सध्या महाराष्ट्रात जोरदार राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत.
१. कलमाडी चुपचाप आणि बिनबोभाट सुटले. थोरल्या राणीसाहेबांच्या कृपेने अगदी मोक्याच्या वेळेस सुटका झाली म्हणायची! आता ते पुण्यात आपले पुण्य दाखवणार का अज्ञातवासात जाणार की पुन्हा ऑलिम्पिक भारतात आणण्याच्या हर्क्युलियन साहसात सहभागी होणार?
२. मुंढे काका, पुतणे, भाऊ यांची भाऊबंदकी. त्यावर थोरले पवार आणि पुतणे पवार ह्यांची सूचक शेरेबाजी.
३. अजित पवार, निवडणूक आयोग, राज ठाकरे, आयुक्त, क्लीन चिट वगैरे चविष्ट तोंडीलावणे आहेच.
पवारांच्या आचारसंहिताभंगावर जालीम उपाय म्हणजे आय आम सारी असे म्हणणे असे दिसते आहे.
४. आज आमच्या ठाण्याचे परांजपेजी थोरल्या साहेबांच्या तंबूत डेरेदाखल. मग त्यांची प्रतिमा जाळणे वगैरे नेहमीचेच यशस्वी कार्यक्रम. थोरल्या ठाकर्यांची शिवीगाळ, थोरल्या साहेबांचे शोलेतील ड्वायलाकबाजी (तुम एक मारोगे तो हम चार मारेंगे वगैरे).
एकंदरीत बरीच धुळवड होते आहे. ह्या हातापाईत कुठे महागाई, ऊर्जा, वाहतूक, भ्रष्टाचार वगैरे (तुलनेने) गौण गोष्टी दिसत नाहीत. पण सामान्य माणसाला दोन घटका करमणूक म्हणून चांगले आहे. शिवाय सगळे पक्ष दलबदलूपणा, संधीसाधूपणा ह्यात तोडीस तोड आहेत असा दिव्य साक्षात्कार होतो आहे हे बरे.
तुम्हाला काय वाटते?
प्रतिक्रिया
21 Jan 2012 - 12:17 pm | सुक्या
ते म्हणतात ना, यथा प्रजा तथा राजा.
बाकी भारतापुढे सलमान खान चे लग्न, सचिनचे शंभरावे शतक, राहुल गांधी हे पंतप्रधान होनार की नाही असे महाभयंकर प्रश्न असतान कोण फालतु महागाई, ऊर्जा, वाहतूक, भ्रष्टाचार वगैरे कडे लक्ष्य देतो हो.
21 Jan 2012 - 12:26 pm | मृगनयनी
ह्म्म... एक विषण्ण करणारा उपहास!!!.... :|
बाकी आनन्द परान्जपे'सारख्या ट्रैडीशनल भटाला शिवसेनेने गमावलेच्च! किम्बहुना "गमावले" म्हणण्यापेक्षा पवारांनी शिवसेनेच्या तोन्डचा मोठ्ठा "लोण्याचा गोळा" बोक्यासकट पळविला..... :)
आता जितेन्द्र आव्हाड ठाण्यात "नाकापेक्षा मोती जड" असे वाटायला लागल्यावर अजित पवारान्नी मस्त गेम टाकली... एका दगडात दोन पक्षी मारले. परान्जपेंच्या रुपाने आव्हडाअमोर एक प्रतिस्पर्धी निर्माण केला.. आणि शिवसेनेलाही जबरदस्त चपराक दिली.
उद्धव ठाकरेंची मनमानी "मनसे"च्या निर्मितीमुळे उघड झालीच्च होती. आता आनन्द परान्जपेंसारखा एक पारम्पारिक योद्धा गमावल्यावर त्यावर शिक्कामोर्तब झाले. कुणी राजकारण शिकावे ते "पवारां" कडून.....
21 Jan 2012 - 2:00 pm | जोशी 'ले'
बोका होताच तो ....गेल्या मनपा निवडनुकीत तिकिट न मिळाल्यामुळे मनसे चा प्रचार करत होता,पण नंतर वडिलांच्या निधना मुळे रिक्त झालेल्या जागेवर खासदारकीच लोणी मिळवलं, बाकि त्यांच्या जान्याने शिवसेनेने एक खासदार गमवला या उप्पर काहि नाहि
24 Jan 2012 - 3:50 pm | गणेशा
मग असे असेन तर, ज्यांना साधे मनपाचे तिकिट मिळत नव्हते, त्याला डायरेक्ट खासदारकीचे टिकिट देवुन शिवसेनेने ठाण्यातील एका निष्ठावान नेत्याचे तिकिट फाडले म्हणायचे ...
24 Jan 2012 - 8:27 pm | जोशी 'ले'
खरय
21 Jan 2012 - 12:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नगर परिषदांच्या निवडणुकीनंतर आता जि.प. आणि पंचायत समितीच्या निवडणूक ही पायवाट पुढे आमदार-खासदार या मुख्य रस्त्याकडे जाणारी असली तरी विकासाच्या नावाखाली येणारे शासनाचे सर्व पॅकेजेस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये येऊन थांबतात. खेडी तालुके यांचा विकास साठ-वर्षांपासून मंदगतीने होतच आहे. तेव्हा या निवडणूका नेत्यांच्या प्रत्येक पिढींचे पुनर्वसनासाठी आवश्यक असतात. तेव्हा त्यांच्यासाठी निवडणुकीसारखा मोठा धंदा नाही. काका, भाऊ, पुतणे, आप्पा, दादा, हे सर्व आपापल्या जागा बुद्धीबळाच्या सोंगट्याप्रमाणे ठरवलेल्या चाली चालतात. स्वार्थाआड येणार्यावर मात करण्याचा प्रयत्न करतात. आपण ही सर्व सोंगं आणि राजकीय खेळ्या व्यवस्थित बघायच्या आणि आपण आपलं गालातल्या गालात हसत राहीलं पाहिजे. उगाच अस्वस्थ होण्यात काही फायदा नाही,नसतो. [धनंजयही आपला नसतो आणि गोपिनाथदादाही आपले नसतात] आपण विचार करुन मतदान केले तरी आपण ज्याला मतदान करतो तो निवडून येत नसल्यामुळे वीजेचे भारनियमन, महागाई, खड्यातले रस्ते, पाण्याची असुविधा, घाणेरड्या नाल्या, रस्यावर तुंबलेली गटारे यांना सोसण्याशिवाय पर्याय नाही.
