चालुक्यांची बदामी.

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in भटकंती
29 Feb 2012 - 3:20 pm

बदामी. हंपी, ऐहोळे, बदामी इत्यादी ठिकाणांची मधे जे फोटो काढले ते आत्ता टाकत आहे.

लिनाबाईंचे आभार मानायला पाहिजे कारण मी हे फोटो विसरलो होतो. बरेच आहेत पण त्यातील काही निवडकच टाकतो नाहीतर खूपच पाने भरतील. दुसरे म्हणजे यात इतिहास अजिबात लिहीत नाही कारण मग लेख नेहमीप्रमाणे “क्रमश:” करावा लागेल. सध्या मुसोलिनी पूर्ण करायचे असल्यामुळे तो मोह टाळला आहे. :-)

गेल्या गेल्या हा गुलाबीसर रंगाचा दगड नजरेत भरतो. या दगडाच्या अंगभूत रंग आणि पोत यांनी मुर्तींमधे मजा आणली आहे.

बदामी हे शहर आता छोटे असले तरी एके काळी चालुक्यांची राजधानी होती. (५४३ ते ८००) अत्यंत भरभराटीस आलेले हे राज्य नंतर लयास गेले.
या काळात अनेक डोंगरात त्यांनी देवळे खोदली त्यातील बदामीखुद्दचे आपण काही फोटो बघणार आहोत.

कारागिरांची हजेरी. त्यांच्याही प्रती आदर व्यक्त करूयात.

गुहा -

देऊळ १
असे म्हणतात हे ५ व्या शतकात कोरले गेले. याच्यातील अर्धनारीनटेश्वराची मुर्ती भव्य आणि अचूक आहे. आत शंकराची पिंड आणि गणपती इ. च्या मुर्ती आहेतच. खाली आमची गाईड मुर्ती समजावून सांगताना. ही मुसलमान होती पण तिला माहिती बर्‍यापैकी होती. तिच्या ज्ञानात थोडीफार भर घालून आम्ही दुसर्‍या गुहेत गेलो.

गाईड व अर्धनारीनटेश्वर.

तेथूनच पुढचे दिसणारे विहंगम दृष्य.

समोरच्या छोट्या किल्ल्यावरचे देऊळ -

गुहा/देऊळ क्रमांक २
याच्यात श्री विष्णूचे दोन अवतारांच्या मुर्ती आहेत. एक वराह आणि दुसरा त्रिविक्रम.
वराह

त्रिविक्रम

गुहेतील त्या काळातील रंग. अजून शाबूत आहेत.

साठ एक पायर्‍या चढून गेले की तिसरी गुहा येते. असे म्हणतात किर्तिवर्मन राजाने ही खोदली आणि विष्णूला अर्पण केली. (५७८ इ.स.)

विष्णू

खांबावरील अप्रतीम नक्षिकाम-

एक गंमतशीर शिल्प - आपल्या दारू पिउन धुंद झालेल्या स्त्रीला सावरणारा पुरूष -

नृसिंहाचा अवतार.

त्रिविक्रम

चवथ्या गुहेत सर्व जैन तिर्थंकरांच्या मुर्ती आहेत.

शेवट या दृष्याने करूयात.

मित्रहो माझा हंपी आणि या विभागातील मुर्ती शास्त्राचा आभ्यास चालू आहे. तो झाला की एक मस्त लेख मालिका टाकणार आहे.

क्रमशः नाही...
जयंत कुलकर्णी.
ता.क. लवकरच मी माझ्या मित्रांसाठी ह्युएन्संगचा प्रवास यावर ६० एक मिनिटांचा एक कार्यक्रम करणार आहे. ज्यांना रस आहे त्यांनी मला व्यनि किंवा खरड करावी. जागा कमी असल्यामुळे हे करणे भाग आहे.

0

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

29 Feb 2012 - 4:16 pm | अन्या दातार

सर्वच प्रकाशचित्रे उत्तम आहेत.
>>एक गंमतशीर शिल्प - आपल्या दारू पिउन धुंद झालेल्या स्त्रीला सावरणारा पुरूष -
काळ फिरला वाटतं इतक्या लवकर ;)

मी-सौरभ's picture

29 Feb 2012 - 4:27 pm | मी-सौरभ

घरी जाऊन बघतो..

