अगदी मागच्या वीकांताला मनात विचार आला की मिपा वर काही लिहावे.
पहिल्यांदा सुचलेल्या काही विषयांमध्ये हाही एक होताच पण आता तो कालबाह्य झाला असे वाटून टाळला होता, तोच......(असो!)
त्यावेळी मी पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजात शिकायला असल्याने खडे प्रकरण प्रत्यक्ष पाहिले नाही पण सुट्टीत गावी आल्यावर चर्चेतून नंतर पूर्ण माहिती मिळाली.
या लेखावर अर्थातच माझी मते आहेत कारण ही माझ्याच गावातली घटना आहे .
सदर खडे येण्याचा प्रकार अशास्त्रीय वाटल्याने सुरुवातीला नेत्ररोग तज्ञ आणि लगेचच शंका असल्याने अंनिस लाही बोलावले गेले. (गावाबाहेर च्या व्यक्तीने सांगितले तर लवकर स्वीकारले जाते असाही विचार असेल) सर्व डॉक्टर मंडळीनी याला औषध नाही हे सांगितल्यावर रुग्णांच्या नातेवाईकानी 'इतर' उपाय करून पाहिले. त्यालाही यश न आल्याने अंनिस ला उपचारांमध्ये भाग घेऊ दिला गेला. या लेखातील बहुतेक सर्व व्यक्ती मला माहीत असून 'पुढारी' चा वार्ताहर ही आमच्याच गावातला होता. प्रत्येकाने या घटनेचा आपल्याला हवा तसा अर्थ लावला असे वाटते.
एकूणच हा प्रकार म्हणजे छोट्यांचा खोडसाळपणा होता असे म्हणावे लागते. त्या मुलीनी स्वतःच डोळ्यात खडे घालणे विचित्र वाटले तरी अशक्य नव्हते. या घटने नंतर त्यांना घरात विशेष वागणूक मिळू लागली. एकीच्या अनुभवाने दहा जणींना जमले. आपल्याला महत्व दिले जातेय ही सुखद भावना सुद्धा त्यामागे असू शकते. चहाच्या टपरीवाल्याने 'मालक' म्हणावे किंवा गल्लीतल्या नेत्याने 'सरकार' म्हणाल्यावर सामान्य माणसाला काहीसा अशाच प्रकारचा आनंद होत असतो.
माझ्या शाळेत मुले मास्तरांना गैर हजेरीची असंख्य कारणे सांगत असत आणि एकूणच शाळेत न जाणे अनेकांना आवडे. शिक्षणाविषयी आजही खूप अनास्था वाढते आहे आणि जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा कल्पनेपलीकडे खालावला आहे.
तर डॉ. दाभोळकरांनी केलेला उपाय आवश्यक होता त्यामुळे खरे काय ते कळायला मदत झाली. अन्यथा आपल्या गम्मत म्हणून केलेल्या युक्तीला जिल्हाभर अनपेक्षित प्रसिद्धी मिळत आहे हे बघून त्या चिमण्या मुलीना खरे बोलण्याचे धाडस पण झाले नसते. ही घटना होऊन चोवीस वर्षे झाली. या सर्व मुली आता दिल्या घरी सुखी आहेत. त्यांना पुन्हा कधी त्रास झाल्याचे ऐकिवात नाही.
प्रश्न उरतो तो श्री ओंक साहेब यांच्या लेखाचा. ज्या कोणा बाबांचा ते उदो उदो करू पहातात त्याचे कारण काहीही असो.
मूळ प्रश्न असे आहेत:
१. डॉ. दाभोळकर हे स्वतः डॉक्टर आहेत. त्यांना रुग्णांशी कसे वागावे हे समजत नाही असे वाटते काय?
२. १९८८ नंतर असे खडे परत गावात आले नाहीत हे सत्य नाही काय? का बरे आले नाहीत?
३. अंनिस ला बोलावण्या आधी काही पालकांनी मांत्रिक वगैरे उपाय केलेच होते. मग त्याला यश का आले नाही?
४. खडे थांबले ते नक्की कोणामुळे, याचे उत्तर का शोधले नाही?
५. या विषयावर स्वतः दाभोळकर यांनी त्यांच्या पुस्तकात एक पूर्ण प्रकरण दिले आहे ते आपण वाचले आहे काय?
६. अंधश्रद्धा निर्मूलन हे कार्यच चूक आहे असे आपल्याला वाटते काय?
प्रतिक्रिया
18 Jan 2012 - 4:07 am | मराठमोळा
>>त्या मुलीनी स्वतःच डोळ्यात खडे घालणे विचित्र वाटले तरी अशक्य नव्हते.
१००% शक्य आहे.. अशा बर्याच प्रकारच्या घटना पहाण्यात आल्या आहेत.. हा एक प्रकारचा मानसिक विकारही आहे. ज्यात रुग्ण स्वतः किंवा त्याच्या जवळची व्यक्ती जसे आई-वडील हेच असे प्रकार करत असतात.
बाकी विचारलेले प्रश्न अतिशय रास्त आहेत. :) ओकसाहेब उत्तर देतील अशी आशा करतो.
हा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद.
18 Jan 2012 - 5:42 am | रामपुरी
"ओकसाहेब उत्तर देतील अशी आशा करतो." :)
निराशेची तयारी ठेवा. असल्या "औट ऑफ सिलॅबस"( पक्षी : अडचणीच्या ठरणार्या) प्रश्नांना ते उत्तरे देत नाहीत हा पूर्वानुभव आहे.
18 Jan 2012 - 5:54 am | टुकुल
<< ओकसाहेब उत्तर देतील अशी आशा करतो. >>
हि आशा लै वैट हो. हॅ हॅ हॅ.
बाकी लेखात शिर्षकाप्रमाणे त्या गोष्टीची दुसरी बाजु चांगली मांडली आहे, फक्त दाभोळकरांनी काय केल होत ते सांगीतल असत तर अजुन नीट कळाल असत.
--टुकुल.
18 Jan 2012 - 8:25 am | रेवती
दुसरी बाजू चांगली मांडली आहे.
18 Jan 2012 - 9:10 am | मन१
मत्व्चा मुद्दा
18 Jan 2012 - 9:32 am | अत्रुप्त आत्मा
तुंम्ही दिलेल्या सहा प्रश्नांची खरीखुरी उत्तरं ओकांनी देणं,,, म्हणजे जावेद मियांदाद नी भारतीय क्रिकेट विषयी सद-भावना बाळगल्या सारखं होइल... ;-)
18 Jan 2012 - 10:32 am | पप्पु अंकल
मेरे आत्मा की ये आवाज है
18 Jan 2012 - 11:05 am | अत्रुप्त आत्मा
@मेरे आत्मा की ये आवाज है>>> :-D
<<< याsss हूsss.... पप्पु अंकल और हम दोस्त है।
18 Jan 2012 - 11:09 am | प्रचेतस
डोक्याला डोकं भिडतं जिथे, उवांना नवं घर मिळतं तिथे. :P
18 Jan 2012 - 11:41 am | अत्रुप्त आत्मा
@-डोक्याला डोकं भिडतं जिथे, उवांना नवं घर मिळतं तिथे.>>> :-D
<<<
पप्पू अंकल हताशी या
आपण नव घर धुवू
कारण त्यात शिरलीये
वल्ली नावाची ऊ
18 Jan 2012 - 11:43 am | प्रचेतस
पप्पू अंकल निघून गेले,
उवांना डोक्यात घेऊन गेले,
आता फक्त तुम्हीच उरलाय
डोक्याला जोरात खरारा करताय.
