गोळाबेरीज

बाळ सप्रे's picture
बाळ सप्रे in काथ्याकूट
16 Feb 2012 - 2:15 pm
गाभा: 

गोळाबेरीज
पु लं च्या जीवनावर /व्यक्तिरेखांवर आधारीत काहीतरी कलाकॄती (नाट्य/चित्रपट) बनवण्याचा आणखी एक फसलेला प्रयत्न.
पु लं चे शब्द इतके चपखल आहेत की एकाही शब्दाला इकडचे तिकडे करता येण शक्य नसत. आणि पटकथेसाठी असं थोडसं करावं लागलं की ऐकताना खटकतं.
आणि त्याहून कठिण म्हणजे त्याच्यासारखा आवाज काढणे. अलूरकर/ दूरदर्शन यांच्यामुळे पु. लं चा आवाज इतका डोक्यात बसालाय की दुसर् या कुणाच्याही तोंडून तो ऐकवत नाही. अगदी दिलीप प्रभावळकर सारख्या दिग्ग्जालाही अन्तु बर्व्याच्या जवळपासदेखिल फिरकता आलं नाही. प्रभावळकरांनी आवाजात हेल काढून अन्तु बर्व्याला रत्नागिरी ऐवजी सिन्धुदुर्गात नेले.
बाकी व्यक्तिरेखांची अशी सरमिसळ आहे की त्या अजिबात सुसूत्रता नाही.
स्थळे अशी निवडली आहेत की फक्त कीव कराविशी वाटते.
सर्वात जास्त वाट लावली आहे ती "इथेच टाका तम्बू" या आयट्म साँग ने..

घरी येउन पु. लं. चे कथाकथन ऐकुनच नॉर्मल ला येउ शकलो. :-)

थोडक्यात म्हणजे "जमत नाही तर कशाला उगाच उंन्टाच्या शेपटीच्या बुड्ख्याच मुका घ्यायच म्हणतो मी sssss"

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

16 Feb 2012 - 2:31 pm | चिरोटा

जमतय की जमत नाही आहे हे प्रयत्न केल्याशिवाय कळणार कसे?

यकु's picture

16 Feb 2012 - 2:54 pm | यकु

पुलंची हातोटी, विनोद पकडण्‍याची खुबी आणि हसतानाच अंतर्मुख करण्‍याची जादू एवढी विलक्षण आहे की त्यांचे साहित्य सतत न‍वनिर्मिती करण्‍यासाठी प्रेरक ठरते.
काही प्रयोग फसतात, काही चालतात.

हा एक चाललेला प्रयोग ऐका व कसे वाटले ते जरुर कळवा: http://www.ideasnext.com/marathimusic/Kathakathan/Hasya%20Kallol.htm
प्रा. दीपक देशपांडे यांची साईट : http://hasyakallol.com/

चित्रपटाबद्दल अधिक काही लिहिल असत तर एक वेळ समजण्या सारख होत.
एक धागा असताना हा दुसरा प्रतिसाद वजा धाग्याच प्रयोजन कळले नाही.

बाळ सप्रे's picture

16 Feb 2012 - 3:20 pm | बाळ सप्रे

काथ्याकूट सदरात नसल्याने नजरेत आला नाही तो धागा..
बाकि हा धागा त्या धाग्याच्या प्रतिक्रियेत टाकण्याची सोय आहे का??

परिकथेतील राजकुमार's picture

16 Feb 2012 - 3:29 pm | परिकथेतील राजकुमार

म्हणजे हा 'सदरा' आता त्या 'सदर्‍यात' मोडणार तर. ;)