गाभा:
एका दूरदर्शन वृत्तवाहिनीने कर्नाटक विधानसभेतील कामकाज सुरू असताना भाजपाच्या ३ मंत्र्यांना भ्रमणध्वनीवर अश्लील चित्रफिती पाहताना पकडले आहे व त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबतचे अधिक वृत्त येथे वाचता येईल.
सदर मंत्र्यांनी संसदीय लोकशाहीतील विधानसभेसारख्या पवित्र ठिकाणी असे कृत्य करून भारतीय राज्यघटनेचा, लोकशाहीचा व पर्यायाने सार्या देशाचाच अपमान केला आहे. आणि या कृत्याबद्दल त्यांना मंत्रीपदाचा राजिनामा, पक्षातून बडतर्फी इतक्याच माफक शिक्षा न देता त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली गेली पाहिजे असे आम्हाला वाटते.
हेच ते भाजपाचे तीन मंत्री -
अर्थात, 'चरित्र की राजनिती' करणार्या भाजपा मंत्र्यांकडून अन्य अपेक्षा तरी काय करावी असा प्रश्न पडतो..
-- कॉमॅ.
प्रतिक्रिया
8 Feb 2012 - 5:11 pm | यकु
विधान सौधात चाललेल्या चर्चा ऐकत राहून आमदारांना फार बोर होते म्हणत
आता या लोकांनी तिथे बाया नाचवू नयेत म्हणजे मिळवली. ;-)
8 Feb 2012 - 5:17 pm | कॉमन मॅन
आपली भिती साधार वाटते.
8 Feb 2012 - 5:19 pm | इरसाल
पूर्वी सौन्धात राण्या महाराण्या बसून राजा महाराजांची वाट पाहत किंबहुना त्या सौन्धातूनच उपवर राजकन्या राजपुत्राची निवड करत.
इथे हे राजे सौन्धात बसून परदेशीय* राजकन्या पाहत होते.
8 Feb 2012 - 5:20 pm | अप्रतिम
मंत्री असले म्हणून काय झाले,ती पण माणसेच आहेत.
8 Feb 2012 - 7:58 pm | अन्नू
माणसच वो ती उगीच नाव ठेवायलेत हित त्यांना!
बघा तर कशी शांत झोपी गेलेत ती!
अशा परिस्थितीमुळे आमचेच दिवस जायची सॉरी सॉरी भरायची वेळ आली आहे.
8 Feb 2012 - 5:40 pm | गवि
मिररमधे आलेल्या वृत्तांतानुसार या मंत्र्यांनी असं म्हटलंय की ते "स्त्रियांचे शोषण" या विषयावरची (एक्स्प्लॉयटेशन ऑफ विमेन) डॉक्युमेंटरी पहात होते.
पाटील या सदगृहस्थांनी काही काळापूर्वी स्त्रियांनी पूर्ण कपडे घातल्यास बलात्कार होणार नाहीत असं म्हटलं होतं. त्यावरुनही मिररने गदारोळ केला आहे. यांचं कृत्य कितीही लाजिरवाणं असलं (पकडलं जाणं लाजिरवाणं खरं तर) तरी त्यांनी केलेल्या विधानाशी विपरीत असं हे वागणं आहे असं वाटत नाही.
ते नक्कीच पूर्ण कपड्यातल्या स्त्रिया पहात नसावेत.. :)
8 Feb 2012 - 5:43 pm | यकु
>>>ते "स्त्रियांचे शोषण" या विषयावरची (एक्स्प्लॉयटेशन ऑफ विमेन) डॉक्युमेंटरी पहात होते.
=)) =)) =))
=)) =)) =))
साफ झालो हा डिफेन्स वाचून.
या 'सफाई' ला डिप्लोमसी ऑफ दि इयर म्हणायला हरकत नाही.
अरे दातारांच्या अन्या, हा मिरर कुणाचा रे? कुठेय तुझी ती लिंक?
8 Feb 2012 - 5:52 pm | गवि
मी छापील मुंबई मिरर पेपरच्या पहिल्या पानावर वाचलं.
ऑनलाईन
http://www.mumbaimirror.com/
तिथे आता सर्व संबंधित मंत्र्यांना हाकलले अशी बातमी दिसतेय.
मी दातारांचा अन्या नव्हे.. आम्ही डु आयडी नव्हे.. ते खरगपूरला असतात..
8 Feb 2012 - 5:57 pm | यकु
आँ?
गवि तुमच्या पेपर वाचण्याच्या खरेखोटेपणाबद्दल काही नाही म्हटले हो..
