गोबी मंचुरिअन हे माझं एकदम आवडतं स्टार्टर (पर्यायी मराठी शब्द सुचवा). ह्या रेसिपीची चव बर्याच प्रमाणात रेस्टॉरंट स्टाइल लागते. फक्त तयार झाली की गरम गरम खावी.
साहित्यः फ्लॉवरचे तुकडे (फ्लोरेट्स), बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेलं लसूण, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ, मिरपूड, १ वाटी मैदा, अर्धी वाटी कॉर्नफ्लोर, १ टीस्पून बेकिंग पावडर, तेल, टोमॅटो केचप, चिली फ्लेक्स, सोया सॉस, बारीक चिरलेला पातकांदा
कृती:
१) एका बाऊलमध्ये फ्लॉवरचे तुकडे, बारीक चिरलेला (कांदा, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या), मीठ, मिरपूड एकत्र करून २० मिनिटे झाकून ठेवा.
२) दुसर्या एका बाऊलमध्ये मैदा, कॉर्नफ्लोर, बेकिंग पावडर, मीठ, मिरपूड एकत्र करून त्यात पाणी घालून (भज्याच्या पिठापेक्षा दाट) मिश्रण बनवा.
मिश्रण दाट यासाठी बनवायचे असते की नंतर त्यात फ्लॉवरचे तुकडे घालायचे असतात तेव्हा हे मिश्रण आपोआप पातळ होते फ्लॉवरला सुटलेल्या पाण्यामुळे .
३) एका कढईत मध्यम आचेवर तेल तापत ठेवा. आता एका छोट्या बाऊलमध्ये थोडे फ्लॉवरचे तुकडे घेऊन त्यात थोडे पिठाचे दाट मिश्रण घालून हे फ्लॉवरचे तुकडे दाट मिश्रणाने चांगले कोट करून घ्या.
[सगळे फ्लॉवरचे तुकडे एकदमच दाट मिश्रणात घातले तर मिश्रण चांगलेच पातळ होऊन ही पा.कृ. फसू शकते. आणि नुकसान नियंत्रण (डॅमेज कंट्रोल) अवघड होऊन बसते :-) त्यामुळे एका वेळी थोडे थोडे फ्लॉवरचे तुकडे कोट करून तळून घ्यावेत. ]
४) लगेचच हे कोटेड फ्लॉवरचे तुकडे मध्यम आचेवर चांगले खरपूस तळून घ्या. त्यामुळे फ्लॉवर आतूनही चांगला शिजेल. हे तळलेले फ्लॉवरचे तुकडे मस्त कुरकुरीत लागतात.
५) आता सॉस बनवूया.
एका कढईत तेल घेऊन गरम करत ठेवा. मग त्यात बारीक चिरलेला (कांदा, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या) घालून तेल वेगळे होईपर्यंत परता. मग त्यात ४-५ चमचे टोमॅटो केचप, चिली फ्लेक्स घालून परता. मग २-३ चमचे सोया सॉस घालून चांगले परता. आता त्यात पाणी घालून शिजवा. मग त्यात (पाणी + कॉर्नफ्लोर) घालून १-२ मिनिटे शिजवा.
६) आता कुरकुरीत तळलेले फ्लॉवरचे तुकडे आणि हा सॉस एकत्र करून वरून बारीक चिरलेला पातकांदा घालून गरम गरम खा.
[मी बारीक चिरलेला पातकांदा घालायची विसरले होते]
फक्त यासारख्या पा.कृ. चा एकच तोटा असतो आणि तो म्हणजे करायला लागतो तासभर आणि संपवायला फक्त १०-१५ मिनिटे ;-)
प्रतिक्रिया
8 Mar 2012 - 3:20 am | रोहन कुळकर्णी
मस्तच!!!
8 Mar 2012 - 3:56 am | पिंगू
ढिंचाक पाककृती.. माझा नेहमीचा आवडता स्टार्टर.
- पिंगू
9 Mar 2012 - 9:14 pm | जेनी...
माझाही ..
