राम राम मंडळी. (नेहमीप्रमाणेच) हापिसात रिकामपणीचे उद्योग करण्यात आम्ही व्यस्त होतो.
जरा जालावर पेपर वगैरे वाचावेल म्हटले म्हणून esakal उघडला. तिथे चक्क http://www.esakal.com/eSakal/20120119/4672807682597002147.htm ही बातमी दिसली.
त्यातील एकदम भारी वाटलेला मजकूर देतोयः-
इराणवर हल्ल्याचा विचारही करू नका
(युएनआय)
Thursday, January 19, 2012 AT 03:00 AM (IST)
Tags: jerusalem, iran, international
जेरुसलेम - इराणवर हल्ला करण्याचा कोणताही विचार इस्राईल करत असेल, तर त्यांनी त्यापासून लांब राहावे. अणुचाचणीसाठी आमच्यावर कोणताही दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा बुधवारी इराणचे संरक्षणमंत्री एहुद बराक यांनी दिला. या गोष्टींमध्ये पुढे पाऊल टाकण्याची आमची इच्छा नाही, असेही ते म्हणाले.
इराणच्या प्रस्तावित अणुचाचणीवरून निर्माण झालेल्या वाढत्या तणावाबाबत बराक बोलत होते. इराणचा अणुचाचणीबाबतचा उद्देश अत्यंत स्पष्ट आहे. शांतता आणि वैद्यकीय दृष्टिकोनातूनच या चाचण्या केल्या जाणार आहेत. मात्र, इस्राईलसह शेजारी राष्ट्रांनी त्याचा विपर्यास केल्याचेही त्यांनी सांगितले.
ह्याच हिशेबाने आम्चे "साहेब" उद्या पाकिस्तानचे पंतप्रधान , हु जिंताओ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याची वाट पहात आहे.
ज्यांना डिट्टेल हवेत त्यांच्यासाठी :- टंकलेखनात झालेल्या चुका, विरामचिन्हे समजू शकतो हो. पण धडधडित चुकीची माहिती दिली जाते आहे. एहुद बराक हे इस्राइलचे माजी पंतप्रधान अन् विद्यमान परराष्ट्रमंत्री आहेत. इस्राइल आणि इराणची विळ्या-भोपळ्याची जानी दोस्ती ठाउक असेलच.
http://en.wikipedia.org/wiki/Ehud_Barak
तर ह्या निमित्ताने अशा वृत्तपत्रीय चुकांच्या नावाने शिमगा करुन घेउया.
प्रतिक्रिया
19 Jan 2012 - 1:50 pm | मोदक
हरवींदर ने केलेल्या हल्ल्यानंतर टाईम्स वर Good Job च्या कमेंट्सचा पाऊस पडला होता तर सकाळ वर निषेधात्मक कमेंट्सचा पूर आला होता...
कमेंट्सचा अप्रूव्ह करणारा इतका हुशार होता, की एक अशीही कमेंट अप्रूव्ह झाली होती.
"जवळ कृपाण असताना हाताने हल्ला केल्याबद्दल हरवींदर चा निषेध"
मोदक
19 Jan 2012 - 2:09 pm | प्रचेतस
20 Jan 2012 - 4:38 am | पिवळा डांबिस
असा इशारा बुधवारी इराणचे संरक्षणमंत्री एहुद बराक यांनी दिला.....एहुद बराक हे इस्राइलचे माजी पंतप्रधान अन् विद्यमान परराष्ट्रमंत्री आहेत.
आसं काय करता राव!
अवो पार्टी बदालली आसंल बराकरावांनी!!!!
आमच्या सायबांनी नाय का किती पार्ट्या बदालल्या?
:)
20 Jan 2012 - 6:27 am | इंद्रवदन१
सकाळ वाले एकदा छापल :
"एचपी निर्मित आय फोन मधे अँङॉ्ईङ प्रणाली आहे"
बर झाल स्टीव जॉब्स ला मराठी येत नव्हत.
20 Jan 2012 - 9:31 am | अप्रतिम
आजचा सकाळ वाचा...पुण्यात कलमाडींच्या सुटकेने शिवसेना-भाजप युतीचे माहित नाही पण राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकली आहे...संपादकीय पासून पानेच्या पाने भरून कलमाडींच्या भ्रष्ट्राचाराची आठवण वाचकांना करून देण्यात व्यस्त झाले आहेत पवारसाहेब...
