वंदे मातरम् !
तथाकथित टीम अण्णाचे सदस्य श्री अरविंद केजरीवाल यांनी कालच पुन्हा एकदा देशाच्या सार्वभौम संसदेवर चिखलफेक करून दुगाण्या झाडल्या आहेत. 'आपली संसद हेच या देशाकरता सर्वात मोठे संकट आहे, तिथे सगळे बलात्कारी आहेत' वगैरे वगैरे मुक्ताफळे केजरीवालांनी उधळली आहेत.
टीम अण्णांच्या पाठीशी असलेला संघ व भाजपचा छुपा पाठिंबा, परकीय शक्तींचा आणि कॉर्पोरेट भांडवलदारांचा पैसा आणि माध्यमांनी हिरो केल्याबद्दल 'आपणच काय ते सर्वेसर्वा आहोत' असा टीम अण्णाचा स्वत:बद्दलचा फाजील आत्मविश्वास आता अधिक बळावलेला दिसतो, असे म्हणावे लागेल.
केजरीवालांनी झाडलेल्या वरील दुगाण्यांवरून टीम अण्णांनी आता पुन्हा एकदा संसद आणि राज्यघटना यांना चॅलेन्ज करण्याचे ठरवलेले दिसते. या मंडळींना या देशात लोकशाही नकोच असून केवळ कॉर्पोरेट भांडवलशाही हवी आहे असाच यांचा एकंदरीत छुपा अजेंडा दिसतो. परंतु मुंबईतील अण्णा आंदोलन सपशेल हापटल्यामुळे टीम अण्णाला आताशा चळही लागलेला दिसतो आहे.
भारतीय राज्यघटनेतील कलम १९ (१) (अ) नुसार अरविंद केजरीवालांना भाषण करायची व आपले विचार मांडण्याची मुभा आहेच परंतु त्याचसोबत कलम १९ (२) काय म्हणते (...so far as such law imposes reasonable restrictions on the exercise of the right conferred by the
said sub-clause in the interests of the sovereignty and integrity of India,) याकडे केजरीवालांचे लक्ष गेलेले दिसत नाही आणि म्हणूनच संसदेवर दुगाण्या झाडून भारतीय राज्यघटना व लोकशाहीच्या सार्वभौमतेवर हल्ला चढवण्याचा गंभीर गुन्हा त्यांनी केलेला आहे, व याकरता आम्ही या लेखाद्वारे श्री अरविंद केजरीवाल यांचा तीव्र निषेध करतो व त्यांना भारतीय दंड संविधान कलम १५३(ब) (अ) च्या अंतर्गत imprisonment for 3 years, or fine, or both—Cognizable—Non-bailable—Triable by Magistrate of the first class—Non-compoundable - या तरतुदीनुसार शिक्षा व्हावी, अशी इच्छा व्यक्त करतो.
आणि त्यातूनच जरी केजरीवालांच्या म्हणण्याप्रमाणे जर त्यांना भारतीय संसद अगदी धुतल्या तांदळासारखी स्वच्छ हवी असेल तर त्यांना स्वत:चा पक्ष काढून निवडणुका लढवण्याची व निवडून येऊन त्यांच्या स्वप्नातली संसद प्रत्यक्षात आणण्याची मुभा आहेच. परंतु त्यांनी खुद्द संसदेच्याच संघीय स्वरुपावर कदापि हल्ला करू नये, तो सहन केला जाणार नाही असे या लेखाद्वारे आम्हाला सांगावेसे वाटते.
जय हिंद..!
-- कॉमॅ.
प्रतिक्रिया
28 Feb 2012 - 11:52 am | चिरोटा
शिक्षा झालीच पाहिजे. संसद सदस्यांचा अपमान आम्ही भारतिय कदापी सहन करणार नाही.
(युवराज्ञी प्रियांकाचा चाहता) चिरोटा
29 Feb 2012 - 2:36 am | निशदे
शिक्षा झालीच पाहिजे. संसद सदस्यांचा अपमान आम्ही भारतिय कदापी सहन करणार नाही.
(युवराज्ञी प्रियांकाचा(चिरोट्याहून मोठा) चाहता) निशदे
29 Feb 2012 - 3:33 am | अन्नू
हो हो ही झालीच पाहीजे
(सुकुमारी ०ल्पा हीचा भयंकर चाहता, प्रियकर) अन्नू! :P
28 Feb 2012 - 12:38 pm | कपिलमुनी
>>असे म्हणावे लागेल..
म्हणा की..
>> लागलेला दिसतो आहे
दिसु द्या की ..
>> आम्ही या लेखाद्वारे श्री अरविंद केजरीवाल यांचा तीव्र निषेध करतो
जबर्या इनोदी वाक्य !!
>> या तरतुदीनुसार शिक्षा व्हावी, अशी इच्छा व्यक्त करतो.
तरतुद माहित आहे ना ..मग करा कि कोर्टात याचिका दाखल ..इथे कशाला जिलेबी ??
>>तो सहन केला जाणार नाही
लेख लिहिण्याशिवाय तुम्ही नक्की काय करणर ते समजला तर आनंद होइल ..
28 Feb 2012 - 1:10 pm | अत्रुप्त आत्मा
28 Feb 2012 - 1:16 pm | पियुशा
टीम अण्णांच्या पाठीशी असलेला संघ व भाजपचा छुपा पाठिंबा, परकीय शक्तींचा आणि कॉर्पोरेट भांडवलदारांचा पैसा आणि माध्यमांनी हिरो केल्याबद्दल 'आपणच काय ते सर्वेसर्वा आहोत' असा टीम अण्णाचा स्वत:बद्दलचा फाजील आत्मविश्वास आता अधिक बळावलेला दिसतो, असे म्हणावे लागेल.
