मिपावरील उत्तमोत्तम लेख वाचायचे असतील तर...

Pearl's picture
Pearl in काथ्याकूट
4 Mar 2012 - 4:27 pm
गाभा: 

मिपावरील उत्तमोत्तम लेख वाचायचे असतील तर... (काय करावे ?)

आजवरच्या मिपावर वावरण्याच्या अनुभवावरून असं वाटतं की मिपावर कधी कधी खूपच छान, सुंदर, अप्रतिम असं काही काही वाचायला मिळतं, जे मी माझ्या सोयीसाठी वैयक्तिकरित्या वाचनखूण म्हणून साठवून ठेवू शकते.
पण काही वेळा जसे की
१) मिपा वर रोज लॉगइन व्हायला जमत नसेल/ वेळ नसेल तर
२) किंवा समजा मी मिपाची आजच सभासद झाली असेन तर मला याआधीचे
अनेक चांगले चांगले लेख/पा.कृ. मिस होतात. (वाचायचे राहून जातात.)

आणि सध्या असा कोणताही पर्याय मिपावर अस्तित्वात नाही की जेणे करून मला पर्टिक्युलरली(नेमके) हेच लेख वाचता येतील किंवा असं म्हणू की अशी कोणतीही सुविधा सध्या अस्तित्वात नाही की जेणे करून हे चांगले, सुंदर लेख ट्रॅक करता येतील.

तर असं काही करता येइल का की
१)प्रत्येक लेखाला वाचक १ ते ५ स्टार पैकी काही रेटिंग त्याच्या मनाने देउ शकतो. लेख ज्या प्रमाणात आवडला त्याप्रमाणात स्टार देता येतील आणि खूपच जास्त आवडला तर ५ स्टार.
त्यायोगे चांगल्या चांगल्या लेखनाचा ट्रॅक राहील असं वाटतं.
२)किंवा कमीत कमी लाइक(लेखन आवडले) चे बटन दिले तरी ज्या लेखाला जास्तीत जास्त लाइक मिळाले आहेत त्या लेखनाचा ट्रॅक राहील.
[ कारण प्रतिक्रियांची संख्या हा काही (चांगल्या लेखांचा) निकष ठेवता येतो असं मला वाटतं नाही कारण बरेच वेळा अवांतर होत असते.]

मला माहिती आहे की वरील पर्याय हे सांगायला/ म्हणायला सोपे असतील पण आमलात आणायला कठिण असेलही तरी पण मला हा विचार मांडावासा वाटला.

याबाबत जाणून घ्यायला आवडेल की
१) मिपाकरांना याबाबत काय वाटतं किंवा
२) कोणाकडे चांगले लेख ट्रॅक करण्यासाठी अजून काही उपाय / युक्ति(आयडिया) असल्यास
कृपया सुचवा.

प्रतिक्रिया

पर्ल तै ,हा उपाय योजला होता मि .पा.ने बहुतेक !
आय गेस मि. पा. ने काही दिवसापुर्वी ही पद्धत अवलंबिली होती , फक्त स्टार रेटिंगच्या एवजी लेखाला
गुणांक देण्याची सुविधा उपलब्ध केली होती मि.पां. ने ,
जसे की +२ , - २ असे काहीस ,
ते यशस्वी झाले की नाही ते माहित नाही . पण ती सुविधा बंद करण्यात आली काही दिवसातच :)

चौकटराजा's picture

4 Mar 2012 - 5:06 pm | चौकटराजा

मला वाटते एकूण मिळविलेले तारकांक याचा निकष ठेवून 'विशेष प्रशंसित" असा फिल्टर मदत पान च्या पुढे केला तर व त्यात ठराविक
म्हणजे उदा ६० तारकांक झाल्याशिवाय प्रवेश नाही असे करता येईल( जसा शेअर बाजारातील ए ग्रूप ) .प्रतिसाद किती आले यावर मात्र
लेखाची गुणवत्ता अजिबात ठरवू नये. व एका सदस्यास एकदाच तारकांक देण्याची मुभा असावी. म्हणजे अवास्तव स्तुतीला आळा बसेल.

>>लेखाची गुणवत्ता अजिबात ठरवू नये. व एका सदस्यास एकदाच तारकांक देण्याची मुभा असावी>>

+१
गुणवत्ता ठरवूच नये. मान्य.
पण ५ तारे मिळणार्‍या लेखांना टॉप रेटेड पोस्ट (उच्च गुणांक लेख) किंवा मोस्ट पॉप्युलर (सर्वाधिक लोकप्रिय) असं म्हणता येइल.

>>मला वाटते एकूण मिळविलेले तारकांक याचा निकष ठेवून 'विशेष प्रशंसित" असा फिल्टर मदत पान च्या पुढे केला तर व त्यात ठराविक
म्हणजे उदा ६० तारकांक झाल्याशिवाय प्रवेश नाही असे करता येईल>>
याबद्दल मला वाटते की याऐवजी (६० तारकांक वगैरे असं न ठरवता)
मिळविलेले तारकांक याचा निकष ठेवून 'विशेष प्रशंसित" असा फिल्टर (सिंगल सिलेक्शन कोम्बो बॉक्स) ठेवून त्यात '५ तारे', '४ तारे', '३ तारे', '२ तारे', '१ तारे', '० तारे' असे पर्याय ठेवावेत.

चौकटराजा's picture

5 Mar 2012 - 1:00 pm | चौकटराजा

मिळविलेले तारकांक याचा निकष ठेवून 'विशेष प्रशंसित" असा फिल्टर (सिंगल सिलेक्शन कोम्बो बॉक्स) ठेवून त्यात '५ तारे', '४ तारे', '३ तारे', '२ तारे', '१ तारे', '० तारे' असे पर्याय ठेवावेत.
हे लई ब्यास कारन क्यी, ज्येला पईठनी पायजेल तो ५ ष्टार मदी जाईल आन ज्येला कन्चिबी घ्या सुरतची फकस्त येकशे साट ला त्यो
झिरो मदी जायील !

