आठवणीतील मृत्यूची तीन रूपे....

सस्नेह's picture
सस्नेह in काथ्याकूट
18 Feb 2012 - 2:41 pm
गाभा: 

आठवणीतील मृत्यूची तीन रूपे....
माझ्या आठवणीतल्या मृत्युच्या प्रसंगापैकी तीन अगदी अतर्क्य अकल्पनीय आहेत.
१. सचिन ३२ वर्षीय होतकरू तरुण. आई वडीलांचा एकुलता एक मुलगा. स्वत:चा व्यवसाय . मा. प्रा. सुमारे ३००००. २ लहान मुली. ६ आणि २ वर्षाच्या. माहेरी गेलेल्या बायको व मुलींना आणण्यासाठी रात्रीच्या बसने सचिन मुंबईला निघाला होता. Reservation मिळाले नाही. आई वडील म्हणाले Reservation मिळाल्या नंतर जा. ते न ऐकता आयत्या वेळी मिळेल असा विचार करून निघाला. शेवटच्या क्षणी मिळाले. शेवटच्या बाकावर जागा . अर्धा प्रवास झाल्यावर driver शेजारच्या माणसाला झोपायचे होते म्हणून सचिनला त्याने विनंती करून सीट exchange केली . सचिन driver शेजारी जाऊन बसला. अर्ध्या तासानंतर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या truck ला बसची धडक बसून जागीच ठार झाला.. Driver फक्त जखमी झाला.
सचिन ला imergency नसूनही व Reservation मिळाले नसताना जाण्याची तातडी का वाटावी ? सीट बदलण्याची बुद्धी का व्हावी ?
२. काकाजी वय ५५ वर्षे. आरोग्य उत्तम. रक्तदाब विकार नाही. मधुमेह नाही. हृदय ठणठणीत. १० वर्षापूर्वी operation करून मेंदूतील छोटी गाठ काढलेली . त्यानंतर नियमित औषधे व तपासण्या करीत असत. सर्व काही नॉर्मल. जेवण अत्यंत मर्यादित व ठराविक वेळेला. झोप वेळच्यावेळी. व्यसन नाही. व्यायाम पुरेसा व वेळच्यावेळी. स्वभाव हसरा happy go lucky. एक दिवशी दुकानातून आले. दुध घेऊन फिरायला बाहेर पडले. कोपऱ्यावर वळले आणि खाली पडले. ओळखीच्या लोकांनी ताबडतोब दवाखान्यात नेले. पण काही उपयोग झाला नाही. हृदय बंद पडून मृत्यू. Heart attack नव्हे , heart fail..! हा नियमितपणाचा व बिनचूकपणाचा परिणाम ?
३. मंदा आजी वय ७४ वर्षे. वजन प्रमाणाच्या दुप्पट. गेली १० वर्षे पक्षाघाताने अंथरुणाला खिळून. मधुमेह आहे. उच्च रक्तदाब आहे. अनिमिया आहे. सुदैवाने एकत्र कुटुंब असल्याने सुश्रुषा करण्यारया ३-४ स्त्रिया घरात. झोपून बेड सोर्स झालेले. सुश्रुषा करणारेही मनोमन घाईला आलेले. ३-४ वेळा डॉक्टरनि ‘नातेवाईकांना बोलावून घ्या’ म्हणून सांगून झालेले. आजी यमाच्या दारातून ४ पावले परत. आलेले नातेवाईक २-४ दिवस वाट पाहून परत गेले. अखेर ७६ व्या वर्षी सर्वांचा अंत पाहून पाहून व स्वत:हि यातना भोगून भोगून आजी (एकदाच्या ) गेल्या. यावेळी नातेवाईक खात्री केल्यानंतरच आले..
मृत्यूची अशी रूपे पाहिली कि वाटते..
1. मृत्यूचे हे नियोजन कसे होते ? याला काही नियम आहेत का ? असतील तर कोणते ?
2. सुनियमित विश्वात हि उदाहरणे अनियमित वाटत नाहीत का ? याचे गणित ( असेल तर ) अजून माणसाला समजलेले नाही.
3. वेळ आली म्हणजे मृत्यू बोलावून नेतो हे खरे वाटते
4. आणि वेळ आल्याशिवाय मृत्यू नेत नाही हेही तितकेच खरे.