अन्या दातारला हाळी यासाठी दिली की कोणचा पेपर कोणाचा, कोण सीईओ, मंत्रीसंत्री आणि उच्चाधिकारी कोणाचे नातेवाईक याची जंत्रीच असलेला दुवा त्याने दिला होता मागे..
आन् हे काय गवि, मी तुमच्यावर डुआयचा संशय घेण्याचं पाप कशाला करु? ;-)
8 Feb 2012 - 5:57 pm | गवि
मी म्हटलेली बातमी इथे दिसतेय :
http://ahmedabadmirror.com/printarticle.aspx?page=comments&action=transl...
तो उतारा असा:
With outrage sweeping political circles, Savadi tried to downplay the incident saying they were watching a documentary on the exploitation of girls. Pooh-poohing it, the Congress demanded that the two ministers be sacked immediately by the chief minister. Congress leader Ramesh Kumar said, The two have disgraced the political fraternity. If they had any scruples, they would have committed suicide after being caught red-handed watching porn. We do not know what is happening to Karnataka.
8 Feb 2012 - 6:04 pm | परिकथेतील राजकुमार
8 Feb 2012 - 6:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'महिला व बालकल्याण मंत्र्याला' च जर असा नाद असेल तर काय बोलायचे ?
स्त्रियांच्या शोषणाचा एक अधिकृत परवाना़च अशा वेळी मिळत असेल . असो, काय बोलायचे !
-दिलीप बिरुटे
8 Feb 2012 - 6:38 pm | धमाल मुलगा
मिपावरच कुठंशीक वाचलेल्या प्रतिक्रियेत म्हणलं होतं की लोकप्रतिनिधी हे आपणच निवडून दिलेले असतात. त्यामुळे ते जनसामान्यांचं प्रातिनिधीक रुप असतं.
आता काय म्हणायचं?
अवांतरः काम काम तरी किती कर्णार मनुक्ष? जरा जिवाला विरंगुळा म्हनुन बसले असतील बघत. पायजे तं साडेधा टक्के करमणुक कर लावा की त्यांना. ;)
8 Feb 2012 - 7:16 pm | श्रावण मोडक
असहमत. तो विरंगुळा नव्हता. ते 'कामा'चीच तयारी करत होते. ;)
8 Feb 2012 - 7:27 pm | धमाल मुलगा
नक्की कोणत्या माहितीआधारे आहे?
की केवळ घडलेली घटना संध्याकाळी घडली ह्यावर असा निष्कर्ष काढण्यात आला आहे? ;)
8 Feb 2012 - 7:53 pm | श्रावण मोडक
म्हणजे? फक्त संध्याकाळ? काळाबरोबरच हाती असणारे रिसोर्सेसही महत्त्वाचे, हे मी तुम्हाला सांगावं?
8 Feb 2012 - 9:14 pm | धमाल मुलगा
मिडियाचे भिरभिरते ससाणे बारीक नजर ठेऊन असतात ह्या गृहितकावर संध्याकाळचा अंधार सुरक्षित समजला जातो असं खात्रीलायक समजते.
28 Feb 2012 - 10:59 am | कॉमन मॅन
तो तर मुद्दा आहेच. मूळ दोष जरी त्या संबंधित ३ मंत्र्यांचा असला तरी त्यांना निवडून देणार्यांनादेखील आता पस्तावा वाटत असेल. सदर मतदार पुढल्या वेळेस तरी या तिघांना सत्तेपासून दूर ठेवतील अशी आशा करुया..
8 Feb 2012 - 6:39 pm | धमाल मुलगा
द्विरुक्तीमुळे प्रकाटाआ.
8 Feb 2012 - 6:57 pm | चिरोटा
हल्ली कर्नाटक सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी काही उपाय केले होते. समुद्र किनार्यावर पार्ट्या आयोजित करणे हा एक त्याचा भाग होता. ह्या पार्ट्यात रेव्ह पार्ट्यांसारखेच प्रकार चालु होते असे नंतर निदर्शनास आले. त्यावरून विधानसौधात काल सकाळी बोंबाबोंब झाली. सावडी ह्यांनी जे स्पष्टीकरण दिले आहे त्यामागे हे कारण आहे. त्यांच्यामते ही क्लीप त्यांना एका मंत्र्याने दिली. त्या क्लीपमध्ये काही तरूणींवर बलात्कार करतानाचे दृष्य आहे. नंतर भारतिय वंशाच्या काही मुली कपडे काढून नाचतानाचेही एक द्रूष्य आहे. हे द्रूष्य आंध्रप्रदेशातले आहे असे टी.व्ही.वाल्यांचे मत आहे.
