आपण आधुनिक आहोत का (अधु) निक?

वाटी's picture
वाटी in काथ्याकूट
19 Jan 2012 - 8:54 am
गाभा: 

नमस्कार,

सध्या समाजाचा कल हा आधुनिकतेकडे झुकलेला दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक ठीकाणी आपण आधुनिकतेचाच जास्त अवलंब करतांना दिसत आहोत. असो पण या आधुनिकतेमुळे खरंच आपण (अधु) निक तर नाही ना होत चाललोय? असा विचार मनात आला. असो तरीही यावर निव्वळ चर्चा व्हावी हाच हेतु.

उदाहरणार्थः
१) आज आपण घर बसल्या भ्रमणध्वनीवरून आपल्याला काय जिन्नस हवे आहेत याची यादी देऊन मोकळे होतो त्यामुळे आपल्याला सहजच घर बसल्या हव्या त्या गोष्टी उपलब्ध होतांना दिसतात. यामुळे आपल्या घरातील असलेल्या लहान मुलांमध्ये व्यावहारीक ज्ञान कसे काय मिळणार?

२) आजकाल घरातील कर्ती मंडळी बराच काळ ऑफीसच्या निमित्त्याने बाहेरच असतांना दिसतात त्यामुळे सहाजिकच त्यांची मुले पाळणाघरात आढळतात याचे मुख्य कारण की आजकाल म्हातार्र्या आई वडीलांना म्हणजेच त्यांच्या आजी आजोबांना व्रुध्दाश्रमात आपला वेळ घालवावा लागतो. कारण की कर्त्या मंडळींच्या घरी होणार्र्या पार्ट्या, ऑफीसमधील त्यांचे असणारे स्टेटस हेच त्यांना महत्वाचे वाटते.

३) तसेच आधुनिकतेमुळे आज तरुण पिढीत फार आळशीपणा आढ्ळून आलेला दिसुन येत आहे त्यामुळे त्यांना एखादी गोष्ट वेळेत नाही मिळाली किंवा अमुक अमुक कडे एखादी गोष्ट आहे तो फारच चैनीत राहतो अशा आणि अनेक बाबींमुळे त्यांच्या मानसिकतेवर गंभीर परीणाम होताना दिसुन येतात. यातुनच मग तरुण पिढी नको त्या मार्गांचा अवलंब करतांना दिसुन येते. त्यामुळे समाजाचे जीवनमान ढासळते.

या आधुनिकतेचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेतच त्यामुळे खरंच आपण आधुनिकतेकडून (अधु) निकतेकडे तर नाही ना जात आहोत.

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

19 Jan 2012 - 9:12 am | अन्या दातार

सरसकट विधाने केली असल्याने माझा पास

मालोजीराव's picture

19 Jan 2012 - 3:02 pm | मालोजीराव

असेच म्हणतो...गावाकडे किंवा छोट्या शहरात गेल्यास...वरील पैकी एकही विधान लागू पडत नाही !

- मालोजीराव

आधुनिक आणि अधुनिक ही शाब्दिक कोटी ठिक आहे, पण जसा आधुनिक या शब्दाला एक अर्थ आहे तसा अधुनिक या शब्दाचा काय अर्थ ?

त्यांना कदाचित सध्याची अधु प्रगती असे सांगाय्चे असावे
अधु= अपंग
निक= आधुनिक प्रगती.
हो की नाही ओ?

बाळ सप्रे's picture

19 Jan 2012 - 11:55 am | बाळ सप्रे

निक किंवा अधुनिक य दोन्हि शब्दाना काहिही अर्थ नाही. त्यामुले कोटी मुळात INVALID आहे.

उदाहरणेही फारशी मुद्द्याला धरुन नाहीत.

परिकथेतील राजकुमार's picture

19 Jan 2012 - 12:19 pm | परिकथेतील राजकुमार

त्यांना बहूदा अधु = अपंग असा अर्थ अभिप्रेत असावा.

बाळ सप्रे's picture

19 Jan 2012 - 12:28 pm | बाळ सप्रे

कंसातल शब्द धरुन व न धरता असे दोन वेगळे परन्तु मुदद्याला धरुन अर्थ झाल्यास ती कोटी ठरते.
अधु हा एक शब्द धरल्यास .. निक शब्द कंसात हवा.. पण तरिहि अधुनिक या सम्पूर्ण शब्दाला अर्थ नसल्याने कोटी निरर्थक आहे. :-)

पैसा's picture

19 Jan 2012 - 11:58 am | पैसा

मुद्दा क्र. १:

आज आपण घर बसल्या भ्रमणध्वनीवरून आपल्याला काय जिन्नस हवे आहेत याची यादी देऊन मोकळे होतो

पूर्वी काही लोक नोकराबरोबर दुकानात यादी पाठवत असत. हे आणि ते एकच ना? आम्ही तर बुवा ४ दुकानं फिरून मगच काय ते घेतो.

