गाभा:
अमेरिकेतील मराठी लोकांची राहणी ...
अमेरिकेत असलेली मराठी तिकडे कशीकाय राहतात, काय काय करतात, त्यांना सुरुवातीला वा नंतरही काय काय अडचणी येतात वा येऊ शकतात, तिकडील श्वेत व अश्वेत लोकांशी कसे आणि कितपत संबंध जुळतात ? तिकडे रहाताना काय सावधगिरी बाळगावे लागते ? तिकडील लोकांच्या सवयी व आवडीनिवडी, खाणेपिणे, घरे, सण-उत्सव, वगैरे वगैरे विषयी माहिती (मराठी माणसाच्या दृष्टीतून) जालावर उपलब्ध आहे का ? नसल्यास मिपाकर यावर काही प्रकाश टाकतील का?
हे सर्व आत्ता सुचण्याचे कारण म्हणजे माझा फिजीयोथेरापीस्ट मुलगा येत्या फेब्रुवारी पासून न्यूयॉर्क राज्यातील साराटोगा स्प्रिंग / क्लिफ्टन पार्क भागात नोकरी सुरु करणार आहे. तिथे त्याला घर हुडकणे, कार घेणे वगैरे पासून सर्व सुरुवात करणे आहे. तरी याविषयी मार्गदर्शनाची अपेक्षा करत आहे. या भागात कुणी मिपाकर आहेत का?
प्रतिक्रिया
4 Jan 2012 - 7:38 pm | विजुभाऊ
कॉलिंग पिडां काका
कॉलिंग पिडां काका
कॉलिंग पिडां काका
कॉलिंग पिडां काका
कॉलिंग पिडां काका
कॉलिंग पिडां काका
कॉलिंग पिडां काका
कॉलिंग पिडां काका
कॉलिंग पिडां काका
कॉलिंग पिडां काका
कॉलिंग पिडां काका
कॉलिंग पिडां काका
http://misalpav.com/user/401/guestbook
http://misalpav.com/user/401/guestbook
http://misalpav.com/user/401/guestbook
http://misalpav.com/user/401/guestbook
6 Jan 2012 - 12:20 am | पिवळा डांबिस
अरे हो, हो, आलो!!
किती जोराने बोंब माराल, विजुभाऊ?
:)
अमेरिकेत असलेली मराठी तिकडे कशीकाय राहतात, काय काय करतात,
सगळी साली इब्लिस आहेत एक नंबरची!! टोपणनांवं घेउन मिपावर वावरतात!!!:)
आता सिरियसली,
इथे रहाणारी बहुतेक मराठी मान्सां ही चाकरमानी आहेत. नियमितपणे नोकर्या (आणि ग्रोसर्या!) करतात आणि घरात येऊन चुपचाप पडतात. मधूनमधून गणपती किंवा मराठी मंडळाच्या निमित्ताने मतभेद व्यक्त करतात! तेंव्हा तसा तिकडे आणि इकडे फारसा फरक नाहिये काही!!
तुमचे चिरंजीव येतायत कुठनं?
त्यांना सुरुवातीला वा नंतरही काय काय अडचणी येतात वा येऊ शकतात,
मराठी म्हणुन विशेष अशा काही अडचणी नाहीत. सुरवातीला अपार्टमेंट, गाडी, इथलं ड्रायव्हिंग, क्रेडिट कार्ड वगैरे जमेपर्यंत किरकोळ अडचणी असतात पण त्या अनसरमाउंटेबल नाहीत. नोकरी करायला येणार्यांना तर ऑफिसातल्या कलिग्जची खूप मदत होते.
न्यूयॉर्क राज्यासारख्या बर्फाळ प्रदेशात आल्यास पहिल्या हिवाळ्याचा त्रास होऊ शकतो कारण स्थानिक थंडी ही किती पडेल याचा अंदाज नसतो म्हणून. भारतातून हिवाळ्याचे कपडे आणू नये कारण त्यांचा थंडीनिवारणासाठी फारसा उपयोग होत नाही (माझ्या मते).
