सध्या आपल्या शेजारी असलेल्या दोन्ही राष्ट्रातील घडामोडी चिंताजनक आहेत
पाकिस्तानातील राष्ट्रपती झरदारी हे दुबई भेटीला गेले आहेत. त्यांच्या राजिनाम्याचा प्रश्न ऐरणीवर आहें. नव्याने निवडणूका होण्याची शक्यता आहे
पंतप्रधान गिलानीनी संरक्षण सचीव खलीद नईम लोढिंची हाकालपट्टी केली आहे.
लश्कर प्रमुख जनरल कयानी यांच्या विरोधात हा इशारा आहे
माजी लश्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ हे पाकीस्तानात पुन्हा परतण्याची भाषा करताहेत.
अमेरीकेचे पाकिस्तानचे संबन्ध तणावग्रस्त आहेत.
चीन ने आपल्या विस्तारवादाची नव्याने नांदी तैवान व तेथील समुद्रात केलेली आहे.
अमेरीकेला आर्थीक मंदीने ग्रासले आहे. तसेही पाकिस्तानात त्यांचे हात दगडाखाली अडकले आहेत
या सर्व घडामोडींचा भारतावर परीणाम अपरीहार्य आहे.
पाक मध्ये निवडणूका झाल्या आणि कोणताच पक्ष बहुमत मिळवू शकला नाही तर लश्कर पुन्हा प्रबळ होण्याची शक्यता जास्त आहे.
या पार्श्वभूमीवर भारतात देखील परीस्थिती फारशी आशादायक नाहिय्ये.
केंद्र सरकार पूर्वी कधी नव्हते इतके अस्थीर आणि दुर्बळ आहे. सर्वच पक्षांकडे कणखर नेतृत्वाचा अभावच आहे.लोकसभेसाठी मूदतपूर्व निवडणूका झाल्या तर कोणताच पक्ष /निवडणूकपूर्व आघाडी साधे बहुमत मिळवेल ही शक्यता नाही.
महागाई शीगेला पोहोचली आहे.
दोन्ही देशांत गेल्या तीन दशकातील सर्वात अस्थीर कालखंड आपण पहातोय.
या सर्व परीस्थितीचा भारतावर काय परीणाम होईल?
या वर्षाच्या मध्यात युध्द सदृष परीस्थिती निर्माण होईल असे म्हंटले जातेय.
येत्या वर्षात भारताची परीस्थिती निश्चीतच फार वेगळी असणार आहे.
पुन्हा पाकिस्तान
गाभा:
प्रतिक्रिया
12 Jan 2012 - 3:45 pm | मन१
ह्या धाग्याच्या निमित्तानं पुनरागमन करतील का?
अमेरिकेच्या मदतीवर अवलंबून असल्यानं तशीही पाकची अर्थव्यवस्था डब्घाईला आली आहे.
मला अमेरिकेन व युरोपीय अर्थ संकटाचे काय करावे हेच मला समजत नाहीये. त्यामुळे हा घोळ अजूनच वाढतोय.
तसेही वेळच्यावेळी चीनला रोखले नाही तर तो मिसाइल घेउन तयार आहेच.
चीनला रोखायला आपण बलशाली व्हायला हवे म्हणून मी gymसुद्धा लावली आहे.
एकाबाजूने पाक व दुसर्या बाजूने पाक अशा कोंडित आपण एकटे पुरे पडणार नाही म्हणून शेजारच्या शेंबड्या पक्याशीही दोस्ती करून ठेवली आहे. त्याचा पैसेवाला पप्पा अर्थसंकटास आवरु शकण्यास महत्वाचा ठरणार आहे.
चिंता करितो विश्वाची
12 Jan 2012 - 4:14 pm | मोदक
>>>चीनला रोखायला आपण बलशाली व्हायला हवे म्हणून मी gymसुद्धा लावली आहे.
एकाबाजूने पाक व दुसर्या बाजूने पाक अशा कोंडित आपण एकटे पुरे पडणार नाही म्हणून शेजारच्या शेंबड्या पक्याशीही दोस्ती करून ठेवली आहे. त्याचा पैसेवाला पप्पा अर्थसंकटास आवरु शकण्यास महत्वाचा ठरणार आहे.