बाकी, सच्याचे शंभरावे शतक, राहुल गांधी उत्तरप्रदेशात किती 'शिट्स' आणतात आणि येत्या महिन्या दोन महिन्यात का होईना सहाव्या वेतन आयोगातील पगाराचे तुंबलेले येरीयर्स मिळतील काय हे सध्या माझ्यासमोरील मोठे प्रश्न आहेत.
-दिलीप बिरुटे
21 Jan 2012 - 9:31 pm | पक पक पक
एकदम सहमत आहे ....
23 Jan 2012 - 12:58 am | पाषाणभेद
प्राडॉ. सही. आपापल्या घरातले सगळे जण वेगवेगळ्या पक्षात रहायचे व सगळ्यांच्या पोटापाण्याची सोय करायची ही आताच्या काळात राजकारण्यांची जगण्याची पध्दत झाली आहे. काका-पुतणे संघर्ष त्याचेच लक्षणे आहेत.
21 Jan 2012 - 6:00 pm | चिरोटा
कसेल घंटा राजकारण? तकलादू ,पोकळ पायावर पक्षाची स्थापना,स्वतःची नातलगांची तुंबडी भरणे. एवढा मोठा 'मुत्सद्दी' वगैरे विशेषणे असूनही ५४५ पैकी फक्त ९ खासदार.
22 Jan 2012 - 9:18 am | मराठी_माणूस
सहमत. त्यांच्या कडे जाणारी माणसे स्वार्था ने अंध झालीली असतात. तुकडा फेकला की शेपुट हलवत येतात त्यात साहेबांचे कसले कर्तुत्व
21 Jan 2012 - 8:04 pm | पक पक पक
ह्या हातापाईत कुठे महागाई, ऊर्जा, वाहतूक, भ्रष्टाचार वगैरे (तुलनेने) गौण गोष्टी दिसत नाहीत.
अण्णा हजारे सन्यस्थ झाले काय..? इतक्यात काही कळ्ल नाहि....
21 Jan 2012 - 10:06 pm | daredevils99
अण्णा हजारे सन्यस्थ झाले काय..? इतक्यात काही कळ्ल नाहि....
मुंबैकरांनी मारलेल्या एकाच थपडेमुळे अण्णा मौनात गेलेत :)
23 Jan 2012 - 9:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुंबैकरांनी मारलेल्या एकाच थपडेमुळे अण्णा मौनात गेलेत
कृपया कमी शब्दात अधिक अपमान करु नये. टीम अण्णांच्या प्रत्रकार परिषदेत कोणी माथेफिरुने बूट फेकुन मारला तरी आमच्या दुसर्या स्वातंत्र्ययुद्धाला कोणी रोखू शकत नाही. श्री अण्णा हजारेंनी 'प्रश्नोपनिषद' [दै. सकाळच्या सौ.] लिहिले असून पंतप्रधान आणि वरिष्ठ नेत्यांना त्यांनी काही महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे श्री अण्णा सन्यस्थ वगैरे नाही. काँग्रेसविरुद्ध आमचा प्रचार नाही, हे सांगून झाले आहे. आता पुढे काय करावे म्हणून त्यांचे वैचारिक मंथन चालू असावे, काळजी करु नये.
-दिलीप बिरुटे
(श्री अण्णा आणि टीम यांचे कौतुक असलेला)
23 Jan 2012 - 1:30 pm | अनामिका
अण्णांचे कौतुक असणारे आणि त्यांना समर्थन असल्याची ग्वाही देणारे येताजाता त्यांच्या आंदोलनाला शालजोडीतला आहेर का देत असतात हे काही समजले नाही ....किंबहुना हे अश्या प्रकारचे जाहीर समर्थन आमच्यासारख्यांसाठी तरी निदान अगम्य आहे बुवा?
ह घ्या....डॉ ......
बाकी ह्या प्रश्नाचे उत्तर सध्या संभ्रमावस्थेत असलेल्या सेनेकडे देखिल नाही.....बाकी सेनेबद्दल जितके बोलू तितके कमी....तरीही न रहावून सेनेचे आद्य चाणक्य श्री संजय राऊत यांना एक अनावृत्त पत्र पाठविण्याचे धाडस केले होते ..त्याचे त्यांनी दिलेले उत्तर मुळ मुद्द्यास हात घालणारे जाणवले नाही...इथे पत्र देण्याचा प्रमाद करतेय ..काय माप काढायची आहेत ती सदस्यांनी यथाशक्ती काढून घ्यावीत हि नम्र विनंती....
पत्र क्रं १
संजयजी!
सस्नेह जयमहाराष्ट्र!