मुद्दा क्र. २:

मुले पाळणाघरात आढळतात याचे मुख्य कारण की आजकाल म्हातार्र्या आई वडीलांना म्हणजेच त्यांच्या आजी आजोबांना व्रुध्दाश्रमात आपला वेळ घालवावा लागतो. कारण की कर्त्या मंडळींच्या घरी होणार्र्या पार्ट्या,

पाळणाघरात राहिलेली माझी मुलं अत्यंत सोशल आणि स्वतंत्र झाली आहेत. नोकरी करणार्‍या लोकानी घरात पार्ट्या करण्यासाठी मुलं पाळणाघरात आणि म्हातारे वृद्धाश्रमात ठेवलेत असं मी तरी कुठेही पाहिलेलं नाही.

मुद्दा क्र. ३:

तसेच आधुनिकतेमुळे आज तरुण पिढीत फार आळशीपणा आढ्ळून आलेला दिसुन येत आहे त्यामुळे त्यांना एखादी गोष्ट वेळेत नाही मिळाली किंवा अमुक अमुक कडे एखादी गोष्ट आहे तो फारच चैनीत राहतो

याचा संदर्भच नाही लागला. आधुनिकता याची तुमची व्याख्या काय आहे? आळशीपणा हा वैयक्तिक गुण्/दुर्गुण आहे आधुनिकतेशी त्याचा काय संबंध?

श्रीरंग's picture

20 Jan 2012 - 10:23 am | श्रीरंग

""पाळणाघरात राहिलेली माझी मुलं अत्यंत सोशल आणि स्वतंत्र झाली आहेत. नोकरी करणार्‍या लोकानी घरात पार्ट्या करण्यासाठी मुलं पाळणाघरात आणि म्हातारे वृद्धाश्रमात ठेवलेत असं मी तरी कुठेही पाहिलेलं नाही.""

अलका कुबल, मिलिंद गवळी, रमेश भाटकर आदिंचे इंटेन्स भावनाप्रधान चित्रपट पहा..

पैसा's picture

20 Jan 2012 - 11:21 am | पैसा

ते फक्त शिनेम्यात असतंय हो! आणि त्यातूनही अल्काताई वगैरे मंडळींचे शिणेमे आपल्याला झेपत नायत त्यामुळे बघत नाय.

मुद्दा क्र. २:

"मुले पाळणाघरात आढळतात याचे मुख्य कारण की आजकाल म्हातार्र्या आई वडीलांना म्हणजेच त्यांच्या आजी आजोबांना व्रुध्दाश्रमात आपला वेळ घालवावा लागतो. कारण की कर्त्या मंडळींच्या घरी होणार्र्या पार्ट्या,"
---------------------------> मला तुमचा मुद्दा पटला नाही....
मी माझ्या माहितीतल्या किंवा आजुबाजूला बघितलेल्या उदाहरणांवरुन सांगते---
आजकाल बर्याच आजी-आजोबांना नातवंडे सांभाळण्यात Interest\वेळ नसतो\ताकद नसते (काही अपवाद आहेत).
बरेचसे आजी-आजोबा TV addict झालेले आहेत.पुर्ण दिवस TV वरच्या serials चालू असतात.
जर चुकून त्यांच्या कडे सांभाळायला नातवंडे दिली तर त्यांना पण TV समोरच बसवतात.
काही लोकांना याच्यात गैर काही वाटणार नाही...पण जर तुम्ही आठवून पाहिले तर तुमच्या लहानपणी तुमचे आजी-आजोबा बरेच active होते.....माझी आजी तरी होती..मला छान गोष्टी सांगायची..श्लोक म्हणून घ्यायची...छान पदार्थ करुन खायला घालायची..स्वतः भजनाला जायची...चरित्रे वाचायाची......आजकाल हे कमी झाले आहे असे वाटते (काही अपवाद आहेत). आजी-आजोबांना स्वतः साठी वेळ हवा हे मी मान्य करते.बर्याच जणांच्या तब्येती पण साथ देत नाहीत. म्हणूनच पाळणाघर हे चांगले option आहे...पण मला सांगा किती आजी-आजोबा संध्याकाळी नातवंड घरी आल्यावर त्याच्या बरोबर वेळ घालवतात - खुप कमी .......अर्थात नाण्याच्या दोन बाजु असतात....त्यामुळे तुम्ही केलेले सरसकट विधान पटले नाही....

>>किती आजी-आजोबा संध्याकाळी नातवंड घरी आल्यावर त्याच्या बरोबर वेळ घालवतात - खुप कमी <<<

तुम्ही केलेले हे सरसकट विधान पटले नाही....

