आहे . स्स्त्री पाताळयंत्री लोभी खोटारडी झोपाळू , आळशी, गैरसमजास अनुकूलता या साख्या या बाबतीत पुरुसासारखीच आहे व असते. फक्त स्त्रीच मत्सरी असते यास माझा विरोध आहे.
फरक कुठे ? ती नैसर्गिक दृष्ट्या मंद्कामी आहे . तिची वासना फुलण्यासाठी वेळ लागतो. साहजिकच सुन्दर स्त्री गेली तर पुरूष तिच्याकडे वळून बघतो तसे ती करीत नाही.कारण तिची वासना पट्कन पेट घेत नसते. आरशात सारखे पहाणे .मॉचिंग ची आवड अशी दुसरी काही फुटकळ उदाहरणे सध्या पुरेत !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Mar 2012 - 3:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्त्रिया आणि पुरूषांचे लैंगिक वर्तन किंवा कामोत्तेजन याबद्दल चर्चा सुरू केलेली नसताना हा विषय तिथे का गेला हे मला समजलं नाही. माझ्या मते, चर्चेचा विषय स्त्री आणि पुरूष यांचे संस्थळांवर व्यक्त होण्याचे प्रमाण विषम आहे असा आहे. संस्थळांवर व्यक्त होण्यासाठी फक्त खांद्यावरच्या अवयवाचा विचार होतो आणि त्या बाबतीत स्त्री आणि पुरूषांत काहीही फरक नसतो, असं संबंधित विज्ञान सांगतं.

चौकटराजा's picture

10 Mar 2012 - 9:43 am | चौकटराजा

कारण , काम व निर्णयात्मक वर्तणूक यांचा संबध आहे असे मीच नाही तर सिग्मंड फ्राईड ही म्हणतो( तसे वर्‍याच वर्षापूर्वी वाचले आहे). चूक असल्यास सांगावे . नाहीतर सार्वजनिक पेपर चे ठिकाणी पेपर वाचन हे खांद्याच्या वरचेच काम चालते ना ? मग तिथे ललनांचा वावर कमी का?
अण्णांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची सुरूवात होती. २००१ चा सुमार. शनिवार वाड्या समोर सभा. मी हजर होतो. निरिक्षण- महिलांची संख्या
सभेस जास्तीत जास्त २ प्रतिशत. एकूण लोकसंख्येतील हजारी स्त्रिया ९५० धरल्या तर किती कमी पडल्या बरे ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Mar 2012 - 1:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

फ्रॉईडची अनेक मतं निखालस चूक आहेत हे सिद्ध होऊनही अनेक दशकं उलटून गेली आहेत. सिमॉन दी बोव्व्हारने 'द सेकंड सेक्स'मधे त्या मतांचा अगदी व्यवस्थित समाचार घेतलेला आहे. तेही १९४० च्या दशकाच्या उत्तरार्धात.
तेव्हा फ्रॉईड सरसकट सगळीकडे लागू पडतो हे अमान्य. स्त्रियांच्या व्यक्ततेचा आणि संभोग, शरीररचना यांचा काहीही संबंध नाही.

चौकटराजा's picture

13 Mar 2012 - 9:37 am | चौकटराजा

बरं बाई ,आपण फ्रॉईड व सेकंड सेक्स ( मीही वाचलेले आहे ४० वर्षापूर्वी) सोडू . माझे दोन प्रश्न आपण बायपास केलेले दिसतात. ते पुन्हा ठेवत आहे .नाहीतर सार्वजनिक पेपर चे ठिकाणी पेपर वाचन हे खांद्याच्या वरचेच काम चालते ना ? मग तिथे ललनांचा वावर कमी का?
अण्णांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची सुरूवात होती. २००१ चा सुमार. शनिवार वाड्या समोर सभा. मी हजर होतो. निरिक्षण- महिलांची संख्या
सभेस जास्तीत जास्त २ प्रतिशत. एकूण लोकसंख्येतील हजारी स्त्रिया ९५० धरल्या तर किती कमी पडल्या बरे ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Mar 2012 - 8:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाहीतर सार्वजनिक पेपर चे ठिकाणी पेपर वाचन हे खांद्याच्या वरचेच काम चालते ना ? मग तिथे ललनांचा वावर कमी का?

सार्वजनिक ठिकाणी अनेक ठिकाणी स्त्रियांसाठी वेगळी सोय असते, उदा: सार्वजनिक मुतार्‍या, शौचालये. (यांची अवस्था अतिशय दयनीय असते हा भलताच मुद्दा आहे.) उपनगरीय रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधेही स्त्रियांचे डबे वेगळे असतात. भारतात उपलब्ध असणार्‍या गोष्टी आणि त्यांचा फायदा घेण्यार्‍या लोकांची संख्या यांचं प्रमाणही व्यस्त आहे. सगळीकडे जिथे मारामारी करून गोष्टी मिळवाव्या लागतात तिथे स्त्रिया मागेच रहाणार.

पण माझा मुद्दा तो नाहीच्चे. मी उच्चभ्रू लोकांमधलंच प्रमाण पहाते आहे. मराठी उच्चभ्रू वर्गाततरी स्त्रियांचं प्रमाण पुरूषांच्या प्रमाणाच्या बरोबरीने असेल असा समज भारत महासत्ता होण्यातून होत होता. पण तिथेही हे प्रमाण miserable म्हणावं असंच आहे. शिवाय नोकर्‍या, आर्थिक सुबत्ता यांमधून उपलब्धतेचं प्रमाणही उच्चभ्रू, एलीट वर्गासाठी अधिक आहे. आणि तरीही स्त्रिया मागे का असा प्रश्न आहे.

अण्णांच्या सभेबद्दलही तेच कारण. मी सर्वसामान्य लोकांबद्दल बोलतच नाहीये.
पण त्याच बाबतीत आणखी एक निरिक्षणही नोंदवते. फेसबुकावर माझ्या यादीत साधारण ३५० ते ४०० लोकं तेव्हा होते. पैकी अर्ध्याधिक भारतीय. स्त्री-पुरूष प्रमाण अगदी समान नाही (याचं प्रमुख कारण मी पुरूष डॉमिनेटेड क्षेत्रात शिक्षण आणि नोकरी केली आहे.) पण तरीही मराठी आंजाएवढं वाईटही नाही. आणि तरीही फेसबुकावरून अण्णांना समर्थन देणार्‍या लोकांमधे स्त्री-पुरूष प्रमाण एवढं असमान नव्हतं, साधारण ४०-६० टक्के अशी विभागणी. (आणि या निरिक्षणाशी मिळतंजुळतं निरीक्षण विमे आणि धनंजय बोरगावकर यांनीही याच धाग्यात मांडलेलं आहे.)

चौकटराजा's picture

13 Mar 2012 - 9:44 am | चौकटराजा

व्यक्ततेच्या बाबतीत गुणात्मक फरक नसेलही संख्यात्मक आहेच ! कारण अवाजवी संकोच नसत्या बाबतीत हे स्त्री मनाचे वैशिष्टय आहे.त्याचे मर्यादित फायदे व अमाप तोटे स्त्री ला आहेत.

चिंतामणी's picture

9 Mar 2012 - 9:38 am | चिंतामणी

स्पष्ट आणि टोकदार मतं असणाऱ्या स्त्रिया कमी आहेत. किंबहुना स्वतःची ठाम मते असणाऱ्या स्त्रिया कमी आहेत.

मन१'s picture

9 Mar 2012 - 9:48 am | मन१

आमच्यासारखे रिकामचोट अधिक संख्येने मराठी जालावर येत जात असतात असा माझा समज आहे.
तो खरा असल्यास स्त्रिया रिकामचोट कशा काय नाहित? कशात व्यग्र असाव्यात ह्याबद्दल चर्चा होउ शकते.

मूळ चर्चाविषय वैचारिक असल्याने आम्ही फारतर वाचणेच पसंत करु.

सोत्रि's picture

9 Mar 2012 - 10:12 am | सोत्रि

मुळात स्त्री - पुरुष समानता म्हणजे काय?
ही समानता सांख्यिकीच्या आधारे ठरलेली असावी का?

लेखात आलेला आणि प्रामुख्याने जाणवणारा मुद्दा हा 'समान संखे'वर आधारित आहे असे मला वाटले. जे मला पटत नाही. सांख्यिकीच्या आधारे जर शिक्षण, नोकरी, उच्चपदे आणि इतर तुलना करायची क्षेत्रे ह्यामध्ये जर "स्त्री = पुरुष" असे सिद्ध झाले तर स्त्री - पुरुष समानता आली असे म्हणता येईल का? हा मुद्दा वैचारिक नसून सामाजिक असावा असे मला वाटते. ह्याचे मूळ आपल्या सामाजिक जडणघडणीवर आधारित आहे.

१. आता लेखात म्हटल्याप्रमाणे समानता नाहीयेय तर त्याचे काय फायदे व तोटे ?
२. जर समानता (?) झालीच तर त्याचे काय फायदे व तोटे ?
३. जर सांख्यिकीच्या आधारे "स्त्री > पुरुष" असे झाले तर त्याचे काय फायदे व तोटे ?

आता इंटरनेटचा मुद्दा:
ममो ह्यांनी म्हटल्याप्रमाणे हा मुद्दा समानता आणि स्त्रीमुक्ती ह्यापासून सर्वस्वी भिन्न आहे.
इंटरनेटवर अभिव्यक्त व्हायला मुळात इंटरनेटचा अ‍ॅक्सेस हवा. जसा टीव्ही सरसकट सगळ्या घरांमध्ये पोहोचला आहे तसे इंटरनेट अजूनही घराघरात पोहोचले नाही. तसे जेव्हा होईल तेव्हा महिलांची संख्या लक्षणियरित्या वाढेल असे खात्रीने सांगता येईल. बघा म्हणजे, टीव्हीवरच्या रटाळ, टुकार अशा मालिकांचा TRP हा महिलाच ठरवतात कारण त्यांना मिळालेला वेळ त्या असल्या मालिकांमध्येच सत्कारणी लावतात. पण ते टीव्हीचा सहज असलेला अ‍ॅक्सेस ह्यामुळे. हा मुद्दा लेखात ध्यानात घेतलेला नाही. फक्त काही नोकरपेशा आणि उच्चमध्यमवर्गिय महिलांना अभिप्रेत धरून चर्चा सुरू आहे.

तरीही इंटरनेटवर व्यक्त होण्यात स्त्रियांचे प्रमाण कमी का असावे?

ह्यावर ममो ह्यांनी दिलेला प्रतिसाद अतिशय चपखल आहे.

- (इंटरनेटवर अभिव्यक्त न होणारी बायको असलेला) सोकाजी

अन्या दातार's picture

9 Mar 2012 - 10:58 am | अन्या दातार

सडेतोड प्रतिसाद! प्रत्येक मुद्दा पटण्यासारखा.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Mar 2012 - 5:23 pm | विश्वनाथ मेहेंदळे

इंटरनेटवर अभिव्यक्त व्हायला मुळात इंटरनेटचा अ‍ॅक्सेस हवा. जसा टीव्ही सरसकट सगळ्या घरांमध्ये पोहोचला आहे तसे इंटरनेट अजूनही घराघरात पोहोचले नाही. तसे जेव्हा होईल तेव्हा महिलांची संख्या लक्षणियरित्या वाढेल असे खात्रीने सांगता येईल

मग फेसबुक वर कशा काय इतक्या संख्येने सांडलेल्या असतात हो या स्त्रिया ???
सबब, गृहीतकात काहीतरी गल्लत आहे.