याच पवारांच्या श्रीमुखात हरविंदरने भडकवल्यावर कुणी तरी आपल्या आप्तांपैकी स्वर्गवासी झाल्यासारखे तुंम्ही रुदन केले होतेत्..आणि पवार कसे सर्वकष नेते आहेत महाराष्ट्राचे स्वाभिमान इत्यादी आहेत अश्याप्रकारचे संपादकिय सामनामधे प्रसवले होतेत....पवारांचे गोडवे गाताना तुमची लेखणी थकत नव्हती....आता उद्याच्या सामनातील संपादकिय लिहिताना तुंम्ही पवारांवर शरसंधान करत त्यांचे व पर्यायाने राष्ट्रवादीचे वाभाडे काढाल.....पण संजयजी एक विसरू नका "बुंद से गयी वो हौद से नही आती"...आमच्यासारख्या अतिसामान्य निष्ठावान शिवसैनिकांचा जीव हे सगळ बघून तिळ तिळ तुट्तो हे तुंम्हास सांगून उमजणार नाही....आनंदच्या वडिलांनी प्रकाशकाकांनी सेनेसाठी रक्ताचे पाणी करत दिघेंच्या खांद्याला खांदा लावून आमच्या ठाण्यात सेना वाढवण्यात रुजवण्यात आपली उभी हयात घालवली..... ठाण्यात सेना उभी रहाताना आंम्ही स्वतः बघितली आहे आणि त्याच सेनेबरोबर आंम्ही देखिल घडत गेलो....धर्मवीर आनंद दिघे ,गणेश नाईक ,सतिश प्रधान,प्रकाश परांजपे,साबिर शेख ,मोदा जोशी,राम कापसे यांच्या सारख्या सेनेच्या शिलेदारांनी दिवसरात्र एक करत ,रक्ताचे पाणी करत ,प्रसंगी तेंव्हा वाहनांच्या रैलचेलीच्या अभावी सतत पायपीट करत माननिय शिवसेनाप्रमुखांचे विचार जनमानसांत रुजवण्याचे कठिण व दिव्य कार्य केले.....सेनाप्रमुखांच्या राष्ट्रवादी विचारांचे तेंव्हा चेतवलेले स्फुल्लींग आजतागायत सेनेचा भगवा आमच्या ठाण्यात डौलाने फडकवत ठेवण्यात महत्वाचे योगदान देत आलय्..पण कालानुरुप परिस्थिती बदलली ...८०% समाजकारण व २०% राजकारण करणारी सेना जेंव्हा ८०% राजकारणात उतरली तेंव्हापासून परिस्थिती बदलली....मधल्या काळात दिघेंच्या नेतृत्वाखाली ठाण्यात सेनेने कायापालट करुन दाखवला....दिघे सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्यास अग्रक्रम देत ....दिघेंच्या कार्यकाळात सेनेची पकड जरादेखिल ढिली पडली नाही किंबहुना ती त्यांनी जाणिवपुर्वक कमी पडू दिली नाही.. मधल्याकाळात दिघेंचे खच्चिकरण करण्याचा देखिल प्रयत्न सेनेच्या काही नेत्यांकडून झाला....पण सेनेशी एकनिष्ठ असणार्या ठाणेकरांनी सतत दिघेंची साथ दिली.. सामान्य जनतेला दिघेंचा मोठा आधार होता.रात्री बेरात्री त्यांच्या दारात मदत मागण्यास गेलेल्या ठाणेकराला त्यांनी कधी विन्मुख पाठवले नाही...आणि २००१ साली एका क्षुल्लक अपघातात दिघे गेले ..त्यांच्या जाण्याबद्दल देखिल अनेक प्रवाद आहेत्....ते गेले कि घालवले गेले हे ज्याने केले असेल तोच जाणो ....झपाट्याने वाढलेल्या ठाण्याने दिघेंच्या जाण्यानंतर आपला आनंदच गमावला......दिघेंच्या जाण्याने तयार झालेली पोकळी त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या एकनाथ शिंदे यांनी भरुन काढण्याचा बराच प्रयत्न केला त्यात ते काही प्रमाणात यशस्वी देखिल झाले....पण तो पर्यत पुलाखालून आणि वरुन बरेच पाणी वाहून गेले होते....पैशाची आणि सत्तेची धुंदी सेनेतल्या वरच्या फळीतल्या नेत्यांना नगरसेवकांना ,स्थानिक नेत्यांना चढली होती....आणि त्याचमुळे सेनेच्या मुळ उद्देशाशी फारकत घेत फक्त स्वत:च्या प्रगतीतच फक्त या सगळ्यांनी अधिक रस घेतला...व त्याचमूळे सेनेची सर्वसामान्यांशी जोडली गेलेली नाळ तुटली....जनप्रतिनिधींमधे एक प्रकारची गुर्मी आणि बेदरकारिता वाढीस लागली.....त्याच काळात सेनाप्रमुखांच्या आजारपणामुळे त्यांचा शिवसैनिकांशी होत असलेला थेट संवाद क्षीण होत गेला...आणि सेनेतल्या कुरघोडी वाढीस लागल्या...याच काळात सेनेतल्या बर्याच नेत्यांनी सेनेशी फारकत घेत राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाशी घरोबा केला...सेनेचे खच्चीकरण करण्याचे अथक प्रयत्न या सेना सोडून गेलेल्यांनी केले...सेनाप्रमुखांच्या विचारांवर निष्ठा असण्यार्यांनी त्यांचे प्रयत्न सफल होऊ दिले नाहीत्....पण हि गळती सुरुच राहिली...आणि राज यांच्या सेना सोड्ण्याच्या निर्णयाने या गळतीने कळस गाठला....स्वत:च्या वैयक्तिक अहंकारापायी दोन्ही ठाकरेंपैकी एकानेही सामंजस्याची भुमिका घेतली नाही आणि मनसेचा जन्म झाला....मनसेच्या जन्माने सेनेचे नुकसान आपण लोकसभा निवडणुकांमधे बघितलेच....
मधल्या काळात इतर पक्षातील सदस्यांना सेनेने सामावून घेण्याचा नविन पायंडा पाडत नव्याने खोगिरभरती सुरु केली सेनेचा हाच निर्णय सेनच्या मुळावर आला हे मान्य करण्याइतका परिपक्वपणा नविन सेना नेतृत्वाकडे व सेनेच्या चाणाक्यांपाशी असावयास हवा........इतरांवर टिका करताना स्वतःवर होणारी टिका देखिल पचवण्याची ताकद राजकिय नेतृत्वाकडे असायलाच हवी पण या भुमिकेशी सेनेचा दुरान्वयानेही संबंध नाही..... "हम करे सो कायदा' या न्यायानेच पक्ष चालवायचा या हेकेखोर भुमिकेमुळे सेनेचे सर्वाधिक नुकसान झाले आहे....अण्णा हजारे यांच्या आंदोलनासंदर्भात सेनेने घेतलेल्या धरसोड भुमिके बद्दल देखिल शिवसैनिकांच्या मनात रोष आहे.......माझ्यासारखे असे कित्येक शिवसैनिक आहेत ज्यांनी आजतागायत सेनेची साथ सोडली नाही ..आणि भविष्यातही आंम्ही अखेरच्या श्वासापर्यंत सेनेबरोबरच राहू ...
लिहीण्यासारखे खुप काही आहे पण आपल्याच प्रिय पक्षावर टिका करताना देखिल अतिव दु:ख होतय....
म्हणून इथेच थांबते..
