‘धुंवाधार’ प्रेम करणं पुरुषाला अजूनही उत्तमप्रकारे जमत नाहीच. प्रेम असं केलं पाहिजे की ज्याची मनावरही अन् तनावरही खोल जखम व्हायला पाहिजे. ती ठसठसणारी किंवा भळभळत राहणारी असली पाहिजे. तेच खरे प्रेम. नाहीतर आज प्रेम केलं, उद्या तिनं झिडकारलं, परवा ती दुसऱ्याचबरोबर नांदू लागली हे काही पुरुषाच्या दृष्टीने चांगले घडत नाहीये बरं का! आजकाल कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित राहणारी असंख्य डिव्होर्सची प्रकरणे कशाची द्योतके आहेत? प्रेम करण्यात पुरुष खूपच मागासलेला आहे असेच म्हणावे लागेल. जो एका स्त्रीला हवं ते प्रेम भरभरून देऊ शकत नाही तो कुठेतरी कमी पडतो आहे हे निश्चित.
पूर्वी असं नव्हतं का? होतं. परंतु त्याकाळी स्त्रीची उघड बोलण्याची शक्ती जागृत झालेली नव्हती. स्त्री शक्ती वगैरे फंडा त्यावेळी अस्तित्वात नव्हता. मूग गिळून गप्प बसणे हा सर्वमान्य तोडगा होता. स्त्रीची तृप्ती कशात आहे हे तिलाच स्वतःला कळत नव्हते, जरी कळाले तरी ते मिळवायचे कसे यावर मोठी बंधने होती. आज परिस्थिती बदलली आहे. मुक्ततेचे वारे घेऊन ललना अधिकच समंजस तितक्याच टोकदार झालेल्या आहेत. मानव प्राणी म्हणून आपल्यालाही हवे ते मिळविण्याचा अधिकार असल्याचे समुपदेशाकापुढे ठासून सांगण्यात आजची स्त्री तरबेज झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक विवाह टिकवून धरण्यापेक्षा जुने मोडून नवे ते हवे हवे म्हणत विभक्त होण्याचा घाट पुरुषापेक्षा स्त्रीकडूनच अधिक घातला जातो. वैवाहिक जीवनात कुठली उणीव राहिली हे पुरुषाला अजूनही कळलेले नसते. तो बापुडा माझं काय चुकलं? असंच घोकीत राहतो. तिची चीडचीड तो थंडावू शकत नाही हेच त्यामागील कारण होय. कितीही हाल अपेष्टा काबाडकष्ट सोसण्याची तिची तयारी असते जेव्हा तो तिच्यावर मुक्तहस्ते प्रेमाचा वर्षाव करू शकेल, जेव्हा ती त्याच्याकडून मिळणाऱ्या तुडुंब प्रेमाने भारीत होऊन बेहोशीची मजा लुटून निश्चिंत राहत असेल अन् जेव्हा तो तिला पुरुनही उरत असेल!
म्हणूनच आजचा भारतीय पुरुष प्रेम करण्याकामी फारच मागासलेला आहे असे खेद पूर्वक म्हणावे लागते. एका सर्वेक्षणानुसार भारतातील फक्त दहाच टक्के स्त्रियांना सुखाची जाणीव झालेली असते. इतर नव्वद टक्के स्त्रिया अजूनही अनभिज्ञ राहून ढगात जाणाऱ्या गोळ्या झेलीत आयुष्य कंठतात. त्यांना खरे प्रेम कधीच मिळालेले नसते, त्यामुळे त्या कंबरदुखी, पाठदुखी, चिडचिड, त्रागा, राग, द्वेष, अनुत्साह, नैराश्य अशी लक्षणे व्यक्त करीत राहतात. यामागे अतृप्तता हे प्रमुख कारण असले तरी पुरुष त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करून माझ्यात काहीच कमी नाही असे खोटे खोटे भासवीत जातो. खरे तर स्त्रीची सुख\पूर्ती कशात आहे हे काही त्याला कळलेले नसतेच. त्याचा कार्यभाग संपला की तो दूर होणेच पसंद करतो. शिखरावर चढाई करतांना मध्यातूनच माघार घेतल्याने अस्मानसे गिरे सारखी अवस्था अधुऱ्या स्त्रीची होऊन जाते. तिची तगमग दुसरा पुरुष मिळविण्याच्या मार्गाने नकळत होत जाते. आणि यात गैर ते काहीच नाही. तू नही तो और सही असा कायदा स्त्रीसुद्धा पुरुषाला सुनावू लागली आहे. आजकाल प्रत्येक ऑफिसमधून झडणारी अफेअर्सची चर्चासत्रे कशाचे लक्षण आहे? भारतात एकही कार्यालय असे नाही की जिथे अशा घरवाले बाहरवाले प्रकार नसतो. मग आता खरी पुरुषाने स्वतःतील प्रेम करण्याबाबतचे न्यूनत्व धुंडाळण्याची वेळ आलेली आहे.