मराठमोळा's picture

9 Mar 2012 - 6:26 pm | मराठमोळा

आले का खवचट छिद्र्वान्वेशी विमे,
बाकी मुद्दे सोडून भोके शोधणारे ;)
असो,
इथे केवळ उच्चपद्स्थ, उच्चशिक्षित, मराठी आंतरजालाची आवड असणार्‍या समाजाच्या बाबतीत चर्चा सुरु आहे हो.

इरसाल's picture

9 Mar 2012 - 6:32 pm | इरसाल

इथे केवळ उच्चपद्स्थ, उच्चशिक्षित, मराठी आंतरजालाची आवड असणार्‍या समाजाच्या बाबतीत चर्चा सुरु आहे हो.

ह्या गोळाबेरजेतून स्त्री आय डी घेवून वावरणारे वगळलेले आहेत असे समजुनच ना ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2012 - 10:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

फेसबुकावरून मराठीत व्यक्त होणारे संस्थळांवर फारसे लिहीताना दिसत नाहीत. वाचक असतात का हे मला माहित नाही. पण या निरीक्षणाचा विचार जरूर व्हावा असं वाटतं.

धनंजय बोरगावकर यांनी याच प्रकारचा मुद्दा मांडलेला आहे.

सोत्रि's picture

9 Mar 2012 - 10:40 pm | सोत्रि

फेसबुकावरून मराठीत व्यक्त होणारे संस्थळांवर फारसे लिहीताना दिसत नाहीत. वाचक असतात का हे मला माहित नाही. पण या निरीक्षणाचा विचार जरूर व्हावा असं वाटतं.

फेसबुक हे बिनडोकपणाचे आणि रिकाम्या भिंतीला तुंबड्या लावण्याचे माध्यम आहे. तिथे काय अकलेचे दिवे लागतात हे आपण बघतोच. जिथे Today I'm feeling SAD ह्याला १००० भर लाईक्स असतात तिथले भिंतींवर पिंका टाकणे म्हणजे अभिव्यक्त होणे ? :O

फेसबूक आणि वरती नामोल्लेख केलेली मसं येथे मराठीत अभिव्यक्त होणे हे जर सारखेच आहे असे म्हणत असशील तर मग चर्चाच खुंटली.

- (फेसबुकवर असणारा पण अभिव्यक्त मसंवर होणारा) सोकाजी

Nile's picture

9 Mar 2012 - 11:12 pm | Nile

फेसबुक हे बिनडोकपणाचे आणि रिकाम्या भिंतीला तुंबड्या लावण्याचे माध्यम आहे. तिथे काय अकलेचे दिवे लागतात हे आपण बघतोच.

ह्यावर अधिक विदा दिल्यास आवडेल.

त्यानंतर फेसबुकवर कोणत्याही मराठी संस्थळापेक्षा अधिक वैचारीक आणि विधायक गोष्टी होतात हे सिद्ध करण्याची जबाबदारी माझी.

एखाद्याच्या फ्रेंड्सलिस्टमध्ये बिनडोक आणि तुंबड्यालावणारेच अधिक असतील तर तो फेसबुकचा दोष नाही. ८०० मिलियन लोकांच्यात तुमच्या आमच्यासारखे सगळेच येतात. मराठी संस्थळावर काय कमी बिनडोक लोक आहेत?

निळुभाऊ,

माझा प्रतिसाद ह्या खालच्या वाक्याला होता.

फेसबुकावरून मराठीत व्यक्त होणारे संस्थळांवर फारसे लिहीताना दिसत नाहीत

प्रत्यक नाण्याला दोन बाजू असतात ह्या न्यायाने फेसबुकवर वैचारीक (?) आणि विधायक गोष्टी होतही असतील. पण फेसबुक हे त्याचे प्रमुख माध्यम खचितच नाही. विधायक गोष्टींसाठी उत्तम 'मार्केटिंग प्लॅटफॉर्म' मात्र आहेच, त्याबद्दल दुमत नाहीयेय.

- (फेसबुकावर तुंबड्या लावायला आवडणारा) सोकाजी

Nile's picture

9 Mar 2012 - 11:40 pm | Nile

माझं म्हणणं एकंदरीतच आहे, मराठी त्यात इन्क्लुडेड आहे. फेसबुकवर मराठीतूनही मराठी संस्थळांच्या तुलनेत होणारी अभिव्यक्ती असण्याची शक्यता नाही असे तुम्हाला वाटते का?

अन्या दातार's picture

9 Mar 2012 - 11:47 pm | अन्या दातार

फेसबुकवर मराठीतूनही मराठी संस्थळांच्या तुलनेत होणारी अभिव्यक्ती असण्याची शक्यता नाही असे तुम्हाला वाटते का?

काही ग्रुप्सवर लोक मराठीतून व्यक्त होतातच, पण त्यात एक प्रकारची क्लिष्टता येते. कोण कोणास उद्देशून बोलतोय, याचा माग काढणे एका मर्यादेनंतर अशक्य होऊन जाते. मसंवर तो प्रकार नाही. तदर्थ अनेक लोक हळूहळू तिथे मते व्यक्त करणे टाळतात (हे माझे निरीक्षण). पर्यायाने अभिव्यक्तिला मर्यादा येतात. लोक आपसूकच रिकाम्या भिंतींना तुंबड्या लावत सुटतात.

सोत्रि's picture

9 Mar 2012 - 11:57 pm | सोत्रि

बिंगो!
अन्या, धन्यवाद रे मित्रा, एक्झॅक्टली हेच लिहायचे होते.

- (अन्याशी सहमत असलेला) सोकाजी

Nile's picture

10 Mar 2012 - 12:12 am | Nile

माझं म्हणणं आहे तुमच्या डोक्यात असलेली फेसबुकची जी इमेज आहे (सोकांजींचा पहिला प्रतिसाद) ती चुकीची आहे. तुम्ही संस्थळ जॉईन केलंत की संपूर्ण मटेरीअल तुम्हाला अव्हेलेबल होतं. फेसबुकावर तुम्हाला मटेरीअल शोधावं लागतं. नुस्तं फेसबुकावर असणं उपयोगाचं नाही. कोणाला कोणत्या ग्रुपवर काय सापडतं हे त्याने जॉईन केलेल्या ग्रुपवर अवलंबून आहे. फेसबुकचा कोणतातरी ग्रुप आणि संस्थळ अशी तुलना चूकीची आहे.

सोकांजीचा पहिल्या प्रतिसादाला आक्षेप आहे. त्यातील दावा सिद्ध कोणी करणार असेल तर मला रस आहे.ग्रुप्स वगैरे नीटीग्रीटीमध्ये रस नाही.

अन्या दातार's picture

10 Mar 2012 - 9:34 am | अन्या दातार

फेसबुक हे बिनडोकपणाचे आणि रिकाम्या भिंतीला तुंबड्या लावण्याचे माध्यम आहे. तिथे काय अकलेचे दिवे लागतात हे आपण बघतोच. जिथे Today I'm feeling SAD ह्याला १००० भर लाईक्स असतात तिथले भिंतींवर पिंका टाकणे म्हणजे अभिव्यक्त होणे ? Shock

फेसबूक आणि वरती नामोल्लेख केलेली मसं येथे मराठीत अभिव्यक्त होणे हे जर सारखेच आहे असे म्हणत असशील तर मग चर्चाच खुंटली.

हा झाला तुम्ही म्हणत असलेला सोत्रिंचा पहिला प्रतिसाद. यात त्यांनी एखादा स्पेसिफिक ग्रुप व मसं ही तुलना केलेली दिसत नाही. त्यानंतर तुमच्या या प्रतिसादात तुम्ही काही विदा मागितला होता. तसा विदा देणे जरी शक्य नसले तरी धागाकर्तीचे मत सोत्रिंच्या मुद्द्यास पुष्टी देणारे असल्याचे येथे आढळते.
फेसबुक व मसं अशी चर्चा चालू नसल्याने खरंतर या उपचर्चेची गरज नव्हती, पण आता तशी झालीच आहे तर आमचे मत मांडून थोडी भर घालतो आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Mar 2012 - 5:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

विमेंचा मुद्दा, फेसबुक वापरता येतं याचा अर्थ इंटरनेट उपलब्ध आहे, असा आहे. इंटरनेट उपलब्ध असताना फेसबुक का निवडतात आणि संस्थळांवर का येत नाहीत हा मला पडलेला प्रश्न नाही. म्हणूनच मी त्यावर निबंध लिहीलेला नाही.

फेसबुक आणि संस्थळांमधे निवड करणार्‍यांमधे जेंडर बायस आहे का? असल्यास का असा प्रश्न आहे. फेसबुक स्त्रियांना अधिक सुरक्षित, आपलंसं वाटतं असं उत्तर असेल का?

अवांतरः १. कंटाळा आल्यास फेसबुकावर फुकाचा टेमपास करायला मला आवडतं.
२. ऐसी अक्षरेचं फेसबुक फीड माझ्या अकाऊंटवर आहे. तिथे फेसबुकावर अनेक मित्र ऐसी अक्षरेवरचं चांगलं लेखन लाईक करतात, पण त्यांना संस्थळावर येण्याएवढा वेळ नाही, हौस नाही, इच्छा नाही, किंवा इतर काही. असं करण्यार्‍यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढी असल्यामुळे त्याचा विदा जमवण्यात हशील नाही.

नितिन थत्ते's picture

9 Mar 2012 - 10:58 am | नितिन थत्ते

इंटरनेट / मराठी साइटच्या वापरकर्त्यांमध्ये सिंगल राहणारे पुरुष (मी, कुंदन ही दोन विवाहित उदाहरणे त्याखेरीज बरेचसे बॅचलर्स) हा मोठा वर्ग असावा. अश्या प्रकारात स्त्रिया जवळजवळ मुळीच नसाव्यात. या वर्गातले पुरुष जवळजवळ (जागे असण्याचा) पूर्णवेळ जालावर पडिक असतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2012 - 11:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बॅचलर हा शब्द स्त्रियांसंदर्भात वापरला जात नाही*, पण स्त्री-पुरूष दोघांच्याही बाबतीत विवाहाचं वय पुढे ढकललं जात आहेच. स्त्रिया मराठीत व्यक्त का होत नाहीत याचं हे कारण काही प्रमाणात पटलं तरीही पुरेसं वाटत नाही.

*मी स्वत:चा उल्लेख एकेकाळी स्यूडो बॅचलर असा केला होता तेव्हा मला हे सांगण्यात आले होते.

कुंदन's picture

10 Mar 2012 - 10:57 am | कुंदन

>>पडिक असतात.
म्ह़ण़जे काय.... साला २०० दिर्‍हाम भरतो महिन्याला , वसुल नको करायला ? आँ ?

अन्नू's picture

10 Mar 2012 - 10:59 am | अन्नू

आक्शी याजा सकट वसूल कराया पायजे!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Mar 2012 - 11:11 pm | निनाद मुक्काम प...

एव्हढे करूनही अनेक साईट वापण्यास बंदी

मग त्या वापण्यासाठी दर सेंकदाला बदलणारा आयपी अड्रेस

तेव्हा वसूल हे केलेच पाहिजे.

अन्नू's picture

10 Mar 2012 - 10:49 pm | अन्नू

या वर्गातले पुरुष जवळजवळ (जागे असण्याचा) पूर्णवेळ जालावर पडिक असतात.

असे का!