अतीअवांतर--काही प्रतिक्रिया-
आनंद परांजपे यांची लाचारी आणि त्यांनी केलला विश्वासघात बघून आनंद दिघे आणि प्रकाश परांजपे यांची आत्मे आज स्वर्गात रडत असतील.....आनंद यांनी वडीलांच्या नावाला काळीमा तर फासलाच पण नैतिक अधःपतनाची देखिल हद्द केली
सेनेच्या चाणक्यांना आनंद दिंघेचे मोल निदान आज तरी समजले असावे.
येताजाता सांप्रदायिक आणि जातियवादी असल्याचा ठपका ठेवत भाजपा सेनेच्या नावाने शिमगा करणार्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपाचे धनंजय मुंडे आणि सेनेचे आनंद परांजपे यांच्यासारखे त्याच तथाकथित सांप्रदायिक पक्षांचे आमदार खासदार आपल्या पक्षात बरे चालतात...?
बाहेर पडलेल्या प्रत्येकाला चार आण्याचा म्हणुन हिणवण्यापेक्षा सेनेने वेळीच पावले उचलत आत्ममंथन करावे नाहीतर काही वर्षात सेनेची अवस्था फक्त नेतेच आहेत आणि कार्यकर्ते नाहीतच अशी व्हायची...-शिवसैनिक
वाघ हा वाघच रहातो कायम त्याची कधी शेळी होत नाही....पण तो वाघ यांना आयुष्यभराला कायमचा पुरणार नाही हे सत्य सेनेच्या चाणक्यांना पचवता येत नाही...सदैव काय बाळासाहेबांवरच अवलंबून रहाणार का सेना?
जय हिंद !
जय महाराष्ट्र!
पत्र क्रं २
संजयजी!
आनंद परांजपे यांना सेनेने नगरसेवक पदाची उमेदवारी देखिल नाकारली होती पाच वर्षापुर्वी....प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर सहानुभुतीच्या लाटेवर स्वार होण्यासाठी आनंद यांना सेनेने बिनदिक्कत उमेदवारी देऊ केली...तेंव्हा देखिल ठाण्यात आनंद परांजपे यांची पत चार आण्याची देखिल नव्हती....उमेदवारी देताना सेनेने हा विचार केला नाही कि आनंद यांची लायकी नसताना त्यांना उमेदवारी देऊन कित्येक वर्ष तळागाळात प्रामाणिकपणे काम करणार्या एका शिवसैनिकाचा पक्षाच्या उमेदवारीचा हक्क आपण मारत आहोत.....आनंद यांना उमेदवारी न देता इतर एखाद्या सर्वसामान्य प्रामाणि़क निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती तरी ठाणे शहरात तो निवडून आलाच असता याला कारण स्व आनंद दिघे आणि माननिय बाळासाहेबांची पुण्याई .पण तेंव्हा सेनेने सारासार विचार न करता पक्षस्वार्थासाठी बेरजेचे राजकारण केले ....पहिल्यांवेळेस परांजपे निवडून आले तो मतदारसंघ आमचाच होता...मतदारसंघात परांजपेंनी काय काम केले हा संशोधनाचाच विषय होता तेंव्हा देखिल....
पण त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय चुकला होता ह्याची उपरती सेना नेत्यांना होणार का? व त्याही पेक्षा ती चुक लोकांसमोर मान्य करण्याचा प्रांजळपणा सेनानेते करणार का?.....पण एकुणच भारतिय राजकारणाची पत पुर्णपणे घसरली आहे आताशा....नैतिकता, निष्ठा , वैचारिकता ,तत्वनिष्ठा,राष्ट्रप्रेम हे शब्द फक्त लेखात वापरण्या पुरतेच उरलेत....बाकी वैयक्तिक आयुष्यात या शब्दांना व मुल्यांना मुळीच स्थान उरले नाही.....दुसर्या पक्षांतुन येणार्यांना पदे देऊन सेनेने आपल्याच लोकांवर बरेचदा अन्याय केलाच आहे....धरसोड वृत्तीने पक्षबदल करणार्यांना खरे पाहता पक्षात कुठलेही स्थान देणे उचित नाही पण हे चुकीचे पायंडे राजकिय पक्षांनी स्वार्थासाठी पाडले आणि त्याच चुकांची फळे आज सर्वच पक्ष चाखित आहेत्...सेना भाजपा इतर पक्षांपेक्षा वेगळे होते कारण भाजपा एक वैचारिक बैठक असलेल्यांचा पक्ष म्हणून व सेना सर्वसामान्यांसाठी लढणारा पक्ष म्हणुन जनमानसात परिचीत होता....पण सध्या आजुबाजुस बघतो तेंव्हा सेनेचा साधा शाखाप्रमुख देखिल पेजेरो शिवाय फिरताना दिसत नाही... हि सगळी सुबत्ता वरच्या कमाईतून आलेली असते हे न समजण्याइतकी जनता दुधखुळी नाही....महाराष्ट्राचा बिहार होतोय अशी ओरड बरेच जण करत असतात सतत पण सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा प्रत्यय घेतल्यावर महाराष्ट्र देखिल बिहार उत्तरप्रदेशच्या वाटेवरुनच मार्गक्रमणा करतोय हे सिद्ध होते.....राष्ट्रवादीच्या जन्मापासून महाराष्ट्रातील राजकिय वातावरण पुर्णपणे गढूळ झालय हे कटू सत्य आहे...राष्ट्रवादीच्या फोडाफोडीच्या राजकारणाने एक सिद्ध होतय की या पक्षाकडे स्वतःचा असा कोणताच विचार नाही त्यामुळे सच्चा कार्यकर्ता घडवण्याची ताकद या पक्षात नाही...पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ' हाच काय तो यांचा आणि यांच्या अखंड जगात भ्रष्टाचाराचे नायक अर्थात पर्यायाने परिंमाण ठरलेल्या पक्षप्रमुखांचा विचार ...तुमच्या प्रिय पवारांचा असा उलेख कदाचित आपणास रुचणार नाही पण जे सत्य आहे ते कुणीही कितीही लपवले तरी लपणार नाही.तुंम्ही कितीही पवारांचे गोडवे गा पण पवार हेच महाराष्ट्राच्या अधोगतीला आणि राजकिय अधःपतनाला कारणीभूत होत आहेत..
