मनोरंजक घोषणा / भाषणे

राजघराणं's picture
राजघराणं in काथ्याकूट
17 Feb 2012 - 3:32 pm
गाभा: 

महापालिका निवडणुकीत भरपूर मनोरंजन झाले. ठाकरेंची कोंबडी पवारांना भावली पण त्यांच्या कोंबड्यात दम नसल्याने, कोंबडीने अंड घातलच नाही ! राज उद्धव पाउल फुडे मागे जायचे खेळ खेळत होते. बाबा म्हणाले ठाकरेंचे महत्व ही निवडणुक संपवणार.

काही मनोरंजक उखाळ्या पाखाळ्यांचा संग्रह करूया इथे

काय बघतोस रागाने फाडुन खाल्ल ना वाघाने..."

बघतोयस का रागान इंजिन धावतय वेगान

तुम्ही अ‍ॅड करा अजून

-

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

17 Feb 2012 - 3:40 pm | अत्रुप्त आत्मा

प्र.का.टा.आ.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Feb 2012 - 3:39 pm | अत्रुप्त आत्मा

निवडणुक प्रचार काळात पुण्या मुंबैत प्रचारात असलेली टॅग लाइन--रात्री खा कुनाचं बी मटन,पन सकाळी दाबा आपलच बटन ;-)

मनसे विरुद्ध निसटता विजय मिळवलेल्या उमेदवाराला---इंजीनाचा धुर अजुन चढला न्हाई,म्हणुनच तू,,,फक्त पडला न्हाई.. ;-)

एक किस्सा:
मागे लोडशेडिंग, क्रिकेटवरुन राज ठाकरे, अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात कलगीतुरा सुरु होता.
अजित पवार म्हणे - ''आमचे आजोबा क्रिकेटर होते.. त्यामुळे हे क्षेत्र आमच्यासाठी नवं नाही वगैरे''
राज ठाकरे म्हणे - ''तुम्ही उद्या दारासिंगला आमचे आजोबा म्हणाल..याला काही अर्थ नाही''
उद्धव ठाकरे म्हणे - ''‍अजित पवारांनीच अख्ख्‍या महाराष्‍ट्रात लोडशेडिंग सुरु केलंय.. हे काय लोडशेडिंगमध्‍येच जन्माला आले होते का??''

ही स्टेटमेंट पेपरांतून वाचून गावाकडच्या दोस्ताने मला फोन केला न् म्हणे, ''च्यायला हे लोक पण बिलकुल आपल्यासारखेच आहेत, अस्सल गावठी .. शिवराळ..''

त्यावर आम्ही दोन तास हसत होतो... असले किस्से उकरुन काढून..

दादा कोंडके's picture

17 Feb 2012 - 4:14 pm | दादा कोंडके

खूप दिवसांपुर्वी आलेला एक फॉरवर्ड आठवला.,

_______________________________________________________________

पु.लं. चा एक किस्सा .... चाळीतला दादर (Steps)

चाळीमधल्या दोन तरुण मुली समोरासमोर आल्या आणि संवाद सुरु झाला ...

"इतकं काही नको ओळख नसल्यासारखं तोंड चुकवून जायला -"

"इश्श! तोंड चुकवायला काय कर्ज नाही घेतलं!"

"पण ब्लाउज घेतला होतास तो? बहुतेक हरवला असेल! जॉंर्जेटच्या साडीसारखा."

"तीन दमडीचा ब्लाउज!"

"म्हणजे तुला महागच!"

"पन्नास ब्लाउज आणून देइन -"

"शेवटी मधूला सोडुन लॉंड्रीवाल्याशीच जमवलस वाटतं?"

"काम म्हणून -"

"त्याशिवाय पन्नास ब्लाउज कुठून देणार? मधुनं दिली वाटतं चाट!"

"अशी चाट खायला मी म्हणजे तू नव्हे! तरी बरं अरविन्दा गेला त्या मंदाच्या मागं"

"हो जातोय! डोळे नाही फुटले त्याचे चकणिच्या मागे जायला "

"तुला पाहतांना फुटले होते वाटतं?"

"कां, तुझ्याकडे ढुंकून पाहिलं नाही म्हणुन?"

"असल्या छप्पन अरविंदाना पातळं धुवायला ठेविन मी !"

"हो क्का? चाळीतली पातळं धुवायचं कंत्राट घेतलय का तुझ्या पोष्टमन बाबांनी?"