सावडी/पाटील ह्यांच्या स्पष्टीकरणानुसार त्यांनी ही क्लीप बघितली हे मान्य केले. पण सरकारने पार्ट्यांना आळा घातला नाही तर क्लीपमध्ये दाखवले आहे तसे घडू शकते.म्हणून त्यांच्यामते क्लीप बघितली ती ह्या द्रूष्टीकोनातून!! आंबटशौकीन म्हणून नव्हे.
क्लीप सकाळी बघितली असती तर ह्या बचावाला अर्थ होता. पण क्लीप बघत होते तेव्हा(म्हणजे संध्याकाळी) वेगळाच विषय चर्चेला होता. त्यामुळे तिघांना डच्चु मिळणार हे उघड होते.
क्लीप फक्त स्वतः बघणे गुन्हा नाही.माझ्या माहितीनुसार सार्वजनिक ठिकाणी बघणे(आणि इतरांना बघायला प्रव्रूत्त करणे)कायद्याने गुन्हा आहे. आता विधानसभा सार्वजनिक की खाजगी?( तज्ञांनी सांगावे). त्यामुळे कारवाई करता येईल की नाही ह्याविषयी साशंक आहे.सरकारी ईमारतीत अशा क्लीप्स बघणे अनैतिक निश्चितच आहे असे माझे मत आहे.
8 Feb 2012 - 7:00 pm | चेतनकुलकर्णी_85
तुमचा आक्षेप नक्की कशावर आहे...त्यांनी सभागृहात चित्रफित पाहिल्यावर कि फक्त चित्रफित पाहिल्यावर??? :P
(कि तुम्हाला ऑफिसात पाहता येत नाही म्हणून?? :P)
8 Feb 2012 - 7:18 pm | विजुभाऊ
ते भाजप आहे. त्यामुळे त्यांचे सर्व मंत्री हे जे काही करतात ते सत्कृत्यच असते
8 Feb 2012 - 7:34 pm | हंस
ही काही पहिली घटना नव्हे, ह्या आधी इंडोनेशियामध्ये "अॅटी-पॉर्नोग्राफी विधेयक" सादर करणारा सदस्यच अश्लिल चित्रफीत बघताना पकडला गेला होता. आता बोला!
http://www.bbc.co.uk/news/world-asia-pacific-13032128
8 Feb 2012 - 7:38 pm | वपाडाव
कॉ.मॅ. यांना अजुन एक शतकी धागा बहाल करावयास विषय नको का उगवायला?
म्हणुन ते तिघे फिल्म्स पाहत बसले...
8 Feb 2012 - 7:52 pm | दादा कोंडके
चर्चा लवकरच टीम आण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या चर्चेच्या वळवार जाणार असं दिसतय. तुम्ही कधीतरी छोटा-मोठा भ्रष्टाचार केला असाल/भ्रष्टाचाराला हातभार लावला असाल तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही!
त्यामुळे या धाग्यावर आता गप्प बसलेलंच बर! ;)
10 Feb 2012 - 11:57 am | चिगो
>> तुम्ही कधीतरी छोटा-मोठा भ्रष्टाचार केला असाल/भ्रष्टाचाराला हातभार लावला असाल तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही!
आयच्यान.. असं आहे व्हय? मग आपली बी चुप.. पण क्लिप पाहणार्यांची क्लिप ज्यांनी काढली, त्यांची "जागरुकता" आवडली आपल्याला..
9 Feb 2012 - 12:23 am | हुप्प्या
हे कृत्य मूर्ख, असंस्कृतपणाचे आहे पण ह्यात किती लोकांचे नुकसान झाले आहे?
इथे सरकारी धनाचा अपहार झाला आहे का? देशाच्या वा लोकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे का?
करदात्यांचे नुकसान झाले का? लोकांच्या रोजच्या व्यवहारात वाहतुकीत अडथळा वगैरे तरी? जाती/धर्मात तेढ?
काही नाही.
वरील जातकुळीत मोडणारी अनेक कृत्ये केलेले मंत्री, खासदार वगैरे नि:संकोच आपल्या खुर्च्या उबवत आहेत.
उदा. चिदंबरम, मनमोहन सिंग, कलमाडी.
अश्लील चित्रफिती बघणार्यांविरुद्ध इतका असंतोष होतो आहे तर भ्रष्टाचार करणार्यांविरुद्ध कितीतरी जास्त असला पाहिजे. पण तसे होत नाही हे आपले दुर्दैव.
9 Feb 2012 - 5:09 am | वपाडाव
पॉइंट आहे....