(गणेशाज्वराने त्रस्त)

वपाडाव's picture

1 Mar 2012 - 3:48 pm | वपाडाव

फुल्ल सहमत...

अत्रुप्त आत्मा's picture

29 Feb 2012 - 4:36 pm | अत्रुप्त आत्मा

अप्रतिम...डोळ्यांचे पारणे फिटले गेल्या आहे...

हुश्श्श्....खूप खूप आभारी आहे जयन्तजी माझे काम वाचवल्याबद्दल. आणि माहितीपण खूप सुरेख दिली आहे. मला केव्हा जमलं असतं देव जाणे...
एक माकडांचा फोटो टाकायचा राहिला...कसली धीट आहेत ती बदामीची माकडं..!माझ्या हातातली पर्सच हिसकावून घेत होतं त्यातलं एक.

जयंत कुलकर्णी's picture

29 Feb 2012 - 4:49 pm | जयंत कुलकर्णी

आपले काम वाचवले नाही तर पुढच्या वेळेस आपण जरा काळजी घेऊन, माहिती देऊन लेख लिहावा ही विनंती. म्हणजे मी आपली जबाबदारी आणि काम वाढवले आहे. मी पट्ट्दकल आणि इतर ठिकाणांवर लिहिणार होतो पण आता तुम्ही लिहा. वाट बघतो.

सस्नेह's picture

29 Feb 2012 - 4:43 pm | सस्नेह

हायसोळ नव्हे, ऐहोळे. आणि पट्ट्दकल. तिथली भग्न देवळेही पहिली आहेत का तुम्ही ?

जयंत कुलकर्णी's picture

29 Feb 2012 - 4:46 pm | जयंत कुलकर्णी

नमस्कार !
चूक दुरूस्त केली आहे. हायसोळ राजे होते का हो ? माझ्या डोक्यात हा शब्द कुठू बसला होता कोणास ठावूक.

अन्या दातार's picture

29 Feb 2012 - 6:05 pm | अन्या दातार

हायसोळ नव्हे, होयसाळ साम्राज्य होते. हळेबीड-बेल्लूर हे त्यांचे मुख्य ठिकाण.

मागे दशानन यांनी त्यासंदर्भात काही लेख लिहिले होते. भाग १, भाग २, भाग ३, भाग ४

मालोजीराव's picture

29 Feb 2012 - 6:23 pm | मालोजीराव

आपल्या दारू पिउन धुंद झालेल्या स्त्रीला सावरणारा पुरूष

हे चित्र आवडण्यात आले आहे !
आताच्या काळातही डिस्क,पब मध्ये दारू पिऊन औट झालेल्या पोरींना असंच सावरावं लागतं :P
काय करणार !
- सावरणारा (मालोजी)

अप्रतिम शिल्पकला, आणि तुम्ही काढलेले फोटोही तितकेच सुंदर.
हंपीवरील मूर्तीशास्त्राच्या मालिकेची वाट पाहातो आहे.
तिसर्‍या गुहेतील (वरून ११ वा फोटो) स्तंभांसारखीच रचना असलेला पाताळेश्वरातील हा खोदीव सभामंडप.

सध्या गणेशाच्या कृपेनं फोटो दिसत नाहियेत.
पण माहिती छान.

अन्या दातार's picture

29 Feb 2012 - 9:15 pm | अन्या दातार

कृपेनं कि अवकृपेनं??

हा गणेशाज्वर फारच संसर्गजन्य दिसतोय. वेगाने फोफावतच आहे.

चौकटराजा's picture

29 Feb 2012 - 9:08 pm | चौकटराजा

मी काढलेले बर्‍यापैकी प्रेक्शणीय फोटू बदामी हंपीचे आहेत . ते इथे दाखवायचे झाल्यास एक अडचण अशी की त्याचे पॉवर पॉईट स्लाईडशो केलेले आहेत. एखाद्याकडे त्याचे परत जेपीजी फोटो करण्याची " कल्पनेची आयडीया " आहे का ?

