ज्यांना जे लेनो माहित नाही त्यांच्याकरता:
http://en.wikipedia.org/wiki/Jay_Leno
सध्या अमेरिकेत रिपब्लिकन पक्षात रणधुमाळी चालू आहे. चार उमेदवार राष्ट्राध्यक्षाची निवडणूक लढवण्याकरता नामांकन मिळवायला झुंजत आहेत. त्यातला एक आघाडीचा अतीश्रीमंत उमेदवार म्हणजे मिट रॉमनी.
जे लेनोने त्याच्या एका कार्यक्रमात तमाम उमेदवारांची घरे दाखवली. एक विनोद/उपरोध/टिंगलीचा प्रकार म्हणून मिट रॉमनीच्या घराच्या जागी त्याने चक्क सुवर्णमंदीरचा फोटो दाखवला! अर्थात रॉमनीच्या श्रीमंतीवर एक उपरोधिक टोमणा मारला. पण अर्थातच ते शीखांचे आदरस्थान असल्यामुळे हा प्रकार बघून बरेच शीख लोक खवळले. त्यात भारताबरोबर कॅनडा व अमेरिकेतील शीखही आहेत. ही पहा ती क्लिप
http://www.youtube.com/watch?v=WfGlyjY5bJU
यावर तुम्हाला काय वाटते? जे लेनोला असा विनोद करायचे स्वातंत्र्य असावे का? का त्याने माफी मागावी?
आधुनिक काळात सगळी माध्यमे जगभर पोचत आहेत त्यामुळे हा प्रकार अमेरिकेपुरताच मर्यादित रहात नाही.
मला तरी ह्यात फार काही गैर नाही वाटले. एक तर ह्यात शीख धर्माबद्दल काहीही म्हटलेले नाही. एक गंमत म्हणून सोडून द्यावे असे मला वाटते.
प्रतिक्रिया
3 Feb 2012 - 6:26 am | रामपुरी
एवढी बोंबाबोंब झाल्यामुळे सगळ्यांना कळालं की ते शीखांचं मंदीर आहे. नाहीतर ज्यांनी कार्यक्रम बघितला त्यातल्या हजारी पाव लोकांना पण कळलं नसतं की ते शीख मंदीर आहे. :)
3 Feb 2012 - 6:50 am | सुक्या
बाकी आमच्या भावना लै दुखर्या हायेत. कुणी फू केल तरी भावना दुखत्यात.
जाउ दे . .
कश्याने भावना दुखतील त्याची एक लिष्ट बनवावी म्हणतो.
जे लेनोला असा विनोद करायचे स्वातंत्र्य असावे का?
अगदी अगदी ..
का त्याने माफी मागावी?
का ? काय चुक केली त्याने?
3 Feb 2012 - 7:33 am | रेवती
त्यात काय रागवायचं?
चांगलय की उलट.
आपल्याकडे ओबामामामांनाचे कितीतरी विनोद असतील.
आपल्याला माहित नाही एवढेच.
3 Feb 2012 - 8:06 am | शुचि
पण चर्चचा विनोद आहे का?
3 Feb 2012 - 11:10 am | विश्वनाथ मेहेंदळे
धर्म आणि देवांवर आधारित अनेक विनोद आहेत. फक्त ते TV वर सांगत नाही कुणी.
तुम्ही एकही ऐकला नाही अजून ?? कमाल आहे !!!
3 Feb 2012 - 12:14 pm | मी-सौरभ
अरे ये चर्च के जोक्स नही जानती :)
वि.मे. : तुम्हाला माहीत आहेत ना हो??
3 Feb 2012 - 12:36 pm | विश्वनाथ मेहेंदळे
केवळ चर्चच कशाला, हिंदू देवांवर पण अनेक आहेत. मुसलमान धर्मावर पण आहेत. अगदी लहान मुले पण "जहाज बुडताना प्रत्येकाने आपल्या देवाचा धावा केला..." तो विनोद एकमेकांना सांगत असतात. त्यात गणपती मुख्य पात्र आहे.
चाय पिएगा क्या, वाला जोक ऐकलाय का कुणी इथे ?
3 Feb 2012 - 12:57 pm | नगरीनिरंजन
हे सगळे विनोद माहित आहेत आणि शिवाय एक "हलवा" विनोदही माहित आहे.