"आहाहा! तरीच एस्सेसीत गचकलीस तीनदा! पोष्टमास्तरला पोष्टमन म्हणत नाहीत इंग्रजीत!"

"तुझी आई तर सारखी त्यांना पोष्टमन म्हणते रात्रंदिवस!"

"चोरुन ऎकायची सवय जात नाही म्हणायची!"

"आईला जरा आवाज हलका करायला सांगा - आगीचा बंब गेल्यासारखी ठणठणते! चोरुन नाही ऎकांव लागत "

"हो, तुझी आई म्हणते कोकिळाच की नाही! तरी बरं, परवा सगळी चाळ जमा झाली "

"आणि तुझ्या आईच्या झिंज्या पकडल्या तेव्हा वाजवल्या ते का नाही सांगत?"

"हॉ हॉ हॉ ~!"

"वेडावतेस काय माकडासारखी "

"तुझा अरविन्दा एक माकड आहे. म्हणुन सगळीच माकडं वाटली तुला? राधेला म्हणे सगळीकडेच
कृष्ण दिसत होता."

"ही ही ही ही! गणपती उस्तवात चोरुन दुसऱ्यांच्या कविता आपल्या नावावर म्हटल्या
म्हणजे काय सगळीकडे कावय नको."

"चोरायला काय तुझे बाबा नाही मी. पुरुषासारखा पुरूष असून कोळसे चोरतो!"

"बाबांच नको हं नाव घेऊ!"

"मम्मीला सांग तुझ्या. मला कशाला सांगतेस? दिवसभर तर नाव घेते. गोपाळ गोपाळ गोपाळ करुन."

"माडर्न मम्मी तुझी- लिपष्टिक लावली म्हणून काय अक्कल नाही आली!"

"मग तुम्ही फासा तोंडाला-तुमचे कोणी ओठ धरले आहेत?"

"तुझी मम्मी ओठाला लावते का लिपस्टि~~क? मला वाटलं. समोर आलेल्या दाताला"

"खरे दात आहेत - कवळी नाही तुझ्या आई सारखी!"

"चप्पल मारीन, सांगते!"

"आहे का पायात? वा वा! आहे की! तरीच हल्ली रोज देवळात जातेस - रोज नवी चप्पल!"

"बघायचिय का?"

"बघू - माझीच असेल!"

"ही बघ .. फाट! "

:)

यकु's picture

17 Feb 2012 - 4:16 pm | यकु

____/\______!!!!!!!

=)) =)) =)) =))

पु. ल. म्हणजे माईंड ब्लोईंग! ___/\___ :)

sagarpdy's picture

17 Feb 2012 - 5:44 pm | sagarpdy

हहपुवा

दिपोटी's picture

18 Feb 2012 - 3:24 am | दिपोटी

'काही (बे)ताल चित्रे' या पुलंच्या लेखातील हा पुढील भाग सुध्दा तितकाच मजेशीर आहे ...

झपताल
पार्श्वभूमी : चाळीतली खोली
"मेले शंभरदा ओरडा - फुटलेयत कान!"
"जरा गप्प बसाल का?"
"मुकी बायको करायची होतीत-"
"तेच चुकलं!"
"मग पुन्हा बांधा बाशिंग - नाहीतरी दिवसभर खिडकीतून पलीकडल्या बिर्‍हाडात पाहत असताच कॉलेजवालीकडे!"
"मग भीती आहे की काय कुणाच्या बापाची."
"त्या पोरीच्या बापाची तरी बाळगा! पोलिसांत आहे तो! जरा वयाची ठेवा!"
"उगीच बडबडू नकोस - भांडखोर बायको म्हणजे पाप आहे -"
"काय?"
"नाही, शाप आहे - शापच बरोबर!"
"दिवसभर मेले चौकोन भरतात - दोन रुपड्यांचं तरी बक्षीस लागेल तर शपथ!"
"पंचवीस हजार मिळतील तेव्हा पाटल्या मागायला येऊ नकोस!"
"पाटल्या घालताहेत! होत्या त्या विकल्या!"
"विकेन नाहीतर समुद्रात फेकून देईन -"
"मलाही द्या फेकून -"
"चल ऊठ!"
"ट्यँ -"
"काय कारटी आहेत! लोकांची पोरं कशी हसत असतात."
"आमची कारटी बाप मरत नाहीत म्हणून रडतात -"
"फार लवकर समज आलीय त्यांना -"
"बाबा, मास्तरनी वही आणायला सांगितलंय!"
"मास्तरला म्हणावं - वहीबिही काही मिळणार नाही! किती वह्या लागतात तुझ्या मास्तराला?"
"मास्तरला नाही - मला लागतात."
"मिळणार नाहीत! हा आणा घे. विड्या घेऊन ये लालधागा -"
"आणि वह्या?"
"थोबाड फोडीन! अहो, जरा शिस्त लावा पोरांना -"
"आधी अंग घ्या जरा विसळून! दिड मिंटाची मेली आंघोळ - तीन तास पेटतोय बंब!"
"पंचा आण! एकदा शेवटली आंघोळ करतो तुझ्या नावाने - तांब्या कुठाय?"
"तो काय समोर? घ्या आतून -"
"ते तू नको सांगायला."
बुडबुडबुडूक -
"ओय ओय मेलो! अग, हे आंघोळीचं पाणी आहे की चहाचं आधण? - ओय ओय ओय -"