18 Jan 2012 - 11:53 am | अत्रुप्त आत्मा
@-डोक्याला जोरात खरारा करताय.>>> अरारा...
काय आली ही तुमच्यावर वेळ
मोडुन पडला तुमचाच ख्येळ
अंकल उवांना(पक्षी-तुंम्हाला) घेऊन ग्येले...
मग हे सांगायला,तुंम्ही काय आभाळातुन आले?
18 Jan 2012 - 12:42 pm | प्रचेतस
आमचा खेळ मोडला नाही,
उवांनी त्रास दिला नाही,
तुमच्या डोक्यात मात्र शिरल्या
आणि उगाचच रक्त पीत बसल्या.
आता बास हो गुरुजी, अवांतर होत चाललय उगाच. ;)
9 Feb 2012 - 6:29 pm | शशिकांत ओक
मित्रा,
कदाचित वाचनात आले नसेल तर म्हणून...
खेडूतांच्या प्रश्नांना प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांचे उत्तर -
“ खेडूतांचे वरील आक्षेप-प्रश्न गैरलागू आहेत. मुलींच्या डोळ्यातून आपोआप खडे येत होते की नाही हा मुख्य प्रश्न असून त्याचे उत्तर त्या मुलींच्या नित्य सहवासात असणारे शिक्षक व पालक देऊ शकतात. त्या सर्वांची साक्ष काय आहे ते पहा.
मुख्य प्रश्नाला गैरलागू प्रश्नांचे फाटेफोडण्यामधे सत्यशोधण्याऐवजी दुसराच काही हेतू असल्याचे दिसते. फाटे फोडणाऱ्याला ते स्वीकारल्यावाटून गत्यंतर नाही.”
ओकांची प्रतिक्रिया - प्रा. गळतगे कोणी बाबा वगैरे नाहीत व मी त्यांचा उदो उदो करायची गरज नाही.
18 Jan 2012 - 9:44 am | गवि
लोकांचा बुद्धिभेद न करता सरळपणे आपलं मत आणि निरिक्षण सर्वांसमोर ठेवलंत त्याबद्दल आभार आणि अभिनंदन.
समयोचित लेख.
18 Jan 2012 - 11:47 am | सुमो
अगदी अस्सच म्हणायचं होतं...
दुसरी बाजू खूपच छान मांडली आहे तुम्ही..
अभिनंदन.
18 Jan 2012 - 9:54 am | ५० फक्त
दुसरं काहीही असुदे ते नेहमीच महत्वाचं असतं आणि अडचणीचं ही, पण तेच इथं स्पष्टपणं मांडल्याबद्दल धन्यवाद.
आणि प्रश्नांची उत्तरं मिळायची आशा सोडुन द्या किंवा पुढच्या कट्ट्याला या, सोय करु.
18 Jan 2012 - 10:30 am | उदय के'सागर
ओक साहेब ह्याला काहि प्रत्युत्त्तर देतिल कि नाहि हि शंकाच आहे, पण त्यांनी जर काहि 'ठोस' उत्तरं नाहि दिलीत तर त्यांनी इथुन पुढे मिपा वर असले (आणि अश्या कोणि बाबांबद्दल) लिखाण करु नये हि नम्र विनंती.
(केवळ मिपाकरांचे मनोरंजन म्हणुन असले धागे काढायचे असतिल त्यांना तर मग काय "लोकशाहिच" आहे असे समजुन चालु द्यावे :))
18 Jan 2012 - 1:42 pm | गणपा
दुसरी बाजू समोर आणलीत ते बर केलत.
पण दाभोळकरांनी नक्की काय केल त्या बद्दल चार ओळी लिहिल्या असत्या तर अधिक आनंद झाला असता.
(पुस्तक विकत घेउन ते आख्खं प्रकरण वाचुन उलगडा होईलच... पण त्यासाठी किमान ४-६ महिने थांबाव लागेल. या मधल्या काळात संपुर्ण प्रकरणच विस्मृतीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.)
18 Jan 2012 - 2:11 pm | परिकथेतील राजकुमार
एका भानामतीची दुसरी बाजू आवडली.
आता ह्याच विषयावरती, 'स्वतःला हवे ते मिळवण्यासाठी स्त्रीया कुठल्याही पातळीवरती जाऊ शकतात' हे सांगू पाहणार्या युयुत्सुंच्या लेखाची प्रतिक्षा आहे.
असो..
आता इकडे दाभोळकरांचे पुस्तक शोधणे आले.
18 Jan 2012 - 2:16 pm | यनावाला
श्री.खेडूत यांनी कडेगाव भानामतीची केवळ दुसरी बाजू मांडली नसून सत्यबाजू मांडली आहे. ते स्वतः तिथले गावकरी असल्याने त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना विशेष महत्त्व आहे. कोणताही आक्रमक पवित्रा न घेता त्यांनी सौम्य शब्दांत सत्य सांगितले आहे. त्यांचे प्रश्नषटक मूळ चर्चाप्रस्तावकांना निरुत्तर करणारे आहे. श्री.खेडूत यांना धन्यवाद! शतशः धन्यवाद!
18 Jan 2012 - 9:10 pm | शशिकांत ओक
मित्र हो,
आपले विचार मला समजले.
भानामती व अन्य काही प्रकरणातील कथने पुढील पोस्टमधे वाचकांच्या माथी मारायचा माझा डाव आहे, असे नाही.
मला गळतग्यांच्या प्रखर विज्ञानवादी विचारसरणीचा आदर आहे. त्याच्या निर्भीड लेखनातून वाद निर्माण होणार हे अपेक्षित आहे.
म्हणून मी त्यांची असे लेखन करायच्या मागची भूमिका काय हे सादर करत आहे. अं नि व्हायला हवे यात दुमत असायच कारण नाही असे मी व प्रा. गळतगे मानतो. तेंव्हा दाभोलकर आणि अन्य अंनिवादीचे कार्य चांगले किंवा वाईट आहे असे तागडीत तोलायला मी लेखन सादर केलेले नाही.
खेडूत यांनी मांडलेले विचार -
त्याचे खंडन वा मंडन करायची माझी भुमिका नाही. कारण माझा त्या करिताचा भानामतीचा वा अन्य प्रकरणातील घटनांचा अभ्यास नाही. म्हणून त्याच्या प्रश्नांना मी बगल देत आहे असेही नव्हे.
