सा रे ग म प.... स्वप्न तार्‍यान्चे

चिम् चिम् मामा's picture
चिम् चिम् मामा in काथ्याकूट
22 Feb 2012 - 8:50 pm
गाभा: 

झी-मराठी वर चालु असलेले सा रे ग म प... या कार्यक्रमाचा या पर्वाचा नेमका हेतु काय हेच कळत नाही...
सर्व नावाजलेले कलाकार... पण त्याना गाणे म्हणायला घेतले?

क्रान्ती रेडेकरचा आवाज तर.... खरच रेड्या सारखा आहे... नुस्ती किन्चाळत असते... ती आली तर मी चेनल बदलतो किन्वा आवाज बन्द करतो आणि अशा गाण्या नन्तर पण अवधूतला तिच कौतुक कराव लागत...हे पाहून मला हसु येत....आणि आज कल राग पण येतो.
सम्पुर्ण कार्यक्रमात मला गाण सोडुन फक्त अवधूतचे बोलणे आवडते...

प्रशान्त दामले...मोहन जोशी... अम्रुता सुभाष... अशा काही मोजक्या कलाकाराचे गाणी सोडली तर... बाकिचे नाममात्र फक्त कलाकार आहेत.

मराठी सा रे ग म प मध्ये...हिन्दी गाण्यान्चा भडिमार् का?

आणि अवधूत एक शेवटची इछा व्यक्त करतो... कार्यक्रमाचा शेवट अवधूतच्या एका गाण्याने व्हावा... एक तरी चान्गले गाणे ऐकायला मिळेल.

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2012 - 10:45 pm | अत्रुप्त आत्मा

अहो...धंदा आहे तो... हा भाग म्हणजे ठरवुन टाकलेली जिलबी आहे ती... सोडुन द्या हो,नका लाऊन घेऊ एवढं मनाला :-)

निवेदिता-ताई's picture

22 Feb 2012 - 11:23 pm | निवेदिता-ताई

जाउद्या हो........

सानिकास्वप्निल's picture

22 Feb 2012 - 11:16 pm | सानिकास्वप्निल

अगदी अगदी क्रांती रेडकरचे गाणे ऐकवत नाही
कान निखळून पडतील की काय असे वाटते :(

श्रीरंग's picture

23 Feb 2012 - 12:11 am | श्रीरंग

गाणेच काय.... बोलणे देखील ऐकवत नाही. ढिंक चिका मधे इतकी कर्कश्श किंचाळत असते, की त्यापुढे त्यातले भिक्कार विनोद पण परवडले असं वाटतं.

चिम् चिम् मामा's picture

23 Feb 2012 - 10:17 pm | चिम् चिम् मामा

१०० टक्के मान्य...
तिने बोलायला सुरुवात केली रे केली...आवाज बन्द

तिने बोलायला सुरुवात केली रे केली...आवाज बन्द

पण चैनल चालुच का ठेवता तुम्ही...? ;)

अन्या दातार's picture

23 Feb 2012 - 10:32 am | अन्या दातार

दुसरा कोणताच चॅनेल दिसत नाही का तुमच्याकडे??

चिम् चिम् मामा's picture

23 Feb 2012 - 10:21 pm | चिम् चिम् मामा

दिसतात ना... पण मराठीवर प्रेम आहे ना...
म्हणुन मराठी कार्यक्रम जास्त पाहतो...

परिकथेतील राजकुमार's picture

23 Feb 2012 - 11:02 am | परिकथेतील राजकुमार

तुमच्याकडे टीव्ही आहे ? आणि केबल पण ?

तुमच्याकडे टीव्ही आहे ? आणि केबल पण ?


आणि केबल पण ?
मग एफ टी व्हि का नाही बघत... ;)

:bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

वपाडाव's picture

24 Feb 2012 - 6:22 pm | वपाडाव

नुसतं टीव्ही, केबलच नाही तर 'बायको' पण आहे त्यांना... समजुन घ्या असं खालीच लिहिलंय त्यांनी...

नुसतं टीव्ही, केबलच नाही तर 'बायको' पण आहे त्यांना...

:bigsmile: :bigsmile: :bigsmile:
मग भोगा म्हणाव आपल्या कर्माची फळ ;) मुळात सगळ दुखण एक्दम घ्यायच कशाला ..?

मूकवाचक's picture

23 Feb 2012 - 11:44 am | मूकवाचक

एक उपयुक्त दुवा:
http://www.zeemarathi.com/Zee_FeedBack.aspx

शुचि's picture

23 Feb 2012 - 7:19 pm | शुचि

=)) =)) =))

क्रान्ती रेडेकरचा आवाज तर.... खरच रेड्या सारखा आहे... नुस्ती किन्चाळत असते...

सहमत...:D

मृगनयनी's picture

23 Feb 2012 - 12:10 pm | मृगनयनी

ह्म्म्म... 'क्रान्ती रेडकर'बद्द्लच्या सगळ्यांच्या मताशी सहमत!!!... पण सुदैवाने मागच्या आठवड्यातच तिला काढून टाकण्यात आलेले आहे..... :) ;) ;)
क्रान्ती कोम्बडी टाईप डान्स करताना बघणेच जास्त सुसह्य होते... :)
सेम फॉर हर "रुपमती देवी".... .... :)

