मेणबत्तीवीरांचे अन् टोपीबाजांचे कमी मतदान - लोकशाहीकरता अत्यंत घातक..!

कॉमन मॅन's picture
कॉमन मॅन in काथ्याकूट
18 Feb 2012 - 11:29 am
गाभा: 

भारतीय राज्यघटनेतील भाग ९अ - कलम २४३ आर (१) अंतर्गत नुकत्याच महाराष्ट्रातील दहा महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकींमध्ये कुठल्या पक्षाची सत्ता आली, न आली, कुठल्या पक्षाच्या किती जागा निवडून आल्या, या सर्वांपेक्षाही या निवडणुकांत असलेली 'मतदानाची टक्केवारी' हा आमच्या मते आज आपण सर्वांनीच गंभीर होऊन चिंता करावी असा मुद्दा आहे.

सदर १० निवडणुकांमध्ये मतदानाची सरासरी ४० ते ५० इतकीच अल्प टक्केवारी पाहायला मिळाली, जी आमच्या मते आपल्या सार्वभौम लोकशाहीकरता अत्यंत घातक बाब आहे.

सदर मतदानात एरवी 'भ्रष्टाचार!' 'भ्रष्टाचार!' असे ओरडत 'अण्णा' टोप्या घातलेले सारे टोपीबाज अन् मेणबत्तीवीर गेले कुठे? स्वत:ला सोकॉल्ड सुशिक्षित, विचारवंत म्हणवणार्‍या, लोकशाहीच्या बाता करणार्‍या या लोकांची संख्या सदर मतदानात अत्यंत म्हणजे अत्यंत कमी होती असेच दिसून आले. परंतु गंमत म्हणजे पुन्हा हीच सारी मंडळी व्यवस्थेविरोधात 'अण्णा' टोप्या घालून, मेणबत्ती मोर्चे काढायला तयार..!

यांच्यापेक्षा झोपडपट्टीतून आणि चाळीतून राहणारे, तुलनेने कनिष्ठ मध्यमवर्गीय, गरीब असलेले लोकच खर्‍या अर्थाने 'अधिक सुशिक्षित' म्हणायला हवेत. ही मंडळी मेणबत्तीमोर्चात कदाचित सामिल होत नसतीलही, परंतु अधिकाधिक संख्येने मतदान मात्र करतात असे आकडेवारी सांगते.

वास्तविक पाहता, आपल्या लोकशाहीमध्ये घटनेनुसार 'मतदान' करणे हेदेखील सक्तीचे नाही, किंबहुना तो अधिकार बजावायचा अथवा नाही हा हक्कही लोकांनाच दिलेला आहे. आता लोकशाहीतील कुठले कलम यापेक्षा अधिक उदारमतवादी असू शकते? परंतु आपण याच मुभेचा गैरफायदा घेऊन मतदान करत नाही आणि नकळत लोकशाहीच्या मूळ गाभ्यावरच घाव घालत असतो ही बाब आपल्या लक्षातच येत नाही..!

असे. जे झाले ते झाले. परंतु येत्या २०१४ साली येणार्‍या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकांत मात्र आपण सर्वांनीच मतदानाचे गांभिर्य लक्षात घेऊन, एक परमपवित्र कर्तव्य समजून आवर्जून मतदान केले पाहिजे, इतके सांगून आम्ही आपली रजा घेतो.

जय हिंद..!

-- कॉमॅ.

प्रतिक्रिया

कॉमन मॅन's picture

18 Feb 2012 - 11:34 am | कॉमन मॅन

वरील लेखातील,

परंतु गंमत म्हणजे पुन्हा हीच सारी मंडळी व्यवस्थेविरोधात 'अण्णा' टोप्या घालून, मेणबत्ती मोर्चे काढायला तयार..!

हे वाक्य असे वाचावे -

परंतु गंमत म्हणजे पुन्हा हीच सारी मंडळी व्यवस्थेविरोधात 'अण्णा' टोप्या घालून मेणबत्ती मोर्चे काढायला तयार, भारतीय राज्यघटनेला अन् संसदेला चॅलेन्ज करायला तयार..!

पक पक पक's picture

21 Feb 2012 - 10:10 am | पक पक पक

:crazy: :crazy: :crazy:

ओ कॉमन मॅन त्ये तुम्ही काय म्हण्त आहात ना वर त्याला काय अर्थ नाय.२५ /२५ वर्ष एकाच ठिकाणी रहात असुन आमच मतदार यादीतल नाव निवड्णुका आल्या की गायब कस होत ते समजत नाय्,मागच्या विधान सभेच्या निवड्णुकीला आमच नाव यादीत होत ,तेव्हा मतदान केल होत.पण परवाच्या निवड्णुकीला मतदार यादीतुन नाव गायब्,मागच्या लोक्सभेच्या निवड्णुकिला पण नाव होत ,पण त्याआधीच्या निवड्णुकीला नाव गायब होत.

अन उगाच कोण्त्या तरी एक समाजीक स्तराला नाव ठेवण बंद करा ..

मुळात तुम्ही कोण्त्या गटात मोड्ता ते सांगा , ;) आमच्या भागात झोपड्पट्टी पुनर्वसन झोरात चालु हाये... ;)

मराठी_माणूस's picture

18 Feb 2012 - 11:39 am | मराठी_माणूस

स्वत:ला सोकॉल्ड सुशिक्षित, विचारवंत म्हणवणार्‍या, लोकशाहीच्या बाता करणार्‍या या लोकांची संख्या सदर मतदानात अत्यंत म्हणजे अत्यंत कमी होती असेच दिसून आले

हे कशावरुन ?

पक पक पक's picture

21 Feb 2012 - 10:22 am | पक पक पक

त्यांच्या आइडी वर जाउ नका हो.. ;) कल्कि कल्कि म्हण्तात ते हेच नारायणाचा दहावा आवतार..त्यांना सर्व समज्त असा त्यांचा समज आहे.... :bigsmile:

चिरोटा's picture

18 Feb 2012 - 11:46 am | चिरोटा

हीच मंडळी,तीच मंडळी हा काय प्रकार आहे? नक्की काय पुरावा आहे की जे आंदोलनात सामील झाले होते त्यांनी मतदान केले नाही म्हणून?

ही मंडळी मेणबत्तीमोर्चात कदाचित सामिल होत नसतीलही, परंतु अधिकाधिक संख्येने मतदान मात्र करतात असे आकडेवारी सांगते.

ह्या मंडळीना मुंबईत अनेक ठिकाणी सकाळचा नाश्ता,दुपार/रात्रीचे जेवण आणि शंभरची एक नोट मिळाली होती(खात्रीलायक माहिती आहे. हे एका राष्ट्रीय पक्षाने केल्याचे नोट मिळालेल्या दोन लोकांनी मला सांगितले). मला सकाळी (अननस घातलेला)शिरा,दुपारी मटण थाळी दिलीत तर मीही मतदान करेन.

नितिन थत्ते's picture

18 Feb 2012 - 3:04 pm | नितिन थत्ते

>>मला सकाळी (अननस घातलेला)शिरा,दुपारी मटण थाळी दिलीत तर मीही मतदान करेन.

हॅ हॅ हॅ. त्यासाठी तुम्हाला तुमचे ड्युप्लेक्स अपार्टमेंट सोडून झोपडीत रहायला जायला हवे.

>>हे एका राष्ट्रीय पक्षाने केल्याचे नोट मिळालेल्या दोन लोकांनी मला सांगितले)

या गोष्टीचा नेहमी बाऊ केला जात असला तरी निकालात त्याचा फरक पडत नाही असे दिसते.

केवळ उच्चभ्रू, सुशिक्षित लोक मतदान करत नाहीत असा काही विदा आहे असे वाटत नाही. बहुतेक प्रभागांमध्ये आज मिश्र वस्ती असते. आणि वस्ती विशिष्ट लोकांची असली तरी त्यातले सगळेच काही सुशिक्षित असतात असे नाही.