प्रा. गळतगे कर्नाटक राज्यात निपाणी पासून २३ किमी दूर त्यांच्या शेतात - भोज नामक खेड्य़ात राहातात. त्यांचा मिपाशी थेट संपर्क होत नाही. त्यांना कॉम्युटरवरील लेखन इतरांकडून समजून घ्यावे लागते. तसे असले तरी प्रा. गळतगे यांनी इथे मांडलेल्या विचारांवर लेखन करून प्रकाश टाकला तर तो मी जरूर सादर करेन. त्यांचे वय (८१) व तब्बेत यामुळे ते केंव्हा घडेल त्याबद्दल मी सध्या काही आश्वासन देऊ शकत नाही मात्र त्यांच्यापर्यंत विचार पोहोचण्यासाठी जरूर प्रयत्न करीन. याची खात्री बाळगा.
18 Jan 2012 - 3:40 pm | गणेशा
धन्यवाद
बाकी आमचा ही क मित्र त्याच भागातील असल्याने
त्यास भेटल्यावर बोलले जाईनच
18 Jan 2012 - 4:17 pm | खेडूत
सर्वांचे आभार!
आताच डॉक्टर दाभोळकर यांच्याशी बोललो . त्यांनाही वृत्त ऐकून बरे वाटले . 'अंधश्रद्धा विनाशाय ' हे पुस्तक
राजहंस प्रकाशनाचे असून आठवी आवृत्ती चालू असल्याचे त्यांच्याकडून समजले .
मला आठवते ते असे :
त्या लेखात म्हटल्याप्रमाणे त्यांनी काही मुलीना गोड बोलून तर काहीना धाक दाखवून हे कबूल करून घेतले .
त्या मुलीनी त्यांना प्रात्यक्षिक सुधा दाखवले हे महत्वाचे आहे, इतर तपशील आता आठवत नाही .
वरील पुस्तकात सविस्तर चर्चा वाचली होती आणि ते पटले होते.
18 Jan 2012 - 4:23 pm | अत्रुप्त आत्मा
माझ्याकडे प्रस्तुत पुस्तक आहेही..संपादक व धागाकर्ता यांची हरकत नसेल तर त्या प्रकरणातला आशय इथे टंकू सुद्धा... म्हणजे मीच टंकेन... (दाभोळकरांची परवानगी आहे,असं समजुन चला...ते असल्या कामाला..किंवा त्यांच्या भाषेत-''त्यांच्याच कामाला'' कधिही नकार देत नाहीत...)
18 Jan 2012 - 4:27 pm | खेडूत
वाट पहातोय, वाचायला आवडेल, कारण आता सगळे काही आठवत नाहीय.
18 Jan 2012 - 8:50 pm | ईन्टरफेल
येउ ध्या कि हो!
लवकर
18 Jan 2012 - 9:43 pm | अत्रुप्त आत्मा
सो सॉरी टू ऑल... आज नाही पण उद्या नक्की मिळेल पुस्तक..(ज्यानी माझं पुस्तक नेलय तो अम्चा मैतर नेमका आजच बाहेरगावी आहे,आणी जिथनं[असच]मिळवायचं त्या संस्थेला आज बुधवारी सुट्टी :-( )
उद्या तर नक्कीच काहीही करुन आणीन... :-)
19 Jan 2012 - 5:24 pm | अत्रुप्त आत्मा
खेडूत यांचे लेखाच्या संदर्भातली मुळ माहिती-डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या ''अंधःश्रद्धा विनाशाय'' या पुस्तकातून साभार---(या माहितीमधील मुळ पिडित व्यक्तिंची नावे देण्याचे मुद्दामच वगळत आहे...तसेच मुळ प्रकरणातील आपल्या लेख-चर्चेच्या अनुषंगानी आवश्यक असलेला भागच इथे लिहित आहे...)
मुळ प्रकरणाची संक्षिप्त माहिती-
थोडी पूर्व कल्पना-हा प्रकार कडेगाव येथे घडलेला आहे. प्रथम कु.---हिच्या डोळ्यातुन असे खडे निघायला सुरवात झाली,व नंतर तिच्याच वयोगटातल्या( वयोगट ९ ते १०वर्षे) अन्य १०मुलींच्याबाबतही हा प्रकार सूरू झाला..यामुळे गावकरी त्रस्त होऊन गेले..गावातले लांबच्या रुग्नालयातले असे सर्व डॉक्टर हा प्रकार तपासत होते,परंतू त्यांनाही फारसे यश आले नाही,म्हणुन डॉ.बर्वे यांनी पाठवलेल्या निरोपानुसार डॉ.दाभोलकर,मानसोपचार तज्ञ.प्रसन्न दाभोलकर,अं.नि.स.चे सातारचे पदाधिकारी श्री.मंडपे,श्री.पांगे आणी इतर कार्यकर्ते अशी टिम कडेगावला येऊन थडकली या नंतर या सर्व मुलींशी त्यांच्या घरी/शाळेत अंनिसचे सर्व कार्यकर्ते प्रेमानी/सामोपचारानी गरज भासल्यास धाक दाखवून,म्हणजेच ''गरजेनुसार आवश्यक ते तंत्र वापरुन''बोलू लागले...ही सर्व तपासणी गावकर्यां मधल्याच कुणाच्या तरी घरी चालू होती,,,दोन दोन मुलिंना बोलावुन कार्यकर्ते तपासत होते,व पुढिल सुरक्षितता..म्हणुन त्यांना घराच्या परसदारी वेगळे नेऊन थांबवत होते.सर्वात पहिल्यांदा हा प्रकार घडलेली जी मुलगी होती, तिच्या बरोबर घडलेल्या संवादाचा व प्रकरण उघड्कीला येऊन त्यातुन निष्पन्न झालेला सर्व विषय पुढे...मुळ पुस्तकातुन....
प्रकरण चवथे---छोट्या मुलिंची-मोठी भानामती---(पान ५८ वरुन..)
''बाकीच्या सर्व बोलल्या.त्यात सर्वात महत्वाचे बोलणे --- ------ --चे. दहा एक मिनिट ती खोटे बोलत होती,पण नंतर तिचा बांध फुटला.तिने हुंदके देत सर्व सांगितले. ---(मुलगी)* वयाने आणी चणीने छोटी.वडिल व्यसनी होऊन वारलेले,आणी आई दूर.आजोळच्या घरच्या रगाड्यात भांडी घासणे,धुणी धुणे यासाठी दुसरे कुणी नव्हतेच.---(मुळ पिडित मुलगी)* जरा मोठी झाली असे मानुन तिच्या अंगावर काम टाकण्यात आले,त्यातुन सुटका नव्हती.हे करुनही अधुन मधुन मार होता.ही कामे आणी हा मार खेड्यातल्या या वयातल्या अनेक मुलींच्या भोगाला येतो.तो सोसतच मुली मोठ्या होतात.त्यामुळे या एकुण प्रकारात घरच्यांना फारसे गैर वाटत नाही.परंतु --- मात्र हिरमुसली झाली,खचली.एके दिवशी खेळताना एका मुलाने तिच्यावर वाळु उडवली.काही तासांनी तिला वरच्या पापणीखाली जरा खुपल्यासारखे वाटले.तिने डोळ्याचा कोपरा दाबला,तर खडा खाली पडला.तिने तो पुन्हा बसवला.एकदा बाजुच्या खोबणीत,एकदा खालच्या पापणिच्या आतल्या खाचेत.डोळ्याला काहिच त्रास झाला नाही.शाळेत तिने पहिल्या दिवशी हे गुपचुप दोनदा केले,मग पुढिल दिवसात कितितरी वेळा...