:-D
12 Jan 2012 - 9:08 pm | सुनील
चीनला रोखायला आपण बलशाली व्हायला हवे म्हणून मी gymसुद्धा लावली आहे.
:-D :lol:
अहो, चिन्यांना रोखायला Gym नव्हे तर कराटेचा क्लास लावा!
12 Jan 2012 - 3:45 pm | शरदिनीआप्त
फारच मनोरंजक तुम्ही बोआ ... आमी नाई ज्जा!
12 Jan 2012 - 4:22 pm | परिकथेतील राजकुमार
विजुभौ.
आपल्या काय करायचे आहे ह्या मोठ्या लोकांच्यात पडून ?
आपली संध्याकाळी क्वार्टरची सोय झाली की झाले. तसेही आमच्या पुप्यानी आम्हाला सध्या शनीवारवाड्यातील एक ओसरी मुक्कामास दिलेली आहेच.
12 Jan 2012 - 6:05 pm | विनायक प्रभू
कॉटर ला क्वार्टर म्हटल्याबद्दल परा चा निषेध.
12 Jan 2012 - 6:17 pm | परिकथेतील राजकुमार
माफी माफी.
कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर कॉटर .
12 Jan 2012 - 4:27 pm | रानी १३
>>>>मला अमेरिकेन व युरोपीय अर्थ संकटाचे काय करावे हेच मला समजत नाहीये. त्यामुळे हा घोळ अजूनच वाढतोय.
हा हा हा ............:)
12 Jan 2012 - 4:40 pm | मुक्त विहारि
चान्गली मस्त झोप लागली होती....ऊगाचच जागे केलत...
परत झोपावे ... हे ऊत्तम........
12 Jan 2012 - 4:53 pm | विजुभाऊ
मित्रानो थट्टा जाउ द्या..
पाकिस्तान हा फाळणीच्या उंबरठ्यावर आहे.
ती धार्मिक बाबीमुळेहोते की आर्थीक हा मुद्दा महत्वाचा आहे.
कशीही झाली तरी ती दक्षीणोत्तर होइल.
ते तसे होताना भारत आणि चीन हे घटक महत्वाचे ठरणार आहेत.
इराण सीमेवर वेगळीच परीस्थिती आहे. अफगाण सीमेवर पाकिस्तान नेहमीच अराजकाची स्थिती आहे.
ओसामा होता तोवर तेथून काही झाले नसते.
पण आता त्या भागात पकिस्तान तालीबान+ त्याना साथ देणारे लश्कर यांच्याकडून पाकिस्तानला धोका संभवतो. पाकिस्तानातील अराजकाच्या परीस्थितीचा ते फायदा घेणार नाहीत हे संभवत नाही.
सुदैवाने कोणीच नेता नसल्याने जनता रस्त्यावर येण्याच्या मनस्थितीत नाही.
लश्कर हे राजकीय नेतृत्वाला दाबण्यासाठी दडपशाही करेल तर मात्र परीस्थिती हाताबाहेर जाईल.
लोकांचे लक्ष्य विचलीत करण्यासाठी पाकिस्तानने नेहमीच भारताचा बागुलबोवा दाखवलेला आहे.
एखाद्या आततायी नेत्यामुळे सर्वंकश नाही पण मर्यादीत आगळीक होण्याची शक्यता आहे.
भारताचे नेतृत्व अगदीच पुळचट असेल तरच हे सहन केले जाइल
12 Jan 2012 - 5:59 pm | विनायक प्रभू
डाँगराला आग लागली पळा रे पळा.
जे आय्ला, विजुभौ,
वरण भात खाउन (शक्यतो) निपचित पडणार्या आम्हा क्षुद्र किटकांना का छळताय?
13 Jan 2012 - 12:29 am | पाषाणभेद
भारत चीन पाकिस्तान याच्याबाबतीतील बातम्या, परस्पर संबंध, क्रिकेट मॅच, बॉम्ब स्फोट, अतिरेकी, घुसखोरी, नट नट्या आदी बातम्यांनी डोक्याला झिंग येते. भारतसरकारचे साधूतत्व पाहून वैषम्याने रक्तदाब वाढतो. त्यापेक्षा आम्ही पाकिस्तान चीन बाबतीत बातम्या सहसा वाचत नाही.