कवितानागेश's picture

9 Mar 2012 - 12:34 pm | कवितानागेश

तरीच, गेल्या काही दिवसात ही गोष्ट माझ्या लक्षात आली होतीच, की इथे 'मुली' ;) कमी आहेत.कारण जरा कुठे ऑनलाईन आले की सगळ्या 'टग्यां'शीच बोलावे लागते!! :P
असो.
माझ्या मते काही कारणे,
१. मुलीना नेटवर वेळ कमी मिळतो.
कारण त्या वर्तमानात रहातात, आणि वर्तमानात 'कृती' करतात. वैचारीक ( थेअरेटिकल) चर्चा करणे अनेकवेळा निरर्थक वाटते.
२.असलेल्या वेळात त्या पाककृती वाचतात. :)
३. मूळात स्वभाव 'अ‍ॅग्रेसिव्ह' नसतो, त्यामुळे आपली मते ( काही पक्की मते असली तरिही) ती हिरिरीने मांडावीत अशी गरज वाटत नाही.
तसेही इथल्या कुठल्याही चर्चांमुळे रोजच्या आयुष्यात काहीही फरक पडणार नसतो.
४.आपली स्वतःची मते 'चव्हाट्यावर' मांडणे तितके सुरक्षित वाटत नाही.
५. पुरुष मूळ मुद्द्याला सोडून कधीही अचानक 'लागेल' अशी कॉमेंट टाकू शकतात. त्यामुळे सांभाळून रहावे लागते.
६. स्वतःला व्यक्त करण्यासाठी अजून हजार ठिकाणे असतात.
उदा.: मैत्रिणी, बहिणी, आई, मावशी वगरै. त्यांच्याशी बोलणे फोनवर होते, पुन्हा 'नेट' बाद!
७.शिवाय इतर काहीतरी कलाकुसरीचे उद्योग ८०% मुलींना असतातच. त्यात वेळ घालवणे जास्त आनंददायक असते.
८.सामाजिक म्हणवल्या जाणार्‍या विषयांबद्दल उदासिनता.
आपण बरे आपले घर बरे अशी वृती.
९. मुद्दा ३ चा पुढचा परिणाम. वाद घालणेदेखिल आवडत नाही. त्यामुळे आपले मत एकाच छोट्याश्या वाक्यात मांडण्याकडे कल.
१०. मुलींना ( निदान ७०%) बोलायला खूप आवडते!
त्यामुळे लिहणे कमी असते. फोनच पुष्कळ वापरला जातो, नेटची गरजच काय? ;)

अन्नू's picture

9 Mar 2012 - 2:21 pm | अन्नू

काही मुद्दे पटले, काही डोक्यावरुन गेले तर काही नुसतेच वरुन गेले (उदा.- प्रतिसादाचा आणि तुमच्या वयाचा संबंध आणि यावरुन वयाचा अंदाज! ;) )

हे टग्या म्हणजे नेमके काय वो?
म्हन्जी टांगमोड्या, मुडद्या, काळतोंड्या, बोक्या, अशा पुरुषी विशेषणासारखच ते वाटतया म्हणं यीचारलं!

लिमाउजेट यांच्या

बर्‍याच मतांशी सहमत .

वेळ मिळाल्यावर सविस्तर लिहिन्याचा प्रयत्न करेन .

तुर्तास वाचत आहे ...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Mar 2012 - 11:37 am | विश्वनाथ मेहेंदळे

तरीच, गेल्या काही दिवसात ही गोष्ट माझ्या लक्षात आली होतीच, की इथे 'मुली' कमी आहेत.कारण जरा कुठे ऑनलाईन आले की सगळ्या 'टग्यां'शीच बोलावे लागते!!

आता कळली का आमची व्यथा ??

१. मुलीना नेटवर वेळ कमी मिळतो. कारण त्या वर्तमानात रहातात, आणि वर्तमानात 'कृती' करतात. वैचारीक ( थेअरेटिकल) चर्चा करणे अनेकवेळा निरर्थक वाटते.

ते वर्तमानात राहण्याचे सोडा, पण वैचारिक काहीही आवडत नाही हे मान्य:-)

२.असलेल्या वेळात त्या पाककृती वाचतात.

घ्या. म्हणजे परत चूल आणि मुल चा प्रकार का ??? तरी बरे, इथे आपण बाय चोइस मुद्द्यांबद्दल बोलत आहोत.

३. मूळात स्वभाव 'अ‍ॅग्रेसिव्ह' नसतो, त्यामुळे आपली मते ( काही पक्की मते असली तरिही) ती हिरिरीने मांडावीत अशी गरज वाटत नाही.

कुणाचा स्वभाव 'अ‍ॅग्रेसिव्ह' नसतो ?? सर्व महिलांचा ?? अरे बाप रे. यावर प्रतिवाद करायची माझी कुवत नाही.

तसेही इथल्या कुठल्याही चर्चांमुळे रोजच्या आयुष्यात काहीही फरक पडणार नसतो.

हा पलायन वाद झाला. फरक पडताच नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही. अगदीच काही नाही तर इतरांची मते कळतात त्यातून आपली मते बदलू शकतात. ती क्षितिजे का कायसे म्हणतात ती विस्तारत नाहीत ? मिपा वर मी नसतो तर ओरिगामी शी ओळख झाली नसती, पक्षी निरीक्षण करायला शिवडीला गेलो नसतो.

४.आपली स्वतःची मते 'चव्हाट्यावर' मांडणे तितके सुरक्षित वाटत नाही.

का कोण खाणार आहे ? मते चव्हाट्यावर मांडून कसली असुरक्षितता वाटते बुवा ??

५. पुरुष मूळ मुद्द्याला सोडून कधीही अचानक 'लागेल' अशी कॉमेंट टाकू शकतात. त्यामुळे सांभाळून रहावे लागते.

महिला पण हे चोख प्रकारे करू शकतात. मिपा वर अशा अनेक ताई (माई, अक्का) आहेत की. नवे व्यनितून विचारा. नाही तर उगाच कुणाला तरी "लागेल"

६. स्वतःला व्यक्त करण्यासाठी अजून हजार ठिकाणे असतात. उदा.: मैत्रिणी, बहिणी, आई, मावशी वगरै. त्यांच्याशी बोलणे फोनवर होते, पुन्हा 'नेट' बाद!

म्हणजे त्याच त्याच वर्तुळात फिरणे प्रेफर केले जाते. हम्म्म्म.... रोचक आहे.

७.शिवाय इतर काहीतरी कलाकुसरीचे उद्योग ८०% मुलींना असतातच. त्यात वेळ घालवणे जास्त आनंददायक असते.

असेच काहीसे वर बिचारा ममो म्हणाला तर नॉन अ‍ॅग्रेसिव्ह रीतीने उत्तर आले की.

८.सामाजिक म्हणवल्या जाणार्‍या विषयांबद्दल उदासिनता. आपण बरे आपले घर बरे अशी वृती

ज्जे बात !!!!

९. मुद्दा ३ चा पुढचा परिणाम. वाद घालणेदेखिल आवडत नाही. त्यामुळे आपले मत एकाच छोट्याश्या वाक्यात मांडण्याकडे कल.

महिला आपले मत थोडक्यात मांडतात ??? देवा परमेश्वरा..... वाचव रे बाबा !!!!!

१०. मुलींना ( निदान ७०%) बोलायला खूप आवडते! त्यामुळे लिहणे कमी असते. फोनच पुष्कळ वापरला जातो, नेटची गरजच काय?

मुद्दा ६ चेच उत्तर

चला, पुढे बोला..... ;-)

शिल्पा ब's picture

10 Mar 2012 - 11:50 am | शिल्पा ब

त्याच त्या वर्तुळात म्हणजे काय? अर्थातच!! ज्या लोकांवर विश्वास आहे त्यांच्याशीच बोलणार ना?
उगाच वाट्टेल त्या लोकांशी का म्हणुन बोलायचं?

बाकी चर्चा रोचक आहे.

कवितानागेश's picture

10 Mar 2012 - 7:37 pm | कवितानागेश

आता कळली का आमची व्यथा ??>
अरेरे! फार वाइट वाटले हो विमेकाका. ( स्त्रियांचे ऑनलाईन वर्तनदेखिल सहानुभूतीपूर्ण असते) :)

ते वर्तमानात राहण्याचे सोडा, पण वैचारिक काहीही आवडत नाही हे मान्य:-)>
मुद्दा २ वाचा. येथे कृतीला महत्त्व दिले जाते!

घ्या. म्हणजे परत चूल आणि मुल चा प्रकार का ??? तरी बरे, इथे आपण बाय चोइस मुद्द्यांबद्दल बोलत आहोत.>
मुद्दा १ वाचा. वर्तमान आयुष्यात याच २ महत्त्वाच्या गोष्टी असतात, ज्यांना सतत तोंड द्यावे लागते.

कुणाचा स्वभाव 'अ‍ॅग्रेसिव्ह' नसतो ?? सर्व महिलांचा ?? अरे बाप रे. यावर प्रतिवाद करायची माझी कुवत नाही.>
योग्य निर्णय. माणसानी केवळ वादासाठी वाद घालू नयेत. ;)

हा पलायन वाद झाला. फरक पडताच नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही. अगदीच काही नाही तर इतरांची मते कळतात त्यातून आपली मते बदलू शकतात. ती क्षितिजे का कायसे म्हणतात ती विस्तारत नाहीत ? मिपा वर मी नसतो तर ओरिगामी शी ओळख झाली नसती, पक्षी निरीक्षण करायला शिवडीला गेलो नसतो.>
मला नै ना येता आले. :(
त्याचे कारण, नवीन मुद्दा १ अ: स्वतःच्या आवडींपेक्षा 'इतर' कामे नेहमीच जास्त महत्त्वाची वाटतात.

का कोण खाणार आहे ? मते चव्हाट्यावर मांडून कसली असुरक्षितता वाटते बुवा ??>
घरी कळले म्हणजे?? :P

महिला पण हे चोख प्रकारे करू शकतात. मिपा वर अशा अनेक ताई (माई, अक्का) आहेत की. नवे व्यनितून विचारा. नाही तर उगाच कुणाला तरी "लागेल">
पुरुषांचा टक्का जास्त आहे, द्व्यर्थी शब्द वापरणयात. आणि बोलले कुणीही तरी 'लागते' बायकांनाच.

म्हणजे त्याच त्याच वर्तुळात फिरणे प्रेफर केले जाते. हम्म्म्म.... रोचक आहे.>
मुद्दा ४ वाचा. वर्तुळ लहान, सुरक्षितता महान!

असेच काहीसे वर बिचारा ममो म्हणाला तर नॉन अ‍ॅग्रेसिव्ह रीतीने उत्तर आले की.>
ब्वॉर्र.
ज्जे बात !!!!>
धन्यवाद.

महिला आपले मत थोडक्यात मांडतात ??? देवा परमेश्वरा..... वाचव रे बाबा !!!!!>
वरची २ उत्तरे वाचा! ;)

चला, पुढे बोला..... >
असे प्रत्येक वाक्याला उत्तर देणे म्हणजे झिम्मा खेळल्यासारखे वाटतय! ;)
असो. झाला का पुरेसा गुंता? :D

Dhananjay Borgaonkar's picture

9 Mar 2012 - 12:46 pm | Dhananjay Borgaonkar

मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?

प्रत्येकाच्या व्यक्तिगत आवडीचा हा मुद्दा असु शकतो.
तुम्ही नमुद केलेल्या सगळ्या संकेत्स्थळामधे कुठेही फक्त पुरुषांना आवडेल असेच लिखाण, धागे असतात जेणेकरुन पुरुषांची संख्या अधिक वाढावी असही काही नाहीये.