आणी बघता बघता भानामतीचा बोलबाला झाला.काम कमी झाले.मार चुकला.तिच्याकडे बघण्यात प्रेमळपणा आला.परिक्षा जवळ आली असुनही आइकडे धाडण्यात आले.आईकडे अर्थातच भानामती बंद होती.पुन्हा कडेगावला आल्यावर या प्रिय भानामतीला ---ने (यामुलीने)* परत बोलविले.(''हे खडे मी शाळेच्या झाडलेल्या कचर्याच्या ढिगातुन घेत असे''..हे पण तिने सांगितले.आणी आता येताना तिन खडे घालुन आले,असे खरे खरे सांगुन ,खालच्या पापणीच्या आतल्याबाजुने तांदळाच्या दाण्या एवढे तिन खडे काढुन दाखवले.)
हे सारे सांगुन झाल्यावर तिला जोरात रडू फुटले.एकदम कसेतरी वाटु लागले.शेजारच्या कॉटवर ती पंधरा मिनिटे पडुन राहिली.डोळ्यातुन खडे येण्याचा हा प्रकार कुतुहलाचा,चर्चेचा,आपल्याकडे लक्ष वेधण्याचा,सहानुभुती मिळण्याचा प्रकार होतोय हे लक्षात आल्यामुळे हळूहळू इतर काहीजणींनी ही भानामती (ट्रीक)* आत्मसात केली.आपण हे कुणाला दाखविले वा आपल्याला हे कुणी शिकविले,याबाबतही काही माहिती मुलींनी दिली.डोळ्याला या प्रकारात इजा होत नाही,याची खात्री पटल्यानंतर उत्साहाने दिवसातुन पंधरा-वीस वेळा हा प्रकार चालू झाला...''
मित्रहो वरिल सर्व भाग वाचल्यानंतर यातिल सत्य व त्या पाठिमागिल (सामाजिक) परिस्थिती नीट कळुन येते... या मुली अश्या का वागत होत्या हे त्यांच्या पालकांना अं.नि.स. ने सांगितल्यावर पालकांनीही सामोपचाराची व समंजस पणाची भुमिका घेतली. मुलींनीही ''अश्या प्रकारचा घरातुन होणारा त्रास थांबला तर आंम्ही असे वागणार नाही'' असे कागदोपत्री लिहुन दिले.पुढे गावकर्यांसमोर या बद्दलची सभा दाभोलकरांनी घेतली व सगळ्यांच्या शंका/कुशंकांना उत्तरे देऊन यापुढेही असे प्रकार घडले तर ''न भिता आंम्हाला कळवा आंम्ही पुन्हा येऊ'' अश्या तर्हेचे आश्वासन गावकर्यांना देऊन दाभोलकर आणी टिम सातार्याला परतली.
ता.क. - वरिल उतारा टंकताना पिडित व्यक्तिचा नामोल्लेल्ख टाळला असला तरी काही ठिकाणी वाक्यांचे इत्यर्थ कळुन यावे म्हणुन (---)* अश्या असलेल्या कंसाची योजना ही माझी आहे...तर उरलेले कंस मुळचेच आहेत...
19 Jan 2012 - 6:04 pm | गणेशा
धन्यवाद !
19 Jan 2012 - 6:58 pm | प्रचेतस
'अंधश्रद्धा विनाशाय' हे पुस्तक आधी वाचलेले होतेच. भटजींनी दिलेल्या उतार्यामुळेपुस्तकाची आठवण परत ताजी झाली.
19 Jan 2012 - 7:20 pm | ईन्टरफेल
धन्यवाद ! सर आमच्या सारख्या खेडुतांना आसली पुस्तके वाचायला मिळत नाहित !
आम्हि आपले आसल्याच भंपक गोष्टीवर विस्वास ठेवुन आसतो! माहिति दिल्याबद्दल धन्यवाद!
19 Jan 2012 - 8:39 pm | अप्पा जोगळेकर
माहितीबद्दल आभार. कोणताही मोबदला न घेता असे जागॄतीचे काम करणारे दाभोळकर ग्रेटच आहेत.
19 Jan 2012 - 11:02 pm | रेवती
उतारा वाचला. अपेक्षेप्रमाणेच गोष्टी होत्या.
20 Jan 2012 - 8:14 am | मराठमोळा
>>उतारा वाचला. अपेक्षेप्रमाणेच गोष्टी होत्या.
+१ सहमत आहे.. अपेक्षा हीच होती. अतृप्त आत्मा यांना धन्यवाद.
20 Jan 2012 - 2:22 am | टुकुल
धन्यवाद, आणि मला वाटते, दाभोळकरांनी योग्य प्रकारे यामागचे कारण शोधले.
--टुकुल
20 Jan 2012 - 12:30 pm | सुमो
मूळ पुस्तक वाचले नव्हते..पण आता वाचायला उत्सुक आहे...
अत्रुप्त आत्मा यांचे आभार...
20 Jan 2012 - 12:31 pm | सुमो
मूळ पुस्तक वाचले नव्हते..पण आता वाचायला उत्सुक आहे...
अत्रुप्त आत्मा यांचे आभार...
21 Jan 2012 - 12:24 am | शशिकांत ओक
यात नविन ते काय?
मित्र हो,
कडेगावच्या शाळकरी मुलींच्या डोळ्यातून खडे येऊ लागल्याची भानामतीची केस विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन या पुस्तकात प्रकरण एक वर दिलेली आहे. त्यासंबंधी गळतग्यांच्या ब्लॉगवरील विचार मिसळपाव सादर झाल्यावर शेकड्याने प्रतिक्रिया आल्या. गळतग्यांचे पुस्तक एकदम डोळ्यासमोर आले. त्यातील ते प्रकरण जगाच्या कानाकोपऱ्यातील अनेक सदस्यांनी धुंडाळून वाचले. असे ब्लॉगच्या व्हिजिट्समधून निदर्शनास आले. त्यावर ‘कडेगावची भानामती दुसरी बाजू’ असा धागा उघडला गेला व त्यात ‘खेडूत’ यांनी ते त्याच गावातील रहिवासी असल्याचे नमूद करून अंनिसच्या कारवाईचे समर्थन करणारे विचार सादर केले. त्यानंतर ‘अतृप्त आत्मा’ने डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी प्रत्यक्ष संवाद करून त्यांच्या पुस्तकातील याच प्रकरणात काय म्हटले आहे ते सादर केले. त्यामुळे अनेकांना ती बाजू कळली. आणि आता ओक या धाग्याला कसे उत्तर देणार अशी अपेक्षा व्यक्त केली गेली. नेहमी प्रमाणे ते पळ काढणार असा संकेतही दिला.
त्याला अनुलक्षुन सोबतचे लिखाण सादर करत आहे.