तिकडील श्वेत व अश्वेत लोकांशी कसे आणि कितपत संबंध जुळतात ?
ते तुमच्यावर अवलंबून आहे. स्थनिक अमेरिकन माणूस हा बोलायला आणि मैत्री करायला अगदी सोपा असतो. पण त्याचबरोबर कुणाच्या फार खाजगी गोष्टीत लक्ष घालणं उचित समजत नाहीत. उदा. स्त्रियांच्या वयाविषयी (आणि वजनाविषयी!!) चारचौघात अंदाज करणं! मिपावरून तुम्हाला अंदाज आला असेलच!! ;)
तिकडे रहाताना काय सावधगिरी बाळगावे लागते ?
तशी विशेष नाही. अनोळखी ठिकाणी भलत्या वेळेला न जाणे. समोर आलेल्या प्रत्येक इंडियन दिसणार्या माणसाने आपल्याला हसून दाखवलेच पाहिजे हा अट्टहास न बाळगणे, पैसे उसने देण्या आणि घेण्यापूर्वी परिणामांचा आधी विचार करणे, इत्यादि आपल्या मुंबईसारख्या शहरात वावरतांना पाळली जाणारी पथ्ये तिथेही पाळली म्हणजे झालं...
तिकडील लोकांच्या सवयी व आवडीनिवडी, खाणेपिणे, घरे, सण-उत्सव, वगैरे वगैरे विषयी माहिती (मराठी माणसाच्या दृष्टीतून) जालावर उपलब्ध आहे का ?
असावी, कारण इथल्या मराठी मंडळींना (प्रत्यक्ष नियमित भेटणारे) मित्र कमी असल्याने त्यांना जालावर मराठी टंकलेखन करायची भारी खाज असते!! बाकी इथल्या मराठी लोकांच्या सवयी व आवडीनिवडी, खाणेपिणे, घरे, सण-उत्सव तिथल्यापेक्षा वेगळे नसतात हो! म्हणजे तिथे रेग्युलर पंचांग वापरणारे इथे आले म्हणुन लगेच टिळक पंचांग वापरू लागले असं नाही होत!!:) बाकी अभारतीय अमेरिकन लोकांच्या वरील गोष्टींशी आपला वाढवला तर संबंध, नाही तर नाही....
नसल्यास मिपाकर यावर काही प्रकाश टाकतील का?
बाकी खाली लंबूटांग लिहितो आहे त्याप्रमाणे. तो तुम्ही सांगता त्या भागात राहिलेला आहे. आमी लय लांब म्हंजे आक्शी वाळवंटाच्या पलिकल्डे म्हना ना!!
काही विशेष प्रश्न असल्यास व्यनि करा, उत्तर पाठवीन.
तुमच्या मुलाला शुभेच्छा!
(आणि तो नॉनव्हेज खात असावा ही सदिच्छा! कारण नायतर कठिण आहे! त्याला मिपावरच्या रेसेप्या करून पोट भरावं लागणार!!!!!:))
आमेन
4 Jan 2012 - 8:09 pm | लंबूटांग
एका महिन्यापूर्वीच मी त्या भागातून परत बॉस्टन ला मूव्ह झालो. जवळ जवळ ३ तास पूर्वेला.
त्या भागात इतर अमेरिकेइतकी नसली तरी बर्यापैकी मराठी लोक आहेत.
तुम्हाला मराठी मंडळाचा email address व्यनी केला आहे. तिथे request पाठवल्यास त्या ग्रुपच्या सर्व activitiesचे updates मिळत राहतील.
अल्बनीमधे हिंदू टेम्पल आहे तिथे गेल्यास बर्याच लोकांशी ओळखी होतील.