9 Feb 2012 - 10:09 am | पियुशा
अश्लील चित्रफिती बघणार्यांविरुद्ध इतका असंतोष होतो आहे तर भ्रष्टाचार करणार्यांविरुद्ध कितीतरी जास्त असला पाहिजे. पण तसे होत नाही हे आपले दुर्दैव.
+१ हुप्प्या
मनातल बोललात अगदी :)
अहो जर काड्या सारल्या नाही तर शेकणार कुठॅ ?
हे काही मिडीयावाले / वुत्तपत्रवाले ना आजकाल नको त्या विषयाला जास्ती तुल देतात अन आपली टी.आर.पी वाढ्वून घेतात , चान्गले विषय नाहीत का याच्याकडे प्रसिद्ध करायला ?
9 Feb 2012 - 12:42 pm | यकु
तुल देतात म्हणजे काय?
9 Feb 2012 - 12:46 pm | प्यारे१
खूप कॉम्बिनेशन्स करुन देखील योग्य शब्द जुळवू शकलो नाही....
झुलू जमातीच्या वापरातला एखादा शब्द आहे का?
9 Feb 2012 - 2:12 pm | वपाडाव
तूलु ही भाषा दक्षिण कर्नाटक प्रदेशात बोलली जाणारी एक भाषा आहे...
कदाचित त्या भाषेतुन एखादा वाक्प्रचार उचलण्यात आला असावा काय?
9 Feb 2012 - 1:05 pm | पियुशा
@ यशवंत एकनाथ
तुल देना हा एक हीन्दी शब्द आहे
तुल देणे म्हणजे
1) बढ़ावा
२) बढ़ा देना
३) बढ़ा-चढ़ाकर बताना
४)विज्ञापन करना
मराठीत याला आपण " अव्वाच्या सव्वा महत्व देणे म्हणतो " ;)
9 Feb 2012 - 1:09 pm | चिंतामणी
9 Feb 2012 - 1:17 pm | यकु
'तो मला घुरत होता' असे वाक्य काल कानावर आदळल्याने वारता वारता राहिलो होतो.
'तुल देतात' ने उरलासुरला प्राण निघुन गेला आहे.
धन्यवाद.
9 Feb 2012 - 2:35 pm | प्यारे१
तुझ्याबरोबर माझी पण चिता मांडू या रे....!
हे 'नगरी' हिन्दी आहे का? नागरी हिन्दी तर नाही वाटत. ;)
9 Feb 2012 - 2:44 pm | यकु
अगदी.. अगदी.
9 Feb 2012 - 3:01 pm | पियुशा
@ य.कु. ,प्यारे ,व प्या
तुम्हाला तिघाना हिन्दी सब्जे़क्ट नव्हता का हो शाळेमध्ये इतक रडायला काय झाल ? ;)
9 Feb 2012 - 3:04 pm | प्यारे१
आम्ही शाळेत जात नव्हतो .... पुढं?
9 Feb 2012 - 10:07 pm | ५० फक्त
मला माहितिय, तुम्ही शाळेत जात नव्हता........ पुढं नॉन फिस्को कान व्हें ट मध्ये जात होता, बरोबर किनै. ?
9 Feb 2012 - 10:11 pm | ५० फक्त
@ पियुषा, हो ना ओ,
त्या थ्री नांना त्यांच्या स्कुल मध्ये धिस रिव्हर विषयच नव्हता, तुमचं स्कुल कसलं भारी होतं किनै ओ ?
10 Feb 2012 - 11:44 am | सूड
त्यांच्या स्कूलला तुल नका देउ ५०राव. आमच्या ममराठी शाळांपुढे त्यांची डाळ गळणार नाही. ;)
11 Feb 2012 - 4:17 pm | विश्वनाथ मेहेंदळे
त्यांचे छोड, तुम्हे मराठी विषय (सॉरी सब्जे़क्ट) होता की नाही. इतना क्राय करनेको काय happened?
9 Feb 2012 - 2:11 pm | नितिन थत्ते
हे कृत्य मूर्ख, असंस्कृतपणाचे आहे
इतकेच आहे का? बेकायदेशीर वगैरे नाहीये का?
पण ह्यात किती लोकांचे नुकसान झाले आहे?
इथे सरकारी धनाचा अपहार झाला आहे का? देशाच्या वा लोकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे का?
करदात्यांचे नुकसान झाले का? लोकांच्या रोजच्या व्यवहारात वाहतुकीत अडथळा वगैरे तरी? जाती/धर्मात तेढ?
काही नाही.
या पैकी कुठलीच गोष्ट संसदेत/विधानसभेत डुलक्या काढल्याने पण होत नाही. मग संसदेत झोपणे चालवून घ्यायचे का?