अतृप्त आत्म्या यांनी कष्टपुर्वक लेखन कार्य करून डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पुस्तकातील मजकूर सादर करून दुसरी बाजू मांडली. त्याबद्दल त्यांचे आभार.
असे दिसते की श्री. गळतग्यांच्या पुस्तकातील प्रकरणातून ते डॉ. नरेंद्र दाभोलकराच्या म्हणण्याला आक्षेप घेतलेला वाटत नाहीत. कारण गळतगेही तेच म्हणताना दिसतात. 'प्रत्येक मुलीशी एकटी करून तिच्याशी अंनिसचे लोक लाडीगोडीने वा धाक दाखवून त्या सर्व मुलींच्याकडून त्या घटनेला आम्हीच जबाबदार होतो कारण घरच्या कष्टाच्या कामांना आम्हाला जुंपले जाई. तो जाच नको म्हणून ही शक्कल आम्ही काढली होती. असे वदवून घेतले होते.'
प्रश्न होता तो गळतग्यांनी या कथनाच्यापुढे जाऊन कडेगावच्या ग्रामस्थांनी दै. पुढारीतील दि 23 मार्चच्या अंकात वाचकांच्या पत्रव्यवहारातील पत्र. ज्याचे शीर्षकच “वस्तुस्थिती नेमकी काय?” असे आहे ते सादर केले.आणि ज्या पत्राला गुलाबराव देशमुख, डॉ. अशोक काळे, दत्तात्रय कुलकर्णी (मुख्याध्यापक – मुलींची शाळा, कडेगाव.) आदि तेथील जेष्ठ ग्रामस्थांनी दि. 16मार्चच्या दै. पुढारी पेपरमधे अंनिसने प्रसिद्ध केलेल्या प्रचाराच्या मजकुराला उद्देशून लिहिले गेलेल्या खुलाशा बाबत, त्या पत्रात जे वस्तूस्थिती काय म्हणून जे म्हटले आहे,की ‘अंनिस व विज्ञान प्रबोधिनीने लोक आले आणि त्यांनी बळजबरीने मुलींच्याकडून लिहून घेतले, फोटो काढले, मात्र मुली जर डोळ्यात आपणहून खडे घालत असतील तर त्यांच्याप्रमाणे समितीच्या लोकांनी त्यांच्या (आपल्या) डोळ्यात असेच खडे घालून (व मग ते काढून) दाखवण्याचा प्रयोग गावकऱ्यांसमोर का केला नाही?, ग्रामसभेत मुलींनी खडे डोळ्यात घालून ते काढून दाखवण्याचा प्रकार झाला नाही आणि अद्यापि डोळ्यातून खडे यायचे बंद झालेले नाही”. ग्रामसभेत तेथील जिल्हा परिषदचे सदस्य श्री. डांगे यांच्या मुलीच्याही डोळ्यातून खडे येत होते. गावाची अब्रू जाईल असा विचार करणाऱ्या सूज्ञ मंडळींनी त्यांची व इतरांची समजूत घातल्याने त्यांनी आपला राग आवरला व सभा कशीबशी संपली. आदि. जे लेखन प्रस्तूत केले आहे त्याचा. ते छापून आलेले पत्र काही गळतग्यांनी लिहिलेले नव्हते.
आता प्रश्न आहे तो अंनिसच्या या मान्यवरांनी त्यावर काही प्रतिक्रिया नोंदवली काय त्याचा. काय विचाराने त्यांनी त्या प्रकाशित पत्रावर काही भाष्य केले किंवा नाही. नसेल तर का नाही? कारण डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी त्या प्रकरणाच्या नंतर काही काळाने प्रकाशित केलेल्या पुस्तकात त्यांना उद्देशून केलेल्या सार्वजनिक पत्रातील त्या विधानांवर अंनिसतर्फे खुलासा करायची जबाबदारी त्यांच्यावर येते. ती त्यांनी पार पाडली का किंवा नाही हे महत्वाचे आहे. विशेषतः दै. पुढारीतील स्थानिक घटनेवर ताबडतोब छापलेल्या गेलेल्या प्रतिक्रियेच्या लेखनावर ‘आम्हाला ते लिखाण माहित नव्हते’ असे त्यांना म्हणता येणार नाही असे वाटते. असो,
खेडूत म्हणतात की ते त्या गावचे रहिवासी आहे आणि प्रत्यक्ष नसेल पण त्यानंतर गावात काय बोलले गेले याचे ते साक्षी आहे. त्यांनी आपले त्यावेळचे मत नोंदवले. छान आहे. पण त्याच गावात वा पेठेत ते राहात होते म्हणून त्यांचे मत ग्राह्य व्हावे असे नाही. अगदी आत्तासुद्धा त्याच शहरात, गावात राहून देखील एखादी घटना पेपरमधून कळली तेंव्हा माहिती झाली असे अनेकवेळा होते. त्यामुळे प्रत्यक्षात काय घडले याची नोंद होतेच असे नाही. हे आपण प्रत्यक्ष अनुभवतो. याचा अर्थ मला खेडूत ना खोट्यात पाडायचे नाही. पण सामान्यतः पेपर मधील लेखन अंनिस पुरक केलेले असते. त्यामुळे ते सत्यच असणार असा ग्रह होतो. गळतगे यांचा रोख अशा छापील कथनामागील सत्यता काय आहे हे शोधायचा आहे. म्हणून अंनिसच्या लेखनात छापील सत्य व घडलेले सत्य असा फरक पडणार. त्यामुळे गळतगे यांच्यासारखे कोणीही सत्याग्रही राहूनही केलेल्या त्यांच्या लेखनावर प्रत्येकदा प्रश्न चिन्ह ठोकले जाणार हे गृहित आहे. तरीही त्यांनी त्यांना अनुभवायला आलेले जे सत्य आहे ते मांडण्याचे साहस प्रत्येक प्रकरणात केले आहे. ते पुढील प्रकरणातील नोंदीवरून लक्षात येईल. अंनिसचे विचार ऐकून ऐकून ज्यांची मते टोकाची झाली आहेत त्यांना असे विरोधी लिखाण आले की प्रतिक्रिया रागावलेल्या येणार हे ओघाने येते. आता यापुढील विविध प्रकरणात देखील असेच दिसेल की त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या काही विरोधी प्रतिसादांवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून काही प्रतिउत्तर त्यांच्या पुस्तकात नमूद आहेत किंवा नाहीत. नाही तर अंनिसला सोईचे तेवढे सादर करून त्याला सत्यकथन म्हणायचे असे होणार नाही काय?
मिपावरील काहीं प्रतिसादातून भानामतीत सांगितल्या जाणाऱ्या विचित्र व बीभत्स घटना घडलेल्याच नसतात किंवा घडत नाहीत असे मत नोंदवले गेले आहे. त्या खऱ्याच असतात किंवा नाही यावर अंनिसचे काय मत आहे? उदा. या प्रकरणातील कोवळ्या मुलींच्या डोळ्यातून खडे येत होते, का येत नसताना ही ते येत आहेत असे खोटेच सांगितले जात होते याची शहानिशा करावी.
सध्या इतकेच.