Schenectady भागात राहाणे शक्यतो टाळावे. बरेच ड्रग डीलींग वगैरे चालते आणि त्यामुळेच crime rate जास्ती आहे.
त्या भागात पब्लिक ट्रान्सपोर्ट जवळ जवळ नाहीच आहे. त्यामुळे लवकरात लवकर गाडी घ्यावी लागेल. त्या भागात बराच बर्फ पडतो त्यामुळे येताना थोडे उबदार कपङे घेऊन यायला सांगा.
घरी स्वयंपाक करत नसल्यास व मांसाहार करत नसल्यास खाण्यापिण्याचे फारच कमी options राहतात.
बाकी काही माहिती हवी असल्यास माझा इमेल पत्ता व्यनि केला आहे.
बाकी माणसांशी संबंध वगैरे जुळण्यात वगैरे काहीच अडचणी येत नाहीत.
5 Jan 2012 - 2:28 pm | वपाडाव
अरेरे, लंबु राव आपल्याकडुन ही असली अपेक्षा नव्हती.....
5 Jan 2012 - 4:30 pm | मी-सौरभ
माणूस मंजे काय फक्त बाप्ये नै कै त्यात पोरी बी येतात..
5 Jan 2012 - 4:31 pm | मी-सौरभ
कुणाला काय आवडावे याबद्दल मी बोलणे योग्य नाही. मी फक्त मत नोंदवलं.
5 Jan 2012 - 2:19 am | बबलु
Any Time, चित्रगुप्त साहेब.
तुम्हाला व्यनि केला आहे. केव्हाही फोन करायला सांगा.
हॅपी जर्नी.
5 Jan 2012 - 6:46 am | इन्दुसुता
मला व्यनी करावा अथवा तुमच्या मुलाला मला व्यनी करायला सांगावे. माझ्यासाठी कित्येक गोष्टी लिहिण्यापेक्षा बोलायला सोप्या असतात.
5 Jan 2012 - 10:06 am | नितिन थत्ते
उडी मारा हो....
जमतं सगळं. आधी अभ्यास वगैरे करून जायला नको काही.
5 Jan 2012 - 6:07 pm | परिकथेतील राजकुमार
याच विषयावरती अमेरीकन लोकांचा काथ्याकूट वाचायला विशेष आवडेल.
आजकाल 'आपल्या देशात आलेल्या मिपाकरांशी कसे वागावे' असे काथ्याकूट तिकडची स्थानीक मंडळी काढत असतात म्हणे.
5 Jan 2012 - 6:58 pm | चित्रा
>त्यांना सुरुवातीला वा नंतरही काय काय अडचणी येतात वा येऊ शकतात?
सुरुवातीची एक अडचण म्हणजे हेल्थ इन्शुरन्स - प्रत्येक कंपनी वेगळ्या पद्धतीने इन्शुरन्सचा विचार करत असते. काही कंपन्यांचे ठराविक प्लॅन्स असतात, ते किचकट असतात. त्याचा थोडा प्रत्येकालाच स्वत:च्या कुटुंबापुरता विचार करावा लागतो.
> तिकडील लोकांच्या सवयी व आवडीनिवडी, खाणेपिणे, घरे, सण-उत्सव, वगैरे वगैरे विषयी माहिती (मराठी माणसाच्या दृष्टीतून) जालावर उपलब्ध आहे का ? नसल्यास मिपाकर यावर काही प्रकाश टाकतील का?
इंडियन स्टोर्स अनेकदा घरापासून लांब असतात तेव्हा काहीजण बरीच यादी करून अनेक दिवस पुरेल अशा प्रकारे खरेदी करून येतात.