3 Feb 2012 - 11:58 pm | शुचि
हाहा गणपतीचा जोक माहीत आहे :D
3 Feb 2012 - 8:25 pm | रेवती
शुचितै, अगं एवढ्या तेवढ्यानं कसल्या भावना दुखावल्या जातात?
काय भावना म्हणायच्या का काय?
आज आपण आमची गल्ली, आमचे गाव यातून बाहेर पडलोय.
जगात कोण कोणाचा इतका विचार करणार?
साधा विचार असा आहे की आपल्या देशात घडलेले मोठमोठे गुन्हे, दंगे आपणच काही काळाने विसरून जातो. भारतातल्या एका टेंपलचा दहा सेकंद पाहिलेला फोटो किती लक्षात राहणार? त्या वरून दंगे अपेक्षित नाहीतच. आपल्याकडे देवळात
चपलांपासून देवाच्या अंगावरच्या दागिन्यांपर्यंत कशाचीही चोरी होते. त्या वेळी हे दंगेकर कुठे जातात? कितीजणांच्या भावना दुखावल्या जातात? आणि हे सगळं शेवटी मिट रोमनीबद्दल चालू आहे, तेही गमतीने.;)
3 Feb 2012 - 11:59 pm | शुचि
खरं आहे.
3 Feb 2012 - 10:18 am | पुण्याचे वटवाघूळ
बरोबर आहे असल्या लहान सहान कारणांवरून आपल्या भावना का दुखावल्या जातात तेच कळत नाही.कार्यक्रमात शीख धर्मावअनुचित्/गुरूंविरूध्द किंवा ग्रंथसाहेब विरूध्द काहीही अनुचित उद्गार नव्हते. कार्यक्रम बघत असलेल्या १% लोकांना (किंवा स्वतः कार्यक्रम सादर करत असलेल्यालत) तरी ते धर्मस्थळ आहत्)याचाच पत्ता नसेल.चर्चविरूध्द (अगदी धर्मगुरूंविरूध्द) सुध्दा विनोद अगदी रिडर्स डायजेस्टसारख्या मासिकातही मी वाचलेले आहेत.
यात इतके आकाशपाताळ एक करण्यासारखे काही आहे असे वाटत नाही. जनरली मी हुप्प्यांच्या मतांबरोबर सहमत नसतो पण यावेळी सहमत आहे.
3 Feb 2012 - 12:15 pm | हुप्प्या
>>जनरली मी हुप्प्यांच्या मतांबरोबर सहमत नसतो पण यावेळी सहमत आहे.
<<
अरेरे! चुकुन गफलत झाली पुन्हा नाही होणार ;-)
3 Feb 2012 - 10:56 am | शिल्पा ब
त्यात आक्षेपार्ह काय होतं बॉ? उगा बोंबा मारायच्या!!
3 Feb 2012 - 11:22 am | चिरोटा
सहमत आहे. व्हिसा नियमांची ऐशी तैशी करून न्युयॉर्क,लंडनमध्ये टॅक्सी चालवणार्यांनी एवढे चिडायचे कारण नाही.
3 Feb 2012 - 11:49 am | विश्वनाथ मेहेंदळे
टॅक्सी चालवण्याचा उद्धार करण्याचे कारण कळले नाही. शीख ही कष्टाळू जमात आहे त्याबद्दल कौतुक करायचे की असे हिणवायचे ? मराठी माणसाला घराच्या खुर्चीवरून (मग ती मोडकी तोडकी का असेना) पार्श्वभाग हलवायला पण कंटाळा येतो. श्रमाला आपण प्रतिष्ठा सोडा साधी किंमत देत नाही, म्हणून मग बाहेरून येऊन लोक डोक्यावर मिरे वाटतात.
दिवसभर जालावर पडीक राहून कमेंट टाकणाऱ्यापेक्षा परदेशात जाऊन का होईना श्रमाचे काम करून पैसा मिळवणाऱ्या बद्दल जास्त आदर मनात आहे.