आंधळा कारभार...
‘भारतीय पुरुष सध्या अंधारात चाचपडत जगतो आहे, त्याला अजूनही खरे कामविश्व कळलेले नाही. याबाबत त्याचे प्रबोधन करण्याची गरज निर्माण झालेली आहे...’ हे काही माझे वैयक्तिक मत नव्हे, गेल्या काही महिन्यात (डिसें.२०११) सकाळ वृत्तपत्राच्या सप्तरंग पुरवणीत ‘लैंगिक शिक्षण देणारं कुटुंब’ या लेख-मालिकेत लेखक हुजूर- राजन खान या ‘गहन’ विषयाबद्दल सडेतोड भाष्य करतांना दिसत होते.
लैंगिकतेबद्दल आपली रूढ झालेली छुपी पद्धत त्यांना बिलकुल आवडली नाही. सेक्स हा विषय जीवनाचे अविभाज्य ‘अंग’ असतांना त्याबाबत कमालीची गुप्तता पाळणे, त्याबद्दल जाहीरपणे लिहिणे-बोलणे, त्याविषयीचे मतप्रदर्शन त्याज्य समजणे फार चुकीचे आहे, असे ते म्हणतात. एका सर्वेक्षणानुसार भारतातील केवळ दहा टक्के स्त्रियांनाच कामतृप्तीचा अनुभव येत असतो. इतरजणी मुग गिळून गप्प राहतात. काहींना तर तृप्ती म्हणजे काय हे आयुष्यभर उमजलेले नसते. केवळ एका यांत्रिक क्रियेचा भाग म्हणून त्या लैंगिक संबंध पार पडतात. ज्यांना हे जाणवते पण पुरुषाकडून मिळत नाही त्या मात्र ‘आहे त्यात समाधान’ मानत संसार कडेला लावतात. खरे तर या अंधारातल्या क्रिया उजेडात आणून निदान नवरा-बायकांनी तरी चर्चेला घ्याव्यात, त्यातील अधिक-उणे व्यक्त करावे, जाणून घ्यावे, त्रुटी दूर करून निश्चिंत व्हावं असाच त्या लेख मालिकेमागील उद्देश होता. कुटुंबात या विषयी उघड चर्चा व्हावी असे त्यांचे प्रांजळ मत होते. हे सद्य परिस्थितीत शक्य नसले तरी काळाची गरज म्हणून येत्या काही दशकांत चर्चेला घेतले गेले तर त्यात वावगे असे काहीच समजू नये.
उदाहरणादाखल काही रुढी-परंपरा उधृक्त कराव्याशा वाटतात.-
काही आदिवासी जमातींमध्ये आपल्याला आवडलेल्या मुलीला मुलगा पळवून नेतो. त्यावेळी ते दोघेच स्वतःचे जीवन स्वतःच कंठत असतात. एकटेच राहतात, शिकार करतात, खातात, पितात, मौजमजा करतात. त्या दोघांचे पटले (अनेक अर्थांनी) तर ती मुलगी त्याच्या सोबत राहते. अन्यथा तिला त्या मुलाला अव्हेरण्याचा अधिकार असतो. म्हणजे तिला पाहिजे ते सुख मिळवून देण्यासाठी तो तिला पळवून नेण्याआधीच तयारीत असतो. जोवर त्याला स्वतःविषयी दृढ विश्वास वाटत नाही तोवर तो पोरगी पळवून नेण्याची भाषाच करू शकणार नसतो. अन् त्याच्यात योग्य ‘धमक’ असेल तरच ती त्याचसोबत राहण्याचा हट्ट धरते. तो जर तिला ‘सुखा’त ठेवू शकला नाही तर त्याला दुसरी मुलगी शोधावी लागते. इतके होऊनही त्या जमातीत अशा अनेक ठिकाणी फिरून आलेल्या मुलींना व्हर्जिनिटीचा प्रश्नांकित शिक्का मारुन टाळले जात नाही हे विशेष. आजच्या हायटेक पिढीत हा मुद्दा जास्त चर्चिला जात असला तरी पुरुषाला ‘त्या’तलं काय येतं, ‘त्या’वेळी तो कसं वागतो? असे प्रश्न विचारात घेतले जातच नाहीत. खरे तर त्याच्याच वयाच्या एखाद्या मध्यस्थाला पुढे घालून त्याचं लैंगिक वर्तन जाणून घेणे अतिमहत्त्वाचे असते, जे की वधूपक्षाकडून सोईस्कररीत्या टाळले जाते.