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
23 Jan 2012 - 1:40 pm | सुनील
,राम कापसे यांच्या सारख्या सेनेच्या शिलेदारांनी दिवसरात्र एक करत
रामभाऊंनी पक्षांतर केल्याचे ऐकले नव्हते बॉ कधी!
बाकी पत्र नेहेमीप्रमाणेच!
23 Jan 2012 - 4:00 pm | योगी९००
अनामिका,
तुमच्या पत्रातील शिवसेना आणि मा. बाळासाहेबांच्या विषयीची कणव जाणवली..
संजय राऊत यांचे उत्तर काय होते..?
बा़की.. आज मा. बाळासाहेबांचा वाढदिवस.. त्यांना ८५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा..!!! यावर एक धागा टाकणार होतो पण पिंजर्यात सापडलेल्या वाघाला लोकं खडे मारतात जे बघवत नाही ...म्हणून धागा टाकला नाही.
23 Jan 2012 - 4:08 pm | दादा कोंडके
त्यांनी दिलेलं उत्तर इथं टंकाल का?
उत्तर अगदी थातुर-मातूर असलं तरी, इतक्या पोटतिडकीने लिहिलेले प्रश्न त्यांच्या पर्यंत पोहोचलेतरी का?
23 Jan 2012 - 8:41 pm | मृगनयनी
शिवसेनेचे एकनिष्ठ "दत्ता साळवी"यान्चे सुपुत्र "गौरव साळवी" यान्नी "राष्ट्रवादी कॉन्ग्रेस"मध्ये नुकताच प्रवेश केलेला आहे. :|
दत्ता साळवींच्या म्हणण्यानुसार गेल्या ५-६ वर्षांपासून सेनेतील "काही" लोकांमुळे त्यांना सतत डावलले जात होते, ती वेळ "गौरव"वर येऊ नये, म्हणून वेळीच त्याला "राष्ट्रवादी"त पाठवण्याची व्यवस्था केली गेली... अर्थात "दत्ता'जी" स्वतः शिवसेनेबरोबर एकनिष्ठ राहणार आहेत!!!! :)
'आनंद परांजपे' यांचे देखील गार्हाणे सेनेतील "इतरां"कडून "डावलले" गेल्याचेच्च आहे. वर्तमानपत्रात आलेल्या त्यांच्या मुलाखतीनुसार त्यांच्या "परांजपे" या आडनावामुळे अनेकदा त्यांच्या जातीवरून, उच्चशिक्षणावरूनही कही शिवसैनिकांनी त्रास दिलेला आहे. आणि तोही अगदी १५ वर्षांपासून.. त्यांच्या वडिलांच्या कारकीर्दीपासून..
दत्ता साळवी आणि आनन्द परान्जपे या दोघान्च्याही म्हणण्यानुसार शिवसेनेतल्या "इतर काही" लोकांमुळे त्यांना सतत डावलले जाते. अर्थात बाळासाहेबांवरील दोघांचीही श्रद्धा अढळ आहे. त्यामुळे या ज्या काही "इतर" लोकांमुळे शिवसेनेचे नुकसान होत आहे, ते भरून येणे खरंच अवघड आहे. कारण उद्धवजींचे नेतृत्व कुठेतरी खरंच कमी पडत आहे.. आणि बाळासाहेबांचेही वय आज ८५ आहे...
शिवसेनेचीच्च्च्च्च्च्च सत्ता महाराष्ट्रात यावी... अशी खरंच खूप इच्छा आहे. फक्त ते "स्वप्न" सत्यात लवकर उतरावे, ही सदीच्छा!!!!! :)
* माननीय बाळासाहेब ठाकरे'जींना ८५व्या वाढदिवसाच्या मन्गलमय शुभेच्छा! :)
24 Jan 2012 - 12:31 am | अप्पा जोगळेकर
सदर दोन पत्रे लिहिण्याचे धाडस दाखवल्याबद्दल अभिनंदन.
पुढील गोष्टी सहजच डोळ्यांसमोर तरळून गेल्या.
=>कॉम्रेड देसाईं यांची कत्तल, आचार्य अत्रे यांचा वारंवार वरळीचे डुक्कर असा उल्लेख करणे.
=> दक्षिण भारतीयांविरुद्ध केलेल्या दंगलीत आरेचे स्टॉलसुद्धा जाळणे आणि मुंबईकरांचे तीन दिवस दुधावाचून झालेले हाल. शिवाय याच दंगलीत दक्षिण भारतीयांची सिलेक्टिव्ह दुकाने जाळली गेली हासुद्धा चमत्कारच.
=> सुपार्या घेउन कामगारांचे संप फोडणे, इंदिरा गांधींनी लादलेल्या जुलमी आणीबाणीला पाठिंबा देणे, जाणीवपूर्वक घडवून आणलेल्या हिंदू-मुसलमान दंगली(१९८४),मराठी अस्मितेचा मुद्दा सोडून हिंदुत्वाचा अजेंड्याची कास धरणे(१९८७),श्रीधर खोपकर खून(१९८९), आनंद दिघे यांचा विवाद्य मृत्यू,एन्रॉन बाबत घातलेला घोळ आणि मराठी जनतेचे केलेले अतोनात नुकसान.
=> लोकभावनांशी खेळत कुठलाही अजेंडा नसलेला पक्ष चालवण्याचे अफाट कौशल्य, इतरांनी ल्ढलेल्या लढाया स्वतःच्या नावावर खपवणे(जसे - संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, राममंदिर तोडणे(खरतर या नादान क्रूत्याला लढाई म्हणवत नाही. )) .
=> बाकी वारंवार उलट सुलट विधाने वक्तव्ये करुन चर्चेत राहणे, स्वातंत्र्यवीर सावरकरांची पदवी स्वतः वापरणे, अण्णा हजारेंसारख्या माणसाबद्दल बेताल बडबड करणे, दुसर्याच्या व्यंगावर पातळी सोडून टीका करणे नेहमीचेच. अजूनही बरेच काही लिहिता येईल.
चालायचंच. 'दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये'.
हरविंदर२ जन्माला येईल काय ?
