मिपाकरांकडून मला सतावत असलेल्या एका प्रश्नाचे उत्तर मिळेल ही अपेक्षा आहे. जगात नक्की कोणत्या देशाचे चांगले चालू आहे आणि तो देश येत्या काही वर्षात वर्चस्व गाजवेल?
अमेरिका गेली अनेक वर्षे वर्चस्व गाजवत होती पण २००७-०८ पासून तिथे आर्थिक संकट आले आणि त्यातून ते पुरते सावरलेले दिसत नाहीत. इराक आणि अफगाणिस्तानातील युध्दांमध्ये त्यांचा वारेमाप खर्च झाला आहे.मध्यंतरी त्यांचे क्रेडिट रेटिंगही कमी झाले असे वाचल्याचे आठवते.
युरोपात तर प्रश्न मोठाच आहे.अनेक देशांच्या अर्थव्यवस्था मोडकळीस आल्या आहेत. बडा घर आणि पोकळ वासा अशी त्यांची अवस्था. त्यांचेही क्रेडिट रेटिंग कमी होतच आहे.
चीनने मोठी प्रगती केली आहे हे मान्य पण ती प्रगती आपल्याच लोकांच्या शोषणावर केलेली आहे. अशी कोणतीच व्यवस्था चिरस्थायी असू शकत नाही. तसेच चीनमध्ये मधल्या काळात लोकसंख्या नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचे वाईट परिणाम पुढील काही वर्षात पुढे येतील अशी चिन्हे आहेत कारण देशात तरूणांची संख्या कमी होईल आणि म्हातारे लोक वाढतील.
आफ्रिका खंडात तर आनंदी आनंदच आहे. जपानमध्ये, युरोपातही लोकसंख्येचा हा प्रश्न आहेच. गल्फमधील तेल संपल्यानंतर त्यांना कोण विचारणार?
आपल्या भारताचे म्हणाल तर वेगळे काही बोलायलाच नको.
मग नक्की कोणाचे चांगले चालू आहे आणि कोणता देश येत्या काही वर्षांत वर्चस्व गाजवेल?
(रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ
मी ऐसी अक्षरे या संकेतस्थळावर "पिसाळलेला हत्ती" या नावाने वावरतो.
प्रतिक्रिया
31 Jan 2012 - 1:48 pm | कॉमन मॅन
काहीच कल्पना नाही.
31 Jan 2012 - 2:01 pm | बाळ सप्रे
"चांगले " ही फार Relative term आहे.
कुठल्या मुद्द्यावर चांगल वाईट ठरवायच.. (Economy/ population/ oil etc) आणि किती म्हणजे चांगले हे स्पष्ट करा
General Statement हवे असल्यास "विकसित " देशात " विकसनशील" देशांपेक्षा बरे चालले आहे. आणि "विकसनशील"देशात " अविकसित" देशांपेक्षा बरे चालले आहे. :-)
बाकी समर्थानी म्हटले आहेच "जगी सर्व सुखी असा कोण आहे ???"
31 Jan 2012 - 2:02 pm | बाळ सप्रे
"चांगले " ही फार Relative term आहे.
कुठल्या मुद्द्यावर चांगल वाईट ठरवायच.. (Economy/ population/ oil etc) आणि किती म्हणजे चांगले हे स्पष्ट करा
General Statement हवे असल्यास "विकसित " देशात " विकसनशील" देशांपेक्षा बरे चालले आहे. आणि "विकसनशील"देशात " अविकसित" देशांपेक्षा बरे चालले आहे. :-)
बाकी समर्थानी म्हटले आहेच "जगी सर्व सुखी असा कोण आहे ???"
31 Jan 2012 - 2:07 pm | चिरोटा
सप्र्यांशी सहमत.
जर आपले चांगले चालले असेल तर देशाचे चांगले चालले आहे म्हणायचे. नाही म्हणायला विकसित देशांत लोक त्यातल्या त्यात सुखी असतात.