मिपावर अमेरिकेवरचे अनेक लेख आहेत त्यावरून येथील राहणीमानाची कल्पना येऊ शकेल. येथील मराठी लोक नव्याजुन्याचे मिश्रण असलेले जीवन जगत असतात असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. बर्याच तरूण मुली-मुलांचे आपापले ग्रूप असतात. जुन्या, बर्याच काळापासून येथे राहणार्या लोकांमध्ये आणि तरूण दांपत्ये आणि सुटवंग मुले यांच्या वागण्या-विहारामध्ये बराच फरक असतो, जो येथे वस्ती विरळ असल्याने स्पष्ट दिसायला लागतो. काही (विशेषतः तरुण दांपत्ये किंवा मुले-मुली) पूर्वीचे लोक आपल्याच विश्वात वावरतात, नव्यांना चटकन 'आपल्यात' घेत नाहीत या कारणासाठी मराठी मंडळांत जात नाहीत. पण एखादी व्यक्ती माणसे जोडणारी असेल तर तिला कंटाळा येणार नाही असे वाटते. बाकी जिथे आले आहे तेथले जगही पहावे, आयुष्य समजून घ्यावे असे वाटते.
5 Jan 2012 - 9:25 pm | रेवती
अगं चित्राताई त्यांचे चिरंजीव सध्या अमेरिकेच्या दुसर्या राज्यात राहतायत. मलाही वाटले की नविनच येतायत म्हणून मोठ्ठा व्य. नि. केला होता. उत्तरात लेखकाने असे कळवले आहे.
6 Jan 2012 - 2:52 pm | चिरोटा
मग हा धागा काढला तरी कशाला? आणि तोही मिपावर? क्रेगलिस्ट न्युयॉर्कवर टाकायचे की.
6 Jan 2012 - 3:13 pm | चित्रगुप्त
............ क्रेगलिस्ट न्युयॉर्कवर टाकायचे की............
माझा मुलगा याविषयी निर्धास्त आहे, आणि तो मजपेक्षा व्यवहार चतुर असल्याने सर्वकाही सक्षमपणे करतो आहे, खरोखरच क्रेगलिस्ट व जालावरून वरून मामला हाताळतो आहे.
.... परन्तु मुले कितीही मोठी झाली, तरी आई-बापास ती लहान लेकरेच वाटतात, तस्मात आमचा हा उपद्व्याप.
तसदीबद्दल माफी आणि आपुलकीने प्रतिसाद देणार्या सर्वांचे आभार.
......खरेतर मुले अनिवासी झाल्यावर येथिल निवासी पालकांनी म्हातारपणी एकटे कसे रहावे, याविषयी धागा काढला पाहिजे....
6 Jan 2012 - 11:14 pm | पिवळा डांबिस
आपुलकीने प्रतिसाद देणार्या सर्वांचे आभार.
ते ठीक आहे. पण मला वाटतं की तुम्ही तुमचा मुलगा अमेरिकेतच दुसर्या राज्यात सध्या वास्तव्य करून आहे आणि तिथून तो न्यूयॉर्कमध्ये येतो आहे हे स्पष्ट करायला हवं होतंत...
सरळ फोनवर काम झालं असतं आणि मग हिते लांब प्रतिसाद द्यायची गरज पडली नसती...
असो.
6 Jan 2012 - 11:08 pm | शिल्पा ब
झैरात करायचा मोह दुसरं कै नै!!
6 Jan 2012 - 3:25 pm | मराठी_माणूस
......खरेतर मुले अनिवासी झाल्यावर येथिल निवासी पालकांनी म्हातारपणी एकटे कसे रहावे, याविषयी धागा काढला पाहिजे....
धागा काढण्यापेक्षा , ज्यांच्यामुळे एकटे रहावे लागत आहे त्यांनाच हा प्रश्न विचारावा
6 Jan 2012 - 3:46 pm | विजुभाऊ
ज्यांच्यामुळे एकटे रहावे लागत आहे त्यांनाच हा प्रश्न विचारावा
शिक्षणासाठी / नोकरीसाठी परदेशात जाणे हा गुन्हा नाही. पालकाना भारतात एकटे सोडून जाणे हा सुद्धा गुन्हा नाही.