26 Jan 2012 - 9:19 pm | अशोक पतिल
अनामिका , असा कोणता पक्ष भारतात आहे की तो भ्रष्टाचारा पासुन मुक्त आहे ? एखाद्या पक्ष / पार्टिला बदनाम करणे सोपे आहे , ज्याचे गोडवे गातो त्याचे ही विश्लेशन केल तर फारच बरे. बाकि फक्त पवार आणि पार्टिला बदनाम करणे हा फार पुर्विपासुन तथाकथीत बुद्दिवाधी चा धधाच झालेला आहे. १९९६ नन्तर ५ वर्षे महाराष्ट्रात किती भ्रष्टाचाऱ झाला ते लिहीले तर फारच बरे होइल .
23 Jan 2012 - 1:49 pm | अनामिका
सुनिलजी आधी निट वाचनाचे कष्ट घेण्याचे उपकार करा आमच्यावर.....मी विचारांबद्दल लिहिलय्...पक्ष वेगळे असले तरी विचार तर एकच होते..जे मी स्वतः अनुभवलय ,ऐकलय पाहिलय तेच लिहिलय....उगीच टंकायच म्हणून टंकलेले नाही....
23 Jan 2012 - 8:13 pm | अनामिका
संजय राऊत यांचे मोघम उत्तर इथे टंकते आहे.....
फार मुद्देसुद इत्यादी नसल्यामुळे घोर निराशाच झाली खरे तर.....
"Sanjay Raut
aanand paranjpe yanche shivsenetil yogdan kay ahe hey tumhala sangayla nako...fakt tyanche vadil prakash paranjpe yancha nidhna-nanter fakt tyancha mulga mhnunch tyanna sandhi milali.aanand paranjpe yanni shivsene sathi kiti khasta khallya? hey thane-karanna mahit ahe.prakash paranjpe aani aanand paranjpe yanmadhe jamin-aasmanacha farak ahe.khasdar mhnun aanand paranjpe yanni shivseneche char-aanyache hi kaam kelele nahi hech satya ahe.tarihi aapan jya bhavna vyakt kelyat tyacha me aadar karto..."
कसे आहे ?सेनेबद्दलचे प्रेम,बाळासाहेबांवर निष्ठा वगैरे स्वतःचीच मक्तेदारी समजणार्यां विद्वानांकडून समजूतदारपणाची अपेक्षा व्यर्थ आहे......
23 Jan 2012 - 8:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अण्णांचे कौतुक असणारे आणि त्यांना समर्थन असल्याची ग्वाही देणारे येताजाता त्यांच्या आंदोलनाला शालजोडीतला आहेर का देत असतात हे काही समजले नाही ....किंबहुना हे अश्या प्रकारचे जाहीर समर्थन आमच्यासारख्यांसाठी तरी निदान अगम्य आहे बुवा?
ह घ्या....डॉ ......
हाहाहा जमेल तसा लवकरच खुलासा केल्या जाईल. :)
तुंम्ही कितीही पवारांचे गोडवे गा पण पवार हेच महाराष्ट्राच्या अधोगतीला आणि राजकिय अधःपतनाला कारणीभूत होत आहेत..
ठाणेकर शिवसैनिक म्हणून आपले तपशिलवार पत्र वाचायला आवड्ले. पण 'महाराष्ट्राच्या अधोगतीला आणि राजकिय अधःपतनाला' पवार साहेब कारणीभूत आहे या शब्दांनी आम्हाला बॉ लैच वाईट वाटले.
बाकी, पत्रात तुम्ही 'आम्ही करुन दाखवलं' अशी सतत आकाशवाणी करणार्या पुंगट नेतृत्त्वाबद्दल काही लिहायला पाहिजे होतं बॉ.
-दिलीप बिरुटे
23 Jan 2012 - 9:51 pm | daredevils99
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11598537.cms
23 Jan 2012 - 11:51 pm | मोदक
aanand paranjpe yanche shivsenetil yogdan kay ahe hey tumhala sangayla nako...fakt tyanche vadil prakash paranjpe yancha nidhna-nanter fakt tyancha mulga mhnunch tyanna sandhi milali.
यालाच घराणेशाही म्हणावे का..?
24 Jan 2012 - 1:57 am | सुक्या
नाय हो. घराणेशाही दुसर्यांची .. आपली नाही.
म्हणजे बघा पं. नेहरू -- > ईंदिरा गांधी --> राजीव गांधी ही झाली घराणेशही.
पण बाळ ठाकरे --> उद्धव ठाकरे ही किंवा प्रकाश परांजपे --> आनंद परांजपे ही घराणेशही नाही.
बाकी मी काही कोण्या राजकीय पक्षाचा पुरस्कार करतो आहे असे नाही. . .
पण जवळ्पास सर्वच पक्ष हेच म्हणतात .. दुसर्या पक्षात आहे ती घराणेशाही .. आमच्या नाही...
24 Jan 2012 - 3:23 pm | मोदक
>>>पण जवळ्पास सर्वच पक्ष हेच म्हणतात .. दुसर्या पक्षात आहे ती घराणेशाही .. आमच्या नाही...
हेच झाले होते ना दसरा मेळाव्याला..?
आमच्या पक्षात घराणेशाही नाही असे म्हणून तिथल्या तिथे आदित्य टी. ला तलवार दिली होती.
24 Jan 2012 - 7:38 am | हुप्प्या
आजवर जे कोणी शिवसेनेचा केसाने गळा कापून अन्य पक्षात गेलेत ते न विसरता बाळासाहेब ठाकर्यांच्या चरणावर आपल्या अलोट, अपार, असीम, अस्खलित निष्ठेचे कमळ कायम विराजमान असल्याची ग्वाही देतात आणि मगच शिवसेनेचा एकखांबी तंबू कसा पोखरलेला आहे यावर आगपाखड करतात. कुणी विठ्ठलाला बडव्यांनी वेढले म्हणतो तर कुणी म्हणतो गुळावर माश्या तर कुणी मधावर मुंग्या. एकंदरीत मखरीत बसवलेल्या सर्वेसर्वा असणार्या बाळासाहेबांचे गोडवे गाऊन मगच अन्य निंदा करावी असा संकेत बनला आहे.