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

18 Feb 2012 - 2:51 pm | आत्मशून्य

आपल्या सर्व शकांची उत्तरे फायनल डेस्टीनेशन या चित्रपट मालीकेमधे अत्यंत सुसंगतपणे देण्यात आली आहेत. तसच जे.के. रोलिंगच्या ७ व्या पुस्तकात सर्व रहस्यांचा भेद करण्यात आला आहे अशीही जाहीरात करण्यात आली होती, तिथेही प्रयत्न करावा.

जाई.'s picture

18 Feb 2012 - 2:52 pm | जाई.

जीएची राणी कथा आठवली

प्यारे१'s picture

18 Feb 2012 - 3:40 pm | प्यारे१

>>>
1. मृत्यूचे हे नियोजन कसे होते ? याला काही नियम आहेत का ? असतील तर कोणते ?
2. सुनियमित विश्वात हि उदाहरणे अनियमित वाटत नाहीत का ? याचे गणित ( असेल तर ) अजून माणसाला समजलेले नाही.
3. वेळ आली म्हणजे मृत्यू बोलावून नेतो हे खरे वाटते
4. आणि वेळ आल्याशिवाय मृत्यू नेत नाही हेही तितकेच खरे. <<<

जग म्हणजे कारागृह आणि आपण सगळे जीव (मुद्दाम जीव म्हणतोय यात सगळंच आलं -मानव, प्राणी, पक्षी आणी सगळे सजीव) म्हणजे बंदीवान/ कैदी अशी कल्पना करुन पाहू.
खूप सारी डिपार्टमेंट्स त्यामध्ये खूप सारी सब डिपार्टमेंट्स. प्रत्येक कैद्याची शिक्षा त्याच्या त्याच्या गुन्ह्यानुसार. शिक्षा म्हणजे साधी कैद, सक्तमजुरी, अंडा सेल, काहींना राजकीय कैददेखील.
प्रत्येक कैद्याला ती ती शिक्षा पूर्ण केल्यावर निघणं भाग. कैदेमध्ये झाले असतील मित्र म्हणून त्यांना न सोडता राहणार तसेच?
जायलाच हवं निघावं लागतं. कैदेतली चांगली वर्तणूक तुमची शि क्षा कधी कमी करते, कधी तुमची सक्त मजुरी साध्या कैदेमध्ये रुपांतरित करते, कधी कैदेत चुकीचं वागलात तर पुढच्या अधिक कडक शिक्षेसाठी जबरी शिक्षा भोगायला दुसर्‍या डिपार्टमेंटमध्ये पाठवलं जातं.
कुणी कैदी पळून चालला असेल तर त्यालाही शिक्षा आणि पळायला एखाद्यानं मदत केली तर त्यालाही शिक्षा.

बस्स. ह्यात कसं बसतंय ते बघून घ्या.

रणजित चितळे's picture

19 Feb 2012 - 5:35 pm | रणजित चितळे

खूप आवडला व पटला

५० फक्त's picture

19 Feb 2012 - 5:42 pm | ५० फक्त

प्रतिसाद संपादित केलात, अपराधीपणाची बोच कमी झाली.

दादा कोंडके's picture

18 Feb 2012 - 2:59 pm | दादा कोंडके

खूप काही लिहायचं होतं या धाग्यातील उत्तरादाखल. १०-१२ ओळी टंकल्या सुद्धा होत्या.
पण नंतर लक्षात आलं की कितीही मतभिन्नता असली तरीही ही उत्तरं तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी एक "कॉमन लॉजिकल प्लॅटफॉर्म" असला पाहीजे त्यामूळे सोडून दिलं. मी काहितरी "प्रोबॅबिलीटी", "रँडमनेस" वगैरे म्हणणार आणि तुम्ही "प्रारब्ध", "सुनियमित विश्व" म्हणणार. म्हणून माझा पास.