मैत्र's picture

2 Mar 2012 - 4:33 am | मैत्र

पॉवर पॉइंट मध्ये सेव्ह अ‍ॅज मध्ये जा आणि फाईल टाइप शोधा. प्रत्येक स्लाईड स्वतंत्र जेपेग म्हणून सेव्ह करता येते.
ऑफिस २०१० असेल तर जेपेग, टिफ, बी एम पी काही ही फॉर्म मध्ये सेव्ह करता येईल..

जयंत कुलकर्णी's picture

29 Feb 2012 - 9:34 pm | जयंत कुलकर्णी

You can save the slide show as jpg and you will get all the images as jpg

पिंगू's picture

1 Mar 2012 - 7:31 am | पिंगू

बदामीला एकदा तरी जायला लागेलच..

- (हौशी प्रवासी) पिंगू

खुपच छान फोटो आहेत!!बदामीला जायचा सर्वात चांगला season कोणता??

हा धागा वर आला की कालपासून सारखं सारखं मला
चालुक्यांची बदनामी, चालुक्यांची बदनामी असंच दिसतं आहे..
च्यायला काय करावं काही कळत नाही..

जयंत कुलकर्णी's picture

1 Mar 2012 - 2:33 pm | जयंत कुलकर्णी

चायला, मी पण तसेच वाचलेना आत्ता.... करा बदनामी आमची....:-)

सुहास झेले's picture

1 Mar 2012 - 4:16 pm | सुहास झेले

मस्त फोटो जयंतकाका.... लेख मालिकेची वाट बघतोय :) :)

मनीषा's picture

1 Mar 2012 - 6:23 pm | मनीषा

सुरेख छायचित्रे !

पैसा's picture

1 Mar 2012 - 10:01 pm | पैसा

मरायच्या आधी एकदातरी बदामी, ऐहोळ, बेलूर हळेबीडु बघायचं आहे. फोटो आणि माहिती नेहमीप्रमाणे उत्तम! (तुमच्या लेखांसाठी आता प्रतिक्रियेची एक वर्ड फाईल तयार करून ठेवणार आहे. दर वेळी चोप्य पस्ते केलं की काम झालं!)

प्राजु's picture

2 Mar 2012 - 2:39 am | प्राजु

सॉल्लिड!!

पाषाणभेद's picture

2 Mar 2012 - 3:51 am | पाषाणभेद

सुंदर

विकास's picture

2 Mar 2012 - 5:26 am | विकास

फोटो आणि त्यातील वास्तूकला दोन्ही खूपच आवडले.. बदामीला जे शाकंभरी देवीचे देऊळ आहे ते येथेच आहे का?

अन्नू's picture

2 Mar 2012 - 5:34 am | अन्नू

__/\__ :) शब्दांची गरज न लगे आता. Smiley

चौकटराजा's picture

2 Mar 2012 - 5:46 am | चौकटराजा

@ जयन्तराव व मैत्र धन्यवाद ! मार्गदर्शना बद्दल ! ( १९८५ पासून संगणक वापरतोय काय ज्ञान आहे ! )
@ पैसा. बदामीला ऐहोळ विशेषकरून पत्तडकल साठी जाच !
@ महारानी. तेथील मर्कटलीलेला सिझन नाही . आपण त्याचे वंशज असल्याने नाताळची सुटी बेस्ट !
@ विकास , ते देऊळ बनशंकरीचे !

चौकटराजा's picture

2 Mar 2012 - 5:49 am | चौकटराजा

@ जयन्तराव व मैत्र धन्यवाद ! मार्गदर्शना बद्दल ! ( १९८५ पासून संगणक वापरतोय काय ज्ञान आहे ! )
@ पैसा. बदामीला ऐहोळ विशेषकरून पत्तडकल साठी जाच !
@ महारानी. तेथील मर्कटलीलेला सिझन नाही . आपण त्याचे वंशज असल्याने नाताळची सुटी बेस्ट !
@ विकास , ते देऊळ बनशंकरीचे !

मराठमोळा's picture

2 Mar 2012 - 5:50 am | मराठमोळा

अप्रतिम शिल्प आहेत.. फोटुही जबरदस्त त्या काळात घेऊन जाणारे..

अवांतरः यावेळी कुलकर्णी साहेबांचा कॉपीराईट मार्क कसा नाही आला फोटोंवर. :)