21 Jan 2012 - 10:18 am | शिल्पा ब
तुमची खरोखरच कीव येतेय. पण असं वागल्याशिवाय कदाचित तुमचा धंदा चालत नसेल, नाही का?
:Sp :-S) :sick:
21 Jan 2012 - 1:14 pm | सुमो
वोक्के..विंग कमांडर...
हे जे कुणी गळतगे आहेत त्यांनी हे असले भानामतीचे प्रकार एखाद्या पुरुषाकडून केले गेल्याचा एखादा प्रकार उघडकीस आणून दाखवावा...
जर मुली, स्त्रीयाच असे अंगात येणे , भानामती अशा प्रकारात असतील तर त्यांना मिळणारी वागणून आणि त्यापासून पाहीजे असलेली सुटका हे प्रमुख कारण असू शकते. हे अंनिस ने बळजबरीने नव्हे तर त्या मुलींशी बोलून सिद्ध केले.
असो..भारतीय वायुसेनेतील .रशियन मिग चांगले की फ्रेंच मिराज याबद्द्ल आपले काय मत आहे?
की त्यांचीही नाडीपट्टी बघावी?
18 Jan 2012 - 10:29 pm | अप्पा जोगळेकर
अंधारातून प्रकाशाकडे नेणारे लिखाण आहे. दाभोळकर यांच्या पुस्तकातील उतारे लवकर टंकावेत अशी गुरुजींना विनंती आहे.
19 Jan 2012 - 4:13 pm | प्रकाश घाटपांडे
१९३५ साली रा. ज. गोखले या भुगोल शिक्षकाने पुण्यात लोकभ्रम नावाचे पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाचा परिचय इथे वाचा. अशा प्रकारच्या अंधश्रद्धा पुर्वीपासून चालत आलेल्या आहेत. त्यावेळी नगर जिल्ह्यातील कान्हूर येथील भानामती / भुताटकी यावर चर्चा आहे.
हे पुस्तक ज्यांना मूळातुन वाचायचे असेल त्या हौशी लोकांसाठी हे पुस्तक मी स्क्रिब्ड वर ठेवले आहे. तिथे लोकभ्रम वाचा.
ता.क. हे पुस्तक लवकरच वरदा बुक्स नव्याने प्रकाशित करीत आहे.
19 Jan 2012 - 6:09 pm | तिमा
भानामती या शब्दाची व्युत्पत्ती काय असावी ? आणि भानुमती या नांवाचीही काय असावी ?
19 Jan 2012 - 6:25 pm | प्रकाश घाटपांडे
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मराठी वेबसाईट आपल्याला इथे पहाता येईल.
19 Jan 2012 - 6:31 pm | ५० फक्त
भटजी बुवा एक समजले नाही , जर श्री. दाभोळकरांनी संबंधितांची नावं स्पष्ट लिहिली आहेत, म्हणजे असतील, तर तुम्ही का गाळली ? या मागे काही श्रद्धा किंवा अंधश्रद्धा आहे काय ?
19 Jan 2012 - 6:45 pm | अत्रुप्त आत्मा
@,-जर श्री. दाभोळकरांनी संबंधितांची नावं स्पष्ट लिहिली आहेत, म्हणजे असतील, तर तुम्ही का गाळली ?>>>> ही केस दाभोलकरांकडे ''आलेली'' असल्याकारणाने त्यांना त्यांच्या पुस्तकात ती नावांसह मांडायचा अधिकार आहे..पण इथे व्यक्ती पेक्षा घटना महत्वाची आहे या एका कारणासाठी व त्या(पिडित) व्यक्तिंची नावं इथे उघड करण मला सयुक्तिक वाटत नाही म्हणुन...मी ती दिलेली नाहीत... :-)
@-या मागे काही श्रद्धा किंवा अंधश्रद्धा आहे काय ? >>>(हा प्रश्न [खरच..?] आपल्याला पडलेला आहे काय..?)पण या प्रश्नामुळे आंम्हाला तुमच्या मनातली श्रद्धा मात्र कळली आहे ;-)
20 Jan 2012 - 7:45 am | ५० फक्त
@,-जर श्री. दाभोळकरांनी संबंधितांची नावं स्पष्ट लिहिली आहेत, म्हणजे असतील, तर तुम्ही का गाळली ?>>>> ही केस दाभोलकरांकडे ''आलेली'' असल्याकारणाने त्यांना त्यांच्या पुस्तकात ती नावांसह मांडायचा अधिकार आहे..पण इथे व्यक्ती पेक्षा घटना महत्वाची आहे या एका कारणासाठी व त्या(पिडित) व्यक्तिंची नावं इथे उघड करण मला सयुक्तिक वाटत नाही म्हणुन...मी ती दिलेली नाहीत... --
१.असं असेल तर मग सदर लिखाण इथं पुनः प्रकाशित करण्यासाठी आपण श्री. दाभोळकरांची परवानगी घेतली आहे काय किंवा तसे करण्याचा अधिकार आपणांस आहे काय?
२.आणि परवानगी घेतली असल्यास श्री. दाभोळकरांनी सदर नावे प्रसिद्ध न करण्याची सुचना केलेली आहे काय ?
३.ज्या पिडित किंवा नाटकी व्यक्तींची नावे एखाद्या खुल्या / सार्वजनिक माध्यमात प्रसिद्ध झालेली आहेत, ती पुन्हा दुस-या माध्यमांत प्रसिद्ध करणे आपल्याला सयुक्तिक का वाटत नाही ?
४.कारण सदर घटना काही विशिष्ट व्यक्तींबद्दलच घडत असल्याने, घटनेएवढेच महत्व व्यक्तीला देखील आहे.
@-या मागे काही श्रद्धा किंवा अंधश्रद्धा आहे काय ? >>>(हा प्रश्न [खरच..?] आपल्याला पडलेला आहे काय..?)
होय, कारण सदर पिडित व्यक्तींची नावे इथं न टंकल्यामुळे त्यांना सदर उल्लेखाचा मानसिक त्रास होणार नाही अशी तुमची श्रद्धा किंवा अंधश्रद्धा स्पष्ट दिसुन येत आहे.
20 Jan 2012 - 2:53 pm | अत्रुप्त आत्मा
१.असं असेल तर मग सदर लिखाण इथं पुनः प्रकाशित करण्यासाठी आपण श्री. दाभोळकरांची परवानगी घेतली आहे काय किंवा तसे करण्याचा अधिकार आपणांस आहे काय?>>> होय परवानगी घेतली,,,तसे करण्याचा अधिकार मला नाही,परंतु मी तसे केले आहे...हेही मी त्यांना सांगितले आहे..व त्यांचा त्याबद्दलही कोणताही आक्षेप नाही...