20 Jan 2012 - 5:24 pm | गवि
सकाळचा भलता प्रताप महेंद्र कुलकर्णींच्या साईटवर वाचा:
इथे आहे तो लेख
सरळ शेरिल (व्हाईट इंडियन हाऊसवाईफ या वाचकप्रिय ब्लॉगवरच्या) शेरिलचा रिक्षातून फिरतानचा फोटो उचलून त्यात कतरिनाचे मुख चिकटवून अशी काही चापलुसी केली आहे की ज्याचे नाव ते..
फोटोशॉपवरचे एवढे सारे कौशल्यपूर्ण काम म्हणजे नजरचूक म्हणे..
20 Jan 2012 - 7:14 pm | यकु
हाण्ण **** !!!
ट्वीन टॉवर्स पाडले होते तेव्हा त्या क्षणाचा म्हणून फोटो छापून सकाळने अशीच नाचक्की करून घेतली होती.
मागच्या एका पेपरमध्ये धरणाच्या तीव्र उतारावर मेंढ्या चरायल्या चढल्या असतानाचा फोटो टाकून त्यांना गुरुत्वार्षण लागू होत नाही यावर आश्चर्य व्यक्त केलं गेलं होतं..
स्पर्धक पेपरने तो फोटो मूळच्या साईटवरुन घेऊन दुसर्या दिवशी फार उद्धार केला.
मग असे फोटो ओरिजीनल असले तरी दहादा खात्री केल्याशिवाय छापायचे नाहीत असा ठराव पास झाला.
राजस्थानातील जैसलमेर वगैरे भागात शेळ्या झाडांवर चढून पाला खातात. अशा पाच-सहा शेळ्या झाडावर चढल्याचा क्षण पकडणारा ओरिजनल फोटो आला तरी तो छापला नाही.
22 Jan 2012 - 2:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>>>मागच्या एका पेपरमध्ये धरणाच्या तीव्र उतारावर मेंढ्या चरायल्या चढल्या असतानाचा फोटो टाकून त्यांना गुरुत्वार्षण लागू होत नाही यावर आश्चर्य व्यक्त केलं गेलं होतं
हाहाहाहा मेलो.ड्वाले पाणावले :)
-दिलीप बिरुटे
20 Jan 2012 - 9:58 pm | मन१
@मोद्क,वल्ली :- फोटुबद्द्ल आभार. पण मला काही फोटु अजूनही दिसला नाही.
@पि डा :- :) त्या एहुद बराकाला ही पक्षांतराची गुप्त बातमी फुटल्याचं समजलं तर सकाळचं कै खरं नै.
@इंद्रवदन :- उत्तम्.लवक्रच विहिंपकृत मदरसाची बातमी येइल असे वाटते.
@ अप्रतिम :- स्व भोचक साहेबांची खोचक सही आठवली. "पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?";)
@गवि :- त्या लेखात दिलय तशी अशा बेजबाबदार वृत्तीवर कायदेशीर कारवाई झाली तर उत्तमच. पण पुन्हा त्या केसची बातमीही सकाळवाले "सकाळ च्या पत्रकाराने ठोठावला न्यायमूर्तींना दंड". अशी देतील त्याचं काय?
@यकु :- तो ट्विन टॉवर्सचा फोटु आठवतोय व्यवस्थित. त्यांनी पहिल्याच पानावर छापला होता.
शेळी प्रकरण भारिच.
21 Jan 2012 - 12:09 am | किचेन
-------------------------------------------------------------------------------
21 Jan 2012 - 2:32 am | वपाडाव
किचेनतैंचा यकमेव वाचनीय प्रतिसाद.............
21 Jan 2012 - 2:40 am | इंद्रवदन१
http://www.esakal.com/eSakal/20120119/4854926683664466922.htm
गोदरेज कंपनीचे परमेश्वर यांनी ओफ्राच्या स्वागतासाठी......
21 Jan 2012 - 2:31 pm | प्यारे१
On 19/01/2012 05:29 PM damodar dattatray deshmane (3D) said:
गोदरेज कंपनीचे परमेश्वर कसलं लिहितोस... तुझ्या मारी रताळ्या... गोदरेज चे परमेश्वर अन बाकीच्यांचे परमेश्वर काय वेग वेगळे हायेत होय... अन कोंबडीच्या... परमेक्ष्ह्वर गोदरेज बाई हाय...
21 Jan 2012 - 7:06 am | सन्जोप राव
छान करमणूक. सकाळसारख्या निर्बुद्ध वर्तमानपत्राकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नाही. आम्ही सकाळ घेतो तो म्हणजे 'सकाळ' ची अन्हिके उरकायला मदत म्हणून.
