किल्ले रामशेज

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
6 Feb 2012 - 10:56 pm

किल्ले रामशेज- नाशिकपासून अवघ्या १५ किमीवर. दिसायला तसा छोटेखानी, अगदी एखाद्या टेकाडाएव्हढाच. पण त्याला संरक्षण आहे ते चहुबाजुंनी असलेल्या कातळकड्याचे. याच भक्कम नैसर्गिक तटबंदीच्या जोरावर आणि यावरच्या मूठभर मावळ्यांच्या मनगटाच्या ताकदीवर हा किल्ला मोगलांच्या राक्षसी सैन्यबळापुढे तब्बल साडेपाच वर्षे झुंजला.

रामशेजला जाण्यासाठी आम्ही नाशिकवरून सकाळीटे साडेसहालाच निघालो, नाशिक-वणी रस्त्यावर असलेल्या किल्ल्याच्या पायथ्याच्या आशेवाडीत जेमतेम अर्ध्या तासातच पोहोचलो. रामशेजची कातळटोपी लक्ष्य वेधून घेत होती.
गावातूनच किल्ल्याची चढाई चालू होते. किल्ल्याची पायवाट किल्ल्याला वळसा मारून पाठीमागच्या बाजूने वर वर चढत जाते. उजवीकडे दरी आणि डावीकडे किल्ला यांमधून अरूंद अशी ती वाट पुढे सरसरत जाते.

१. आशेवाडीतून दिसणारी गडाची कातळटोपी

२. गडावर वर चढत येणारा ट्रॅव्हर्स

३. ट्रॅव्हर्स

थोड्याच वेळात पुढे बांधीव पायर्‍या लागतात. पायर्‍या चढून जातात आम्ही थेट गडाच्या कातळाला भिडलो. गडाचा मूळ दरवाजा तिथेच कातळात बुजलेल्या अवस्थेत आहे. त्याशेजारूनच कातळ कोरून गडावर जाणार्‍या अरूंद पावठ्या खोदलेल्या आहेत. कातळाला लगटून ते चढून जातात कातळात अजून एक गुहा खोदलेली दिसते. गुहेत रामाचे मंदिर आहे व शेजारीच पाण्याचे टाके आहे. दरवाज्याची कातळकोरीव रचना, पाण्याचे अंतर्भागात खोलवर पसरलेले टाके यांवरून हा किल्ला सातवाहनकालीन असावा.

४. बांधीव पायर्‍या

५. कड्यातील मूळचा दरवाजा आणि राममंदिर

६. सातवाहनकालीन खोदीव टाके

७. भग्नावस्थेत असलेला गडाचा मुख्य दरवाजा

तिथून अजून काही पायर्‍या चढून जातात गडमाथ्यावर आम्ही प्रवेशतो झालो. समोरच्याच बाजूला एक गुप्त दरवाजा आहे. पलीकडच्या बाजूच्या तुटलेल्या कातळामुळे हा मार्ग तसा आज बंदच आहे, किंबहुना शिवकाळातही दोर लावूनच पलीकडे उतरता येत असावे.
थोडेसे पुढे चढल्यावर पाण्याची टाकी आणि कोरडाठाक तलाव लागतो, त्याच्याच जवळ देवीचे एक मंदिर पण आहे. तसेच पुढे गेल्यावर पाण्याची काही टाकी आणि घरांचे पडके अवशेष दिसतात. संपूर्ण गडाला कातळाचे आवरण असल्याने तटबंदी इथे अशी बांधलेली नाहीच. गडाच्या पलीकडच्या टोकापर्यंत जाऊन परत दरवाजापाशी येऊन समोरच्या पठारावर गेलो. इथे बर्‍यापैकी सपाटी असून काही अवशेष, ओहोरलेले पाण्याचे टाके व ध्वजस्तंभ आहे. गडमाथ्यावरून देहेरगड, भोरगड अगदी उत्तम दिसतो, दूरवर अजंठा सातमाळा रांगेतील अजस्त्र किल्ले सप्तशृंगी, धोडप, रवळ्या जावळ्या खुणावत असतात.

८. गडमाथ्यावर जाणारी वाट

९. समोरच असलेला चोर दरवाजा

१०. गडमाथा

११. ओहोरलेले पाण्याचे टाके

१२. काही अवशेष

१३. गडाची माची

१४. उजवीकडचा देहेर किल्ला आणि डावीकडचा सैन्याच्या ताब्यात असलेला भोरगड.

१५. पायथाची शेते

१६. वैराण प्रदेश

शिवाजी महारांजाच्या मृत्युनंतर औरंगजेबाची राक्षसी वावटळ दख्खन काबीज करण्याच्या हेतूने महाराष्ट्रात घुसली, त्यांचा वेढा पडला तो ह्या छोटेखानी रामशेजला. काही तासातच किल्ला जिंकून देण्याच्या वल्गना मोंगल सेनापतींनी केल्या. पण इथल्या मातीपुढे ते फिके पडत गेले. मूठभर शिबंदीनिशी इथल्या अज्ञात किल्लेदाराने तब्बल साडेपाच वर्ष किल्ला झुंजता ठेवला. अखेर रसद संपल्याने आणि राजेही दुसर्‍या मोहिमेत झुंजत असल्याने रामशेज नाईलाजाने मोंगलाच्या हवाली करावा लागला. पण मोंगलानाही रामशेजचं पाणी कळून चुकलं.