२.आणि परवानगी घेतली असल्यास श्री. दाभोळकरांनी सदर नावे प्रसिद्ध न करण्याची सुचना केलेली आहे काय ?>>> अशी कोणतीही सुचना त्यांनी केलेली नाही,,,हा माझा स्वतःचा निर्णय आहे... आणी या केलेया लेखनाच्या उचलीची व त्यातल्या परिस्थितीजन्य बदलाची कल्पना मी त्यांना दिलेली आहे..व वर उल्लेख केल्या प्रमाणे दाभोलकरांचा कोणताही आक्षेप नाही...(आणी दाभोलकर काका अश्या स्वरुपाच्या कामांना आक्षेप घेतही नाहीत,असा माझा या पूर्वीचा अनुभव आहे...आणी समजा..आक्षेप घेतला तर पुढील संमंधित परिणामांसाठी मी ही तयार राहिन... :-) )
३.ज्या पिडित किंवा नाटकी व्यक्तींची नावे एखाद्या खुल्या / सार्वजनिक माध्यमात प्रसिद्ध झालेली आहेत, ती पुन्हा दुस-या माध्यमांत प्रसिद्ध करणे आपल्याला सयुक्तिक का वाटत नाही ?...>>> याबाबत पहिलं म्हणजे असं,,,की सदर प्रसंगातली व्यक्ति नाटकी म्हणजेच निव्वळ स्वता:च्या अपस्वार्थासाठी दुसर्या व्यक्तिंना त्रास देणारी असती,,तर तिचा उल्लेख मी हमखास अगदी निश्चितच केला असता..परंतू सदर प्रसंगातील मुलीने व तिच्या मैत्रीणींनी-''घरात होणार्या जाचावरचं औषध सापडलं'' अश्या भावनेनी सदर नाटकी कृत्यांचा अवलंब केला होता.
त्यामुळे जाच बंद व्हायचं आश्वासन मिळालं,व तो पुढे बंद झालाही..म्हटल्यानंतर त्यांनी या प्रकारची नाटकं पुढे कधिही केली नाहीत...हे सत्य आहे( मुळ धागाकर्ते खेडुत यांनी तसा उल्लेखही केला आहे...>>>''ही घटना होऊन चोवीस वर्षे झाली. या सर्व मुली आता दिल्या घरी सुखी आहेत. त्यांना पुन्हा कधी त्रास झाल्याचे ऐकिवात नाही.'') असं सर्व आहे म्हटल्यानंतर अश्या सुधारलेल्या व्यक्तिंचा नामोल्लेख करुन त्यांना (आता) निष्कारण दुखावल्या सारखं काही घडू नये,,,असं मला वाटल्यामुळे मी तो उल्लेख केलेला नाही.
आणी अपल्या उप-प्रश्ना नुसार दुसरं उत्तर असं,,की... दुसर्या माध्यमात ही जी नावं मी प्रसिद्ध करणार त्याला मुळ लेखकाचा जरी आक्षेप नसला तरी मुळ पिडित व्यक्तिचा आक्षेप असू शकतो... मुळ व्यक्तिंना हे कळलं,तर त्या मला या संदर्भात कायदेशीर स्वरुपात जाब विचारता येत असला/नसला,तरी वैयक्तिक स्वरुपात विचारू शकतात..मला तर फक्त घटनेचं मुळ स्वरुप वाचकांपर्यंत पोहोचवायचं आहे,,,मग मी हा पुढचा अनावश्यक उद्योग कशाला करू..?त्याची गरज नाही..असती तर मी तेही केलं असतं
४.कारण सदर घटना काही विशिष्ट व्यक्तींबद्दलच घडत असल्याने, घटनेएवढेच महत्व व्यक्तीला देखील आहे...>>> होय घटने इतक महत्व व्यक्तिंना आहेच...परंतू ते आपल्या इथे चाललेल्या काथ्याकुटाच्या मुळ विषयाकडे पाहाता गौण स्वरुपाचं आहे...म्हणुनच पुनर्लेखनात त्याचा प्राधान्यानी उल्लेख केलेला नाही. आणी या संदर्भात आणखि एक असं की सदर घटना हा इतिहास आहे..आणी जेंव्हा इतिहसातील दाखल्यांचा वर्तमान काळात सामाजिक संदर्भात उपयोग करायचा तेंव्हा व्यक्तिंचे नामोल्लेख हे---गरजेनुसार/तारतम्यानी करायला हवेत या मताचा मी आहे...
@-या मागे काही श्रद्धा किंवा अंधश्रद्धा आहे काय ? >>>(हा प्रश्न [खरच..?] आपल्याला पडलेला आहे काय..?)>>>
<<<@होय, कारण सदर पिडित व्यक्तींची नावे इथं न टंकल्यामुळे त्यांना सदर उल्लेखाचा मानसिक त्रास होणार नाही अशी तुमची श्रद्धा किंवा अंधश्रद्धा स्पष्ट दिसुन येत आहे.>>> होय तशी माझी श्रद्धा किंवा अंधःश्रद्धा आहे... कारण सदर पिडित व्यक्ति या लबाड नसुन, कौटुंबिक जाचाला बळी पडल्यामुळे नाइलाजानी काही काळ गैरवर्तन केलेल्या म्हणजेच गुन्हेगार नसुन फक्त दोषी आहेत...आणी गेल्या इतक्या कालावधीत त्या पुन्हा असं काहीही वागलेल्या नाहीत...म्हणुनच माझं म्हणणं आहे की अश्या व्यक्तिंना कशाला होऊ द्यायचा त्रास..? ज्याची गरजच नाही,ते करायचच कशाला..?
या मुद्याच्या बाबतीत शाम मानव यांचं एक मत इथे अवर्जुन सांगावसं वाटतं---ते अंगात येणार्या स्त्रीयांसंमंधी म्हणतात,,,''जो पर्यंत एखादी बाई अंगात येऊन घुमायला लागते(म्हणजे तिची वैयक्तिक अंधःश्रद्धा असते)..तोपर्यंत तिला माफ करा...पण जर का ती बाई देवी बनुन धंदा करायला लागली तर तीला साफ करा..म्हणजेच कायदेशीर शिक्षा करा''...---संदर्भ>>> पुणे येथे २००३साली अखिल भारतिय अंनिसची झालेली ५दिवसांची जाहिर व्याख्यानमाला....
त्यामुळे वरिल सदर प्रकरणातील पिडित मुलगी माफ करण्यातली आहे...तेंव्हा तिला आता जुन्या अठवणींनी त्रास होऊ नये असं वागलं पाहिजे..अशी माझी श्रद्धा/अंधःश्रद्धा/मनोधारणा आहे...
ता.क.---@या मागे काही श्रद्धा किंवा अंधश्रद्धा आहे काय ? >>> या आपल्या पहिल्या प्रतिसादातल्या वाक्याला मी हलकेच घेतल्यामुळे जिभ काढणारी स्मायली टाकली होती..(माझा समज असा की ही आपली मि.पा.ष्टाइल गंमत असेल,म्हणुन मीही जीभ काढली.).पण आपण याबाबत सिरियस आहात,,,असे दिसल्यामुळे या मुद्यापुरते आम्ही आपणाला---क्षमस्व---म्हणतो... :-)
20 Jan 2012 - 3:57 pm | प्रचेतस
इतका मोठा प्रतिसाद आणि फक्त दोनच स्मायली त्यापण फक्त स्मितहास्य करणार्या? आत्म्याकडून हे मुळीच अपेक्षित नाही.