आणि आता कालच्या एपिसोडबद्दल :- (अर्थात कुणी पाहिला असेल तर्र!!! ) -

काल अभिजीत केळकरला अवधूतजी आणि वन्दनाजींनी "ध" आणि नी"दिले आणि"कोळी गीत" गाणार्‍या दीप्ती भागवत यांना दोन्ही परीक्षकांनी "प" दिले. ऐक्चुली अभिजीत केळकर'चा आवाज आणि एकन्दर अदा बघता त्याला "ग" किन्वा "म" मिळेल असे वाटले होते.. आणि दीप्तीजींना 'ध' / 'नी' मिळेल असे वाटले होते..
पण असो.. परीक्षकांना जास्त कळतं!! ;) ;)

तसेच अभिजीत केळ्कर जेव्हा त्याच्या एका अ‍ॅक्सीडेन्टच्या वेळेस 'प्रशान्त दामलेंनी त्याला केलेली मदत आणि दिलेला आधार' याबद्दल सान्गत होता... तेव्हा आत बसलेल्या प्रशान्त दामले'जींचे एक्स्प्रेशन्स हे असे होते की- " काय बोलतोय हा अभिजीत केळकर?... मी कधी केलीये याला मद्त? का बिचारा स्वतः इमोशनल होतोय आणि सगळ्यांना करतोये? त्यापेक्षा गाणं नीट म्हटलं असतं.. तर या सगळ्याची गरजही नसती...." ;)

प्रशान्त'जींचे एक्सप्रेशन्स असे काही होते... की अभिजीत केळकर नावाच्या माणसाला कधी अ‍ॅक्सीडेन्ट वगैरे झाल्याचे आणि आपण त्यला मदत केल्याचे त्यांना काही आठवतही नव्हते!!! ;) वेरी फनी!!!

वपाडाव's picture

23 Feb 2012 - 6:03 pm | वपाडाव

तुमच्या सर्वांच्या घरची विद्युतधारा वाहिनी अथवा केबलवाहिनी कापलीच पाहिजे... उगाच काहीही लिहायला घेता का?
उद्या, त्या सरदारजीच्या पाकृच्या शोवरही लिहाल...

चिम् चिम् मामा's picture

23 Feb 2012 - 10:32 pm | चिम् चिम् मामा

नका हो असे करु...
कारण आम्ह्च्या घरी दोनच् व्यक्तिन्चा आवाज येतो... बायकोचा आणि टि.वी चा...

माझा आवाज...किन्वा विचार व्यक्त करायला काही ठिकाणीच वाव मिळतो... म्हणुन म्हणल... इथेच बोलु.

घ्या हो समजुन्...

प्रास's picture

24 Feb 2012 - 11:38 am | प्रास

वपाडाव यांनी मृग्गा अर्थात मृगनयनी या आयडींच्या घरची विद्युत वाहिनी किंबा केबल कापण्याबद्दल लिहिलं आहे. त्याबद्दल तुम्ही का येवढी गयावया करता आहात? ऑ?

कारण कळलं नै ब्वॉ..... :-o

चिम् चिम् मामा's picture

25 Feb 2012 - 12:32 am | चिम् चिम् मामा

बर-बर...
असे आहे का?

५० फक्त's picture

25 Feb 2012 - 7:42 am | ५० फक्त

चिचिमा, तुम्ही टिव्हीला व्यक्ती मानता म्हणुन हे लफडं आहे, सुधारा आधी स्वताला. उद्यापासुन स्वताला अन बायकोला व्यक्ती मानुन जगत जा,

अवांतर - अगदीच टिव्ही बघायची वेळ आली तर संधीसुधा, कसला तो प्राश वगैरे जाहिराती काय, इंद्रा द टायगर, यमराज एक फोउलाद, विनाशक - द डिस्ट्रॉयर असले कलात्मक सिनेमे पाहात जा.

पर्नल नेने मराठे's picture

25 Feb 2012 - 10:43 am | पर्नल नेने मराठे

=)) अग पुरे....किति त्या बनानाडु ला छळशिल ;)

क्रान्ती रेडेकरचा आवाज तर.... खरच रेड्या सारखा आहे

रेड्या सारखा कसा असेल..? म्हशी सारखा असेल हो.. ;)

मी चेनल बदलतो किन्वा आवाज बन्द करतो
मग बदललेला चॅनल तसाच ठेवा किंवा आवाज बंदच ठेवा. सोप्पय.
खरं तर असले प्रकार नाही बघितले तरी आयुष्य सुरु राहतं.
एवढं मनाला लावून घेऊ नका.

विसोबा खेचर's picture

24 Feb 2012 - 11:02 am | विसोबा खेचर

कार्यक्रमाचा शेवट अवधूतच्या एका गाण्याने व्हावा... एक तरी चान्गले गाणे ऐकायला मिळेल.

अरेरेरेरे..!

तिमा's picture

24 Feb 2012 - 11:22 am | तिमा

तुमच्या 'अरेरेरेरे' च्या पुढे माझे आणखी १००० रे!
काय दिवस आलेत!

चैतन्य दीक्षित's picture

24 Feb 2012 - 5:28 pm | चैतन्य दीक्षित

चायलेंज खेळताना करतात तसं,
उस्के उप्पर मेरे और ४००० अरेरे... :)

श्रीयुत संतोष जोशी's picture

24 Feb 2012 - 6:25 pm | श्रीयुत संतोष जोशी

" रेडेकरचा आवाज तर.... खरच रेड्या सारखा आहे... नुस्ती किन्चाळत असते... "
पर्फेक्ट , एकदम बरोबर :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

24 Feb 2012 - 6:40 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

घरी कोणी बोलू देत नाही म्हणून इतकं? :(
असो.
हे सार्वजनिक मराठी संस्थळ आहे.
व्यक्त होण्यासाठीच आहे. व्हा... व्यक्त.

निशदे's picture

24 Feb 2012 - 7:41 pm | निशदे

:bigsmile:
:D