तासाभरात गडफेरी आटपून आम्ही उतरणीला लागलो. २० मिनिटातच परत पायथ्याला पोहोचलो. सकाळचे नऊ वाजत आले होते. पंचवटीच्या अंबिकाची मिसळ मनसोक्त चापून परत शहरातल्या रूक्ष वातावरणात आलो.

१९. गडावरून उतरताना

२०. आशेवाडीतून

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

6 Feb 2012 - 11:13 pm | अत्रुप्त आत्मा

फोटू आणी माहीती...नेहमी प्रमाणेच कातिल... :-)

वपाडाव's picture

7 Feb 2012 - 12:21 am | वपाडाव

तुमचं नामकरण करावं काय?
वल्लीसायेब "गड"करी... हे कसं वाट्टंय...

मोदक's picture

7 Feb 2012 - 12:56 am | मोदक

:-)

सूड's picture

7 Feb 2012 - 8:02 am | सूड

+१

इरसाल's picture

7 Feb 2012 - 10:23 am | इरसाल

वप्याला अनुमोदन......
हे चालल काय.....जस वृक्षवल्ली सारख गडवल्ली

पियुशा's picture

7 Feb 2012 - 10:26 am | पियुशा

फटु एकदम झ्याक आल्येत हो वल्ली :)

सुहास झेले's picture

7 Feb 2012 - 6:22 am | सुहास झेले

अप्रतिम... फक्त ४५०-५०० मावळ्यांनी हा किल्ला साडे पाच वर्ष लढवला. संभाजी पुस्तकामध्ये ह्या किल्ल्याची प्रथमतः ओळख झाली, आणि नक्की बघायचा असं ठरवलं. बघुया कधी योग येतोय :) :)

वल्लीशेठ, फोटो आणि माहिती नेहमीप्रमाणे निव्वळ अप्रतिम !!!

५० फक्त's picture

7 Feb 2012 - 8:07 am | ५० फक्त

जबरा,

मा. संपादक मंड्ळ,

मराठ्यांचं स्वराज्य अस्तित्वात आणणा-या आणि टिकवुन ठेवणा-या या गड किल्यांसाठी मिपावर एक वेगळा विभाग करावा अशी नम्र विनंती आहे .

स्पा's picture

7 Feb 2012 - 8:49 am | स्पा

वल्ली ला त्या विभागाचे हेड म्हणून मान्यता द्यावी :)

उत्तम फोटू झकास वर्णन (नेहमीप्रमाणेच)

सुहास झेले's picture

7 Feb 2012 - 12:18 pm | सुहास झेले

अनुमोदन.... !!!

अन्या दातार's picture

7 Feb 2012 - 9:00 am | अन्या दातार

वल्ल्या, लेका उगाच कुठेतरी जॉब करतोस बघ. मस्तपैकी पुरातत्त्व खात्यात कामाला लागायला हवे होतेस.

(आता परत छान माहिती वगैरे सांगणे भागच आहे काय??)

मालोजीराव's picture

7 Feb 2012 - 12:54 pm | मालोजीराव

अगदी अगदी...त्याने पुरातत्व खाते किंवा वनविभाग यापैकी एक विभाग जरूर निवडावा!
बाकी 'फ़ॉरेस्ट ऑफिसर वल्लीशेठ' नाव पण शोभून दिसेल ! ;)

- मालोजीराव

प्यारे१'s picture

7 Feb 2012 - 9:50 am | प्यारे१

सगळे 'गड'करी नी गडकरी धष्ट्पुष्ट असतात काय? ;)

वल्ली, आपणाला ७ तोफांची सलामी .

मालोजीराव's picture

7 Feb 2012 - 11:46 am | मालोजीराव

जबरदस्त किल्ला आणि जबरदस्त इतिहास !
राव दलपत बुंदेला,शुभकर्ण बुंदेला,राघोजी खोपडे,बहरामखान,कासीम खान,शहाबुद्दीन एक ना अनेक मातब्बर मोगल सरदार येऊन वेध घालून गेले...पण कुणालाच यश आलं नव्हतं !
मानाजी मोरे,रुपजी भोसले,जवळच असलेल्या त्र्यंबक चा किल्लेदार तेलंगराव आणि रामसेज च्या किल्लेदारानी अफाट पराक्रम गाजवला...पण नंतर दाणापाणी,दारू आणि इतर रसद संपल्याने किल्ला सोडवा लागला....शेजारील त्र्यंबक गड सुद्धा ६ वर्षे लढवत ठेवला होता !

फोटू मस्तच वल्लीशेठ !
-मालोजीराव

प्रचेतस's picture

7 Feb 2012 - 12:58 pm | प्रचेतस

उत्तम माहिती मालोजीराव.
रामशेजच्या रणसंग्रामाबद्दल एक लेख येऊ द्या आता.