आज काल बहुतांशी मुल मुली फेसबुक, ट्वीटर अन्य सोशल नेटवर्कींग साईट्स वर असतात (मराठी संकेतस्थळावर नसले तरी). जर का अश्या ठिकाणीसुद्धा स्त्रीवर्गाची संख्या कमी असली असती तर मात्र विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

अवांतर - आता असं म्हणंण किती योग्य होईल की मराठी संकेत्स्थळावर पुरुष वर्गाची संख्या जास्त आहे म्हणजे पुरुष वर्गाला मराठी बद्दल जास्त आदर आहे आणि स्त्री वर्गाला नाही? असा धागा निघाला तर चुक की बरोबर?

हे उत्तर सुचले आहे

बाळ सप्रे's picture

9 Mar 2012 - 2:18 pm | बाळ सप्रे

मराठी ईंटरनेट साइट युजर हा ग्रुप इतका छोटा आहे , की Enough samples नसल्यामुळे यावरुन काढलेला कुठलाही निष्कर्ष प्रातिनिधिक ठरणार नाही...

अन्या दातार's picture

9 Mar 2012 - 2:39 pm | अन्या दातार

शीर्षक बघा:

मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?

इंटरनेट साईट युजर हाच ऑब्जेक्ट ऑफ स्टडी आहे मालक.

संख्या महत्वाची की दर्जा महत्वाचा ?
निदान मिपा वर तरी तुलनेने स्त्रियांच्या लेखनाच्या संख्येपेक्षा त्यांचा लेखनाचा दर्जा वरचा आहे.

अवांतर:
"महाराष्ट्र व्यापारात मागे का? " ह्या चाली वर वाचले.

मस्त कलंदर's picture

9 Mar 2012 - 2:54 pm | मस्त कलंदर

माझ्या काही वर्षांच्या होस्टेलच्या अनुभवातून, माझ्या व्यवसायामधून आणि आजवर भेटलेल्या स्त्रियांशी बोलण्यावरून अदितीच्या प्रश्नाचं उत्तरे ही असू शकावीत.

१. स्त्री असो वा पुरूष, त्यांना स्वतःचं मत आहे की नाही, आणि ते किती ठामपणे मांडता येतं हे महत्वाचं आहे. पिढ्या न पिढ्या शिकलेल्यांच्या पण पुरूषीवर्चस्वाच्या घरांमधून," तुला काय करायचंय, तुमची अक्कल शेवटी चुलीपाशीच चालवायचीय" असं म्हटलेलं ऐकलं आहे. अशा वेळेस फक्त सांगितलेलं ऐकायचं, प्रश्न उपस्थित करायचे नाहीत आणि कुणी विचारत नसल्याने मत देखील नसण्याची काही उदाहरणे पाहिली आहेत. किंवा अशा घरातल्या काही स्त्रियांकडून, "विचार केला की त्रास होतो, त्यापेक्षा बिनडोकपणे राहिलेलं बरं पडतं" असंही ऐकलं आहे. अशा स्त्रियांच्या घरी इंटरनेट आलं तरी त्या वाचनमात्र न राहिल्या तरच आश्चर्य वाटेल. याउलट एखादी अशिक्षित स्त्री तिच्या मतांबद्दल, मुद्दयांबाबत ठाम असू शकते आणि ते ती प्रसंगी पटवूनही देऊ शकते. त्यामुळॅ व्यक्त होणं हे फक्त एलिट वर्गापुरतं मर्यादित नसावं. थोडक्यात, त्यामुळे व्यक्त होता येणं हे महत्वाचं आहे. याबाबतीत मला मसरबाईचं उदाहरण आठवतं.

२. काही घरांमधलं अतिप्रोटेक्टेड वातावरण. अशा वेळेस मुलांच्या(मुलगा+मुलगी)यांच्या विचारांना कितपत चालना मिळते हा प्रश्न आहे. विचारशून्यता असेल तर व्यक्त कुठून होणार? अर्थात हे आजच्या विद्यार्थीदशेतल्या लोकांमध्ये काही प्रमाणात आढळून येतंय. सध्या आपण ज्यांच्याबद्दल( मराठी आंतरजालावर सक्रीय असणार्‍यांबद्दल) बोलतोय त्यांच्याबाबतीत हे कारण नक्कीच नसावंसं वाटत आहे.

३. टंकाळा असू शकतो. त्यामुळॅ फक्त वाचलं आणि पुढे गेले असंही होतं. वेळॅचा अभावही एक कारण आहेच
४. लीमाऊचा वाद न घालण्याचा मुद्दा थोडासा पुढे नेते. काहींना मुद्देसूद चाललेल्या चर्चा आवडतात, पण मग मुद्दे नाहीत म्हणून समोरचा कसाही वितंडवाद घालू लागला तर ," ठीक आहे, तुझा बैल दूध देतो" असं म्हणून त्या वादात निष्फळ जाणारा वेळ दुसरीकडे स्त्कारणी लावणं सोयीस्कर वाटत असावं.

मी स्वतः इथं खूप कमी प्रतिसाद देते, लेखही कमीच लिहिते. माझ्यासाठी तीन आणि चार नंबरची कारण लागू पडतात.
आणि हो, इथं प्रतिसादांत कामाच्या वाटणीचा मुद्दा आलाय. आमच्या घरी ती कशी आहे हा मुद्दा नाही. पण माझा नवरा वर्षभरातून एकदा मीच तयारी करून दिलेल्या पाककृतीत स्वत्:ची दोन मिनिटे घालून ती बनवतो आणि लिहायला दहा मिनिटे घालवून इथे पोस्ट करतो. आणि म्हणूनच मला पुस्तकं वाचायला, सिनेमे बघायला आणि इथे लिहायला वेळ मिळतो असं काही महाभागांचं मत आहे. तेव्हा, असो!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Mar 2012 - 12:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्या निमित्ताने मकीचं दर्शन घडलं! ;-) असो.

लीमाऊजेटचा प्रतिसादही आवडला.

मसरबाईंसारख्या अनेक स्त्रिया आहेत हा मुद्दा वादातीत आहे. प्रश्न असा आहे की समाज विशेषतः सामान्य स्त्रिया या स्त्रियांकडे, एलिट गटातल्या नसल्यामुळे, कॉपी करण्यायोग्य म्हणून पहातो का? बहुदा नाही. या स्त्रिया एलिट गटात, थोडक्यात आर्थिकदृष्ट्या समृद्ध, उच्चशिक्षित गटात आल्या की त्यांची उदाहरणं इतर गटांमधले लोक देतात.

२ आणि ३ हे मुद्दे मला पटले; पण ते लिंगनिरपेक्ष असावेत असं वाटतं.

४ हा मुद्दा, जो अनेकींनी प्रतिसादात मांडला आहे, तो फक्त स्त्रियांच्याच बाबतीत आहे का? एलिट समजल्या जाणार्‍या समाजातही हा भेद असणं मला काळजी करण्यायोग्य वाटतं. (म्हणूनच हा धागा.)

... म्हणूनच मला पुस्तकं वाचायला, सिनेमे बघायला आणि इथे लिहायला वेळ मिळतो असं काही महाभागांचं मत आहे. तेव्हा, असो!!!

अशा प्रकारच्या लोकांची, विशेषतः पुरूष आयडी, उपस्थिती मिपावर अन्यत्र दिसते. या धाग्यावर अदितीचा बैल दूध देतो आहे का? :D

सुहास..'s picture

10 Mar 2012 - 10:39 am | सुहास..

आणि हो, इथं प्रतिसादांत कामाच्या वाटणीचा मुद्दा आलाय. आमच्या घरी ती कशी आहे हा मुद्दा नाही. पण माझा नवरा वर्षभरातून एकदा मीच तयारी करून दिलेल्या पाककृतीत स्वत्:ची दोन मिनिटे घालून ती बनवतो आणि लिहायला दहा मिनिटे घालवून इथे पोस्ट करतो. आणि म्हणूनच मला पुस्तकं वाचायला, सिनेमे बघायला आणि इथे लिहायला वेळ मिळतो असं काही महाभागांचं मत आहे. तेव्हा, असो!!! >>>>

आता त्या महाभागांना काय माहीती की तुमचे नवरोबा असला 'चालुपणा' करत पाकृ टाकतात ते ...असो ....देव तुम्हाला ईंटरनेट करिता भरभरून वेळ देवो हि मनोमन कामना !!

बाकी

मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का? >>

या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात " सगळ्याच बायका रिकामटेकड्या नसतात " विशेषता नवर्‍याच्या जीवावर !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Mar 2012 - 10:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात " सगळ्याच बायका रिकामटेकड्या नसतात " विशेषता नवर्‍याच्या जीवावर !!

खरं आहे. पण नवर्‍याच्या जीवावरच कशाला, जवळच्या नात्यातल्या सर्वच पुरूषांच्या जीवावर.
गुलामांना स्वातंत्र्य मिळतं तेव्हा त्यांना गुलाम बनवणार्‍यांची चैन कमी होतेच; गुलामी संपल्यावर गुलामीचा उपभोग घेणार्‍या मालकांना बुडं हलवून काम करावंच लागतं.

आणि असं समाजव्यापी परिवर्तन घडवणार्‍यांना, या संदर्भात पुरुषांना, उदा: जगन्नाथ शंकरशेट, महात्मा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी कर्वे, र.धों. कर्वे, बाबासाहेब आंबेडकर, या सर्वांना समाजात अतिशय आदराचं स्थान असतं.

अविनाशकुलकर्णी's picture

9 Mar 2012 - 5:52 pm | अविनाशकुलकर्णी

त्या मनाने विदेशी महिला जागरुक आहेत..

खास स्त्रीया साठी अनेक वेब साईत्स आहेत
A 30 year old Canadian woman has come up with a social networking website exclusively for females.

The site Luluvise.com bans males from joining, the Daily Mail reported.

It connects though other networking websites LinkedIn and Facebook. Since its launch Wednesday, it already has 1,000 users in 69 countries.

मराठी स्त्रीयाने पण खास स्त्रीया साठी एखादी वेब साईट डेव्हलप करण्यास हरकत नाहि..
त्या साठी पुरुष हि त्यांना मदत करु शकतिल..
http://mashable.com/2008/05/11/top-10-social-networking-sites-for-women/
इथे १० वेब साईट्स ची नावे दिली आहेत..ज्या खास स्त्रीया साठीच आहेत.

मराठी महिला प्रगत विचाराच्या आहेत..त्या मुळे नजिकच्या काळात अशी वेब साईट निघु हि शकते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Mar 2012 - 12:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्या मनाने विदेशी महिला जागरुक आहेत..

सदर तुलना जगभरच्या इंटरनेट वापराशी केल्यामुळे हे वाक्य गृहीतच होतं. असो.

अन्या दातार's picture

9 Mar 2012 - 6:36 pm | अन्या दातार

चर्चा नीट मुद्द्यांना धरुन चाललेली आहे हे बघून खुप चांगले वाटतंय.

गणपा's picture

9 Mar 2012 - 6:59 pm | गणपा

वयोगट १६ ते २५ : विद्यार्थी दशेतला काळ.
मुली मुलांपेक्षा जास्त अभासु असतात (हे त्यांच्या उत्तीर्ण होण्याचा प्रमाणावरुन लक्षात येईलच.) मुलांना टिंगल टावाळी करण्यात जास्त रर असतो. कदाचीत म्हणुनच या वयोगटातल्या मुलांच आंजावरील प्रमाण मुलींपेक्षा जास्त असेल.

वयोगट २५ ते ३० : नोकरी/धंद्याच्या उमेदीतली वर्षे
काळ बदलत असला तरी अजुनही नोकरी करणार्‍या पुरषांची संख्या महिलांपेक्षा जास्त आहे. पर्यायाने मुलींच्या प्रमाणात मुलांचा आंतरजालाशी जास्त संबंध येतो.

