ब्लोगबद्दल थोडस ...

शेफ चेतन's picture
शेफ चेतन in काथ्याकूट
28 Jan 2012 - 6:53 pm
गाभा: 

नमस्कार,
मिपावरच माझ हे पहिले लेखन.चू.भू.द्या.घ्या.
नुकताच मी माझा ब्लोग तयार केला.मी पाहिलेले इंटरनेटवर आणि मिपाकरांचे ब्लोग ह्यांमध्ये अनेक गोष्टी अशा होत्या ज्या मला माझ्या ब्लोगवर ताकाव्याशा वाटल्या.ब्लोग तयार करताना ज्या अडचणी मला आल्या आणि येत आहेत त्यांचे समाधान मिपाकर निश्चित करतील अशी अशा आहे.अडचण्नींची यादी खाली देत आहे.
१. मी जी लेबल्स तयार केली आहेत त्या लेबलमध्येहि मला सबलेबल हवी आहेत.ती कशी घ्यायची?
२.काहींच्या ब्लोगवर गोल फिरणारी पृथ्वी होती ती कशी घ्यायची.
३.templet नुसार गजेट बदलतात का?
४.मला ब्लोग मधले लेखन आधी टाकलेले प्रथम असे हवे आहे तसे करण्यासाठी काय करावे.
५. कोपिराईत कसे घ्यावेत?
६.काहींच्या ब्लोगमध्ये एक कॉम्बो बॉक्स कि काय दिसलं होत. ते कस टाकायचं?

इतरही अनेक प्रश्न आहेत.गुगल वर सर्च केली असता उपयोगी पडेल अशी माहिती मिळाली नाही.रादर ब्लोग मधून पैसे कसे कमवायचे यावरच माहिती होती.मिपाकर मला मदत करतील अशी अपेक्षा आहे.

हा माझा ब्लोग:
http://chefchetanscorner.blogspot.com/

तुमच्या मदतीची आणि सूचनांची वाट पाहणारा शेफ चेतन.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jan 2012 - 7:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वप्रथम मिसळपाववर आपले स्वागत आहे. आपल्या ’ब्लोग’ वर आपले उत्तमातले उत्तम लेखन वाचायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

खालीलप्रमाणे दुवे चाळून घ्यावेत. उपयोगाचेच आहेत काय खात्री करुन घ्यावी. अजून काही माहिती लागली तर जरुर विचारा. उद्या मला सुटी आहे, पहाटे पाच पासुन गुगलुन गुगलुन माहिती देण्याचा प्रयत्न करीन. बाकीचे मिपाकरही यात भर घालतीलच.

दुवा क्र. १.
दुवा क्र. २.
दुवा क्र .
दुवा क्र..
दुवा क्र. .

-दिलीप बिरुटे

धन्यवाद सर.मला इंग्रजी ब्लोग बद्दल मदत हवी आहे.

पैसा's picture

30 Jan 2012 - 9:42 am | पैसा

तुम्ही किचेन ताईंचे चेतन का? तर मिपा परिवारात आधीच आहात. गणपा, विशाल यांचे ब्लोग पहा, म्हणजे कल्पना येईल.

शेफ चेतन's picture

30 Jan 2012 - 12:50 pm | शेफ चेतन

गणपा यांचा ब्लोग बघितला.सुंदरच आहे.
विशाल याच्या ब्लोगच नाव काय?त्यांना कस शोधायचं.आणि मिपावरच एखाद लेखच नाव माहित असेल तर तो कसा शोधायचा.

पैसा's picture

31 Jan 2012 - 12:16 am | पैसा

म्हणजे सापडेल!
विशाल म्हणजे विशाल कुलकर्णी. http://magevalunpahtana.wordpress.com/ हा त्याच्या ब्लॉगचा पत्ता. साधा दिसणारा, पण त्या ब्लॉगला कितीजणांच्या भेटी आहेत बघा.

तुमचा ब्लॉग पाहिला, लेखन आणि फोटो चांगले आहेत, पण बॅकग्राउंड जास्त डोळ्यात भरणारी झालीय. त्यामुळे काय होतं, की पदार्थांच्या फोटोकडे लक्ष कमी जातं.

http://chakali.blogspot.com/ हा खाद्यपदार्थांसाठीचा सर्वात लोकप्रिय ब्लॉग बघा. त्याची रचना साधीशीच आहे. पण बघणार्‍याचं सगळं लक्ष लिखाणाकडे आणि फोटोकडे जातं.

मिपावरचा एखादा लेख शोधायचा असेल तर 'शोध' ही लिंक वापरू शकता. त्या लेखकाच्या दुसर्‍या लेखांवर सगळ्या लेखांच्या लिंक्स मिळतात, तसंच लेखाचे काही शब्द आणि मिसळपाव असं गुगलवर सर्च केलं तरी पटकन लेख सापडतो! तुमच्या ब्लॉगला शुभेच्छा!

अमोल केळकर's picture

30 Jan 2012 - 11:45 am | अमोल केळकर

आपला ब्लॉग चांगला आहे. :)

अमोल केळकर

शेफ चेतन's picture

30 Jan 2012 - 12:51 pm | शेफ चेतन

धन्यवाद.

१. मी जी लेबल्स तयार केली आहेत त्या लेबलमध्येहि मला सबलेबल हवी आहेत.ती कशी घ्यायची?

उत्तर माहित नाही. तुम्हाल जमल्यास मलाही कळवा.

२.काहींच्या ब्लोगवर गोल फिरणारी पृथ्वी होती ती कशी घ्यायची.

इथुन फिरणारी पृथ्वी मिळेल.

३.templet नुसार गजेट बदलतात का?

४.मला ब्लोग मधले लेखन आधी टाकलेले प्रथम असे हवे आहे तसे करण्यासाठी काय करावे.

एखाद कंटेंट टाकलं की संपादन (एडिट) करुन त्यावरची तारीख बदलता येते. आणि एकदा का तारखा बदलल्या की तुमच्या आवडी नुसार क्रमवारी येईल.

५. कोपिराईत कसे घ्यावेत?

या बद्दल थोडी माहिती इथे आणि इथे

६.काहींच्या ब्लोगमध्ये एक कॉम्बो बॉक्स कि काय दिसलं होत. ते कस टाकायचं?

हे अजुन करुन पाहिलं नाही.

शेफ चेतन's picture

30 Jan 2012 - 2:13 pm | शेफ चेतन

तुमचा ब्लोग खूप आवडला.खूप सुंदर आणि माहितीपूर्ण आहे.पृथ्वीसाठी धन्यावद.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Jan 2012 - 4:10 pm | विश्वनाथ मेहेंदळे

रिअल इस्टेट व्यवसायात एक म्हण आहे.
When it comes to real estate, The three most important things are location, locaiton and location !!!

तशीच ब्लॉग बद्दल तीन महत्त्वाच्या गोष्टी मला विचाराल तर मी म्हणेन. कंटेंट, कंटेंट आणि कंटेंट....
तुमच्या ब्लॉगचा कंटेंट चांगला असेल पण मी तो नीट पाहू शकलो नाही. याचे कारण म्हणजे ब्लोग ची background इमेज. या इमेज मुळे navigations नीट दिसत नाहीत. त्यावर जरूर विचार करा.

बरेच नवीन वेब डिझायनर सजावटीला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देण्याची चूक करतात, तेव्हा त्यांना हेच सांगितले जाते की "Your design should not overpower your content"

बाकी ब्लॉग या प्रकाराबद्दल फार तांत्रिक माहिती नसल्याने पास :-)