31 Jan 2012 - 2:10 pm | यकु
अंमळ जागा चुकल्याचे वाटते आहे. तुमच्या शहराच्या महानगरपालिकेत उंदीर मारण्याच्या कामगिरीवर नेमलेल्या इसमास याचे उत्तर पक्के ठौक असेल. इथे समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास त्या इसमास गाठावे असे विनम्रपणे सुचवितो.
31 Jan 2012 - 2:20 pm | विजुभाऊ
चीनने मोठी प्रगती केली आहे हे मान्य पण ती प्रगती आपल्याच लोकांच्या शोषणावर केलेली आहे. अशी कोणतीच व्यवस्था चिरस्थायी असू शकत नाही. तसेच चीनमध्ये मधल्या काळात लोकसंख्या नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचे वाईट परिणाम पुढील काही वर्षात पुढे येतील अशी चिन्हे आहेत कारण देशात तरूणांची संख्या कमी होईल आणि म्हातारे लोक वाढतील
ते घडायला अजून पन्नास एक वर्षे जावी लागतील. तोवर चीन चे बरे चालले आहे असे दिसते. भाम्डवलशाही ही सुद्धा लोकांच्या शोषणावर च उभी रहाते. प्रत्येक अर्थव्यवस्था ही कोणाच्यातरी शोषणावरच उभी रहाते. जर कोणीच कोणाचे शोषण करत नसते म्हणजे सर्वचजण एका विशिष्ठ आर्थीक पातळीवर असतील तर ती अर्थव्यवस्था मृत असते.
31 Jan 2012 - 2:23 pm | स्पा
विजुभौंकडून अधिक विस्तृत उत्तराची अपेक्षा होती.. पण घोर निराशा झाली.. असो...
31 Jan 2012 - 6:04 pm | विजुभाऊ
अधिक विस्तृत उत्तराची अपेक्षा होती
चीन सध्या ज्या परिस्थितीतून जात आहे त्य अमध्ये त्यांच्या कडे निर्णय घेणे आणि ते यशस्वीपणे राबविण्याची सक्षम यंत्रणा आहे. त्यामुळे जागतीक बाजारपेठेत चिनचे वर्चस्व राहील. जेथे निर्णय लवकर घेतले जातात तेच टिकतात. भारताची लोकशाही ही कोणतेच निर्णय घेऊ देत नाही. ते राबविणे हे अजूनच अवघड जाते. इतकी वर्षे आपल्याकडे विजेचा तुटवडा आहे मात्र त्यावर वीजनिर्मिती करणे सोडून इतरच मुद्द्यावर वाद घालत बसतो.
एन्रॉनचा फटका बसला म्हणून त्यानंतर वीसवर्षे महाराष्ट्रात एकही वीजप्रकल्प निर्माण झालेला नाही.
तीच गोष्ट बोफोर्स सारख्या सक्षम युद्ध सामुग्रीची.
भारतात निर्णय क्षमता असलेले नेते नाहीत. ती आपली मानसीकता नाही त्यामुळे क्षमता असूनही पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद सहन करत बसलोय.
या बाबतीत चीन सर्वच गोष्टीत वरचढ आहे.
लोकसंख्येवर त्यानी नियंत्रण आणलेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काही काळाने लोकसंख्याबळ कमी होईल ही भीती निरर्थक आहे. कारण तो इफेक्ट दिसायला निदान ३० वर्षे जावी लागतील. सर्वच लोक म्हातारे असतील ही परिस्थिती यायला किमान ५० वर्षे लागतील. तोवर तंत्रज्ञान बरेच बदललेले असेल.
जगाची आर्थीक /सामाजीक परिस्थिती बदललेली असेल. बदललेली नसेल ती भारताची मानसिकता
31 Jan 2012 - 2:26 pm | इरसाल
खान्देशाचे..........अजुन कोणाचे ?
31 Jan 2012 - 2:31 pm | बिपिन कार्यकर्ते
सहमत आहे. काही खान्देशी लोक खान्देशातून बाहेर पडल्याने ही ऊर्जितावस्था त्या देशास प्राप्त झाली असे ऐकून आहे.