काही जमातींतील मोठी माणसे आपल्या वयात आलेल्या मुलांना मुद्दामहून प्राण्यांचा समागम प्रत्यक्ष जागेवर जाऊन समजावून सांगतात. त्यामुळे त्यांना त्या क्रीयेविषयी अजिबात लाज वाटत नाही वा त्या गोष्टीचे दडपण येत नाही. शिवाय अशा क्रियेचा मोठीच माणसे परिचय करून देत असल्याने बाऊ करण्याचा प्रश्नच उद्भवत नसतो. प्रत्यक्ष क्रीडेच्यावेळी त्यांची लैंगिक भूक यथोचित शमत असेल यात शंका नसावी. आपण सुशिक्षित मात्र अशा दृश्यांपासून मुलांना चार हात दूर ठेवतो, ते वाईट कसे आहे याचे चरित्र गात राहतो आणि केवळ तेच म्हणजे जीवन नाही हेही बिंबवत जातो. खरे तर त्याच्याशिवाय जगणे पूर्ण होत नाही. परंतु आपल्या अशा दडपून टाकण्याच्या वृत्तीमुळे होतं काय की कुतूहलापोटी नको त्या मार्गाने स्त्री-पुरुष संबंधाची चित्रे वा ब्ल्यू फिल्म्स तरुणांकडून पाहिल्या जातात. त्यात दाखविलेला उत्तानपणा, भडकपणा अन् तासनतास चालणारा ‘डोंबारकी’चा प्रकार खरा वाटू लागतो. प्रत्यक्षात असे काहीच नसते. स्त्रीला तृप्ती मिळवून देणे ही वेगळीच ‘कामकला’ आहे. ती ‘अनुभवानेच’ शिकून घेण्याचा शाप आजच्या भारतीयाला मिळालेला आहे. स्त्रीच्या कामतृप्तीबद्दल योग्य ते मार्गदर्शन कोणीच करीत नाही. जे काही सांगितले जाते ते अतिशयोक्त किंवा अशास्त्रीय असे असते. मुळात हे लैंगिक संवेदनेचे ज्ञान पालकांनीच देणे क्रमप्राप्त असतांना ते कानावर हात ठेवतात, बाजूला होतात. ‘तू अन् तुझे लैंगिक जीवन. तुझे तूच निस्तर.’ असे म्हणत काखा वर करून मोकळे होतात. अशावेळी बाहेरच्या जगाकडून अयोग्य ज्ञान पदरात पाडून घेण्याकडे मुलांचा कल वाढतो. आणि ट्रिपलएक्स मध्ये दाखवतात तसेच प्रात्यक्षिक करायला गेल्यावर नववधू भडकणार नाही तर काय हो? कदाचित किंचाळत पळेलही किंवा नवऱ्याला काहीच ‘जमत’ नाही म्हणून माहेरी गेलेली थेट कोर्टातच भेटेल!