******************************
अवांतराबद्दल क्षमस्व! शुक्रवार संध्याकाळ - मंडळी पुलंच्या खुमासदार लिखाणाची मजा लुटतायत, तेव्हा त्याच लेखाचा हा एक भाग (अजूनही बरेच भाग आहेत) येथे देण्याचा मोह आवरला नाही ...

- दिपोटी

भन्नाट !! काही प्रत्यक्षातले नमुने आठवले. :D

गोमटेश पाटिल's picture

17 Feb 2012 - 4:38 pm | गोमटेश पाटिल

हे सगळे चोर साले असलेच,,, आता एकमेकाचे पाय ओडायचे नी नतर सत्तेसाटि युति करयाचि.. मग आपनहि मोकळेच पुन्हा त्याच्यावरहि चर्चा करण्यास ?

तर्री's picture

17 Feb 2012 - 8:29 pm | तर्री

राजकारण ही करमनूक आसती गोर गरीबाची. दोन पैसे , दोन पेग , दोन कोबडी ची जेवणे आणि थोडी करमनूक.

नाहीतर कुठे आपण २०० रु. तिकीट काद्गून विनोदी सिनेमा पाणार ? जरापण हसाया येत नाही २०० सारून !!! त्यापेक्षा हे राजकारण बरे.
थोडी करमनूक.

राजू शेट्टी आमदार होते. मग ते खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहिले.. सगळीकडे बोर्ड लागले....

आमदार? अं हं खासदारच!

ते खासदारकी जिंकले.. सगळीकडे बोर्ड लागले...

पटलं पटलं पटलं ! खासदारच!

कपिलमुनी's picture

20 Feb 2012 - 8:10 pm | कपिलमुनी

वहिनींना सुट्टी.............
राजू शेट्टी .....

अशी घोषणा होती

हुप्प्या's picture

18 Feb 2012 - 12:30 am | हुप्प्या

थोरले ठाकरे आणि पुतण्या ठाकरे यांचे मर्द असणे या विषयाला धरून झणझणीत सवाल जवाब झडले होते.
मर्द असाल तर अमुक करा. मर्द आहेच आणि तमुक केलेच वगैरे.
पण ५० टक्के महिला आरक्षण असताना कुणी किती मर्दानगी दाखवतो हे का बरे महत्त्वाचे समजले जाते?

मराठी_माणूस's picture

18 Feb 2012 - 11:21 am | मराठी_माणूस

बाकी ह्या रणधुमाळीत सगळ्यांना (खास करुन, हिंदु परंपरा जपणार्‍याना) व्हॅलेंटाईन डे चा सोयीस्कर विसर पडला.
नुसती दांभिकता

राष्ट्रवादीने पिंपरीत इतकी घड्याळं वाटली कि लोकं चक्कं वेळेवर कामावर जाऊ लागली.. पण राज साहेब ह्या घड्याळं वाटण्यावर खवळले आहेत. सहाजिकच आहे, इंजिनं वाटता येत नाही ना!

कपिलमुनी's picture

21 Feb 2012 - 7:28 am | कपिलमुनी

बडवा चा काय झाला पुढे ?
टंका की राव !

राजघराणं's picture

21 Feb 2012 - 4:43 pm | राजघराणं

३ दिवस द्या मालाक. हापिसात लै कामै

diggi12's picture

13 Aug 2024 - 11:04 am | diggi12

अजून किती दिवस मालक?