तुम्ही "अण्णाना पर्सनली ओळ्खता का हो ? ;)
का मिडियात जे काही छापले/बोलले जाते त्यावर जास्ती विश्वास आहे तुमचा ?
एकतर आपला सामान्य माणुस देशासाठी काही करत नाही वरुन असले धागे काढूण ,वाचुन ,तुमच्या धाग्यातुन प्रेरणा घेउन काही साध्य / हासिल होइल ? की होणार आहे ? हे तुम्हालाच ठाउ़क ?
काय मत काय आहे तुमच स्वतःच ( एकन्यासाठि उत्सुक ) ;)
धन्यवाद :)
28 Feb 2012 - 4:19 pm | आबा
केजरीवाल, टीम अण्णा वगैरे लोक फाजील आहेत, दुगाण्या झाडणारे आहेत,...
हे सगळं खरं आहे, असं आपण सोपेपणासाठी गृहीत धरू.
आता त्यांनी जे आरोप केलेत, ते खोटे आहेत हे सिद्ध करू शकाल काय ?
28 Feb 2012 - 5:40 pm | अन्या दातार
१. हा एक दुवा दिसतोय ज्यात असं म्हणले आहे कि १५० खासदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पण गुन्हे दाखल असणे व ते सिद्ध होणे यात बरेच अंतर असते. अन घटनेनुसार जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोवर निरपराधी मानतात.
२. एकूण ५४५ लोकप्रतिनिधींच्या गृहात १५० आरोपी आहेत. म्हणजेच फारफार तर २७.५२% सदस्य आरोपी आहेत (खरंतर इतकेही असायला नकोत). केजरीवाल साहेब या २७.५२% सदस्यांच्या जोरावर संपूर्ण गृहास दूषणे देत आहेत.
३.
हे सरसकटीकरण करणे संसदीय ढाच्याला व एकंदर समाजव्यवस्थेलाच हानीकारक आहे. पण एका आंदोलनाने मिळालेल्या प्रसिद्धीपुढे त्यांची दृष्टी क्षीण झाली असावी; ज्यामुळे बेभान होऊन आरोप करत सुटले आहेत.
28 Feb 2012 - 5:50 pm | प्रशांत उदय मनोहर
+१
28 Feb 2012 - 6:06 pm | कॉमन मॅन
अगदी सहमत. आमचाही हाच मुद्दा आहे/होता.
यू सेड इट सर. आमच्या धाग्याचे सार्थक झाले..!
आभारी आहे..
28 Feb 2012 - 8:02 pm | आबा
बरोबर आहे म्हणा तुमचंही,
पण केजरीवाल असं म्हणाले,
" Parliament and assemblies are hostage to criminals, corporate mafia and corrupt. Time to reclaim them. Second freedom struggle.
India has been dictatorship of party high command. Time to make it truly by, of and for the people.
This Parliament has 15 MPs facing murder charges, 23 attempt to murder, 11 cheating section 420, 13 face kidnap charges.
In UP, 5 people accused of rape have been fielded by parties. Shud we expect them to deliver India out of corruption and crime?
Parliament and assemblies are temples of democracy and they watch blue films in temples, tear Bills n throw chairs.
When we question them, they say u don't have faith in Parliament. How can we have faith that such people will deliver India out of poverty?
Till the character of Parliament and assemblies is changed, there is no hope.
They are threatening to sue me for sedition and for insulting Parliament. I hv stated the truth n m willing to face consequences thereof. "
- Arvind Kejriwal "
यात ते आकडेवारीच सांगत आहेत,
आता यातले पहिलेच ट्वीट वेगळे काढून त्यावरून हक्कभंग दाखल करणे, हे सुद्धा बरोबर नाही
28 Feb 2012 - 9:07 pm | गणपा
एकंदर काय तर मिडियाने पुन्हा सुतावरुन स्वर्ग गाठला आणि कॉमन मॅन* बळी पडला.
* मिपा सदस्य नव्हे.
29 Feb 2012 - 10:49 am | अत्रुप्त आत्मा
आणि कॉमन मॅन* बळी पडला.>>>
29 Feb 2012 - 1:20 am | हुप्प्या
खासदार हे पद चांगले पावरबाज असते. खासदाराची पोलिस, न्यायव्यवस्था, अन्य स्थानिक नेते ह्यांच्यात उठबस असते. सर्वसामान्य लोकांना धारेवर बसणारे पोलिस खासदाराच्या वाट्याला सहसा जात नाहीत. त्यामुळे असे असूनही जे गुन्ह्यात पकडले गेलेत ते फारच "पोचलेले" लोक असावेत. नेहमीचे सामदामभेददंड वापरुनही ज्यांच्यावर गुन्हे दाखल होतात ते खासदार हे वादातीत गुन्हेगार असण्याची शक्यता मोठी आहे. याउलट आपली सत्ता, पैसा, भाईबंद वापरुन आपले गुन्हे यशस्वीरित्या दाबू शकणारे कितीतरी नग असणार. तेव्हा पकडले गेलेले वा आरोप लावलेले लोक हे हिमनगाचे एक लहानसे टोक आहे. त्यावरुन संसदेतील गुन्हेगारांच्या आकडेवाडीचा अंदाज केला जाऊ नये. गेलाच तर खासदार गुन्हेगारांची संख्या याहून कितीतरी असणार असा केला जावा.
निवडणुकीचे तिकिट मिळवणे, निवडणूक जिंकणे ह्या सगळ्या प्रक्रियेत गुन्हेगारी जगाचा सहभाग असणे हे गृहित धरलेले असते. तो नसेल तर खासदार बनू शकत नाही असा एक अलिखित नियम बनला आहे. तेव्हा केजरीवालांचे हे विधान फार चुकीचे नाही.