मिपास्टाईलने विचारावे वाटते, "कोण पाकिस्तान?"
अवांतर: आमच्या शाळेत एकनंबर जाण्यासाठी 'बांग्लादेश' व दोन नंबरसाठी 'पाकिस्तान' असले संकेत होते.
12 Jan 2012 - 6:02 pm | sagarpdy
आमचा साहेबांच्या नेतृत्वावर आणि दूरदृष्टीवर संपूर्ण विश्वास आहे
12 Jan 2012 - 6:02 pm | तिमा
७१ साली आम्ही मुंबईत ब्लॅकाऊट पाळला होता. सेबर जेट आलेली पाहिली होती. तसेच वा त्याहूनही काही वाइट पहायला मिळेल फार तर! हाकानाका.
12 Jan 2012 - 6:32 pm | मी-सौरभ
आम्ही ते पाहिले नाही अन् पहायची ईच्छा पण नाही...
12 Jan 2012 - 8:59 pm | विजुभाऊ
७१ साली आम्ही मुंबईत ब्लॅकाऊट पाळला होता. सेबर जेट आलेली पाहिली होती
सेबर जेट ही बाँबर विमाने होती. ती मुम्बै पर्यन्त कधीच आलेली नव्हती.
फार तर राजस्थान बॉर्डर /पुंछ पंजाब इकडे आलेली असतील पण त्याना भारतीय हद्दीत खोलवर झेप कधीच घेता आली नाही.
12 Jan 2012 - 9:19 pm | तिमा
मग मुंबईत एअरपोर्ट वरुन रात्री ट्रेसर बुलेटस का उडवल्या होत्या ? का लोकांना रोषणाई पहायला मिळावी म्हणून ?
12 Jan 2012 - 9:29 pm | धन्या
सकाळची वेळ असते. स्टेटस कॉल चालू असतो. कुणीतरी बॉसचं मत खोडून काढतं. मग बॉस त्याला मुद्देसुद उत्तर देण्याऐवजी वाकड्यात जातो.
... आम्हीही मग समजून जातो, साहेब आज बहुतेक बायकोबरोबर भांडून आलेले असावेत.
13 Jan 2012 - 2:55 pm | विजुभाऊ
पाकिस्तानी एअरफोर्स ने कधीच एवढी हिम्मत दाखवली नाही.
त्यांच्या किंवा विकीच्या सुद्धा एकाही साईटवर मुम्बईवर पाकने हवाई हल्ले केले अशी एखादी सुद्धा नोंद नाही.
तुम्ही जे काय पाहिले ते बहुतेक युएफो असू शकतील.
13 Jan 2012 - 3:37 pm | प्रदीप
१९७१ च्या युद्धात मुंबईतही काही वेळा खरोखरीच हवाई हल्ल्याच्या सूचना केल्या गेल्या होत्या (सायरन वाजवून) आणि आम्ही सगळे सावध (तत्कालिन भाषेत) झालो होतो. आताच्या भाषेत सांगायचे तर आम्ही तेव्हा 'सतर्क' झालो होतो. आता त्या टेहळणीकारांनीच जर युफो पाहिले असतील तर माहिती नाही.
13 Jan 2012 - 3:56 pm | विजुभाऊ
दुसर्या महायुद्धातही मुम्बईवर हवाईहल्ल्यच्या सूचना मिळायच्या. त्या भीतीने बर्याच लोकानी दादर वगैरे भागतील फ्लॅट्स स्वस्तात विकले होते.
मात्र मुम्बई वर हवाई हल्ले कोणत्याच युद्धात झाले नाहीत.
याचे कारण भौगोलीक तसेच आर्थीक सुद्धा आहे.
मुम्बई ही भारताची आर्थीक राजधानी होती /आहे. मुंबई च्या रक्षणासाठी मुंबई पासून जवळचा अस पुण्याचा हावाई दलाचा तळ आहे.
