भोजनालय का ...............

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in भटकंती
6 Mar 2012 - 3:43 pm

भोजनालय का.......

हंपीला दोन वर्षापूर्वी गेलो होतो. गाडी थांबवताच मन थक्क झाले. या भेटीदरम्यान बरेच म्हणजे खुपच फोटो काढले ते फोटो आणि इतिहास याची सांगड घालून एक भला मोठ्ठा (नेहमीप्रमाणे :-) ) लेख लिहायचे मनात आहेच पण त्या अगोदर एक लक्षात आलेली गोष्ट तुम्हाला सांगायचीय. जे मी लिहीणार आहे ते बरोबर आहे का हे ठरवायचे काम तज्ञांचे आहे. आपले मत मांडायला काय हरकत आहे ? या विचारातून धाडस करून हा उद्योग करत आहे. ( कदाचित हे अगोदरच कोणी सांगितले असल्यास व तसे कळवल्यास हा लेख काढायला हरकत नाही )

आमच्या गाईडने आम्हाला हंपी मधे खूप फिरवले. जवळ जवळ चार दिवस आम्ही त्या भग्न शहरात हिंडत होतो. एका ठिकाणी तो आम्हाला “चला तुम्हाला सैनिक जेथे जेवण करायचे ते ठिकाण तुम्हाला दाखवतो” असे म्हणून घेऊन गेला.

गेल्यावर बघतो तो काय मधे एक छोटा कालवा काढला होता आणि त्याच्या दोन्ही बाजूला दगडात कोरलेले केळीची पाने, वाट्या व ताटे. गाईड म्हणाला “ या कालव्यातून त्या काळी पाणी वहात असे. जेवण झाले की त्या वहात्या पाण्यात हात धुवायचे, उरलेले अन्न त्यात टाकून दिले की झाली स्वच्छता. अजूनही काही पर्यटक, त्यात काही विदेशीही होते, आश्चर्यचकीत होऊन विस्फारलेल्या डोळ्याने ते भोजनालय पहात होते. आमचा गाईडही खूष.

मला शंका आली ज्या राजाच्या पदरी लाखो सैनिकांचे सैन्य होते, त्याच्या शरीररक्षकांसाठी तरी ही व्यवस्था कशी पुरेल ? मी ही शंका त्याला विचारल्यावर त्याने खास सरकारी उत्तर दिले “ मी सरकारी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि त्यात आम्हाला हेच सांगण्यात आलेले आहे, तेच मी तुम्हाला सांगतोय”.

तेवढ्यात एका ठिकाणी माझे लक्ष गेले आणि मी मनात म्हटले अरेच्या या ताटाला उलट्या वाट्य़ा कशाला जोडल्यात ? मी त्याला पुढे जायला सांगितले आणि तेथे थोडा वेळ निरिक्षण केले. फौंड्रीत काम केले असल्यामुळे माझ्या लक्षात आले की ते सगळे Permanent Die Moulding चे साचे असावेत. ज्याप्रमाणे मोल्डींग बॉक्सचे दोन भाग असतात त्याप्रमाणे याचेही होते. जादा रस व हवा वाहून जाण्यासाठी खाचाही मारलेल्या होत्या. एवढेच नाही तर याच्यावर दोन्ही साचे एकामेकांवर बरोबर बसावेत म्हणून Dowels ही आहेत. बहुतेक याच्यात तांब्याची ताटे तयार करत असावेत व ते मोल्ड फोडल्यावर आतील ताट लगेच गार करण्यासाठी त्या वाहत्या पाण्यात टाकत असावेत....

खालील छायाचित्रे बघा आणि सांगा पटते आहे का मी काय म्हणतो आहे ते ......

यात एकही साच्याची जोडी दिसत नाही पण थोडी शोधली तर मला वाटते सापडेल. जरा उत्खनन करायला लागेल. खालच्या पेट्यांची रांग अगोदर टाकतात मग त्यावर वरची पेटी टाकतात व मातीने लिंपतात मग त्यात रस ओततात. थोडे गार झाल्यावर तो साचा परत फोडतात व आतील वस्तू लगेच पाण्यात टाकतात....

थोडक्यात हे भोजनालय नसून एक फौंड्री आहे...... हे पटले तर पुढच्या वेळेस तेथे जाल तेव्हा हेच सांगा....की ही १००० वर्षापूर्वीची Permanent Die फौंड्री आहे...

जयंत कुलकर्णी.