तुमचा मुद्दा व्हिसाचा असेल तर त्याचे नियम मोडणारा तिथे जाऊन टॅक्सी चालवतो काय किंवा मोठ्ठी कंपनी चालवतो काय, फारसा फरक पडत नाही. पण तुमच्या वाक्यात श्रमजीवी लोकांबद्दल तुच्छता दिसते आहे (निदान मला तरी). देश श्रमिकांमुळे पुढे जातो, केवळ बुद्धीजीविंमुळे नाही हे लक्षात असू द्या.
3 Feb 2012 - 12:33 pm | चिरोटा
नाही. तेथे वाट्टेल ते धंदे करून जायचे, नियम तोडून उलट सुलट धंदे करायचे, स्वतःच्या नातेवाईकांना असेच करण्यासाठी आमंत्रित करायचे. मग स्वजातिचे खूप जमले की अस्तित्व दाखवण्यासाठी हे असले प्रकार करायचे ह्याबद्दल तुच्छ्ता आहे.
हा एक टिपिकल गैरसमज. आपण कुठे आहात माहित नाही पण महाराष्ट्राबाहेर (केरळ्,तामिळ्नाडु,कर्नाटक) अनेक मराठी पाहिले आहेत जे कष्टांच्या जोरावर यशस्वी झाले आहेत.
काही महिन्यांपूर्वी द वीक मध्येच पंजाबविषयी अहवाल आला होता. पंजाबमधून नाना क्लूप्त्या करुन(पासपोर्ट्/व्हिसा फेरफार करणे) भारताबाहेर जाणार्यांची संख्या भारतात सर्वात जास्त आहे. ह्याला तेथे कबुतरबाजी म्हणतात.असे उलट सुलट धंदे करुन बाहेर जाणे ह्याला श्रम म्हणत असाल तर प्रश्न मिटला.माझ्या अनुभवानुसार शीख्/पंजाबी कमीत कमी कष्टांत वाट्टेल त्या प्रकारे उद्दिष्ट साध्य करणारी जमात आहे.
3 Feb 2012 - 1:41 pm | विश्वनाथ मेहेंदळे
आक्षेप नेमका कशावर आहे ? व्हिसा चे नियम तोडण्यावर की पडेल ते काम करण्यावर ? आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे नियम मोडणारा तिथे जाऊन टॅक्सी चालवतो काय किंवा मोठ्ठी कंपनी चालवतो काय, फारसा फरक पडत नाही. मग टॅक्सी चा उल्लेख करण्यात अर्थच काय राहतो ?
हा गैरसमज नाही. परवाच एका लाँड्री वाल्याशी बोलत होतो. त्याला दादर मध्ये मराठी माणूस मिळत नाही आहे लाँड्रीचे काम सांभाळायला. एक किस्सा मासलेवाईक होता. हा माणूस विरार वरून येतो सकाळी ७ ला दुकान उघडतो. एकाला नोकरी बद्दल विचारले तर तो म्हणाला, "मी ७ ला दुकान कसा उघडू ? मी ८ ला उठतो." घरापासून ५ मिनिटांच्या अंतरावर मिळणारी नोकरी त्याने या कारणासाठी नाकारली. आणि तो माणूस आता नाक्यावर टाईमपास करत असतो. माझ्या मामाची सुपारीची बाग आहे, तिथे सुपारी सोलायला माणसे मिळत नाहीत. कोकणात काही वर्षांपूर्वी एका परिचितांनी काही म्हशी आणून दुधाचा छोटा व्यवसाय करायचा प्रयत्न केला. दुध काढायला माणसे मिळेनात. जी यायची ती दांड्या मारायला लागली. शेवटी एक बिहारी भैय्या आणला. तो थोडे दुध चोरून प्यायचा म्हणे, पण धंदा तर नीट चालायला लागला. अजून उदाहरणे देऊ ???
महाराष्ट्राबाहेर किती मराठी दिसले आहेत ? तितके स्थलांतर खूप नॉर्मल आहे. मी राजस्थान बाहेरचे मारवाडी, पंजाब बाहेरचे पंजाबी आणि गुजरात बाहेरचे गुजराती मोजतो. करणार कम्पेअर ??
याचे उत्तर वर दिलेले आहे. पंजाबी माणूस सात्विक आणि नियम पाळणारा असतो असे कुणीही म्हटले नाही. पण इतके धंदे करून तिथे गेल्यावर श्रम करतो हे नाकारू नये.