छातीठोकपणे होय, मला शिवसेना आवडत नाही अगदी बाळासाहेबांसकट आणि म्हणूनच मी बाहेर पडतो आहे असे कुणी का म्हणू धजत नाही.
अशा एकछत्री पक्षातील अंदाधुदीला बाळासाहेब जबाबदार नाहीतच हे कसे ठरवतात हे लोक? की पुढेमागे पुन:प्रवेशाचे एक चोरदार उघडे ठेवायची ही एक ट्रिक आहे?
बाकी आनंद परांजपे यांनी पक्ष सोडल्यावर त्यांची लायकीच कशी नव्हती, चार आण्याचेही योगदानच नव्हते, हल्लीची नवी पिढी कशी बेजबाबदार आहे वगैरे ट्याण ट्याण ट्याण सुरु व्हावे हे मनोरंजक आहे. तसेच केवळ बाप नेता होता म्हणून आम्ही त्याला खासदार बनवले वगैरे कबुलीजबाबही मोठा बोलका आहे.
बाकी परांजप्याचा राष्ट्रवादीत अगदीच अण्णू जोशी (अर्थात पुण्याचे महान नेते अण्णा जोशी) होऊ नये ही आशा.
(वरील वाक्यातील महान नेत्यांचे एकवचनी उल्लेख हे अनादरापोटी नसून केवळ पुलंच्या अंतू बर्व्याशी साधर्म्य निर्माण करण्याचा एक कुवतीनुसार केलेला प्रयत्न आहे ह्याची नोंद घ्यावी. असो.)
24 Jan 2012 - 10:54 am | मृगनयनी
हाहाहा.... बाळासाहेबांचे गोडवे गाईले, म्हणजे, त्या दलबदलू व्यक्तीची दोन वर्षांमध्ये अपघाती मृत्यू किन्वा खून होण्याची शक्यता बर्यापैकी कमी होते!!... :|
=)) =)) =)) =)) =)) =))
सहमत! म्युन्सिपल कॉर्पोरशनच्या निवडणुकीसाठी भाजपा'ने तिकिट दिले नाही, म्हणून अण्णा जोशी - (तत्कालीन वयवर्षे ८०,) यांनी राष्ट्रवादीचे तिकिट मिळवले...अर्थात ते निव्डून आलेच्च नाही... पण ८०व्या वर्षी मेन्दूसकट सगळी गात्रे शिथील झालेली असताना... म्हातार्याला असलेली सत्तेची हाव पाहून खरंच खूप चीड आली होती... :|
"आनन्द परान्जपे" कितीही मुरलेले उच्चशिक्षित राजकारणी असले आणि शरद पवारांचा वरदहस्त त्यान्च्या डोक्यावर सध्यातरी असला.. तरी राष्ट्रवादी'तल्या इतर टोळभैरवांचा काय भरोसा? आधीच्च "परान्जपे"- चित्पावन ब्राह्म्ण!!!... त्यातून ब्राहणद्वेष्टी सम्भाजी सी-ग्रेड म्हणजे राष्ट्रवादीचं दुय्यम फळीतलं पाळलेलं कुत्रं!....त्यामुळे पक्षांतर्गत मतभेद, एकमेकांवर कुरघोडी इ. प्रकारात परान्जपेंचा निभाव लागणंही अवघड आहे.
24 Jan 2012 - 11:16 am | अनामिका
हे सगळ बघण्यापेक्षा बाळासाहेबांनी शिवसेना विसर्जीत करावी ........का?
24 Jan 2012 - 12:05 pm | अनामिका
'छातीठोकपणे होय, मला शिवसेना आवडत नाही अगदी बाळासाहेबांसकट आणि म्हणूनच मी बाहेर पडतो आहे असे कुणी का म्हणू धजत नाही. ' हे धाड्स जो कुणी करेल त्याला मर्द म्हणावयास हरकत नाही...?
त्याहीपेक्षा 'घुसमट' या शब्दाची व्याख्या आता खरच सेनेच्या अनुषंगाने नव्याने करावयास हवी......कारण सेना सोडून जाणारे कायम "घुसमट" हे कारण देतात काँग्रेसला रामराम करणारे "पक्षाने केवळ वापर केला" असे देतात्...आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणारे स्थानिक नेत्यांच्या "दडपशाहीला(दादागीरी किंवा आव्हाडगीरीला) कंटाळून" इतर पक्षात प्रवेश करतात....
पक्ष सोडण्याबद्दल आ़क्षेप नाही पण नेहमी बहुतांश पक्ष सोडणारे नेते विरुद्ध विचारसरणीच्या पक्षात प्रवेश करतात आणि त्यास वर नमुद केलेली कारणे देतात तेंव्हा गंमत वाटते.....
24 Jan 2012 - 2:55 pm | चिरोटा
८० च्या दशकात सुरुवातीला पवार्-ठाकरे एकत्र (प्यायला) बसतात अशी उपनगरांमध्ये अफवा असायची . त्यावेळी आम्हाला तो विनोद वाटायचा पण नंतर कळून चुकले की ती अफवा नसावी.
24 Jan 2012 - 4:14 pm | अनामिका
स्वतःच्या तथाकथित कृष्ण सुदामा स्टाईलच्या मैत्रीची ग्वाही दोन्ही नेते येता जाता देतच असतात....
24 Jan 2012 - 4:27 pm | इरसाल
स्वतःच्या तथाकथित कृष्ण सुदामा स्टाईलच्या मैत्रीची ग्वाही दोन्ही नेते येता जाता देतच असतात....