स्वातीविशु's picture

18 Feb 2012 - 11:50 am | स्वातीविशु

मतदानात एरवी 'भ्रष्टाचार!' 'भ्रष्टाचार!' असे ओरडत 'अण्णा' टोप्या घातलेले सारे टोपीबाज अन् मेणबत्तीवीर गेले कुठे?

काय आहे? मतदानाची एक अतिरीक्त सुटी मिळते आम्हा चाकरमान्यांना. जरा सुखाने झोपु द्या की?;)

परत उठुन घरची रखड्लेली कामे पण करायचीत. मी तर बाई आमच्या विशुला सांगितले आहे, जरा गव्हाच्या दळणाचे बघा हं. ;)

प्रसन्न शौचे's picture

18 Feb 2012 - 7:48 pm | प्रसन्न शौचे

२०१४ साली येणार्‍या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकांत मात्र आपण सर्वांनीच मतदानाचे गांभिर्य लक्षात घेऊन, एक परमपवित्र कर्तव्य समजून आवर्जून मतदान केले पाहिजे,या मताशी मी परिपुर्ण सहमत आहे.

राजो's picture

19 Feb 2012 - 11:56 am | राजो

नाव(आय डी) आवडले..

धाग्यांवर धागे
अभिनंदन
अशीच यशाची शिखरे पादाक्रांत करा

चौकटराजा's picture

18 Feb 2012 - 12:58 pm | चौकटराजा

मनसे ची प्रगती म्हातार्‍यानी केलेली नाही.
काही फेसवूक च्या सोप्या लाइक अनलाईक कल्चरचे पाईक ! तेच मेणबत्तीवाले होते.
काही तरूण मुळात " पॅकेज" वाले आहेत . त्याना पैसा ३ बेडरूम, होडा सिटी या लाईफ शिवाय कशात रस नाही.
काही जाउ द्या काय फरक पडतो? नाहीतरी र्तीन चार धनदांडग्यातून च एक निवडून येणार ? असे म्हणून हादडायला किंवा लावायला
खडकवासला किंवा विहार लेक ला रवाना.
सर्वात मोठा घोटाळा अण्ण्णा हजारे व कंपनीने केला . लढाई सोडून पळ काढला तरूणाना वार्‍यावर सोडून ! का तर राजकारण नको ! राज नाही एकाकी लढतो आहे ? १८८५ च्या कॉग्रेसला व १९७७ च्या भाजपाला या देशातून हाकलून द्यायला आठवडा का पुरणार आहे ?

योगप्रभू's picture

18 Feb 2012 - 1:00 pm | योगप्रभू

मी या धाग्यात जरा अवांतर आवाहन करतोय, याबद्दल माफ करा.

'उचलली जीभ लावली टाळ्याला', यासारख्या समानार्थी काही आणखी म्हणी कुणी सांगू शकेल का?

परिकथेतील राजकुमार's picture

18 Feb 2012 - 1:13 pm | परिकथेतील राजकुमार

'उचलली जीभ लावली टाळ्याला', यासारख्या समानार्थी काही आणखी म्हणी कुणी सांगू शकेल का?

'उचलला कीबोर्ड लागले टंकायला.'

'उचलला झारा लागले जिलब्या पाडायला.'

'वाचला पेपर धावले अक्कल पाजळायला.'

'फुकटचा वेळ धावले तुंबड्या लावायला.'

इ.इ.

'शहाण्याला शब्दाचा मार' हे आजकाल मागे पडत चालल्याने इथेच थांबतो.

तिमा's picture

18 Feb 2012 - 7:45 pm | तिमा

उचलली शेपूट लागले मारायला.

'उचलला झारा लागले जिलब्या पाडायला.'

"झारा" नाय हो पराषेट.. "सोर्‍या"..

झारा नंतर लागतो..

नगरीनिरंजन's picture

20 Feb 2012 - 1:09 pm | नगरीनिरंजन

सोर्‍या कसला हो गवि? हायक्लास क्वालिटी जिलेबीसाठी भोकं पडलेलं जुनं बनियन वापरतात असं ऐकून आहे.

रणजित चितळे's picture

20 Feb 2012 - 3:00 pm | रणजित चितळे

अर्धी वाटी. त्या वाटीच्या डोळ्याच्या जवळ वाटी पातळ असल्या कारणाने भोक पाडण्यास सोपे जाते. जिलब्या त्याने पाडताना बघितल्या आहेत.

सुहास..'s picture

18 Feb 2012 - 1:23 pm | सुहास..

'उचलला कीबोर्ड लागले टंकायला.'

'उचलला झारा लागले जिलब्या पाडायला.'

'वाचला पेपर धावले अक्कल पाजळायला.'

'फुकटचा वेळ धावले तुंबड्या लावायला.'

अगदी असेच म्हणतो, आणि बोल्ड मध्ये !!

हुप्प्या's picture

18 Feb 2012 - 10:16 pm | हुप्प्या

सामान्य, सुशिक्षित लोकांच्या ह्या औदासिन्याचे कारण राजकारण्यांचा नालायकपणा आहे.
शिवसेनेच्या ठाकर्‍यांना पवारांचा नको इतका पुळका येतो, कलमाडीला भाजप समर्थन देतो, परांजपे अचानक टोपी बदलून राष्ट्रवादीत जातात.
कोण कुणाला सामील आहे हे कळयाला मार्ग नाही. पैसे खायच्या वेळेस वाटून खायचे आणि भाषण करण्यापुरती डायलाक बाजी.
शिवाय नेत्यांना पैसे वाटल्यावर झोपडपट्टीतली मते मिळतात. त्यामुळे पांढरपेशा लोकांना भीक घालायचे कारणच उरत नाही. काही मूठभर निष्ठावंत सोडल्यास बाकीच्यांना सगळे नेते सारखेच वाटतात आणि त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे?
हे एक दुष्टचक्र आहे. आणि काही क्रांतीकारक बदल झाला नाही तर ते असेच चालत राहणार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Feb 2012 - 10:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हुप्प्याच्या मताशी सहमत आहे. वरच्या कारणाबरोबर आपण मतदानाला नाही गेलो तर काय जगबुडी होणार आहे काय अशी एक मानसिकता बनत चालली आहे. पण भारतीय आहात आणि लोकशाहीवर विश्वास आहे, लोकशाहीला बळकट बनवायचे आहे तर मतदान करणे गरजेचे आहे. मतदान करणे आवश्यक आहे. मतदान न केल्यास गॅस मिळणार नाही, चुलीसाठी लाकडं मिळणार नाही, शेतीसाठी खत मिळणार नाही. विविध कंपन्यातील कामगारांना वाढीव वेतनवाढी मिळणार नाही. गाडीला डिझेल-पेट्रोल मिळणार नाही. पगारातून महिन्याला हजार- पाचशे रुपये पुढील मतदान होईपर्यंत कपात करणे आणि मतदान न केल्यास जेलात पाठविण्यात येईल असं काही तरी केलं पाहिजे. असं केलं ना मताची टक्केवारी आता वाढायला लागेल.

-दिलीप बिरुटे

आनंदी गोपाळ's picture

18 Feb 2012 - 11:04 pm | आनंदी गोपाळ

लेखाशी सहमत

नगरीनिरंजन's picture

19 Feb 2012 - 7:04 am | नगरीनिरंजन

कॉमन मॅन कॉमन सेन्स वापरत नाही हेच तर सगळ्यात मोठं दुखणं आहे.
फक्त टोपीबाज आणि मेणबत्तीबहाद्दरांनी (म्हणजे अण्णासमर्थकांनी) मतदान केले नाही असे वरच्या लेखातून सुचवायचे असेल तर ६०% लोक अण्णांचे समर्थक आहेत असा अर्थ निघतो. अण्णांच्या आंदोलनाला इतका मोठा 'जनाधार' आहे हे माहित नव्हते. असो.
या निष्क्रिय लोकांना नावे ठेवण्यापेक्षा मार्गदर्शन करा. अण्णा ज्यांची नक्कल करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात असे म्हटले जाते त्या महात्मा गांधींच्या मागे पूर्ण देश उभा राहिला होता असे ऐकतो. त्या, सूतकताई करून इंग्रजांना सळो की पळो करणार्‍या आणि तुरुंगात जाण्याचे पेन्शन घेणार्‍या, स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या चाळीस वर्षांत कसे कर्तृत्व गाजवले आणि देश किती मजबूत केला, त्यावर लेख लिहा म्हणजे या टोपीबाजांना आणि मेणबत्तीबहाद्दरांना कळेल की खरे कर्तृत्व म्हणजे काय ते.

