घरातील बाईमाणसाला जास्त काम लावू नये, शक्यतो स्वत:चा हातभार वाढवावा,असे माझे मत आहे. असो.
आई-वडिल, मुलगा-सून, नातवंडे असे भरलेले कुटूंब दिसणे हल्ली दुर्मिळ होत चालले आहे. त्यातही जी काही थोडी कुटूंबे आहेत, तिथे सूनांना योग्य वागणूक मिळत नाही. बायकांनी नेहमी घरकाम आणि नवर्याने तंगड्या पसरुन टीव्ही बघत चमचमीत खाण्याच्या फर्माईशी सोडायच्या असे समीकरण सर्रास दिसते. [ आमच्या गणपासारखे काही अपवाद सोडून...]
माझ्या गावाला (झुमरीतलैय्या) ओळखीचे अशा एक कुटूंबात आई-वडिल, दोन मुले -सुना, नातवंडे आहे. तर झाले काय... धाकटा मुलगा दुबईत नोकरी करतो. त्याची बायकोसुद्धा चांगल्या कंपनीत नोकरी करते, अर्थात घरकामातही ती अजिबात कमी पडत नाही. त्यामुळे घरी-दारी तिचे कौतुक होत असते. पण यामुळे कामाचा सगळा बोजा तिच्यावर पडतो आणि नवरा मात्र दिवाणखान्यात बसुन बीयर ढोसत बसतो.
हे पाहून थोरली सून गावाला राहून नोकरी करु लागली.[ म्हट्ले जाउद्या...घरात, शेतात काही काम होत नाही, नोकरीवर तरी उजेड पडेल....] मधे एकदा गावाला जाण्याचा योग आला असता असे दिसले की, बाईसाहेब स्वतःचे आवरून कामाला जायला लागल्या तर तिच्या खाष्ट सासूबाई घरी तिच्यावर ओरडल्या नाष्टा, स्वयंपाक, धुणे, भांडी, पाणी भरणे, दोन नातवंडांचे आवरणे कोण करणार म्हणुन.
हे सर्व पाहीले की असे वाटते चुकते कोण? सासू , सून की आळशी नवरा? घरकामाची जबाबदारी एकट्या बाईचीच का? मुलगा का म्हणुन काही करत नाही. आजकाल मुलीही मोठ्या हुद्द्यावर काम करता (आयटी वैग्रे) . मग मुलानेही घरकामात हातभार लावायला नको काय? स्वत:चा मुलगा ठोंब्या असुनही सूनेवर आगपाखड करुन स्वतःचे आणि सूनेचे ब्लडप्रेशर वाढवणारी सासू चुकीची? की वर्षानुवर्षाची भारतीय परंपरा झुगारुन घरकामाला फाटा देणारी सून चुकीची? की झेपत नसताना काम करणारी दुबैची सून चुकीची? की सासूबाईंचे २ ठोंबे चुकीचे?
{मिपाकर यावर नक्कीच काही चांगले मार्गदर्शन करतील अशी खात्री आहे. उत्तर माहिती असुनही उत्तर न देणार्या मिपाकरांच्या डोक्याची शंभर शकले होतील आणि या धाग्याला फाट्यावर मारणार्या मिपाकरांचा आयडीच गोठवला जाइल}
प्रतिक्रिया
25 Jan 2012 - 6:36 pm | सूड
आमची आज्जी काय म्हणत्ये ते पाहू, आम्ही या बाबतीत अनुभवशून्य असल्याने पास !!
26 Jan 2012 - 9:47 pm | रेवती
येता जाता माझ्यावर अवलंबून राहू नकोस.
लग्नाळू झालास की आता.
चुकत माकत का होईना या क्षेत्रातही तयार होशील.
बरं, या अठवड्यात कुठला पदार्थ शिकलास?
25 Jan 2012 - 7:28 pm | प्रचेतस
१ तारखेचे वेध चालू झालेले दिसत आहेत. ;)
26 Jan 2012 - 12:14 pm | प्रशांत उदय मनोहर
एल. ओ. एल.