न्यूज आयटम भाजपविषयी असल्याने ती घटना महत्त्वाची नाही याच्याशी सहमत आहे.
9 Feb 2012 - 2:28 pm | चिरोटा
+१
पण तीन आमदारांतले दोन आमदार अनेक वर्षे जनता दलात होते हे ही लक्षात ठेवावयास हवे.
सध्या IT Act काय म्हणतो ह्यावरून मिडियावाले बौद्धिक घेत आहेत्.Act नुसार क्लीप बघणे गुन्हा नाही.पण दुसर्याला पाठवणे गुन्हा आहे. एवढेच कळलय अजून तरी.त्यामुळे ज्या मंत्र्याने क्लीप पाठवली तो तरी आत जायला हवा. पण २७ कोटींची संपत्ती असलेला हा मंत्री आत जाण्याची शक्यता खूप कमी वाटते.
9 Feb 2012 - 9:17 pm | अन्नू
यामुळे काहीएक झाले नाही किंवा होणारही नाही. पण सध्या म्हणे मंत्र्यांच्या बर्थडे पार्टीमध्ये आयटम साँग्स होतात.
अर्थात याचा खर्च जनतेच्या निधीतून होत असला तरी यामुळे वरील पैकी कोणताच गंभीर परीणाम होत नसावा असे मला वाटते.
9 Feb 2012 - 8:53 pm | मराठी_माणूस
नेहमीप्रमाणे त्या निगरगट्ट पक्षाची कुठलीच प्रतिक्रिया नाही
9 Feb 2012 - 9:38 pm | चेतनकुलकर्णी_85
मध्यंतरी राहुल बाबांवर पण बलात्काराचे आरोप झालेले ऐकले होते...
शिवाय ३-४ वेर्षापुर्वी उघडकीस आलेल्या आमच्या शहरातील एका रकेत मध्ये एक डायरी सापडलेली त्यात भल्या भल्या पॉवर फुल्ल लोकांची नावे व फोन नंबर पाहून पोलीचांचीच पाचारवर धारण बसली असे कट्ट्या वर बोलले जात होते.....
हे सर्व आपण गृहीतच धरायला हवे ह्या लोकांबद्दल...
9 Feb 2012 - 11:23 pm | चिरोटा
डायरीत लिवायला काय? मी माझ्या डायरीत ओबामा,सारकोझीचे नाव घालतो.आणी त्यांचे पत्ते पण. एक वॉशिन्ग्टनचा तर एक पॅरिसचा.
10 Feb 2012 - 6:58 pm | चेतनकुलकर्णी_85
पण तुम्ही जर रंगे हाथ एखाद्या कांडात सापडले गेला तरच तुमच्या डायरीला महत्व आहे राव........ :P
10 Feb 2012 - 9:30 pm | आशु जोग
तुमच्यामुळे नव्या नव्या बातम्या कळतात ब्वा !
बाकी संध्यानंदची आजची हेडलाइन काय आहे...
11 Feb 2012 - 9:43 am | श्रीयुत संतोष जोशी
ऐकीव बातमी अशी आहे की तो अश्लील व्हिडीओ " पूनम पान्डे " चा होता आणि ही बातमी मी रेडिओ वर ऐकली आहे.
12 Feb 2012 - 1:07 pm | वेताळ
एकादा अश्लील चित्रपट पाहिला आहे काय?
13 Feb 2012 - 12:00 pm | कॉमन मॅन
वेताळजी, प्रस्तुत धाग्यासंदर्भात आपला प्रश्न अंमळ असंबद्ध वाटतो. खाजगी चर्चेकरता आपल्याला खरडवही तसेच संदेशाचा पर्याय उपलब्ध आहे असे आम्ही सुचवतो..
14 Feb 2012 - 10:40 pm | आशु जोग
एक इच्छा
असे प्रकार पुन्हा पुन्हा घडत राहोत
बातम्या येत राहोत
त्यातून नवे नवे धागे वाचायला मिळोत
कॉमन मॅनचा हा धागा शतायुषी होवो !
16 Feb 2012 - 2:32 am | आशु जोग
एक आयडीया शेयर करणार आहे
या सगळ्या पेक्षा राखीलाच विधानसभा सदस्य बनवलं तर
सगळाच ताप वाचेल
16 Feb 2012 - 9:12 am | चिंतामणी
"रोगापेक्षा इलाज भयंकर" अशी अवस्था होइल.
16 Feb 2012 - 2:10 pm | आशु जोग
हेमा जया दिपीका चालतात
मग राखीलाच विरोध का !