मला फार आवडतो हा पदार्थ खायला ,:P
बनवायला नाही :(
10 Mar 2012 - 1:08 pm | पिंगू
बनवायला तरी फार कष्ट पडणार नाहीत. का मीच येऊ बनवून द्यायला... :P
- (पार्टटाईम स्वंयपाकी) पिंगू
8 Mar 2012 - 4:05 am | पारुबाई
मस्त केले आहे.
एकदम हेल्दी आहे.
8 Mar 2012 - 6:15 am | अत्रुप्त आत्मा
8 Mar 2012 - 11:45 am | पियुशा
ओक्के करुन बघण्यात येइल लवकरच :)
8 Mar 2012 - 11:57 am | जाई.
तोँपासू
8 Mar 2012 - 12:11 pm | जयवी
कसली सही पाककृती आहे........नक्कीच करुन बघणार :)
याआधी मी जरा वेगळ्या पद्धतीने करायचे. पण आता ही करुन बघेन :)
8 Mar 2012 - 1:07 pm | बटाटा चिवडा
8 Mar 2012 - 1:07 pm | परिकथेतील राजकुमार
चकण्यासाठी असलेला एक उत्तम पर्याय !
स्टेप बाय स्टेप फटू दिले असते तर मजा आली असती.
9 Mar 2012 - 2:47 pm | निवेदिता-ताई
मस्तच ह......:)
9 Mar 2012 - 9:08 pm | Pearl
सर्वांचे आभार....
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
शक्य तेव्हा स्टेप बाय स्टेप फोटो काढण्याचा प्रयत्न करेन :-)
9 Mar 2012 - 10:01 pm | सानिकास्वप्निल
मस्तं मस्तं :)
फोटो एकदम टेम्पटींग आहे :)
11 Mar 2012 - 2:10 am | इन्दुसुता
पाकृ आवडली. ( पातकांदा नसून सुद्धा ... :) ) फोटो फार आवडला... मी केल्यानंतर असे नेत्रसुख का मिळत नाही असा विचार केला आणि ठरवले की माझे corn flour चे प्रमाण बिघडत असावे... :(
15 Mar 2012 - 11:37 am | सस्नेह
>>>>[सगळे फ्लॉवरचे तुकडे एकदमच दाट मिश्रणात घातले तर मिश्रण चांगलेच पातळ होऊन ही पा.कृ. फसू शकते. आणि नुकसान नियंत्रण (डॅमेज कंट्रोल) अवघड होऊन बसते त्यामुळे एका वेळी थोडे थोडे फ्लॉवरचे तुकडे कोट करून तळून घ्यावेत. ]<<<
यावर एक चांगला पर्याय. बाऊलमध्ये मैदा, कॉर्नफ्लोर, बेकिंग पावडर, मीठ, मिरपूड एकत्र करून त्यात पाणी न घालता कोरडे मिश्रण फ्लॉवरच्या तुकड्यांवर भुरभुरावे व नीट लागेपर्यंत खालीवर करावे. मग वरून थोडे थोडे पाणी शिंपडावे. ओलसर झाले की तळावे. यामूळे लगदा होत नाही व मंचुरी कुरकुरीत होतात.
15 Mar 2012 - 11:43 am | सस्नेह
>>>>>[सगळे फ्लॉवरचे तुकडे एकदमच दाट मिश्रणात घातले तर मिश्रण चांगलेच पातळ होऊन ही पा.कृ. फसू शकते. आणि नुकसान नियंत्रण (डॅमेज कंट्रोल) अवघड होऊन बसते त्यामुळे एका वेळी थोडे थोडे फ्लॉवरचे तुकडे कोट करून तळून घ्यावेत. ]<<<<<
यावर एक चांगलं पर्याय .. बाऊलमध्ये मैदा, कॉर्नफ्लोर, बेकिंग पावडर, मीठ, मिरपूड एकत्र करून त्यात पाणी न घालता कोरडेच मिश्रण फ्लॉवरच्या तुकड्यांवर भुरभुरावे. खालीवर करून मिश्रण सगळीकडे लागले की वरून थोडे थोडे पाणी शिंपडावे. ओलसर झाले की तळून घ्यावे. यामुळे लगदा होत नाही व मंचुरी कुरकुरीत होतात.