प्रभाकर पेठकर's picture

19 Feb 2012 - 11:14 pm | प्रभाकर पेठकर

मतदानाचा टक्का वाढवत वाढवत अगदी १०० टक्क्या पर्यंत नेला. पण निवडून आलेले नेते (कुठल्याही पक्षाचे असोत) सामान्य माणसाला अनाकलनिय अशी धोरणे राबविणार, वेगवेगळ्या घोटाळ्यांना सक्रिय किंवा मुक पाठींबा देणार, पक्षाचे छुपे अजेंडा राबविणार, झेड सुरक्षेची प्रतिष्ठा उपभोगणार, परदेश वार्‍या करणार, सरकारी पैसा आपल्याच तिर्थरुपांचा समजून उधळणार, निकृष्ट दर्जाची सोय-सुविधा समाजासाठी करणार (आपली दलाली मोजून घेऊन), आपल्या कार्यकाळात गडगंज बेहिशोबी, बेनामी मालमत्ता जमविणार, आपल्या पुढच्या पिढीला, त्याच्या पुढच्या पिढीला आणि बालवाडीतील पुढच्या पिढीलाही पदे वाटून, राजकारणात आणून 'गंगे'चा ओघ आपल्याच कुटुंबात येत राहील ह्याची व्यवस्था करणार,पुन्हा निवडणूका आल्या की एकमेकांचे वाभाडे काढणार, कमरेखाली वार करणार, असभ्य भाषा आणि नकला करून टाळ्या मिळविणार आणि ह्या सगळ्या तमाशाला विटलेल्या वैफल्यग्रस्त सुशिक्षितांचे मतदान कमी झाले तर सुशिक्षित समाज मतदान करीत नाही, त्यांना भ्रष्ट राज्यव्यवस्थेवर बोलण्याचा अधिकारच नाही, असे गळे काढणार.

वारे! लोकशाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Feb 2012 - 10:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हम्म, हेही पटण्यासारखंच आहे. :(

-दिलीप बिरुटे

पारा's picture

20 Feb 2012 - 12:01 pm | पारा

मध्यंतरी वाचनात एक बातमी आली होती, की सध्याची मतदारयादी ही परिपूर्ण तर नाहीच, पण त्याच्यातील दोषांमुळे या अश्या टक्केवाऱ्या बऱ्याच अंशी चुकतात.

बातमीतील मजकुराप्रमाणे, ह्याची काही कारणे देखील दिली होती,
-मयत लोकांची नावे कमी न करणे
-राहण्याचा पत्ता बदलूनसुद्धा आधीच्या मतदारसंघामधून नाव कमी न करणे
-IT युग पाहता, कामानिमित्त सदानकदा घरापासून दूर असणे

ह्याचा फार मोठा परिणाम होत असेल असे माझे म्हणणे नाही. मात्र अशी अनेक कारणे जी वरकरणी सहजी दिसत नाहीत ती देखील विसरून चालणार नाही .

बाकी लेखातील विषयांशी मी सहमत !

पैसा's picture

20 Feb 2012 - 9:20 pm | पैसा

यातलं काही कारण नसताना याद्या करणार्‍यानी आळस केल्यामुळे आमच्या सोसायटीतल्या एका संपूर्ण बिल्डिंगची नावं लिस्टमधून गायब झाली होता. माझ्याकडे व्होटर्स कार्ड आहे पण लिस्टात नाव नाही. आणि एकही उमेदवार मत देण्यासारखा वाटत नाही. म्हणून मी नाव परत लिस्टात घालायचा प्रयत्नसुद्धा केला नाही. एकाही उमेदवाराला मत द्यावं असं नाही वाटलं तर त्या मतदारांसाठी काही ऑप्शन आहे का?

पारा's picture

21 Feb 2012 - 10:05 am | पारा

तशी सुविधा आपल्या संविधानात आहे. त्याचा नाव ४९-0.
ह्याचा काही सरळ उपयोग होत नसला (read Disqualification hoax in the article above) तरी त्याची माहिती गोळा केली जात असते !

वपाडाव's picture

21 Feb 2012 - 9:25 pm | वपाडाव

काही देशात 'नन ऑफ द अबोव्ह = NOTA' पर्याय बॅलट पेपरवर किंवा व्होटिंग मशिनवर उपलब्ध आहे. पण जिथे ही सुविधा नाही त्यांनी जसे कॅनडा, युके या देशात अशीही माणसे आहेत ज्यांनी आपले नाव 'नन ऑफ द अबोव्ह' करुन घेतले आहे, ती इलेक्शनला उभी राहतात. अन लोकांना प्रोत्साहन देतात, जर तुम्हाला सर्वच उमेदवार नापसंत असतील तर आम्हाला मतदान करा. आम्ही निवडुन आलो तर संबंधित पदावर जाणार तर नाही पण पुन्हा इलेक्शन घ्यायला भाग पाडु...
त्या संदर्भात काही दुवे = http://www.nocandidate.org.uk/
http://en.wikipedia.org/wiki/NOTA_(UK_political_party)
पुर्वी 'NOTA' ही पार्टी युकेत अस्तित्वात होती पण सध्या कदाचित 'nocandidate' मुळे त्यांनी माघार घेतली असावी. म्हणुन सध्या त्यांचं संकेतस्थळ जालावर दिसत नाही.

रणजित चितळे's picture

20 Feb 2012 - 12:10 pm | रणजित चितळे

मतदान सक्तीचे केले पाहिजे, नाही केले तर दोन सुट्ट्या कापल्या गेल्या पाहिजेत व त्या दिवशीचा पगार पण कापून सरकारी तिजोरीत जमा झाला पाहिजे. (नोकरी असणारी मध्यम वर्गी लोक ह्या जास्त पिसली जातील - पण खरी लोकशाही मध्यम वर्गी लोकच सांभाळू शकतात कारण खुप पैसे असणा-यांना फारसा फरक पडत नाही, व एकदम गरीब जनतेला त्याचे भानच नसते रोजच्या चक्रात इतकी गुरफटून गेलेली असतात ती बिचारी जनता...)

असे. जे झाले ते झाले. परंतु येत्या २०१४ साली येणार्‍या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकांत मात्र आपण सर्वांनीच मतदानाचे गांभिर्य लक्षात घेऊन, एक परमपवित्र कर्तव्य समजून आवर्जून मतदान केले पाहिजे

सहमत आहे.

चिरोटा's picture

20 Feb 2012 - 1:39 pm | चिरोटा

कारण खुप पैसे असणा-यांना फारसा फरक पडत नाही, व एकदम गरीब जनतेला त्याचे भानच नसते रोजच्या चक्रात इतकी गुरफटून गेलेली असतात ती बिचारी जनता

असहमत. खूप पैसे असणार्‍यांना, विशेष करुन काळा पैसा असणार्‍यांना वश होणारे अधिकारी,राजकारणी हवे असतात. एकदम गरीब जनता पैशाने गरीब असली तरी आपण कोणाला मत देत आहोत, त्या बदल्यात आपल्याला काय भेटवस्तु मिळाली आहे ह्याचे योग्य भान असते. 'पैसे खातो पण काम करतो" अशी विधाने बर्‍याचवेळा ह्या/मध्यम वर्गातून ऐकू येतात.