वयोगट ३० ते ४४ : गृहस्थाश्रम फेज १
नवीन लग्न झालेली युगुले, पहिलट करणी, लेकुरवाळ्यांचा हा गट. आपला समाज पितृसत्ताक असला तरी त्याची जडण घडण करणारी ती माताच. त्यामुळे लहान बाळाच्या संगोपना पासुन ते त्या बाळाच्या सुरवातीच्या शालेय काळा पर्यंत स्त्री गुरफटलेली असते.

वयोगट ४५ ते पुढे : गृहस्थाश्रम फेज २
मुलं मोठी झाली, हातशी थोडा वेळही आहे पण इडियट बॉक्सच्या आहारी गेलेला हा वर्ग. संगणक अजुनही घराघरात पोहोचलेला नाही. त्यात त्या सासु सुनांच्या कगाळ्यांचा आणि कट कारस्थानांचा मारा असलेल्या मालिकांत पुरषांना जास्त रस नसतो. तेव्हा आपले काका लोक जालावरच्या संसारात रमतात.

चौकटराजा's picture

9 Mar 2012 - 8:12 pm | चौकटराजा

तारे पटले पण आणखी तार्‍यांचा पटेल असा पट पहाण्यासाठी ली माउ जेट या चिनी सदस्याच्या प्रतिसादास पहावे .

विनायक प्रभू's picture

9 Mar 2012 - 7:09 pm | विनायक प्रभू

खालील विधान फक्त माझ्या घरापुरते मर्यादित आहे.
घरात नेट कनेक्शन आल्यावर संस्थळ वाचना बद्दल बायकोला विचारल्यावर मिळालेले उत्तर.
" हो का? काम धंदे नाहीत का? नको ते सांगताय"?

तुम्ही संस्थळावर उनाडक्या करत आहात हे माहित असल्याने काकूंना संस्थळाबद्दल गैरसमज झाले असतील. ;-)

चेतनकुलकर्णी_85's picture

9 Mar 2012 - 7:33 pm | चेतनकुलकर्णी_85

असू द्या हो..
इतर स्त्रियांना बाकीची पण महत्वाची कामे असतात...तरीही सर्व स्त्रियांची कसूर तुम्ही भरून काढताय ना तुमच्या वावराने त्या बद्द तुमचे हार्दिक अभिनंदन..

तिमा's picture

9 Mar 2012 - 7:39 pm | तिमा

आमच्या जवळच्या नातेवाईकांत व परिचितांमधे ज्या सुशिक्षित स्त्रिया आहेत(जवळ जवळ सगळ्याच आहेत) त्यामधील फारच कमी स्त्रिया या मराठी संकेतस्थळांवर जातात. त्यांत ज्येष्ठांपासून कॉलेजवयाच्या कन्यकाही आल्या.
त्यातल्या माझ्या वयाच्या ज्या आहेत, त्यातल्या ५० टक्के ह्या आंतरजालावर येतात. पण त्या फक्त मेल बघण्यापुरत्या ! मराठी संस्थळावर का सभासद होत नाही असं विचारलं तर त्यांना मराठी टंकायला येणार नाही असे उगाचच (प्रयत्न न करताच) वाटत असते. शिवाय तुम्ही पुरुष सदा काँप्युटर अडवून बसलेले असता , मग आम्हाला वेळ तरी असतो का? वगैरे वगैरे उत्तरे मिळतात.
त्यांच्या बाबतीत तरी, घरात एकच काँप्युटर असणे, तो हाताळायला फारसा न मिळणे व त्यामुळे त्याच्या वापराविषयी एक भीति असणे, घरकामातून व नातवंडांतून वेळ काढता न येणे, टंकायचा कंटाळा वा त्यांत स्वारस्य नसणे ही प्रमुख कारणे असावीत.
माझ्या मुलीच्या व त्यापुढच्या वयाच्या ज्या असतात, त्यांचे शिक्षण इंग्रजी शाळेत झालेले असल्यामुळे त्यांना मराठीत रसच नसतो, बाकी जालावर मात्र त्यांचा स्वच्छंद विहार चालू असतो.

पैसा's picture

9 Mar 2012 - 7:58 pm | पैसा

माझ्या घरात कॉम्प्युटर आला तेव्हापासून म्हणजे बहुतेक २००० साली असेल, इंटरनेट डायल अप कनेक्शन होतं. इमेल्स वगैरेसाठी नेट वापरात होतंच पण आताच्या सारखं चॅट इ. उपलब्ध नव्हतं. जेव्हा ब्रॉडबँड स्वस्तात आणि सहज मिळायला लागलं तेव्हा इतर गोष्टींकडे लक्ष गेलं.

मी मिसळपाव या संस्थळाची मेंबर तर अगदी अलीकडे झाले. मायबोलीवरचं थोडंफार त्यापूर्वी वाचत असे. शहरात राहिल्यामुळे हे शक्य झालं. पण नेट इतक्या मोठ्या प्रमाणात अजून सगळीकडे उपलब्ध नाही. माझ्या सासरच्या घरी मोबाईल नेटवर्क अजूनही चालत नाही. लँडलाईन फोन हजारदा बंद पडतो. बहुतेक खेड्यात हीच अवस्था असावी. शहरातून नेट उपलब्ध असलं तरी वेळ हा मोठा फॅक्टर असतो.

सकाळचा सगळा वेळ स्वयंपाक करण्यात जातो. तेव्हा नेट/कॉम्प्युटर लावून बसलं तर स्वतःलाच जेवायला मिळणार नाही. शिवाय घरातल्यांचे शिव्याशाप खावे लागतील. कारण इतर सगळे माझ्या आधीच घराबाहेर पडलेले असतात. भारतात रहाणार्‍या बहुतांश स्त्रियांचा फार मोठा वेळ स्वयंपाक करण्यात खर्ची पडतो. याला काही उपाय नाही, कारण बाहेर चांगलं आणि स्वस्त हेल्दी खाणं सहज मिळत नाही.

मोठ्या प्रमाणात स्त्रिया या बँका, शाळा अशा ठिकाणी नोकर्‍या करतात. तिथे इंटरनेट उपलब्ध नसतं. त्यामुळे बहुसंख्य पुरुषमंडळी ऑफिसात गेल्या गेल्या ऑनलाईन येतात तेही शक्य नसतं. संध्याकाळी घरी आल्यावर आधी रात्री काय स्वयंपाक करायचा याचा विचार, काही संपलं तर बाजारहाट, मुलांना खायला पाहिजे, यात वेळ जातो.

मग मुलांना त्यांचे शाळा कॉलेजचे प्रोजेक्ट करण्यासाठी कॉम्प्युटर हवा असतो. नवर्‍याला काहीतरी सर्फिंग करायचं असतं, तेव्हा जेवण झाल्यावरच मला कॉम्प्युटर सापडतो. मग राहिलेल्या वेळात सगळी मराठी संस्थळं फिरणे, फेसबुक, गुगल चॅट, ऑनलाईन खरेदी, मोबाईल रिचार्ज, रेल्वेची तिकिटं काढायची या सगळ्या कामातून मराठी संस्थळांच्या वाट्याला कितीसा वेळ येणार?

हे मी माझ्यापुरतं पण माझ्या वयाच्या स्त्रियांबद्दल कमी अधिक प्रमाणात प्रातिनिधिक लिहिते आहे. सुदैवाने माझ्याकडे दांड्या मारणारी का होईना पण मोलकरीण आहे. आणि मी टीव्हीच्या रिमोटला हातसुद्धा लावत नाही. पण ज्या स्त्रियांना मोलकरीण उपलब्ध नाही आणि टीव्ही बघायला आवडतो त्यांच्याकडे आणखीच कमी वेळ असणार.

शिवाय एखादं चांगलं पुस्तक आणलं की मग बाकी सगळ्याला "मारो गोली!" रेवती म्हणते तशी कारणं म्हणजे "आपल्याला कोणी काही म्हणतील का?" वगैरे काहीम्च्या बाबतीत असतील नक्कीच पण माझ्या बाबतीत हा प्रश्न कधी आला नाही. काही मंडळी अशीही असतात की त्याना कॉम्प्युटरपेक्षा छापलेलं वाचायला जास्त आवडतं. त्या बायका कशाला नेटवर येताहेत? तेव्हा माझ्या मताने स्त्रियांचा वावर मराठी संस्थळांवर कमी का याचा कारण असलेला मुख्य घटक 'वेळ नाही' हाच आहे.

मराठमोळा's picture

9 Mar 2012 - 8:17 pm | मराठमोळा

पैसातै,

प्रतिसाद आवडला.
तुमच्याबद्दल किंवा स्त्रियांबद्द्ल आदर नाही असे मुळातच नाहीये.. आई, बहिण यांना जन्मापासून पहात आलोय, त्यांची माया प्रेम यांच मुल्य हे कदाचित देवही (असला तर) ठरवू शकणार नाही. :)

तुम्ही सांगा, तुम्हाला यातून व्यक्तीमत्वाचे नुकसान झाले असे वाटते की सुख आणि समाधान?

पैसा's picture

9 Mar 2012 - 8:29 pm | पैसा

कारण माझ्यावर कोणीही कोणतीच गोष्ट लादलेली नाही. शिवाय मला जेव्हा लिहावंसं किंवा वाचावंसं वाटतं तेव्हा मी रात्री उशीरा बसून किंवा सुटी असेल तेव्हा ते करतेच. सुख आणि समाधान याची तुम्ही व्याख्या कशी करता यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत. तू नेट लावू नको किंवा घरात काम करच असं मला कोणी कधी सांगितलं नाही. मी जे काही करते ते माझ्या मर्जीने. त्यामुळे माझं कोणी नुकसान करतोय किंवा नुकसान झालंय असं मला कधीच वाटलं नाही. कोणत्याही अडचणीतून बाहेर कसं पडता येईल हेच मी नेहमी बघत असते. त्यामुळे मी संबंध वेळ ऑनलाईन रहायचा उपाय शोधून काढलाच! तो म्हणजे अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल! पण इतर बहुसंख्य बायकांना हे शक्य होणार नाही हे मला माहिती आहे.

चेतनकुलकर्णी_85's picture

9 Mar 2012 - 8:17 pm | चेतनकुलकर्णी_85

उत्तम..!!

चौकटराजा's picture

9 Mar 2012 - 8:18 pm | चौकटराजा

आजच्या कॉलेज मधे एक परिक्षा मुलींची घ्या. त्याना आजची पेपरमधली हेड लाईन विचारा .अचूक उत्तरे २० टक्याच्या वर येणार नाहीत.
हे वास्तव आहे. नेट चे जाळे आयएस पी चा रेंज वगैरे नका आता लक्षात घेउ. पेपर तर सर्वत्र दिसतो ना ?

दादा कोंडके's picture

9 Mar 2012 - 11:02 pm | दादा कोंडके

खत्रा प्रतिसाद!
तुमचे प्रतिसाद एकदम हटके पण पटण्यासारखे असतात. :)

बाकी, आमच्या ऑफीसमध्ये पण वीमेन्स डे निमित्त एका दक्षिण भारतीय मुलगी, भारतातल्या बायकांनी काय काय कारायला पाहिजे ते सांगत होती. तीचं भाषण संपल्यावर माझा सहकारी तीच्याकडे निरखून बघत म्हणाला, "भारतातल्या बायकांनी दुसरं काही केलं नाही तरी वजन आटोक्यात ठेवावं आणी वॅक्सींग कराव!" :D

"भारतातल्या बायकांनी दुसरं काही केलं नाही तरी वजन आटोक्यात ठेवावं आणी वॅक्सींग कराव!"
अचरटपणा , दुसरं काही नाही. या असल्या मनोवृतीला काय म्हणावं. वाद घालणे वेगळे आणि संवाद बंद करणे वेगळे. मला तरी ऑफीसमधील माणसाचे बोलणे अजिबात आवडले नाही. यापुढे पुरुषांबद्दलही बोलण्यास विषय असतात पण स्वत:च्या मर्यादा सोडून वागणं होईल ते.

