गाभा:
हा धागा म्हणजे संपादकांना एक प्रश्न म्हणा किंवा एक नवीन feature म्हणा.
माझ्या मनात असे होते कि मिसळपावचं एक twitter खाते बनवता येईल काय ?
नवीन कुठलेही लेखन झाले की आपसूक एक tweet केला जाईल ज्यात त्या लेखाचा दुवा असेल.
कशी वाटते कल्पना?
ता. क. : असे आधीच काही असेल किंवा असा काही विचार आधी झाला असेल तर माफ करा
अ.(अधिक) ता. क. : कुठल्या विषयांतर्गत हे मांडावे न कळल्यामुळे बरेच विषय निवडले आहेत
प्रतिक्रिया
17 Feb 2012 - 11:59 am | मी-सौरभ
.............................
काय प्रतिक्रिया द्यावी हे न कळल्याने बरेच टिंब दिले आहेत.
17 Feb 2012 - 12:16 pm | तर्री
शून्य प्रहारातिल लक्षवेधी सुचना.
17 Feb 2012 - 5:50 pm | sagarpdy
अहो RSS फीड्स आहेत ना!?
17 Feb 2012 - 9:03 pm | पारा
गेला हो. RSS चा जमाना. twitter हे नवीन आता !
18 Feb 2012 - 9:59 am | बहुगुणी
मुक्तसुनीत यांनी अडीच वर्षांपूर्वी थोडासा संबंधित धागा इथेच काढला होता त्याची आठवण झाली...
20 Feb 2012 - 2:11 pm | पारा
अडीच वर्षांपूर्वी twitter तसं फारच तुटक-तुटक चालायचं, पण आता ते दिवस गेले.
सध्या twitter बऱ्याच अंशी माहिती पाठवायला वापरात येऊ लागलेलं आहे.
हा धागा काढण्याचा कारणच हे की इथे सारखा सारखा न येता, नवीन लेखांची माहिती मिळत राहू शकेल.
20 Feb 2012 - 3:34 pm | परिकथेतील राजकुमार
ट्विटर म्हणजे नक्की काय आहे नेमके ?
21 Feb 2012 - 10:45 am | पारा
ट्विटर ही अशी एक सुविधा आहे जिथे एका SMS च्या जागेत मावेल (१४० अक्षरे) एवढा संदेश तुम्ही प्रसिद्ध करू शकता. याचा वापर अनेक जण लेखांचे आणि बातम्यांचे तसेच गाण्यांचे आणि चित्रफितींचे दुवे जगाला पाठवण्यासाठी करतात.
अनेक प्रसिध्द माणसे आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठीही ह्या सेवेचा वापर करतात. तुम्ही ट्विटर ला जरूर भेट द्या, मला तर ते आवडतेच, तुम्हालाही आवडेल अशी अपेक्षा !
माझा ट्विटर चा दुवा : पारा (अर्थात mercury )
21 Feb 2012 - 1:35 pm | गवि
आई ग्गं...
21 Feb 2012 - 2:11 pm | वपाडाव
पर्या, लेका... ह्यानं दांडी उडवली की बे !!!
20 Feb 2012 - 3:38 pm | विनायक प्रभू
चिमण्या किंव तत्सम प्राण्यांचा आवाज जेथे येतो त्याला म्हणतात ट्विटर.
तुझ्या सारख्या पराच्या कावळ्यांना मस्त संधी.