आणखी एक गोष्ट राजन खान यांनी नमूद केलीय की भारतीयांचे लग्न फारच उशिरा होते. पैसा ही बिनीची वस्तू बनल्याने अथवा करियर हा शब्द प्राधान्याने अमलात आणण्याच्या धडपडीपायी आजचा तरूण आपल्या तारुण्यसुलभ भावना अक्षरशः दडपून टाकीत चालला आहे. ज्यावेळी त्याचं करियर पार पडतं त्यावेळी त्याने आयुष्याची तीस वर्षे मोजलेली असतात अन् त्यामुळे ‘वयात आल्या’नंतरची पंधरा वर्षे सक्तीचे ब्रह्मचर्य (फार फार तर ‘आपला हात...’ असे व्रत) पाळलेले असते. रोज उफाळणार्यात लाटा थोपविलेल्या असतात, लैंगिक संवेदना गोठविण्याचा प्रयत्न केलेला असतो कारण असं काही अनैतिक करणं म्हणजे व्यभिचार होय, अशी व्याख्या त्याच्या डोक्यात फिट्ट रुतलेली असते. लग्नापूर्वी संबंध येऊ देऊच नये हा संस्कार वादाचा मुद्दा ठरावा, इतका पोकळ बनत चालला आहे. भारतीयाला कामक्षयाची व्याधी जडलीय हे कुणी मान्यच करायला कबूल नाहीत. आपला कार्यभाग उरकला की संपली क्रीडा असा पुरुषी वर्चस्वाचा मानदंड स्वीकारला गेला आहे. स्त्रीचे स्खलन झाले आहे की नाही, तिला या यांत्रिक क्रियेतून लैंगिक समाधान मिळाले आहे की नाही किंवा ती अशा अपूर्ण संबंधामुळे त्रासली आहे काय? याचे ना कधी चिंतन होते ना कधी विचारपूस केली जाते. वाढत्या वयामुळे येणारे शैथिल्य कोणीच रोखू शकत नसते. त्यावर मात कशी करायची याचे शास्त्र जाणून घेण्याऐवजी तरूण मुले व्हायेग्रा सारख्या धोकादायक गोळ्यांना बळी पडतात. हार्डकोरच्या लालसेपोटी स्त्रीवर प्रेमाचा वर्षाव करणे, तिच्या शृंगाराला दाद देणे, तिला समजून घेत यथास्थित परमोच्च बिंदू गाठून देणे हे साफ विसरत चालला आहे.
योग्य वयात लग्न झाले की तारुण्याचा उन्माद यशस्वीरित्या शमवता येतो. उशीर होत गेला की संवेदना बधीर होत जातात, उत्साह बोथट होत जातो. वयात आल्यावर जे हवं असतं, शरीराकडून ज्याची वारंवार विचारणा होत असते तेच तरुणांना मिळत नाही. मग ते त्यांना पटेल त्या वाटेने जात राहतात, चुकीच्या पद्धतीने भावना मोकळ्या करीत राहतात किंवा गैरमार्गाने भूक भागवित जातात. शास्त्रोक्त ज्ञानाची गरज असतांना काहीतरी ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेऊन वागावे लागते, त्या अवैज्ञानिक कृती पडताळून पहाव्याशा वाटतात. मग जे चुकीचे आहे तेच बरोबर वाटून त्या पद्धतीचा अवलंब करीत वैवाहिक जीवन सुरु होते अन् काहीच अनुभव नसलेल्या ड्रायव्हरला अवघड घाट पार करण्यास सांगावे तशी गत त्या नवशिक्याची होऊन जाते. यावरून पाहिल्या रात्रीचा ‘गलीतगात्र’ अनुभव अनेकांना अजूनही जसाच्या तसा आठवू लागेल. शारीर ज्ञानाची गरज असतांना कोणतंही नवं जोडपं या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतांना आढळत नाहीत वा एखाद्या तज्ञाचा सल्ला घेत नाहीत. ‘ज्यांचं बेडवर जमतं त्यांचं उभ्या आयुष्यात चांगलं जमतं’ ही उक्ती तर प्रत्येकाला माहितीच असली पाहिजे.
