कृपाछत्र हरपले!

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
25 Feb 2012 - 8:00 am
गाभा: 

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12027781.cms
अलीकडे कृपाशंकर नामक महात्म्याचे नाव वारंवार चर्चेत येते आहे. ह्या सद्गृहस्थाने घरावर सोन्याची कौले घालायचेच बाकी ठेवले होते. अशा अचाट आणि अफाट रकमेच्या उलाढालीने कोर्ट (म्हणे) चक्रावून गेले.
हे काही नवे नाही. ही विभूती भ्रष्टाचाराकरता कायमच चर्चेत होती. पण नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकात काँग्रेसचे पानिपत झाल्यामुळे सोनियाच्या कौलावरील सोनियाचे कवच हटले. थोडक्यात वरुन रोष झाल्यामुळेच की काय असली कुलंगडी उघडकीस येऊ लागली आणि त्यावर आश्चर्य व्यक्त होऊ लागले, कारवाया होतायत की काय असे वाटू लागले.

अशा ह्या थोराचे कुलदीपकही आपल्या कुळाचे नाव उज्ज्वल करत आहेत ह्यात आश्चर्य ते काय? नावाला कुठेसे पायलट म्हणून नोकरी करत होते पण मुख्य काम खोर्‍याने पैसा ओढणे हेच.
लाजेकाजेस्तव कॉंग्रेसने ह्या सज्जन गृहस्थाला प्रदेशाध्यक्षापदावरुन डच्चू दिला पण नंतर तो भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस यायच्या आधीच केला वगैरे सारवासारवी केली गेली. म्हणजे हे चांगले की वाईट?

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12016674.cms
एका चाळीत रहाणार्‍या संजय तिवारी ह्या झुंजार माणसाने जिद्दीने किल्ला लढवून हे प्रकरण उघडकीस आणले. त्याला सलाम!

कृपासाहेबांच्या कृपाछत्राखालचे समर्थक आता इतरांकडे बोट करुन ह्यांनीही पैसे खाल्ले मग आमच्याच नेत्यावर राग का वगैरे राग आळवायला घेतले आहेत.
आता पुढचा टप्पा काय? तिहारची तीर्थयात्रा करुन पवित्र होऊन येणार आमच्या सुरेशभाईंसारखे?

प्रतिक्रिया

श्रीयुत संतोष जोशी's picture

25 Feb 2012 - 8:24 am | श्रीयुत संतोष जोशी

हे तर हिमनगाचे वरचे टोक आहे . पाण्याखाली काय असेल त्याची फक्त कल्पनाच केलेली बरी.काही दिवस थांबा मग बघा त्या क्रुपाशंकरला पाठिशी घालायला एक एक जण कसा हिरिरीने पुढे येतो तो .

डॉ.श्रीराम दिवटे's picture

25 Feb 2012 - 9:02 am | डॉ.श्रीराम दिवटे

टक्केवारीची बोलणी फिसकटली, किंवा टक्का मिळाला नाही तर कृपाछत्रच काय भू छत्रही कुणी डोईवर धरत नसते ही वस्तुस्थिती आहे.

चेतनकुलकर्णी_85's picture

25 Feb 2012 - 10:45 am | चेतनकुलकर्णी_85

आता सोनिया ,राहुल,प्रियांका, रोबेर्ट वडेरा ...यांचे वस्त्र हरण कधी होणार??(त्या रोबेर्ट वडेरा चे म्हणे ऐर-पोर्ट वर कोणी चेच्किंग पण नाही करत...)
ह्या देशातील पुचाट लोकशाही जाऊन लष्करी उठाव व्हावा अशी मागणी आहे..जेणे करून ह्या सर्व लोकांना गोळ्या घातल्या जातील...

दादा कोंडके's picture

25 Feb 2012 - 1:29 pm | दादा कोंडके

जेणे करून ह्या सर्व लोकांना गोळ्या घातल्या जातील...

चिल माडी साSSSSSर!