पप्पु अंकल's picture

18 Feb 2012 - 9:58 pm | पप्पु अंकल

माझा पण

ही थिअरी जो पर्यंत शेजारच्या माणसाला लावली जाते तो पर्यन्त पटले नाहीत तरी हे विचार विचारात घेतले जातात. पण स्वतःला भोगायची पाळी येते तेव्हा हे सगळे विरुन जाते.
(असे मला वाटते) अर्थात आपल्याला पटणार नाही (उपक्रमचा वास आला असे वाटत तर नाही?)

मला तरी ते प्रारब्ध वाटते.

दादा कोंडके's picture

19 Feb 2012 - 10:34 pm | दादा कोंडके

पण स्वतःला भोगायची पाळी येते तेव्हा हे सगळे विरुन जाते.

तसं नाही. मला स्वतःला असे अनुभव आले आहेत. त्या पैकी एक म्हणजे २००३ साली पुण्याच्या ब्रेमेन चौकात रस्ता ओलांडत होतो. तीथं सिग्नल नव्हता. गर्दी नव्हती, पण मोठ्ठी वाहनं रस्त्याच्या मधून सुसाट चालली होती. मी रस्ता ओलांडणार तेव्हड्यात एका मित्राची हाक ऐकू आली म्हणून मी मागं वळून बघितलं, त्याच्याशी ५-१० सेकंद काहीतरी बोललो असेन, परत मागं वळून एक पाउल पुढं टाकणार इतक्यात एक सुमो अगदी जवळून वेगात गेली. इतकी जवळून की फ्लोटर्सच्या (बोटांच्या पुढ्ची जी मोकळी जागा असते) टोकावरून गेली. घटका ओसरल्यानंतर मी त्या धक्क्यातून सावरलो. पण मित्राचं बोलावणं, मोकळा रस्ता असताना कडेला सुमो येणं वगैरे रँडम होतं असं तेंव्हाही वाटलं होतं.

अपघात असेच असतात. तो घडण्यासाठी "चेन ऑफ इवेंट्स" कारणीभूत असतात. ती साखळी तुटायला आणि जोडायला छोटसं कारण पुरतं.

आता ह्या धाग्यातील प्रश्न बघा,

3. वेळ आली म्हणजे मृत्यू बोलावून नेतो हे खरे वाटते
4. आणि वेळ आल्याशिवाय मृत्यू नेत नाही हेही तितकेच खरे

हे जर खरं असतं तर थोडक्यात वाचलेली लोकं परत कुठल्याश्या कारणानं (फायनल डेस्टीनेशन मधल्यासरखं) मेली नसती का?

खरतर जगात रँडमनेस आहे म्हणूनच जगण्यात गंमत आहे.

वपाडाव's picture

23 Feb 2012 - 6:32 pm | वपाडाव

"चेन ऑफ इवेंट्स"

'इंक-द बीट सिन = INK-The Beat Scene' या चित्रपटातील हा व्हिडो पहा.
http://www.youtube.com/watch?v=74fni87lGIU
सगळं काही प्लॅनड असतं त्यात रँडम असं काहीच नाही... वाटतं ते फक्त आपल्यालाच...

दादा कोंडके's picture

23 Feb 2012 - 11:06 pm | दादा कोंडके

सगळं काही प्लॅनड असतं त्यात रँडम असं काहीच नाही... वाटतं ते फक्त आपल्यालाच...

हे सगळं प्लॅन कोण करतं असं म्हणायचं आहे मग? यम?

वपाडाव's picture

24 Feb 2012 - 6:40 pm | वपाडाव

हे सगळं प्लॅन कोण करतं असं म्हणायचं आहे मग? यम?