खूप overlapping मुद्दे येतील प्रतिवाद करायला गेलो तर. त्यामुळे या वाक्यावर माझा पास. :-)
3 Feb 2012 - 1:42 pm | वाहीदा
चिरोटा,
कोणावर ही जातीय / धर्मिय / प्रांतिय हल्ले करण्याचे विधान टाळावेत हि नम्र विनंती .
माझ्या ही बर्याच शिख / पंजाबी मैत्रीणी आहेत. तुमच्या अनुभवाशी मी तरी सहमत नाही.
3 Feb 2012 - 1:51 pm | चिरोटा
ओक्के. पण-
ह्या बद्दल काय?
3 Feb 2012 - 2:13 pm | नगरीनिरंजन
कृपया जनरलायझेशन करू नये.
विमे, तुम्हालाही सांगायची वेळ यावी ना? ;-)
3 Feb 2012 - 6:13 pm | विश्वनाथ मेहेंदळे
जनरलायझेशन शक्यतो करून नये हे मला मान्य आहे. पण मला वाटते की जनरलायझेशन न करणे हे पोलिटीकली करेक्ट असते. जनरलायझेशन सगळेच करतात कुणी मनात तर कुणी उघड. इथे अवांतर होईल म्हणून आता फार लिहित नाही.
तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगीर आहे.
3 Feb 2012 - 11:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सध्या अमेरिकेत रिपब्लिकन पक्षात रणधुमाळी चालू आहे. चार उमेदवार राष्ट्राध्यक्षाची निवडणूक लढवण्याकरता नामांकन मिळवायला झुंजत आहेत. त्यातला एक आघाडीचा अतीश्रीमंत उमेदवार म्हणजे मिट रॉमनी.
माहितीबद्दल आभारी.......! :)
लेनोला असा विनोद करायचे स्वातंत्र्य असावे का?
लेनोलाच नव्हे तर ज्यांना ज्यांना विनोद करावेसे वाटतात त्यांनी त्यांनी विनोद करावेत असे मला वाटते.
विनोद करण्याचे स्वातंत्र्य प्रत्यकाला असावे.
-दिलीप बिरुटे
3 Feb 2012 - 12:48 pm | कवितानागेश
गुगलून बघितल्यास, "golden building" साठी सर्च केल्यावर इतरही अनेक गोष्टी बघायला मिळतील.
शिवाय सुवर्णमंदीराचे कुठलेही चित्र जिथे असेल, तिथे हे घर नाही, आणि देसी लोकांचे टेंपल आहे हेदेखिल सहज कळते.
..पण हे लेनोला कळलेच नाही मुळी!!
टीव्ही शो तयार करणार्यांनी इतके निरागस असू नये अशी अपेक्षा आहे.
अजून गुगलून पहिल्यास ,
Previously, in 2007 he called Sikhs 'diaper heads.' Clearly, Jay Leno's racist comments need to be stopped right here.
असे सापडलंय.
यातून लेनोचा अत्यंत निरागस आणि गमत्या स्वभावच दिसून येतोय!!
3 Feb 2012 - 2:15 pm | मूकवाचक
.
3 Feb 2012 - 5:56 pm | विकास
सर्व प्रथम जे लेनोचा कार्यक्रम अनेक वेळेस पाहीलेला असल्याने त्याचे तसेच इतर सर्व तत्सम लोकांचे (लेटरमन, कोलबेर, जॉन स्टूअर्ट वगैरे ) कार्यक्रम बघितलेले आहेत आणि अजूनही वेळ झाला की बघतो. खूप आवडतात. त्यांचे विनोद अनेकदा त्यांच्याच लोकांबद्दल, इथल्या बहुसंख्यांच्या (पक्षी: ख्रिश्चन) धर्माबद्दल आणि राजकारण्यांबद्दल कधविखारी असतात असे म्हणता येईल. भावनां दुखावण्यामुळे नाही पण काही मर्यादा नक्की पाळाव्यात असे ते बघताना वाटते. नाहीतर अतिशय इंटेलिजेंट असलेले हे कार्यक्रम हे केव्ळ "टवाळा आवडे विनोद" असल्याच प्रकारातले होतात. तरी देखील येथे ते समान स्वातंत्र्य आहे त्यामुळे असले खटले मान्य नाहीत. पण लक्ष वेधण्याची गरज आहे असे मात्र वाटले, कारण :
वर शीखांच्या बाबतीत जे काही झाले आहे त्यासंदर्भात इतरांनी मांडलेल्या मतांशी सहमतच. पण ह्याच जे लेनोने आधी त्यांच्या फेट्याला डायपर / "डायपर हेड्स" असे म्हणाला होता. ओबामाच्या दिल्लीवारीत तो दरबार साहीब गुरूद्वार (पाच प्रमुख स्थानातील आणि दिल्लीतील) जाऊ शकला नाही कारण त्याला फेटा बांधायला सांगितला असे त्याने (तसे apparently काहीच झालेले नसताना) जनतेला सांगितले होते.