अन्या दातार's picture

25 Feb 2012 - 10:51 am | अन्या दातार

कृपाछत्र हरपले!!
बरं. मग आम्ही काय करु म्हणता??
आम्ही पेपर वाचतो. एक नाही तर ३-४ वाचतो. पुन्हा तुमचे धागे आहेतच. एवढे करुन हाताशी काय लागते का? काहीच नाही. पेपरवाल्यांचे तर तेच काम आहे बातम्या देणे, तुम्ही दुसरे काहीतरी काम का शोधत नाही??

यकु's picture

25 Feb 2012 - 12:48 pm | यकु

तुमचं एकेक शीर्षक इंट्रेस्टिंग असतं; पेपराच्या हेडलाईनसारखं..
कृपाछत्र हरवले
स्वारगेटचा यमदूत
मौलवींची मौलिक मौक्तिके
बुखारींचे विखारे निखारे
भारताची रहमदिल न्यायालये
एका पाणीपुरीवाल्याची (ना)पाक क्रिया

आणखी लिहा ;-)

येवढंच होय !! कोण गेलं आता म्हणतच धागा उघडला मी.

निवेदिता-ताई's picture

25 Feb 2012 - 10:20 pm | निवेदिता-ताई

असेच म्हणते

सुहास झेले's picture

3 Mar 2012 - 9:22 am | सुहास झेले

अगदी अगदी.... ह्येच विचार आले होते मनात...

मराठी_माणूस's picture

25 Feb 2012 - 1:03 pm | मराठी_माणूस

मोठ्या साहेबां वर अशी वेळ येईल तो "सोनियाचा दिनु"

चिरोटा's picture

25 Feb 2012 - 1:53 pm | चिरोटा

गेले ५/६ वर्षे कृपाशंकर, सिंधुदुर्ग सम्राट आणि राष्ट्रवादी सम्राट ह्यांनी हातमिळवणी करून रत्नागिरी,सिंधुदुर्ग येथे आंब्याच्या बागा,समुद्राजवळच्या जमीनी खरेदी करायचा सपाटाच लावला होता. समुद्रकिनार्‍याजवळ जमीन घ्यायची आणि मिळवलेला काळा पैसा हॉटेलात गुंतवायचा असे सामाजिक कार्य गेले काही वर्षे चालु होते.

चेतनकुलकर्णी_85's picture

25 Feb 2012 - 2:01 pm | चेतनकुलकर्णी_85

मोठे साहेब म्हणजे त्योच न बारामतीचा बारा बोड्याचा .....?

मोदक's picture

26 Feb 2012 - 10:44 pm | मोदक

चेतन,

मिपावर सभ्य भाषा वापरणे गरजेचे आहे. (सभ्यतेची माझी व्याख्या = जी भाषा आपण घरात आणि मंदिरात वापरतो ती.)

(वरच्या प्रतिक्रियेबद्दल 'तुम्ही कधी मोजायला गेला होतात..?' असे प्रश्न येण्याची शक्यता मिपावर नाकारता येत नाही.)

तुमचा म्होटया सायबाव राग आसल पर हे बारा *****काय ?
आता आण्णा हजारे परत फिनिक्स प्रमाणे परतणार अशी बातमी आहे. आता मेणबत्यांच्या व्यापाराला प्रोत्साहन नको. या सा***ना तुरुंगात
पाठवायची फॅक्टरी चालू करा . " किसनरावाची फॅक्टरी" . कलाकार - रागावलेली जनता.

प्रशांत उदय मनोहर's picture

25 Feb 2012 - 7:48 pm | प्रशांत उदय मनोहर

हम्म्.

शीर्षक वाचल्यावर मिपावरील कोणीतरी किंवा कोणाचे कोणीतरी ..... थोडक्यात दुखवट्याचा मामला असेल असं क्षणभर वाटलं. पण "काथ्याकूट" सदर आहे हे पाहिल्यावर असंच (म्हणजे काथ्याकूटकुमाराने जे मांडलं आहे ते) काही तरी असेल याची खात्री पटली.

आपला,
(कृपाभिलाषी) प्रशांत

स्वतन्त्र's picture

26 Feb 2012 - 11:46 am | स्वतन्त्र

असेच म्हणतो !