पण आपल्या समाजाची शोकांतिका हीच की या अत्यावश्यक लैंगिकतेला अश्लीलतेच्या झापाखाली डालून ठेवले जात असते. कितीतरी लैंगिक समस्यांनी ग्रस्त असलेले पुरुष खरोखर ‘तसे’ नसतातच. फक्त त्यांचे वर्तन कुठेतरी चुकत आलेले असते. तसे पाहता आपण भारतीय लोक या विषयांत बहुत पारंगत होतो असे प्राचीन ग्रंथांवरून लक्षात येईल. खजुराहोची लेणी असो व वात्सायनातले संस्कृत श्लोक यावरून कोणेएके काळी आपला समाज कामक्रीडेत खूपच प्रगत होता असे म्हणता येईल. त्याकाळी आपले राजे महाराजेच नव्हे तर सामान्य पुरुषदेखील दोन-दोन तीन-तीन बायका करून ‘मजेत’ जगत होता. बहुपत्नीत्व त्यावेळी मान्य होतं. आता मात्र या सर्वावर बंदी का आलीये न कळे. की खरेच पुरुषाला अनेक व्यवधाने असल्याने या प्रमुख कारभारात पारंगत होण्याची त्याला आवश्यकता वाटत नाहीये. की हायब्रीड खाण्याने वा निकृष्ट फास्टफूड सेवन करण्याने त्याच्यातील ‘क्षमता’ कमी होत चाललीय? जरा विचार करता असे लक्षात येईल की त्या काळी एकटा पुरुष अनेक पत्नींना यशस्वीरीत्या सांभाळू शकत होता पण आजकाल त्याला एकाच बायकोला ‘सुखा’त ठेवता येत नाही, लग्नाच्या काही महिन्यांतच ती घटस्फोटाची भाषा करू लागते, यातून कोणता निष्कर्ष निघतो?
वृत्तपत्रे व मासिकांच्या (विशेषतः महिलांसाठीची मासिके) पानोपानी कामोत्तेजक गोळ्यांच्या, तेलाच्या अन् विविध लैंगिक आजारांवर मात करण्यासाठीच्या वाढलेल्या जाहिराती कशामुळे अवतरल्यात? काहीतरी समस्या निर्माण झालीय म्हणूनच ना? याला बळी पडणारे पुरुष खरोखरच यशस्वी ठरतात का? कारण अशा भोंदू वैद्यांकडे चोरीछिपेच जावे लागते. पाच-दहा हज्जाराला खड्डा बसतो. गुण कसा येईल? कारण तुम्हांला मूळचे शास्त्रीय ज्ञानच अवगत नाहीये, तुम्हांला कोणताही आजार नसून तुमची फक्त ‘भीड चेपली’ आहे. तुम्ही उगाचच या क्रियेला अश्लीलतेचे लेबल लावून अंधाऱ्या पोतडीत गुंडाळल्याने खऱ्या ज्ञानापासून तुम्ही वंचित राहिला आहात. मुख्य म्हणजे जिथे स्त्रीलाच आपले ‘शारीर’ नीटसे उमजलेले नसते, स्वतःचा ‘जी स्पॉट’ माहितीच नसतो तिथे पुरुषाला ‘आंधळा कारभार’ करीत राहणे क्रमप्राप्त ठरले आहे. आणि हेच आंधळं प्रेम करणं त्याच्या ‘मागासलेपणाचं’ अभिलक्षण म्हटलं पाहिजे. यावर मात करून जे सुशिक्षित झाले ते सर्वार्थाने सुखी झाले...
प्रेमात पुरुष मागासलेला!
गाभा:
प्रतिक्रिया
13 Feb 2012 - 5:19 pm | कपिलमुनी
चालु द्या
13 Feb 2012 - 5:40 pm | पक पक पक
वा ! वा !! काय लिहील आहे वा ! मस्त , बाकी आपला या 'विषया' मधील व्यासंग खुपच दांडगा आहे....... ;)
छान छान् ... चालु द्या.
13 Feb 2012 - 5:51 pm | कॉमन मॅन
छान, चवदार लेख. वाचून मजा आली! :)
13 Feb 2012 - 5:52 pm | ५० फक्त
धन्यवाद, एका उपेक्षित विषयाला ब-याच संयतपणे हात घातलाय यावेळी.
मध्यंतरी नातातल्या काही अन ओळखीच्या काही मेडिकल डॉक्टरांबरोबर या विषयावर चर्चा केल्या आहेत. त्यावरुन एक सिरीज लिहायचं मनात होतंच. काही लिहुन झालंय आता पुर्ण करुन टाकतो.
13 Feb 2012 - 6:40 pm | गणपा
असेच म्हणतो.
मुळात* 'विषय' तुमच्या आवडीचाच आहे.
पण जागोजागी जे कोट्स पेरलेत ते नकळण्या ईतका मिपाचा वाचक वर्ग नक्कीच बालीश नाही.
पण त्यामुळे होतय काय की तुम्हाला 'त्यातच' जास्त 'रस' आहे अस अधोरेखीत होतय.