९/११ नंतरच्या धार्मिक विद्वेषात शीखांना मारले गेले आहेत. अगदी १-२ वर्षांपुर्वी जेंव्हा लेनोच्यचाच लॉस एंजेल्स/कॅलीफोर्निया भागातील दोन शिखांच्या हत्या झाल्या आणि अती झालं म्हणत तेथील स्थानिक गोरा काँग्रेसमन (म्हणजे खासदार) आणि इतर अनेक त्याच्या (विद्वेषाच्या) विरोधात आवाज उठवण्यासाठी म्हणून फेटे बांधून त्या दोघांच्या अंत्यसंस्कारास गेले आणि शीख समाजाशी सॉलीडॅरीटी दाखवली होती. थोडक्यात येथील शिख समाजास त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज पसरत आहेत याबद्दल काळजी वाटली आणि आता अती झालं असे वाटू लागले तर आश्चर्य वाटायला नको.
अर्थात ह्याचा अर्थ त्यांचा खटला भरणे मान्य आहे असे मला अजिबात म्हणायचे नाही. कारण येथील समान स्वातंत्र्य मला अधिक मान्य आहे. पण ही सर्व या खटल्याच्या संदर्भातील तिव्र भावनांची पार्श्वभूमी आहे. ती न समजता या संदर्भात विचार करणे चुकीचे आहे असे वाटते. (संदर्भः रॉयटर्स)
आता थोडे शीख समाजाबद्दल (वर अनेक कॉमेंट्स गैर आणि अयोग्य वाटल्या त्या संदर्भात): सगळे शीख टॅक्सी ड्रायवर आहेत असे म्हणणे म्हणजे सगळे मराठी घाटी आहेत अथवा पाट्या टाकतात असे म्हणण्यासारखे होईल. ते अर्थातच पटले नाही. तसेच कोणी ते काम करत असले म्हणून काही बिघडते असे देखील वाटत नाही. तेच बेकायदेशीर स्थलांतर करणार्यांबद्दल. शिखच कशाला यात कदाचीत आंध्रचा पहीला नंबर लागेल असे म्हणले तर अगदी आंध्रचे लोक पण चू़क म्हणणार नाहीत.
पण तुमच्या पैकी किती जणांना हे माहीत आहे की येथे अनेक "गोरे" (पक्षी: अमेरीकन) शीख आहेत हे? त्याला देखील इतिहास आहे. (अचूक इतिहास माहीत नाही, थोडाफार ऐकीव इतिहास) कॅलीफोर्निया पासून मेक्सिको वगैरे पर्यंत ब्रिटीशांच्या काळात अनेक शीखांना मोलमजूरी करायला आणले होते. पण शीख स्त्रीया आल्या नव्हत्या/ येऊन दिले नव्हते. सुरवातीस त्यांना वेगळेच ठेवल्याने आधी मेक्सीकन्स आणि नंतर इथल्या गोर्या समाजात लग्ने झाली.
कारणे काही असली तरी साधारण दिडदोनशे वर्षात रंग बदलला, वंशाचे मिश्रण झाले पण शीख आचरण आजही जसेच्या तसे राहीले आहे. त्यांचा भारताशी अथवा भारतीयांशी बाकी काहीच संबंध नसतो, माहिती नसते. फक्त एक नक्की माहीत असते : सुवर्ण मंदीर.
असो.
3 Feb 2012 - 8:26 pm | रेवती
नवीन माहिती.