मी-सौरभ's picture

8 Feb 2012 - 8:11 pm | मी-सौरभ

पण त्या किल्लेदाराच नाव माहीत नाही हे वाचून वाईट वाटले....

मनराव's picture

7 Feb 2012 - 12:26 pm | मनराव

मस्त रे.......... आणखी एक किल्ला सर करण्यासाठी माहिती करून दिलास.......

उदय के'सागर's picture

7 Feb 2012 - 12:33 pm | उदय के'सागर

खुपच छान माहिती आणि फोटो! खुप खुप मनापसुन धन्यवाद!!!!

(नाशिकच्या एवढ्या जवळ हा किल्ला आहे हे माहित नसल्याने स्वतःचीच लाज वाटली :( )

सुहास..'s picture

7 Feb 2012 - 12:58 pm | सुहास..

ख ल्ला स !!

अवांतर : खानदेशात घुसखोरी ची चर्चा कामी आली म्हणायची , मोदकशेठ कुठे जातील याची वाट पहातो आहे ;)

अप्रतिम पुन्हा एकदा ..
आवडेश

रम्या's picture

7 Feb 2012 - 3:14 pm | रम्या

सुदंर फोटो आणि माहीती.

मस्त वर्णन
शिवाजी महाराजांचा विजय असो!

पैसा's picture

7 Feb 2012 - 10:52 pm | पैसा

छान, सुंदर, अप्रतिम नेहमी नेहमी काय लिहायचं तेच ते?

sneharani's picture

9 Feb 2012 - 10:22 am | sneharani

मस्त फोटो अन वर्णनसुध्दा!
त्या किल्लेदाराचं नाव इतिहासात कुठेच कसं नाही? :(

स्वच्छंदी_मनोज's picture

9 Feb 2012 - 12:42 pm | स्वच्छंदी_मनोज

वल्लीजी मस्तच फोटो आणी वर्णन ...रामाने वनवासाच्यावेळी राहाण्यासाठी वापर केलेला म्हणून "रामशेज"...

आम्ही ३ वर्षांपुर्वी ह्याच सुमारास हा किल्ला केला होता.. त्यावेळचे फोटो आठवले....

तासाभरात गडफेरी आटपून आम्ही उतरणीला लागलो. २० मिनिटातच परत पायथ्याला पोहोचलो. सकाळचे नऊ वाजत आले होते.>>>>> एवढ्या लवकर जर किल्ला भटकून झाला तर जवळच असलेली म्हसरूळची जैन चांभारलेणी का नाही बघीतलीत?

अगदीच राहवले नाही म्हणून माझ्या भटकंतीत काढलेले काही फोटो ताकतोय... सर्व फोटो मी माझ्या मोबाईल कॅमेरातून काढले आहेत...

म्हसरुळची जैन चांभारलेणी.....

पुढील ट्रेकला शुभेच्छा....कधीतरी एकत्र ट्रेक जमवाच....

प्रचेतस's picture

9 Feb 2012 - 12:46 pm | प्रचेतस

मस्त फोटो मनोजराव.
म्हसरूळजवळची चांभार लेणी अनेकवेळा बघितलीय. पण एकदाही फोटो काढले नाहीत. :(
आता परत नाशिकला जाईन तेव्हा फोटो नक्कीच काढेन.
त्यांचे मूळ नाव चामराज लेणी अथवा चामर लेणी. चांभार लेणी हे अपभ्रष्ट रूप.
एकत्र ट्रेक नक्कीच जमवूया.

स्पा's picture

31 Oct 2014 - 3:49 pm | स्पा

झाला का प्लान?

म्हसरूळजवळची चांभार लेणी अनेकवेळा बघितलीय. पण एकदाही फोटो काढले नाहीत.
आता परत नाशिकला जाईन तेव्हा फोटो नक्कीच काढेन.
त्यांचे मूळ नाव चामराज लेणी अथवा चामर लेणी. चांभार लेणी हे अपभ्रष्ट रूप.
एकत्र ट्रेक नक्कीच जमवूया.

चला लवकर पिल्लान करा :)

मी-सौरभ's picture

9 Feb 2012 - 6:41 pm | मी-सौरभ

चला लवकर पिल्लान करा

अरे स्पविनाश स्वामी पुढचं वाक्य टंकायचं राहीलं वाटतं. जौ दे मी टंकतो.

मी येणार नाही हे पण लक्षात घ्या..
;)

वपाडाव's picture

9 Feb 2012 - 7:39 pm | वपाडाव

सौणेशा, त्याच्यापुढचं मी टंकतो....
जरा अ‍ॅड्जस्ट करुन पाहतो जमेल का ते? कसें ;)

इन्दुसुता's picture

28 Feb 2012 - 7:04 am | इन्दुसुता

फारच छान वर्णन आणि फोटो.

बोका-ए-आझम's picture

2 Nov 2014 - 11:04 am | बोका-ए-आझम

मस्त!