रणजित चितळे's picture

20 Feb 2012 - 3:05 pm | रणजित चितळे

कोणीही आले तरी फरक पडत नाही. बहूतांशी पैसे खातात त्या मुळे अ आला काय किंवा ब आला काय. अशिक्षित व गरीब एक्प्लॉइट होतात व न समजता मस देतात. अ निवडून येतो का ब निवडून येतो ह्याला ते फारसे महत्व देत नाहित.

जयंत कुलकर्णी's picture

20 Feb 2012 - 4:42 pm | जयंत कुलकर्णी

निवडणूक प्रक्रियेत खालील सुधारणा करता आल्या तर मतदान नक्कीच वाढेल. जर मतदान जास्त व्हायचे हे उद्दिष्ट असेल तर असे काहीतरी करावेच लागेल.
केंद्राव्र दोन दिवस व खालील ठिकाणी
१ मतदान कमीत कमी एक महिना चालू रहायला पाहिजे.
२ मतदान क्रेडिट कार्ड किंवा बँक खात्यावर व ईंटरनेट वर करता यायला पाहिजे.
३ नोकरीच्या ठिकाणी मतदानाची सोय व्हावी.
४ हे जरा जास्तच होईल - पण अपक्षांवर बंदी घालावी त्यांचे काहीही काम नाही. पक्षाने मत मागावे. म्हणजे प्क्ष निवडून आणावा. व त्याच्या प्रमुखाने आपले मंडळ बनवावे. म्हणजे तो एकटा त्यासाठी जबाबदार राहील.

विचार केलात तर हे करता येणे शक्य आहे का ? सध्याच्या जगात सहज शक्य आहे. माझा अंदाज आहे ६५ % तरी मतदान यामुळे होईल.

४ हे जरा जास्तच होईल - पण अपक्षांवर बंदी घालावी त्यांचे काहीही काम नाही. पक्षाने मत मागावे. म्हणजे प्क्ष निवडून आणावा. व त्याच्या प्रमुखाने आपले मंडळ बनवावे. म्हणजे तो एकटा त्यासाठी जबाबदार राहील.

शेवटी अपक्ष कोणालातरी सपोर्टच करणार.. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं मलाही कधीकधी वाटतं पण त्याचा अधिक मतदार मतदानासाठी येण्यासाठी कसा फायदा होईल?

टवाळखोर's picture

20 Feb 2012 - 6:03 pm | टवाळखोर

कुलकर्णी साहेब,

निवडणूक प्रक्रियेत खालील सुधारणा करता आल्या तर मतदान नक्कीच वाढेल. जर मतदान जास्त व्हायचे हे उद्दिष्ट असेल तर असे काहीतरी करावेच लागेल.

तुम्हाला काय वाटतं निर्वाचित सदस्य अश्या सुधारणा करून स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतिल?

जयंत कुलकर्णी's picture

20 Feb 2012 - 6:27 pm | जयंत कुलकर्णी

ते उद्दिष्ट असेल तर, असे मी म्हणूनच म्हटले आहे. ते पायावर धोंडा मारून घेणार नाहीत म्हणूनच अण्णा आणि मेणबेत्यावाले लागतात. जनता विचार तरी करायल लगेल....

अन्या दातार's picture

20 Feb 2012 - 6:12 pm | अन्या दातार

१ मतदान कमीत कमी एक महिना चालू रहायला पाहिजे.

इतका खर्च झेपणारा, परवडणारा असेल असे वाटत नाही.

२ मतदान क्रेडिट कार्ड किंवा बँक खात्यावर व ईंटरनेट वर करता यायला पाहिजे.

यामुळे गुप्त मतदानाचा अधिकार अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (उदा. इंटरनेटवर कदाचित, 'U may also vote for.....' च्या जाहिराती आल्या तर काय घ्या? ;) )

३ नोकरीच्या ठिकाणी मतदानाची सोय व्हावी.

याबद्दल पूर्ण सहमती. हे मात्र व्हायलाच हवे. अशी सोय नसल्यामुळेच मी २ दा मतदानाला मुकलोय :(

परिकथेतील राजकुमार's picture

20 Feb 2012 - 6:29 pm | परिकथेतील राजकुमार

कशाला हव्यात त्या भिकार निवडणूका आणि ते टूकार मतदान ?

सरळ दोनच पक्ष बनवा आणि आलटून पालटून करु द्या राज्य. राज्यावरती भुते आली काय आणि राक्षस आले काय.. सगळे एकच.

जयंत कुलकर्णी's picture

20 Feb 2012 - 6:33 pm | जयंत कुलकर्णी

अहो अन्या डॉन,
केंद्रत दोन दिवस आणि इतर मार्गाने ३० दिवस. त्याला काय खर्च येणार आहे ?
तुमचा पासवर्ड गूप्त राहू शकतो मग हे का नाही ? हे जर भारतासारख्या IT त एवड्।ए लोक काम करत असताना शक्य नसेल तर कसे व्हायचे हो......
साला IT return कंपन्यांनी गोळा केला तर सरकारला चालतो तर हे का नाही ?

ता.क. माझ्या बाजूने बोल. थोड्याच वेळात मुसोलिनीचा पुढचा भाग टाकतो आहे. :-)

रणजित चितळे's picture

21 Feb 2012 - 11:11 am | रणजित चितळे

विचारांशी सहमत

चौकटराजा's picture

20 Feb 2012 - 9:24 pm | चौकटराजा

मतदान सक्तीचे करा हे म्हणणे एकदम सोपे पण लोकशाही च्या मूलभूत हक्काच्या ते विरोधी असू शकते.
पण दुसर्‍या मार्गाने त्याचे प्रमाण मात्र वाढविता येईल. कसे ?
मतदान झाल्यावर एक मतदान प्रमाण पत्र संगणक लगेचच प्रिट करून देईल. त्यावर अधिकार्‍याची सही शिक्का असेल.
पासपोर्ट , विसा, शॉप लायसन्स, गाळा खरेदी, जमीन व्यवहार, शेअर हस्तांतर , राष्ट्रीकृत बॅकेत खाते काढणे ई ठिकाणी ते प्रमाण पत्र
अनिवार्य करता येईल. याने " उदासीन वर्ग " बराचसा पकडता येईल.

गरीबांसाठी प्रमाणपत्र दाखविल्या खेरीज , सरकारी सवलती, सायकली , रेशन वरचे धान्य ई. मिळण्यासाठी अटकाव करता येईल.

विद्यार्थ्याना , डोमिसाईल, पोस्ट ग्रॅजुएशन एन्ट्रन्स ला प्रमाण पत्र अनिवार्य करता आले तर मतदान वाढेल .

पण हे मतदान जरी वाढले तरी त्याने निकालात फरक काय पडतो हे मला कुणी पटवून देईल काय? कारण ते वाढीव मतदान कोणाच्याही
वाट्याला आजच्या प्रमाणातच विखुरले गेले तर २०० मतांच्या फरकाने ऐवजी " अपने निकट तम प्रतिद्वंद्वी से २००० वोटोंसे जीत गये" हा
फरक फक्त बातमी देताना होईल. कसे ?

पैसा's picture

20 Feb 2012 - 9:34 pm | पैसा

माझा अगदी साधा प्रश्न आहे. सगळेच्या सगळे उमेदवार नालायक, भ्रष्ट, पार्टी सतत बदलणारे असतील तरी मतदान केलंच पाहिजे का? उभ्या असलेल्या एकाही उमेदवाराला मत द्यावं असं मला नाही वाटलं तर सक्ती कशाला?

नगरीनिरंजन's picture

21 Feb 2012 - 10:32 am | नगरीनिरंजन

उभ्या असलेल्या एकाही उमेदवाराला मत द्यावं असं मला नाही वाटलं तर सक्ती कशाला?

