गाभा:
भारताच्या सर्वोच्च नेत्या आपण इटलीहून आयात केल्या. तर नुकतेच आलेल्या बातमीनुसार ह्या थोरल्या महाराणीसरकारच्या म्हाईरच्या काही लोकांनी भार्ताच्या काही मच्छीमार बांधवांचा गोळ्या घालून बळी घेतला. कारण की ते चाच्यांसारखे दिसत होते (म्हंजी चाचा न्हेरू वा थत्ते चाचा नसून सोमालियातील चाचे).
http://timesofindia.indiatimes.com/india/Killing-of-fishermen-Italian-na...
महाराणीसाहेबांनी वज्रचुडेमुंडित असल्यापासून ती.गं.भा. होईपर्यंत देशाकरता इतका त्याग केला आहे की आपुन गुमान त्या इटालीच्या लोकांना मोठ्या दिलाने माफी करावी अशी इच्छा आहे. शेवटी ते आपल्या माल्किनीचे म्हाएर आनि युवराजांचे आजोळ आहे.
प्रतिक्रिया
17 Feb 2012 - 10:57 am | प्यारे१
गप्प बसायचे ठरवले आहे. ;)
17 Feb 2012 - 11:11 am | इरसाल
पण मी म्हण्तो का हो ?
17 Feb 2012 - 11:13 am | चिरोटा
एक महिना पास्ता,पिझा न खायचे ठरवले आहे.
17 Feb 2012 - 11:19 am | गवि
इटालियनांनी भारतीय मच्छिमारांना मारण्याचा सोनियांशी किंवा राहुलच्या आजोळाशी काय संबंध?
इटली ऐवजी नॉर्वे किंवा अमेरिकन गस्ती नौकांनीही संशयित चाच्यांना मारलं असतं..
संशयित बोटीला / खलाशांना मारण्यापूर्वी वॉर्निंग दिल्या जातात. प्रोटोकॉल असतो. त्यातून असं घडणं दुर्दैवीच.. पण केवळ इटलीचं नाव आलं म्हणून महाराणीसाहेबांचा संबंध मधे आणण्याची गरज वाटत नाही.
आपणही (भारत कोस्ट गार्ड/ नेव्ही ) अशा अनेक संशयित लोकांना मारतो / ताब्यात घेतो. प्रत्येकाची न्यूज येतेच असं नाही.
हे केलंच पाहिजे.. ते नीट केलं असतं तर मुंबईवर हल्लाही झाला नसता..
17 Feb 2012 - 5:37 pm | चिगो
>>इटालियनांनी भारतीय मच्छिमारांना मारण्याचा सोनियांशी किंवा राहुलच्या आजोळाशी काय संबंध?
हेच म्हणतो.. इटलीशी संबंधित प्रत्येक गोष्ट असली की त्यात सोनिया, राहुल आणि प्रियंकाला का गोवण्यात यावं, ब्वॉ ?
हे म्हणजे जुन्या काळी "आता तू तुझ्या माहेरासाठी मेलीस. आता ह्या घरासाठी राबायचं" आणि त्याचवेळी येता-जाता माहेरावरुन सुनेला टोमणे मारणार्या सासूसारखं झालं.. (मला काँग्रेसशी काही घेणं-देणं नाहीये, हे नमूद करु इच्छितो.)
झाली ती घटना वाईट, दुर्दैवी आहे आणि त्यासाठी दोषींवर कारवाई व्हायलाच पाहीजे. पण फुकट बादरायण संबंध जोडण्यात काही अर्थ नाही..
17 Feb 2012 - 8:37 pm | हंस
इटालियनांनी भारतीय मच्छिमारांना मारण्याचा सोनियांशी किंवा राहुलच्या आजोळाशी काय संबंध?
अगदी अगदी!
उगा वडाची साल पिपळाला लावल्यासारखे वाटते.
17 Feb 2012 - 8:43 pm | तर्री
जसा कुठल्या ही घातपाती कृत्यामध्ये सघांचा "हात" असतो. तसाच आणि (तेवढाच) हा ही आहे.
17 Feb 2012 - 11:31 am | स्पा
उगाच धागा आहे..
जे काही झाले त्यावर इथे चर्चा करण्यात काय अर्थ आहे?
17 Feb 2012 - 11:43 am | अन्नू
आजपर्यंतचा भारताचा इतिहास पाहता भारत हा खुप दयाळू देश आहे! गुन्हेगारांबद्दल (म्हण्जे बगा आता- खुन, खंडणी, दादागिरी, देशद्रोह असल्या गुन्हेगारांबद्दल) तो सतत आपल्या सदसदविवेक बुद्धीनेच विचार करुन त्यांच्याशी अगदी प्रेमाने वागतो. उदा.- अबु सालेम, कसाब, किंवा इतर मान्यवर व्यक्ती. (इतर चिरकुट गुन्हेगारांना मात्र तो बांबुचे चांगलेच फटके देतो!) त्यात जर राजकारणी काँग्रेस पक्ष म्हणाल तर ते याबाबतीत खुपच अग्रेसर आहेत. त्यांचा गांधींपासूनचा इतिहास तुंम्ही पाहु शकता. त्यामुळे झालेल्या प्रकारामुळे आपण सरळ महाराणीच्या म्हायेरच्या माणसांची माफि मागुन पुढच्या वेळी आमचे कोळी असे चाचे दिसणार नाहीत असे त्यांना सांगावे व त्यानुसार सर्व कोळ्यांना सुट-बुट असा ड्रेसकोड कंपल्सरी बंधनकारक करावा.
त्याचप्रमाणे कोळ्यांनी रोज ब्युटीपार्लरमध्ये जावुन आपापला फेशिअल करुन घ्यावा, आपले सौदर्य वाढवावे, आणि निखळ कि काय म्हणत्यात तशी गोरीपान कांती करावी व एकदम झंटलमॅनसारखे दिसावे. अशी विनंती! टाय घातल्यास उत्तम.
17 Feb 2012 - 12:32 pm | यकु
ग्रॅनी सोनियासाठी गंगाभागिरथी शब्द वापरलेला पाहून नर्मदेत उडी मारावा वाटत आहे.
17 Feb 2012 - 1:11 pm | मनीषा
....मग नर्मदा परिक्रमा पोहत पोहत की काय ?
17 Feb 2012 - 5:01 pm | मेघवेडा
पोहत केल्यास ती नर्मदा तरिक्रमा होईल! ;)
17 Feb 2012 - 8:52 pm | रेवती
संबंध काय तो समजला नाही.
17 Feb 2012 - 11:46 pm | चिरोटा
http://www.bbc.co.uk/news/world-asia-india-17071474
चौकशी चालु झाली आहे. ईटालियन दुतावासाच्या म्हणण्यानुसार घटना international waters मध्ये घडली आहे. केरळ पोलिस/नेव्हीच्या म्हणण्यानुसार भारताच्या हद्दीत घटना घडली आहे. international waters मध्ये हे घडले असेल तर भारतिय कायदे कदाचित लागु होणार नाहीत.
दोन्ही राष्ट्रे हा पेच कसा सोडवतात ते पाहायचे.
19 Feb 2012 - 11:58 am | तिमा
धाग्यात सोनियांबरोबर थत्तेचाचांचाही विनाकारण उल्लेख आहे. म्हणून थत्ते यांनी यावर प्रतिक्रिया द्यावी.