पालकाना परादेशात नेता येत नाही या कारणास्तव आलेल्या संधीला नाकारणे म्हणजे कपाळकरंटेपणा.
मुले इथे नाहीत त्यामुळे एकटेपणा येतो हे खरे आहे. मुले दूर जातात ती त्यांच्या प्रगतीसाठीच. त्यात आनंद मानायचा सोडून एकटेपणची तक्रार कशाला करत बसायचे.
छंद लावून घेतले की एकटेपणा जाणवत सुद्धा नाही.
6 Jan 2012 - 4:21 pm | मराठी_माणूस
शिक्षणासाठी किंवा अल्पकाळ (नोकरीचा भाग) म्हणून परदेशात जाणे हा निश्चितच गुन्हा नाही, पण संधी च्या गोंडस नावाखाली ऐषोआरामाची सवय झालेले आणि न परतणारेच जास्त असतात.
ज्या वेळेस आईवडीलांना भक्कम आधाराची गरज असते , त्यावेळेस शेजारपाजारचे, ओळखीपाळखीचे ह्यांची मदत घ्यायची वेळ येते. असे असंख्य निराधार आई वडील पाहीले आहेत. छोट्या छोट्या गोष्टींसाठी परावलंबीत्व येते.परतफेडीची शक्यता नसल्याने मिंधेपण येते.
वृध्द्पणी आईवडीलांचा सांभाळ करणार्या मुलांचा अम्हाला केंव्हाही अभिमानच आहे , ह्या श्रीमंती पुढे परदेशातले वैभव कस्पटासमान.
6 Jan 2012 - 5:46 pm | विजुभाऊ
वृध्द्पणी आईवडीलांचा सांभाळ करणार्या मुलांचा अम्हाला केंव्हाही अभिमानच आहे , ह्या श्रीमंती पुढे परदेशातले वैभव कस्पटासमान.
बरोबर आहे. तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे.
मात्र मुलगा /मुलगी परदेशात गेल्यावर आमचे काय म्हणुन मुलाच्या प्रगतीत अडथळा होऊ नये.
आईवडील हे मुलांवर पूर्णपणे अवलंबून असतील तर तो आईवडीलांचा दोष आहे. मागच्या पिढीचे सोडा पण ह्या पुढील पिढीने तरी प्रसंगी स्वार्थीपणाचा आळ आला तरी आपली वृद्धावस्था नीट घालवायची असेल, परावलंबित्व नको असेल तर स्वतःसाठी तजवीज करूनच ठेवावी. मुले तुम्हाला विचारणार नाहीत हे गृहीत धरावे.
6 Jan 2012 - 8:40 pm | मराठी_माणूस
परावलंबित्व नको असेल तर स्वतःसाठी तजवीज करूनच ठेवावी.
मग पोरांनी पण तिकडच्या सारखे तरुण वयात घर सोडुन स्वतःच्या शिक्षणाचा/लग्नाचा खर्च स्वतः करावा. आई बापाला कर्जात बुडवु नये. मगच तुम्ही म्हणता ती तजवीज करणे शक्य आहे.
इथे तर मिस्रुड फुटले तरी कमवायची अक्कल येत नाही. उच्च शि़क्षणासाठी काय, काय तारण ठेउन , आईबापांनी कर्जे उचलायची आणि नंतर ह्याच पोरांनी संधीच्या नावाखाली तिकडे ऐषोआराम करायचा, आई बाप भटकतायत इथे वणवण .
इतके करुन बहुसंख्य लोक तिथल्यार सामान्य माणासासरखेच जीवन जगतात. अगदी बोटावर मोजण्याईतकेच काहीजण असतात की जे असामान्य काम करतात. मग ह्या सामन्याना इथे रहायला काय लाज वाटते ?