चांगले उमेदवार नसल्याने लोक मतदानाला जाणं हळूहळू बंद झालं आहे आणि लोक मतदानाला येत नाहीत म्हणून आता चांगले लोक निवडणुकीला उभे राहाणं बंद झालं आहे.
हे कुक्कुटांडचक्र तोडण्यासाठी लोकांनी मतदानाला जाणे गरजेचे आहे. सुरुवातीला एक-दोन वेळा जाऊन नाईलाजाने दगडांतल्या मऊ वीटेला मत द्यावं लागेल किंवा मत द्यायचे नाही असे सांगावे लागेल पण भरपूर मतदान व्हायला लागलं की फरक पडायला लागेल अशी आशा बर्‍याच जणांना वाटते.
पण खरी गोष्ट म्हणजे सगळ्यांनाच सध्याची "शिष्टीम" सोयीची असल्याने असलं काही होणार नाही. उगाच टीपी म्हणून असले धागे निघणार आणि त्यावर लोक हात साफ करून घेणार.
आजकाल तर चांगले सुशिक्षित लोकही उमेदवार नगरसेवकाच्या खर्चाने पर्यटन करून येतात असे बातम्यांमध्ये वाचले. असं असल्यावर काय बोलणार?
आपण आपलं नुसतं ऐकायचं संसदेचं पावित्र्य, सरकारचे अधिकार, न्यायालयाचे मर्यादा उल्लंघन वगैरे वगैरे विचार्वंतांचे विचार आणि कोणी हे बदलायचं असं मनातल्या मनात जरी म्हणालं तर त्याच्या चारित्र्याचा जाहीर पंचनामा करायचा. :-)

अविनाशकुलकर्णी's picture

20 Feb 2012 - 9:39 pm | अविनाशकुलकर्णी

माझे एक सजेशन आहे ..

ज्या वार्ड मध्ये १००% मतदान होईल त्या वार्ड ला एक लाख रुपये बक्षीस द्यावे..

९०% झाले तर ९० हजार रुपये.

असे ७०% पर्यंत बक्षेस ठेवावे..

सदर बक्षिसाचा खर्च सर्व पक्षांच्या उमेद वारांनी करावा ..

या मुळे मतदारां मध्ये उत्साह वाढेल..

व चढाओढ वाढेल..व मतदान हि खूप वाढेल..

नंतर ते पैसे वार्ड ग्रंथालय वा आरोग्य अश्या उपक्रमासाठी वापरावे त्या मुळे सामाजिक बांधील कीचे भान हि राखले जाईल...

अर्थात एक लाख हि रक्कम उदाहरण म्हणून दिली आहे..

ती वाढवणे राजकीय उमेद वारा~या हातात आहे...

प्रभाकर पेठकर's picture

21 Feb 2012 - 12:56 am | प्रभाकर पेठकर

राजकारण्यांना वठणीवर आणण्याचा काही प्रभावी उपाय शोधून काढला तर ते समाजकारणावर भर देतील आणि सुशिक्षित मतदारांमध्ये मतदानाबद्दल औदासिन्य जाऊन उत्साह वाढेल असे वाटते.

चिन्या१९८५'s picture

21 Feb 2012 - 1:57 am | चिन्या१९८५

अण्णा समर्थकांवर उगाचच आगपाखड केलिये.जस काही अण्णा देशभरात लोकप्रिय नव्हते तेंव्हा भरभरुन मतदान होत होत.मुलतः लोकांपुढे चांगले पर्याय नाहीयेत.राजकारणी कमालीचे ढोंगी आहेत आणि अजुन एक प्रश्न असा आहे की ज्या सुशिक्षित लोकांवर तुम्ही आरोप केले आहेत त्यांचे प्रश्न काय आहेत्,त्यांच्या मागण्या काय आहेत हे विचारायला कोणिही नगरसेवक अथवा आमदार वगैरे कधीही येत नाही.त्यामुळे लोकप्रतीनिधी आणि सुशिक्षित लोकांचा फारसा संबंध येत नाही.

तरीही मतदान करावे याच मताचा मी आहे.

प्रभाकर पेठकर's picture

21 Feb 2012 - 3:53 pm | प्रभाकर पेठकर

सुशिक्षित लोकांवर तुम्ही आरोप केले आहेत त्यांचे प्रश्न काय आहेत्,त्यांच्या मागण्या काय आहेत हे विचारायला कोणिही नगरसेवक अथवा आमदार वगैरे कधीही येत नाही.

पुण्यात भारतिय जनता पक्षाच्या उमेदवाराला (अनेकदा निवडून आलेला) आमच्या सोसायटीला चिकटून असलेल्या अनधिकृत झोपडपट्टीची तक्रार करून ती हटवण्याची मागणी केली असता,
'ते जमणार नाही. ते माझे मतदार आहेत' असे उत्तर दिले.
पण 'त्यामुळे तुम्ही आमच्या मतांना मुकाल त्याचा विचार केला आहे का?' असे म्हणता तो यशस्वी, समाजसेवक आणि भारतिय जनता पक्षाचा उमेदवार हसून म्हणाला,
' साहेब, खरं सांगू? तुमची मतं नकोतच मला. ह्या झोपडपट्टीतली १००% मतं मला मिळतात ती खुSSSSSSप झाली.'

ती 'अनधिकृत' झोपडपट्टी तो कधीतरी 'अधिकृत' करुन घेणार ह्यात काही शंका नाही.
सोसायटीतल्या बहुतेकांनी त्याला मतदान न करण्याचा निर्णय घेतला. पण तोच बिजेपीचा उमेदवार निवडून आला.

चिन्या१९८५'s picture

22 Feb 2012 - 2:21 am | चिन्या१९८५

नाही मग सोसायटीतल्या लोकांनी त्याच्या विरुध्द मतदान करायला हव होत.दुसर्‍या उमेदवाराला चांगली मत मिळाली असती .हल्ली बरेच उमेदवार खुप थोड्ञा फरकानी निवडुन येतात.अशा वेळेला प्रत्येक मत मोलाच ठरायला लागत.अशी ट्फ फाईट झाल्यावर पुढच्या वेळी 'तुमची मत मला नकोत' अस त्यानी म्हटल नसत.

प्रभाकर पेठकर's picture

22 Feb 2012 - 4:48 pm | प्रभाकर पेठकर

सुशिक्षित, विचार करणारे असे मतदार थोडे असतात. तसेच, असे थोडे 'विचारवंत' समुदायाबरोबर न जाता स्वतःचा असा वेगळाच मार्ग चोखंदळतात. त्यामुळे कुणाही विरुद्ध त्यांची एकी होत नाही.
ज्यांच्या मुलभूत गरजा पुर्ण झालेल्या नाहीत असे लोकं आपल्या गरजांसाठी एकगठ्ठा मतदान करतात असा निष्कर्ष एका चर्चेदरम्यान ऐकला होता.
त्याहून भयानक गोष्ट म्हणजे हल्ली काही मध्यमवर्गीय मतदार देखिल पैसे, वैयक्तीक सोयी सुविधा, गावच्या देवस्थानाला दान वगैरे मागतात असे ऐकले आहे. असे मतदार वाढत गेले तर मतदानाचा टक्का वाढेल आणि लोकशाहीचा विजय (?) होईल अशी भिती वाटते.

पारा's picture

21 Feb 2012 - 9:58 am | पारा

आता हे UID एकदा आलं की बर्याच गोष्टी शक्य होतील अस मला वाटत.
म्हणजे हळूहळू मतदान देखील online व्हायला तशी काही अडचण उरणार नाही.

देश प्रगती करत आहे हे खरच. जर रेल्वे आणि बसेसचं आरक्षण, बँकांची सर्व कामे संगणकाद्वारे होऊ शकतात, तर हे ही व्हावयास तशी हरकत नसावी.