प्रतिक्रिया

स्मिता.'s picture

6 Mar 2012 - 4:00 pm | स्मिता.

काका, तुम्ही हम्पीसारख्या ठिकाणी जावून नुसतेच कोरीव मूर्त्यांचे आणि भग्न अवशेषांचे फोटो न काढता त्यावर केलेल्या विचाराचं कौतुक वाटलं.
पुरातन वस्तूंचा माझा अभ्यास नाही की त्यात विशेष गती नाही पण तुम्ही मांडलेली शक्यता मला तरी पटली. किंबहुना सार्वजनीक भोजनाकरता अशी दगडी, अवजड ताटं असण्याची शक्यता खूपच कमी वाटते.

मी-सौरभ's picture

6 Mar 2012 - 4:31 pm | मी-सौरभ

तुमाला म्हणून सांगतो,
हे असले प्रश्न सुद्धा माझ्या डोस्क्यात कधी आले नसते ;)
तुमच्या लेखातून शिकण्यासारखे सुद्धा खूप आहे.

(गणेशाज्वर बाधीत)

(गणेशाज्वर बाधीत) सोडून बाकी सगळ्याशी सहमत.

प्रकार रोचक आहे. इथे शेयर केल्याबद्दल तुमचे आभार.
कुणी अधिक प्रकाश टाकला तर वाचायला आवडेल. :)

चिगो's picture

6 Mar 2012 - 4:13 pm | चिगो

ह्याबाबतीत काही माहिती नसली (फौंड्री आणि हम्पी दोन्हीची) तरी नुसती गाईडची पोपटपंची मान्य करण्याऐवजी स्वतः ती जागा अभ्यासणे, हे आवडलं.. तुम्ही म्हणताय, ती शक्यता जास्त वाटते. कारण की, एक तर मोठ्या सैन्यासाठी एवढीशी जागा कमी पडेल.. आणि, "कालव्यात उरलेले अन्न टाकून दिले की झाली स्वच्छता" हेही थोडं विचित्र वाटतंय..

अन्या दातार's picture

6 Mar 2012 - 5:11 pm | अन्या दातार

नुसती गाईडची पोपटपंची मान्य करण्याऐवजी स्वतः ती जागा अभ्यासणे, हे आवडलं

अगदी असेच म्हणतो. तुमच्या दृष्टीला माझा दंडवत. :)

सुकामेवा's picture

6 Mar 2012 - 4:18 pm | सुकामेवा

मी जाणार आहे हम्पी आणि बदामी बघायला, जाण्याआधी तुम्हाला नक्की भेटेन

यकु's picture

6 Mar 2012 - 4:55 pm | यकु

मस्त.
पटण्‍यासारखा विचार.
आमच्या गावाकडच्या नदीत एका खडकावर हत्तीची पावले उमटली आहेत. खरीखुरी हत्तीची पावले.
योगायोगाने आकार दिसतात तशी नव्हे.
कितीही डोकं लावलं तरी हत्तीचे पाऊल खडकावर कसे उमटू शकते काही सुचत नाही.

कदाचित प्राचीन कवणे काळी ज्वालामुखीचा स्फोट होऊन लाव्हा वाहिला असेल.. आणि वहात असणार्‍या लाव्ह्यावर हत्तीने पाय दिला असेल (तो हत्ती मेला असेल काय? )

येत्या चार-दोन दिवसांत फोटो टाकतो त्याचे.

बटाटा चिवडा's picture

7 Mar 2012 - 10:03 pm | बटाटा चिवडा

कदाचित प्राचीन कवणे काळी ज्वालामुखीचा स्फोट होऊन लाव्हा वाहिला असेल.. आणि वहात असणार्‍या लाव्ह्यावर हत्तीने पाय दिला असेल

हाहाहा... तुमच्या कल्पना-शक्तीला सलाम !!! त्या हत्तीचा १ पाय जेव्हा त्या दगडावर पडला तेव्हा त्याचे बाकीचे ३ पाय (जर तो हत्ती 'नॉर्मल हत्ती' असेल तर ) कुठे होते आणि त्यांचे ठसे का उमटले नाहीत हा प्रश्न न राहून मनात येतोच..
असो ... त्या दगडाच्या फोटोची आतुरतेने वाट बघतो आहे... :-)

माझ्याही मनात हाच प्रश्न येतो.
पण एका पायाला लाव्हा पोळाल्यानंतर हत्तीला इतर तीन पायांबाबतही तसेच करणे आवडले नसावे.