तिथली जीवनशैली आपल्यापेक्षा उंचावलेली आहे. त्यात ही आपला वाटा काय ? काहीच नाही, पण सतत तुलना करुन आपण फार मोठा तीर मारलाय असे दाखवत रहायचे.
6 Jan 2012 - 9:38 pm | विजुभाऊ
काका तुमचे विचार अगदी योग्य आहेत.
खरेतर आईबाप मुलाना शिक्षण देतात पण मुलाना त्याची जाणीव असायलाच हवी.
भारतात मुले २५ वर्षाचे झाले तरी आईबापांच्या कष्टाचे खात असतात. आईबापाला कर्जात ठेवून शिक्षण करून घेतात.
आई बापानी ही मुले ही आपली म्हातारपणीची काठी नाहीत हे लक्ष्यात ठेवून मगच त्यांच्यावर खर्च करावा.
मुलांच्या शिक्षणाचा खर्च ही आईबापाने त्यांची गुंतवणूक मानू नये. इथेच आईबापांची चूक होते.
6 Jan 2012 - 9:47 pm | मराठी_माणूस
मुलांच्या शिक्षणाचा खर्च ही आईबापाने त्यांची गुंतवणूक मानू नये
ही गुंतवणूक (PF,PPF,FD) म्हणुन कधीच केलेली नसते. ते सर्व प्रेमापोटीच केलेले असते , मुलाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी.
त्याची जाणीव ठेवली जात नाही हा मुद्दा आहे.
7 Jan 2012 - 1:04 am | रेवती
जाणीव न ठेवणारे परदेशी येतात आणि स्वदेशात राहणार्या सगळ्या मुलांना जाणीव असते असे म्हणायचे आहे काय? तसे असेल तर भारतात सगळेच सुपुत्र्/सुपुत्री असले असते.
उद्या माझ्या मुलाने भयानक महागड्या शिक्षणाचे स्वप्न पाहिले तर त्याला आधी जमिनीवर आणण्याचे काम मला (कोणत्याही आईबापांना) करावे लागेल. आपल्या ऐपतीप्रमाणे जे चांगल्यात चांगलं आहे ते नक्की मिळेल पण एका टप्प्यानंतर त्याने कमावून शिक्षण करावे असे माझे मत राहील. तेच आमच्या वडीलांनी आम्हा सगळ्या भावंडांसाठी केले. अगदी वडीलांची ऐपत असतानाही माझ्या भावांना मास्टर्स आपापल्या कमाईतून करण्यास भाग पाडले. माझे शिक्षणही मी लग्नानंतर हळूहळू काम (घरकाम नव्हे) करत पूर्ण केले. नंतर नवर्याने फी भरली पण आधीच्या शिक्षणासाठी मला काम करावे लागले. मी तरी आधी म्हतारपणाची सोय करून ठेवेन. मुलावर अवलंबून राहणे व्यवहाराला धरून होणार नाही. मुलाला उच्च शिक्षणासाठी दुसर्या देशात जायचे असल्यास त्याने खुशाल जावे.
7 Jan 2012 - 3:20 am | पाषाणभेद
>>> छंद लावून घेतले की एकटेपणा जाणवत सुद्धा नाही.
म्हातारपणी कसले छंद सुचवताय विजुभौ?
(धागा भरकटलाच आहे तर घ्या मजा करून)
7 Jan 2012 - 11:10 am | चित्रगुप्त
'म्हातारपणातील छंद '
हा एक नवीन धागा सुरु करण्यासारखा आहे खरा....
8 Jan 2012 - 10:29 am | मराठी_माणूस
असे कुठेच म्हटले नाही. आई वडीलांना त्यांच्या सरत्या काळात त्याना सोबत करणे हा आपल्यकडचा एक चांगला संस्कार आहे तो निवसि अनिवासी सर्वासाठी आहे पण बरेचसे अनिवासी , संधीच्या गोंडस नावाखाली (चंगळ ?) ही जबाबदरी टाळतात .
