मराठी शब्दकोश कुठला घ्यावा? आणि काही शब्दार्थ विचारणा.

लई भारी's picture
लई भारी in काथ्याकूट
5 Jan 2012 - 5:55 pm
गाभा: 

नमस्कार,

'मराठी-मराठी ' चांगला शब्दकोश कोणी सुचवू शकेल काय? तुम्ही वापरला असल्यास कृपया आपले अनुभव जरूर सांगा.
मी अ.ब.चौकात चौकशी केली होती खूप दिवस आधी - अनमोल चा उपलब्ध होता पण सांगण्यात आले की दुसरा कुठला तरी एक चांगला(प्रमाण म्हणता येईल असा) शब्दकोश आहे पण सध्या तो उपलब्ध नाही (out of print).

काही शब्द इथे देत आहे, जाणकारांनी अर्थ सांगितल्यास बरे होईल :)

- परवाचा : मला वाटते ह्याचा अर्थ श्लोकासारखे काही जे दिवेलागणी वेळी म्हटले जाते असा असावा.
- नेणीव: अंतर्मनाशी जवळ जाणारा अर्थ असावा असे वाटतं. (subconcious?)
- असिधाराव्रत : मी मागे विचारणा केली होती एकदा, त्याचा अर्थ 'तलवारीच्या पात्यावरून चालण्यासारखे अवघड व्रत' असा सांगण्यात आला होता.
- व्यवच्छेदक (लक्षण): सर्वसामान्य पणे आढळणारे लक्षण असा अर्थ का?
- यादृच्छिक
- साक्षेपी

धन्यवाद.

प्रतिक्रिया

लई भारी's picture

5 Jan 2012 - 5:59 pm | लई भारी

'परवचा' असा शब्द आहे. टंकताना चूक झाली :)

मोदक's picture

5 Jan 2012 - 8:08 pm | मोदक

'परवचा' = पाढे (?)

साक्षेपी = स्+आक्षेपी असा अर्थ असावा का..?

तसेच... एखादे वाक्य / वाक्यातील उपयोग दिले असते तर अर्थ लावायला सोपे पडते.

मोदक

विश्वनाथ मेहेंदळे's picture

5 Jan 2012 - 10:43 pm | विश्वनाथ मेहेंदळे

यादृच्छिक :- Random (I guess)

मराठी-मराठी ' चांगला शब्दकोश कोणी सुचवू शकेल काय? तुम्ही वापरला असल्यास कृपया आपले अनुभव जरूर सांगा.>>>>>
“विस्तारित शब्दरत्नाकर”, लेखक वा.गो.आपटे (ह.अ.भावे), वरदा प्रकाशन, १९९५. माझा अनुभव चांगला आहे. मी नियमितपणे वापरत असतो.

परवाचा : मला वाटते ह्याचा अर्थ श्लोकासारखे काही जे दिवेलागणी वेळी म्हटले जाते असा असावा.>>> अगदी बरोबर. पाढे असाही अर्थ आहे. "वाच" वरून पर+वाचा. असा अर्थ मोल्सवर्थ मध्ये दिलेला आहे.

नेणीव: subconcious?>>>> हो.

असिधाराव्रत : मी मागे विचारणा केली होती एकदा, त्याचा अर्थ 'तलवारीच्या पात्यावरून चालण्यासारखे अवघड व्रत' असा सांगण्यात आला होता.>>>>> बरोबर आहे.

व्यवच्छेदक (लक्षण): सर्वसामान्य पणे आढळणारे लक्षण असा अर्थ का?>>>>>
नाही. सॅलिएंट फिचर. वैशिष्ट्ये असा अर्थ आहे.

यादृच्छिक>>>>> रँडम

साक्षेपी >>>>> आक्षेपासहित, कारणमिमांसेसहितचे विवेचन.

मी 'मराठी शब्दरत्नाकर' कै.वा.गो.आपटे आवृत्ती २००२, नोव्हेंबर २००५ वापरतो.

-दिलीप बिरुटे

शरद's picture

6 Jan 2012 - 8:16 am | शरद

"महाराष्ट्रशब्दकोश" संपादक : दाते-कर्वे हा दहा भागांचा शब्दकोश वरदा प्रकाशनने पुनर्मुद्रित केला आहे. (किं. ३२०० रु.). मी गेली चाळीस वर्षे तो वापरीत आहे. खर्च करावयाची तयारी, ठेवण्यास जागा व तेवढी गरज वाटली तर याला पर्याय नाही. थोडी थांबण्याची तयारी असेल तर महाराष्ट्र शासन तो परत सुधारित करून प्रकाशित करणार आहे. (केंव्हा ते देवो न जानाति) एखादेवेळी जालावरही मिळेल. याची संक्षिप्त आवृत्तीही वरदाने प्रकाशित केली आहे बाकी फुटकळ शब्दकोश अनेक मिळतात.
शरद.

बेसनलाडू's picture

6 Jan 2012 - 8:19 am | बेसनलाडू
लई भारी's picture

6 Jan 2012 - 11:32 am | लई भारी

आपणा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. सुचवलेल्या शब्दकोशांची चौकशी करेन आता.

आंतरजालावरचा दुवा खूप उपयुक्त आहे(पटकन शोधण्यासाठी, विशेषतः घराबाहेर असताना).

>>> नेणीव चा मोल्सवर्थ मध्ये खालील अर्थ दिसतो जो subconscious शी विसंगत आहे.
नेणीव (p. 476) [ nēṇīva ] f (Poetry.) Ignorance, unintelligence, inexperience.

कृपया संभ्रम दूर करावा :)

नितिन थत्ते's picture

6 Jan 2012 - 12:01 pm | नितिन थत्ते

शाळेत आपट्यांचा शब्दकोष वापरत असे. चांगला आहे.

व्यवच्छेदक = त्या वस्तूला इतरांपासून वेगळे दाखवणारे लक्षण. म्हणजे हे लक्षण याच वस्तूत असते अशा अर्थी.

नरेंद्र गोळे's picture

6 Jan 2012 - 4:54 pm | नरेंद्र गोळे

>>> नेणीव चा मोल्सवर्थ मध्ये खालील अर्थ दिसतो जो subconscious शी विसंगत आहे.
नेणीव (p. 476) [ nēṇīva ] f (Poetry.) Ignorance, unintelligence, inexperience.>>>>>>

हो. तो अर्थ खरा आहे. नेणीव =अज्ञान

वाक्यात उपयोगः जाणीव नेणीव भगवंती नाही - हरिपाठ
म्हणजे ईश्वरापाशी सज्ञान अज्ञान असा भेदभाव नाही.

चैतन्य दीक्षित's picture

9 Jan 2012 - 2:39 pm | चैतन्य दीक्षित

असा मराठी (देवनागरी)मधून सर्च केला असता ही एक लिंक मिळाली.... पण काहीही कळलं नाही :(