नगरीनिरंजन's picture

26 Feb 2012 - 8:30 am | नगरीनिरंजन

सोनियांनी आपली संपत्ती जाहीर करायला नकार दिला म्हणे. स्वातंत्र्य आणि सुरक्षा या कारणाने.
बरोबरच केले. एका कुटीत राहणार्‍या शबरीला छळणार्‍या राक्षसांचा जमाना आला आहे. ती तरी बिचारी काय करणार?

हुप्प्या's picture

27 Feb 2012 - 12:06 am | हुप्प्या

महाराणींच्या संपत्तीचे तपशील जाहीर झाले तर ते प्रचंड आकडे ऐकून अनेक लोकांचे डोळे पांढरे होतील, कुणाच्या डोळ्यासमोर अंधेरी येईल, कुणाची दातखीळ बसेल येईल तर कुणाचे दात वाजू लागतील. कुणाचे हातपाय गळून जातील तर कुणाचे थरकाप करू लागतील.
तमाम भारतीयांना आपल्या अपत्यासारखे वागवणार्‍या राजमातेला प्रजेला असले क्लेष देणे मान्य नाही म्हणूनच बहुधा हे तपशील गुलदस्त्यात राहतील.
देशाकरता त्याग करायची ह्या घराण्याची चार पिढ्यांची परंपरा आहेच. ह्या कृत्याने ह्या परंपरेत एक नवा तुरा खोवला गेला आहे म्हणायला हरकत नाही!
जय सोनिया माता दी!

नितिन थत्ते's picture

2 Mar 2012 - 11:04 am | नितिन थत्ते

माहितीच्या अधिकारात आयकर विवरणाच्या तपशीलाविषयी केलेला अर्ज आयकर खात्याकडे न करता सोनिया गांधींकडे का केला ते कळलं नाही बुवा.

अहो बातमीत असे म्हटले आहे की असिस्टंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स जो चीफ पब्लिक इन्फर्मेशन ऑफिसरही आहे त्याने थोरल्या महाराणीसरकारकडे अर्ज दिला होता की जमल्यास आपल्या आयकराविषयी माहिती देता आली तर बघा म्हणून.
मुळात मद्रदेशीच्या कुण्या एका जागरुक व्ही गोपालकृष्णन नामक नागरिकाने माहितीच्या अधिकाराखाली आयकर खात्याकडे अर्ज केला होता.
थोरल्या महाराणीसरकारशी बोलणारी सरकारी यंत्रणा आयकर खातेच होती. कुणी हीन, दीन, रंजले, गांजले, अतिसामान्य नागरिक नव्हे.
परंतु आऊसाहेबांनी ह्या आयकरी मागणीची गय केली नाही. तिला वाटाण्याच्या अक्षता लावल्या.
भारतातील सर्वोच्च पदावर विराजमान असल्याचे थोडेतरी फायदे असणारच नाही का?
माहितीबिहितीचा अधिकार खालच्या स्तरावरील लोकांना लागू असेलही पण हे फारच वरचे लोक!

नितिन थत्ते's picture

3 Mar 2012 - 10:50 am | नितिन थत्ते

सोप्पी शंका काढल्यावर तुम्हालाच मिरच्या झोंबल्या वाटते. :)

>>अहो बातमीत असे म्हटले आहे की असिस्टंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स जो चीफ पब्लिक इन्फर्मेशन ऑफिसरही आहे त्याने थोरल्या महाराणीसरकारकडे अर्ज दिला होता की जमल्यास आपल्या आयकराविषयी माहिती देता आली तर बघा म्हणून.

कुठच्या बातमीत म्हटलंय की असिस्टंट कमिशनरने "माहिती देता आली तर पहा" अशी विचारणा केली होती? बातमीतून असं दिसतं आहे की आयकराविषयीची माहिती आयकरखात्याकडे आहेच. ती जाहीर करावी का? अशी विचारणा माहिती अधिकार्‍याने केली होती.

त्याचे नाही असे उत्तर योग्य आहे असे माझे व्यक्तिगत मत आहे.