* लिखाणाच्या दृष्टीने.
13 Feb 2012 - 7:01 pm | VINODBANKHELE
आम्ही वाट पाहुन राहिलोय महाराज........
येऊं द्या..................
13 Feb 2012 - 6:18 pm | चिरोटा
छान. आता लोक sex for Dummies/sex in 21 days उघडपणे वाचू लागतील तो 'सुदिन'
सर्वे कोणी,कधी,कोठे केला?
13 Feb 2012 - 6:45 pm | गवि
हे असे सर्व्हे नेहमीच जाम रोचक असतात..
-अमुक टक्के पुरुषांना उन्नत *** आवडतात.
-तमुक टक्के स्त्रियांना केशविहीन छातीचे पुरुष आवडतात.
- अमुक टक्के पुरुषांनी लग्नाआधी किमान दोन स्त्रियांशी..
- अमुक टक्के विवाहित स्त्रिया लग्नाखेरीज किमान दोन पुरुषांशी..
इ इ..
असे अनेक सर्वे वाचून "फुकट हो आपले हे सपक आयुष्य" असा फील येतो. असो.
एकदा "दाढीचे खुंट वाढलेले पुरुष स्त्रियांना जास्त आकर्षित करतात असा" सर्व्हेनिकाल वाचून फक्त दोन दिवस दाढी केली नाही तर मिशाळ झुरळाकडे पहावं तशा नजरा स्वस्त्रीकडून वाट्यास आल्या. हपीसातील परस्त्रियांबाबत तर काय विचारावे.. जेवायलाही कोणी पंगतीला घेतले नाही.. आणि मग मुकाट दाढी केली.
बाकी..
"२१ अपेक्षित प्रश्नसंच"ची आठवण झाली.. :)
14 Feb 2012 - 2:41 pm | सविता
विषय, लेखक आणि लेखनाची पातळी ... जशी अपेक्षा होती तशीच त्यामुळे १० व्या ओळीनंतर वाचत बसले नाही..डायरेक्ट प्रतिसादांवर आले!!!
तुमच्या सारख्या लोकांच्या अशा खुसखुशीत कॉमेंट्स वाचून धागा उघडण्याचे कष्ट अगदीच वाया गेले नाहीत असे म्हणावे लागेल! :)
बाकी मला हल्ली डॉ. दिवटेंचे लेख वाचले की .... कुठेतरी रोडच्या कडेला व्हॅन असतात त्या आठवतात... हिमालय की जडीबुटी.. मर्दानी कमजोरी का अक्सीर इलाज.... वगैरे वगैरे.........
खरंच कुठली डिग्री घेतली आहे की कुठे अशी वैदुगिरी करता म्हणून नावापुढे "डॉ" पदवी लावतात कोण जाणे! ;)
13 Feb 2012 - 6:33 pm | विनायक प्रभू
१०% का?
बर बर.
13 Feb 2012 - 6:59 pm | VINODBANKHELE
बहुपत्नीत्व त्यावेळी मान्य होतं. आता मात्र या सर्वावर बंदी का आलीये न कळे.
हा मुद्दा घरी चर्चेला घेउन पाहिलेला दिसत नहिये अजुन,,,,,,,,
13 Feb 2012 - 7:07 pm | पक पक पक
आणि हेच आंधळं प्रेम करणं त्याच्या ‘मागासलेपणाचं’ अभिलक्षण म्हटलं पाहिजे.
आता डोळसपणे प्रेम करणे म्हण्जे कसे..? ते तुम्हिच सांगा...
यावर मात करून जे सुशिक्षित झाले ते सर्वार्थाने सुखी झाले...
लैंगिक शिक्शणाचे क्लासेस पण सुरु करा...
14 Feb 2012 - 1:48 pm | हंस
अहो, युरोपात लैंगिक शिक्षण देणारे महाविद्यालय सुरु झाल्याची बातमी वाचली होती दोन-एक महिन्यांपूर्वी.
14 Feb 2012 - 2:17 pm | गणपा
माझ्या माहिती प्रमाणे बहुतेक ऑस्ट्रेलियात.
आणि वाचीव* माहिती नुसार प्रॅल्टीकल आणि गृहपाठावरही भर देणार होते म्हणे.