31 Jan 2012 - 4:06 pm | गणपा
शालजोडीतले का काय म्हणतात ते हेच का हो बिका ? ;)
31 Jan 2012 - 5:49 pm | इरसाल
मला लोण्याचा गोळा हि गोष्ट आठ्वली.;)
खान्देशावर लै प्रेम दिसु र्हायल राव.:)
द्या द्या ............तुमाला पावर हाय !!!!!!!!!!
( काही पुण्यवान लोक गुजरातेत जाताना खान्देशला पाय लावुन जातात त्यामुळेही चान्गले चालले असु शकते.;) )
31 Jan 2012 - 5:55 pm | स्मिता.
तरी काही पुणेकरांनी तिथे वारंवार जावून खान्देशाच्या ऊर्जितावस्थेला धक्का लावू नये अशी विनंती.
31 Jan 2012 - 6:17 pm | इरसाल
+१००००००००
द्या टाळी...........
आवडला प्रतिसाद.
1 Feb 2012 - 1:23 am | कुंदन
+१००००००
असो , कधी तरी पुणेकराला चानस मिळालाय , त्याचा आनंद हिरावु नका. त्याला आपल म्हणा.
31 Jan 2012 - 4:41 pm | मूकवाचक
हा विषय मेदिनीय ज्योतिष्याचा आहे. कॉलिन्ग युयुत्सु ...
31 Jan 2012 - 5:08 pm | कोदरकर
भुतान मध्ये लोक समाधानी आहेत... त्यांचेच चांगले चालु आहे.....
31 Jan 2012 - 5:38 pm | पाषाणभेद
आदेश चे खाउन पिवून वहिन्यांशी खेळ खेळून चांगले चालू आहेत.
31 Jan 2012 - 6:22 pm | वपाडाव
पाभे... काही लिमिट आहे की नाही...
31 Jan 2012 - 6:29 pm | गणपा
मीटर मंदी बसतय ना? मंग?
31 Jan 2012 - 6:49 pm | अत्रुप्त आत्मा
मीटर मंदी बसतय ना? मंग?
31 Jan 2012 - 7:06 pm | चेतनकुलकर्णी_85
कोणत्याच देशाचे नीट नाहीये चालू..पण सर्व देशांच्या राजकारणी लोकांचे एकदम झकास चालू आहे....
31 Jan 2012 - 9:40 pm | सौरव जोशी
कमी-जास्त प्रमाणार आज सगळच जग विविध व्याधींनी ग्रस्त आहे. मग population, terrorism, financial crisis असो की political blunders.
माझे वैयक्तिक मत जाते "Scandinavia" देशांना. Norway, Denmark, Sweden या देशांबद्दल फारसे नकारात्मक ऐकायला, वाचायला मिळत नाही. मी स्वतः या देशांमध्ये गेलोय आणि " त्यांचे नक्की चांगले चालले आहे" असेच वाटते.
1 Feb 2012 - 2:54 am | रेवती
एका स्विडीश मित्राकडूनही चांगल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या.
तो हिरव्या देशात फारसा आनंदी नाही पण बायको इथली असल्याने आणि मुले चांगली रमली असल्याने त्याने बृहनस्विडन मंडळात जायला सुरुवात केलिये (त्यांचा मोठ्ठा गृप आहे).
1 Feb 2012 - 6:47 am | हुप्प्या
सौदी अरेबियाचे सगळे सुरळित चालले आहे. अमेरिका रक्षणाला कटिबद्ध आहे, तेल भरपूर निघते आहे. भाव चांगला मिळतो आहे. मधे मधे महिलांना कार चालवायला परवानगी द्या असे "नेत्रदीपक, पुरोगामी" उपक्रम राबवून तमाम माध्यमांवर इंप्रेशन मारायचे की झाले. बाकी चिंता नाही.
1 Feb 2012 - 1:01 pm | पुण्याचे वटवाघूळ
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. एकूणच पुढील पिढीला चिनी भाषा शिकावी लागणार असे वाटते.