त्याउप्पर, मतदान जरी स्वेच्छेने करायचं असलं, तरी अनेक इतर गोष्टींमध्ये व्यक्तीने मतदान केलं आहे का हा एक पात्रतेचा निकष म्हणून वापरता येईल.

प्रभाकर पेठकर's picture

21 Feb 2012 - 3:34 pm | प्रभाकर पेठकर

मतदान जरी स्वेच्छेने करायचं असलं, तरी अनेक इतर गोष्टींमध्ये व्यक्तीने मतदान केलं आहे का हा एक पात्रतेचा निकष म्हणून वापरता येईल.

हे विधान परस्पर विरोधी आहे. विधानाच्या पुर्वाधात स्वेच्छा मतदानाच्या अधिकाराला मान्यता दिली आहे तर उत्तरार्धात असे करणार्‍या मतदारास 'अपात्र' घोषित करण्याची 'धमकी' आहे.
हे म्हणजे एखाद्याच्या मस्तकावर पिस्तुल रोखून सांगायचे की 'बाबारे, तुझे पैसे, घड्याळ, चेन, मोबाईल माझ्या हवाली करायचे की नाही हे ठरविण्याचा तुला पुर्ण अधिकार आहे.'

माझा मुद्दा मला नीट मांडता आला नाही. म्हणण्याचा उद्देश असा होता की जे लोक मतदान करून एखाद्या व्यक्तीला आपला पाठींबा देतात, त्याच व्यक्तींना सरकार विरुध्द आवाज उठवण्याची, तक्रार करण्याची मुभा हवी.

मतदानाचा दिवस मी सुट्टी म्हणून उपभोगायचा आणि नंतर रस्त्याला खड्ड्यांपासून ते अनियमित वीजपुरवठ्याबद्दल ओरड करायची, सरकार ला नावे ठेवायची. हे योग्य नाही. मी जर मतदान केले असेल तरच अश्या तक्रारी करायचा मला नैतिक अधिकार राहतो. ज्या अर्थी मी कोणाला मत दिले आहे, त्या अर्थी माझे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणाच्यातरी नेमणुकीला माझा पाठींबा आहे, म्हणजेच मी माझ्या सामाजिक जीवनाबद्दल उदासीन नाही. अशाच परिस्थितीत मी मत दिलेला माणूस निवडून आला किंवा नाही तरीही सरकारला जाब विचारायचा अधिकार, (अप्रत्यक्षरीत्या, सत्तारूढ अथवा विरोधी असल्याने) माझ्याकडे येतो.

स्वेच्छेने म्हणजे, ज्यांना आपले मत नोंदवायचे नाही, त्यांनी ते खुशाल नोंदवू नये, मात्र मग तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद) ह्याची अपेक्षा करू नये. ठेविले सरकारे तैसेची राहावे.

हा मुद्दा स्थूलमानाने बरोबर आहे.. यात माझा एक उपप्रश्न.. विशेषतः तक्रारीच्या हक्काविषयी.. (तक्रारीचा हक्क ही खूप मोठी गोष्ट असल्यासारखा तो उल्लेख अशा चर्चेत नेहमी येतो म्हणून :

समजा मी मनसेला मतदान केलं.. आणि राष्ट्रवादीवाला निवडून आला..

तर मी राष्ट्रवादीवाल्याविरुद्ध तक्रार / बोंबाबोंब करायची की नाही..

"मी तुला निवडून दिलंय, तरी तू मला आउटपुट दिला नाहीस" असं मी त्याला म्हणू शकत नाही.. कारण मी त्याच्या विरोधात मत दिलंय..

मग जो कोणी त्या खुर्चीत बसलाय त्याच्याविषयी तक्रारीचा अधिकार मला आहे की नाही?

"तक्रार करण्याचा नैतिक अधिकार" ही कल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी विचारले आहे.

(की मला मतदान करण्याइतपत उत्साह आजुबाजूच्या राजकारणात आहे म्हणून मी दाद फिर्याद करायला लायक झालो.. ?)

प्रभो's picture

22 Feb 2012 - 1:56 pm | प्रभो

मी तर म्हणतो फक्त मतदान करणार्‍यांना तक्रारीचा हक्क का?

जर मी माझे कर वेळोवेळी भरत असेन आणी त्या कराच्या रूपाने सरकारने काही सोयी सुविधा जनतेला पुरवल्या असतील तर मला तक्रारीचा हक्क का नको?

मला वाटतं त्यांच्या मते (कर भरण्यासोबतच किंवा कर भरणे यासारखेच) मतदान करणे हेही कर्तव्य आहे ज्याने आपल्याला तक्रारीचा हक्क प्राप्त होतो.

हा मुद्दा नक्कीच विचार / काथ्याकूटयोग्य आहे.

प्रभाकर पेठकर's picture

22 Feb 2012 - 5:53 pm | प्रभाकर पेठकर

मी तर म्हणतो फक्त मतदान करणार्‍यांना तक्रारीचा हक्क का?
मला अगदी हेच म्हणायचे आहे. कर चुकविणारे कितीतरी जणं मतदान करतात आणि आपले शाई लावलेले बोट कॅमेरासमोर मिरवून समाजाला प्रबोधनात्मक संदेश देतात. उदा. काळा पैसा जमविणारे अभिनेते, व्यापारी, उद्योगपती, खेळाडू, जाहिरातीत कामे करणारी मॉडेल्स इ.इ.
पण ज्याच्या पगारातूनच कर कापला जातो तो करदाता राजकारण्यांच्या 'घोटाळ्यांना', 'सौदेबाजीला', 'लालसेला', 'भ्रष्टाचाराला', 'स्वकियांना वाटलेल्या निवडणूक तिकिटांना', 'आयुष्य वेचणार्‍या कार्यकर्त्यावर अन्याय करून 'आपल्याच' माणसाला', निवडणूकीची तिकिटे वाटणार्‍या' राजाकारण्यांच्या निर्ल्यज्य, कोडगेपणाने वैफल्यग्रस्त होतो. त्याने फक्त 'मतदान केले नाही' म्हणून त्याचे अधिकार काढून घ्यायचे, त्याला शिक्षा करायची आणि त्याला ह्या अवस्थेप्रत आणणार्‍या राजकारण्यांना मोकळे सोडायचे हा त्या नागरिकावर अन्याय नाही का? अनेकदा वेगवेगळ्या निवडणूकांमधून मतदान करूनही राजकिय व्यवस्थेत काहीच सकारात्मक बदल होत नाही, उलट राजकिय व्यवस्थेतील अनारोग्य दिवसेंदिवस वाढतानाच दिसतं तेंव्हा तो नुसता वैफल्यग्रस्त नाही तर ह्या बलाढ्य शक्तीपुढे हतबल होतो. अशा हतबल वर्गावर 'मतदान करीत नाही म्हणून त्यांचे अधिकार काढून घ्या', 'मेणबत्तीवाले', 'अण्णा हजारे टोपीवाले', 'षंढ' वगैरे वगैरे शाब्दिक आसुड ओढणे हे नुसते सोप्पेच नाही तर ती एक फॅशन होत चालली आहे.
त्या विरूद्ध, स्वार्थी आणि निगरगट्ट राजकारण्यांविरुद्ध कोण ब्र काढतो? त्यांना, 'निवडणूकीस उभे राहण्यास मज्जाव करा' असे कोण म्हणतो? त्यांनी, आपल्या पदांचा गैरवापर करून गडगंज संपत्ती कमावली, जमिनी बळकावल्या, पक्षीय स्वार्थासाठी उद्योगपतींना वेगवेगळ्या समाज विघातक सोयी सुविधा दिल्या, 'हा 'देशद्रोह' आहे त्यांना देहांताची शिक्षा द्या' असे कोणी का म्हणत नाही? एकतर्फी मतदारांवर आगपाखड कशा करीता?
मी मतदानाच्या विरोधात नाही. कित्येक गोष्टी भावनिकदृष्ट्या योग्य असल्या तरी प्रत्यक्षात आणणे कठीण आहे (जसे, अक्षम उमेदवारास माघारी बोलावणे) हे ही समजतं. मतदान प्रत्येकाने केले पाहिजे हे मलाही मान्य आहे. पण त्यासाठी मुळात 'पोषक' राजकिय वातावरण असावे लागेल. जशी खुन्याला फाशी होते तसेच भ्रष्टाचार्‍यांना जबरदस्त शिक्षा व्हायला पाहिजे. सत्तेचा गैरवापर करणार्‍यांना आयुष्यभराकरीता निवडणूका लढविण्यास नालायक ठरविले पाहीजे. निवडणूक लढविण्यासाठी नुसती 'निवडून येण्याची क्षमता' हा पक्षांचा स्वार्थी निकष ग्राह्य न धरता त्या-त्या उमेदवाराची शैक्षणिक क्षमता, सामाजकार्याची पातळी आणि कार्यकाळ आदी गोष्टींचा विचार व्हावा. अशी कठोर धोरणं राबविली आणि राजकारणास काही प्रमाणात जरी पावित्र्य लाभलं तर मतदानाचा टक्का स्वतःहून नक्कीच वाढेल.
आज लोकं आपल्या तक्रारी घेऊन पोलीसस्टेशनला जाणं टाळतात. कारण त्यांना माहीत असतं विरुद्ध पार्टीने कितीही मोठा उघड गुन्हा केला असला तरी त्याच्या पार्टीचा 'नगरसेवक(?)' त्याच्या साठी पोलीसस्टेशनला फोन करतो आणि तो मोकळा सुटतो, नव्हे तो तुम्हावर डूख धरून जास्त छळतो. चुकून केस उभी राहीलीच तर ती न्यायालयात वर्षोंन्वर्ष चालत राहते त्याचा निकाल येत नाही. त्या 'न्याया'साठी लागणारा वेळ, पैसा आणि समाजिक अभय त्या नागरिकाकडे नसते. रोजच्या जिवनात अशा अनेक अन्यायांना तोंड देत जगणारा नागरिक हळू-हळू बिछान्यावरचा मृतवत 'व्हेजिटेबल' बनतो. त्याला, 'तू मतदान करीत नाहीस म्हणून तुला राज्यव्यवस्थेविरुद्ध बोलायचा अधिकारच नाही' असे म्हणणार्‍यांकडे तो क्षीणपणे पाहतो आणि असे म्हणणार्‍यांना 'माफ' करून टाकतो कारण त्याहून वेगळे करण्याची त्याची क्षमताच ह्या व्यवस्थेने काढून घेतली आहे. त्याचे दोन्ही पाय तोडून 'तो शर्यतीत भागच घेत नाही' असा होणारा दोषारोप तो मुकमनाने स्विकारतो.