आजच इ-सकाळ वर पुरचुन्डीतले पोहे याची गोश्ट आली आहे.
http://esakal.com/eSakal/20120124/5265871578849840298.htm
24 Jan 2012 - 6:00 pm | चिरोटा
हा हा. म्हणजे लोक पूर्वी जे बोलत- एकत्र प्यायला बसतात, ते खरे होते. शिवसेना खरे तर बर्यापैकी जुना प्रादेशिक पक्ष.१९६६ सालचा. त्यानंतर स्थापना झालेले अनेक पक्ष ईतर राज्यांमध्ये स्वताकदीवर सत्तेवर आले. राज्य केले. मायावती काय, जयललिता काय किंवा ममता किंवा पूर्वीचे एन. टी रामाराव.. ह्या लोकांसारखा विश्वास ठाकरे कधीच संपादन करु शकले नाहीत्.कारण सेनेचे आधीपासूनच खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे होते.वर्षानुवर्षे 'प्रचंड जाहीर सभा' घेवून्,'रोखठोक' बोलूनही हे लोक सत्तेवर का येत नाहीत हा प्रश्न अनेकांना पडायचा. सेनेचा कॉन्ग्रेसविरोध केवळ तोंड देखला होता. ठाकरे ह्यांचे फक्त पवार ह्यांच्याशी संबंध असतील आणी इतर कॉन्ग्रेस नेत्यांना ठाकरे पाण्यात पहात असतील हे संभवत नाही.
स्वताकदीवर राष्ट्रवादी/शिवसेना पुढच्या २५ वर्षात तरी सत्तेवर येणार नाहीत.
24 Jan 2012 - 7:37 pm | सुनील
महाराष्ट्रात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश आणि मुंबई प्रदेश असे दोन उपविभाग आहेत.
पैकी मुंबई प्रदेश काँग्रेसला कायम दबावाखाली ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशने शिवसेनेला हाताशी धरले. त्यांना मुंबई-ठाण्यात मोकळे रान दिले आणि उर्वरीत महाराष्ट्र स्वतःच्या पंजाखाली ठेवला. सेनेने मुंबई-ठाण्यात बस्तान बसवायचे (जेणेकरून मुंबई प्रदेश काँग्रेस कायम बचावात्मक राहील) आणि उर्वरीत महाराष्ट्रात मात्र सेनेने काँग्रेसला त्रास द्यायचा नाही. असा हा अलिखित करार!
उगाच नाही वसंतराव नाईकांच्या काळात सेनेला वसंतसेना म्हणीत!
इतर राज्यातील प्रादेशिक पक्षांप्रमाणे सेना महाराष्ट्रावर एकछत्री राज्य का करू शकली नाही याचे हे कारण आहे.
आणिबाणीला पाठिंबा ही सेनेची गरजच होती.
पुढे महाराष्ट्राची डेमॉग्राफी बदलली. इतरही अनेक समीकरणे बदलली. आज राज्यातील २८८ आमदारांपैकी ४८ केवळ मुंबई-ठाण्यातून जातात. मुंबईचा अर्थसंकल्पदेखिल १७ हजार कोटींवर जाऊन पोचलाय! अर्थातच नव्या पिढीला (उद्धव आणि अजित पवार) यांना "जुने करार" मान्य नाहीत.
परंतु, आपणहून स्वतःचा बोन्साय करून घेतलेली सेना आता वाढण्याच्या परिस्थितीत नाही. "मनसे" फॅक्टर वेगळाच! .
बाकी काँग्रेसचे "गरीबी हटाव" काय नी सेनेचे "मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी" काय. दोन्ही तोंडीलावणीच!
24 Jan 2012 - 9:05 pm | गणेशा
स्वताकदीवर महाराष्ट्रात निदान पुढील २ निवडनुका तरी कोणता पक्ष सत्तेवर येणाअर नाहीच.
आनि केंद्रात तर कधीच कोणता एक पक्ष सत्तेवर येण्याची आशा दुरापास्त आहे.
बाकी शरद पवार ... बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे तिनही नेते वेगवेगळ्या कारणाने आवडणारा .
बाकी पक्ष म्हणजे काय ? सत्तेसाठी या नेत्यांनी वापरलेले लोक येव्हडेच वाटते.
त्यामुळे क्रिकेट टीम हारली की धोनी जबाबदार.. जिंकली तरी तोच जबाबदार तसे
पक्षात काही ही होत असले तरी त्याला संपुर्णपणे नायकच जबाबदार ..
शिवसेना जर राज ठाकरेंतर्फे कंट्रोल्ड ( like बाळासाहेब ठाकरे) आणि उद्धव ठाकरे जर याच तळमळतेने शेतकरी आणि इतर महत्वाच्या प्रश्नावर लढा देत असते (कार्यकारीच) तर चित्र वेगळे असते..
महाराष्ट्रावर भगवा फडकला असता..
बारामती गाव असुनही असे वाटत होते .. आहे.
पण आता वाटते , कोणाला महाराष्ट , मराठी, जनता, आणि त्यांचे प्रश्न पडले आहेत ? प्रतिष्टा विकुनच प्रतिष्टेपाठी लागलेले हे सगळे ..
आपण फक्त आपल्याला हे आवडतात ते आवडतात बोलतो .. ( मीही), पण सामान्य जनता आवडणारा नेता कुठे आहे ?
कुठे आहेत गांधी.. कुठे आहेत सुभाषचंद्र बोस ( कालच जयंती झाली यांची, मुंबईत तरी ठाकरेमय परिस्थीतीच होती),
विरुद्ध टोके असुनही जनते बद्दलची सेम कळवळ आता कोठे आहे.. ?
नेते म्हणजे समाजाचा रुणी .. जनतेसाठी काहीतरी करायची आलेली संधी
आता असे कोठे आहे ?
आता आहे समाजासाठी रुण .. अआणि जनतेकडुन स्वताला हवे ते करण्याची संधी.
27 Jan 2012 - 5:42 pm | कपिलमुनी
दोन काका गेल्यानंतर पुढे काय ?
अजित पवार / राज ठाकरे / उद्धव ठाकरे आणि काँग्रेस ( राहुल ब्रिगेड)
यांच्यामधे कोण सरस ठरणार हा महाराष्ट्रापुढचा प्रश्न आहे ..
सध्या तरी
१ . अजित पवार (माझी आवड नाही , पण सत्ता , पैसा अनुभव आणि काकांची पुण्याइ यामुळे पारडे जड आहे)
२. राज ठाकरे ..(स्वतंत्र पक्ष आणि तरुणांमधे लोक प्रियता याच्या बळावर अपेक्षा
३. काँग्रेस ( अनादी अनंत...काय बोलायचे ..)
४. उद्धव ठाकरे ..यांना सहानुभुतीचा फायदा एकदाच मिळणार आहे ..पण हळु हळु अवस्था बिकट होइल असा अंदाज