उद्याच्या बाजाराबाबत

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in काथ्याकूट
18 Oct 2007 - 10:40 pm
गाभा: 

नमस्कार,

अपेक्षेप्रमाणे शेअरबाजार खाली आला आहे. काल दुपारी झालेल्या पुलबॅक वर भाळून ज्या मूर्खांनी काल दुपारी खरेदी केली, त्यांनी स्वत:च्या मूर्खपणाला शिव्या द्याव्या.

कारण मार्केट प्रचंड ओव्हरबॉट होतं आणि त्याला पडायला काहीतरी कारण पाहिजे होतं. ते सेबीने दिलं इतकचं. नाहितर चिदुच्या (चिदंबरमच्या) गोड गोड साखरपेरी आश्वासनानंतर आज फॉलोअप बाइंग दिसलं असतं, पण तसं झालं नाही, ते होणार नव्हतं.

आज ते़जीमातेच्या महाआरत्या चालल्या नाहीत. कोणताही विधीनिषेध न बागळता एखाद्याने लुंगी सोडावी तस मार्केट आज "सुटलं".

आम्ही मंदीतच होतो आणि आहोत. जे कोणी तेजीत असतील त्यांचे स्टॉपलॉस हिट झाले असतील.

जे मंदीत आहे त त्यांनी उद्यासाठी म्हणजे १९ ऑक्टोबर २००७ साठी निफ्टी स्पॉटला ५५६२ चा स्टॉपलॉस ठेवावा. त्यावर निफ्टी जाणे कठीण आहे. जरी सकाळी मार्केट वर नेलं तरी दुपारी प्रॉफिट बुकींग मोठ्या प्रमाणात होईल असा आमचा अंदाज आहे.

सिप्ला, डॉ. रेड्डी आणि हिंदुस्थान पेट्रोलियम हे खरेदीसाठी (डिलिव्हरी) आकर्षक वाटत आहेत. त्याचप्रमाणे इंडिया बुल्स फायनान्शिअल सर्विसेस आणि आयबी रिअल इस्टेट या दोन्ही कंपन्या ज्यांना आमच्यासारखी कंड आहे, त्यांच्यासाठी खूप चांगल्या वाटत आहेत. उद्या या दोन कंपन्यांची केलेली खरेदी येत्या दोन आठवड्यात चांगला नफा मिळवून देईल असे वाटते.

आपला,
(सटोडिया) धोंडोपंत

प्रतिक्रिया

माझ्या मते अजुन खाली जाण्याची शक्यता आहे, किमान ४०० पाइण्ट तरी. आज खरेदी करु नये.

ईत्यादि

क्रेमर's picture

22 Jul 2010 - 9:25 pm | क्रेमर

असे मार्गदर्शक, खर्‍या जीवनात उपयोगी पडू शकतील धागे सध्या दिसत नाहीत.

- (इगाराशी मोटरचा मालक) क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.