स्टफ्ड चेरी टोमॅटो

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
6 Jan 2012 - 3:26 am

साहित्यः

चेरी टोमॅटो - १ पाकीट
सॉफ्ट चीज - १ पाकीट
लसुण - २ पाकळ्या
कांद्याची पात - १/४ कप बारीक चिरुन. (फक्त पात कांदा नाही)
काळी मिरी पावडर - १/२ चमचा
लिंबाचा रस - १/२ चमचा
ऑलिव्ह ऑइल - १ चमचा
मिठ चवीनुसार

कृती:

१. चेरी टोमॅटो धुवुन, पुसुन घ्यावेत. त्याचा देठाचा भाग कापावा. तसाच एकदम थोडा खालचा भाग ही कापावा, ज्यामुळे टोमॅटो निट उभे राहतील.
२. देठाच्या भागाकडुन टोमॅटोच्या आतला सगळा गर काढुन घ्यावा व टोमॅटो फ्रिज मधे ठेवुन द्यावे.
३. चीज एका बाउल मधे काढुन घ्यावे. त्यात २ क्रश केलेल्या लसुण पाकळ्या, कांद्याची पात, काळी मिरी पावडर, लिंबाचा रस, ऑलिव्ह ऑइल व चवीप्रमाणे मिठ टाकुन मिक्स करुन घ्यावे.
४. एका piping bag मधे हे चीज भरावे. आता ह्या piping bag च्या मदतीने सगळ्या टोमॅटोज मधे हे चीज भरावे व फ्रिज मधे ५-१० मिनिटे ठेवुन द्यावे.
५. बारीक चिरलेल्या कांद्याच्या पातीने सजवुन टोमॅटो serve करावेत.
६. हे टोमॅटोज रेड वाइन सोबत मस्त लागतात.

t1

t2

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

6 Jan 2012 - 5:00 am | मराठमोळा

सुंदर...

साईड डिश साठी मस्त प्रकार वाटतो आहे. :)

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jan 2012 - 9:38 am | अत्रुप्त आत्मा

हाय हाय..काय क्लास प्रेझेंट केलेत हो,हे भरीव टोमॅटो... दुसर्‍या फोटोतल्या डिशकडे नुसतं पाहिलं तरी एक निवांत संध्याकाळ मनःचक्षूंसमोर लगेच प्रकट होते... :-)

उदय के'सागर's picture

6 Jan 2012 - 10:06 am | उदय के'सागर

आहाहा!!! काय सुदंर प्रेझेंटेशन आहे हो... व्वा.. झकासच.....:)

एक साधी सोपी पाकृ पण दिसायला एकदम 'रीच' अशी 'साईड-डिश'.... :)

(फोटो पाहुन एखादं 'डिझर्ट' आहे असंच वाटतं)

मोदक's picture

6 Jan 2012 - 10:17 am | मोदक

मस्त दिसते आहे.. :-)

धन्स.

कवितानागेश's picture

6 Jan 2012 - 10:17 am | कवितानागेश

मला वाटते यात पुदिन्याची पाने पण छान लागतील.

मदनबाण's picture

6 Jan 2012 - 11:34 am | मदनबाण

च्यामारी लयंभारी ! :)
फोटो काढण्याची कला पण अफलातुन आहे. :)

प्यारे१'s picture

6 Jan 2012 - 11:58 am | प्यारे१

एखाद्या फूड प्रॉडक्टचं मार्केटिंग असल्यासारखे फटु आलेत. पाकृ न वाचताच 'फिदा' ;)

गणपा's picture

6 Jan 2012 - 12:59 pm | गणपा

नैन सुखावणारे फोटु. :)

मेघवेडा's picture

6 Jan 2012 - 3:17 pm | मेघवेडा

अगदी हुच्चभ्रू प्रकार वाटतो आहे! सुंदर फोटो!

विशाखा राऊत's picture

6 Jan 2012 - 3:20 pm | विशाखा राऊत

काय मस्त दिसत आहे... :)

जाई.'s picture

6 Jan 2012 - 3:28 pm | जाई.

झकास

सगळ्यांचे धन्यवाद.. :)
मी फक्त पाकृ बनवते आणि सजवते. फोटो काढायचे काम मात्र माझा नवरा करतो. :)
@ लीमाउजेट..--- हो ह्यात पुदिन्याचे पान पण छान लागेल. तसेच parsley पण चांगली लागते.

सानिकास्वप्निल's picture

6 Jan 2012 - 4:03 pm | सानिकास्वप्निल

अरे मस्तचं पाकृ :)
ह्यात Chives पण छान लागेल

स्मिता.'s picture

6 Jan 2012 - 4:21 pm | स्मिता.

कसले मोहक फोटो आहेत. हात पुढे करून पटकन उचलून घ्यावेसे वाटतायेत!
पाकृ पण सोपीच आहे.
कोणत्या प्रकारचं चीज यात जास्त चांगलं लागतं?

ह्यात कुठलेही सॉफ्ट चीज किंवा स्प्रेड चीज चालेल..... मग ते प्लेन किंवा कुठल्याही फ्लेवरचे पण चांगले लागते.

भारी प्रकार आहे.
फोटू हुच्च आलेत.

झकास. खाद्यप्रकार आणि फोटु दोन्ही हुच्च आहेत याच शंका नाही.

- पिंगू

पैसा's picture

6 Jan 2012 - 9:32 pm | पैसा

फोटो पाहूनच समाधान झालं. चीजच्या वाटेला कोलेस्टेरॉलच्या भीतीने जात नाही. :(

छ्या ह्या असल्या धाग्यावर कार प्रतिसाद देणार, हल्ली शब्दच सुचत नाहीत, असो.

पाकृ वाचावीशी वाटलीच नाही, यावेळी जबरा आणि खुप छान हे रिप्लाय मा. श्री. स्वप्निल यांचेसाठी, सानिकातै तुम्हाला नेक्स्ट टाईम.

प्रचेतस's picture

7 Jan 2012 - 8:42 am | प्रचेतस

गल्ली चुकली का हो ५०?,

इथे चमचे दिसत नाहीत हो. :) ही देखणी पाकृ मृणालिनी तैंची आहे. :)

सानिकास्वप्निल's picture

7 Jan 2012 - 8:52 am | सानिकास्वप्निल

हो हो वल्ली मला ही असेच वाटतआहे हर्षदभौ गल्ली चुकले ;)

हा हा हा... बरोबर... बहुतेक ५० फक्त गल्ली चुकले... २ मिनिटे मला पण कळले नाही, माझ्या नवर्‍याच नाव स्वपनील कधी पासुन झाल ते...पण काय हरकत नाही... ५० फक्त तुमच्या भावना पोचल्या... ;) धन्यवाद. :)

सुहास झेले's picture

7 Jan 2012 - 3:30 pm | सुहास झेले

अजुन काय बोलावं....?? :) :)

निवेदिता-ताई's picture

7 Jan 2012 - 8:47 pm | निवेदिता-ताई

मस्तच,,,,,,,

स्वाती२'s picture

8 Jan 2012 - 5:23 pm | स्वाती२

लै भारी!