माझ्या विचारांची झेप, उंची आजवर ते उत्तर गाठु नाही शकली... खुप लहान किंवा बांधलेल्या बुद्धीने (संकुचित नव्हे) विचार करत असेन कदाचित किंवा ती प्रगल्भताही नसेलच... आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनुभव... जास्त पावसाळे पाहिले नसल्याने तेही गाठीशी नाहीत...
हे सगळं नाकारताही येत नाही अन स्विकारताही येत नाही... फक्त मनाशी साठवुन ठेवायचं अन चालायचं या प्रकारचं असावं... किंवा हे प्लॅन करायलाही एखादा प्रोग्रामर हायर केलेला असेल देवाने...
सम थिंग्स आर बियाँड आवर (रादर माय) इमॅजिनेशन/एक्स्प्लेनेशन...

दादा कोंडके's picture

25 Feb 2012 - 1:04 am | दादा कोंडके

जास्त पावसाळे पाहिले नसल्याने तेही गाठीशी नाहीत...

देन टेक माय वर्ड. शिट जस्ट हॅपन्स.

एक साधू एका झाडाखाली बसून भंकस करत असतो. नाती, पैसा मिथ्या आहे. यात फसू नका. सगळं जग माया आहे. परमेश्वरप्राप्ती हवी असेल तर मोह, लोभ आणि जीवनलालसा सोडून द्या वगैरे. तेव्हड्यात तीथं अचानक वाघ येतो. ते बघून साधू पळायला लागतो. लोकं मात्र त्याच्या बोलण्यानी प्रभावित झालेली असतात त्यामुळे ती तशीच बसून असतात. लोक म्हणतात अहो महाराज तुम्ही का पळता आहात मग? तो जाता जात ओरडून म्हणतो. मी सांगितल होतं ना तुम्हाला, ही सगळी माया आहे. मी पळतोय ही पण मायाच आहे. :)

चिरोटा's picture

18 Feb 2012 - 3:17 pm | चिरोटा

साहिर लुधियानवीचे गाणे आहे मुक्कदर का सिकंदरमधले-
झिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकरायेगी
मौत मेहबुबा है अपने साथ लेकर जायेगी.
मरके जीनेकी अदा जो दुनिया को सिखलायेगा
वो मुकद्दर....

रणजित चितळे's picture

19 Feb 2012 - 5:52 pm | रणजित चितळे

जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया।
जो खो गया मैं उसको भुलाता चला गया।।

चौकटराजा's picture

18 Feb 2012 - 3:31 pm | चौकटराजा

लीना बै , आपल्याला सगळ्या बाबी गूढ कशा वाटतात बुबा ? आकाशात आमावस्येच्या दिवशी एखाद्या ढगाने राक्षसाचा आकार घेतला. खेळाडूने
सिक्सर मारायचा प्रयत्न केला त्याचवेळी स्येडीयम वर एक हेली़कॉप्टर आले त्याच्या पंखात चेडू अडकून हेली ची मैदानावर होली झाली तर
काय गूढ प्रकार आहे असा नवा धागा निर्माण करायचा का? करू , इथल्या मिसळीच्या तरर्रीला " जादा आकार " द्यावा लागेल अशी पाटीच नाही.
खरं की नाही ? जोक अपार्ट.

आपण दासबोधातील अधिभौतिक , अधिदैविक, व आध्यात्मिक हे काय गौडबंगाल आहे ते वाचावे. कोणतीही एखादी घटना या तिन्हीच्या
संगमाने होत असते. अर्थात ते स्वामी लिहून गेले म्हणून म्हणायचे नाही. वरील सर्व घटना या त्रिविध तापांच्या त्रिमिती जाळीत सापडतात की नाही ते पहा ( थी डी मॅट्रिक्स ) .

मी माझ्या आयुष्यातील जबर दु:ख देणार्‍या घटनांची उकल वरील पद्धतीने करून सुखी झालो आहे.

धन्यवाद चौकटभाऊ. प्रतिसाद पटला. दासबोध मी खूप वेळा वाचलाय. अजुनही मन स॑भ्रमित झाल॑ की वाचते. Most व्यवहारी ग्र॑थ. ज्ञानेश्वरीपेक्षाही. एक कोड॑ सुटत नाही. गुरुक्रुपेने भोग नष्ट होतात म्हणे. असा एखादा मनुष्य पाहण्याची इच्छा आहे..
By the way, मिपा वर एक दासबोध प्रेमी भेटल्याने आन्॑द वाटला.