म.टा.च्या २०११ च्या दिवाळी अंकात , जयंत नारळीकरांच्या पत्नीचा एक लेख आहे. त्यात असे म्हटले आहे की , जयंत नारळीकरांचे वडील निवृत्त होण्याच्या सुमारास त्यांनी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला त्याचे कारण वडीलांना प्रेमाने आधार देणे हा होता. खरे तर मुलभूत संशोधनात पाश्चात्य देश आघाडीवर आहेत , तरी त्यांनी परत येउन वेगळे विश्व निर्माण केले.
8 Jan 2012 - 12:30 pm | शिल्पा ब
सगळ्यांचं सगळं ठीक हो, पण आम्हाला उगाचच कोल्ह्याला द्राक्षे आंबट ही म्हण आठवली. बाकी चालु द्या.
8 Jan 2012 - 2:54 pm | मराठी_माणूस
वेगवेगळी कारणे काढुन रहाणार्या सांठी "अग अग म्हशी मला कुठे नेशी (म्हशीची शेपटी गच्च धरुन) " ही म्हण आठ्वली,
स्वतःला स्वतःच अमेरीकन म्हणुन घेणार्यासाठी "मान न मान मै तेरा मेहमान" ही म्हण आठवली . तसेच "चोराच्या मनात चांदणे" ही म्हण सुद्धा आठवली.
सगळ्या प्रकारची फळे चाखलेला
8 Jan 2012 - 3:39 pm | गणपा
मिपाला निवासी अनिवासी वाद नवा नाही. बरीच चर्वणं होऊन चोथा झालेला विषय आहे हा.
तरी सुद्धा ज्यांना या बाबतीत चर्चा करायची आहे त्यांनी एका मर्यादेत राहून केली तर बर.
हा उप-प्रतिसाद जरी मराठी_माणूस यांच्या प्रतिसादाला असला तरी तो सर्वांसाठी लागू आहे.
धन्यवाद.
8 Jan 2012 - 5:48 pm | रेवती
समजले. मी थांबते.
9 Jan 2012 - 9:52 am | मराठी_माणूस
वैयक्तीक पातळीवर कोण उतरले ते पहावे, त्यांच्या प्रतिसादाला ही समज दिली असती तर योग्य वाटले असते.
तरीही मि सुचने नुसार थांबत आहे.
8 Jan 2012 - 8:56 pm | विश्वनाथ मेहेंदळे
शिल्पा तै, भारतात राहिलेला प्रत्येक जण अमेरिकेत जायला मिळाले नाही म्हणून इथे असतो असा समज कुणीही बाळगू नये. आणि अमेरिकेत गेलेला प्रत्येक माणूस फार ग्रेट असतो म्हणून गेलेला असतो असेही नाही.
(बाय चॉईस परतलेला) विमे
8 Jan 2012 - 11:52 pm | शिल्पा ब
आम्ही असं कुठे म्हंटलं? पण जे तिथे बाय चॉइसच राहीलेले आहेत त्यांच्याविषयी वाट्टेल ते बोलायचा अधिकार इतरांना कोणी दिला?
9 Jan 2012 - 2:49 pm | विजुभाऊ
ते सर्व प्रेमापोटीच केलेले असते , मुलाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी.
त्याची जाणीव ठेवली जात नाही हा मुद्दा आहे.
कोई शर्त होती नही प्यार मे. मगर प्यार शर्तो पे तुमने किया.
6 Jan 2012 - 3:54 pm | वपाडाव
विजुभौ, एक्दम सडेतोड उत्तर आवडलं....
6 Jan 2012 - 6:57 pm | परिकथेतील राजकुमार
कोल्ह्याला द्राक्षे आंबट.