ता.क. निवडणूक प्रचारा दरम्यान माननिय राज ठाकरेंचे 'किणी प्रकरण' ऐरणीवर येताच भुजबळांच्या 'तेलगी प्रकरणाचीही' चौकशी व्हावी असे मत श्री. राज ठाकरेंनी मांडले. ह्याचाच दुसरा अर्थ 'माझे प्रकरण तुम्ही काढू नका मी तुमचे प्रकरण काढणार नाही'.
राज ठाकरेंवरील विक्रोळी सभेची 'केस' काढून टाकली आहे हि बातमी, नाशकात त्यांच्याच सहकार्याने सत्ता स्थापन होऊ शकते ह्याची उपरती झाल्याबरोबर लगेच आली.
कालाय तस्मैन मः।

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !

तक्रारीच्या हक्काला गरजेपेक्षा मोठा करायचा माझा उद्देश नाही, मात्र तो जसा आपण हक्क म्हणून बजावण्यासाठी आतूर असतो, तसेच आपण त्यासाठी लागणाऱ्या कर्तव्याकडे डोळेझाक करता कामा नये हा मुद्दा.

जेंव्हा मी असा म्हणतो की नैतिक अधिकार, तेंव्हा हे मी आधी सिध्द करतो की माझ्या दृष्टीनें माझा दैनंदिन व्यवसाय सांभाळून मी जे करू शकत होतो ते मी केलेले आहे. माझ्या दृष्टीने सारासार आणि व्यापक विचार करून जो उमेदवार मला योग्य वाटला त्याला माझे मूल्यवान मत मी दिलेले आहे. आता तो निवडून आला नसेल, तर काही कारणवशात कोणीतरी दुसरा त्याहून वरचढ ठरलेला आहे, अश्या वेळी तो वरचढ कसा हे पटवून देण्यासाठी वारंवार त्याला जाब विचारण्याचा अधिकार मला राहतोच. तसेही, सरकार ही हुकुमशाही वा अधिकारशाही होऊ नये, आणि लोकशाही अबाधित राहावी म्हणूनच नाही का विरोधी पक्ष हे संकल्पना महत्वाची आहे ?

राहिला प्रश्न कर देणाऱ्यांचा, तर त्या मुद्द्याचा पूर्ण विचार मी केला नाही हे मी मान्य करतो. पण तशी ही एखादी सुविधा पैसे मोजून विकत घेण्यासारखी कृती झाली. मग असे असेल तर उच्च कर पातळीत जे बसतात ते असेही म्हणू शकतात की आम्ही जास्त कर भरत असल्याने आमच्या मागण्यांच मूल्यांकन अधिक झालं पाहिजे. सर्वांना समान संधी येथे उरत नाही.

परवाचाच उदाहरण देतो, आमच्या कार्यालयात सर्वंकष स्वच्छतेबद्दल एक गटचर्चा होती. सगळ्यांनी, हे केला पाहिजे अन ते केला पाहिजे अश्या बऱ्याच गोष्टी केल्या. माझा मित्र मधे उभा राहिला, आणि त्याने सर्वांना साधा प्रश्न विचारला की इथे आपण सार्वजनिक बसचा वापर करून येतो. त्याचे तिकीट प्रत्येकजण कचरापेटीत नीट टाकतो का ? ते जर आपण करत नसू तर महापालिकेच्या कचरा नियोजन समितीचे आपणच अध्यक्ष असल्यासारखे बडबडून काय होणार ?

तसेच, आपण काहीही हातपाय न हलवता सरकारच आपली काळजी घेईल, किंबहुना तेच त्याचे मूलभूत कार्य आहे असे नुसते ओरडून काय होणार?

कॉमन मॅन's picture

21 Feb 2012 - 11:03 am | कॉमन मॅन

विषयाला धरून प्रतिसाद नोंदवणार्‍यांचे आभार.

असंबद्ध प्रतिसाद-उपप्रतिसाद देणार्‍यांची मानसिकता आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे असले असंबद्ध प्रतिसाद इथे राहू देण्यामागची मिपा प्रशासनाची नक्की भूमिका काय आहे, हेही आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.

धन्यवाद!

असंबद्ध प्रतिसाद-उपप्रतिसाद देणार्‍यांची मानसिकता आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत

कॉमन मॅन यांची मानसिकता समजुन घेण्यास कुणी तयार आहे का...? :bigsmile:

कॉमन मॅन ,असंबद्ध धाग्यांवर सुसंबद्ध प्रतिसाद कसे द्यायचे ते तुम्हीच सांगा ;)

आनंदी गोपाळ's picture

21 Feb 2012 - 11:23 pm | आनंदी गोपाळ

मला वाटतं,
की टीव्हीवर 'जागृत' झाल्यासारखे दिसणारे 'मी अण्णा' टोपी घातलेले, मेणबत्त्या पेटविणारे तरूण यंदा मतदान करून काही बदल घडवतील अशी कॉमन मॅन यांची समजूत असावी.
त्या समजूतीचा (भ्रम)निरास झाल्यामुळे हा लेख आहे.
यात अण्णा अथवा आंदोलनाला दोष नसून आपल्याच प्रवृत्तीचे आत्मपरिक्षण करण्यासा प्रयत्न असावा?