गुरुक्रुपेने भोग नष्ट होतात म्हणे
म्हणजे गुरू योग्य वाट दाखवतात त्यामुळे नाश टळतो अश्यासारखा अर्थ असावा.
(मी दासबोध वाचलेला नाही)

जिंदगी एक सफर है सुहाना यहा कल क्या हो किसने जाना

सुहास..'s picture

18 Feb 2012 - 4:58 pm | सुहास..

द फायनल डेस्टीनेशन !!

जरूर पहा

तिमा's picture

18 Feb 2012 - 7:37 pm | तिमा

पत्ता देऊन ठेवा. मेल्यानंतर ह्या सगळ्याचा अर्थ सांगीन.

मृत्यू हा जीवनाचा शेवट आहे आणि त्याला आपआपल्या कुवती नुसार अजमावायाचे असते / समजायचे असते. कितीही विचार केला तरी ह्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत . मिळाली तर ती दुसयाला पटणार नाहीत.

ज्या दिवशी ह्या प्रश्नाचे उत्तरे मिळतील ( अनीस वाले दाभोळकर किंवा मिपा वाले ओक कोणाकडूनही) , त्या दिवशी जीवन पूर्ण बदलून जाईल. नाती , समाज , देश कोलमडून पडतील.

प्रकटन चांगले व संयमित केले आहे.

विजुभाऊ's picture

20 Feb 2012 - 2:09 pm | विजुभाऊ

( अनीस वाले दाभोळकर किंवा मिपा वाले ओक कोणाकडूनही) ,
माझ्या माहितीप्रमाणे दाभोळकर हे अंनिस नावाची चळवळ चालवतात. ओक हे मिपा नावाची कोणतेही चळवल चालवत नाहीत

पारा's picture

22 Feb 2012 - 5:24 pm | पारा

पूर्वी मी एक लेख येथे प्रकाशित केला होता, त्याची आठवण झाली.
विषय संबंधित असल्याने, दुवा दिल्याशिवाय राहवत नाही म्हणून :)
मुक्ती

चौकटराजा's picture

24 Feb 2012 - 8:46 am | चौकटराजा

परिक्षित राजा- काचेचा महाल- बोर खाण्याची इच्छा - बोरे मागविणे- एक बोर फोडणे- अळी- तिचा नाग- नाव तक्षक- राजाचा मृत्यू.

श्रीयुत संतोष जोशी's picture

24 Feb 2012 - 6:28 pm | श्रीयुत संतोष जोशी

कालायै तस्मै: नमः
दुसरं काय ?

(अंतु बर्व्याच्या आवाजात ऐकावे)
अहों म्हटंलेलेंच आहें, मृत्यु हा योग आहे हों, ज्याच्या नशिबात असतों त्यानें साधी चूळ भरली तरी त्याला विषबाधां होऊन मरतों, आणि ज्याच्या नशिबात नसतो, त्याने झोपेच्या गोळ्यांची उसळ बनवून खाल्ली तरी ढीम्म काही होत नाही. कांय?
---

पिवळा डांबिस's picture

24 Feb 2012 - 11:48 pm | पिवळा डांबिस

बाकी ती झोपेच्या गोळ्यांच्या उसळीची रेसेपी द्या ना इथे!
मिपावरचे हल्लीचे रेसेपी धागे वाचून ती उसळ खायची सॉल्लीड इच्छा झालीये!!!
:)

यकु's picture

24 Feb 2012 - 11:49 pm | यकु

=)) =)) =)) =))
मला ही उसळ वाडगाभर पाहिजे.

गोंधळी's picture

12 Mar 2012 - 7:58 pm | गोंधळी

प रा धि न आहे जगति पुत्र मानवाचा दोष ना कुनाचा....

everyones life is a fixed match.
(श्री शरद उ पाध्दे य्नाच्या शास्रा नुसार)

हे खरे आहे का??????