धन्या's picture

4 Mar 2012 - 9:39 pm | धन्या

चला... कुणालातरी जाणवला म्हणायचा रोजच्या रतिबांमधला फालतूपणा. प्रचंड सहमत आहे तुमच्या मताशी. असं काहीतरी व्हायला हवं.

प्रमाण खुपच कमी असलं तरी मिपावर कधी कधी अतिशय चांगलं लेखनही होत असतं. पण रोजच्या रोज पडणार्‍या जिलब्यांमुळे हे चांगलं लेखन कधी मागच्या पानांवर ढकललं जातं हेच कळत नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

5 Mar 2012 - 11:37 am | परिकथेतील राजकुमार

आमच्या तात्यानी मिपावरती चांदण्या वाटायाल सुरुवात केली होती पूर्वी. पण त्या फार वेगळ्या कारणासाठी होत्या. ;)

त्या चांदण्या, त्या चांदण्यांवरच्या कविता, ती अवांतरे...

असो.. जुन्या आठवणींनी ड्वाले पाणावले.

रमेश आठवले's picture

6 Mar 2012 - 1:10 am | रमेश आठवले

17 फेब्रुवारी 2012 - 10:42
मी मिसळच्या सम्पादकाना खालील सुचना केलेली आहे.
You have by now received thousands of articles on various topics. As per the present practice, after new additions, the previous articles go on back pages. If one has to find a week old article by a particular author, one has to open many back pages before reching the page on which the article of one's interest gets discovered. The page number on which one finds this article is entirely decided by the number of articles appearing after the article of your interest was inserted. This process of search is time consuming and slightly irritating.
I, therefore, request you to make an alphabetical author index of all articles and place its link on the home page, so that one can reach all the articles of a given author with a single click.
Regards,
Ramesh Athavale

परिकथेतील राजकुमार's picture

6 Mar 2012 - 10:51 am | परिकथेतील राजकुमार

सूचना एकदम आवडेश.

सहसा आठवले नावाच्या लोकांनी केलेल्या सूचना ह्या भन्नाट आणि जबरदस्त असतात. नुकतीच रामदास आठवले ह्यांनी कोर्टाला केलेली सूचना देखील अशीच भन्नाट आहे.

पाषाणभेद's picture

6 Mar 2012 - 4:59 am | पाषाणभेद

काय चांगल, काय वाईट हे व्यक्तीसापेक्ष आहे.
येथे येत राहणे अन वाचन लिखाण करत राहणे यातच आनंद आहे.

गवि's picture

6 Mar 2012 - 12:12 pm | गवि

बाकीचे उपाय मेमरी / सर्व्हरवरील ताण वगैरे लक्षात घेऊन मालक यथावकाश करतील किंवा स्पीड कमी होणे टाळण्यासाठी करणार नाहीत.. हा निर्णय आपल्याला न कळणारे अनेक फॅक्टर्स लक्षात घेऊनच घेतला जाईल हे नक्की..

माझी फक्त एकच विनंती आहे की स्वतः च्या (ज्याचे लॉगिन चालू आहे त्याच्या) धाग्यावर स्वतः प्रतिसाद दिल्यास धागा वर येऊ नये..

यामुळे प्रत्येक वेळी नकळत ( किंवा कळल्याने) स्वतःच स्वतःच्या धाग्यावर वेळोवेळी धन्यवाद किंवा अन्य काही म्हणून धागा वर आणण्याचं टाळता येईल. शिवाय महत्वाचं म्हणजे मूळ धागाकर्त्याला मोठ्या कालावधीनंतरही स्वतःच्या धाग्यावर कॉमेंट करताना जुनापुराणा धागा वर आणल्याचे कर्म करावं लागणार नाही.

एक उदा. म्हणून माझ्या धाग्यांचं घेतो: माझ्या जुन्या धाग्यांवर (जास्त करुन विमानविषयक) मला अनेक मित्रांनी प्रश्न विचारले आहेत. काहीची उत्तरं मी तातडीने दिली. काहींनी मधे दोनेक दिवस गेल्यावर प्रश्न/ शंका विचारल्या. त्या मी तीन/चार दिवसांनंतर पाहिल्या.. अशा अनेक ओपन क्वेश्चन्सकडे पाहताना मला वाचकांची खरीखुरी उत्सुकता / कुतुहल दिसलं पण तेव्हा इतक्या उशीराने रिप्लाय केला तर सगळे धागे वर आले असते..
मग खवत किंवा व्यनीने उत्तर देणं हाच पर्याय राहिला.. पण इतर जणांना ते कळणार नाहीत..

अशा वेळी नवीन प्रतिक्रिया आली आहे असा नंबर त्या धाग्यापुढे यावा, पण धागा वर येऊ नये.. ज्यांना कुतूहल आहे ते आपल्या ट्रॅकरमधे जाऊन या नवीन प्रतिक्रिया / उत्तरं वाचू शकतील.

हे फक्त एक उदाहरण झालं. इतर धाग्यांनाही हे लागू होईल.. त्यासाठी तंत्रविषयक धागाच असला पाहिजे असं नाही.

अविनाशकुलकर्णी's picture

6 Mar 2012 - 9:18 pm | अविनाशकुलकर्णी

स्टार्स च्या ऐवजी फु बाई फु मधे देतात तसे तुरे द्यावेत..
तेव्हढाच बदल..