3 Feb 2012 - 11:21 pm | शिल्पा ब
शिखांबद्दल नविन माहीती मिळाली.
लेनो किंवा इतर कॉमीक बहुतेक सगळ्याच धर्मांवर, लोकांवर, राजकारण अन राजकारणी इ. वर गंमती ते विखारी असे विनोद करत असतात. पण केवळ अपमान करण्यासाठी (उदा. ऑस्ट्रेलियन टी.व्ही. प्रकरण) कोणी काही बोलत असेल तर विरोध केला तर गैर नाही. अर्थात दंगल करणे हा उपाय नाही पण लोकांपर्यंत "असे बोलल्याने अपमान होतो" हे पोहचवले पाहीजे. (उदा. काळ्यांना निग्रो म्हणणे रेसिस्ट आहे तसे.)
4 Feb 2012 - 12:11 am | विकास
लेनो किंवा इतर कॉमीक बहुतेक सगळ्याच धर्मांवर, लोकांवर, राजकारण अन राजकारणी इ. वर गंमती ते विखारी असे विनोद करत असतात.
सहमत
पण केवळ अपमान करण्यासाठी (उदा. ऑस्ट्रेलियन टी.व्ही. प्रकरण) कोणी काही बोलत असेल तर विरोध केला तर गैर नाही.
मला नाही वाटत लेनोने अपमान करण्यासाठी केले असावे म्हणून. त्याच्या या (रॉम्नी-सुवर्ण मंदीर) विनोदाबद्दल दुखावण्यासारखे काही वाटले देखील नाही. पण त्याने ओबामाच्या संदर्भात (आधी सांगितल्याप्रमाणे) शीखांवर जो काही विनोद केला अथवा डायपरहेड म्हणणे हे अधिक अयोग्य वाटले. बाकी आपल्या मुद्यांशी सहमतच आहे.
या संदर्भात एक गेल्या वर्षातील चर्चा आठवली: "ग्रेट सोल..." आणि "दि बुक ऑफ मॉर्मन" त्यातील या संदर्भातील एक भाग खाली चिकटवत आहे :
3 Feb 2012 - 7:52 pm | यकु
कारणे काही असली तरी साधारण दिडदोनशे वर्षात रंग बदलला, वंशाचे मिश्रण झाले पण शीख आचरण आजही जसेच्या तसे राहीले आहे. -------- त्यांचा भारताशी अथवा भारतीयांशी बाकी काहीच संबंध नसतो, माहिती नसते. फक्त एक नक्की माहीत असते : सुवर्ण मंदीर. --------
---
मनोरंजक.
हे पहिल्यांदाच माहित झाले. धन्यवाद :)
3 Feb 2012 - 10:37 pm | मराठी_माणूस
ते अमेरिकन्स तिथल्या उपर्यांच्या खवळण्याला किति भीक घालतात ?
4 Feb 2012 - 12:02 am | शुचि
उपरे का बुवा? अमेरीकेला "मेल्टींग पॉट" म्हटले जाते. अनेक वंशाचे, जगातील विविध भागातून आलेले लोक येथे नांदतात. मग आम्ही भारतीयच उपरे कसे?
3 Feb 2012 - 11:22 pm | धनंजय
कॅथोलिक पोपबद्दल लेट-नाइट टीव्हीवर विनोद (दुवा)
मासलेवाईक म्हणून जे लेनोचाच विनोद, मागल्या निवडणुकीच्या वेळेचा. या वेळी रॉम्नी अतिश्रीमंत असल्याबाबत चर्चा होते, तशी त्या वेळेला मॅककेन फार वयस्कर असण्याबाबत चर्चा होत असे. तर जे लेनो म्हणे :
अन्य लोकांनी केलेले विनोद वरच्या दुव्यावर सापडतील.
हा पोपच्या पवित्र वस्त्रांचा अपमान समजावा का?
येथे पोपच्या चित्रावर विनोदी व्हॉईस ओव्हर असलेली चित्रफीत (डेव्हिड लेटरमॅन) :
http://www.youtube.com/watch?v=TZuK9MtyfGA
लोक फारच हळवे असतात बुवा. शिवाय आपल्यावरच विनोद अधिक तिखट होतात, बाकीच्यांवर विनोदच होत नाहीत... अशी काहीतरी कल्पना असते.