20 Jan 2012 - 4:35 pm | अत्रुप्त आत्मा
@फक्त दोनच स्मायली त्यापण फक्त स्मितहास्य करणार्या? आत्म्याकडून हे मुळीच अपेक्षित नाही.>>> :-D कळ्ळें...कळ्ळें हो आम्हास... आंपल्यांलां कांय म्हणायचें तें
आपण आमच्या प्रतिसादांस बुच मारलत,
म्हणुन आता इथेच देतों हों... घ्यांsss...सगळ्यां आमच्याच आहेत...
1 Feb 2012 - 1:25 pm | शशिकांत ओक
मित्र हो,
प्रा. गळतगे कर्नाटक राज्यात निपाणी पासून २३ किमी दूर त्यांच्या शेतात - भोज नामक खेड्य़ात राहातात. त्यांचा मिपाशी थेट संपर्क होत नाही. त्यांना कॉम्युटरवरील लेखन इतरांकडून समजून घ्यावे लागते. तसे असले तरी प्रा. गळतगे यांनी इथे मांडलेल्या विचारांवर लेखन करून प्रकाश टाकला तर तो मी जरूर सादर करेन. त्यांचे वय (८१) व तब्बेत यामुळे ते केंव्हा घडेल त्याबद्दल मी सध्या काही आश्वासन देऊ शकत नाही मात्र त्यांच्यापर्यंत विचार पोहोचण्यासाठी जरूर प्रयत्न करीन. याची खात्री बाळगा.
वरील कथनाप्रमाणे प्राचार्य अद्वयानंद गळतग्यांनी खेडूतांच्या सहा विचारणांवर आपली प्रतिक्रिया कळवली. ती सादर करत आहे.
निरुत्तर करणारे प्रश्न षटक
प्रश्न उरतो तो श्री ओंक साहेब यांच्या लेखाचा. ज्या कोणा बाबांचा ते उदो उदो करू पहातात त्याचे कारण काहीही असो.
मूळ प्रश्न असे आहेत:
१. डॉ. दाभोळकर हे स्वतः डॉक्टर आहेत. त्यांना रुग्णांशी कसे वागावे हे समजत नाही असे वाटते काय?
२. १९८८ नंतर असे खडे परत गावात आले नाहीत हे सत्य नाही काय? का बरे आले नाहीत?
३. अंनिस ला बोलावण्या आधी काही पालकांनी मांत्रिक वगैरे उपाय केलेच होते. मग त्याला यश का आले नाही?
४. खडे थांबले ते नक्की कोणामुळे, याचे उत्तर का शोधले नाही?
५. या विषयावर स्वतः दाभोळकर यांनी त्यांच्या पुस्तकात एक पूर्ण प्रकरण दिले आहे ते आपण वाचले आहे काय?
६. अंधश्रद्धा निर्मूलन हे कार्यच चूक आहे असे आपल्याला वाटते काय?
...............................
खेडूतांच्या प्रश्नांना प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांचे उत्तर -
“ खेडूतांचे वरील आक्षेप-प्रश्न गैरलागू आहेत. मुलींच्या डोळ्यातून आपोआप खडे येत होते की नाही हा मुख्य प्रश्न असून त्याचे उत्तर त्या मुलींच्या नित्य सहवासात असणारे शिक्षक व पालक देऊ शकतात. त्या सर्वांची साक्ष काय आहे ते पहा.
मुख्य प्रश्नाला गैरलागू प्रश्नांचे फाटेफोडण्यामधे सत्यशोधण्याऐवजी दुसराच काही हेतू असल्याचे दिसते. फाटे फोडणाऱ्याला ते स्वीकारल्यावाटून गत्यंतर नाही.”
ओकांची प्रतिक्रिया - प्रा. गळतगे कोणी बाबा वगैरे नाहीत व मी त्यांचा उदो उदो करायची गरज नाही.
12 Feb 2012 - 8:39 pm | खेडूत
आपला नवा प्रतिसाद पाहिला. त्यात नवीन काहीच नाही!
तुम्हाला काय वाटते हे तुम्ही लिहिलेच नाही. स्वतः नाही तर तुमच्या 'प्रा.' ना विचारून का होईना मूळ प्रश्नांची उत्तरे शोधाल असे वाटले होते. असो.
मी फाटे फोडले नाहीत, हे तर सुशिक्षित अश्या कोणालाही पडणारे प्रश्न आहेत. त्याची उत्तरे द्याल तर पुढे बोलूच. अन्यथा चालले आहे ते चालू द्या !
बाकी माझ्याच गावातली घटना असल्याने आणि मला पूर्ण माहिती असल्याने लिहीले.
(खरी उत्तरे निपाणीला जाऊन नाय मिळायची. कडेगांव शंभर कि. मी.अलिकडेच आहे. डॉ दाभोलकरांना भेटायचे तर सातारा अजून जवळ.. जमले तर जाऊन या एकदा..)
>>>> मुख्य प्रश्नाला गैरलागू प्रश्नांचे फाटेफोडण्यामधे सत्यशोधण्याऐवजी दुसराच काही हेतू असल्याचे दिसते. फाटे फोडणाऱ्याला ते स्वीकारल्यावाटून गत्यंतर नाही.
हे मात्र तुम्हालाच अचूक लागू पडतेय हे तुमच्या लक्षात आले की नाही ?
__________________________________________________
खेडूत
14 Feb 2012 - 1:56 am | शशिकांत ओक
मित्रा
गळतगे यांचे लेखन आहे. त्यावरील आपल्या प्रतिक्रियेला त्यांनी उत्तर दिले आहे, त्यात मी कुठे येतो.
गळतग्यांनी तो लेख निपाणीत बसून लिहिलेला नाही. प्रत्यक्षात कडेगावला जाऊन अनेक संबंधित लोकांच्या व गावकऱ्यांशी संपर्क करून लिहिल्याचे ते म्हणतात.
आपल्या माहितीसाठी - या कामासाठी नाही पण मी काही वर्षांपुर्वी मी डॉ.जयंत नारळीकरांपासून ते दाभोळकरांना (नाडी ग्रंथात पट्टित नाव व अन्य माहिती खरोखर लिहिलेली असते का ) अशा शोधकार्यात मला रस आहे, आपणाला मी माझ्याकडून मदत करायला तयार आहे असे नुसतेच पत्रांनी सांगून न थांबता पुण्यातील आयुकाच्या कार्यालयामधे नारळीकरांना भेटलो व सातारला दाभोलकरांच्या घरी प्रत्यक्ष भेटायला गेलो होतो. (त्यावेळी ते भेटले नाहीत पण चि.हमीद व त्याचे मामांची गाठ पडली होती) नुसतीच (नाडी ग्रंथाची)जाहिरातबाजी करायची असती तर मी तसे केले नसते.
असो.
अंनिस बाबत नेहमी लिहिले जाते त्याच्या पेक्षा वेगळे लिहिल्याने अनेकांना रोष होणे स्वाभाविक होते, हे मी जाणतो. आपण प्रा.गळतगे यांचे अन्य प्रकरणातील लेखन वाचले असेल. त्यांच्या त्या लेखनावर आपण व्यक्त केलेले विचार वाचायला आवडतील.