म्हणुनच मी लिहीले आहे - याला अपवाद आहेत.......व "कोणीच नाही" असे न लिहीता "कमी" असे लिहीले आहे जेणेकरून हे सरसकट विधान वाटू नये :)

यांची मुले पाळणाघरात आढळतात याचे मुख्य कारण म्हणजे आजकाल घराघरात निरागसता जपली जात नसावी हेही असावे.

निरागसता जपायची का मुलं ते नक्की ठरवा आधी,

आणि हो मिपावर जपा निरागसता सप्ताह चालु होता,संपला काय तो ?

मालोजीराव's picture

19 Jan 2012 - 2:59 pm | मालोजीराव

' जपा निरागसता ' ...सिक्वेल च्या प्रतीक्षेत !

- मालोजीराव

कवितानागेश's picture

19 Jan 2012 - 2:25 pm | कवितानागेश

लहान मुलांना आणि आजोबांना पार्टीत आणले की काय काय होते हे अलिकडच्याच एका धाग्यावर शिकवण्यात आले आहे! ;)

पुण्याचे वटवाघूळ's picture

19 Jan 2012 - 2:56 pm | पुण्याचे वटवाघूळ

जुने कसे सगळे चांगले आणि नवे कसे सगळे वाईट अशा टिपीकल विचारांचा भयंकर कंटाळा आला आहे. एकेक मुद्द्यांवर नंतर लिहितो. तरीही लेख आवडला नाही हे आताच लिहितो.

(रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ

मी-सौरभ's picture

19 Jan 2012 - 9:31 pm | मी-सौरभ

धागा रंगणार अशी चिन्हे दिसतायत ;)

पॉपकॉर्न!! पॉपकॉर्न!! पॉपकॉर्न!! पॉपकॉर्न!!

आधुनिक असल्याने पॉपकॉर्न मिळतायत पण वृक्षतोडीमुळे बसायला फांद्या नाहीत.
जी काही झाडे वाचलेली आहेत त्यावर चढण्याची शक्ती म्हातार्‍यांना वयामुळे राहिली नाही.
नातवांडांनी झाडावर चढणे पाहिलेले नाही आणि तरूण पिढीला हापिसात असल्याने वेळ नाही.
फारतर हरभर्‍याच्या झाडावर चढता येईल.
मग धागा रंगणार कसा?;)

मी-सौरभ's picture

20 Jan 2012 - 6:25 pm | मी-सौरभ

धाग्यावर पिंका आणी पिचकार्‍या टाकणारे नेहमीचे यशस्वी लोक हे काम झाडं नसली तरी करु शकतात...;)
पॉपकॉर्न!!
पॉपकॉर्न!!
पॉपकॉर्न!!

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jan 2012 - 6:27 pm | परिकथेतील राजकुमार

मराठे's picture

19 Jan 2012 - 11:32 pm | मराठे

१३ भागिले ३

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jan 2012 - 4:29 pm | परिकथेतील राजकुमार

वॄद्ध (टाकावु झाले की वृद्ध म्हणायचे किंवा थकलेल्या, काम न करणार्‍या, सभासदांन बरोबर वेळ न घालवणार्‍या, फक्त वाचनमात्र असल्याचा आव आणणार्‍या) आंतरजालीय संपादकांना पाठवण्यासाठी कुठल्या आश्रमाची वैग्रे सोय आहे का ?

अस्सं काय!
वय झाल्यानं कानानं ऐकू येत नसलं तरी डोळे शाबूत आहेत हो माझे!

काय तरी लिहायचे म्हणून लिहीले आहे.....
अधु काय..? निक काय..?

एक्दम नरम जिलबी.......

शेखर काळे's picture

23 Jan 2012 - 11:03 am | शेखर काळे

वाटी यांचा रोख कोणाकडे आहे हे कळले नाही.

आधुनिकते(?) मुळे .. म्हणजे ज्या आधुनिक तंन्त्रज्ञानामुळे सोयी झाल्या आहेत, ते वापरल्यामुळे आपण आळशी झालो आहोत, असे म्हणायचे आहे का ?
आजची लहान मुले मोठी झाल्यावर हातात पिशवी आणि पैसे घेऊन खरेदी करायला जाणार आहेत का ? जर घरपोच सेवा ऊपलब्ध असेल तर याचा फायदा घेऊन मुलांना शिकवणे सोपे नाही का ? गर्दीत, एका हातात पिशव्या आणि दुसरा हात खिशातल्या पाकिटावर ठेवून, धक्के खात आणि मारत मुलांना व्यावहारिक ज्ञान शिकवणे कसे शक्य आहे, हे लक्षात आले नाही. मारामारीच शिकवायची तर मुलांना चांगल्या कराटे क्लासला घाला नं !

- शेखर