* ऐकीवच्या धर्तीवर
14 Feb 2012 - 2:23 pm | अन्या दातार
ऑस्ट्रेलिया नव्हे गणपाशेठ, ऑस्ट्रिया. अधिक माहिती इथे वाचा
अवांतर: डॉक्टर दिवटेंना लई स्कोप असावा असे वाटतेय एकंदर ;)
13 Feb 2012 - 7:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉक्टर साहेब, आवरा आता....!
डॉ साहेब, लेखाचं शीर्षक 'पुरुष प्रेमात मागे का' असे लिहिण्याऐवजी 'पुरुष समाधान करण्यात मागे का' असं असायला पाहिजे होतं असं लेखन वाचून वाटलं. आपलं लेखन वाचून वर प्रतिसादात गवि म्हणतात तसे जाहिराती वाचून जसे 'आपलं सालं आयुष्य सपक चाल्लय' असा फील यावा अशा आशयाचे आपले लेखन वाटण्याची शक्यता आहे. डॉ. साहेब, हे खरं आहे की विवाहित स्त्री-पुरुषांच्या अज्ञानामुळे घडणार्या काही गोष्टी नक्कीच असतील. परंतु हर एक जड की दवा मुझे मालूम आहे, अशा थाटाचे लेखन मला आपण डॉक्टर असूनही विचित्र मनोवृत्तीचे वाटते.
तेव्हा डॉक्टर साहेब, आपल्याकडून असल्या फाल्तू आशयाकडे जाणार्या लेखनाची अपेक्षा एक वाचक म्हणून मला तरी नाही. आपल्या लेखनात सुधार होण्याची वाट पाहणे व्यर्थ आहे, असेही आता वाटायला लागले आहे.
-दिलीप बिरुटे
(स्पष्ट & संतप्त )
13 Feb 2012 - 7:36 pm | यकु
विठ्ठल प्रभुंनी त्यांच्या पुस्तकात कामुकतेचे कायसेसे प्रकार सांगितले आहेत.
त्यातल्या एका प्रकारचे लेखन वाटले.
एक्झॅक्ट प्रकार कोणता ते आता आठवत नाही.
13 Feb 2012 - 7:57 pm | पक पक पक
पण डॉ.दिवटे आता आपण कोठे आहात..?
13 Feb 2012 - 8:14 pm | अन्नू
देवा...
13 Feb 2012 - 7:36 pm | दादा कोंडके
असच म्हणतो.
आ व रा...
13 Feb 2012 - 9:01 pm | अन्या दातार
तरी बराच* संयत लिहिलाय त्याबद्दल अभिनंदन. प्रतिक्रियेची अन लेखात केलेल्या दाव्यांबद्दल सायटेशन्सची अपेक्षा जो ठेवणार नाही, तोच लेख वाचून सुखी व 'समाधानी' राहिल ;)
*आधीच्या काही लेखांच्या तुलनेत. यात उडलेले लेख पण सामील
13 Feb 2012 - 9:07 pm | पक पक पक
तरी बराच* संयत लिहिलाय त्याबद्दल अभिनंदन
ते सुशिक्शीत आहेत .तुझ्या कॉऊतुकाला सुद्धा प्रतिसाद देणार नाहीत आता ,ते बहुतेक सुख अन समाधान शोधत असावेत.. ;)
14 Feb 2012 - 5:01 pm | डॉ.श्रीराम दिवटे
असं उघड उघड लिखाण येथे करता येणं अशक्य आहे. पुस्तकांची काही नावे सुचवितो, प्रत्येक पुरुषाने एकदातरी वाचावित अशी शास्त्रीय माहिती त्यात मिळेल.
१) कामसत्य- डॉ.रमेश पोतदार (एम्.डी.)/डॉ.सौ.उमा पोतदार(एम्.बी.बी.एस्)
२) प्रणय कौशल्य कसे मिळवावे?- डॉ.विवेक पाटील
३) निरामय कामजीवन- डॉ.विठ्ठल प्रभू.(एम्.बी.बी.एस्.,एफ्.सी.जी.पी.,एफ्.आय्.सी.)
४) मैक केरिज् ह्युमन सेक्श्युयालिटी
५)वर्कशॉप ऑन ह्युमन सेक्श्युयालिटी इन फॅमिली लाईफ- फॅमिली प्लॅनिंग असोशिएशन ऑफ इंडिया- बॉम्बे.
इ.इ.