दुसरी गोष्ट ही की पाकिस्तानला मुंबईपर्यन्त यायचे झाले तर सर्वात जवळचा मार्ग कराची वरून आहे. भारतीय नौदलाची विनाशीका ही त्यावेळेस कराची बंदराजवळ होती. त्या शिवाय सेबर जेट विमाने ही बाँबर विमाने आहेत.
इतक्या दूरचा पल्ला गाठायचा तर सोबत तितक्या ताकदीची फायटर विमाने हवीत. बोंब वगैरे घेवून उडायचे तर इंधन आणि विमानाचे वजन यामुळे ही विमाने बरीच संथ व्हायची
सेबर विमानाना भारताच्या ताफ्यातील नॅट विमानानी धूळ चारली होती.
युद्धात हवाई हल्ल्याच्या सूचना दिल्या गेल्या असतील मात्र प्रत्यक्ष मुम्बईवर थेट हवाई हल्ले चढविण्याइतकी पाकिस्तानची कधीच तांत्रीक्क्षमता नव्हती.
एफ १६ मुळे ही क्षमता आली असावी असा कयास आहे. घोरी ( हल्फ) मिसाईलमुळे मात्र मुम्बई हे मार्याच्या टप्प्यत येवु शकते.
13 Jan 2012 - 4:37 pm | मन१
घोरी ( हल्फ) मिसाईलमुळे मात्र मुम्बई हे मार्याच्या टप्प्यत येवु शकते.
महत्वाचे वाक्य. खरे आहे.
सुदैवाने आता निव्वळ मिसाइल व उड्दाणक्षमता हेच निकष नाहित तर उपग्रह,satellite ह्या क्षमताही लक्षात घेतल्या जातात. (हेरगिरी करण्यासाठी व समोरून वार होण्याआधीच त्याचा छडा लावून वार करणारा हात कापून टाकण्यासाथी. हे इस्राइलने १९६७ च्या युद्धात खुबीने केले होते. नंतर कधीतरी सांगेन.)
अवकाश क्षेत्र(satellite) ह्या क्षेत्राततरी पाक्-चीन ह्यांच्या एकत्रित ताक्दीच्या तोडिसतोड भारताची क्षमता आहे.
मानवी हेरगिरी,internet व इतर साधनांत मात्र भारत जबरदस्त कधीच पोखरला गेलाय अशी नेहमी भिती वाटते.
13 Jan 2012 - 6:17 pm | तिमा
सेबर जेट आली होती, हे वाक्य मी मागे घेतो. कारण तसा पुरावा उपलब्ध नाही. पण वारंवार सायरन वाजायचे व एका रात्री ट्रेसर बुलेटस उडवलेल्या मात्र आम्ही पाहिल्या होत्या. दुसर्या दिवशी पेपरात , ट्रेसर बुलेटस चे शेल लागून, गच्चीत ते बघायला गेलेले काही लोक जखमी, अशी बातमी वाचल्याचेही आठवते. रोज अफवाही उठत. त्यातीलच एक, सेबर जेट आली होती म्हणून बुलेटस उडवल्या ,अशी होती. मीही वयाने लहान असल्याने तेच स्मरणात कोरले गेले. असो. निदान, या धाग्यामुळे आमची गैरसमजूत दूर झाली आणि आम्ही किती मूर्ख होतो हेही कळले. त्याबद्दल विजुभाऊंना धन्यवाद.
12 Jan 2012 - 9:46 pm | शिल्पा ब
हे पहा..अशा गोष्टी काळेकाकांना समजतात आम्हाला फारसं कैच कळत नै. पाकीस्तान नेहमीच शेणात असतो. चीन कायमच विस्तारवादी आहे अन अजुनतरी अमेरीकाच प्रबळ देश आहे त्यामुळे जागतिक महायुद्ध कै होत नै. काळजी नसावी.
बाकी तुम्ही आज फारच निराशावादी झालात!! आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या काळजी करण्याने जगात खट कै फरक पडत नै.
14 Jan 2012 - 2:23 pm | अर्धवट
एकदम बरोबर शिल्पातै..
इजूभौ हे धागा-ए-फस्लामी च्या स्लीपर सेल चे हस्तक असावेत असा संशय येतो आहे. ;)