आमचे परमपूज्य माता-पिता तर दर दोन दिवसांनी 'उलथा की आता स्वतःची जागा घेऊन तिकडे' असे प्रेमाने सांगत असतात ;)
6 Jan 2012 - 7:03 pm | रेवती
तरी सांगत होते माझ्या वधूवर संशोधन मंडळात नावनोंदणी कर म्हणून.
एकट्यानंच काय म्हणून स्वत:ची जागा घ्यायची?
तळकोकणात आमच्या केंद्राची शाखा सुरु करत आहोत.
लवकर नाव नोंदणी केल्यास वधूबरोबर स्टीलच्या ६ ताटांचा संच मोफत.
6 Jan 2012 - 8:45 pm | स्मिता.
तुमची प्रतिस्पर्धी चांदीचे पेले देत असताना तुम्ही स्टिलची ६ ताटं देणार असाल तर कोण येणार आहे तुमच्याकडे?
या पर्याने मागे काहितरी पॅकेज सुचवलं होतं, त्याच्याकडूनच डिटेल्स घ्या.
6 Jan 2012 - 8:51 pm | रेवती
दिलेही असते गं चांदीचे पेले...........यावर्षी 'मंदीनं' माझ्या व्यवसायाला चांगलाच दणका दिलाय.
लग्न जमवून नोकरी सोडून निघून गेली की एकदम!
कांपिटिटरचे फावले मग!
आता एकटी कुठे कुठे पुरी पडू?;)
9 Jan 2012 - 2:41 pm | वपाडाव
आज्जे, मंदी म्हणजे मंदाकिनी का गं?
9 Jan 2012 - 8:40 pm | रेवती
होय रे बाबा! कसं बरोब्बर ओळखलस, अश्या वेळी चुकायचा नाहीस तू.
नावनोंदणीला आलेल्या स्थळाबरोबर स्वत:चं जमवलन् काय!;)
7 Jan 2012 - 8:11 am | हंस
आणि चांदीच्या पेल्यांबरोबर "मंजुळा" मोफत.....
7 Jan 2012 - 6:57 pm | परिकथेतील राजकुमार
खूप खूप वाटते की असेच धावत यावे आणि नाव नोंदवावे. पण मग रंगाकाकांचा चेहरा डोळ्यासमोर येतो 'आणि पुढच्यास ठेच...' या न्यायाने आम्ही विचार बदलतो ;)
हम्म्म !
असे काय तरी बोला. आता नक्की विचार केल्या जाईल.
फुकट म्हणले, की ओरिजनल मध्ये नक्की फॉल्ट असतो हा आमचा मंडईचा सिद्धांत आहे बघा ;)
6 Jan 2012 - 7:05 pm | विजुभाऊ
लवकर नाव नोंदणी केल्यास वधूबरोबर स्टीलच्या ६ ताटांचा संच मोफत.
एका वर दोन फ्री अशी काही स्कीम आहे का?
अवांतरः सहा ताटे? इतकी कशाला?
6 Jan 2012 - 7:08 pm | सुहास..
लवकर नाव नोंदणी केल्यास वधूबरोबर स्टीलच्या ६ ताटांचा संच मोफत. >>>
उगा, पर्या , गडबडलेला, ह्या ताटात खावु का त्या ताटात , असा नयनचक्षु समोर उभा राहिला ;)
6 Jan 2012 - 11:07 pm | शिल्पा ब
ठ्याँ!!
10 Jan 2012 - 11:53 am | स्पा
"मराठी माणूस "
यांच्या सर्व मुद्द्यांशी सहमत
10 Jan 2012 - 9:22 pm | सुनील
शीर्षक वाचून असे वाटले की अमेरिकेतील मराठी मंडळीच्या राहणीमानाबद्दल काही निरीक्षणात्मक लेख असेल. प्रत्यक्षात "माहिती हवी" स्वरूपाचा लेख निघाला. :)
असो, मिळालेली माहिती उपयोगी ठरली असेल अशी आशा वाटते!