हुप्प्या यांनी किती इन्कमटॅक्स भरला ही माहिती नितिन थत्तेला मिळण्याची काही आवश्यकता नाही. फार तर हुप्प्या यांनी आयकर विवरणपत्र भरले आहे का? किंवा त्यांच्या आयकर विवरणाची छाननी झाली आहे का? विवरण योग्य आहे का? अशी माहिती मागितली जाऊ शकते पण हुप्प्या यांनी १ रुपया आयकर भरला की १ कोटी रुपये भरला हे नितिन थत्तेला सांगण्याची काही गरज नाही.

परवा परवा पर्यंत 'आखों का तारा "असलेल्या कृपाशंकर यांच्यावर अचानक वक्रदृष्टी होण्याचे कारण टक्केवारीच घोड अडले असणे हेच असू शकत असा संशय घ्यायला वाव आहे.....झाडून सगळ्या मराठी वृत्तवाहिन्यांनी यावर चर्चासत्र घडवली...शिरा ताणून ताणून ओरडत माध्यमांच्या निवेदकांनी आपले घसे कोरडे केले(तेच घसे रात्री पुन्हा कृपाच्याच पैशानी ओले करुन घेत श्रमपरिहार देखिल केला असावा)...वर जोशींनी म्हंटल्याप्रमाणे हे फक्त हिमनगाचे टोक आहे ....पण या कृपाच्या पक्षाच्या सर्वेसर्वा असलेल्या महाराणी सोनिया देवी यांनी त्यांच्या प्राप्तीकराची माहिती उघड करण्यास दिलेल्या नकाराची दखल मात्र कोणतेही माध्यम घ्यावयास तयार नाही..अगदी नुकतेच दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने सन्मानित झालेले स्पष्टवक्ते, जांभेकर बाण्याचे थोर पत्रकार श्री निखिल वागळे, त्यांचे व्यावसायिक सहकारी राजदीप सरदेसाई,अर्णव गोस्वामी ,गेला बाजार किमान पद्म पुरस्काराने सन्मानित असलेल्या बरखा दत्त यांच्या सारख्या धडाडीच्या (पीत)पत्रकारांनी सोनियांच्या विषयावर चर्चासत्रांचा बाजार उठवल्याचे कालपासून कुठे दिसले नाही.....

हुप्प्या's picture

2 Mar 2012 - 7:13 am | हुप्प्या

अनेक थोर, थोर, त्यागी नेते कृपावर आपली कृपादृष्टी कसे ठेवून होते आणि आता सगळी अवकृपा होऊ घातली आहे ह्यावर एक उद्बोधक लेख.
http://www.lokprabha.com/lokprabha/20120309/rajakiya.htm

थोडक्यात काय लाळघोटेपणा करा, संधीसाधूपणा करा, वेळ मिळताच भरपूर कमाई करा पण पकडले जाऊ नका.
ह्या हुजरेगिरीतून त्यांनी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, केसरी, मधू कोडा वगैरे उपमहात्मे आपल्याला वश केलेच पण हळूहळू शिरकाव करुन देशाच्या सर्वोच्च पदावरील महाराणी सोनिया आणि राजकन्या प्रियांका ह्यांचीही मर्जी संपादन कशी केली ह्याची खुमासदार हकीकत आपल्याला वाचायला मिळेल.
कॉंग्रेसच्या अशा त्यागी, सेवाव्रती नेत्यांमुळे पुढच्या पिढीला स्फूर्ती मिळो आणि ह्याहूनही मोठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्ठा भ्रष्टाचार बघायला मिळो अशी इच्छा! लवकरच कृपारुपी सूर्यावर आलेले मळभ हटो आणि त्यांना आपल्या संपत्तीचा उपभोग घ्यायला मिळू द्या!

परिकथेतील राजकुमार's picture

3 Mar 2012 - 11:27 am | परिकथेतील राजकुमार

मिपाला सध्या अशाच दर्जेदार आणि सकस साहित्याची गरज आहे.

पु.ले.शु.