दादा कोंडके's picture

10 Mar 2012 - 12:38 am | दादा कोंडके

ह्या प्रतिक्रियेला उत्तर म्हणून फक्त इथला एक पॅरा चोप्य पस्ते करतो.

एकदा शाळेत समाजकार्य करणार्‍या बाईचे अगदी चोख मोजून घ्यावे असे ऐसपैस नऊवारी भाषण झाले. अगदी वैतागाने रेगे मास्तर आम्हाला म्हणाले, "या बायकांचे समाजकार्य तत्काळ थांबविण्यास आता एकच मार्ग उरला आहे. सारा समाजच नष्ट केला पाहिजे." पण आपटे मास्तरांचा उत्साह अनावर होता. त्यांनी ताबडतोब एक परिसंवाद ठेवला व काही पोरांनी समाजसेवा करणार्‍या स्त्रियांविषयी माहिती द्यावी अशी योजना केली. त्यात तातूने भाग घ्यायचे ठरवले. वास्तविक आपटे मास्तरांनी निदान तातूबद्दल तरी धोका पत्करायचा नव्हता. तातू प्लॅटफॉर्मवर उभा राहिला, पण त्याचे भाषण एका मिनिटातच संपवून त्याला प्रिन्सिपॉलकडे पाठवण्यात आले. त्याने अशी सुरुवात केली होती, "सामाजिक कार्य करणार्‍या स्त्रियांमध्ये दोन प्रकार असतात. एक कुरूप आणि दुसरा म्हणजे अती कुरूप..." :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Mar 2012 - 5:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्त्रियांचं वस्तूकरण करण्यात मिपाची कितपत प्रगती झाली आहे याचा सांख्यिकी विदा जमवते आहे. माझ्याच काही जुन्या धाग्यातल्या प्रतिक्रिया उपयुक्त आहेत. सांख्यिकी विदा जमवण्यासाठी तिथे पुरेश्या शेंच्युर्‍या झालेल्या आहेत.

बाय द वे, मुकुल केसवन नामक भारतीय पुरूषानेच भारतीय पुरूष भारतीय स्त्रियांच्या तुलनेत कुरूप का असतात आणि त्याला पुरूषप्रधान संस्कृतीच का जबाबदार आहे याबद्दल एक रोचक लेख खुसखुशीत शैलीत लिहीलेला आहे. इच्छा असल्यास जरूर वाचा. त्याचं शीर्षकच पुरेसं बोलकं आहे:
THE UGLY INDIAN MAN
- Of hygiene, hair and horrible habits

स्त्री ही पुरुषापेक्षा सुंदरच हे सिद्ध करण्यासाठी लेखाची गरज नाही. स्त्री ही पुरूषापेक्षा दागिने, प्रसाधने न वापरताही सुंदर असते हे माझेच नाही तर
८४ वर्षे वयाच्या माझ्या आईचे ही हे मत आहे. स्त्रीला या बाबतीत निसर्गाने काही गोष्टी "फ्री" दिल्या आहेत. पुरूषाला बरेचसे प्रयत्नाने कमवावे लागते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Mar 2012 - 12:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्त्री ही पुरूषापेक्षा दागिने, प्रसाधने न वापरताही सुंदर असते

असं काही मला वाटत नाही. बहुतांश माणसं व्यवस्थित आहार, विहार आणि विचार यांच्यामुळे व्यवस्थितच दिसतात. सौंदर्य हे बघणार्‍याच्या दृष्टीवर असतं. मला फारच थोडी माणसं कुरूप दिसतात; विचारशून्य स्त्रिया आणि पुरुषही चेहेर्‍याने अनेकांना सुंदर वाटणारे असले तरी मला दखलपात्र वाटत नाहीत.

सदर लेखाच्या लेखकाचाही पुरूष कुरूप पैदा होतात असा दावा नसून, सवयींमुळे ते कुरूप दिसतात असा दावा आहे; जो मला पटतो. असल्या ओंगळ सवयी नसणारे पुरूष अर्थातच कुरूप नसतात.

चौकटराजा's picture

13 Mar 2012 - 7:34 pm | चौकटराजा

प्रश्न तुमचा नाही .कारण तुम्हाला न पटणार्‍याच गोष्टी जास्त दिसतायत. जातिच्या गं सुंदराला सारे काही शोभते हे कालिदासांचे वाक्य आहे . तुलनात्मकपणे सुंदरपणा स्त्री मधे अधिक असतोच असतो. न मानणार्‍या तुम्ही विरळाच !

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Mar 2012 - 10:51 am | विश्वनाथ मेहेंदळे

अशी कमेंट टाकणारा तुमचा मित्र महान* आणि ती इथे टाकणारे तुम्ही अतिमहान.

*(हा शब्द "तिय्या" असा वाचावा)

Nile's picture

9 Mar 2012 - 11:19 pm | Nile

आजच्या कॉलेज मधे एक परिक्षा मुलींची घ्या. त्याना आजची पेपरमधली हेड लाईन विचारा .अचूक उत्तरे २० टक्याच्या वर येणार नाहीत.

अच्छा, आणि मुलांची उत्तरं किती टक्के बरोबर येणार आहेत?

तुमच्या करता एक क्वीक क्वेश्चनः खालील वाक्य कोण म्हणालं?
“All generalizations are false, including this one.”
आलं नाहीतर खुशाल गुगल वर शोधा.

चौकटराजा's picture

11 Mar 2012 - 8:39 am | चौकटराजा

बाबा किती मुले पेपर वाचतात याचाही शोध घ्या !
अयला , घरातूनच बंड ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Mar 2012 - 1:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

नेट चे जाळे आयएस पी चा रेंज वगैरे नका आता लक्षात घेउ. पेपर तर सर्वत्र दिसतो ना ?

हे माझ्या मुद्द्याच्या अगदी विरुद्ध आहे.

माझा मूळ विचार असा आहे की एलीट लोक, ज्यांची कॉपी समाजात मारली जाते, जे अगदी १-२ टक्के असतील, त्यांच्यात काय दिसतं. सामान्यतः परिस्थिती प्रचंड दयनीय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. फक्त मुली-स्त्रियांना (आणि पुरूषांनाही) दोष शोधण्यापेक्षा, परिस्थिती काय आहे, लोकांची त्याबद्दल काय मतं आहे आणि त्यात काही बदल करायचा असेल तर काय करता येईल याचा विचार मी करते आहे.

चेतनकुलकर्णी_85's picture

9 Mar 2012 - 8:28 pm | चेतनकुलकर्णी_85

हा लेख वाचून व.पु.काळेंचे "Statistical Marathe" नावचे कथाकथन आठवले... 8) 8-) :cool:

Pearl's picture

9 Mar 2012 - 8:51 pm | Pearl

अजून वरची चर्चा वाचली नाहीये.
पण 'स्त्रिया संस्थळांवर कमी प्रमाणात का व्यक्त होतात' यावर माझं मत --
(१) जे आजवरं मी मिपावर पाहिलं आहे, अनुभवलं आहे त्यावरून मला असं सांगावसं वाटतं आहे की,
मैत्रिणींनो एखादी गोष्ट आवडली की जितक्या उस्फूर्तपणे लिहिता, तितकीच एखादी गोष्ट आवडली नाही तर तेही तितक्याच उस्फूर्तपणे लिहा. निदान एखादी गोष्ट अजिबातच आवडली नाही किंवा आता हे अति होतयं, सहन करण्यापलिकडचं लिखाणं आहे असं वाटलं त्याबद्दल तर आवर्जून लिहा.

(२) माझंही पहिले-पहिले असंच धोरणं होतं की जे आवडले ते आवडलं असं लिहा आणि जे नाही आवडलं ते सोडून द्या. पण जेव्हा (माझ्या) सहन करण्याच्या / सोडून देण्याच्या क्षमतेपलिकडचे लिखाणं आणि अशा लिखाणांची संख्या वाढायला लागली (आणि नेटवर पुरेसा वेळही मिळायला लागला - हे जास्त महत्वाचं ;-)) तेव्हा मात्र मी ठरवलं जे अजिबात आवडले नाहीये, तिथे सडेतोड मत व्यक्त करायचं.
ऑफकोर्स माझ्याकडे आता नेटवर पुरेसा वेळ आहे म्हणूनच हे होऊ शकते हे मान्य आहे.
जेव्हा वेळ कमी असतो, तेव्हा
१) कदाचित असचं होतं असावं की घटकाभर करमणूकीसाठी म्हणून मिपा उघडायचं, आवडेल ते घ्यायचं, नको ते सोडून द्या. कारण कोणत्याही चर्चेत भाग घ्यायचा म्हंटल की नेट/लॅपटॉपला चिकटून बसणं आलं जे रोजच्या गडबडीत किंवा कमी वेळ असताना बिलकूल परवडत नाही. हे झालं चर्चेबद्दल.
आणि दुसरं म्हणजे प्रशंसेचे शब्द लिहिताना जास्त वेळ द्यावा लागत नाही. कारण तुम्हाला कोणी उलटप्रश्न करणार नसते की हे तुम्हाला अप्रतिम का वाटलं, सुंदर/मस्त/छानचं का वाटलं इत्यादि. पण याउलट जे आवडलं नाही ते लिहिताना मात्र जास्त वेळ देउन मुद्देसूद आणि नेमक लिहावं लागतं. थोडक्यात हे करण्यासाठी वेळ लागतो.

२) असंही होतं की बर्‍याच मैत्रीणी (नेटवर रहाण्यास कमी वेळ मिळत असल्याने) वाचनमात्र रहात असाव्यात. मलाही वेळ कमी होता तेव्हा माझंही असचं व्हायचं

मराठे's picture

9 Mar 2012 - 8:59 pm | मराठे

स्त्रीयांचं प्रमाण फेसबूकवर/गबोल्यावर किंवा मराठी संस्थळांच्या व्यनी/खवमधे त्यांच्या इतर प्रकट लिखाणापेक्षा जास्त आहे असं जाणवतं. मला वाटतं वरच्या काही प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे स्वतःच्या 'कंफर्ट झोन' मधे राहणेच जास्त सोयिस्कर वाटल्यामुळे असं होत असावं.

फक्त मराठी संस्थळांविषयी बोलायचं तर प्रत्येक संस्थळाचा एक स्वभाव आहे (त्या त्या संस्थळांच्या सदस्यांप्रमाणे) त्यामुळे एखाद्या संस्थळावर आवर्जून लिखाण करणारी स्त्री इतर संस्थळांवर फक्त वाचनमात्र राहात असणार. (किंवा काही संस्थळांकडे ढूंकूनही बघत नसणार).

एक प्रश्न; लेखात दिलेला विदा हा प्रत्येक संस्थळावरच्या सर्व सदस्यांचा आहे की फक्त काँट्रीब्युटींग / अ‍ॅक्टीव सदस्यांचा?