25 Jan 2012 - 7:56 pm | कपिलमुनी
अर्थव्यवहार उखाणे औषधोपचार कथा कला चारोळ्या नृत्य संगीत हे ठिकाण गुंतवणूक धोरण नाट्य प्रतिशब्द प्रवास प्रेमकाव्य बालकथा मांडणी संस्कृती कविता म्हणी वावर देशांतर धर्म गझल पाकक्रिया बालगीत भाषा राहती जागा वाक्प्रचार विनोद इतिहास मुक्तक वाङ्मय व्याकरण विडंबन व्युत्पत्ती शब्दक्रीडा साहित्यिक नोकरी शब्दार्थ शुद्धलेखन समाज जीवनमान सुभाषिते तंत्र फलज्योतिष भूगोल राहणी विज्ञान क्रीडा सामुद्रिक अर्थकारण कृष्णमुर्ती ज्योतिष राजकारण राशी शिक्षण मौजमजा प्रकटन मत लेख विचार शुभेच्छा संदर्भ सद्भावना अभिनंदन चौकशी प्रतिसाद बातमी शिफारस माध्यमवेध सल्ला अनुभव प्रश्नोत्तरे मदत माहिती प्रतिक्रिया वाद आस्वाद प्रतिभा समीक्षा भाषांतर विरंगुळा
;)
25 Jan 2012 - 8:11 pm | मस्त कलंदर
टीव्हीवर एक जाहिरात लागते. आईची कंबर दुखत असल्याने ती जिन्यावरून कण्हत कण्हत कसेबसे ओझे वाहून नेत असते. तिचा मुलगा त्याच्या बाबाला म्हणतो,"सारा काम मम्मी ही क्यूँ करती है?" यावर मग बाबा आईच्या कमरेला आयोडेक्स फियोडेक्स लावतात आणि आई पुन्हा कामाला कंबर कसून सज्ज होते. आणि आकाशवाणीसारखं कुणीतरी मागून म्हणतं, "आपका दर्द अपनोंका दर्द ना बनने दें"
फक्त घरीच नाही, तर टीव्हीवर तरी दुसरं काय दाखवतात? आणि हो, कौतुकाने सटीसहामाशी एखादा पदार्थ बनवला तर त्याचे लगेच फोटो काढून मिरवणारे नवरे कधी-मधी घरकाम/स्वयंपाक न करण्याचे स्वातंत्र्य घेणार्या बायकांबद्दल काय बोलतात हे सांगायला नकोच..
कॉलिंग सुजय कुलकर्णी अँड प्रविन भप्कर!!!
25 Jan 2012 - 9:53 pm | श्रावण मोडक
हं... ;) एका वाक्यात किती तीर!
25 Jan 2012 - 10:25 pm | मस्त कलंदर
इतक्या दिवसांनी प्रतिसाद दिला तर दणक्यात द्यायला नको का हो?
25 Jan 2012 - 10:52 pm | प्रशांत
दणक्यात ???
25 Jan 2012 - 11:32 pm | गणपा
घराचा आहेर. ;)
=))
25 Jan 2012 - 11:39 pm | मस्त कलंदर
गंपाभौ आणि प्रशांतभौ, उदाहरणार्थ अभ्यास वाढवा.
25 Jan 2012 - 11:54 pm | गणपा
एक उदाहरण माझ्या माहितीतलंच आहे. :)
बाकीची व्यनी करून कळवं. ;)
26 Jan 2012 - 12:11 am | स्मिता.
एका दगडात किती पक्षी मारलेस गं??? ;)
हे प्रत्येकवेळी वाचून सहमत व्हायला लागतं.
25 Jan 2012 - 8:12 pm | पैसा
असल्यामुळे सुखान्तच झाली पाहिजे! त्यामुळे चर्चेच्या शेवटी सर्वानाच पश्चात्ताप झाला असा उपसंहार लिहायला विसरू नका!
25 Jan 2012 - 8:16 pm | मराठी_माणूस
आयटी म्हणजे मोठ्ठा हुद्दा ? हे नवीनच ऐकतोय ?
25 Jan 2012 - 9:34 pm | रंगोजी
चूक सासूचीच!
तिने आपल्या तरुणपणी स्वत: काम न करता आपल्या नवर्याला घरकामाची सवय लावली असती तर, वडिलांकडे बघून दोन्ही मुलांना कामाचे वळण लागले असते. तिच्या दोन्ही सुना आरामात कोचावर टीव्ही बघत बसल्या असत्या. आणि घरात फार फार तर रिमोट सासूकडे की सुनेकडे ह खटका उडाला असता. (त्यातही दोघीना एकाच मालिका हवी असल्यास प्रश्नच नाही)
26 Jan 2012 - 12:29 pm | परिकथेतील राजकुमार
यात आम्ही काय डोंबल मार्गदर्शन करणार?
आणि समजा केलचं (आपले मिपाकर हौशी हो भारी. ;) ) तर त्या गावच्या सुनबाई ऐकतीलच याची ग्वाही तुम्ही देणार का? ;)