कितीही डोकं लावलं तरी हत्तीचे पाऊल खडकावर कसे उमटू शकते काही सुचत नाही.

लाव्हाच असला पाहिजे असं नाही. सिमेंटसारखे नैसर्गिक गाळापासून बनलेले लगदासदृश पदार्थ असू शकतात. ते ओले असताना / त्यात पाण्याचा अंश असताना ते लिबलिबीत असतात आणि तेव्हा त्यात एक पाऊल उमटलं असेल. नंतर ती खूण काळाने पुसण्यावेळेआधीच (काही दिवसांतच) हा पदार्थ सुकला असेल (उदा. पूर ओसरल्याने) आणि मग एकदा सिमेंटसारखा घट्ट होऊन दगड बनून राहिला असेल.

अशी उदाहरणं पाण्याच्या आसपास पहायला मिळतात. धरणात वर्षानुवर्षे वाहून येऊन अडकलेला गाळ हा मायक्रो आकाराच्या कणांमधे रुपांतरित होतो आणि धरण गाळाने पूर्ण भरलं की किंवा कोरडं पडलं की त्यातलं पाणी सुकून या वस्त्रगाळ आकाराच्या चिखलाचा अक्षरशः काँक्रीटइतका अभेद्य खडक बनतो. पुन्हा पाणी आल्यास तो विरघळत नाही.. (काँक्रीटसारखंच)

यामागे असणार्‍या कॅपिलरी किंवा तत्सम काही अ‍ॅक्शन्स / रासायनिक घटक इ इ काही असतील तर तांत्रिक माहिती असलेले कोणी त्याविषयी जास्त सांगू शकेल.

हम्म..
पटणेबल गवि..
पण खडक डोंगऱकड्याच्या खड्कासारखा काळाभोर आहे
तीनेक तासात पोहोचतोय गावात.. आज रात्री किंवा उद्या हत्तीच्या पावलावरचा धागा नक्की ;-)

कवितानागेश's picture

9 Mar 2012 - 1:14 pm | कवितानागेश

पोळले असेल म्हणुन हत्ती लंगडी घालत पटकन बाहेर पळाला!
नाहीतर हत्ती बगळ्यासरखा एका पायावर उभा राहुन लाव्हातून वाहात येणारे शिजलेले गवत मटकावत असेल..
नाहीतर...........
असेच काहीबाही.....
:)

गवि's picture

6 Mar 2012 - 5:21 pm | गवि

जबरदस्त निरीक्षण... पटण्यासारखं आहे..

असेच म्हणतो.
मानलं तुम्हाला.
असाच काहीसा प्रकार म्हसावद जळगांव येथे आहे. भीम कुंड ....भीमाच्या पायाचा ठसा आहे तिथे.
(उजव्या आणि डाव्या सोंडेचा असे दोन्ही गणपती एकत्र आहेत तिथे.)

दादा कोंडके's picture

6 Mar 2012 - 5:43 pm | दादा कोंडके

मी हंपीला जाउन खूप वर्ष झाली. त्यामुळे ते ठिकाण आठवत नाहिये.

बाकी आपलं पर्यटन मंत्राल कुणालाही गाईडचं लायसन्स देतं हो. गोवळकोंढा किल्ला बघताना असाच अनुभव आला होता. आमच्या गृपमध्ये अमेरिकन लोकंही होती. तो गाईड त्याच्या दिव्य इंग्रजीतून इतकी चूकीची आणि पोरकट माहिती सांगत होता ना. त्या-त्या जागेवर घडलेल्या गोष्टी सांगाच्या सोडून राजा आणि त्याच्या जनानखान्याबद्दल इतस्ततः थुंकत काहितरी सांगत होता.

प्रचेतस's picture

6 Mar 2012 - 6:07 pm | प्रचेतस

मस्त संशोधन.
असेच असू शकते.

हंपीवरच्या लेखाची आता वाट बघत आहे.

नितिन थत्ते's picture

6 Mar 2012 - 6:17 pm | नितिन थत्ते

आपण म्हणता ते ठीक वाटत आहे. मोल्ड सारखेच दिसते आहे.
परंतु डॉवेल पिनांची उंची खूपच कमी आहे. त्या मोल्डच्या दोन भागांना एकमेकावर योग्य अलाईनमेंटने बसवायला कुचकामी वाटतात. ताटे कदाचित बनणार नाहीत.