सदस्यांची विभागणी खालील प्रमाणे करता येइल:
१. नॉन-मेंबर्सः ज्यांनी सदस्यत्व घेतलेच नाही पण मराठी वाचायला आवडतं म्हणून साईटला भेट देणारे
२. इनॅक्टीव: सदस्यत्व घेतलं आहे पण लॉगीन न होता वाचन मात्र राहणारे.
३. अ‍ॅक्टीव: लॉगिन होऊन पण लेख-प्रतिसाद न देणारे (प्रमाण कमी असावं)
४. काँन्ट्रीब्युटींग: लेख प्रतिसाद देणारे.

माझ्या मते पहिल्या दोन विभागात स्त्रीयांचं प्रमाण जास्त असावं. याला अर्थात कारणं बरीच असतील जी वरच्या काही प्रतिसादांमधून आलेलीच आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Mar 2012 - 1:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

एक प्रश्न; लेखात दिलेला विदा हा प्रत्येक संस्थळावरच्या सर्व सदस्यांचा आहे की फक्त काँट्रीब्युटींग / अ‍ॅक्टीव सदस्यांचा?

बहुदा भेट देणार्‍यांचा असावा.

फक्त मराठी संस्थळांविषयी बोलायचं तर प्रत्येक संस्थळाचा एक स्वभाव आहे (त्या त्या संस्थळांच्या सदस्यांप्रमाणे) त्यामुळे एखाद्या संस्थळावर आवर्जून लिखाण करणारी स्त्री इतर संस्थळांवर फक्त वाचनमात्र राहात असणार.

याचा अर्थ बहुसंख्य एलिट स्त्रियांना आवडेल असं संस्थळ अजून बनलेलं नाही. किंवा असलेल्या संस्थळांची पुरूषप्रधान वृत्ती या स्त्रियांना आवडत नाही?

एकूण उत्तरं न आवडणारी आहेत खरी!

मराठी संस्थळावर स्त्री-आयडी किती ह्या प्रश्नाचे उत्तर निदान सांखिकीच्या आधारे अपेक्षित असे मिळते. त्या उत्तरात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.
साहित्य ह्या प्रांतात तशीही स्त्रीयांची संख्या कमी आहे, संस्थळही ह्याला अपवाद नाही ( माझे हे विधान स्टेरियोटाईप नाही, माझे म्हणणे स्पष्ट करण्यासाठी पुढे वाचण्याची तसदी घ्यावी, धन्यवाद), साहित्य वाचण्याची इच्छा असणार्‍या, वाचणार्‍या आणि त्यावर चर्चा वगैरे करणार्‍या स्त्रीया आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यात किती भेटतात ( पुन्हा एकदा, हे स्टेरियोटाईप नाही. तुम्हीच स्वतःबद्दल सांखिकी चाळुन पहा ) ? मग मराठी संस्थळे त्याला कशी अपवाद असतील ?
हेच तुम्ही कला, नृत्य, संगीत आदी बाबींबाबत बघायला गेलात तर तिकडे विदा वेगळा मिळेल, हे ही स्वाभाविक आणि पटण्यासारखे नाही का ?
स्त्री-पुरुष समानता वगैरे कितीही हो-हो म्हटले तर निसर्गाने स्त्री-पुरुषांची शारिरीक आणि मानसीक घडण वेगवेगळी केली आणि अनेक सामाजिक, धार्मिक परंपरामुळे ह्या घडणीतला वेगळेपणा जाणवण्याइतका प्रभावी होतो हे ही सत्य नाही काय?
असो, हे जरी समर्थन नसले तरी मला बर्‍यापैकी पटते. इनफॅक्ट प्रत्यक्ष आयुष्य आणि आंतरजाल ह्यामध्ये ह्या बाबतीत फारसा फरक नाही हे ही मला मान्य करावे वाटते.

आता हे का घडत असावे ह्यामागची मला वाटणारी काही 'ऑन सिरियस नोट' कारणे :
स्त्रीयांची शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थिती. (आज जरी शिक्षणाच्या संधी ढिगाने उपलब्ध होत असल्यातरी हे प्रमाण स्त्रीयांपर्यंत किती पोहचते?)
कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदार्‍या.
कंफर्ट-झोनमधुन शक्यतो बाहेर न पडावे अशी बर्‍याच काळापासुन असलेली मानसिक घडण.
व्यक्त होण्याच्या भावनेचा व ते करताना आवश्यक असणार्‍या मानसिक शक्तीचा आभाव (हा आरोप नाही, वर्षानुवर्षे असलेल्या परंपरांचा परिणाम आहे).
त्रयस्थ गोष्टींशी एकरुप होण्यापुर्वी बाळगली जाणारी सावधानी किंवा काळजी.
अन्य गोष्टी ... जसे की कला, संगीत वगैरेंना जास्त प्राधान्य (ऑर्कुट, फेसबुकवर ह्यांचे ग्रुप्स बरेच आहेत)
हलक्याफुकल्या गोष्टीत रमण्याची आवड, डोक्याला जास्त त्रास देणार्‍या गोष्टींपासुन शक्यतो लांब राहण्याबद्दल प्राथमिकता.
असो, तूर्तास एवढेच.

काही टुकार सांगायचे तर :
स्त्री ह्या पुरुषांएवढ्या रिकामटेकड्या आणि बेशिस्त नसतात (इतर महत्वाची कामे आणि त्याचे महत्व ह्या बाबी ओळखुन असतात, पुरुष बर्‍याचदा ते फाट्यावर मारतात)
स्त्रीयांना इतर अनेक मन रिझवण्याचे पर्याय मराठी आंतरजालापेक्षा सुलभ वाटतात.

अवांतर :
मुळात मराठी आंतरजालावर स्त्रीया किती हे शोधणे मला कितकेसे फ्रुटफुल वाटत नसल्याने पर्टिक्युलर संस्थळाबाबत स्त्रीयांचा काय ट्रेन्ड आहे हा विदा तर त्याहुन युसलेस आहे असे वाटते. ह्याहुन संस्थळाच्या इमेज किंवा सभ्य-असभ्यतेची व्याख्या ठरवण्याचा प्रश्न जरी तूर्तास आला नसला तरी ते ही हास्यास्पद ठरेल असे वाटते. ह्याची उदाहरणे मी देऊ शकतो, सध्या गरज नाही इतकेच.

- छोटा डॉन

धन्या's picture

10 Mar 2012 - 5:06 am | धन्या

मुळात मराठी आंतरजालावर स्त्रीया किती हे शोधणे मला कितकेसे फ्रुटफुल वाटत नसल्याने पर्टिक्युलर संस्थळाबाबत स्त्रीयांचा काय ट्रेन्ड आहे हा विदा तर त्याहुन युसलेस आहे असे वाटते.

सहमत आहे.

वर लीमाउजेट यांनी म्हटल्याप्रमाणे "तसेही इथल्या कुठल्याही चर्चांमुळे रोजच्या आयुष्यात काहीही फरक पडणार नसतो.
" म्हणून ही चर्चा सुरु आहे. :)

सोत्रि's picture

9 Mar 2012 - 10:48 pm | सोत्रि

मुळात मराठी आंतरजालावर स्त्रीया किती हे शोधणे मला कितकेसे फ्रुटफुल वाटत नसल्याने पर्टिक्युलर संस्थळाबाबत स्त्रीयांचा काय ट्रेन्ड आहे हा विदा तर त्याहुन युसलेस आहे असे वाटते.

अगदी नेमके हेच, लिटरली हेच, मनात आले होते हा लेख वाचल्या वाचल्या.
त्यामुळेच विडंबन टाकायचे मनात आले होते पर ईस ममो ने भांजी मार दी :(

- (डॉन्याशी चक्क सहमत व्हावं लगलेला) सोकाजी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Mar 2012 - 5:27 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

विडंबन मिळाले नाही. कोणी खरड, व्यनी, इमेल, फेसबुक इत्यादींवर संपर्क करून वाचनासाठी उपलब्ध करून देईल का?

अन्नू's picture

9 Mar 2012 - 11:41 pm | अन्नू

गर्ल्स Vs बॉईज चांगलीच धोबीपछाड चालू आहे. Cat Fight
प्रकरणही जास्त तापत चालल आहे. आता यात कोण जिंकणार हे पहायच आहे.

"भांडो-भांडो तुम बिनधास्त भांडो हम इधर कपडे संभालता हय!"Smiley

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Mar 2012 - 1:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पर्लचा संपूर्ण प्रतिसाद थोड्याबहुत फरकाने सर्वच संस्थळांनी विचार करण्यासारखा आहे असं वाटतं.

निदान एखादी गोष्ट अजिबातच आवडली नाही किंवा आता हे अति होतयं, सहन करण्यापलिकडचं लिखाणं आहे असं वाटलं त्याबद्दल तर आवर्जून लिहा.

याच्याशी अगदी सहमत. फक्त लिहीताना भावनेच्या भरात भरकटण्याची शक्यता अधिक. तेव्हा डोकं शांत ठेवून लिहा; दोन-चार तासांनी व्यवस्थित मुद्देसूद न पटणार्‍या गोष्टींचा समाचार घेता येतो. थंड डोक्यानेही गरळ ओकणारे लोकं असले तरी ते अल्पसंख्य आहेत.

डॉन्याच्या प्रतिसादातला गंभीरपणे लिहीलेला भाग पहाता आणि त्या भागाला अनेक स्त्री आयडींकडून, पैसा, रेवती, इ. आलेलं अनुमोदन पहाता, ज्या वर्गाला आपण (का मी) एलिट समजतो (आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक बाबतीत) त्यांच्यातही स्त्रिया घर, संसार, सजावट, व्यवस्थितपणा, मुलं यांच्यापुढे जग असतं त्याचा विचार करण्यात कमी पडत आहेत असं वारंवार दिसून येत आहे. डॉन अगदी मस्करीत जरी म्हणतो, "स्त्री ह्या पुरुषांएवढ्या रिकामटेकड्या आणि बेशिस्त नसतात" तरी त्यात दुर्लक्ष करण्याजोगतं मला दिसत नाही. हे असं का याबद्दल सिमॉन दी बोव्वारने 'द सेकंड सेक्स' या पुस्तकात अतिशय सुंदर विवेचन दिलेलं आहे. (जमेल तेव्हा या पुस्तकाबद्दलही लिहायचं आहे.) किंबहुना डॉन्या, तू हा मुद्दा जेवढा लाईटली घेत होतास, मी ही तशीच होते. पण त्यामागचं विवेचन माझ्यासाठीतरी त्रासदायक आहे.

गर्ल्स Vs बॉईज चांगलीच धोबीपछाड चालू आहे

अजिबात नाही. माझा असा काहीही उद्देश नाही. संकेतस्थळ वापरकर्ते म्हणून आपण कुठे कमी पडतो का असा विचार करून लोकांची त्याबद्दल मतं काय आहेत असा मला प्रश्न पडला आहे.

मुळात मराठी आंतरजालावर स्त्रीया किती हे शोधणे मला कितकेसे फ्रुटफुल वाटत नसल्याने पर्टिक्युलर संस्थळाबाबत स्त्रीयांचा काय ट्रेन्ड आहे हा विदा तर त्याहुन युसलेस आहे असे वाटते. ह्याहुन संस्थळाच्या इमेज किंवा सभ्य-असभ्यतेची व्याख्या ठरवण्याचा प्रश्न जरी तूर्तास आला नसला तरी ते ही हास्यास्पद ठरेल असे वाटते.

इंग्लिशमधून फार विचार केल्यामुळे लेखात फार इंग्लिश शब्द आले आहेत. डॉन्या, त्याबद्दल तुला विशेषतः सॉरी.
आंजावर स्त्रिया असण्याबद्दल मला अधिक कळकळ का आहे हे लेखाच्या सुधारलेल्या आवृत्तीच्या शेवटी आहेच. हा विचार मला मराठी संस्थळांबद्दल करायचा असल्यामुळे ही चर्चा या पाचही संस्थळांवर टाकलेली आहे.