इनोबा म्हणे's picture

22 Feb 2012 - 12:53 am | इनोबा म्हणे

यांच्यापेक्षा झोपडपट्टीतून आणि चाळीतून राहणारे, तुलनेने कनिष्ठ मध्यमवर्गीय, गरीब असलेले लोकच खर्‍या अर्थाने 'अधिक सुशिक्षित' म्हणायला हवेत. ही मंडळी मेणबत्तीमोर्चात कदाचित सामिल होत नसतीलही, परंतु अधिकाधिक संख्येने मतदान मात्र करतात असे आकडेवारी सांगते.

आणि तुमचे हेच 'अधिक सुशिक्षित' मतदार केवळ गणेश मंडळाला मिळणारी वर्गणी, मंडळाच्या गणपतीच्या मुर्तीला मिळणारे दागीने, खास पुरुष मतदारांसाठी निवडणूकी नंतर निघणार्‍या कोकण,गोवा किंवा महिलांसाठीच्या तुळजापुर, पंढरपूर, शिर्डी वगैरे तिर्थयात्रा, किंवा रोख रकमेच्या आमिषाकरता मतदान करतात. याबद्दल आपल्यासाख्या 'मेणबत्तीछाप' धागाकर्त्याचे विचार जाणून घ्यायला आवडतील.

हुप्प्या's picture

22 Feb 2012 - 4:14 am | हुप्प्या

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layou...
>>
‘दलित-मुस्लिम व गरीब वस्त्यांमधून मोठय़ा प्रमाणावर मतदान झाले व उच्च मध्यमवर्गीय वस्त्यांतील कमी मतदानामुळेच मतदान टक्केवारी घसरली’ अशा बातम्या दिशाभूल करणाऱ्याच ठरतील..
वरळी, रमाबाईनगर, शिवाजीनगर, मानखुर्द इथल्या दलित वस्त्यांतून मतदारांचा उत्साह यंदा कमीच होता, त्याचा फटकाही आरपीआयला बसला. भेंडीबाजार व मोहम्मदअली रोड (३७.३९), धारावी (४३.४१) ही आकडेवारी पाहिल्यास मुस्लिम वा गरिबांनीही कमी मतदान केल्याचे दिसेल. याउलट, दादर, परळ, प्रभादेवी, माहीम तसेच वांद्रे, जुहू, अंधेरी येथून ४८ ते ४९ टक्के मतदान झाले आहे.
म्हणजेच, राजकारण्यांविषयी उदासीनता फक्त मेणबत्तीवाल्या मध्यमवर्गात आहे असे नसून, सर्वसामान्य गरीब, दलितांमध्येही एकूण राजकारण्यांविषयी राग, आणि असंतोष आहे. सर्व राजकीय पक्षांची विश्वासार्हता ढासळलेली असणे, हे त्याचे प्रमुख कारण. राजकारण्यांच्या व संसदीय लोकशाहीच्या ढासळलेल्या या स्थितीकडे काणाडोळा करून निवडणूक प्रक्रियेच्या पावित्र्याची चर्चा करणे अखेर घातकच ठरणार आहे.
<<
लोकसत्तेत आलेले हे पत्र. यात असे म्हटले आहे की मतदान टक्केवारी ही निव्वळ पांढरपेशा वर्गातच घसरलेली आहे असे नाही तर झोपडपट्टीत रहाणारेही मतदानात फार स्वारस्य दाखवत नाहीत. तेव्हा हा वर्गही आता मतदानाकडे पाठ फिरवू लागला आहे असे दिसते.

गोव्यात विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या धाग्याची आठवण यायचं कारण म्हणजे, जनतेत जो कमालीचा असंतोष होता, त्याला लोकांनी ८२% मतदान करून वाट दिली. तुम्ही ज्याना मेणबत्तीवाले म्हणून हिणवताय, त्यानी फेसबुकवर "दिगंबर कामत गेट वेल सून" "पर्रीकर मुख्यमंत्री पाहिजेत" असे अनेक ग्रुप्स तयार करून प्रचंड वातावरण निर्मिती केली होती. त्यापूर्वीच्या माध्यम प्रश्नावरून झालेल्या चळवळीत फेसबुक वापरणार्‍या तरूण विद्यार्थ्यानी वृद्ध शशिकलाताईना अभूतपूर्व साथ दिली होती. हा प्रचार आणि वातावरण निर्मिती प्रत्यक्ष मतदानात दिसून आली आणि भ्रष्टाचारी, अनागोंदी कारभार करणार्‍या उन्मत्त सरकारला आम जन्तेने त्यातही तरूण विद्यार्थ्यानी धूळ चारली.

स्वतः मनोहरभाई पर्रीकर यांचं फेसबुकवर खातं आहे, त्यांच्या "मित्रांमधे" तरुणांचा भरणा आहे आणि या तरुणांच्या वाढदिवसाना ते शुभेच्छा वगैरे देतात! मग तरुणाना हा स्वच्छ प्रतिमेचा नेता आपला वाटला यात नवल ते काय!

दुसरे "टोपीवाले". या निवडणुकात श्री श्री रविशंकर आणि रामदेवबाबा यांच्या शिष्यानी शक्य तितक्या सर्वाना फोन करून, एसेमेस करून मतदान करायला बाहेर आणले होते. कोणा एका पक्षाला मते द्या असा प्रचार न करता तुमचा अधिकार साक्षेपीपणे वापरा असंच त्यांचं सांगणं होतं.

या सगळ्याचा परिणाम आज आपल्यासमोर आहेच. उद्या मनोहरभाई पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत!!

नितिन थत्ते's picture

8 Mar 2012 - 10:35 am | नितिन थत्ते

गोव्यातील निकालाबाबत सहमत आहे. तेथील जनतेतील असंतोष काँग्रेसच्या पराभवाला कारणीभूत झाला आहे. त्यात विक्रमी मतदानाचा मोठा सहभाग असावा. "आपल्या मतानं काय फरक पडतो?" असे वाटणार्‍यांसाठीही हा मोठाच धडा असावा. शिवाय रात्री वाटल्या जाणार्‍या गोष्टींचाही काही परिणाम होत नाही असे दिसते.

फेसबुक इफेक्टबाबत मात्र असहमत. फेसबुक आणि तत्सम ऑनलाईन माध्यमांतून तसेच इतर मीडियातून शिक्षित लोकांद्वारा गेले वर्षभर चाललेल्या काँग्रेसविरोधातील विखारी प्रचारानंतरही काँग्रेसने पाच राज्यांत मिळून पूर्वीपेक्षा २४ जागा अधिक जिंकल्या आहेत. या पाच राज्यांत काँग्रेसच्या आधी १४३ जागा होत्या आता १६७ आहेत म्हणजे सुमारे १६% अधिक आहेत.

पैसा's picture

8 Mar 2012 - 10:57 am | पैसा

प्रत्यक्ष किती झाला असेल हे सांगणं कठीण आहे खरंच. पण निदान तरुणांमधे असंतोष आहे हे फेसबुकवरून आणि इतर मीडियामधे स्पष्ट दिसत होतं याची दखल इथल्या राज्यकर्त्यांनी घेतली असती तर त्यांना आज एवढ्या मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं नसतं.

गोव्यात यावेळची विशेष गोष्ट म्हणजे भाजपने जाणून बुजून ख्रिश्चन आणि राजकारणात नवीन असे उमेदवार उभे केले आणि या खेळीला यश मिळालं. लोकांनी धर्मावर आधारित किंवा अशा कोणत्याही प्रकाराने मतदान केलं नाही. जिथे बिगर काँग्रेसी पण भाजपपेक्षा जास्त योग्य उमेदवार मिळाला तिथे त्याला मतदान झालं आहे.

कॉमन मॅन's picture

9 Mar 2012 - 10:57 am | कॉमन मॅन

आशादायी चित्र आहे. आभारी आहे..