कदाचित कॉपर इन्गट बनवण्याचा मोल्ड असेल. जालावर कॉपर इन्गटची (बहुतांश चौकोनी आकाराशिवाय) अशी इमेज मिळाली.

भोजनालय नक्कीच नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Mar 2012 - 7:32 pm | अत्रुप्त आत्मा

संशोधन पटले...वेगळ्या वाटेने विचार करण्यास उद्युक्त केल्या बद्दल धन्यवाद...

जोशी 'ले''s picture

6 Mar 2012 - 10:28 pm | जोशी 'ले'

मानलं बुवा तुमच्या 'पारखी नजरेला' ...
या die मधले runner तसेच riser चे बिस्किटं पण स्पष्ट दिसतायेत.

जयंत कुलकर्णी's picture

7 Mar 2012 - 10:53 pm | जयंत कुलकर्णी

बरोबर !
Proud to be a Fdyman !

शिल्पा ब's picture

6 Mar 2012 - 10:43 pm | शिल्पा ब

लेख आवडला. त्या काळी तांबे, चांदी वगैरे धातुंचे भांडे असताना अशी दगडाची ताटं कोण कशाला बांधेल? हम्पी काही अश्मयुगातलं नाही. अन समजा अशे दगडाचे भांडे बनवले तरी "उरलेले अन्न तिथेच कालव्यात टाकुन दिले की झाली स्वच्छता" अशी भारतीय मनोवृत्ती नक्कीच नाही. त्यामुळे तुमचे विचार पटतात.

जोशी 'ले''s picture

6 Mar 2012 - 10:52 pm | जोशी 'ले'

मानलं बुवा तुमच्या 'पारखी नजरेला' ...
या die मधले runner तसेच riser चे बिस्किटं पण स्पष्ट दिसतायेत.

जोशी 'ले''s picture

6 Mar 2012 - 10:54 pm | जोशी 'ले'

मानलं बुवा तुमच्या 'पारखी नजरेला' ...
या die मधले runner तसेच riser चे बिस्किटं पण स्पष्ट दिसतायेत.

जोशी 'ले''s picture

6 Mar 2012 - 10:57 pm | जोशी 'ले'

मानलं बुवा तुमच्या 'पारखी नजरेला' ...
या die मधले runner तसेच riser चे बिस्किटं पण स्पष्ट दिसतायेत.

तो पहिला फोटो वनमानवाची पाऊलखुण म्हणुन सहज खपुन जावा. ;)

मराठमोळा's picture

7 Mar 2012 - 4:13 am | मराठमोळा

>तो पहिला फोटो वनमानवाची पाऊलखुण म्हणुन सहज खपुन जावा
हाहाहा.. ईंडीया टीवी वाले असते तर नक्कीच. बाकी आमच्या गणपाशेटची पारखी नजर पण लै भारी बर का..

जयंत कुलकर्णींचे लेख नेहमीच माहितीपुर्ण आणि ईंटरेस्टींग असतात. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच.
धन्यवाद.

चित्रा's picture

7 Mar 2012 - 6:09 am | चित्रा

संशोधन पटण्यासारखेच वाटले.

५० फक्त's picture

7 Mar 2012 - 7:35 am | ५० फक्त

अतिशय उत्तम नजर आहे तुमची सर, तुम्ही म्हणत आहात तशी शक्यता वाटते, याबद्दल खरंच अजुन संशोधन होणं या दिशेनं आवश्यक आहे.

प्रभाकर पेठकर's picture

7 Mar 2012 - 11:47 am | प्रभाकर पेठकर

लेखातील तार्किक विचारांशी १०० टक्के सहमत.

पर्यटन विभागाला हे पटवून दिले तर प्राचिन भारताची परदेशी पर्यटकांसमोर होणारी नाचक्की टळेल.

मन१'s picture

7 Mar 2012 - 10:53 pm | मन१

नेहमीप्रमाणेच उत्तम लेख....

पैसा's picture

10 Mar 2012 - 5:24 pm | पैसा

अगदी ओरिजिनल विचार करून लिहिलंत!

रघु सावंत's picture

11 Mar 2012 - 8:43 pm | रघु सावंत

जयंत कुलकर्णी साहेब
उत्सुकता ताणली गेली
आश्चर्यचकीत होऊन विस्फारलेल्या डोळ्याने ते भोजनालय पहात होतो.
बाकी नुस्त भोजनालय की तोंडाला पाणी सुटते