संस्थळाची इमेज आणि सभ्यासभ्यता, याबद्दल मला काहीही टिप्पणी करायची नव्हती. पण लेखाला आलेल्या प्रतिक्रियेत हा विषय आलेला असला तरीही याबद्दल, विशेषतः मिपाबद्दल, मी बोलणं अयोग्य असेल. माझ्याकडून बायस्ड आणि निगेटीव्ह अनुमानं मिळण्याचीच शक्यता अधिक.

अन्या दातार's picture

10 Mar 2012 - 7:51 am | अन्या दातार

डॉन्याच्या प्रतिसादातला गंभीरपणे लिहीलेला भाग पहाता आणि त्या भागाला अनेक स्त्री आयडींकडून, पैसा, रेवती, इ. आलेलं अनुमोदन पहाता, ज्या वर्गाला आपण (का मी) एलिट समजतो (आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक बाबतीत) त्यांच्यातही स्त्रिया घर, संसार, सजावट, व्यवस्थितपणा, मुलं यांच्यापुढे जग असतं त्याचा विचार करण्यात कमी पडत आहेत असं वारंवार दिसून येत आहे.

अधोरेखित भाग हा पूर्णपणे त्यांच्या प्रायॉरिटीजचा (आणि म्हणूनच वैयक्तिक) आहे. पुरोगामी किंवा एलिट म्हणवून घेण्यासाठी कुटुंबाचा रोष पत्करणे प्रत्येकाला पटेलच असं नाही. मसंवर अक्कल जमवण्यापेक्षा/आजमावण्यापेक्षा घराकडे आणि माणसांकडे लक्ष दिले तर त्यात चुकीचे काही आहे असं नसावे. पुरुष मंडळींनीही त्यात हातभार लावावा ही अपेक्षाही रास्तच आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Mar 2012 - 8:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुरोगामी किंवा एलिट म्हणवून घेण्यासाठी कोणी अशा गोष्टी करत नाही; विचार आणि त्यातून होणार्‍या प्रायॉरिटीजमुळे मनुष्य पुरोगामी म्हणवला जातो. पुरोगामी म्हणवले जाणारे न्यायमूर्ती रानडे दुसरं लग्न लहान मुलीशी केलं म्हणून पुरोगामी लोकांमधे थट्टेचा विषय बनले होते.

कुटुंबाचा रोष पत्करणे प्रत्येकाला पटेलच असं नाही.

घराबाहेरच्या जगाचा विचार केल्यामुळे कुटुंबाचा रोष पत्करावा लागत असेल तर त्या व्यक्तीला पुरोगामी आणि त्या व्यक्तीच्या इतर कुटुंबीयांना सनातनी म्हणण्याचा मोह आवरत नाही.
घर, संसार, मुलंबाळं यांची काळजी घेऊनही पुरोगामी व्यक्ती, विशेषतः स्त्रिया, नसतातच असं काही नाही. घराबाहेरच्या जगाचा विचार करणं हे एव्हरेस्ट चढण्यापेक्षा बरंच सोपं आहे.

पैसा's picture

10 Mar 2012 - 8:14 am | पैसा

बरं, तुझा बैल दूध देतो!! ;) ऑफिसला जायच्या घाईत आहे, म्हणून इतकंच!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Mar 2012 - 2:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

WPTA :D

अन्या दातार's picture

10 Mar 2012 - 8:18 am | अन्या दातार

घराबाहेरच्या जगाचा विचार केल्यामुळे कुटुंबाचा रोष पत्करावा लागत असेल तर त्या व्यक्तीला पुरोगामी आणि त्या व्यक्तीच्या इतर कुटुंबीयांना सनातनी म्हणण्याचा मोह आवरत नाही.

आजूबाजूच्या जिवंत लोकांकडे दुर्लक्ष करुन आंजावर (बर्‍यापैकी) व्हर्च्युअल जगात जगण्याला जर पुरोगामी म्हणत असाल तर प्रश्नच मिटला. जेंव्हा गरज पडते तेंव्हा सगळ्यात आधी आजूबाजूची माणसे मदतीला धावून येऊ शकतात, आभासी जगातील लोक (आयडी?) येतीलच याची शाश्वती नाही. अर्थात तुम्ही कुठे राहता वगैरे यावरही अवलंबून आहे. पण अजुनतरी शेजारच्या घरातील व्यक्तिशी नेटवर चॅट करण्यापेक्षा प्रत्यक्ष बोलणेच जास्त सोयीस्कर व श्रेयस्कर आहे (ही माझी समजूत)

(तुमच्या प्रतिसादानुसार प्रतिगामी/सनातनी) अन्या

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Mar 2012 - 8:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

(तुमच्या प्रतिसादानुसार प्रतिगामी/सनातनी) अन्या

हे मी म्हटलेलं नाही.

बाकी आपण दोघे लंब दिशांमधे बोलत आहोत. त्यामुळे आणि मी न बोललेले शब्द माझ्या तोंडी येत असल्यामुळे मी थांबते.

अन्या दातार's picture

10 Mar 2012 - 8:25 am | अन्या दातार

"तुमच्या प्रतिसादाच्या निकषाप्रमाणे" असा अर्थ अभिप्रेत होता. बाकी सिलेक्टीव्ह रिडिंग तुम्हीही केलेत हे बघून अंमळ मौज वाटली.
बाकी चालूद्या

आंतरजालावर स्त्रियांच्या असलेल्या प्रमाणाबद्दल लेखिकेची कळकळ मूळ लेख व प्रतिसादातून दिसून आली. हा विषय केवळ काथ्याकूटापर्यंत मर्यादित न ठेवता लेखिका ते प्रमाण वाढावे यासाठी काय करता येईल हे सुचवून ते अमलात आणण्यासाठीही पावले उचलेल यात शंका नाही.

अन्नू's picture

10 Mar 2012 - 10:51 am | अन्नू

यासाठी काय करता येईल हे सुचवून ते अमलात आणण्यासाठीही पावले उचलेल यात शंका नाही.

आंम्हालाही असंच वाटत.

अति अवांतरः- चित्रावरुन तरी मॉडर्न झाशीच्या राणी शोभतात. Smiley
सपललो तर उगीच हान्त्याल धरुन! पला पला पला... Smiley

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Mar 2012 - 11:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

यासाठी काय करता येईल हे सुचवून ते अमलात आणण्यासाठीही पावले उचलेल यात शंका नाही.

हा विदा बघितल्यावर निदान आजूबाजूच्या लोकांना या संदर्भात जागरूक करणे हे एक पाऊल नव्हे का?
या धाग्याच्या निमित्ताने, याच धाग्यावर किमान दोन-चार स्त्रीसदस्यांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या हा त्याचा पुरावा नव्हे? (त्या तक्रारी मला किती वैध वाटतात वा नाही हा मुद्दा नाही. माझा मुद्दा स्त्रियांनी न घाबरता, कंटाळता आपली मतं मांडणं हा आहे. मतं ग्राह्य का अग्राह्य ही पुढची पायरी आहे)

कोणत्याही बाबतीत बदल घडवण्यासाठी आधी "काहीतरी चुकतं आहे" हे अनेकांना समजावण्याची आवश्यकता आहे. अजूनही अनेकांना "काय फरक पडतो बायका नसल्या तरीही!" असा प्रश्न पडला आहे. अनेकांना "जिच्या हाती पाळण्याची दोरी", "मुलगी शिकली प्रगती झाली", "एक बाई शिकली की संपूर्ण कुटुंब शिकतं" या आपल्या कानांवर, डोळ्यांवर अगदी नियमितपणे पडणार्‍या विचारांचा २१ व्या शतकातला भाग, स्त्रिया आंजावरही समप्रमाणात असाव्यात, त्यांनी स्वतःला व्यक्त करावं हे पटत नाहीये. चूल आणि मूल यात धन्यता मानणार्‍या स्त्रियांच्या मुलांना, भावांना माया मिळणारच* पण लहानपणी विस्तारलेल्या दृष्टीतून जगाकडे न बघितल्यास आपलीही जगाकडे बघण्याची दृष्टीही लघु रहाण्याची शक्यताच जास्त हे अनेकांना अजूनही पटत नाहीये, हे याच धाग्यावरचे प्रतिसाद वाचल्यास समजेल. मुळात काही पावलं उचलण्यासाठी आपण तिसर्‍या मजल्यावर आहोत का तळघरात हे समजायला नको. माझा असा तद्दन गैरसमज होता की आपण आत्ता नदीत पोहतो आहोत आणि समुद्रात कसं जायचा याचा विचार करायला हवा. अनेक प्रतिसाद वाचून आपण विहीरीच्याही बाहेर नाहीत याची जाणीव होत आहे.

चित्रावरुन तरी मॉडर्न झाशीच्या राणी शोभतात.

फ्युचुरामा ही मालिका तुम्ही पाहिली असेल तर त्यात लीला हे पात्र (जिचं हे चित्र आहे) ती मारामारी करणारी नाही. ती ड्रायव्हर आहे. पण ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे. स्वतःच्या कामाशी प्रामाणिक, जगाकडे बघण्याची दूरदृष्टी असणारी आणि स्वतःकडे स्त्री म्हणून न पहाता माणूस म्हणून पहाणारी व्यक्ती आहे. मला 'लीला'चं पात्र आवडतं ते या कारणासाठी! बंदूक फक्त इन्सिडेंटल आहे.
आजच्या झाशीच्या राणीच्या हातात तलवार किंवा बंदूकीऐवजी कीबोर्डच जास्त शोभून दिसेल. हिंसेवर माझा विश्वास नाही.

*आपल्या माणसावर माया असणं ही मानवी वृत्ती आहे. त्यात स्त्री-पुरूष असा काही अपवाद मला दिसलेला नाही. ना जगाकडे बघण्याच्या दृष्टीकोनाने फरक पडत. मला माझ्या आईबद्दल प्रेम वाटणं हे तिच्या पाककौशल्याशी निगडीत नाही. पण तिच्याबद्दल आदर वाटणं हे तिच्या स्वातंत्र्याच्या कल्पना आणि तिने मला दिलेल्या घराबाहेरच्या जगाकडे बघण्याच्या दृष्टीमुळे आहे. आई, बहिण, मैत्रीण अशा नात्यातल्या स्त्रियांकडून जशी माया मिळते तशीच वडील, भाऊ, मित्र या लोकांकडूनही मिळतेच.

अन्नू's picture

11 Mar 2012 - 11:33 pm | अन्नू

माझा मुद्दा स्त्रियांनी न घाबरता, कंटाळता आपली मतं मांडणं हा आहे

अनुमोदन!

आई, बहिण, मैत्रीण अशा नात्यातल्या स्त्रियांकडून जशी माया मिळते तशीच वडील, भाऊ, मित्र या लोकांकडूनही मिळतेच.

मानल ब्वॉ! :)

अन्या दातार's picture

12 Mar 2012 - 12:43 am | अन्या दातार

माझा मुद्दा स्त्रियांनी न घाबरता, कंटाळता आपली मतं मांडणं हा आहे.

मान्य. पण त्यासाठी प्लॅटफॉर्म कोणता वापरावा हे ज्याचे त्याने ठरवावे, निदान तेवढे स्वातंत्र्य तरी दिले जावे. व्यक्त होण्यासाठी मराठी आंजा हा काही एकमेव पर्याय नाही हेही काही प्रतिसादांमधून दिसून येते.