22 Jan 2012 - 10:14 pm | श्रीरंग
सकाळ मध्ये एकाच दिवशी छापून आलेल्या या परस्परविरोधी बातम्या पहा...
असला बेअक्कलपणा सकाळच करू जाणे. ट्विन टॉवर्स च्या वेळेचा फोटो पहिल्या पानावर छापून त्यांनी स्वत्।ची करून घेतलेली नाचक्की अजूनही स्मरणात आहे.
24 Jan 2012 - 5:16 pm | मन१
http://www.esakal.com/eSakal/20120122/5393268223633262154.htm
असे गृहीत धरले जाते की, येणाऱ्या 10 ते 20 वर्षांत जपान आणि इराण यांच्यामध्ये अणुयुद्ध होण्याची शक्यता आहे.
ह्याचा अर्थ जपान व इराण ह्यांच्यात भयानक वितुष्ट वगैरे आहे, ते एकमेकांशी युद्धवगैरे करण्यास आसुसलेले आहेत.
आणि दोघेही अण्वस्त्रसज्ज आहेत!!
दक्षिण अरेबिया आणि म्यानमार यांच्यातही भविष्यात अणुयुद्ध होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
दक्षिण अरेबिया ह्या देशाला नव्यानेच जन्माला घातल्याबद्दल त्या च्या पित्याचे अभिनंदन.
शिवाय तो देश नुसता अस्तित्वातच आहे असे नाही तर अण्वस्त्रसज्ज वगैरे आहे, म्यानमारही आहे अण्वस्त्रसज्ज!!
24 Jan 2012 - 5:37 pm | यकु
तो उपसंपादक तुझी मजा घेतोय रे मनोबा.. लक्ष देऊ नकोस त्याच्याकडे.. ;-)
27 Jan 2012 - 7:59 pm | गणपा
यशवंताशी सहमत.
त्याआधी दैनिक ह्या क्षेत्रातील मनोबा ह्यांच्या योगदानाविषयी अथवा ह्या विषयाच्या त्यांच्या आवाक्याविषयी जाणुन घ्यायला आवडेल. बरेच प्रश्न विचारायची इच्छा होते आहे, मात्र लगेच ते गुरुजींकडुन उत्तरे मिळतील म्हणून गप्प आहे.
अर्थात रोज उठून तद्दन फालतू दैनिकांतील बातम्या शोधणार्यांना 'कामाला' लावावे का ?
©º°¨¨°º© बरा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
20 Feb 2012 - 7:44 am | तुषार काळभोर
"आम्चे राज्य" मधील कामगार बघून डोले फुटले!!
24 Jan 2012 - 10:11 pm | अन्या दातार
नीट वाच ते विधान
असे गृहीत धरले जाते की, येणाऱ्या 10 ते 20 वर्षांत जपान आणि इराण यांच्यामध्ये अणुयुद्ध होण्याची शक्यता आहे.
जोर दिलेल्या शब्दयोजनेतून हवे तसे बरेच अर्थ निघू शकतात. याच नियमाने पुढचेही वाक्य वाच. उगाच आपली आवई उठवायची ;)
गृहित धरायला तुझे-माझे काहीतरी जातंय का? :D
25 Jan 2012 - 1:32 pm | यकु
Redudant. Removed.
25 Jan 2012 - 1:30 pm | यकु
अरे ते सगळं खरंय.
पण तु इथे तापतो आहेस हे बघून तो आणखी बेफाट विधानं करुन तुझी मजा घेत आहे..;-)
तु अजून नजर ठेव..
27 Jan 2012 - 6:49 pm | गणामास्तर
ही घ्या अजुन एक मनोरंजन पर संध्याकाळ छाप बातमी "सकाळ" कडून..
http://www.esakal.com/eSakal/20120127/5076582576318597457.htm
27 Jan 2012 - 6:55 pm | परिकथेतील राजकुमार
त्याखालची सकाळ वाचकाची प्रतिक्रिया देखील खुपच सुरेख आहे. ;)
On 27/01/2012 04:10 PM vidya said:
the teeths of human being are more poisionous than any other its not an magic................................
26 Feb 2012 - 4:58 pm | दादा कोंडके
विज्ञानात भारत चीनपेक्षा वरचढ -पंतप्रधान
- पीटीआय
अशी हेडलाइन आहे. आणि बातमी उघडल्यावर पहिलीच ओळ ,
विज्ञानाच्या क्षेत्रात चीन भारतापेक्षा कित्येक पावले पुढे आहे, अशी कबुली पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी "सायन्स' या अमेरिकी नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली.
आहे! :)